Moksh - 19 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 19

The Author
Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 19

समर्थ कृणाल आणी सैतान येहूधी.
भाग 46
सीजन 3
पंतांचा झपाटलेला वाडा... ep 25 -

पितृपक्ष अमावस्या स्पेशल१
महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी
फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
..कथा सुरु....



तिस-या दिवसाची छानशी सुंदर सकाळ झाली होती.
हिवाळा सुरु असल्याने नुकताच मोठ -मोठ्या झाडांच्या शेंड्यांवर हळकस पांढरट धुक साचलेल दिसत होत -
त्याच धुक्यापुढून डोंगराआडून भगव्या रंगाचा अर्ध सुर्य नुकताच उगवून आलेला दिसत होता .
पक्ष्यांची किलबिलाट, मध्येच कोकिळेच्या तोंडून निघणारा तिच मनधुंद आवाज वातावरणात घुमत होता .
सकाळच्या प्रहाराला हा पक्ष्यांचा आवाज ऐकताना मन प्रसन्न होऊन जात होत.
कधी आकाशात पाहिल्यावर कोणतातरी पक्षी हमखास उडत जातांना दिसत होता.
सकाळचा हा देखावा किती सुंदर - मनमोहून टाकणारा होता ! नाही का ? परंतु पुढील पुर्ण दिवसाच काय होणार होत ?
हे सुंदर दृष्य फक्त सकाळच्या वेळे पूरत मर्यादित होत का? गोंधळून जाऊ नका वाचक मित्रहो!
म्हंनजे जशी जशी वेळ पुढे सरणार होती इथल्या अघोरी घटनेंचा काळखेल सुरु होणार होता !
पंतांच्या हवेलीत वावरणा-या त्या सैतानाच्या हातून रोजचाच हत्याकांडांचा दिनक्रम सुरु होणार होता.
काल एका दिवसात कितीतरी विलक्षण अतर्कनीय गोष्टी घडवून आणत- तो दिवस संपला होता.
परंतू पुढचा दिवस उगवताच , त्या अघोरी घटना थांबणार होत्या का? त्या घटनेंना पुर्णविराम लागणार होता का?
एक मोकाट सुटलेला खुनी जो पर्यंत
परिसरात वावरत असतो , तो पर्यंत भीतीच्या सावटाच वातावरण असत - तसंच काहीस पंतांच्या हवेलीत वावरणा-या ध्यानाबद्दल नव्हत का ?
जो पर्यंत त्या ध्यानाच काही सोक्षमोक्ष लागणार नव्हत - हा हत्याकांड असाच सुरु राहणार होता.
दिवसाचा मनप्रसन्नीत करणारा वातावरण ...
जस -जस वेळ पूढे सरकणार होती- तसे अभद्र ,मलभी- विषारी रुप घेणार होता.
मनाच्या खोळ तलात कुठेतरी लपलेल्या
तळघरातल्या अनामिक भीतिच द्वार उघडणार होता.
न जाणे आजच्या दिवशी काय थरार घडणार होत?
सेकंदाच्या काट्यागणिक कृल्पती,अघोरी, तामसी, शक्तिंचा नंगानाच माजणार होता का?
आणी ते कोणाच्या जिवावर बेतणार होत-?
कोणाच्या रक्ताने आज भुमिला नैवेद्य लागणार होत?
या पाहूयत ह्या भागात !
आज सर्वपित्री अमावास्या होती -
देवपाडा गावातल्या लोकांनी आपल्या मेलेल्या माता-पित्यांच्या स्मरणात काव-काव केल होत.
शिड्या लावून कौलारू छप्परांवर गोळसर पानांच्या पत्रावलीत नैवेद्य ठेवल होत - मध्येच एक काळ्या रंगाचा कावळा यायचा आणि तो नैवेद्य खाऊन जायचा.
आजच्या दिवशी ह्या कावळ्याच्या रुपात आपले पुर्वज येतात , आणि ठेवलेल नैवेद्य खातात - नैवेद्य खालल्यावर आपले पुर्वज जे कोणि मृत पावले आहेत ते आपल्यावर खुष आहेत , त्यांच्या मनात आपल्या विषयी कसलेही राग नाही अस मानल जात
आणी त्या पुर्वजाची आत्मा ही पुढील वाटचालीस निघुन गेली आहे असही त्यातून कळत !
पन जर ठेवलेल्या पत्रावलीतल नैवेद्य कावळ्याने खाल्लंच नाही तर? मग त्याच काय अर्थ समजायचं ! मृताला पुढील गती मिळाली नाही का ! कोणत्या तरी अतृप्त इच्छेपोटी ते इथे घुटमळत आहेत का ? -
ह्या सर्व गोष्टींत किती तथ्य आहे आणि किती नाही ते अद्याप गुलदसत्यातच आहे .जगातल्या अनेक गुढ़ांप्रमाणे हे सुद्धा एक गुढच आहे.
...
असो कथा पाहूयात..
..... देवपाडागावात सदानंद देहू पाटील वय (42) ह्यांच घराला दुकान होत- सदानंदना पुर्णत गाव सदावाणी म्हंणून हाक मारायचा .
त्यांच्या परिवारात बायको सोमाबाई वय ( 39) -आणि त्या दोघांचा एकूलता एक मुलगा किशोर वय ( 15) अशी तिघजण राहत होती.
सदावाणीच काव -काव करून झाल होत-
आता तो नेहमीसारखा दुकान उघडणार होता.
त्याच्या प्रपंचाला लागणर होता.
" काय ग सोमे , किश्या उठला का ! की झोपलाय अजुन !" सदावाणीने दुकानाच शटर उघडल..
" क्व्हाचांच उठला की , आण परसाला गेलाय " सोमाबाई दारात उभ राहून म्हंणाल्या.
" परसाला ? संडास हाई ना घरात ,बाहेर जायची काय गरज हाई का? तुला थांबिवता न्हाई का आला त्याला...गावात सद्या काय चालूये माहीत नाही व्हय तुला."

