Sahaahi Janki v karli dripavarche Chache - 10 in Marathi Children Stories by Balkrishna Rane books and stories PDF | सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 10

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 10

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे १०

त्या दिवशी सायंकाळी जानकी,शाम , चंद्रसेना व चरण आजोबांचे आशिर्वाद घेऊन बाहेर पडले.चौघांनीही कोळ्यांच्या वेष धारण केला होता. शामने लागणार सारं सामान दुपारीच होडीत ठेवले होते .त्यात धनुष्य, बाण, तलवारी, आपटल्यावर धूर तयार होणारा दारूगोळा, वळलेल्या दोर्या व खंजीर अशी हत्यारे होती.चौघे पहिल्यांदा चंद्रसेनाची सुटका करणार होती.त्याचवेळी प्रतापराव,दयाळ व दादू कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भिल्ल व कोळ्यांच्या दोन तुकड्या दोन बाजूंनी एकाच वेळी हल्ला करणार होते.प्रतापरावांच्या शस्त्रागारातील शस्त्रे ,तीर कामठी यांनी सज्ज लढवय्ये नक्र बेटावर तयार होते.त्यांना बाहेर पडायला अजून अवधी होता.
आज खड्गसिंगांच्या क्रूरतेचा अंत करायचाच असा सार्यांनी चंग बांधला होता. सारा परीसर भयमुक्त करण्यात
आपल्याला यश मिळूंदे अशी सारेच देवाची प्रार्थना करत होते.
शामने होडी पाण्यात लोटली. चौघेही होडीत बसले. उतरत्या किरणांच्या साक्षीने ते मोहिमेवर बाहेर पडले होते.



" हे बघा, चरणकाका पुढे राहतील.कारण त्यांना तिथली माहिती आहे. मी त्यांच्या मागोमाग राहिन.आई व शाम मागे राहतील.सर्वांनी शस्त्रे सज्ज ठेवली पाहिजेत."
जानकीने सर्वांना सांगितले.
" आणि हो बाबांची सुटका होईपर्यंत... प्रत्यक्ष हल्ला करायचा नाही." शाम म्हणाला.
" होय. एकदा का बाबांची सुटका झाली की खड्गसिंग
व त्यांच्या साथीदारांना जीवंत सोडायचे नाही." जानकी म्हणाली.
हळूहळू आसमंत सावळा होवू लागला. समुद्री पक्ष्यांचे थवे बेटांच्या दिशेने परतत होते.पश्चिमेला अर्धचंद्र दिसू लागला होता. होडी वेगाने कर्ली बेटाच्या दिशेने चालली होती.
बघता बघता होडी खडकांच्या रांगेत शिरली. होडी दगडाला बांधून सार्यांनी आपापली शस्त्रे घेतली.
जानकी ने खांद्यावर धनुष्य लटकवले ...पाठीला बाणांचा भाता बांधला.कमरेत धारदार खंजीर लावला. आता काळोख झाला होता. एवढ्यात आकाशातून परीचित आवाज आला ऐकू आला व त्यापाठोपाठ सोनपिंगळ्या उडत - उडत येत शामच्या खांद्यांवर येवून बसला.
" आणखी एका योध्दाची भर पडली." जानकी हसत म्हणाली.
" पिंगळ्या, बाबांना कुठे ठेवलंय ती जागा तू दाखव म्हणजे वेळ जायला नको." शाम म्हणाला.
पिंगळ्याने होकारार्थी मान हलवली व वर उडाला. शामने पलीते हाती घेतले.काळ्या कापड्यात गुंडाळलेल्या दोन काचेच्या बाटल्या त्याने कमरेला बांधल्या.
" हे काय आहे. " चंद्रावतीने विचारले.
" यात प्रवाळ दगड आहेत. या दगडांवर पोपटी शैवाल आहेत ती रात्री काजव्यांसारखी चमकतात. बेटावर आपल्याला मशाल वापरता येणार नाही याचा उपयोग करता येईल."
" छान, कुणाला संशयही येणार नाही." चरण म्हणाला.
सारे सराईतसारखे मशालीच्या उजेडात गुहेतून मार्ग काढू लागले.गुहेच्या पहिल्या खोलीत पोहचल्यावर चंद्रावतीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तिच्या डोळ्यात अश्रू आले.
