Punha Navyane - 1 in Marathi Women Focused by Shalaka Bhojane books and stories PDF | पुन्हा नव्याने - 1

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

पुन्हा नव्याने - 1

मीराला एकटीला घरात खूप कंटाळा आला होता. म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. पण रागिणी काही फोन उचलत नव्हती. ( मीरा आपल्या कथेची नायिका वय वर्षे ३६, गोरी पान, दिसायला सुंदर पण थोडीशी स्थूल) . मीराचा नवरा( राजीव वय वर्षे ४० , पण तिशीत ला वाटणारा हॅण्डसम, हिरो टाईप पर्सनॅलिटी असणारा, गोरा पान क्नीनशेव ) चार दिवसांसाठी ऑफिस च्या कामा निमित्त कालच बाहेर गावी गेला होता. अधनं मधनं तो जात असतो असा ऑफिस च्या कामानिमित्ताने बाहेर.

( रागिणी पण मीरा च्या च वयाची होती पण सडपातळ, आणि खूप मॉड होती. करीअरच्या नादात लग्नाच राहून गेले होते. मागच्या च वर्षी तीने अमेय बरोबर लग्न केले होते. )रागिणी आणि मीरा शाळे पासून च्या मैत्रीणी होत्या.

मीरा ची मुलं पण स्कूल मधल्या कॅम्प साठी बाहेर गेली होती. ती परवा येणार होती. मीराला दोन मुलं होती. राहूल आणि रिया. राहूल ८वीला होता. रिया ५ वीला होती. सगळे बाहेर गेले होते म्हणून मीरा निवांत होती. रागिणी ची सोबत होईल म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. अर्ध्या तासाने रागिणी चा मीराला फोन आला.
रागिणी, " हॅलो मीरा फोन केला होतास. काय झाल गं नाही म्हणजे या वेळेला कधी तुझा फोन नसतो ना म्हणून म्हटलं बाकी काही नाही.

मीरा," अगं राजीव चं काम आहे म्हणून तो चार दिवसांसाठी बाहेर गावी गेला आहे. मुलांच्या शाळेचा कॅम्प आहे. मुलं तिथे गेली आहेत. त्यामुळे म्हटलं तुझी सोबत झाली असती. म्हणून तुला कॉल केला. "

रागिणी, " ठिक आहे, मी अर्ध्या तासात पोहचते. माझी एक मिटींग आहे कल्याणला फार फार अर्ध्या तासात संपेल. मग आपण मस्त फिरु, मज्जा करु. तसपण अमेय पण नाही आहे आज सो मग मी तुझ्याबरोबर येईन तुझ्या घरी. मग आपण खूप साऱ्या गप्पा मारू. ओके. मग अर्ध्या तासात तयार राहा मी तुला घ्यायला येते.

मीरा, " अगं मी काय करू तिथे येऊन. ? "

रागिणी, " अरे यार गाडी त आपलं बोलणं पण होईल आणि माझं काम झालं की बाहेर च जेऊ. "

मीरा, " ठिक आहे ये तू मी अर्ध्या तासात मी रेडी राहते. "

रागिणी दादरला राहत होती. मीरा विद्याविहार ला राहत होती. दादर वरून ती कार ने कल्याणला जाणार होती. वाटेत मीराला पिक करून दोघी एकत्र जाणार होत्या. रागिणी इंटिरियर डेकोरेटर होती. मीरा ने पण मेक अप आर्टिस्टचा कोर्स केला होता. पण मुलां मुळे मिराला घरी राहाव लागलं. तसेच राजीव चा बिझनेस पण चांगला चालू होता. म्हणून मग तिने करिअर न करता गृहिणी होण्याचे ठरवले. अर्ध्या तासात रागिणी गाडी घेऊन खाली आली. मीरा पण तिच्या बरोबर कल्याण ला निघाली. दोघी खूप दिवसांनी भेटल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या खूप गप्पा चालू होत्या.
रागिणी, " मग बाकी कसं चाललं आहे तुझं? "
मीरा, " चाललंय ग मस्त. "
अशाच हलक्या फुलक्या गप्पा चालल्या होत्या दोघींच्या. रागिणी ड्राईव्ह करता करता मीराशी गप्पा मारत होती.
कल्याण कधी आले ते दोघींना पण कळले नाही.
रागिणी मीराला म्हणाली, " मीरा मी अर्ध्या तासात येते. तोपर्यंत तू गाडी त बसतेस का? की येतेस का माझ्या बरोबर?
मीरा, " अगं नको रागिणी मी गाडीतच बसते. "
रागिणी, " ओके मी येते लगेच. "
रागिणी तिच्या क्लाईंटला भेटायला निघून गेली. मीरा थोडावेळ आपला मोबाईल चाळते मग कंटाळून बाहेर नजर टाकते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिला राजीव सारखा एक माणूस दिसतो. पण तो पाठमोरा उभा होता त्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्याच्या बरोबर एक 2७/2८ वर्षाची तरुणी होती.पण तो राजीव च होता का हे कन्फर्म नव्हते. बोलत बोलत ते एका गाडी जवळ आले . मीराने गाडी बघितली ती राजीव चीच गाडी होती. इतक्यात तो वळला आणि मीराला त्याचा चेहरा दिसला. ती शॉकच झाली . तिला काही सुचेना. तिने राजीव ला फोन लावला. त्याने मीराचे नाव बघितले आणि फोन कट केला. मीरा ने परत त्याला फोन केला. त्याने परत तिचा फोन कट केला. मीराने पुन्हा त्याला फोन लावला. यावेळेस राजीव ने फोन उचलला आणि तिच्यावर वैतागला, " फोन अट केला तर तुला कळत नाही का? कामात बिझी आहे म्हणून फोन उचलत नाही. " तिचे काही ही न ऐकता त्याने फोन कट केला. इतक्यात रागिणी पण आली. मीरा च्या चेहऱ्या कडे बघून तिच्या लक्षात आलं की, मीराचं काहीतरी बिनसले आहे.
रागिणी," मीरा काय झाले आहे? "
मीराने फक्त समोर बोट दाखवले. ती गाडीतून उतरली आणि त्या दिशेने चालू लागली. त्याच्या जवळ जात मीराने त्याला विचारले, " हया कामात बिझी आहेस का तू? " ती त्या दोघां समोर जाऊन उभी राहिली.

पुढे काय होतं ते बघुया पुढच्या भागात.

हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा.