Word cup Final - 3 in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | वल्डकप फायनल - भाग ३

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

वल्डकप फायनल - भाग ३

वल्डकप फायनल भाग ३

लिव्ह इन रिलेशनशीप हा कायदा विवाह न करणाऱ्या लोकांसाठी असावा. विवाहानंतरच्या लोकांसाठी नको. तसा कायद्यात बदल व्हावा. अलिकडील वास्तविक परिस्थिती पाहता न्यायालयात घटस्फोटाची दाखल होणारी प्रकरणं जास्त आहेत व ती वाढतच आहेत. ही वाढत आहेत लिव्ह इन रिलेशनशीपच्या सरकारच्या कायद्यामुळे. तसं पाहता न्यायालयानंही इतर देशाप्रमाणे याही देशात लोकांना लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण्याची मुभा दिलेली आहे. तसं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये देशात कोणत्याही वयातील स्री व पुरुषांना राहता येतं. त्यातच अशा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये लोकं आपले आपले विवाहाचे पती वा पत्नीच सोडून नाही तर चांगला रमलेला संसार सोडून राहतात. परंतु यानं संसार उध्वस्त होतो. विवाहाला फाटा फुटतो व संस्काराचा मृत्यू होतो. तसं पाहता बऱ्याच समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे न्यायालयानं अशा कायद्याला मंजुरी द्यावी की विवाहाला फाटा फुटणार नाही. विवाह संस्कार तुटणार नाही. संस्काराचा मृत्यू होणार नाही. कारण विवाह ही अशी गोष्ट वा बंधन आहे की त्याचे धागे मजबूत नसतात. विवाह हा काचेसारखाच असतो. जी काच जशी क्षणीक धक्क्यानं तुटते. तसाच विवाहही तुटतो. याला जबाबदार जरी इतर गोष्टी असल्या तरी एक महत्वाचं कारण आहे लिव्ह इन रिलेशनशीप. म्हणूनच याचे गंभीर परिणाम लक्षात घेता सरकारनं देशातील सर्वांसाठी एकच कायदा बनवावा. देशातील अविवाहित तरुणांसाठी लिव्ह इन रिलेशनशीप असावं. विवाहीत लोकांसाठी नाही. जेणेकरुन विवाह झाल्यानंतरही आज जे लोकं लिव्ह इन रिलेशनशीप अंतर्गत पती पत्नीसोबत न राहता दुसऱ्याच परकीय माणसांसोबत मजेनं राहतात. प्रसंगी असे राहून आपल्याच जोडीदारांकडून खावटीही वसूल करतात. ही चिंतेची व गंभीर बाब आहे. असे राहतात, तेही घटस्फोट न घेता. त्यातूनच खुन, बलत्कार, अपहरण, बदला यासारखी गुन्हेगारी घडत असते. हे जर बंद करायचे असेल तर लिव्ह इन रिलेशनशीप हा कायदा विवाहपुर्व लोकांसाठी असावा. विवाहानंतरच्या लोकांसाठी नकोच.
लिव्ह इन रिलेशनशीप हे पती पत्नीच्या भांडणाचं महत्वाचं कारण आहे. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण अलिकडील काळात पती पत्नीमध्ये नेहमी भांडणं होत असतात. ती भांडणं एवढी मोठी होतात की त्यातून कधीकधी खुनही होत असतात. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. सध्याचा काळ हा सुशिक्षीत लोकांचा काळ आहे. मुलंच नाही तर मुलीही आज शिकायला लागल्या आहेत. परंतु तसं पाहिल्यास लोकं जरा जास्तच सुशिक्षीत झालेत. त्यामानानं मेंदू तेवढा सुशिक्षीत झाला नाही. तशीच शिक्षणाची टक्केवारी पाहिली तर मुली जास्त प्रमाणात शिकतांना दिसत आहेत. त्यामानानं मुलं कमी. त्यातच मुली ह्या उच्चतम टक्केवारी मिळवतात तर मुलं कमी. हा झाला शिक्षणाचा विषय. पुढं कामाचीही गती पाहिली असता मुली ह्या जास्त काम करतांना आढळतात. काही मेहनतीचीही कामं करतांना दिसतात. जसे बाहेर काम करुन आल्यावर घरातील स्वयंपाकाचीही कामं मुली करीत असतात. परंतु मुलं फक्त बाहेरची कामं करतात. घरची कामं करीत नाही. याचाच अर्थ स्वयंपाकाची कामं करीत नाहीत. तसा दर्जाच्या बाबींचा विचार केल्यास पुरुषांच्या बरोबरीने स्रियाही अंतराळात गेलेल्या आहेत. परंतु हे जरी खरे असले तरी जास्त ताकदीची कामं स्रिया करीत नाहीत. मात्र ती आपल्या मेंदूच्या ताकदीनं मोठमोठी कामंही पार पाडत असतात.
ताकदीची कामं.......होय. महिला ताकदीची कामं करीत असतात. परंतु ती कामं करीत असतांना त्या कुणाची तरी मदत घेत असतात. अशातच समजा त्यांना पतीनं पाहिलं तर त्या पतीच्या मनात शंका निर्माण होत असतात.
पुर्वीही तसंच असायचं. त्यामुळं पुर्वी स्रियांना कोणताही पती कामाला जावू देत नसे. यातूनच ना स्रियांचे कामाला जाणे, ना तिला ताकदीची कामं करावी लागणे, ना तिनं कोणी पुरुष मदतनीस पकडणे, ना तिचं वागणं पाहून कोणत्याही पतीच्या मनात शंका निर्माण होणे. या गोष्टी घडत असतात.
अलिकडील काळात तर लोकांच्या वागण्याचं चित्रच बदललं आहे. कालपर्यंत जी स्री कमऱ्याच्या चार भिंतीत बंदीस्त होती. ती आता बाहेर निघाली आहे. तिला पती असतांना ती परपुरुषांसोबत फिरु लागली आहे. त्यातच ती व्याभीचारही करु लागली आहे परपुरुषांसोबत. हे वास्तववादी चित्रण आज सर्वत्र दिसायला लागलं आहे. यात पुरुषही काही मागं नाहीत. पुरुषही आपली एक पत्नी असतांना परस्रीसोबत फिरु लागला आहे. त्यातच तो व्याभीचारही करु लागला आहे. अन् हे जेव्हा जोडीदाराला दिसतं. तेव्हा भांडणं होतात व तद्नंतर लिव्ह इन रिलेशनशीपचा वापर होतो. परंतु त्यामुळं चांगल्या संसारात वितुष्ट येतं. आज अशाच स्वरुपाचं स्री आणि पुरुष असलेल्या पती पत्नीचं वागणं एकमेकांना दिसत असल्यानं घटस्फोटाचं एक कारण म्हणून तेच कारण पुढं येत आहे.
वरील परिणाम पाहता याच प्रकारातून खुनही आज होत चाललेले आहेत. याबाबतीत एक प्रसंग असा घडला होता की त्या प्रसंगात एका पत्नीनं आपल्या प्रियकराला रात्री एक वाजता आपल्या पतीला गाढ झोपेत असतांना बोलावले व आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कारण तिला तो प्रियकर आवडत होता व ती त्याचेसोबतच राहणार होती. परंतु कधीकधी तिला मुलं असल्यानं मजबुरीनं पतीकडं येत होती व पतीही तिला राहू देत होता.
यात महत्वपुर्ण गोष्ट ही की कधी अशा परलोकांच्या विवाहबाह्य संबंधात पडून कधी पत्नी आपल्या पतीची हत्या करते तर कधी पती आपल्या पत्नीचीही हत्या करतो. तसंच आज असे विवाहबाह्य संबंध वाढत चाललेले आहेत. याचं कारण आहे आजचं पाश्चात्यीकरण. आज लोकं पाश्चात्य लोकांचं अनुकरण करुन विवाहबाह्य संबंध ठेवत आहेत. ते विवाहबाह्य संबंध ठेवू शकतात. कारण तेथील वातावरण विवाहबाह्य संबंध ठेवण्यास लाभदायक आहे. तसं येथील वातावरण नाही. ती आपली संस्कृतीही नाही. ही आपली भारतीय संस्कृती आहे व आपली भारतीय संस्कृती एक महान संस्कृती आहे. परंतु आपल्या अशाच प्रकारच्या विवाहबाह्य संबंधानं आपल्या देशात पतीपत्नींमध्ये शंका कुशंका शिरतात. ज्या शंका कुशंका मानवी मनाला घातक असतात व त्यातूनच पुढे वेगवेगळ्या समस्या वाढीस लागतात. कुठे घातपातही होतो.
अलिकडे याच विवाहबाह्य संबंधातून न्यायालयात घटस्फोटाचे खटले दाखल होत आहेत. त्यांचे प्रमाण जास्तच आहे. तसं पाहता ही देशाची एक गंभीर समस्या बनलेली आहे. यात निर्दोष असलेले पती वा पत्नी पिसले जातात. तसं पाहता यात वयाचं बंधन नसतं. नेमक्या वयात विवाहबाह्य संबंध निर्माण होतील असं काहीच नसतं. त्यातच वय वर्ष चौदा पुर्ण झाले की आजच्या काळात विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. जरी त्यांचं वय झालं नसलं तरी. तसेच कोणाचे विवाहबाह्य संबंध हे विवाहानंतर निर्माण होतात. यातच सरकारनं एक कायदा आणला आहे लिव्ह इन रिलेशनशीप. व्यक्ती विवाह न करता आपल्या विवाहाच्या व्यक्तीला सोडून कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही अन् केव्हाही दिर्घकाळ सहवास करु शकतो. राहू शकतो. याचाच अर्थ असा की विवाहानंतरही व्यक्तीचं त्याच्या जोडीदाराबरोबर पटत नसल्यास तो त्या जोडीदाराला सोडून आपल्या प्रियकरासोबत दिर्घकाळ राहू शकतो. यातूनच चांगल्या नात्यात विच्छेद निर्माण होतो व घटस्फोटाचे खटले दाखल होतात.
एकीकडे न्यायालयातील लिव्ह इन रिलेशनशीपच्या कायद्यानुसार लोकं घटस्फोटाचे खटले न्यायालयात दाखल करुन लढत असतात व निर्दोष असलेल्या पती वा पत्नीला सतावत असतात तर दुसरीकडे लिव्ह इन रिलेशनशीप अंतर्गत न्यायालयातून सुरक्षा असल्यानं व खुद्द न्यायालयानंच अभय दिलं असल्यानं प्रियकरांसोबत राहात असतात. हे आजचं वास्तविक वर्तमान आहे. यात महत्वपुर्ण गोष्ट ही की अशा विवाहबाह्य संबंधातून व लिव्ह इन रिलेशनशीप मधून आज विवाहाचं स्वरुप पालटलं आहे. संस्कृती मोडीत निघाली आहे. याचा परिणाम हा सर्वच गोष्टीवर झालेला आहे. जसा विवाह उशिरा होणे. याच विवाह उशिरा होण्यातून संतती न होणे, वांझपण येणे, कधीकधी विवाह होण्यापुर्वी असे संबंध असल्यास गर्भ राहू नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्याही घेतल्या जातात. त्यातूनच पुढं त्याचा परिणाम होवून वांझपण येतं.
महत्वपुर्ण गोष्ट ही की असे विवाहबाह्य संबंध व त्यातून निर्माण झालेल्या समस्या फार मोठ्या आहेत. त्या समस्या अलिकडील काळात वाढतच चालल्या आहेत. त्याचं कारण आहे आज न्यायालयानं लोकांना दिलेले अभय. यात महत्वाचा विचार असा की आज न्यायालयातील घटस्फोटाची वाढती प्रकरणं पाहता न्यायालयानं लिव्ह इन रिलेशनशीप प्रकरणावर विचार करावा. कायद्यातही तसाच बदल करावा. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याची अशा लोकांना परवानगी द्यावी की जे विवाहीत नाहीत वा ज्यांचा कुठंही विवाह झालेला नाही. असं जर न्यायालयानं केलं वा तसा बदल जर कायद्यात झालाच तर कदाचीत न्यायालयातील घटस्फोटाची जी प्रकरणं दाखल होत आहेत वा वाढत आहेत. त्याला खंड पडू शकतो वा पाडता येवू शकतो.
विशेष सांगायचं म्हणजे न्यायालयातील घटस्फोटाची प्रकरणं कमी व्हायला हवीत. कारण विवाह हा एक संस्कार आहे भारतीयांसाठी. ही बाब न्यायालयानंही लक्षात घ्यायला हवी व तसा बदल कायद्यात करायला हवा. जेणेकरुन विवाहानंतर लिव्ह इन रिलेशनशीप अंतर्गत राहणाऱ्या लोकांवर जरब बसेल व तेव्हाच घटस्फोटाची प्रकरणं आपोआपच कमी होतील किंवा कमी तरी करता येतील यात शंका नाही.
सरु आज दुःखी होती. कारण तिनं खटला दाखल केला होता पती मरण पावताच. परंतु तिच्या हातात काहीच गवसत नव्हतं. तसं पाहता तिला आठवत होते तिचे जुने दिवस. ती आठवत होती ते जुने दिवस. ज्यावेळेस सरु निघून गेलेली होती. त्यावेळेस तिचा घटस्फोट झालेला नसतांनाही तिनं एक प्रियकर ठेवलेला होता. ती त्याचेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होती. ती बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशीपमध्येच राहिली होती व पुढं तिचा विवाह झाला नसला तरी.

****************************************

सरु आज दुःखी होती. कारण तिनं खटला तर दाखल केला होता पती मरण पावताच. परंतु तिच्या हातात काहीच गवसत नव्हतं. तसं पाहता तिनं आजही पकडले होता एक व्यक्ती. त्याच व्यक्तीसोबत ती आताही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होती.
तिचे जुने दिवस. ती जुने दिवस विसरुन गेली होती. ज्यावेळेस सरु निघून गेलेली होती. त्यावेळेस तिचा घटस्फोट झालेला नसतांनाही तिनं एक प्रियकर ठेवलेला होता. ती त्याचेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होती. ती बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशीपमध्येच राहिली होती. परंतु तिनं त्यावेळेस सुरेशवर खटला टाकला नव्हता व पुढं तिनं आपला विवाह केला होता घटस्फोट न घेताच. त्यावेळेस ती वेगळी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात असली तरी तिनं खावटीची केस टाकली नव्हती. तशी ती लिव्ह इन रिलेशनशीप अंतर्गत मजेत होती व अपंग असलेल्या सुरेशला त्रास देत होती.
तो जुना प्रियकर नव्हे तर नंतर बनलेला पती. तो मरण पावताच तिनं आणखी नवीन मित्र बनवला होता. त्याचेशी ती विवाह करीत नव्हती, ना करणार होती. परंतु तिनं त्याला जवळ केलं होतं. त्याचेशी मैत्री केली होती व तिनं सुरेशवर खटला दाखल केला होता. त्याचं कारण म्हणजे म्हातारपणाची सोय व्हावी. तिला वाटत होते की म्हातारपणात तिचा मित्र तिला पोषणार नाही तर तिचा मुलगाच तिला पोषेल. यामुळेच तिनं सुरेशकडून एक मुलगा मिळावा म्हणून केस दाखल केली होती.
सुरेशही जिद्दी होता, तो अपंग असला तरी. त्याला तर तिची चीडच आली होती. त्याचं कारण होतं तिचं वागणं. ऐन वेळेस ती त्याला सोडून गेली होती लहानग्या अनिल व सुनीलला सोडून अन् आज ती मुलं लहानाची मोठी झाल्यावर हक्कं जतवत होती त्यांचेवर. तेच पटत नव्हते सुरेशच्या मनाला. तसं त्याचं वागणं चांगलं होतं. परंतु ते वागणं तिला आवडत नव्हतं.
सुरेश आज अपंग बनला होता. त्यामुळं तो हवा नव्हता तिला. तिला चांगला धडधाकट तरुण पती म्हणून हवा होता. तो तिला मिळालाही होता व त्याचेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्येच ती बरेच वर्ष राहिलीही होती. अन् तो गेल्यावरही तिनं पुन्हा लिव्ह इन रिलेशनशीप सुरु केली होती दुसऱ्याच एका नवीनच व्यक्तीसोबत. मात्र म्हातारपणाच्या दुःखानं तिला नियतीनं सुरेशवर खटला दायर करायला बाध्य केलं होतं.
आज खटला सुरु झाला होता सुरेशचा सरुसोबतचा. त्यातच ती हक्कं जरी मुलांच्या कस्टडीचा जतवत असली तरी न्यायालयानं त्या मुलांना बोलावलं व विचारणा केली की तुम्ही आपल्या आईजवळ जायला तयार आहात काय?
तो न्यायालयातील न्यायाधीश महोदयाचा प्रश्न. त्यावर उत्तर देत मुलं म्हणाली,
"न्यायाधीश महोदय, कोण आई? जी आई आम्हाला काही कळत नसतांना सोडून गेली. ती आई कसली? आमची खरी आई तर आमचे बाबा सुरेश आहेत की ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. आम्हाला शिकवलं. आम्हाला खाऊपिवू घातलं. आम्हाला उन्हातून सावलीत नेलं. आमच्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. त्यासाठी त्यांना पैसा हवा होता. तो पैसा आमच्या बाबांजवळ नव्हता आणि आम्हाला जगवणं तर आवश्यकच होतं. म्हणून आमच्या बाबांनी भीकही मागीतली आमच्यासाठी. अन् आमच्या आईनं काय केलं? आमच्या आईनं आमच्या बाबाला सोडलं ते अपंग बनले म्हणून. जेव्हा आमचे बाबा धडधाकट होते, तेव्हा आमची आई आमच्या बाबांजवळ टिकून होती व आमच्या बाबांबरोबरच राहात होती. अन् आमचे बाबा अपंग होताच ती सोडून गेली. कारण तिच्या इच्छा आमच्या बाबांच्यानं पुर्ण होत नव्हत्या. तसंच तिला वाटत होतं की तिची आमच्या बाबांच्या अपंगपणाला पाहून अब्रू जातेय. म्हणूनच ती सोडून गेली अन् सोडून जातांना आमचाही विचार केला नाही तिनं.
आमचे बाबा........ आमचे बाबा अपंग असूनही त्यांनी जगवलं आम्हाला आणि मा. महोदय, आज आम्ही जे काही आहोत, ते आमच्या बाबांमुळंच. तसं पाहता न्यायाधीश महोदय, आज आमच्या आईला म्हातारपणाची झळ गवसलेली दिसतेय. तिला माहीत आहे की आता म्हातारपणात तिला कोण पोसेल. म्हणूनच तिनं आमची कस्टडी मागीतली आहे. परंतु त्यात ती हे विसरली की तिची मुलं आता अंगठा चोखत नाहीत. ती मोठी झाली आहेत. ती नाबालीग राहिलेली नाही. ती अठरा वर्षाच्याही वर वयाची झाली आहेत. त्यांना सर्व कळतं व ते सक्षम असा निर्णयही घेवू शकतात. तेव्हा आम्ही आमच्याच सक्षम निर्णयानुसार आमच्या बाबाला सोडून कुणाकडेही अजिबात जाणार नाही. शिवाय म्हातारपण सर्वांनाच येत असतं हे बरेचजण विसरतात न्यायाधीश महोदय. जशी आमची आई विसरली. आमची आई आहे ती म्हणून काय झाले. लोकं जेव्हा तरुण असतात. ते तरुणपणात गुलछर्रे उडवीत रंगरलिया मनात ठेवून हिंडत असतात. ते आपल्या मुलांनाही विसरत असतात. अन् जेव्हा म्हातारपण येतं किंवा म्हातारपणाची चाहूल लागते. तेव्हा मात्र जुने तरुणपणाचे दिवस आठवत असतात. मग त्याच तरुणपणातील दिवसांचा पश्चाताप होत असतो. झालेल्या चुका आठवत असतात. माफी मागाविशी वाटते. परंतु न्यायाधीश महोदय, कोणत्याही स्वरुपाचा पश्चाताप करुन वा चुकांची माफी मागून गेलेले दिवस परत येवू शकतात काय? याचं उत्तर नाही असंच येतं. जे आमच्या आईनं केलं. काल आमच्या आईनं आम्हाला व आमच्या बाबांना सोडून जावून अतीव त्रासच दिला होता. आज तिला जेव्हा गरज भासली. तेव्हाही तिनं आमच्या बाबांवर खटला टाकून त्रासच दिला आहे. म्हणत आहे की एकतरी मुलगा मला द्यावा. अन् नसेल तसं होत तर त्यांनी खावटी द्यावी तिला. आता आम्ही त्यांची मुलं. आम्ही अठरा वर्षे वर वयाची झालेली असून कोणाकडे राहायचं हा आमचा निर्णय आहे. तसं खावटीच्याही संदर्भात सांगतो न्यायाधीश महोदय की आमचे बाबा कसेतरी रस्त्यारस्त्यांवर भीक मागून केस लढत आहेत व आम्हाला पालवत आहेत. आमचं पोट भरत आहेत. आमचं शिक्षण करीत आहेत. ते कुठून खावटी देणार! तरीही आमची आई त्यांना खावटी मागत आहे. ठीक आहे तिचं खावटी मागणं. परंतु यात विचार असा आहे की एवढे वर्ष झाले. आमच्या आईनं आमच्याकडे व आमच्या बाबांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ती कुठं गेली होती. कुठं राहात होती हे माहीत नाही. तिला एवढ्या वर्षानंतर अचानक जाग आली. मग तिला खावटी द्यायची कुठून? ही बाब न्यायाधीश महोदय, विचार करण्यालायक आहे. तेव्हा आपणास विनंती आहे की आमच्या याच साक्षीनं आमच्या आईची खावटीची अट रद्द करावी व आमच्या बाबांना तिच्यापासून मोकळीक मिळवून द्यावी."
मुलांचे बयाण झाले. तसं न्यायाधीश महोदयांनी सुरेशला विचारलं.
"तुम्हाला तुमच्या बयाणात काही सांगायचं आहे का?"
न्यायाधीश महोदयांनी विचारलेला तो प्रश्न. तसा सुरेश म्हणाला,
