The Author लेखक सुमित हजारे Follow Current Read सफर गणपतीपुळेची By लेखक सुमित हजारे Marathi Travel stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books ગામડા નો શિયાળો કેમ છો મિત્રો મજા માં ને , હું લય ને આવી છું નવી વાર્તા કે ગ... પ્રેમતૃષ્ણા - ભાગ 9 અહી અરવિંદ ભાઈ અને પ્રિન્સિપાલ સર પોતાની વાતો કરી રહ્યા .અવન... શંકા ના વમળો ની વચ્ચે - 6 ઉત્તરાયણ પતાવીને પાછી પોતાના ઘરે આવેલી સોનાલી હળવી ફ... નિતુ - પ્રકરણ 52 નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ... ભીતરમન - 57 પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Share सफर गणपतीपुळेची (3) 2k 6k आज पहाटे जरा उठायला उशीरच झाला.त्यात एक्सप्रेसची ही वेळ झाली होती. काय कराव काय नाही काहीच सुचत नव्हतं. मी आपला कसाबसा तयारी करून रेल्वे स्टेशन गाठायच ठरवलं आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. एक तर पहाटेची वेळ असल्यामुळे रिक्षाही लवकर भेटत नव्हती मी कसबस करुन रेल्वे स्टेशन गाठलंच पण धावपळ ही फारच झाली गाडी ही फलाटावर लागलीच होती. मला वाटलं गाडी सुटेल म्हणून मी आपला धावत पळत गाडी पकडण्यास गेलो आणि एकदाची काय ती गाडी पकडलीच. या धावपळीत फार थकून गेलो मात्र चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता तो प्रवासाचा आणि इकडून माझ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. निसर्गरम्यने भरलेल्या अशा कोकणातला हा माझा पहिला प्रवास आहे. आज अतिशय आनंदी आहे मी निसर्ग समृद्ध रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे मध्ये जाण्यास तिथला आनंद अनुभवण्यासाठी सकाळचे अकरा वाजून गेलेत आत्ताच आमची गाडी रत्नागिरी स्टेशनवर पोहोचली. मी आणि माझा मित्र तुषार आम्ही दोघेही रत्नागिरीला उतरलो. उतरत्यावेळीच तिकडच्या आजूबाजूचे वातावरण पाहून मन प्रसन्न झाले. इतका सुंदर वाटत होता आजूबाजूचा परिसर तिथली स्वच्छता असे वाटत होते तिथून कुठे जाऊच नये. पण जावं तर लागणारच कारण पुढला प्रवास करणं हा महत्त्वाचा होता आम्हाला आणि आम्ही पुढल्या प्रवासाला निघालो. रेल्वे स्टेशन वरून एक किलोमीटरच्या अंतरावर बस डेपो होता. पण आम्ही इतक लांब न जाता आम्हाला एक भला माणूस भेटला त्यांनी आम्हाला गणपतीपुळे साठी कोणती एसटी जाते त्याचे मार्गदर्शन केले आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार चाललो. आम्हाला त्यांनी सांगितल्या नुसार काही अंतरावर गणपतीपुळे ला जाणारी धावती एसटी मिळाली आम्ही लगेच त्या एसटीमध्ये चढलो. एसटी मधून प्रवास करण्याची जी काय मज्जा आहे ती जगा वेगळीच आम्ही दोघांनी तर ठरवलंच होतं आपल्याला प्रवासादरम्यान जितका आनंद घेता येईल एक एक क्षणाची जी काय मज्जा अनुभवता येईल ती अनुभवाची सोडायची नाही. तो क्षण ती मज्जा तो आनंद सगळा एकत्र गोळा करून आपल्या डोळ्यामध्ये हृदयाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवायचा हे आम्ही ठरवून ठेवलं होतं. एसटी मधून प्रवास करताना आजूबाजूचे दृश्य ऐवढी सुंदर होती पक्षांचा मधुर आवाज थंडगार येणारी हवा डोंगर झाडीझुडप त्यावर धुकांची चादर सगळं काही छान वाटत होत. आम्ही गणपतीपुळेच्या भक्तनिवासाच्या थांबा इथे उतरलो.