सदावाणी काळजीच्या सुरात म्हंणाला.
सदाला एकक्षण अस वाटल की बोलून चुकच केली. कारण त्याच्या बायकोने लागलीच साडीच पदर तोंडाला लावल.
जणू ती आता मोठ्याने फिल्मीस्टाईलने हंबरडाच फोडणार होती.
"गप्प " पूढे काही घडण्या अगोदर सदावाणी पटकन खेकसलाच .
" येइल परत तो ! नाहीतर पंधरा- वीस मिनीटात मीच जातो - तसबी सकाळ आहे आता ,आण उजेडात! तसल काही हिंडायच नाही !"
सदावाणी म्हंणाला.
त्याच्या वाक्यातले ते म्हंणजे काय ? ह्याच अर्थ त्या मायेला कळल होत ! एकुलत्या एक मुलाच्या काळजीन तिच्या उरात धाकधूक सुरु झाली होती.
तसंही काहीदिवसांपासून गावात तीन - चार जणांचा
निघृण खून झाल होत.
कोण करत होत?कस करत होत? कुठून येत होत ? कस येत होत ? कळायला काही मार्गच नव्हत ! पण गावातली लोक म्हंणत होती , पंतांच्या वाड्यातली ब्याद पुन्हा बाहेर पडलीये , सूडाच्या भावनेने एक-एकाचा काटा काढत आहे .
सोमाबाईनी गावातल्या दोन- तीन बायकांकडून काही बाही भयानक वार्ता ऐकल्या होत्या.
तेच ते आता त्यांच्या डोळ्यांसमोर भिंगत होत्या - क्षणा,क्षणाला काळजी वाढत चाल्ली होती.
बाहेर गेलेला पोर परत आलाच नाहीतर?
आणी आलाच तर त्याच मेलेल म्हढ आल तर?
डोक्यात काय काय नाना त-हेचे विचीत्र विचार येत होते.
xxxxxx
सदावाण्याचा किश्या एकूलता एक होता.
बापाच दुकान असल्याने पंधरा वर्षाच्या किशाच तोंड चौवीस तास चालू असायचं-
चौकलेट, लेस ,
फरसान, चकल्या, चिक्या जे भेटेल तो ते भसम्या सारखा तोंडात कोंबायचा !
खाऊन खाऊन शरीरयष्टी पैलवानासारखी माजली होती-
उंचीने जेमतेम साडेचार फुट, फुगलेल्या बटाट्यासारखा होता.. किश्या !
परंतु दिसायला मात्र गोंड़स होता.
त्याचा गोल चेहरा - समोरच्या व्यक्तिला भुरळ पडायचा . किश्या जरी पंधरा वर्षाचा असला तरी त्याचे विचार - वागण थोडफार मोठ्या मांणसासारख होत.
" ए किश्या अजुन किती लांब जातो साल्या ..बसू की इथंच , कोण बघतोय !"
किश्याचा काडीमित्र भागाजी वय(चौदा) उर्फ भागो म्हंणाला.
किश्या आणि भागो दोघेही एका बांधावरच्या पायवाटेने चालत निघाले होते.
दोघांच्याही डाव्या आणी उजव्या बाजुला पाच फुट उंचीची पिकलेल्या भाताच्या पिकांची कणसे होती.
त्यावर सोनेरी रंगाने भात उगवून आला होता.
सकाळच्या थंड हवेसहित कणस समुद्राच्या लाटेप्रमाणे डोळत होती.
दूर दुर पर्यंत शेतच शेत दिसत होती- आणि सजीव आकृती म्हंणायला ह्या दोघांशिवाय तिथे कोणिही नव्हत.
" ए भागो तू येडा झाला आहे का ? इथ शेतात बसतो का साल्या ? तुला माहीतीये का ,सकाळी रानातून बायका येत्यात इथून, त्याई आपल्याला बघीतला तर !"