"मी काय सांगणार यावर न्यायाधीश महोदय. मी तर ठरलो अपंग. पायानं आणि सर्वच गोष्टीनं. तसा माझ्या पत्नीचा खावटीचा प्रश्न. मी कुठून खावटी देणार तिला. तिनंच मला खावटी द्यावी. कारण सध्या जर चौकशी केली ना न्यायाधीश महोदय की कोणाकडे संपत्ती जास्त आहे. तर ती तिचीच आढळून येणार. मग खावटी काय गरीब असलेल्या व्यक्तीसमुदायाकडून वसूल करावी की श्रीमंत समुदायाकडून. त्याचाच विचार करावा न्यायाधीश महोदय. शिवाय खावटी जर मागायची होती तर आजपर्यंत ही कुठं गेली होती? याचा हिशोब द्यावा न्यायाधीश महोदय हिनं. हिला विचारावं की ती एवढे दिवस कुठं गेली होती?"
सुरेशचा तो प्रश्न. तसं ते ऐकून घेताच न्यायाधीश महोदय तिला म्हणाले,
"जरा कठड्यात येवून सांगताय काय की आपण एवढे दिवस कुठं गेले होते?"
न्यायाधीश महोदयांनी विचारलेला प्रश्न. तशी ती कठड्यात आली व तिनं सफाईनं उत्तर दिलं.
"मी कुठंच गेली नव्हती. मी माझ्या बाबांकडेच राहात होती."
तिची सफाई. ती सफाई ऐकताच न्यायाधीश महोदय सुरेशला म्हणाले,
"तिचं उत्तर आलेलं आहे. आता मला सांगावं कठड्यात येवून की आपलं यावर काय म्हणणं आहे?"
सुरेशनं ते न्यायाधीश महोदयांचं बोलणं ऐकलं व त्यावर जरा विचार केला व विचारांती तो कठड्यात आला व तो पुराव्यासह म्हणाला,
"न्यायाधीश महोदय, ही चक्कं खोटं बोलतेय. हीनं विवाह केला होता कुठल्याही स्वरुपाचा घटस्फोट माझ्याकडून न घेता. त्याचा पुरावाही माझ्याकडे आहे."
न्यायाधीश महोदयांना तिच्या विवाहाचा पुरावा सुरेशनं दिला. त्यावेळेस तिला आश्चर्यच वाटलं. ती विचार करीत होती की त्याचेजवळ असा पुरावा आलाच कसा?
न्यायाधीश महोदयांनी तो पुरावा घेतला व तो पुरावा घेतल्यानंतर त्यात पाहिलं. चक्कं तो पुरावा म्हणजे सरुच्या दुसऱ्या विवाहाचाच पुरावा होता. तसे न्यायाधीश महोदय म्हणाले,
"आणखी आपल्याला काही सांगायचं आहे काय?"
"होय. मला बरंच सांगायचं आहे."
"सांगा. परंतु कठड्यात येवून अन् तेही लांबवत नाही. जरा थोडक्यात."
"ठीक आहे." तो म्हणाला व कठड्यात येवून तो सांगू लागला.
"न्यायाधीश महोदय, आपण असा निर्णय द्यावा की खावटी ही त्यांना द्यावी. जो गरीब असेल. मग ती पत्नी असो वा पती. जर पत्नी कमवीत जरी नसेल आणि तिच्या वाट्याला पत्नीच्या माहेरची भरपूर मालमत्ता जर असेल तर तिला खावटीच मिळू नये. शिवाय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये कोणाच्याही पहिल्या विवाहापुर्वी कोणालाही राहता यावे. त्याच्या पहिल्या विवाहानंतर कोणालाही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नसावा. तसं त्यांचं राहाणं म्हणजे विवाहासारख्या पवित्र नात्यात विच्छेद निर्माण करणं होय.
माननिय महोदय, आपल्या देशात विवाह हा एक पवित्र संस्कार मानला जातो. त्याला फार मोठं महत्व आहे. जर अशावेळेस आपण विवाहानंतरच्या लिव्ह इन रिलेशनशीपला मान्यता दिली तर हा विवाहासारखा संस्कार मिटेल, तुटेल यात शंका नाही. विवाहाचं स्वरुप व महत्व नष्ट होईल व कोणीही विवाहीत पुरुष केव्हाही कुणाहीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी पळून जातील आपल्या मुलाबाळांचा विचार न करता. मग यात लेकरांचा दोष जरी नसला तरी लेकरांना त्याचा त्रास भोगावाच लागेल यात शंका नाही. तेव्हा आपणास कृपा करुन विनंती आहे की माझी ही विनंती लक्षात घेवून कोणत्याही स्री पुरुषास विवाह झाल्यानंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याची परवानगी देवू नये. निदान लहान मुलांच्या निरागसपणाकडे तरी पाहावे."
सुरेशचं ते म्हणणं. तसं पाहता ते म्हणणं व न्यायालयीन प्रक्रिया सुरु असतांना मधातच सुरेशचा लहान मुलगा अनिल म्हणाला,
"न्यायाधीश महोदय, मलाही काही सांगायचं आहे या प्रकरणात. जरा सांगू का?"
न्यायाधीश महोदयांनी ते ऐकलं व ते म्हणाले,
"कठड्यात येवून सांगावं."
न्यायाधीश महोदयांनी तसं म्हणताच अनिल कठड्यात आला व बोलायला त्यानं सुरुवात केली.
"न्यायाधीश महोदय, माझे बाबा काही साधारण व्यक्ती नाहीत. ते एक आंतरराष्ट्रीय वल्डकप खेळलेले एक गृहस्थ आहेत. तुम्हाला कदाचीत कल्पनाही नसेल की आपला देश वल्डकप फायनलपर्यंत गेला व फायनलला गेल्यावर हारला. त्याचं कारण होतं माझ्या बाबांचं वल्डकपमध्ये नसणं.
माझे बाबा जेव्हापर्यंत वल्डकपच्या स्पर्धेत खेळले. तेव्हापर्यंत आपला देश वल्डकपच्या मॅच जिंकत राहिला. परंतु जेव्हा ते जी मॅच खेळले नाहीत. तेव्हाच आपला देश सपसेल हारला. त्याचं कारण होतं बुकी. बुकींनी आमच्या बाबांना धमकी दिली होती की त्यांनी वल्डकपच्या मॅचेसमध्ये चांगलं खेळू नये. परंतु माझे बाबा त्यांचं न ऐकता खेळले. त्यातच ते बुकी चिडले व त्यांनी वल्डकप फायनलच्या रात्री माझ्या बाबांचा अपघात केला. त्यामुळंच माझे बाबा वल्डकप दरम्यान फायनल खेळू शकले नाहीत व आपला देश वल्डकप हारला. त्यानंतर माझ्या बाबांना त्याचं अतिशय वाईट वाटलं. एवढं वाईट वाटलं की ते अज्ञातवासात निघून गेले. त्यानंतर माझ्या बाबांना अपंग झालेले पाहून आमची आईही. आता मला विशेषकरुन हेच सांगायचं आहे व न्यायालयांना विनंती करायची आहे की काल आम्हाला जेव्हा आईची गरज होती, तेव्हा आमच्याजवळ आई नव्हती. ती आम्हाला सोडून गेली होती. आमचा विचार करता. आज त्याच आईला आम्हाला धडा शिकवायचा आहे. आज न्यायाधीश महोदयानं असा निकाल द्यावा की जो निर्णय जगाचा इतिहास बनेल. निर्णय असा द्यावा की जी आई कोणत्याही बाळाला लहानपणी गरज असतांना सोडून जात असेल तर त्या बाळाला पुढं त्याच आईनं बाळ म्हणू नये वा बाळ समजू नये व बाळानंही तिला आई म्हणू नये."
अनिलचं ते बोलणंही न्यायालयानं ऐकलं व न्यायालयात न्यायाधीश महोदय शेवटी बोलके झाले. ते म्हणाले,
"मी सर्व ऐकलं. अशिलांनी आपलं म्हणणं मांडलं. तसंच म्हणणं साक्षीदार असलेल्या मुलांनीही मांडलं. तसंच म्हणणं प्रतिपक्षानंही. ते बयाण ऐकून लक्षात आलं की या खटल्यातील अशिलानं प्रसंगी खावटीसाठी खटला जरी उभारला असेल. परंतु अशिल दोषी असल्याचं दिसतं. कारण प्रत्यक्ष साक्षपुराव्यावरुन व बयाणावरुन हे लक्षात आलं की अशिल असलेली सरु ही प्रतिपक्ष असलेल्या सुरेशला बऱ्याच दिवसांपासून नव्हे तर वर्षापासून सोडून गेली आहे. तसेच ती त्यांना संकटात असतांना सोडून गेलेली आहे. ते तरुणपण..... ज्या तरुणपणात तिनं प्रतिपक्ष अपंग झाले असता त्यांना साथ द्यायला हवी होती. ती न देता, ती त्यांना सोडून जाणे म्हणजे एक दृष्कृत्य आहे व ही घटना कधीच क्षमा करण्यासारखी नाही. शिवाय अशिलानं आपल्या खटल्यात अशाच अपंग बनलेल्या आपल्या संसाराच्या सोबत्यास त्याला मदत देण्याऐवजी खावटी मागून त्याला दंडीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रकार निंदनीय आहे.
साक्षीदार असलेल्या मुलांकडून कळलं की प्रतिपक्ष असलेले व्यक्ती हे त्यांचे बाबा असून ते एक समाजातील मानवाईक व्यक्तीमत्व आहे. ते अपंग झाले, त्याचं कारणही न्यायालयाच्या लक्षात आलं आहे. ते इमानदारीनं वागल्यामुळे त्यांचा कोणीतरी अपघात केलेला आहे हे लक्षात येतं. त्यावेळेस त्यांना अशिलानं मदत करायला हवी होती. परंतु ती मदत झाली नाही. जसा सैनिक अपंग व्हावा व त्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याची सेवा करु नये.