" इथं कुणीतरी एक दोन दिवसांपूर्वी येऊन गेलय... कदाचित बाबा श्रीधराचार्य असावेत." चंद्रावती म्हणाली.
" चला आपल्याला लवकरच बेटावर जायचं आहे."
चरण ने सगळ्यांना भानावर आणलं. छतावरच्या गुप्तद्वारातून चारही जण एकेक करत वर सरकली.
समोर बळी देण्यासाठी जय्यत तयारी सुरू होती. त्या गोलाकार जागेभोवती लाकडी खांबांनां अनेक मशाली बांधल्या होत्या. मधोमध मोठी धुनी पेटवली होती. नगाडा, ढोल ,ताशे कडेने रचलेले दिसत होते.काळ्या कपड्यांतील पाच अघोरी साहित्याची मांडणी करत होते.
आगीच्या ज्वाळांनी परीसर नारींगी व पिवळा दिसत होता.
अजून चंडोल तिथे दिसत नव्हता. त्या पलिकडे दगडांची चुलाणे पेटलेली दिसत होती.त्यावर पितळीची मोठी भांडी ठेवून जेवण तयार केलं जातं होते.काही बायका व पुरुष जेवण तयार करत होते.ही सगळी तयारी पाहून जानकी च्या तळपायाची आग मस्तकाला गेली.
" बाबांना बळी देऊन... मौज करायचीय यांना! या क्रूरकर्म्यांना धडा शिकवलाच पाहिजे." जानकी म्हणाली.
एवढ्यात आकाशातून सोनपिंगळा शामच्या खांद्यावर उतरला.
" पिंगळ्या आपल्याला आपल्या मागून यायला सांगतोय." शाम म्हणाला.
पिंगळा उजव्या हाताला वळला व उडू लागला. शाम ती प्रकाशमान बाटली हाती घेऊन चालू लागला.
" थांब , सर्वात पुढे मी राहते. माझ्या मागे आई राहिल... त्यामागे चरणकाका व शेवटी शाम राहिलं."
जानकी व शाम यांनी प्रकाशाच्या बाटल्या पकडल्या. मंद हिरवट पोपटी प्रकाशामुळे हातावरच दिसत होतं. काही अंतरावर गेल्यावर पिंगळा पुन्हा डावीकडे वळला.
तेवढ्यात ढोल - माश्यांचा आवाज सुरू झाला. त्या सोबत चाचे आरोळ्या ठोकू लागले.
शामचे लक्ष पिंगळ्याकडे होते.काही अंतर उडल्यावर
पिंगळा एका मातीच्या छोट्या घरावर बसला.
" बाबा, तिथे आहेत. " शाम कुजबुजला. हे घर इतर घरापासून थोडे दूर होते
सारे अतिशय सावधगिरी बाळगत तिथपर्यंत पोहचले.
तिथे लाकडी दरवाज्याजवळ एक गलेलठ्ठ पाहरेकरी होता. नशेमध्ये त्याचे डोळे लालेलाल झाले होते. जानकीने धनुष्यावर बाण चढवला व बाण सोडला.हवा कापात बाण सपकण त्या पहरेकर्याच्या कंठात घुसला. तो बसल्या जागीच कोसळला .सावधगिरीने सारे बाहेरच्या ओट्यावर पोहचले. लाकडी दारावर भाला मोठा अडसर होता.चरण पुढे झाला.त्याने तो अडसर ताकदीने खेचला .दरवाजा उघडत प्रथम चरण व जानकी आत घुसली. शाम व चंद्रवती बाहेर लक्ष ठेऊन होते. आत चंद्रसेन डोळे मिटून बसले होते.आपला अंत जवळ आलंय बळी देण्यासाठी आपल्याला न्यायला आलेत असच त्यांना वाटलं. त्यांचे हाथ व पाय दोरीने बांधले होते.
त्यांना समोर पाहून जानाकीला अश्रू आवरेनात.
" बाबा, डोळे उघडा आम्ही तुम्हाला न्यायला आलोय."
जानकी कुजबुजली.
चंद्रसेनाचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. त्यांनी डोळे उघडले. समोर जानकीला पाहून ते आनंदित झाले.
चरणने झटपट दोर्या सोडवल्या. आधार देत त्याने चंद्रसेन ला उभे केले.
" चला यांना सुरक्षितपणे गुहेत नेऊया."
चंद्रसेनाला पाहून चंद्रावती त्यांना बिलगली.
" काय अवस्था झालीय आपली?"
" आई, आपल्याला झटपट इथून जायचे आहे. आजोबांना इशारा द्यायचा आहे." जानकी म्हणाली.
एकमेकांवर लक्ष ठेवत ती माघारी फिरू लागली. पण चाच्यांच्या वस्तीजवळ एका स्त्रीचे लक्ष त्यांच्यावर गेले. ती ओरडली. धोका पाहून जानकीने आपल्या जवळच्या धुराच्या कांड्या फोडल्या.सर्वत्र धूर झाला.धावत आलेल्या एका चाच्याने धनुष्य सरसावले .शामवर
नेम धरत तो बाण सोडणार एवढ्यात पिंगळ्याने झेप
घेत त्याच्या हातावर चोचीचा आघात केला. बाण भलतीकडे गेला. शामने झटकन वळत बाण सोडला. तो डाकू खाली कोसळला.
" तुम्ही ,यांना घेऊन गुहेत जा ,मी इशारा देऊन येतो."
चरण म्हणाला.
" काका, काळजी घ्या." जानकी म्हणाली.
" मी या परीसराशी परीचित आहे."चरण हसत म्हणाला.
चंद्रसेन सुटकेमुळे उत्तेजीत झाले होते. नवं बळ त्यांच्यात संचारले होते.सगळे धावतच. गुहेजवळ पोहचले.
आत उतरत त्यानी तो सरकता मार्ग बंद केला.
इकडे चरणने चाच्यांच्या शस्त्र ठेवण्याच्या इमारतीला आग लावली. आत दारूगोळा होता.कानठळ्या बसाव्यात एवढे प्रचंड आवाज व त्यापाठोपाठ आगीचे लोळ आसमंतात झेप घेवू लागले.
त्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला.पण तोपर्यंत चंद्र
सेन, चंद्रावती व शाम गुहेत शिरले.
" गुहेचे गुप्त द्वार आतून बंद करा, कोणत्याही परी स्थीतीत बाहेर पडू नका." जानकीने सूचना केली.
" मी पण तूझ्या सोबत येतो." शाम म्हणाला.
आई -बाबा आत गेल्यावर जानकी व शाम वळून धावतच
जिथे बळी देण्यासाठी विधी चालू होते तिथे पोहचले.
आगीच्या तांडवामुळे खड्गसिंगांच्या माणासांनी धावाधाव सुरू केली.कोणासही नेमके काय झालं आहे ते कळत नव्हते.
---*-----*-----*------*-----*-------*-----*-----
जानकी व मंडळी बाहेर पडल्यानंतर काही वेळाने नक्र बेटावरुन एकूण दहा होड्या बाहेर पडल्या.कोळी व भिल्ल लढवय्ये मिळून पन्नासच्या आसपास माणसं होती.
एका होडीत चांद घोड्याला चढवला होता. त्यांचं होडीत
प्रतापराव स्वतः होते. त्यांनी आपला परंपरागत सरदारकीचा पोषाख घातला होता.अंगात चिलखत...डोक्यावर शिरस्त्राण यामुळे ते महारथी योध्दा भासत होते. सगळ्या होड्या झपाझप मार्गाक्रमण करत होत्या.सर्वांमध्ये उत्साह व आवेश होता. कर्ली बेटाच्या ते अलिकडे पोहचेपर्यंत काळोख झाला होताभिल्ल भिल्ल व कोळी सेना

" समोरून जहाजांचा तांडा येतोय." दादू कोळी ओरडले.
" सर्वजण तयारीत रहा. ते नेमके कोण आहेत ते कळल्याशिवाय काहीही हालचाल करू नका." प्रतापरावांनी सूचना दिल्या. ती जहाज हळूहळू जवळ येत गेली.
" त्यावर आपल्या सम्राटांचा ध्वज दिसतोय. काळजीचे कारण नाही." दयाळ म्हणाले.
जहाज व होड्या समोरासमोर आल्या.सर्वात पुढे असलेल्या गलबतावर दोन तरूण कडेला उभे होते.
राजबिंड्या तरूण हात हलवत ओरडला...
" आजोबा, बरे आहात ना?"
" अजय,. पण तू इथ कसा?" प्रतापराव आश्चर्यचकित होत उदगारले.
" सम्राट रविवर्मांचे सुपुत्र राजकुमार अभय खड्गसिंगांचा
उपद्रव कायमचा नाहीसा करण्यासाठी आपल्याला मदत करायला आले आहेत." शशांक हसत म्हणाला.
प्रतापरावांचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.प्रत्यक्ष
राजकुमार आपल्या घरी राहिले होते..आणि आपल्याला जराही कल्पना कशी आली नाही हे त्यांना कळेना.
-----*-------*-------*-------*------*-----*
प्रत्यक्ष भावी सम्राटांना समोर बघून सारेच अवाक् झाले.
सार्यांच्याच अंगी नवा उत्साह संचारला.
" राजकुमारांचा विजय असो..!" सारे एकसाथ ओरडले.
एकमेकांना अभिवादन करून झाल्यावर सगळं सैन्य किनार्यावर उतरलं.एवड्यात बेटावर आगीच्या प्रचंड ज्वाला दिसू लागल्या.
" चला , चरणने इशारा दिलाय.चंद्रसेनाची सुखरूप सुटका झालीय. आता हल्ला करण्यास हरकत नाही." प्रतापराव म्हणाले.
प्रतापरावांनी चांद घोड्याला नौकेतून आणले होते.तसेच अभयने काही घोडे गलबतातून आणले होते.प्रतापराव, अजय, शशांक घोड्यावर स्वार झाले.
"आपल्याला बेटाच्या मध्यभागी जायचे आहे.एकही समुद्री डाकू जीवंत सुटता कामा नये. अर्धचंद्राकृती रचना करून हल्ला करूया.ते विरूध्द बाजूला पळाले तर मगरीच्या आयते तोंडांत पडतील. शिवाय विरुध्द बाजूने जानकी, चरण व शाम आहेतच." अजय म्हणाला.
सारे सैन्य वेगाने बेटाच्या मध्यभागाकडे सरकू लागले.बेटावरुन कोलाहल ऐकू येत होता.
-------*------*-------*-----*-----*-----*----
जानकी व शाम एकापाठोपाठ पळत बळी देण्याच्या जागेकडे सरकत होते.मधल्या झाडांच्या आडोसाने
ते लपत लपत सरकत होते.काही चाचेलोक आग लागलेल्या इमारती कडे धावत जात होते. दारूगोळा जळत असल्याने स्फोट होत होते. शस्त्रे व दारूगोळा असलेल्या ठिकाणाला आग लागल्याने चाचे हतबल झाले होते.
" आपल्यावर हल्ला झालाय....आग लागलेली नाही..लावलेली आहे." खड्गसिंग आपली भलीमोठी काटेरी गदा गरागरा फिरवत ओरडला.
" सरदार, पलीकडून आवाज येत आहेत.एखाद भलंमोठं सैन्य बहुतेक चाल करून येत आहे." एक डाकू ओरडला.
" घाबरू नका, मिळेल ते शस्त्र हाती घ्या. प्रतीहल्ला करूया. 'चंडोल तुम्ही मंत्रपठण चालू ठेवा. देवीला आवाहन करा." खड्गसिंग खदाखदा हसत म्हणाला.
" शाम,आजोबा व इतर लोक जवळ आलेत.आता चिंता नाही." जानकी म्हणाली.
शामने न बोलता धनुष्याला बाण चढवले व नेम धरत बाण सोडले. एकाच वेळी पाच बाण हवा कापत सू..सू..असा वाजत करत पाच चाच्यांच्या शरीरात घुसले.पाच किंकाळ्या वातावरणात घुमल्या.
" पाठीमागूनही हल्ला होतोय.... सावधगीरी बाळगा..जखमींना बाजूला उचलून न्या." खड्गसिंगाचा उजवा हात लखनचंद ओरडला.एवड्यात जानकीने सोडलेला बाण त्यांच्या डाव्या दंडात घुसला. त्याने तो बाण ओढून काढला व दूर फेकला.सारे चाचे मिळेल ते शस्त्र घेऊन तयार झाले होते. शंभरावर चाचे डुंगीदेवीचा जयघोष करत युध्दाला सज्ज झाले.
तांत्रिक चंडोल व त्यांच्या सहकाऱ्यांनी धुनी पेटवली मंत्रोच्चार करु लागले. सोबत ढोल वाजू लागले.सगळीकडे भयावह वातावरण झाले होते.
मंत्रांचे आरोह - अवरोह वाढत गेले. धुनीतल्या अग्नी ज्वाला लाल जांभळ्या होत भडकल्या.चंडोल गोल गोल घुमत मंत्रोच्चार करत होता.त्याचे साथीदार थयथया नाचत होते.ते नेमके काय करत होते ते जानकीला कळेना.
एव्हाना घोड्यांच्या टापांचा आवाज व त्यापाठोपाठ आरोळ्या अगदी जवळ ऐकू येवू लागल्या.
" आपली माणसं आली.पण एवढे लोक कसे?" जानकी आनंदाने कुजबुजली.तिने अतिशय वेगाने लागोपाठ दोन बाण सोडले. एक बाण ढोल वाजवणार्या डाकूच्या छातीत घुसला तर दुसर्या बाणाने आगीत आहुती टाकणार्या एका तांत्रिकाच्या नरडीचा घोट घेतला.
पण त्वरीत दुसय्या दोघांनी त्यांची जागा घेतली.आता चाचे लांब लांब पसरले होते. शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी त्यांची ती चाल होती.
चांद घोड्यावर स्वार झालेले प्रतापराव निर्भिडपणे
चाच्यांच्या गर्दीत घुसले.त्यांच्या तलवारीने त्यांच्यावर हल्ला करणार्या दोन चाच्यांना कंठस्नान घातले. त्यापाठोपाठ अजय व शशांक वीजेच्या वेगाने तलवारी फिरवत चाच्यांना भिडले. बघता बघता तिन्ही बाजूंनी चाच्यांवर हल्ले सुरू झाले. कोळी व भिल्ल पराक्रमाची पराकाष्ठा करत होते. एवढ्या मोठ्या संख्येने हल्ला झाला हे पाहून चाचे घाबरले पण खड्गसिंग त्वेषाने ओरडत काटेरी गदा गरागरा फिरवू लागला. त्याच्या एका फटक्यात पाच सहा सैनिक इतस्ततः उडाले.कापाकापी सुरू झाली.एक-एक समुद्री डाकू जमीनीवर कोसळू लागला.त्यांच्या बायकाही कोयते तलवारी घेवून लढू लागल्या.
अचानक एका भयंकर आवाजाने सारे थबकले.धुनीतल्या ज्वाळांमधून सातमजली हास्य करत...एक भयावह आकृती हळूहळू बाहेर पडू लागली.पांढर्या धूसर रंगाची ती आकृती बघता बघता वाढू लागली.अवाढव्य डोकं ... केसांच्या मोठ्या जटा .... तोंडातून ज्वाळा बाहेर पडत होत्या.... डोळ्यांतून बाणा सारखे चमकदार तीर बाहेर
पडत होते.चित्र- विचित्र आवाज करत ती आकृती हवेत झेपावत होती.आपल्या लांब हातांनी ती अजयच्या सैनिकांना पकडून उंच आकाशात फेकत होती. चंडोल उन्मादाने थयथयाट करत नाचत होता.त्याच्या मंत्राने ती कृत्या निर्माण झाली होती. सारे सैनिक घाबरून सैरावैरा पळू लागले.हाता - तोंडाशी आलेला विजय निसटून चालला होता. जानकी न व शामने एकाच वेळी त्या विचित्र आकृती वर बाण सोडले.प
ण ते बाण आरपार गेले.
" ती ...ती आकृती भासमान किंवा वायुंची बनलेली आहे." जानकी म्हणाली.
सारेच अवाक् झाले.प्रतापराव हतबलतेने खाली बसले. अजय व शशांक अग्णीबाण त्या आकृती वर सोडत होते पण तिच्यावर त्याचा काहीच परीणाम होत नव्हता.
खड्गसिंग विजयोन्मद होत पाय आपटत हसू लागला.
" थांबा, पळू नका... " एक शांत पण करारी आवाज आला.
शुभ्र केसांचा ...पांढरा लांब दाढीचा एक साधू तिथे दंड कमंडलू घेऊन झाडांतून बाहेर आला.
" निश्चितच ते आचार्य चक्रधर असतील.पण यावेळी ते इथे कसे आले." जानकी आश्चर्यचकित होत बोलली.
" त्यांचे असं येण आपल्या फायद्याचे ठरू दे." शाम म्हणाला.
आचार्यांनी कमंडलूतल पाणी ओंजळीत घेत मंत्र पठण करत ते पाणी त्या अक्राळविक्राळ कृत्येवर फेकले.आसमंतात प्रचंड गर्जना हवा कापत घुमली.एक बलशाली सिंह हवेत झेपावला. लाल डोळ्यांचा तपकिरी आयाळ असलेल्या त्या सिंहाने त्या कृत्येवर झेप घेत तिची मान जबड्यात पकडली. चक्रधर मंत्र पठण करत मंत्राने भारलेले पाणी हवेत फेकत होते.त्या भल्यामोठ्या सिंहाने कृत्ये ची मान धडापासून वेगळी केली.मोठ्याने किंचाळत ती कृत्या वळवळू लागली.त्याच क्षणी जानकीने बाण सोडला तो अचूक चंडोलच्या कंठात रूतला.चंडोल खाली कोसळला व त्याच क्षणी ती कृत्या नष्ट झाली.त्या पाठोपाठ तो सिंह सुध्दा हवेतच नष्ट झाला.पळून जाणारे सैनिक जयघोष करीत मागे फिरले.प्रतापरावांनी चांद घोड्याला खड्गसिंगांच्या दिशेने वळवले. पुन्हा युध्दाला सुरूवात झाली.प्रतापरावांची जड व रूंद पात्याची तलवार
खड्गसिंगांच्या काटेरी गोलावरा घाव घालू लागली ठिणग्या उडू लागल्या.कसलेला योध्दा व आडदांड योध्दा यांच्यातली ती लढाई होती.प्रतापराव खड्गसिंगांचे वार कुशलतेने चुकवत त्याला दमवत होते.या दरम्यान अजयने अनेक सैनिकांना कंठस्नान घातले.दयाळांनी लखमचंदाचे डोके उडवले.दादू कोळी आपल्या खडगाने पराक्रमाची पराकाष्ठा करत होते.दुसर्या बाजूने पळू पाहण्यार्या चाच्यांना शाम व जानकी बाणाने टिपत होते.त्यांना सोनपिंगळा साथ देत होता. तो जराही चाहूल लागू न देता हवेतून खाली झेप घेत पळणार्रा डांकूच्या डोळ्यात चोच खुपसून त्यांना आंधळ्या सारखे पळायला भाग पाडत होता.
इकडे प्रतापरावांनी एक जोरदार वार करत खड्ग सिंगांचा उजवा हात कोपरापासून तोडला.हतबल झालेला खड्गसिंग खाली बसला व प्राणांची भीक मागू लागला.
उरलेल्या चाच्यांनी शस्त्रे टाकत शरणागती पत्करली.पण संतापलेल्या जानकीने बाण सोडत खड्गसिंगाचे दुसरे मनगटही उडवले.
" याला व इतर चाच्यांना कैद करा.बायकांना सन्मानाने एकत्र करा.यांचा फैसला महाराज करतील." राजकुमार अजयने हूकूम सोडला.
एव्हाना जानकी व शामने तिथे धाव घेतली.समोर डोक्यावर शिरस्त्राण... अंगावर चिलखत...पाठीला भाता...व हाती तळपती तलवार घेतलेल्या तरुणाला बघून जानकी बावरली.चेहरा ओळखीचा वाटत होता.पण डोक्यावरच्या शिरस्त्राणामुळे नेमकं कळत नव्हतं.
" आजोबा हे कोण आहेत व ऐनवेळी आपल्या मदतीला कुठून आले?"
" जानकी, यांना ओळखले नाहिस? अग हे राजकुमार अजय तूच यांना आपल्या वाड्यावर घेवून आली होतीस."
