Objection Over Ruled - 8 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 8

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 8

प्रकरण ८....
सौम्याआणि पाणिनी, कोर्नीस होटेल च्या स्वागत कशात उभे होते.वयाने थोडा मोठा म्हणजे पन्नाशीतला एक माणूस तिथे होता. “ रूम शिल्लक नाही.” तो म्हणाला.
“ गर्ग नावाच्या माणसाचे इथे बुकिंग आहे? ” पाणिनीने विचारले.
“ आहे.खोली नंबर सहाशे अठरा . काही निरोप आहे? ” त्याने विचारले.
“ त्याला फोन करून सांगा मी इथे आलोय म्हणून.”पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही त्याला अपेक्षित आहात का? ”
“ तसचं नाही म्हणता येणार.”पाणिनी म्हणाला.
“ खूप उशीर झालाय अत्ता पण , एखाद्याला भेटायच्या दृष्टीने.” तो म्हणाला.
“ माझ्या हातावर घड्याळ आहे. ” पाणिनी म्हणाला.
नाईलाजाने त्याने इंटरकॉम वर ६१८ नंबर ला फोन लावला. “ एक गृहस्थ तुम्हाला भेटायला आलेत.त्यांच्या बरोबर एक बाई आहेत.” पलीकडून भेटायला आलेल्या चे नाव काय अशी विचारणा झाली ती पाणिनी ला ऐकू आली.
“ माझं नाव पटवर्धन.” मॅनेजर ने विचारण्या पूर्वीच पाणिनी ने सांगितले.ते ऐकून पुन्हा त्याने ६१८ ला फोन लावला.
“ तुम्हाला बोलावलंय वर.” तो पाणिनी ला म्हणाला.
पटवर्धनची वाट बघत गर्ग दारात उभा होता. हस्तांदोलनासाठी त्याने हात पुढे केला.त्याच्या सडपातळ बोटांचा स्पर्श पटवर्धन च्या हाताना झाला “ या मिस्टर आणि मिसेस पटवर्धन” सौम्याकडे बघून तो म्हणाला.
“ ही सौम्या सोहोनी आहे.माझी सेक्रेटरी.”पाणिनी म्हणाला.
“ माझी खोली खूपच अस्ताव्यस्त झाल्ये, पसारा पडलाय , पण तुम्ही बसा आरामात.मला इथे कोणी येईल अशी अपेक्षा नव्हती त्यामुळे गचाळ पणा झालाय.”गर्ग म्हणाला. पटवर्धनने त्याला अजमावण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज तरल, मुलायम,होता.डोळे एकदम काळेभोर होते.त्यातील भाव ओळखणे कठीण होते.पसारा आवरताना त्याची होणारी हालचाल मात्र सकारात्मक आणि सहज होती.बोलताना संवाद साधायला आवडते असे भाव होते.
“ तुझ्या कडे येणाऱ्या सर्वांचेच तू एवढ्या आत्मीयतेने स्वागत करतोस? आम्ही देणग्या गोळा करायला किंवा पुस्तकं विकायला आलो असू तर ?” गमतीत पाणिनीने विचारले.
“ काय फरक पडतो त्याने मिस्टर पटवर्धन? ज्या अर्थी तुम्ही एवढ्या लांबून आणि या विचित्र वेळेला इथे आलाय मला भेटायला त्या अर्थी तुमचं काम महत्वाच च असल पाहिजे अस मी समजतो.तुम्ही अगदी पुस्तकं विकायला आला असाल तरी तुमच्या दृष्टीने ते महत्वाचेच आहे.मी स्वतः एक विक्रेता आहे.माझे असे मत आहे की प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले जायला पाहिजे. ” गर्ग म्हणाला.
“ चांगला दृष्टीकोन आहे तुमचा. मी कोण आहे ,काय करतो तुम्हाला माहीत आहे का?” पाणिनीने विचारले.
“ मी पटवर्धन, वकील आहे.”
“ पटवर्धन ? पटवर्धन......परिचित वाटतयं नाव . पाणिनी पटवर्धन तर नाही?”
“ वाव ! चांगला योग आला आज. मिसेस पुंड म्हणाली मला तुम्ही फोन केला होतात म्हणून.”
“ तू ओळखतोस तिला चांगलं?” पाणिनीने विचारले.
“ अर्थात ”
“ तिच्या नवऱ्याला सुद्धा? ”पाणिनीने विचारले.
“ अगदी चांगलच ओळखतो.” गर्ग म्हणाला.
“ तर मग मला सांग, तिने शुक्रवारी नेतोर्ली ला जायचा बेत अचानक रद्द का केला?” पाणिनीने अचानक विचारले.
गर्ग चा चेहेरा आणि डोळे निर्विकार राहिले परंतू तो त्याच्या आवाजातला बदल लपवू शकला नाही.तो दुखावला गेला आहे असे पाणिनीपटवर्धन ला जाणवले.
“ ही गोष्ट कुणाला माहीत असेल अस मला वाटलं नाही.”
“ मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? ” पाणिनीने विचारले.
“ तुम्हाला ज्या गोष्टीत रस आहे, त्याच्याशी या उत्तराने काही फरक पडणार नाही.”
“ थोडक्यात मी यात पडू नये अस तुला म्हणायचंय? ’’पाणिनीने विचारले.
“ नाही,नाही.बिलकुल नाही तस काही.मला एवढचं म्हणायचयं की मी तुम्हाला सर्व बारकाव्या निशी तपशील देऊ शकत नाही.अत्ता.”
“ का नाही देऊ शकत? ”पाणिनीने विचारले.
“ खर म्हणजे मी स्वतः च तिला विमान तळावरून परत आणण्यात कारणीभूत होतो.,त्यात काही खाजगी विषय आहेत पद्मनाभ पुंड हयात असता तरी त्याने ही गोष्ट सांगायला परवानगी दिली नसती. ” गर्ग म्हणाला.
“ हे बघ गर्ग मी आणि पोलीस एकाच वेळी त्याच्या खुनाचा शोध घेतोय. मी तुला अत्ता जो प्रश्न विचारला तोच पोलीस तुला विचारणार आहेत.”पाणिनी म्हणाला.
“ विमान तळावर काय घडले हे तुम्हाला कसे काय समजले?”“ मी तुला सांगितलं ना मी त्या खुनाचा शोध घेतोय . आणि माझं मत आहे की तिने नेतोर्ली ला जायचा बेत रद्द केला या गोष्टीचा त्या खुनाशी मोठा संबंध आहे.” पाणिनी म्हणाला.
“ काही नाही ”गर्गम्हणाला
“ ते मी ठरवीन ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही मला अजून संगीतलच नाही की तुम्हाला कळले कसे ?”
“ मी नाही सांगू शकत मला कसे समजले ते , आणि मला सांगायची गरज ही नाही.”
“ सॉरी, पण मला पटत नाही तुमचे म्हणणे.”गर्ग म्हणाला.
“ ठीक आहे मला जर समाधानकारक खुलासा नाही मिळाला तर मी पोलिसांकडे जाऊन सांगीन .मग ते घेतील तुमच्याकडून खुलासा.” पाणिनी म्हणाला.
गर्ग ने पाणिनी ला आपल्या जवळची सिगारेट केस उघडून एक सिगारेट देऊ केली. सावकाशआपले पाय थोडे लांबवले.स्वतः एक सिगारेट घेऊन झुरका मारला.
“ मला वाटतय हे सगळ करण्यात तू मुद्दामच बराच वेळ घालवलास आणि तेवढ्या वेळेत मला काय उत्तर द्यायचं याचा तू विचार करून ठेवला असशील.”पाणिनी म्हणाला.
“ मला वेळ मिळाला पण उत्तर नाही सुचल ” गर्ग ने मोकळे पणाने कबुल केले."
“ आरामात सांग ” निवांत पणे पाय लांब करून खुर्चीत रेलत पाणिनीम्हणाला.
“दिव्व्या ची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे? ”
“ बिलकुल नाही.”
“ भावनिक दृष्टीने ती एकदम खचलेली स्त्री आहे.”
“ म्हणजे काय नक्की?” पाणिनीने विचारले.
“ म्हणजे तिला एकदम झटके येतात.
“ व्यावहारिक भाषेत ती वेडी वगैरे आहे असे सुचवायचे आहे की काय तुला? ”
“ नाही , नाही तशातला भाग नाही.आपल्याच विश्वात रमणारे जिप्सी लोक कसे असतात तशी आहे ती.”गर्ग म्हणाला. “ म्हणजे काही काळा पुरतेच तिला झटके येतात.अर्थात त्यातून ती आपोआपच लगेच ठीक होते.”
“ तुझं आणि तिचं काही लफडं वगैरे आहे? ” पाणिनीने विचारले.
“ मी फक्त तिचा चांगला मित्र आहे , तिचं मन ती माझ्यापाशी मोकळ करू शकते.पद्मनाभशी लग्न करून ती पस्तावलीच होती. ती पद्मनाभ ला एक चिट्ठी लिहून विमानतळावर आली होती, तिच्या प्रियकराला भेटायला जाण्यासाठी , पद्मनाभला सोडून , त्याला घटस्फोट देणार होती ती. तिचा असंच स्वभाव आहे, एखाद्यावर प्रेम करते म्हणजे जीव ओवाळून टाकून देते. आणि कायमच तिला कोणावर तरी असा जीव लावायला आवडतो.”
“ तू फारच तिची बाजू लाऊन धरतोयस ” पाणिनी म्हणाला.
“ तिचा स्वभाव तुम्हाला कळावा हा हेतू आहे माझा. ”
“ बर ठीक , ती विमान तळावर पोचली, पुढे तू काय केलस?”पाणिनीने विचारले.
“ मी थांबवलं तिला.कारण मला माहीत होते की ती तिच्या प्रियकराकडे गेली तर जास्त दु:खी होईल. त्यापेक्षा इथे राहिलेली बरी ”
“ मग तू तिला परत तिच्या घरी घेऊन आलास , पुढे काय झालं? ”
“ ती प्रथम खूप रडली पण नंतर तिला माझं म्हणण पटल.”गर्ग म्हणाला.
“ तिला तिच्या घरी आणल्यावर तिथे किती वेळ होतास?”पाणिनीने विचारले.
“ अर्धा –पाऊण तास असेन.”
“ ती विमान तळावर आहे हे तुला कसे समजले?”
“ ते अगदी योगायोगाने समजले. मी आणि पद्मनाभ पुंड एकत्र काम करतो. म्हणजे करत होतो.” गर्ग म्हणाला.
“ म्हणजे त्या कुक्कुट पालनाच्या धंद्यात?”पाणिनीने विचारले.
“ म्हणजे तसा माझा संबंध प्रत्यक्षच होता. मी त्यातला कुक्कुट पालना......” बोलता बोलता तो मधेच थांबला. “ जाउदे पटवर्धन, मी माझ्या धंद्यातले सगळे नाही सांगू शकत.”
“ म्हणजे कुक्कुट पालनाचे तो बघायचा आणि धरणाच्या जमिनीचे तू .....” पाणिनीने विचारले.
“ अहो, माझ्या तोंडी तुमच्या मनातलेकाल्पनिक विचार घालू नका. ”गर्ग म्हणाला.
“ पद्मनाभने मला त्याच्या घरी पाठवले आणि कागद पत्रांची एक ब्रीफ केस आणायला सांगितले.दिव्व्या घरी नसेल तर पंचाईत होऊ नये म्हणून त्याच्या घराची किल्ली सुद्धा दिली.”