संबंधीत खटला हा एक ऐतिहासिक खटला आहे व हा खटला एक ऐतिहासिक खटला ठरणार असून यातून बऱ्याच नवीन गोष्टी न्यायालयाला समजलेल्या आहेत. पहिली गोष्ट ही की खावटी अशांना द्यावी, जे खरोखरच गरीब आहेत. हवी तर त्यांच्या संपत्तीची शहानिशा व्हावी व दुसरी गोष्ट ही समजली आहे की लिव्ह इन रिलेशनशीप हे विवाह न झालेल्या तरुणांसाठी असावं. विवाह झालेल्या तरुणांसाठी नाही. कारण तसं ते असल्यामुळंच आज घटस्फोटाची प्रकरणं जास्त वाढत चाललेली आहेत हे न्यायालयाच्या लक्षात आले आहे. तसंच न्यायालयाच्या हेही लक्षात आले आहे की देशात विवाह हा एक उत्तम संस्कार असून लिव्ह इन रिलेशनशीप हा संस्कार नाही. तर तो एक व्याभीचार वाटतो. त्यामुळं ती पद्धत जरी चांगली असली आणि समाजाला चांगली वाटत असली तरी ती समाजाला बिघडविणारी वाटते. तेव्हा हा लिव्ह इन रिलेशनशीपचा कायदा, समाजातील संस्कार लक्षात घेता न्यायालय स्वतः पुढाकार घेवून बंद करीत आहे. तसंच खावटीबाबत मी स्वतः न्यायाधीश म्हणून न्यायालयामार्फत आपलं नवीन मत मांडत आहे की आजपासून खावटीचा खटला जर न्यायालयात आला तर त्या खटल्यावर न्यायालय गंभीर विचार करेल व खावटी जरी कोणत्याही पक्षकारानं कुणालाही मागीतली तरी प्रत्यक्ष न्यायालय त्याच्या संपत्तीची चौकशी करेल व ज्याला खरंच आवश्यक आहे खावटी, त्याला खावटी प्रदान करेल. मग ते न्यायालय याचा विचार करणार नाही की तो खावटीचा खटला अशिलानं दाखल केला.
खटल्याबाबत सुनावणी करतांना न्यायालय या निर्णयापर्यंत येवून पोहोचले आहे आणि निकाल देत आहे की या खटल्यातील आरोपी हा निर्दोष असून या खटल्यात पक्षकारच दोषी आहे. या खटल्यातील पक्षकारानं निव्वळ प्रतिपक्षाला त्रास दिलेला आहे हे प्रत्यक्ष साक्षपुराव्यावरुन सिद्ध झालं आहे. तसाच हा खटलाही अशिलानं प्रतिपक्षाला त्रास देण्यासाठीच उभारलेला दिसतो. शिवाय संबंधीत कागदपत्रावरुन हे दिसून आलं आहे की पक्षकार हा बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशीपमध्येच राहात होता व नंतर तिनं आपला विवाहही केला होता. तेव्हा न्यायालयात खटला जरी पक्षकारानं दाखल केला असेल तरी तो खटला प्रत्यक्ष प्रतिपक्षाला त्रास देण्यासाठी टाकलेला आहे हे प्रत्यक्ष पुराव्यावरुन सिद्ध झाल्यानं न्यायालय त्या निर्णयापर्यंत येवून निकाल देत आहे आणि त्यात शिक्षेची तरतूद आहे. हा निकाल एक ऐतिहासिक निकाल असून या प्रकारच्या पहिल्याच खटल्यात न्यायालय पक्षकाराला पाचशे रुपये दंड व दोन वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावत आहे. ही शिक्षा यासाठी आहे की यापुढे कोणीही कोणाला त्रास देणार नाही. तसेच कोणीही कोणाला त्रास देण्यासाठी खटला टाकणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. हाच न्यायालयाचा अंतिम निर्णय होय. तसंच ज्या प्रतिपक्षाला त्रास देण्यासाठी सदर खटला उभारण्यात आला होता. त्या प्रतिपक्षाला अतिशय सन्मानानं न्यायालय सोडून देत आहे. That case is end."
न्यायालयानं आपला निकाल सुनावला होता. तसा तो निकाल ऐतिहासिक असाच होता. त्या निकालात प्रथमच पक्षकाराला शिक्षा व दंड झाला होता.
तो खटला....... त्या खटल्यात सरुला दोन वर्षाचा सक्षम कारावास व पाचशे रुपयाचा दंड झाला. जरी ती पक्षकार होती तरी. हा निर्णय अफलातून घडला होता. त्याचं कारण होतं तिच्या पतीनं तिच्याविरोधात गोळा केलेले पुरावे. तो अपंग होता. परंतु तो फार हुशार होता व त्यानं अपंग असुनही पुरावे गोळा केले होते. शिवाय या खटल्यात संभाव्य धोका लक्षात घेता लिव्ह इन रिलेशनशीप हा कायदा न्यायालयानं बंदच करुन टाकला होता व खावटी ही शहानिशा करुन द्यावी असंही निकालात म्हटलं होतं.
निकाल झाला होता. तशी सरु दोषी ठरली होती. तसं पाहता तिनं आपल्या अंतर्गत फायद्यासाठी तो खटला दाखल केला होता. तिला वाटत होतं की एखादं मुल न्यायालयातून मिळेल व तिचा तो म्हातारपणाचा आधार ठरेल. शिवाय खावटी जर मिळाली तर तिचं म्हातारपण अगदी सुखात जाईल. परंतु तो तिच्या मनातील भ्रम होता. तो भ्रम तसाच राहिला होता. उलट तिला शिक्षा झाली होती व दंडही झाला होता.
निर्णय होताच लवकरच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं व जे तिनं कधी सोचलं नव्हतं ते तिच्यासोबत झालं. त्यानंतर तिला बेड्या पडल्या. ते पाहून ती आशाळभूत नजरेनं आपला पती सुरेशकडं पाहात होती व आपल्या मुलांकडेही. परंतु तिची मुलं तिचीच असून त्यांना दया आली नाही. उलट तिच्या पतीला दया आली व तिचा पती न्यायालयात न्यायाधीशासमोर हात जोडून म्हणाला,
"मा. महोदय, मला काही सांगायचं आहे. हवं तर मला तुम्ही बेड्या घाला. हवं तर दोन वर्षाऐवजी पाच वर्षाची शिक्षा द्या. परंतु हिला सोडा."
ते सुरेशचे बोल. तसे न्यायाधीश महोदय सरुला म्हणाले,
"बघा, तुमच्या पतीच्या मनात किती तुमच्याबद्दल दया अन् सहानुभूती आहे ती. नाहीतर तुम्ही. तुम्ही तर त्यांना संकटात लोटून सोडून गेल्या होत्या."
न्यायाधीश महोदयांनी तिला म्हटलं. त्यानंतर त्यांनी सुरेशकडे आपला मोर्चा वळवला व म्हणाले,
"तुम्ही काय समजता हो स्वतःला. हे न्यायालय म्हणजे खेळगंमत आहे की काय. जसं तुमच्या मतावरच चालेल. न्यायालयाचेही काही नियम आहेत. त्याच नियमानुसार न्याय द्यावा लागतो. मग कुणाला राग आला तरी चालेल. या निकालानुसार कोणाला राग येतो तर कोणी आनंदी होतात. अहो निकाल हा निकाल असतो. ती दगडावरची रेघ असते. ती कधीच बदलवता येत नाही. असा निर्णय जर वेळोवेळी बदलला की नाही, तर लोकांचा न्यायावरचा विश्वास तुटेल व लोकं न्यायासाठी कधीच न्यायालयात येणार नाहीत. म्हणूनच सांगतोय, न्यायालयाला कमजोर समजू नका. तसं पाहिल्यास न्यायालय तुमच्यासारख्याच माणसांमार्फत बदनाम होत असतं व बदनाम झालं आहे."
सरुला बेड्या ठोकल्या होत्या. त्यातच ती आशाळभूत नजरेनं त्याच्याकडं पाहात होती. तसा आता तिला पश्चाताप होत होता. तसा काही वेळाचा अवकाश. पोलीस तिला न्यायला लागले होते. तशी ती म्हणाली,
"मला थोडी सवड द्या. जरा मला माझ्या पतीशी बोलायचं आहे. माझी एवढीच एक विनंती आहे."
तिचं ते बोलणं. ती पोलिसांशी तसं बोलताच पोलिसांनी तिची विनंती स्विकार केली व तिला तिच्या पतीसोबत बोलायची परवानगी दिली. तसा तिचा पतीही तिच्याशी बोलका झाला.
सरु पतीकडे आली. तशी हात जोडून खाली बसली. तिनं खाली मान टाकली. त्यानंतर तिनं डोळ्यातून घळघळा अश्रू बाहेर काढले. ते त्याच्या चरणावर टपकले. तसे तिनं हात जोडले व ती म्हणाली,
"मी तुम्हाला माफी मागण्याच्या लायक नाही. परंतु तरीही माफी मागते. मला हवं तर माफ करा. येते मी."
सरुनं म्हटलेले ते शब्द. ते शब्द ऐकताच त्याच्याही डोळ्यातून घळघळा अश्रू निघाले. परंतु आता त्या अश्रूंचा काही उपयोग नव्हता. थोड्याच वेळाचा अवकाश. सरुला पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवलं व व्हॅन भरधाव वेगानं बाहेर पडली. तो मात्र तिथंच थांबला व त्या व्हॅनकडे तो आपल्या आशाळभूत नजरेनं पाहात राहिला. तो तिथंच थांबला होता. बराचवेळपर्यंत, जेव्हा ती व्हॅन दिसेनासी झाली होती, तेव्हापर्यंत तो तिच्या व्हॅनकडेच पाहात होता. एकटक अन् डोळे न मिटता. त्यावेळेस खरंच त्याचे डोळे पानावले होते.