डोक्यावरच शिरस्त्राण उतरवत अजय हसत म्हणाला..
" सम्राटाना आपले रंगढंग सांभाळताना..प्रजेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो...असंच आपण म्हणाला होता ना?"
अजय जानकी कडे बघत म्हणाला.
जानकीच्या ह्रदयात एक अनाहुत धडधड सुरु झाली.ती लाजून गोरीमोरी झाली.तिचे गोरेपान गाल गुलाबी झाले.
" राजकुमार,मी..मी ते सहज म्हणाले होते...माफ करा."
जानकी खाली बघत म्हणाली.
" जानकी ताई, आमच्या परम मित्र....तर तुमची माफी मागतोय...कारण तुमची भेट झाल्यापासून तो स्वतःला हरवून बसलाय." शशांक हळूच म्हणाला.
सारेच खळखळून हसले.
" पण.. पण चरणकाका कुठे आहेत?" जानकी इकडे तिकडे बघत म्हणाली.
" जानकी ताई, हा काय मी आलोय..." चरण हसत म्हणाला.तो गुहेतून चंद्रसेन व चंद्रावतीला सोबत घेवून आला होता.
" जानकी, चरण हा माझा मुख्य हेर तो वाटेल ते रूप घेवू शकतो .तो शस्त्र व अनेक शास्त्र जाणतो. मीच त्याला कर्ली बेटावर जेवण बनवणारा म्हणून पाठवलं होतं. मी त्याला भेटण्यासाठी येत असताना एका अपघाताने कर्लीद्विपावर जखमी होऊन पडलो.नशिबाने तूझी भेट झाली. सुंदरवाडीला मीच त्याला यायला सांगितले होते...व तूझी पैशा़ची पिशवी पळवायला सांगितले होते.आज मी इथे पोहचलो तो त्याच्याच संदेशामुळे." अजय म्हणाला.
"पण तुम्ही एकमेकांशी संवाद कसा साधता होता?"
" आजोबा, प्रशिक्षित कबूतरांमार्फात आम्ही संदेशवहन करत होतो."

प्रतापरावांना आपल्या मुलाला बघून आनंदाश्रू आवरता
आले नाहीत.दोघेही एकमेकांना कडकडून भेटले.
" चला, शेवट तर गोड झाला. सगळं कुटुंब एकत्र आलं."
आचार्य चक्रधर समोर येत बोलले. त्यांना बघून चंद्रावती
आदराने त्यांच्या पाया पडली.
प्रतापराव आचार्य चक्रधरांकडे टक लावून पाहत होते.
" बाबा,...तुम्ही एवढ्या वर्षांनंतर? आणि या वेळात !" प्रतापराव आश्चर्यचकित होत बोलले.
" बाबा?" जानकी अचंबित होत म्हणाली.
" होय.हे चक्रधर नव्हेत तर सरदार चक्रदेव आहेत.तुझे पणजोबा माझे वडील." प्रतापराव चक्रधरांकडे बघत म्हणाले.
ह्या खुलाश्याने सारेच अवाक् झाले.
"चला आज आपण सारे एकत्र आलोय.नक्र बेटावर आनंदोत्सव साजरा करू." प्रतापराव म्हणाले.
" प्रताप,मी तुझ्यावर व तूझ्या आईवर खुपचं अन्याय केला.आता कोणत्या तोंडाने बेटावर येवू? त्या पेक्षा वनात जावून उरलेले दिवस घालवतो.तप करून मिळवलेली सिध्दी आज माझ्या मुलांच्या कामी आली हे चांगले झाले."
" आचार्य आता दूर जाण्याची भाषा नको.आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुखात राहू." चंद्रावती म्हणाली.
सार्यांनी मान डोलावली ... टाळ्या पिटत आनंद व्यक्त केला.
" हो आणि लवकरच आणखी एक आनंदसोहळा नक्रबेटावर होणार आहे.. त्यावेळी तुमचं तिथे असणे महत्वाचे आहे." शशांक जानकी व अजयकडे निर्देश करत म्हणाला.
जानकीने लाजेने गोरमोर होत हातांच्या ओंजळुत तोंड लपवले.
------******------*****-------*****------
समाप्त
धन्यवाद