किश्या हातातला चिंपाट कंदीलासारखा
वर पकडत म्हंणत होता.
" अरे बगूदे ना म ! आपण काय मोठे आहोत का! "
" ए भागो , तू बायल्या आहे का साल्या ! मर्दासारखा वाग जरा ! नायत एक काम कर, तू बस इथ, मी जातो तिकड - आणी हा त्या रानातून बायका येतीला ना त्या हसतील तुला बायल्या..!"

किश्या हातातला चिंपाट हळकेच हळवत पुढे निघाला..
" ए किश्या थांब ! मी बायल्या नाहीये !"

भागो सुद्धा किश्याबरोबर आला. दोघेही गावापासून खुप लांब आले होते
" ए भागो , ते बघ गावातल मशान ,मी बाबाकडून ऐकलय -की मशनाच्या पुढ मोकळ मालरान आहे..आणि तिथ कोण येनार पन न्हाई चल तिकडच जाऊन बसुयात चल !"

किश्या आणि भागो दोघेही चालत मसणाच्या वाटेने जात होते.
मसणातल्या मोठ मोठाल्या झाडांनी, सकाळचा स्वच्छ प्रकाश अडवून धरला होता - उंच उंच झाडांची काया ह्या दोन लहानसर आकृत्यांना आपल्या खालून जातांना डोळे वटारून पाहत होत्या.
जरास अंधारून आल होत - हलकीशी थंडी जाणवत होती -अवतीभवतीचा परिसर अनोळखी- जाणवत होता.
राहून राहून तिस-या कुणाची तरी उपस्थिती जाणवत होती.
" भागो काळ तीन जण मेली गावातली माहीतीये का ! आणि त्या तिघांना पन रात्रीपर्यंत इथच जाळली लोकाणी.... "
किश्या हळू आवाजात म्हंणाला.
"; मेली?" भागोने जरा विचीत्र नजरेने किश्याकडे पाहिल. आणी हळू आवाजात डोळे मोठे करत पुढे म्हंणाला.
" अरे तुला सगळा माहीतीच नाय, अरे मेली नाही काय ,माझा अण्णा अक्काला सांगत होता -की खलास केली त्या तिघांना ! "

