Ek Pakda Wada - 3 in Marathi Horror Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | एक पडका वाडा - भाग 3

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

एक पडका वाडा - भाग 3

आमचे पालक एकसारखे धडधड दार ठोठावत होते. आमच्या खोलीचा दरवाजा काही केल्या उघडेना.
आम्ही दाराजवळ उभ्या राहून दार उघडण्याची खटपट करत होतो. तेवढ्यात आमच्या खांद्यावर दोन हात पडले आणि मोठ्याने कोणीतरी आमच्या कानात आरोळी मारली. बापरे! केवढी कर्कश्श होती ती आरोळी क्षणभर आमचे कान आणि मेंदू बधिर झाले.

आम्ही थरथरत मागे वळून बघितलं आमच्या माना अक्षरशः भीतीने थरथरत होत्या. दात दातांवर आपटत होते. मागे वळून बघताच एक मोठी आरोळी माझ्या तोंडून निघाली. रक्षा ची तर दातखीळच बसली होती.

एक सांगाडा आमच्या पुढ्यात उभा होता व त्यानेच त्याचे दोन हात आमच्या खांद्यावर ठेवले होते. त्याच्या डोळ्यांच्या खोबण्या लाल भडक रंगाच्या होत्या.

त्या सांगाड्याचा हात झटकून आम्ही बाजूला झालो तर तेवढ्यात तिथले सगळे सांगाडे अचानक भराभर उठून उभे राहिले आणि ते सगळे आमच्याच दिशेने येऊ लागले. आमची भीतीने पार गाळण उडाली.

"अरे बापरे! आता काय करायचं दार उघडत नाही आणि हे सगळे लाल खोबणीचे सांगाडे आपल्याच कडे हळूहळू येऊन राहिले. ",रक्षा

"आता आपलं काही खरं नाही! आता आपण मरणार! आपले पालक मैत्रिणी तिकडे जिवाच्या आकांताने आपल्याला हाक मारून राहिलेले आहेत आणि आपण इथे अडकलोय जाऊ सुद्धा शकत नाही बाहेर. एवढे आपण ओरडतोय पण बाहेर आपला आवाज जात नाहीये. ",मी

तेवढ्यात ते सांगाडे एकेक करून उडत येऊन आमच्या अंगावर पडू लागले. आम्ही सगळ्या शक्तीनिशी त्यांना आमच्या अंगावरून झटकण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात चार पाच सांगाडे माझ्या अंगावर येऊन पडले.

आsss रक्षा! मी भिंतीवर जाऊन आदळली.

नेहाssss एका सांगाड्याने रक्षाचे केस धरून तिला उंच धरलं आणि गोल गोल फिरवून भिरकावून दिलं.

माझे हाडं खिळखिळे झाले. रक्षाची तर फार दुरावस्था होती. आम्ही कशाबशा भिंतीचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात पुन्हा पुन्हा चार पाच सांगाडे आमच्या अंगावर पडत होते. आम्ही दोघीही अर्धमेल्या झालो होतो.

मी धडपडत उठत रक्षा जवळ जात होती एक दोन सांगाड्यांना चुकवण्यात मी यशस्वी झाली पण जेव्हा सांगाड्यांची झुंड च्या झुंड माझ्या अंगावर येऊन पडली तेव्हा मी तिथेच गारद झाली आणि कोसळली.

कितीवेळ आम्ही दोघी बेशुद्ध होतो माहीत नाही. पण जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा खोलीत कुठेच सांगाडे दिसत नव्हते आम्ही पुन्हा पुन्हा आजूबाजूला बघून खात्री करत होतो. पण कुठेही सांगाडे दिसत नव्हते. चारही कपाटं बंद होते.

सांगाडे कुठे दिसत नाही म्हणजे आपण स्वप्न बघितलं होतं की काय असं मला क्षणभर वाटलं पण उठण्याचा प्रयत्न करताना सगळे हाडं खिळखिळे झाल्याची जाणीव झाली आणि खात्री पटली की ते स्वप्न नक्कीच नव्हतं.

मी हळूहळू सरकत रक्षा जवळ गेली. रक्षा पण भिंतीला टेकून बसली.

"रक्षा! ए रक्षा बहुतेक ते सगळे गेले!",मी एकेक शब्द जुळवत अडखळत म्हंटल

"क कोण गेले?",रक्षाला काहीच अर्थबोध झाला नाही.

मला बोलणं खूप कठीण जात होतं. तरीही मी पुन्हा एकदा अडखळत म्हंटल,"ते म्हणजे स..सा..सांगाडे"

"अ...आ...आणि ते सुद्धा गेले.",रक्षाने माझ्यातून आरपार बघत म्हंटल. माझ्याकडे न बघता तिने माझ्यातुन आर पार कसं काय बघितलं मला कळलंच नाही.

मी जिवंत आहे की नाही अशी मला शंका आली म्हणून मी स्वतःला चिमटा घेऊन बघितला मी जिवंतच होती आणि रक्षा सुद्धा जिवंत होती घाबरल्यामुळे ती अशी आरपार बघत होती.

"ते म्हणजे कोण?",मी विचारले

"वाड्या बाहेरचे आपले नातेवाईक",रक्षा

अरे हो त्यांचा आवाज येणं बंद झालं होतं. आम्ही आवाज देत नाही बघून ते माघारी फिरले की काय! आम्ही मेलो असंच त्यांना वाटलं असेल. दार उघडू शकले नाहीत ते. आता आपल्याला इथून कोणीच सोडवू शकणार नाही.

क्रमशः