********************************************

आज दोन वर्ष झाले होते. सरु सुटणार होती तुरुंगातून. तिला न्यायालयानं कैदेत टाकलं होतं. त्रास देणारा खटला टाकला म्हणून व न्यायालयाचा वेळ वाया घालवला म्हणून. त्यातच असा खटला टाकतांना सरुनं विचारही केला नव्हता. ते जेव्हा न्यायालयाच्या लक्षात आलं होतं, तेव्हा थेट न्यायाधीश महोदयांनी तिला तुरुंगातच पाठवलं होतं.
सरु सुटणार होती हे सुरेशला माहीत होते. तसं प्रेम होतंच सरुवर. परंतु आता जास्त प्रेम निर्माण झालं होतं सरुवर. तसं पाहता सरु सुटणार आहे हे पाहून त्याला आनंद झाला होता. विशेष बाब ही होती की ती आजपर्यंत जरी त्याच्याजवळ राहिली नाही तरी चालेल, परंतु आता आयुष्यातील उरलेले दिवस तिच्यासोबत अगदी सुखात काढावे असं तिला वाटत होतं. तसं पाहता तिला तुरुंगवास झाल्यानं त्याला वाईट वाटत होतं व त्याचाच पश्चाताप करण्यासाठी व माफी मागण्यासाठी तो तिला भेटायला तुरुंगात जात होता. त्यानं बराच प्रयत्न केला होता तिला सोडविण्याचा. परंतु ती सुटू शकली नाही.
असाच तो दिवस उजळला व त्या दिवशी ती तुरुंगातून सुटली व सुरेश तिला आणायला जातीनं हजर झाला. तशी ती बाहेर आली.
सरु बाहेर आली होती. परंतु तिला न्यायला तिचा तो मित्र दिसला नाही. ना तो आजपर्यंतच्या खटल्यात सोबतीला होता. तिला फक्त नि फक्त तिच्या नजरेसमोर तिचा पती दिसला. जो अपंग होता. दोघांची नजरानजर झाली. परंतु तिला त्याचेशी बोलायला शरम वाटत होती. तोच तो म्हणाला,
"सरु, मी तुला न्यायला आलो आहे. आता तरी चल घरी. आपल्या घरी."
सुरेशनं म्हटलेले शब्द. ते शब्द तिच्या कानावर पडले. तशी ती त्याचेजवळ आली. म्हणाली,
"आपण? आपण आलात मला न्यायला. आपण माफ केलं मला आणि आपण चालही म्हटलं मला. ठीक आहे. पण मुलं काय म्हणतील?"
"मुलं काहीही म्हणू देत. मला काही करायचं नाही. तू आता चाल. कालपर्यंत जे झालं ते सगळं विसरुन."
सुरेश बोलून गेला खरा. तसं त्याच्या बोलण्यात माधुर्य होतं. परंतु आता तिला तिचीच स्वतःची लाज वाटत होती. ती मनातल्या मनात विचार करीत होती. तसा तो पुन्हा म्हणाला,
"सरु, मी काय बोलत आहे. तुझं माझ्या बोलण्याकडे तरी लक्ष आहे काय?"
सुरेशचे ते बोल. तशी ती भानावर आली. म्हणाली,
"ठीक आहे."
सरु बऱ्या बोलानं तयार झाली होती. ती त्याचेसोबत त्याच्या घरी आली. तसा त्याच्या मनातून आनंद ओसंडून वाहात होता. जसा नदीला पूर येतो तसा.
ते दोघंही पती पत्नी घरी आले होते. सायंकाळ होत आली होती. तसे त्यांचे दोन्ही लेकरं घराकडं परतत होती.
अनिल व सुनील घराकडं परतले. तसं घराकडं परतल्यावर त्यांनी पाहिलं की घरात एक स्री दिसत असून ती आपली आई आहे. तसं बऱ्याच दिवसांपासून पहिल्यांदाच पाहिल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. तसा त्यांना तिला पाहताच आनंदही झाला होता. कारण ती बऱ्याच वर्षानंतर त्यांच्या नजरेला पडली होती. परंतु आश्चर्याचा बाऊ न करता ते घरात गेले. त्यानंतर त्यांनी बापाला म्हटलं,
"बाबा, ही कोण? अन् ही इथं कशी?"
तसा सुरेश बोलणारच होता. तशी तीच बोलली.
"बाळांनो, मी तुमची आई. मला तुम्ही असे बोलता?"
"बोलणारच. तू आमची आई कसली? आम्हाला बालपणातच सोडून जातांना हे माझे बाळ कसे जगतील? याचं काहीच वाटलं नाही तुला? तू तर आम्हाला काही कळायच्या पुर्वीच सोडून गेली होती. उलट बाबा अपंग असतांना तू तर त्यांचेवर खटलेही टाकले होतं. मग तू आमची आई कसली? अन् बाबांचीही पत्नी होवू शकत नाही. अगं एवढे दिवस कुठं होती तू?"
मुलाचं ते बोलणं. ते बोलणं पुर्ण होताच ती म्हणाली,
"बाळांनो, मी नऊ महिने तुम्हाला पोटात ठेवले. वाढवलं तुम्हाला नऊ महिने पोटात. मी जर तुम्हाला नऊ महिने पोटात वाढवलं नसतं तर खरंच तुम्ही मोठे तरी झाले असते का? अन् आज गोष्टी तरी सांगू शकले असते का?"
"हो, नऊ महिने गर्भात ठेवून आमच्यावर उपकार केले काय? त्यापेक्षा आम्हाला मारुन टाकलं असतं तर बरं झालं असतं की नाही. ना बास राहिला असता, ना बासरी वाजली असती. बरं झालं आमचे बाबा होते म्हणून. नाहीतर आमच्यासमोर उपाशीच मरायची पाळी होती. ज्या वयात तुझं काम होतं. त्या वयात तू सोडून गेली होती. अन् आता आम्ही मोठे झालो व तुझं काम अजिबात संपलं. त्या वयात आलीय तू. मतलबी कुठली. अशी आमची आई होवू शकत नाही व आम्ही तुला कधीच आई म्हणणार नाही. जावू शकते तू."
"मी आता कुठे जावू?"
"जिथं पुर्वी राहात होती, तिथं जा. हे आमचं घर आहे. तुझं नाही."
"ठीक आहे. मी जातेय." असं म्हणत ती घरात जायला निघाली. तोच सुरेश बोलला,
"एक मिनीट थांबा. कोणी कुठंच जाणार नाही. अन् तशी वेळ आलीच तर या घरातून प्रत्येकजण जाणार. मग मिही जाणार. कोणाकडेच राहणार नाही."
तिचं व त्या मुलांमध्ये चाललेला संवाद सुरेश ऐकत होता. त्यानं ऐकलं होतं मुलांनी तिला जा म्हटलेलं. तसं त्यानं त्याच्या पत्नीच्या तोंडून ठीक आहे असंही ऐकलं होतं. तसं त्याला वाटत होतं की ती जावू शकते.
मुलं आपल्या वडीलांवर जास्त प्रेम करीत होती. त्यांनी आपल्या वडीलाचे बोल ऐकले. जर जायचंच असेल तर सगळेच जाणार. कोणीच थांबणार नाही इथं. तसा विचार मुलं करु लागले. 'बाबांनीच आणली हिला. नाहीतर ही कशाला आली असती. अन् ज्या बापानं आपल्याला मोठं केलंय. तो आपल्यासोबत राहिलाच नाही तर आपण काय मिळवलं. काहीच नाही. निदान आपल्या वडीलासाठी तरी आपल्याला चूप बसणं गरजेचं. शेवटी विचार करुन ते म्हणाले,
"आम्ही हिला माफ करतो. परंतु एका अटीवर. हिनं आमच्याशी अजिबात बोलू नये. तसं तिनं कबूल करावं म्हणजे तिला इथं राहू देता येईल."
मुलांचं ते बोलणं. तसा त्यांच्या वडीलानं तिला आवाज दिला. तशी ती आपले कपडे एका पिशवीत भरुन बाहेर आली. तसा तो म्हणाला,
"हे काय? तू निघालीस की काय?"
"होय, निघालोय. काय करु?"
"कुठं जाणार?"
"आपल्या घरी."
"नाही. कुणी कुठंच जाणार नाही. अन् जायचंच असेल तर जा. तुम्ही काहीही करा. मीही जातो."
"मग ही मुलं? ही मुलं तर मला काढायला लागलीत घराच्या बाहेर."
"नाही काढणार. तसे संस्कार नाही माझे त्यांचेवर. फक्त एकच अट. तू त्यांचेशी अजिबात बोलू नये. ती अट जर मंजूर नसेल तर तू राहा इथं. मुलांना जिथं जावंसं वाटेल, तिथं जातील. मात्र मी आजपासून त्यांच्याकडं राहाणार नाही."
सुरेश बोलून गेला. तशी मुलं म्हणाली,
"असं कसं? तुम्हाला सोडून आम्ही कुठं जाणार? अन् तुम्हीही आम्हाला सोडून जायचं नाही. आम्हीही जाणार नाही. सगळे राहा इथंच." असे म्हणत ती मुलं घराच्या आत गेली.
मुलांनी तिला राहण्याबद्दल होकार दिला होता. मात्र ती अजुनही काहीवेळ आपलं सामान हातातच घेवून स्तब्ध उभी होती. तसा सुरेश म्हणाला,
"आता जाणं अंदर. वाट कुणाची पाहते. जा आत. अन् चहा ठेव सर्वांसाठी."
सुरेशनं म्हटल्यानंतर सरु आतमध्ये गेली. तिनं आपलं सगळं सामान बाजूला ठेवलं व चहाचं आंधण घेवून ती बाहेर आली. तेव्हापर्यंत कडेकोट अंधार पडला होता. ती जेवन बनविण्याची वेळ होती. परंतु सरु आता चहा बनवीत होती.
सरुनं चहा आणला होता. तो सर्वांना दिला. मोठ्या मुलानं चहाचा कप घेतला नाही. तोच सुरेशनं त्याला डोळे दाखवले. तसे ते आपल्याच वडीलाचे विस्फारलेले डोळे पाहल्यावर तो चूप बसला व चहाचा घोट घेवू लागला. त्यानंतर सरुनं स्वयंपाक केला व रात्रीला त्या खमंग जेवणावर ताव मारत सर्वजण आनंदानं झोपी गेले होते. उद्याच्या दिवसाची वाट पाहात. जणू त्यांना वाटत होतं की उद्याचा दिवस काहीतरी नवीन परंतु चांगलं घेवून येईल.

