Objection Over Ruled - 5 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 5

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 5

प्रकरण पाच.
काया प्रजापति पाणिनी पटवर्धन ला घेऊन एका इमारतीच्या पार्किंग जवळ आली.
“ इथेच असणार ”ती म्हणाली.
“ कोण ? वडील ? ”
“ नाही , माझ्या वडलांचा उजवा हात,जतीन भारद्वाज ”
“ त्याला खुना बद्दल माहिती आहे? ” पाणिनी ने विचारले
“ हो.”
“ तू अत्ता कुठे चालल्येस हे पण माहिती आहे? ”
“ कार मधे टाकी भरून पेट्रोल भरायचं आणि वडील किंवा मी सांगू तिकडे जायचं या व्यतिरिक्त त्याला काही माहिती नसते.” कायाने उत्तर दिले. तेवढ्यात एक गाडी रोरावत आली आणि त्यांच्या जवळ येऊ लागली.आतील माणसाने गाडी पार्कींग चालवणाऱ्या माणसाच्या ताब्यात दिली आणि कुपन घेतले.
“आलाच जतीन ” ती म्हणाली. “ त्याच्या कडे फारसे लक्ष देऊ नका. आपण एखादी टॅक्सी बघत आहोत असं अविर्भाव करा.”
“ का एवढा गूढ पणा? ”पाणिनी ने विचारले
“ मी नाही सांगू शकत आत्ताच. मी सांगेन तसे करा.”
जतीन गाडीतून उतरला.पटवर्धन आणि काया उभे होते त्यांच्या जवळून पुढे गेला. जाताना पार्किंग चे कुपन पटकन काया कडे दिले. पण त्याने कोणतीही ओळख दिली नाही.
“ कोणी याचा पाठलाग करतय का बघू या.” काया म्हणाली. “ तो बघा गाडी लाऊन उतरलेला माणूस जतीन च्या दिशेनेच येतोय.”
“ एवढी गर्दी आहे इथे, प्रत्येकाच्या मागून इतर माणसे येतंच असतात. ते सगळे काय त्यांच्या पुढे असणाऱ्या माणसांचा पाठलाग करत असतात की काय?” पाणिनी ने विचारले.
काया पाणिनीच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या भानगडीत नाही पडली.जतीन कोपऱ्या पर्यंत जाई पर्यंत तिने वाट पहिली, नंतर पार्किग चालवणाऱ्या दुसऱ्या माणसाच्या हातात तिने पार्किन चे कुपन देऊन तिची गाडी बाहेर काढायला सांगितली.गाडी बाहेर आल्यावर ती ड्रायव्हर च्या सीट वर बसली .पाणिनीतिच्या बाजूला बसला. तिचे गाडी चालवण्याचे कसब कौतुकाने बघत होता.
“ जरा खात्री करून घेते, मी, पाठलाग होत नाहीना याची.” ती म्हणाली आणि अचानक तिने गाडी डावीकडे वळवली. “ करतयका कोणी पाठलाग ? ” तिने पाणिनी ला विचारले.
“ करत असतं तर एव्हाना आपल्याला धडकला असता तो.” पाणिनी म्हणाला.
त्यानंतर अनेकदा तिने विचित्र पद्धतीने गाडी चालवून पाठलाग होत नाही याची खात्री केली.
म्हापसा आणि सालीगाव या दोन गावांच्या मधे एका ठिकाणी तिने गाडीचा वेग कमी केला आणि एका मोटेल मधे गाडी आणली.ते एक बंगले वजा मोटेल होते.निळ्या समुद्राच्या आणि हिरव्या नारळाच्या पार्श्वभूमीवर बंगल्यांच्या छ्तांचा गडद लाल रंग उठून दिसत होता.
“ इथे उतरणार आहोत आपण ? ” पाणिनीने तिला विचारलं
“ हो. ” ती गाडीतून उतरली.पटवर्धन आणि ती मोटेल च्या रिसेप्शन मधे आले.
“ तुमच्या इथे मिस्टर प्रबोध या नावाने बुकिंग आहे ना? ” तिने विचारलं.
स्वागतिकेने आपले रजिस्टर चाळले. “ चौदा नंबर मधे आहेत ते. पाच जण आहेत.”
स्वागतिकेचे आभार मानून ते दोघ चौदा नंबरच्या दिशेने निघाले.दारावर तिने टकटक केले.आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने दाराची मूठ फिरवली.दार उघडेच होते.आत कोणाचीच चाहूल नव्हती.
“ आपण आत जाऊया.” ती म्हणाली.
