Mall Premyuddh - 27 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 27

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 27

मल्ल प्रेमयुध्द







दादा आणि आशा दरवाजात उभे राहून वीर आणि आबांचे बोलणे ऐकत होते. वीरचे त्याच्याकडं लक्ष गेल.
" नमस्कार आबासाहेब" दादा म्हणाले.
आबांनी सुद्धा नमस्कार केला. आदराने स्वागत केले. सुलोचनाबाई बाहेर आल्या. आशाताई आणि सुलोचनाबाई आतमध्ये गेल्या.
चहापाणी झाले . दादांनी डायरेक्ट विषयालाच हात घातला. "आबासाहेब माफ करा पण आम्ही तुमचा आणि वीररावांचे बोलन ऐकलं. चुकीच नाय तुमचं... तुम्ही तुमचं मत मांडाव आम्हाला काय वाईट वाटत नाय, तुम्हीच सांगा कारण आधीच आम्ही सांगितलं होतं तुम्हाला क्रांतीच्या आयुष्यात महत्त्वाच्या स्थानावर असलेला कुस्ती हा विषय संपणार नाय पण तुमचं मत नसेल तिला पुढे पाठवायचा तर आत्ताच आपणही लग्न मोडलेल बरं नंतर वितुष्ट नको, वाद नको आम्हाला तुमचा लई आदर हाय." दादा बोलत व्हते न आबा वीर ऐकत व्हते.
"दादा माफ करा पण आमच्या इभ्रतीला शोभेल असा हा खेळ नाय. आमच्या घरातल्या सुनाबाळा भायर पडत नाइत आणि लग्नानंतर क्रांतीला खेळता येणार नाय त्याच्यामुळे...." दादासाहेब उठले.
"आबासाहेब पहिल्यापासनच आम्हाला तुमचा आदर हाय. दादांनी हॅट जोडले आणि आशाला हाक मारल्या.
"आशा... आशा भायर या..." आशा बाहेर आल्या त्यांच्याबरोबर सुलोचना, तेजश्री दोघी बाहेर आल्या.
" निघू आपण..." दादा म्हणजे.
"दादा जेवण करून जा..." सुलोचना बाई म्हणाल्या.
"नाही ताईसाहेब माफी असावी." दादा म्हणाले.
"ताई साहेब खरं सांगायचं तर आम्ही आमच्या मुलीला लहानपणापासून ज्याच्यासाठी प्रोत्साहन दिल पण जिथं हेच सगळं बंद व्हणार असल तर मोडलं लग्न, आम्हाला मान्य हाय स्त्रीचा सन्मान नसल तिथं माझ्या पोरीला देण्यात मला कायचं अर्थ वाटत नाय, घरात असल तर ते डोक्यावरून पदर पाडणार नाय पोर पण पोरीच्या जर आयुष्यातल स्वप्न पूर्ण व्हणार नसल तीच्यासाठी मी एवढ्या खस्ता खाल्ल्या, माझ्या पायाची चाळण झाली त्याचच आयुष्य संपणार असल तर हे लग्न मोडलं, स्वप्न तिनच नव्हतं बघितलं तिच्याबरोबर मीसुदा स्वप्न बघितलं व्हतं पण हे स्वप्न माझं पूर्ण व्हणार नसल तर हे लग्न मोडलं बा
आबासाहेब राग नसावा तुमचं इचार अमास्नी पटत न्हाईत अन आमचं इचार तुमास्नी पटत नसत्याल पण जिथं माझ्या पोरीच्या मान सन्मानाला तडा जाणार असलं तर मोडलं लग्न.

"दादा आपण अस तडकीफड निर्णय नाका घेऊ.. बसू अन यावर काहीतरी तोडगा काढू..." सुलोचनाबाईं म्हणाल्या.
"व्हय आबासाहेब लग्न मोदन हा एकच पर्याय नसावा ह्यावर..." आशाने आपले मत व्यक्त केले. सगळं एकूण वीरला जो धक्का बसला होता तो वेगळाच... पण तेजश्रीला आनंद झाला होता कधी एकदा ही बातमी स्वप्नालीला सांगती आहे असं झालं होतं.