*******************************************

तो आगामी वल्डकप. त्या वल्डकपची तयारी करीत होते ते लोकं. तसं पाहता ती तयारी होताच वल्डकपचा खेळ सुरु झाला होता. एकएक सामना रोमांचकारी होत होता.
तो वल्डकपचा सुरुवातीचा सामना. त्यातच त्या सामन्याची सुरुवात झाली होती. सामना चांगलाच रंगतदार झाला होता. तसं पाहता तो सामना हारता हारता जिंकला होता. तसं पाहता यावेळेस कप्तान म्हणून सुरेशचा मोठा मुलगा सुनील होता. त्यातच दोघंही भाऊ वल्डकपच्या सामन्यात खेळत होते.
सुनील व त्याचा संघ वल्डकप खेळत होते. परंतु त्याला अनुभव होता मागील सामन्याचा. त्याला माहीत होतं की मागील वल्डकपच्या सामन्यात त्या दोघाच भावानं जास्त धावा, जास्त रनरेटनं केल्या होत्या. तरीही फायनल हारली होती. कारण ते दोघंही भाऊ आतापर्यंत ओपनिंगलाच येत असत. तसं पाहता ते गतवेळेसही ओपनिंगलाच आले होते व ते बाद होताच बाकीचे गडी हे पटापट बाद झाले होते व सामना इतर संघाच्या घशात गेला होता. तसंच त्याला संघनायकानं चांगली खेळी खेळशील नको असंही सांगीतलं होतं. परंतु तो खेळला होता. तसा त्याला एक इतिहास माहीत होता त्याच्या वडीलाचा. त्याच्या वडीलांचा बुकीनच अपघात घडवला होता. हा इतिहास होता.
अनिल व सुनील ही सुरेशची मुलं होती. तसं सुरेशनंच त्यांना क्रिकेटचं मार्गदर्शन केलं होतं. त्याची इच्छा होती वल्डकप जिंकायची. ती नष्ट झाली होती अपघातानं. परंतु आज त्याला आपल्या मुलांच्या रुपात ती पुर्ण होणार याचं स्वप्न दिसत होतं नव्हे तर चित्र.
पहिला सामना झाला होता. त्यावेळेस इतर खेळाडू बरोबर खेळले नव्हते. तसं पाहता दोघंही भाऊ नेहमीप्रमाणेच ओपनिंगलाच आले होते व मागील वल्डकपच्या सामन्यासारखा चांगला रनरेट असतांना इतर खेळाडू चांगले खेळले नव्हते. त्यातच तो सामना कसातरी जिंकला गेला. दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
सुनीलसमोर अनुभव होता त्याच्या वडीलांचा. त्यातच त्याला मागील वल्डकपचा इतिहास माहीत होता. तेव्हा तो कप्तान नव्हता. मागील वल्डकप वेळेस संघनायकानं चांगला खेळू नकोस हेही सांगीतल्याचं आठवत होतं. त्यावरुन कल्पना येत होती की संघनायकावर कोणाचा तरी दबाव आहे. त्यानंतर संघ वल्डकप फायनलला हारताच संघनायकाला राजीनामा द्यावा लागला व त्यानंतर सुनील संघाचा कॅप्टन बनला होता.
सुनील विचार करीत होता वल्डकप जिंकण्याचा. जिंकण्याचाच विचार करीत असतांना व पहिला सामना जिंकताच दुसऱ्या दिवशी संधी साधून एक व्यक्ती त्याला भेटायला आला. म्हणाला,
"आपण आंतरराष्ट्रीय वल्डकपच्या देशीय संघाचे नेतृत्व करीत आहात. परंतु एक लक्षात ठेवा. आपण वल्डकप आमच्या मतानुसार खेळायचं. आम्ही जसे सांगणार तसे."
तो व्यक्ती. तो व्यक्ती बोलायला आला होता की धमकी द्यायला तेच सुनीलला कळत नव्हतं. ती शुद्ध धमकीच होती. परंतु सुनीलनं क्षणातच विचार केला. आपल्याला वल्डकप खेळायचाय. तसाच तो जिंकायचाय. तेच स्वप्न होतं आपल्या वडीलाचं. परंतु ते पुर्ण झालं नाही. परंतु यावेळेस आपण पुर्ण करुयात. त्यामुळंच हा खेळ थोडा विचार करुन खेळलेला बरा.
तो विचार करीतच होता. तसं त्या व्यक्तीचं बोलणं ऐकायला आलं.
"ओ मिस्टर, आपण काहीच उत्तर दिलं नाही."
त्या व्यक्तीचे ते बोल. तसा भानावर येत सुनील म्हणाला,
"हं, बोला. मी सगळं ऐकत आहे."
"मी म्हटलं आगामी सामने आमच्याच मतानुसार खेळावेत. आम्ही दिशा दाखवू व तुम्ही त्या निर्देशानुसार खेळावं."
सुनीलनं त्याचं बोलणं ऐकलं. तसा तो म्हणाला,
"होय, आम्ही अगदी तसंच खेळणार. तुम्ही निश्चिंत राहा."
सुनीलला माहीत होता मागील इतिहास. त्यामुळं तो बोलत होता. त्यानं ओळखलं होतं त्या माणसाला. तो दुसरा तिसरा कोणीही नसून बुकीच होता. त्यानंतर तो बुकी तेथून निघून गेला.
ते वल्डकपचे सामने. तो बुकी येवून गेल्यानंतर जो सामना झाला. त्यात संघाचा पराभव झाला. कारण ती एक सुनीलची चाल होती. त्यानंतर तीन सामने झाले व त्या तीन सामन्यातून पुन्हा एका सामन्यात त्याच्या संघाचा पराभव झाला. आता अंतिम सामना होता व यावेळेस कोण संघ फायनलला जाणार यावर प्रश्नचिन्हंच लागलं होतं. मात्र सुनीलला माहीत होती खेळी कशी खेळायची. तसा तो सामना उद्याला होणार होता.
वल्डकपचा तो उपांत्य फेरीचा सामना होता. तसा बुकीवाल्यांचा एक व्यक्ती सुनीलकडे पुन्हा आला. म्हणाला,
"हा सामना हारायचा."
बुकीचा तो प्रश्न. तसा सुनील म्हणाला,
"आम्हाला हा सामना जिंकू द्या. पुढील सामना आम्ही नक्कीच हारु. तेवढं एक करा. ही एक विनंती समजा. एक संधी द्या."
सुनीलचं ते गोडगोड बोलणं संपलं. तसा बुकी वाल्याच्या माणसानं कुणाला तरी फोन लावला. त्यानंतर ठरलं की तो सामना सुनीलनं जिंकावा. कारण कोणता संघ जिंकणार हे काही निश्चित नव्हतं. म्हणूनच सट्टेवालेही संभ्रमातच होते. शेवटी सुनीलचं बोलणं लक्षात घेवून बुकीवाला म्हणाला,
"फक्त एकच चान्स. त्यानंतर नाही."
ते बुकीवाल्याच्या व्यक्तीचं बोलणं. तसा तो निघून गेला. तो गेल्यानंतर सुनीलनं निश्चिंत मनानं पोटभर जेवन केलं व त्यानंतर तो बिनधास्त झोपी गेला. तसा दुसरा दिवस उजळला.
दुसरा दिवस उजळताच सुनीलनं सर्वांना सांगीतलं की आजचा दिवस करो वा मरो असाच आहे. चांगलं प्रदर्शन करा. नाव होईल. तुमचं आमचं देशाचं. तसं साऱ्याचंच नाव होईल. तसा खेळ सुरु झाला व त्या खेळात अटीतटीनं सुनीलचा संघ जिंकला व त्या संघाला उपान्त्य फेरीत मजल मारता आली.
संघ उपान्त्य फेरीत पोहोचला होता. त्याआधी तीन संघ उपान्त्य फेरीत आधीच दाखल झाले होते. यावेळेस एकच खेळ बाकी होता. या खेळात चक्कं बुकीनं सांगीतलं होतं. हा सामना कोणत्याही परिस्थितीत हारायचाच. तसं सुनीलनं ते कबूलही केलं होतं. परंतु त्याच्या मनात औरच काहीतरी शिजत होतं. ते काही तो बुकींना सांगू शकत नव्हता. सामन्यावर कित्येक लोकांचे पैसे लागले होते. सर्वांनी सुनीलच्या बाजूनं पैसे लावले होते. कारण त्यांना सुनीलच्या संघाचं प्रदर्शन माहीत होतं. सुनीलचा संघ हमखास जिंकू शकेल असं त्यांना वाटत होतं. ते गोरगरीब होते. अशातच तो सामना सुरु झाला.
सामन्यादरम्यान सुनील टिकला नव्हता. मात्र त्यानं गड्यांना सांगीतलं होतं. मी आज खेळणार नाही. त्यांनीच उत्तम प्रदर्शन करावं व हा सामना जिंकावा. हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा सामना आहे. त्यानंतर सामन्यादरम्यान तो म्हटल्याप्रमाणेच लवकरच बाद झाला व त्यानंतर काही गडीही. ते गडीवर गडी बाद होत होते. तशी त्यांनी लय चुकवली होती. हाही सामना अटीतटीचाच झाला होता. हा सामना त्याचा संघ जिंकणार नाही असंच वाटत होतं. शेवटी त्याचा संघ अटीतटीतून तो सामना जिंकला व त्याचा संघ फायनलला पोहोचला.
संघ फायनलला पोहोचला खरा. तसा तो सामना जिंकताच सायंकाळी बुकीवाल्यांचा तो माणूस त्याला भेटायला आला. तोच कप्तान या नात्यानं सुनील थोडा घाबरला. तसा तो बुकीवाल्यांचा व्यक्ती काही बोलणार. तोच सुनील म्हणाला,
"साहेब, माफ करा. मी खेळलो नाही. मात्र माझे खेळाडू खेळले. त्यात माझा काय दोष? तरीपण आगामी सामन्यात फायनलमध्ये मी खेळाडूंना रोखीन. त्यांना खेळू देणार नाही."
ते सुनीलचं बोलणं. ते पुर्ण होताच बुकीवाल्यांचा व्यक्ती म्हणाला,
"बरं झालं तुमचा संघ जिंकला. परंतु तुम्हाला माहीत नाही आमचं किती नुकसान झालं ते. आमचं किती करोडो रुपयाचं नुकसान झालं. त्याची कल्पना तुम्हालाही नाही. तुम्ही आमच्या बऱ्याच पैशाचं नुकसान केलं आमचं न ऐकून. साहेब आपल्यावर जाम नाराज आहेत. तसं पाहिलं तर हारजीत लागलीच असते. आम्ही काही त्याचा बाऊ करीत नाही. मात्र आतातरी लक्षात घ्या. वल्डकप फायनल आहे. यावेळेस हारायचंच आहे." बुकीवाल्याचा तो व्यक्ती म्हणाला व चालता झाला.