“ कोणी आत आहे ? ” पाणिनीने मोठ्या आवाजात विचारले.
आत कोणीच नव्हते.पाणिनीआणि काया आत गेले.एका लहान टेबला भोवती तीन खुर्च्या अर्ध वर्तुळात ठेवल्या होत्या.चार पाच अॅश ट्रे टेबलावर होते ते सगळे सिगारेट च्या थोटका ने भरले होते.मद्याचे चार पाच रिकामे ग्लास ही टेबलावरहोते.सर्व खोलीभर सिगारेट च्या धुराचा आणि मद्याचा वास दरवळत होता.
“ मला काळजी वाटायला लागल्ये.ते निघून गेले असावेत.” कायाम्हणाली. “ आत जाऊन पहिले पाहिजे काही बॅगा किंवा सामान,वस्तू आहेत का .”
त्यांनी आत जाऊन पहिले पण काहीच नव्हते.काया ने बाथ रूम तपासले तिथे बेसिन वर दाढीचे समान होते,एक रेझर आणि दाढीचा साबण लागलेला ब्रश होता. “ माझ्या बाबांचा आहे हा ! ” काया एकदम उद्गारली.
“ अजून रेझर आणि ब्रश ओला आहे.त्या अर्थी जवळच कुठेतरी जाऊन येणार असतील.” पाणिनीम्हणाला.
“ तसं नाही होणार.त्यांची बॅग दिसत नाहीये त्या अर्थी ते गेलेत निघून.ते प्रचंड विसराळू आहेत.” ती म्हणाली.
“ तुला का वाटतंय की ते परत नाही येणार म्हणून? ”
“ ज्या कारणासाठी ही जागा बुक केली होती ,तो हेतू सध्या झाला असावा म्हणून ते निघून गेले सर्व.ती सर्व मोठी राजकारणी मंडळी होती आणि ते ज्यासाठी जमले होते ते मला माहीत आहे पण त्याची पुसटशी कल्पना जरी कोणाला आली ना तरी इथे जमलेल्या मंडळींचे राजकीय भवितव्य संपुष्टात येईल त्यामुळे मी तुम्हाला पण नाही सांगू शकणार.” काया म्हणाली.
“ तुझा निर्णय आहे तो, आणि तुझीच माणसे आहेत त्यात. पुढे काय करायचं आहे मी? ” पाणिनीने विचारले.
“ आता काही करण्यासारखं नाहीच राहिले.”ती म्हणाली. रेझर आणि ब्रश तिने हातात घेतला आणि धुवायला लागणार तेवढ्यात तिच्या मनात काय आले पण अचानक तिने विचारले, “ बाबांनी तो स्वच्छ पण नाही केला. मी आहे तसाच ठेवणे आवश्यक आहे की धुवून घेऊ? ”
“ ते बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे.” पाणिनीगूढ पणे म्हणाला.
“ म्हणजे कशावर अवलंबून आहे नेमके ?”
“ वडील इथे होते हे तुला सिद्ध करायचे आहे का? त्यावर ते अवलंबून आहे.” पाणिनी म्हणाला.
“ डॅड कधीच मान्य करणार नाहीत की ते इथे होते.”
“ कारण काय ”पाणिनी ने विचारले.
“ तुम्हाला मगाशीच सांगितलंय.”
“ पण त्यात तुझ्या वडलांच्या कारकीर्दीला काहीच धोका नाहीये ना? ” पाणिनी ने विचारले.
“ कशा मधे धोका नाहीये ? ”
“ ते इथे असल्याचे कोणाला कळले तर ” पाणिनी म्हणाला.
“ वडलाना नाही पण मी इतरांचा विचार करत्ये.”
“ वडिलांनी त्यांची नावे जाहीर केली नाहीत तर काय अडचण आहे? ”पाणिनी ने विचारले.
“ त्याने काय होईल? ”
“ इतरांची नावे जाहीर करायची नसतील आणि त्याच वेळी स्वतःला वाचवण्यासाठी ते इथे होते हे सिद्ध करायची वेळ आली तर तो न धुतलेला रेझर पुरावा ठरू शकतो . त्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी केली तर त्यांच्या केसा वरून ते सिद्ध होईल की हा रेझर त्यांनीच वापरला होता.”पाणिनी म्हणाला
ती पाणिनी च्या या खुलाशाने प्रचंड खुष झाली. “ अहो काय सुंदर सल्ला दिलं तुम्ही.! ” ती उद्गारली.
“ तुम्ही स्वागतिकेला जाऊन सांग की ही खोली आणखी आठवडाभर बुक कर म्हणून.तिचे भाडे सुद्धा आधीच देऊन टाक. तिला सूचना दे की त्या खोलीत कोणालाही जाऊन देऊ नको, अगदी खोली साफ करणाऱ्याला सुद्धा.”पाणिनी म्हणाला
“ छान कल्पना आहे.चला लगेच जाऊन सांगूया ”
“ हे चौदा नंबर चे दार कुलूप लाऊन बंद करूनच जाऊ ”पाणिनी म्हणाला
त्यांना कुठेच किल्ली सापडली नाही.शेजारच्या तेरा नंबर च्या दाराला पण कुलूप होते पण त्याची किल्ली तिथेच होती पण या चौदा नंबर ची मात्र नव्हती.
“ ठीक आहे .आहे ते आहे.”पाणिनी म्हणाला “ तुझे डॅड कुठे असतील ? ”
“ ते बोटीवर गेले असणार. पोलिसांनी गाठण्यापूर्वी आपण त्यांना भेटायला हवं. तुम्ही त्या स्वागतिके बरोबर बोला.आणि काय सूचना द्यायच्या आहेत त्या द्या.” ती पाणिनी ला म्हणाली. “ आणि हे खर्चासाठी पैसे ठेवा तुमच्याकडे.”तिने पाच हजारच्या नोटांची थप्पी पाणिनी ला दिली. “ खूप झाले हे.” पाणिनी म्हणाला
“ राहू दे तुमच्या कडे. आपण त्याचा नंतर हिशोब करू.”
तो रिसेप्शन पाशी गेला.
“ भेटले ना तुम्हाला हवे ते लोक ? ” तिथल्या मुलीने हसून विचारले.
“ परिस्थिती जरा विचित्र झाली आहे.’’ पाणिनी म्हणाला
तिच्या चेहेऱ्या वरील हसरे भाव पाणिनी च्या उत्तरामुळे लुप्त झाले. तिने पाणिनी आणि काया कडे आलटून पालटून पहिले. “ म्हणजे नेमकं काय झालंय ? ”
“ या मुलीच्या वडिलांना भेटायला आलो होतो आम्ही.” कायाकडे बघत पाणिनी म्हणाला “ पण आम्हाला उशीर झाला आणि बहुतेक ते आम्हाला भेटायला म्हणून मेन रोड ला गेले असावेत.”
त्या मुलीच्या चेहेऱ्यावर काहीही भाव उमटले नाहीत.पाणिनी पुढे बोलेल असे सुद्धा तिने गृहीत धरले नाही.मख्ख पणे ती बसून राहिली.
“ आम्हाला आता एवढचं हवं की ती रूम दुसऱ्या कोणाला देऊ नका.” पाणिनी म्हणाला
“ उद्या दुपारी बारा वाजे पर्यंतचे बुकिंग आहेच तुमचे.तेवढे पैसे आधीच जमा आहेत.
“ तुमच्या रजिस्टर वर रूम मधे कोणकोण होते त्या सर्वांची नावे असतात? ”पाणिनी ने विचारले.
“ का बर? ”
“ आम्हाला खात्री करून घ्यायची आहे की आम्हाला हवी असलेली खोली हीच होती ना.”पाणिनी म्हणाला
“ त्यातले एक नाव प्रबोध होते का? ” तिने विचारले.
त्या ग्रुप मधल्या एकाचं ते नाव आहे पण ते माझ्या वडलांचे नाही.” तिने उत्तरं दिले. “ सगळ्यांची नावे दिली गेली होती का या बद्दल मला शंकाच आहे.”
“ तुमच्या वडलांचे नाव काय आहे? ”
“ रेयांश प्रजापति” काया म्हणाली.
स्वागतिकेने रजिस्टर चाळले “ नाही तुमच्या वडिलांच्या नावाने बुकिंग नाही. मिस्टर प्रबोध आणि अन्य असे बुकिंग आहे. ”
“ उद्या पर्यंत त्या खोलीत तुमच्या पैकी कोणी जाण्याची गरज नाही.खोली व्यवस्थित तयार करून ठेवली आहे. आम्हाला पुढचे पाच दिवस तीच खोली हवी आहे.” पाणिनी म्हणाला
“रोज दोन हजार भाडे आहे. ” स्वागतिकेने सांगितले.
पाणिनीने तिच्या हातात दहा हजार च्या नोटा दिल्या.
“ तुम्हाला पावती लागणार असेल ना? ” तिने विचारले.
“ अर्थात ”
पावती घेऊन पाणिनी आणि काया बाहेर पडले.
( प्रकरण पाच समाप्त.)