तिकडून तुषार आणि मी चालतच पुढे निघालो भक्ती निवास पासून गणपतीपुळे मंदिर काही वीस पंचवीस मिनिटांच्याअंतरावर होत.पहिले आम्ही दोघांनी राहण्याची कुठे व्यवस्था होते का याचा शोध घेतला आणि आम्हाला फायनली मंदिराच्या पाच मिनिटांचा अंतरावर एक गोकुळ लॉज नावाचा हॉटेल सापडल. आम्ही दोघांनी तिथेच राहण्याची व्यवस्था केली व आम्हाला दिलेला खोलीमध्ये गेलो थकवा आल्यामुळे थोडा वेळ आम्ही खोलीत आराम केला.आराम केल्यानंतर पहिला फ्रेश होण्यासाठी मी बाथरूम मध्ये गेलो.पाण्याच्या भरलेला बादलीतून मगानी पाणी हाता पायावर घेतले पाणी इतक थंड होतं की तोंड धुवायला पाणी घेण्याची हिंमत होत नव्हती.कारण थंड पाण्याने गारठल्या सारख वाटत होतं. कसाबसा मी आटपून घेतले व बाथरूमच्या बाहेर पडलो. पटापट तयारी करून मंदिरात दर्शनासाठी निघालो. ज्यावेळी मंदिराजवळ पोहोचलो त्यावेळी तिकडचा वातावरण पाहून मन इतकं प्रसन्न झालं की विचारू नका इतकं छान वाटत होतं. मंदिराचा अवतीभवतीचा परिसर इतका स्वच्छ होता आणि मंदिराच्या लगत असलेले समुद्र बीच ही इतका सुंदर होता त्यात उंच उंच असणारी नारळाच्या झाडांनी बीचचा परिसर व्यापून टाकला होता. सुपारींचे झाड आणि आणखी वेगवेगळ्या झाडांनी बीज भरून दिसत होता. थंडगार चालणारी हवेत खूप मजा वाटत होती पहिले मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं. बाप्पांच्या दर्शन घेताना इतकं प्रसन्न वाटत होतं की तिकडून हळूच नये मंदिर ही खूपच छान होत. आम्ही दोघांनी दर्शन घेतल्यावर बिचच्या दिशेने गेलो बीच वरती गेल्यावर आम्ही दोघांनी पोहण्याचा मन मुराद आनंद लुटला. बीचच्या आजूबाजूला डोंगरावर असलेले घर इतकी छान वाटत होती निसर्गही असा भरभरून दिसत होता असे वाटत होते की कायमचे तिकडेच राहावं तिकडून कुठेही जाऊ नये. खरच निसर्गाची काय किमया आहे एक म्हण आहे असं म्हणतात येवा कोकण आपलाच असो तें खरच आहे निसर्गसमृद्धीने भरलेला कोकणात कोण येणार नाही. प्रत्येकाला इकडे यावसं वाटेल व कोकणाच्या या निसर्गाच्या सानिध्यात राहून आयुष्याचा मनमुराद आनंद लुटावस वाटेलच. कोकणामध्ये जी मजा असते अशी मजा दुसरया कुठल्याही ठिकाणी भेटणार नाही. धन्य ते कोकण वासी आणि धन्य ते आम्ही आम्हाला कोकण सारख्या ठिकाणी प्रवास करण्यास मिळाला. कोकणातला हा प्रवास माझ्या नेहमी अविस्मरणात राहील. तिकडच्या लहान लहान गोष्टी ही आणि विशेष करून कोकणातील खाद्यपदार्थ हे ही नेहमी कायम स्मरणात राहील.तस कोकणात बघण्यासारखं खूप काय आहे. Download Our App