“ कधी घडलं हे ? ”पाणिनीने विचारले.
“ दुपारीच ”
“ तुला का दिली किल्ली? पद्मनाभ स्वत: का गेला नाही घरी ? ”
“ त्याची जेवणाच्या सुट्टीत कोणाबरोबर तरी मिटींग होती.”गर्ग म्हणाला.
“ आणि तू त्याला जेवणा नंतर लगेच भेटणार होतास? ”
“ नाही लगेच नाही, चार वाजता भेटणार होतो दुपारी.”
“ तू दिलेल्या कागद पत्रांचे तो पुढे काय करणार होता?” पाणिनीने विचारले.
“ तो ती कागदपत्रे रेयांश प्रजापतिला देणार होता, त्यासाठी त्याला बोटीवर बोलावले होते , प्रजापतिने.”
“ पण प्रजापति तर कोणालाच बोटीवर येऊ देत नसे ना? त्याला तिथे त्याच्या धंद्या पासून दूर , निवांत राहाला आवडायचं ना? ”पाणिनी म्हणाला..
“ बरोबर आहे तुमचे म्हणणे पण ही कागदपत्रे म्हणजे अपवादाने खूप महत्वाची होती. म्हणूनच प्रजापति ने च पद्मनाभ ला बोटीवर बोलावले होते.”गर्ग म्हणाला.
एवढी खात्री तुला आहे? ”पाणिनी म्हणाला..
“ नक्कीच.”
“ उद्या जर असं सिद्ध झालं की रेयांश प्रजापति शुक्रवारी बोटीवर नव्हताच आणि येण्याचा मानसही नव्हता त्याचा, तर ? ” पाणिनी म्हणाला..
गर्ग हसला “ असं शंभर टक्के घडलेले नाही पटवर्धन.”
त्याच्या देहबोलीतला आत्म विश्वास पटवर्धन ला जाणवला. त्याच्या म्हणण्यात तथ्य दिसत होत.
“ ठीक आहे गर्ग , तू कागद पत्रे आणायला तिथे गेलास, पुढे? ”पाणिनी म्हणाला..
“ ही चिट्ठी टेबलावर उशीला टाचून ठेवली होती.”
“ तू काय केलंस त्याच? वाचलीस आणि तिथेच ठेवलीस चिट्ठी? ”पाणिनी म्हणाला..
“ छे छे मी लगेच ती खिशातच टाकली माझ्या.पद्मनाभने ती बघितली असती तर अनर्थच झाला असता.”गर्ग म्हणाला.
“ ती चिट्ठी पद्मनाभसाठी होती ना? ”
“ अर्थात ”
“ तरी तू ती तुझ्याकडे ठेवलीस? बघू मला ती चिट्ठी , आहे ना अत्ता तुझ्याकडे?”पाणिनी म्हणाला..
“ तुमची ही चौकशी भरकटत चालली आहे आणि माझ्या खाजगी गोष्टी मधे तुमी जाताय. ती चिट्ठी म्हणजे त्यांच्या संसारातील आनंद...... ” गर्ग बोलायला गेला पण पटवर्धन ने त्याला मधेच थांबवत म्हटले,
“ ती चिट्ठी हा एक पुरावा आहे. तुम्हा सगळ्यांनाच तुमच्या नावाची बदनामी टाळायची असेल तर मला जी माहिती हवी आहे ती देणे तुमच्या फायद्याचे आहे.”पाणिनी म्हणाला.
गर्ग ने विचार केला शेवटी पाणिनी चे म्हणणे त्याला पटलेले दिसले.आपल्या ब्रीफ केस मधून त्याने ती चिट्ठी काढली आणि पाणिनी कडे दिली.पाणिनीने ती काळजी पूर्वक बघितली.त्याला टाचणी मुळे पडलेले भोक स्पष्ट दिसत होते.