"न्हाय यावर काय पर्याय न्हाय ताई... ज्याअर्थी आबासाहेब शांतबसून त्यांचं मत व्यक्त करत न्हाईत त्या अर्थी त्यांना हे लग्न मोडलेलं बर हाय..." दादा

"आव पण आपल्या पोरांचा इचार करा..." सुलोचना
"सुलोचनाबाई... तुम्हाला म्हाइत हाय जर शब्द पाळणार असू तरच आम्ही तो देतो... आपल्या घरात हे चालणार न्हाय हे म्हाइत तुमास्नी मग कशापायी त्यांना खोटी आशा दाखवायची. जिथं क्रांतीची स्वप्न पूर्ण व्हत्याल त्या ठिकाणी, घरात तीच लग्न व्हावं..."आबा
"पण आधी तुम्हाला म्हाइत व्हत की क्रांती कुस्तीशिवाय राहणार न्हाय तर मग का अट्टाहास व्हता लग्न अन साखरपुडा करायचा..."संग्राम आत येऊन बोलला.
"वीरसाठी..." आबा म्हणाले

"वीर अरे हे लोक तुला न विचारता तुझं लग्न मोडत्यात अन तुला काय बी वाटत न्हाय वय..." वीर उठला अन त्याच्या रूममधी वरती निघून गेला. वीरच्या भावना संग्रामला समजल्या तो वीरच्या मग गेला.
"आबासाहेब निघतो आम्ही..." दादांनी त्यांना हात जोडले आणि दोघेही न जेवता बाहेर पडले.

आबासाहेब शांत होते.
" जे झालं ते पोरांचा इचार न करता झालं... माफी असावी माझी मत तुमच्या बाजूनं असत्यात पण त्यांना आपण लग्नानंतर समजावू शकलो असतो.
"नसतो समजावू शकलो कारण खोट बोलणं आपल्या रक्तात नाय... कशापायी खोटी आश्वासन द्यायची... नंतर चार लोकांच्या मधी अपमान होण्यापेक्षा आता हे सगळं झालं ते बर हाय..." आबा
"आव पोर चार दिस कोकणात एकत्र राहून आल्यात तुमास्नी काय वाटतय की हे लोकांना माहीत झालं नसलं व्हय..?
"लोक दोन्ही बाजूने बोलतील ना त्यांची लेक त्यांच्या शब्दाभायर न्हाय ना आपला वीर... वीरसाठी क्रांतीपेक्षा चांगली पोरगी भेटेल..." आबा
"व्हय का न्हाय आपली स्वप्नाली काय वाईट न्हाय... अशी तीच मन मोडलं व्हत आणि शिकली असली तरी ती आपल्या घरात वावरली. आपल्या सगळ्या गोष्टी तिला म्हाइत हायत...तिला सुद्धा भाऊजी अवडत्यात." तेजश्री बोलून गेली.

आबा आणि सुलोचना एकमेकांकडे बघत होते. त्यांच्या हे लक्षात कस आलं न्हाय ह्याचा इचार ते करत व्हते.

"व्हय पण वीरला स्वप्नाली न्हाय आवडत हे ठाव हाय मला..." सुलोचना
"पण त्यांना तर आवडतो ना वीर... मग झालं तर दोन दिस जाऊद्या मग बोलतो आमच्या बहिणीबरोबर..."आबा म्हणाले तेजश्रीला आनंद झाला.