" कुणी रे ?"
किश्या उत्सुकतेने म्हंणाला.
" कुणी ?" भागो आपल्या बोलण्यात एक गुढ ठेवत हळुच पुढे म्हंणाला..
" भूतानीss!" भागो गुढमय स्वरात म्हंणाला.
भुत हे शब्द ऐकून किश्याच्या पोटात गोळा आला, आधीच पोटावर प्रेशर काही कमी होत -जे भीतिने आणखी वाढल.
" भागो , आपण ह्या विषयवर नंतर बोलू,
माझ्या पोटात जरा गूड गूड होयला लागलाय,तू तिकड बस मी ईकड बसतो !"
चिंपाट वाकड तिकड हळवत किश्या माकडासारकज धावला ..
ही मसणाची शेवटची आंतिम बाजू होती , जिथे कालसंध्याकाळी मण्याच्या अंगात आलेल्या
त्या अभद्र सैतानाने मंजूलालचा काटा काढला होता.
ही तीच जागा होती , ज्या जागेवर अंधारात दृषकृत्य घडल होत.
जस एक लहाण मुल खेळण्यातल्या बाहुलीचे हात पाय तोडून तिला तसंच जागेवर टाकुन देत ..
त्याच प्रकारे काळ घड़लेल्या त्या दृष कृत हत्याकांडातले बळी अद्याप तिथेच अस्त-व्यस्त विकृतरित्या पडले होते .
सोनेरी गवताआडून किश्या उठला -
ढोप्यांवरची काळी चड्डी हळकेच वर घेतली.
" हा , हा, हा, हा, !" डोळे ब्ंद करून किश्या कसतरीच हसला.
"आता कस हलक हलक वाटतय !"

किश्या स्वत:शीच म्हंणाला.
त्याने हळकेच डोळे उघडले ...आणी समोरच दृष्यपाहून त्याचे डोळे खोबणीतून बाहेर येतिल इतके मोठे झाले.- झटकन दातखिली बसली.
समोर तारेच कंपाउंड दिसत होत - त्या पल्याड मूरूमाची तपकीरी माती दिसत होती -आणी त्या मूरूमावर एक मृतदेह पडल होत.
आणि मृतदेहापासून पुढे एक मोठ अक्राळविक्राळ रुपाच वडाच झाड होत.
किश्या त्या मृतदेहाच निरक्षण करु लागला- अंगावर पोलिसासारखी खाकी वर्दी होती ,
त्या मृतदेहाच धड कशानेतरी चेचल होत - बाजुलाच
एक लाल रंगाने माखलेला दगड पडला होता , नक्कीच धड त्याने चेचल होत - मृतदेहाला कमरेपर्य्ंत रक्ताच्या
लाल शिंतोड्यांनी रंगवल होत. खाकीवरती लाल टीपके जे उमटले होते.
मृतदेहाच्या हाता-पायांवर माशा घोंगावत होत्या तर काही माशा अंगावर बसुन रक्त चुकत होत्या.
मर्दाची भाषा करणारा किश्या पंधरा वर्षाचा पोर होता
पण भीति- वय काळ पाहत नसते ..भीतीचे पाष ताकदवर असतात.. भल्या-भल्यांना आपल्यात गुंडाळून जखडून घेतात.
किश्याची कानसूळ गरम झाली, छाती भीतिने जड झाली होती- तोंडावर बारा वाजले होते.
हात- पाय रबराचे झाले होते. किश्या पुतळ्यासारखा उभ राहून त्या प्रेताकडेच पाहत होता.
नाकातून गरम हवा बाहेर पडत होती.
अचानकच आजूबाजूची थंडी वाढली, तारेच्या कंपाऊंड पलीकडे असलेल्या वडाच्या झाडाजवळून पांढरट धुक वाहू लागल...
काहीक्षण पूर्णत सृष्टीतला काळ गोठला होता. काहीतरी भयंक घडण्याच्या मार्गावर होत - नियतीचे क्रूर खेळ सुरु झाले होते.
मेलेत्या स्तबध म्हढ़ाची हळकेच हालचाल झाली, हाताची रक्ताळलेली कालिनिळी जमिनिवर पडलेली बोट वाकडीतिकडी हळली- आणि झटकन कमरेपर्यंत ते मेलेल ध्यान हाडांचा कट कट आवाज करत उभ राहील, यंत्रमानवासारखी हालचाल करत त्याने मान वळवून किश्याकडे पाहिल...
किश्याच्या मणक्यातून जणू बर्फाची थंड लाट
पसरली- हाता पायांना अक्षरक्ष लकवा मारला -
डोळे हे अशे वटारले गेले..तोंड मोठ असत तर काळीजच घशातून बाहेर आल असत्ं.
त्याचा तो दगडाने चेचलेला चेहरा त्यात काहीही नव्हत - आतल्या लाल पिवळ्या नसा दिसत होत्य- चार पाच बत्तीशीतले शिल्लक राहीलेले दात दिसत होते ..त्यातच ते ध्यान बोलू लागल..
" काय रे पोरा !"घोगरा चिरकस आवाज.
"हागाला आलता का , हागाला आलता.. फिफिखिखिखी.फिफी..!."

" मला पोलिस स्टेशनला सोडतो ...का.. रे पोरा. ये ईकड..ये .ईकड ये . "

त्या बाळमनाच्या मुलाला एकट - दुकट पकडून
त्या सैतानाने ही भीती दाखवायला घेतली होती.
आणी त्याच्या त्या क्रूर मायावी पाषात ते कोवळ्या ह्दयाच पोर सपशेल फसल होत.
असल आकलनक्षमते पलिकडच दृष्य पाहून किश्याच्या बाळमनाने धोका ओळखला होता. भीतिने किश्याची पावळे मागे मागे जाऊ लागली होती.
तसा त्या ध्यानाचा बोलण्याचा आवाज थांबला..
त्याने आपला पवित्रा बदल्ला..
कंबरेचा कटकट आवाज करत क्ंबर फिरवली- आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवले, ..जमिनीवरून रेंगाळत किश्याच्या दिशेने धावल..
" थांब ए ..पोरा..... मला पोलिस स्टेशनला घेऊन जा थांब ! हिहिहिहिहिहिहीहीहीह्ह!"

" न्हाई..न्हाई..!आssssss " किश्याने एक आरोळी ठोकली... .भेटेल त्या वाटेने पळत सुटला..
गवतावरून धाड धाड पाय आपटत किश्या धावत होता -
मरणाच्या भीतिपूढे त्या विषारीकिड्या-कुड्यांची भीति कमी होती ! समजाच जर काही विषारी सर्प वगेरे डसलच तर औषध उपचार करता येणार होते - पन ह्या असल्या ब्यादेच्या हाती सापडलो तर सुटका नव्हती-मरणौत्तर सुद्धा सुटका नव्हती.
आत्मा सुद्धा मोक्षासाठी भीक मागत राहणार होता.
पळत असतांनाच त्याने मागे वळून पाहिल -
कुत्र्यासारख हाता -पायांवर उड्या मारत , ते मागून येत होत.
" ए पोरा थांबना रे ए , मला पोलिस स्टेशनला घिऊन जा ना ए, थांबना थांब- फिफिफीफीफिफी !"

किश्याच्या कानांवर तो घोगरा आवाज पडत होता. म्ध्येच ते किन्नरी स्वरात हसत होत.
भीतिने त्या पोराच जिव वर खाली झाला होत उर फुटेस्तोवर तो धावत होता.
डोळ्यांना गावचो ओढ लागली होती .
शेवटी काहीवेळ अजुन धावून झाल्यावर , त्याला समोर गाव दिसल , गावातून धावत तो घरच्या दिशेने निघाला ..
गावातून धावतांना त्याच्या तोंडून तेच शब्द मोठ्याने बाहेर पडत होते.
"भुत...भुत...!"

गावातली मांणस ,बायका, झाडाच्या खाली गोल कठड्यावर बसलेले म्हातारे..जो तो किश्याला अस मोठ मोठ्याने ओरडत धावत जातांना पाहत होता.
किश्या त्याच्या घराजवळ पोहचला - उघड्या दारातून थेट धावत घरात घुसला ..!
किश्याचा आवाज ऐकून दुकानात गि-हाइकांना सामान देणारा सदावाणी पटकन घरात घुसला , स्वयंपक घरात चुलीसमोर बसलेल्या सोमाबाई सुद्धा घाइघाईत काय झाल हे पाहण्यासाठी स्वयंपक घरातून बाहेर आल्या - बाहेर येताच त्यांना सदावाणी पळतच देवघरात जातांना दिसले.
सोमाबाई सुद्धा घाई-घाईतच त्यांच्या मागे गेल्या .
दहा फुट रुंद आणि दहा फुट उंचीच्या देवघरात शंकर , श्री स्वामी समर्थ, विठ्ठल-रुक्मिणी, लक्ष्मीदेवी, गणपती अश्या विविध देवांच्या मुर्त्या, तसबीरी खाली एका टेबलावर लाल कपडा अंथरून त्यावर मांडल्या होत्या - आणी त्या देवांपुढे सकाळीच - काहीवेळा अगोदर सोमाबाईंनी दिवा पेटवला होता.
दिव्याच्या वातीचा तांबूस प्रकाश देवांवर पडला होता .
आणी त्याच देवांच्या बाजुला गुढघ्यात डोक खुपसून किश्या बसला होता.
सदावाणी- सोमाबाई दोघेही किश्याच्या ह्या अशा असमंजस वागण्याने पूरतेच भांबावून गेले होते .
" ए किश्या , एय लेका ! "
सदावाणी चेह-यावर हास्याचे भाव आणत म्हंणाले.
त्याला वाटल की किश्या नक्कीच काहीतरी मस्ती वगेरे करत असावा. परंतु गुढघ्यात मान घालून बसलेल्या किश्याची काडीचीही हालचाल झाली नव्हती. सदावाण्यांने जरा चिंतीत चेह-यानेच सोमाबाईंकडे पाहिल. तस त्यांनी मान होकारार्थी हळवत मी पाहते असे म्हंणत त्या किश्याच्या दिशेने गेल्या.
त्यांनी आपला हात किश्याच्या डोक्यावर ठेवला.
" किश्या माझ्या सोन्या.., काय झाल रे !"
सोमाबाईंच्या शब्दांत मायेची उब होती - त्या उबेत एक हिम्मतप्रदान करणारी शक्ति होती.
किश्याने थरथरत्या देहासहित हळकेच आपली
मान ढोप्यांतून वर काढली.
सदावाणीच्या दुकानात आलेले गि-हाईक , गावातून पळत आलेल्या किश्याला पाहिलेल्या दहा - बारा गावक-यांनी सुद्धा आपला मोर्चा वाण्याच्या घरात घुसवला होता.
जो तो मोठ्या नवलाने,आश्चर्यकारक नजरेने
पुढे घडणार दृष्य पाहत होता.
किश्याने ढोप्यांतुन मान वर काढत आपल्या आईकडे पाहिल.
त्याचे ते पाणिदार डोळे झोप न मिळालेल्या मांणसासारखे लाल झाले होते.
त्यातच त्याचे डोळे मोठे होते - ज्याने ती लाल डोळ्यांची नजर भेदक - काळीज चिरणारी होती.
एकवेळ ती लालभडक डोळ्यांची नजर पाहून
सोमाबाईंच्या छातीत धस्स झाल होत - सदावाणी तोंडाचा आ-वासून किश्याच्या त्या लाल भडक रक्त उतरलेल्या डोळ्यांना पाहत होता.
मागे गावक-यांची कुजबुज सुरु झाली होती .
ज्याच्या त्याच्या नजरेत भय, उत्सुकता, आश्चर्यकारक अश्या कित्येकतरी मिश्रित भावनांचे प्रकार दिसून येत होते.
" किश्या आर पोरा काय झाल , आर परसाला गेलता ना ? काय झालं का तिकड , काय बघितल का?" सदाच्या वाक्यावर किश्याने आवंढ़ा गिळून मान हलवली.
" काय बघीतल ? सांग पाहू मला !"

किश्याच्या तोंडून पटपट शब्द बाहेर पडत नव्हते - एक एक शब्द जणू दगडासारखा जड वाटत होता..उच्चारायला किती त्रास होत होता !.
" मी..मी..आ..आणी भागो म..म..मसणाच्या पुढ परसाला गेलतो! "
अस म्हंणतच किश्याने तोड मोडक्या शब्दांत सर्वकाही सांगायला सुरुवात केली.
सदावाणी- सोमाबाई , तिथे जमलेले गावकरी सर्वाँच्या चेह -यावर भीतिचे भाव पसरले होते.
जो तो तोंडाचा आ- वासून डोळे भीतिने विस्फारून ती हकीकत ऐकत होता.
किश्याच सर्व सांगून झाल होत.
"बाबा ..बाबा..मला वाचवा...! तो पोलिसाच भू मला न्ह्याला येइल बाबा, न्ह्याला येइल मला तो, मी ह्या देवांच्या खोलीतून बाहेर जानार न्हाई , नाइतर मला तो घेऊन जाईल..! "

किश्याच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा वाहत होत्या.
त्याच्या शब्दांतली भीति- बोलतानाचे चेह-यावरचे भीतिमय हावभाव भयान होते.
पंधरा वर्षाच्या त्या पोराची ती विस्फारलेली रक्त मिश्रित नजर ह्दयात घुसत होती.
" सदावाणी , सदावाणी!"

नुकत्याच त्या शांततेत हा आवाज आला.
सदावाण्याने मागे दरवाज्यात पाहिल,
मागे उभ्या गर्दीला पांगवत एक गावकरी देवाच्या खोलीत आला.
सोमाबाईंनी किश्याला आपल्या उराशी कवटाळून धरल, त्याच्या अंगातून जणू वाफ बाहेर येत होती ! अंग विस्तवासारख तापल होत.
"अरे सदा- तुझ्या पोराबरोबर जाधवाचा भागो
परसाला गेला होता , तो पोर मेला की त्याचा ..! "
तो माणुस म्हंणाला.
" काय ?" सदावाणीच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला.
सोमाबाईंनी किश्याला अजुन गच्च उराशी कवटाळून धरल.
" व्हय की , आर अक्खी बॉडी फाडल्या त्या पोराची - जंगली जनावरच काम नाही वाटत, सैतानाच असला पाहिजे !" तो माणुस म्हंणाला.
"त्या..त्या..पोलिसाच्या भुतानीच मारल भागोला..! आता तो मला न्ह्याला येइल.., मला न्ह्याला येइल..आता तो..!आई आई सांगणा देवाला वाचवाला ..आई सांगना देवाला..आई.."

किश्याच्या तोंडून एका पाठोपाठ हेच वाक्य बाहेर पडत होत.
पितृपक्ष अमावास्याच्या सकाळीच
पिताराना नैवेद्य दाखवल होत आणि पाहिलाच मयत पडला होता.
दिवसाच्या प्रहाराची ही प्रथमच अशुभ घटना
घडून सुरुवाफ होती-
आणी अजुन पुढे न जाणे काय काय घडणार होत...
XXXXXXXXXXX

क्रमशः


पुढील भाग उद्या !