*****************************

तो वल्डकपचा सामना. त्या सामन्यात बुकीनं सांगीतलं होतं की तो सामना हारायचा आहे. तसं पाहता सुनीलला भीतीही वाटत होती, ती म्हणजे बुकीवाल्यांची. तसं पाहता बुकीवाल्यानं त्याच्या वडीलांचा अपघात केला होता नव्हे तर घडवून आणला होता. तो अपघात पाहता भीती वाटणं साहजीकच होती. तसं त्यानं आपल्या वडीलांना ती गोष्ट सांगीतली. तसा सुरेश विचार करु लागला. मुलानं त्यावर मार्गदर्शन मागीतलं होतं. तशातच सुरेश आपल्या मुलाला म्हणाला,
"वल्डकप फायनल आहे ना. मग चांगलं प्रदर्शन करायचं. बुकीवाल्यांना घाबरुन खेळू नकोस. त्या बुकीवाल्यांचं काय, ते तर धमकी देणारच. कारण त्यांना पैसा मिळतोय. तुलाही ते पैसे घे म्हणतील हारायचे. परंतु तू घेवू नकोस. अरे पैसे आज आहेत, उद्या नाहीत. अन् पैशानं सारं जग जिंकता येतं, सामना नाही. तू या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. तुला माहीत नसेल. बुकीनं स्वतः येवून मला धमकी दिली होती. परंतु मी घाबरलो नाही. धीरानं पुढं गेलो. माहीत आहे. भीती कधीच बाळगू नये कुणाची. ते काही देव वा सृष्टीनिर्माते नाही झालेत की त्यांना घाबरावं. घाबरावे नियतीला. अन् आपल्या प्रारब्धाला. प्रारब्धात जे घडणार असेल, ते घडेलच. त्यात सगळं चालायचंच. मग का घाबरायचं कोणत्या गोष्टींना. अरे याबाबत एक लक्षात घे. आपल्या देशाचे सैनिक पाहा. ते घाबरतात का कोणाला? नाही घाबरत. ते जर घाबरले असते तर आपण आजही गुलाम असतो. आपल्यावर आजही परकीय शत्रू हावी झाला असता. ते प्रसंगी युद्धावर मरण आलंच तर त्याला वीरमरण समजतात. घाबरत नाहीत अन् पळतही नाहीत.
क्रिकेट सुद्धा आज युद्धभुमीच आहे एकप्रकारची. इथंही तसंच मैदान असतं. फरक एवढाच की तिथं रक्त सांडवलं जातं. इथं घाम. तिथं शत्रू जीव घेतात तर इथं बुकी. बुकी हेही आपले शत्रूच असतात क्रिकेटच्या युद्धभुमीवरचे. त्यात काय घाबरायचं? अन् एक, तुला काहीच होणार नाही. तुझ्या बापाचा आशिर्वाद आहे तुझ्या सोबतीला. एक बाप, ज्याचे वल्डकप फायनल खेळायचे स्वप्न होते. ज्याची वल्डकप जिंकायची इच्छा होती. ते स्वप्न तुला पुर्ण करायचे आहेत. तुला तो वल्डकप जिंकायचा आहे. तुझ्यासाठी नाही तर या तुझ्या बापासाठी अन् बदला घ्यायचा आहे माझ्या या अपंग पणाचा. अन् त्याचबरोबर बदला घ्यायचा आहे. त्या खेळाडूच्या वर्तनाचा. ज्यानं देवतेसमान असलेल्या आपल्या देशातील वल्डकपवर पाय ठेवला होता. त्याला अक्कल नव्हती तेव्हा. तोच संघ आजही फायनलला आला आहे व ही नामी संधी आहे त्याला धुळ चारायची व आपल्या केलेल्या अपमानाचा बदला घ्यायची. तशी तुला शपथ आहे माझी. वल्डकप फायनल जिंकल्याशिवाय मला तुझं तोंडच दाखवायचं नाही."
सुनीलचा बाप बोलून गेला. तसं त्याला स्फुरण चढलं होतं. त्याचबरोबर तो विचार करीत होता. काय करावं. कारण एकीकडून बुकीची धमकी आली होती तर दुसरीकडून बाप वल्डकप जिंकल्याशिवाय आपलं तोंड दाखवू नकोस असं म्हणत होता. अशातच तो दिवस उजळला व सामना सुरु झाला.
तो वल्डकपचा सामना. त्या सामन्यात तो खेळणार होता. तसा तो दरवेळेस आतापर्यंत ओपनिंगलाच खेळत होता. परंतु त्यानं आज रणनीती बनवली होती. आपण ओपनिंगला खेळायचं नाही. कारण कदाचीत बुकी जसा माझ्याकडं आला. तसा तो माझ्या संघातील खेळाडूपर्यंतही पोहोचू शकतो. तो त्यांनाही धमकी देवू शकतो. असा जर सामना खेळला गेला तर आपला पराभव नक्कीच. किल्ला एकाकी लढवता येईल. जसे राजाराम महाराज जिंजीला एकटेच होते तसे. परंतु पराभव होणे वा शरणागती होणे बरोबर नाही हा सामना जिंकायलाच हवा. संयमी खेळी खेळावी लागेलच.
तो वल्डकपचा सामना........तो सामना सुरु झाला होता. परंतु कप्तान असलेल्या सुनीलनं आज ओपनींग केली नाही. आज बऱ्याच वर्षातून त्यानं आज एक अभिनव प्रयोग केला होता. तोही फायनलमध्ये. तो नंतर फलंदाजीस येणार होता. त्यापुर्वी त्यानं बाकी खेळाडूंना पाठवले होते.
खेळ सुरु झाला होता. तसा टॉसही सुनील जिंकला होता. आज त्याचं भाग्य चांगलं होतं की तो टॉस जिंकला व पर्यायानं त्यानंच आपल्या प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी दिली. प्रतिस्पर्धी संघानंही चांगलंच प्रदर्शन केलं व चांगल्या धावा बनवल्या होत्या. आता पाळी होती सुनीलच्या संघाची.
सुनीलच्या संघात त्याचा भाऊ अनिल व एका फलंदाजानं ओपनींग केली होती. लवकरच तो फलंदाज बाद झाला. कारण बुकीनं जशी सुनीलला धमकी दिली होती हारायची. तशीच धमकी इतरही फलंदाजाला दिली होती. तशी ओपनिंगलाच उतरलेल्या अनिलनं पहिल्या राऊंडमध्ये एकाकी झुंज दिली तर अर्ध्यापेक्षा जास्त धावा असतांना व पाच गडी बाद झाल्यावर सुनील फलंदाजीस उतरला होता. असं वाटत होतं की आता सामना जिंकताच येणार नाही. चाहते निराश झाले होते. कोणी म्हणत होते की सुनीलनं ओपनिंगलाच खेळायला हवं होतं. त्यानं असा अभिनव प्रयोग करायला नको होतं. हे दोघंही कितीसे खेळणार. त्यानंतर बॉलरच आहेत. ते तर लवकर बाद होतील. पुर्ण ओव्हरही हे देश खेळू शकणार नाही. अशातच लोकांनी आपले पैसे बुकींकडून परत घेतले होते. काहींनी आता पैसे पलटवले होते. त्यांनी आता विरोधी संघाकडून पैसे लावले होते. सगळेच डाव गडबडले होते.
ते लोकांचे विचार. परंतु त्यांना कप्तान असलेल्या सुनीलची ताकद माहीत नव्हती. तो पाचव्या क्रमांकावर उतरला होता. सुरुवातीला त्यानं जम बसविण्यासाठी संयमी खेळी केली. त्याला साथ देत होता त्याचाच भाऊ. शेवटी सुनीलनं आपल्या भावाला सांगीतलं की त्यानं आक्रमक फलंदाजी करावी. कारण तो सेट झाला आहे.
अनिलनं सुनीलचं ऐकलं व तो आता आक्रमक फळी खेळू लागला. अशातच धावफलकावर भराभर आकडे वाढू लागले. आता सामना तोच एक जिंकून देणार एकटाच खेळून. असं वाटत असतांनाच तो एका खेळाडूकडून धावबाद झाला. शेवटी पुन्हा एकदा खेळ शत्रुच्या पारड्यात गेला.
अनिल बाद होताच उरलेले बॉलर. त्यांच्यावर विश्वास नव्हताच सुनीलचा. तसं पाहता सुनीलनं त्यांना सांगीतलं होतं की फक्त एक एक धाव काढून त्याला स्ट्राईक द्यावी. अन् जास्त फटके मारु नये. मी आहे फटके मारायला. फक्त टिकून खेळावं. परंतु ते बॉलर होते. ते टिकतील तेव्हा ना. तरीही ते टिकण्याचा प्रयत्न करीत होतेच. परंतु ते तरी किती टिकतील. शेवटी नऊ विकेट झाल्या होत्या. आता तर पुर्णच सामना गेला होता परसंघाच्या पारड्यात. काय करावं सुचत नव्हते. चेंडू कमी होते व धावा जास्त होत्या. अशातच सुनीलनं ठरवलं. आता आपण स्ट्राईक सोडायची नाही. नाही तरी मॅच गेली. नाही तरी गेली. तेव्हा आपण सामना फटके लावूनच खेळायचा. मग बाद झालो तरी चालेल. शेवटी तो खेळ आहे. अन् तो नशीबाचा खेळ आहे.
विचारांचा अवकाश. सुनीलनं स्ट्राईक आपल्याचजवळ ठेवला. त्यानंतर त्यानं जोरात फटके मारणं सुरु केले. त्यातच चेंडू सीमेपार जायला लागला. शेवटी ते चेंडू एवढे सीमेपार गेले की विजय साकारता आला.
सुनीलचा संघ विजयी झाला होता. ते त्यानं मारलेल्या अंतिम समयीच्या फटक्यानं. तो दिमाखानं क्रिकेट खेळला होता. तो ओपनिंगला न उतरता पाचव्या स्थानी उतरला होता. म्हणूनच संघालाही विजय प्राप्त करता आला होता. जर तो ओपनिंगलाच खेळला असता तर चित्र काहीसे वेगळे असते. कारण बुकीनं सगळ्या फलंदाजांनाच घेरुन टाकलं होतं.
सुनीलचा संघ जिंकला होता. त्याचा बदला पुर्ण झाला होता. तसे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघत होते. तसे त्याच्या जिंकण्यानं त्याच्या वडीलाचेही स्वप्न पुर्ण झाले होते.
वल्डकप जिंकला होता सुनीलचा संघ. तसं पाहता त्याच्या बापाचं स्वप्न पुर्ण झालं होतं. त्यातच बदला. तसे वल्डकप जिंकल्याला बरेच दिवस झाले होते. मात्र सुरेश पाहिजे तेवढा खुश नव्हता. त्याला पत्नीही मिळाली होती. तरीही तो खुश नव्हता. त्याचं कारण होतं त्याला स्वतःला पुरस्कार न मिळणं. त्याला वाटत होतं की जो वल्डकपचा पुरस्कार माझ्या मुलांनी आणला. तो मला मिळाला असता तर.........कारण त्याचाही खेळ त्याच्या मुलासारखाच होता.
मॅच संपली होती. तसा संबंध देशात सुनील व त्याच्या संघाचा सत्कार झाला. तसे दोन तीन दिवस झाले होते. त्यानंतर एक दिवस तो बुकीचा व्यक्ती सुनीलकडे आला. तसा सुनील घाबरला. तोच तो घाबरत घाबरत म्हणाला,
"माफ करा. मी आपल्या म्हणण्यानुसार केलं नाही. संघात चांगलं प्रदर्शन झालं व संघ जिंकला."
सुनीलचं ते बोलणं. तसा काही वेळ बुकीचा तो माणूस चूप होता. तशी भीती वाटतच होती. तोच बुकीचा तो व्यक्ती बोलता झाला.
"बरं झालं की तुमचा संघ जिंकला. नाहीतर आमचं भयंकर नुकसान झालं असतं. साहेबांनी तुमच्याकडं यासाठीच पाठवलं आहे. दिलगीरी व्यक्त करायला आणि एक भेटवस्तुही पाठवली आहे. मात्र आगामी काळात हे लक्षात ठेवावे की तुम्ही आपलं प्रदर्शन स्वतःच्या मतानुसार करावं. आमचंही ऐकू नये. हारजीत तशीही चालतच असते."
ते बुकीच्या व्यक्तीचं बोलणं. तसा सुनील म्हणाला,
"तशी वेळ आता येणारच नाही."
"का?"
"मी राजीनामा देणार आहे."
"का? तुमच्यासारख्या खेळाडूची संघाला गरज असतांना."
"तसं काही नाही. पण........"
"पण काय?"
"आता माझं वय झालं आहे व मला आता अपंग व्हायचं नाही."
ते सुनीलचं बोलणं. तसे दोघंही हसले. त्यानंतर बुकीच्या व्यक्तीनं सुनीलला भेटवस्तू दिली व तो चालता झाला.
काही दिवसानंतर सुनील व अनिलनं राजीनामे दिले होते संघाचे. कारण त्याचं वय झालं होतं व बदलेही पुर्ण झाले होते. जे बदले घेण्यासाठी ते संघात भरती झाले होते. वल्डकप संपला होता त्यांच्या कारकिर्दीतला. परंतु त्या दोघाही भावांनी वल्डकप खेळून नवा इतिहास बनवला होता. जो इतिहास प्रत्येक वल्डकपक्षणी दोहरवला जाणार होता.