दादा आणि अशा घरी आले. क्रांती अपेक्षेने हातात मोबाईल घेतला होता. बराच वेळ ती वीरच्या फोनची वाट बघत होती पण तो फोन करण्याच्या मनस्थितीत सुद्धा नव्हता हे तिला माहित नव्हतं.
दादा आणि आशा बराच वेळ शांत बसले होते. तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि दादा जवळ गेली.
" दादा काय झाल?" दादा काहीच बोलत नव्हते.
शेवटी आशाच म्हणाली.
" पर्याय नव्हता ना तुझी कुस्ती महत्वाची...म्हणून मोडले लग्न... "असं कसं शक्य हाय ? आणि दाजी काहीच म्हणाल नाय का?" चिनू म्हणाली .
क्रांती शांत बसली. तिच्या लक्षात यायला लागलं की वीरने का फोन केला नाय,
"दादा मला माहिती हाय की योग्य कारणासाठी तुम्ही लग्न मोडल असल अन मी तुमच्या निर्णयाचा मान ठेवते." क्रांती
"व्हय ठेव मान बाई... तुला पण तेच पाहिजे व्हत लग्न मोडव अस पहिल्यापासूनच वाटत व्हत, झालं मनासारखं तुझ्या मोडल लग्न आता गावाला काय तोंड दाखवायचं ते दाखवा..."

"आई तू नको काळजी करूस मी ज्यांना द्यायची ती उत्तर देते तुम्हाला मान खाली घालावी लागल, इथपर्यंत उंबराच्या पर्यंत लोक येणारच नाय तुमास्नी प्रश्न इचारायला लग्न का मोडलं,?

" दादा पण लग्न मोडण हा एकच पर्याय व्हता का? चिनू ला खूप वाईट वाटलं होतं. " आन दाजी काहीच बोलत नव्हत का?" चिनू म्हणाली.
दादांनी हाताची घडी काढली आणि माग हात बांधून उभ राहिल.

"चिनू बहुतेक त्यांच आधीच बोलण झाल व्हत आणि वीररावांच्या चेहऱ्यावरन त्याला खूप मोठा धक्का बसलाय असं वाटत व्हतं. त्यांनी क्रांतीला प्रोत्साहन देण हे आबांना आवडलं नव्हतं आन म्हणूनच वीरराव एका शब्दाने सुद्धा काय बोलल नाय. अगं संस्कार हायत, आई-वडिलांच्या पुढे जाणारे व्हय."

" दादा त्यांच्या सगळ्यांना हा निर्णय मान्य झाला का लग्न मोडलं म्हणून? कोणीच आबासाहेबांना समजवायचा प्रयत्न केला नाय का? अजून दीड महिन होतं की लग्नाला गेले असते मुंबईला तर काय फरक पडला असता, नंतरचे नंतर बघितलं असत आन दाजी पण जाणारच व्हते. तिच्या बरोबर मुंबईला, मग काय हरकत व्हती. ती थोडीच एकटी जाणार व्हती. रत्ना पण बरोबर व्हती." चिनू
" ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटत्यात बाळा त्यांची एक वेगळ प्रस्थ हाय गावात, त्यांना लोक मानत्यात." आशा म्हणाली.
" पण हे लग्न ठरवायच्या आधी का नाही कळल त्यांना तवा तर म्हटले व्हते की तिला जे काय करायचे ते करु दे." चिनू