पाणिनीने चिट्ठी वाचली.
“ प्रिय पद्मनाभ,
तुला वाटेल , मीच चुकीची आहे.गेल्या काही काळात जे काही आपल्यात घडलंय, मी आता माझ्या भावनांवर ताबा नाही ठेऊ शकत , तू चांगलाच वागला आहेस माझ्याशी पण गेले काही महिने त्या धरण क्षेत्रातील जमिनी च्या व्यवहारात तू एवढा बुडून गेलास की आपल्या दोघांचा संसार आहे हे तू विसरलास.मी तुला दोष देत नाही, तू खूप पैसे मिळव , मला काहीही नको आहे तुझे फक्त मी साहसबरोबर प्रेम करते आहे आणि तुला सोडून चालले आहे. ”
“ एकदम बोलकी चिट्ठी आहे.” पाणिनी म्हणाला.
“ अत्यंत मनापासून लिहिलेली आहे तिने ”गर्ग म्हणाला.
“ हा साहस कोण? पूर्ण नाव काय त्याचे?”पाणिनी म्हणाला..
“ मिस्टर पटवर्धन, किती खोलात जाऊन चौकशी करताय या सगळ्याची.? ”
“ हे बघ हा खुनाचा मामला आहे. साहस कोण ते सांग ”पाणिनी म्हणाला.
“ माफ करा पण मी नाही सांगू शकणार.”गर्ग म्हणाला.
पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला, निघायच्या तयारीत. “ धन्यवाद गर्ग ”तो म्हणाला.
“ मी जी माहिती दिली ती गुप्त ठेवालच तुम्ही. ”गर्ग म्हणाला.
“ बिलकुल नाही.” पाणिनी म्हणाला.
“ का ssss य ! ”गर्ग ओरडला. “ मी अशा समजुतीत होतो की तुम्ही कुठे वाच्च्यता करणार नाही. ”
“ तुझी गैर समजूत होती ती.”
“ तुम्ही असं म्हणाला होतात की मी तुम्हाला जर माहिती दिली नाही तर तुम्ही पोलिसांकडे जाल.”गर्ग म्हणाला.
“ एकदम बरोबर आहे , तसच म्हणालो होतो मी.”पाणिनी म्हणाला.
“ मी तर तुम्हाला माहिती दिल्ये. तर मग आता तुम्ही नाही ना जाणार पोलिसांकडे ? ”गर्ग म्हणाला.
“ नक्कीच जाणार पोलिसांकडे.”पाणिनी म्हणाला. “ न जाण्याजोगे एक तरी कारण मला पटवून दे.”
“ मी तुम्हाला जे सांगितलंय त्याचा पद्मनाभ च्या मृत्यूशी काहीही संबंध नाही.”
“ तू म्हणालास की हा साहस नावाचा माणूस नेतोर्ली ला असतो ? ”पाणिनी म्हणाला..
“ त्याने तिला कधी चिठ्या चपाट्या, पत्र वगैरे लिहिली आहेत?” पाणिनी म्हणाला..
गर्ग ने पाणिनीची नजर टाळली.
“ अरे सांग बाबा. पोलीस हे सर्व चव्हाट्यावर आणणारच आहेत. तिच्या शुक्रवारच्या सर्व दिन चर्येचा तपशील ते घेतील आणि ती प्रचंड अडचणीत येईल.”पाणिनी म्हणाला.
“ पोलिसांना ती पत्रे मिळणार नाहीत.”गर्ग म्हणाला.
“ म्हणजे याचा अर्थ ती नष्ट केली आहेत?” पाणिनी म्हणाला..
“ याचा अर्थ ती पोलिसांना मिळणार नाहीत.”गर्ग म्हणाला.
अचानक पाणिनी ने गर्ग ची ब्रीफ केस उचलली. “ थोडक्यात ती पत्र तुझ्याकडे आहेत ! ”
“ ओह, हे काय पटवर्धन? माझी आहे ती ब्रीफ केस. तुम्ही घेऊ शकत नाही त्याचा ताबा.”गर्ग म्हणाला.
“ सौम्या, इन्स्पेक्टर तारकरला फोन लाव.”पाणिनी म्हणाला.
सौम्या फोन करायला उठली तो पर्यंत तो शांत होता.नंतर अचानक म्हणाला,
“ थांबा मिस सोहोनी, ब्रीफ केस च्या उजव्या खणात आहेत ती पत्र.”गर्ग म्हणाला.
पाणिनीने ती पत्रे बाहेर काढली आणि आपल्या कोटाच्या खिशात घातली.
“ काय करणार आहात या पत्राचे? ” गर्ग ने घाबरून विचारले.
“ मी ती नीट बघून, वाचून घेणारे.तुझ्या म्हणण्यानुसार त्याचा खुनाशी संबंध नसेल तर तुला परत देईन. ” पाणिनी म्हणाला.
“ अन्यथा? ”
“ अन्यथा मी ती माझ्या कडे ठेवीन.” पाणिनीदाराकडे जायला निघाला., थोड थांबला, “ ही चिट्ठी वाचल्या वाचल्या तू विमान तळावर निघालास? पद्मनाभ पुंड बरोबर भेट ठरली असून सुद्धा? ”पाणिनी म्हणाला..
“ नाही आधी त्याला हवी असलेली कागदपत्रे दिली. आणि मी लगेचच विमान तळाकडे पळालो.”
“ तो कुठे भेटला तुला? ”पाणिनी म्हणाला..
“ इथेच, या होटेल च्या समोर. तो बोटीवर जाण्यासाठी उतावीळ झाला होता, आधीच अर्धा तास उशीर झालाय असं म्हणाला.मला तो जरा भावनिक तणावा खाली वाटला. कोणीतरी त्याच्याशी खोट बोलून फसवलंय धंद्यात असं त्याचं म्हणण होत. पण तो खूप घाईत असल्याने मी सविस्तर विचारू शकलो नाही.पटवर्धन, या ठिकाणी तुम्हाला प्रजापति बद्दल मिळालेली माहिती चुकीची आहे,कारण त्याची प्रजापति बरोबर ठीक पाच वाजता बोटीवर भेट ठरली होती.
“ तू, तो इथे होटेल समोर येई पर्यंत वाट बघत थांबलास ?”पाणिनी म्हणाला..
“ हो. बरोब्बर पस्तीस मिनिटं ”
“ कशामुळे उशीर झाला त्याला.? ”
“ नाही माहिती. ”
“ त्याला भेटल्यावर तू विमान तळावर गेलास तो पर्यंत दिव्व्या पुंड विमान तळावर बसून होती? तिला विमान मिळालं नव्हत?”पाणिनी म्हणाला..
“ नशिबाने नव्हते.”गर्ग म्हणाला.
“ मग तू तिला घरी आणलस आणि तिला , तुला सापडलेली चिट्ठी दाखवलीस?” पाणिनी म्हणाला..
“ हो अर्थातच दाखवली.”गर्ग म्हणाला.
“ मला या सगळ्याचा जरा विचार करूदे.”पाणिनी म्हणाला.
“ स्पष्ट बोलतो म्हणून माफ करा पटवर्धन, पण मी तिला जेवढं ओळखतो तेवढ तुम्ही नाही ओळखत.”गर्ग म्हणाला.
“ मान्य आहे, म्हणूनच मला तिच्या बद्दल विचार करायला थोडा अवधी लागेल.एखादी व्यक्ती दुसऱ्यांच्या नजरेत कशी आहे यापेक्षा मला स्वत:ला कशी वाटते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे. गुड नाईट.
प्रकरण ८ समाप्त