****************************************

वल्डकप संपला होता. संपली होती फायनलही. आज सुरेशनं लिहीलं होतं त्यावर आधारीत पुस्तक. ज्याचं नाव वल्डकप फायनल ठेवणं होतं. प्रकाशन समारंभ झाला होता व वल्डकप फायनलच्या बऱ्याच प्रतिही खपल्या होत्या. तसं ते वल्डकप फायनल नावाचं पुस्तक गाजत होतं. ज्यात सुरेशनं आपबीती लिहिली होती. तो फायनलचा थरार लिहिला होता. ज्या फायनलनं त्याला उभ्या आयुष्यातून अपंग करुन टाकलं होतं. आज तेच पुस्तक गाजत होतं.
सुरेशलाही वाटत होतं की आपल्याला एखादा पुरस्कार मिळावा. तो वल्डकपसारखाच असावा. तसा विचार नेहमीच करीत असतांना एक दिवस त्याला पत्र आलं. पोष्टमेननं पत्र आणलं. पत्र फोडलं गेलं व पत्रातील मजकूर वाचला गेला. तो पत्रातील मजकूर सुरेशच्या विजयाचा होता. पत्रात लिहिलं होतं की त्याला पदमश्री पुरस्कार मिळालाय.
पदमश्री पुरस्कार. तो देशातील एक सर्वोच्च मानाचा पुरस्कार होता. ज्याची इभ्रत व इज्जत होती. ज्या पुरस्काराला वेगळं असं वलय होतं. ज्या पुरस्कारातून त्याचं ह्रृदय शांत होणार होतं.
ते शासनाचं पत्र होतं. ते पत्र येताच व त्यानं ते वाचताच तो जोरानं ओरडला नव्हे तर किंचाळलाच. तसं मुलांनी विचारलं,
"काय झालं? काय लिहून आलंय."
मुलांनी विचारलेला प्रश्न. तसा तो म्हणाला,
"मला पदमश्री मिळालीय."
"हो काय?"
"मला बोलावलंय पुरस्काराला."
"हो काय?"
"हाच माझ्यासाठी सर्वोच्च मानाचा पुरस्कार आहे. मला आठवते की एकेकाळी मला क्रिकेटनं धोका दिला होता. वल्डकपनं हुलकावणी दिली होती. परंतु आज माझ्या साहित्यानं.........माझ्या साहित्यानं अजिबात धोका दिलेला नाही. ना हुलकावणी दिली. तो आज भेटलाय. वल्डकपपेक्षाही मोठा पुरस्कार. परंतु हाच माझ्यासाठी वल्डकप आहे. वल्डकप फायनल जिंकून आणलेला."
सुरेशला फार आनंद झाला होता. त्याचबरोबर त्याच्या मुलांनाही. तसं पाहता तो पदमश्रीचा समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

************************************************

आज सुरेश म्हातारा झाला होता. त्याला नातवंड होती. ती त्याच्या अंगावर खेळत होती. कधीकधी ती नातवंड त्याला गोष्टी सांगायला विवश करीत होती. तेव्हा तो सांगत होता आपली आपबीती. जे त्याच्यासोबत घडलं होतं. जे त्यानं अनुभवलं होतं व जे तो जगला होता. आजही वल्डकपच्या स्पर्धा खेळल्या जात होत्या अन् स्पर्धा जिंकण्यासाठी डावपेचही लढले जात होते एखाद्या युद्धभुमीसारखे. प्रत्येकजण शत्रूला गारद करण्याचा विचार करुन खेळत होता. अन् बुकीही तेवढ्याच सक्रीयतेनं चाल करीत होता वल्डकपमधील खेळाडूंवर. तसे ते चांगले मातब्बर खेळाडू बुकीच्याच चालीनं मैदानावर गारद होत होते मोठमोठे पराक्रम न करता. तेव्हा सहजच लोकांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडत असे. बिचारा खेळाडू फार्मात नाही. मात्र त्या खेळाडूवर सतत बुकींची धमकी असायची. जी धमकी खेळाडूलाच नाही तर अख्ख्या वल्डकपच्या दावेदार संघाला गारद करुन टाकत होती. अशातच काही सुनीलसारखेही खेळाडू असायचे की जे बुकी कसाही वागो. कोणतीही धमकी देवो. त्या धमकीला न घाबरता चांगला खेळ खेळत होते व वल्डकप जिंकून आणत होते.
आज सुरेश जगात नव्हता. ना त्याची मुलं जगात होती. परंतु त्याचा इतिहास जगात होता. काळाच्या ओघात ते नंतर लोकांच्या विस्मरणातही गेले होते. परंतु त्यांनी केलेले विक्रम जेव्हा तोडले जात असत. तेव्हा ते क्षणीक लोकांना आठवत असत व त्यांचे आभार मानले जात असत. आज सुरेशची मुलंही क्रिकेटमधूनच नाही तर जगातून निवृत्त झाली होती. परंतु त्यांनी देशाला मिळवून दिलेला वल्डकप देशाची शान बनला होता नव्हे तर एक इतिहास बनला होता. जो कधीच मिटला जाणार नव्हता.

*****************************************************************************समाप्त *************