क्रांती उठून आत गेली. तिला पहिल्यांदा एवढे भरून आल व्हत. वीरचा फोन न येण. तिच्या डोळ्यातन आसवं व्हायला लागली व्हती. तिला लग्न मोडण्याचा दुःख होत होतं वीर चा फोन आला नाही म्हणून??? क्रांती स्वतःशीच बोलत होती.
"मी वीरच्या प्रेमात पडली हाय का? म्हणून मला एवढा त्रास व्हतोय. पण वीरच्या प्रेमात पडनं किंवा त्याच्याशी लग्न केलं तर माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीचा काय? मी कुस्ती सोडून द्यावी. त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी नाही हा अपमान सहन करीन मी पण कुस्ती नाय सोडणार... वीर कदाचित मी तुमच्या प्रेमात पडली, मला तुम्ही आवडायला लागला, पहिला भ्रम व्हता की तुम्ही फक्त माझा बदला घ्यायला लग्न करताय, पण तुम्ही मला मुंबईला जायची परमिशन दिली आणि माझं भ्रम तुटला आधीच थोडीफार प्रेमात पडले, पहिल्या भेटीनंतर जरा जास्तच... वीर तुम्ही त्रास करून घेऊ नका. माझं ठरलं... मी दोन दिवसात मुंबईला जाणार."
तिने बाबा मोबाईल बाजूला केला. डोळे पुसले. आणि निर्धाराने उठली. डोळे पुसताना तिच्या हातात अंगठी दिसली. वीरने घातलेली तिने अंगठी काढली आणि बाहेर गेली. संतू येऊन बसला होता. रत्ना त्याच्या बाजूला बसली व्हती. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं.
"संतु ही अंगठी वीर भेटतील तवा त्यांच्याजवळ दे." ती रडली हे सगळ्यांना दिसत व्हतं.
"एवढंच कशाला ? त्या साड्या घातलेले दागिने सगळे देऊन टाक की ...कशाला ठेवायच?" आशा रागातच बोलली.
"ठीक हाय सगळ बॅगेत पॅक करते आणि संतुला द्यायला लावते. क्रांती शांतपणे बोलली आणि आत गेली.
तिच्या पाठोपाठ रत्ना आणि चिनू आत मध्ये गेल्या. रत्ना तिच्या शेजारी बसली.
क्रांती आपण समजावू वीरला... असं कसं लग्न मोडून द्यायचं? तू पण तयार व्हतीस? मला माहितीये तुला वीर कधीच आवडत नव्हता. पण आता तुझ्या डोळ्यात त्याच्याविषयी प्रेम दिसत, प्रेमात पडलीस तू त्याच्या, म्हणूनच फक्त अंगठी दिलीस. कानातले नाय... रत्ना म्हणाली.
"कानातले मी देणार सुद्धा नाय... कारण मी मान्य करते की मी त्यांच्या प्रेमात पडली आणि आजपासून ते कानातले कानात घालणारे मी, त्यांच्या शिवाय कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाय पण मी माझ्यासाठी आणि दादांसाठी कुस्ती नाय सोडू शकत ईतकं सुद्धा ठरलं होतं की मी दारात पाऊल टाकल की माझ्या डोक्यावरचा पदर सुद्धा पडणार नाय पण आबांनी वेगळी अट घातली, का घातली? आयुष्य घालवल याच्यामध्ये आणि जवा माझ आयुष्य बदलणार तवा एका गोष्टीमुळ मी सोडून द्यायची फक्त प्रेमासाठी... मग माझ्यावर जे प्रेम करत्यात, माझ्या कुस्तीवर प्रेम करत्यात, त्यांचा इचार सोडून देऊ मी... नाय आज पासून मी वीरला भेटणार नाय ना त्यांचा फोन उचलणार नाय बास मोडल लग्न आणि दोन दिवसात मी मुंबईला जाणार.
"फोन उचलणार नाय म्हणजे काय? एकदा उचल आला तर आन एक संधी दे त्यांना बोलायला. असं तोडू नकोस एकदम सगळा एकदा बोल." रत्ना म्हणाली.
हो एकदा एकदा बोल दाजीशी, त्यांच म्हणणे ऐकून घे, मग बाकी सगळ... तुमचं प्रेम सहजासहजी वेगळे होण्यासारखं हाय का? साखरपुडा झालाय तुमचा."
" इचार करीन एक संधी द्यायची की नाय, त्यासाठी त्यांचा फोन यायला पाहिजेत आणि एक लक्षात ठेवा कोणी सांगायचं नाय त्यांना की मला फोन करा म्हणून मी वाट बघणार नाय त्यांच्या फोनची क्रांतीच्या डोळ्यातून आपोआप पाणी आल.
" मग हे पाणी कशासाठी ग तायडे."
" शब्द थांबवता येतायत ग, पण मनाचं काय हे खोटं पाणी नाय डोळ्यातल येणार... मला खरच मनापासून वाईट वाटतंय हे असं व्हायला नको होतं मी सून सुद्धा झाले असती आन दादांची स्वप्न पूर्ण करणारी लेक सुद्धा दोन्ही संधी द्यायला पाहिजे व्हती. आबांनी विश्वास ठेवायला पाहिजे व्हता.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत