Sankhya Re - 4 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | सख्या रे - भाग 4

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

सख्या रे - भाग 4

भाग – ४

मिताली हि आता थोडी तापली होती आणि ती तिचा आईची बाजू बोलू लागली होती. तेव्हा तिची आई बोलली, “ म्हणून म्हणत होते मी तुला आपल्या पेक्षा खालचा थराचा लोकांशी संबंध वाढवू नकोस. मेली या थर्ड क्लास लोकांचा मध्ये माझी मुलगी फसली.” सुमितचा आई बाबांना थर्ड क्लास म्हटल्यामुळे सुमित हि आता भयंकर तापला होता आणि तो म्हणाला, “ हो माहित आहे तुम्ही कोणत्या क्लासचा आहात म्हणून सांगू नका आम्हाला.” सुमितचे असे बोलने आणि मग मितालीची आई बोलली, “ चल मिताली आपल्या घरी अशा थर्ड क्लास लोकांचा मध्ये आता एक क्षण हि रहायचे नाही.” मिताली हि रागाचा भारात तिचा आई बरोबर निघून गेली. सुमित आता मात्र एकटाच राहून गेला होता त्या फ्लॅट मध्ये. दिवस ढळू लागला होता आणि सुमितचा राग आणि संताप आता शांत होऊ लागला होता. सुमितला तहान लागली होती तर त्याने आवाज दिला, “ मिताली जरा पानी देतेस काय?” मग थोड्या वेळाने त्याला कळून चुकले कि मिताली तर तिचा माहेरी निघून गेली आहे. आता सुमितला वाईट वाटू लागले होते आणि त्याहून हि जास्त या गोष्टीचे कि मिताली अशी कशी घर सोडून निघून गेली. मग त्याने मितालीला फोन लावला परंतु मिताली काही प्रतिउत्तर देतच नव्हती. ती त्याचा फोन उचलत नव्हती आणि शेवटी मितालीचा फोन बंद झाला.
ट्रिंग ट्रिंगचा आवाजाने सुमित त्याचा आठवणींचा दुनियेतून बाहेर आला. त्याला पुन्हा मितालीला बघण्याची इच्छा झाली आणि तो सीटवरून उठला आणि मितालीचा केबिनचा दिशेने बघू लागला. मितालीने त्याचाकडे एक नजर बघितले आणि ती तिचा कामात व्यस्त झाल्यागत दाखवू लागली. सुमित पुन्हा निराश होऊन वळू लागला होता, तेव्हाच त्याने बघितले कि मिताली हि एक कटाक्ष नजरेने चोरून त्याला बघत आहे. सुमित तसाच बघत खाली आपल्या सीटवर बसला आणि विचार करू लागला, मी याला काय समजावे. आज सुमितचे मन काही थाऱ्यावर राहत नव्हते, राहून राहून त्याला आज मितालीची आठवण आणि तिचा बरोबर बोलण्याची इच्छा होत होती. काही वेळेने त्याचा मानाने निर्धार केला आज काहीही होऊ देत आज मितालीशी मला बोलायचे आहे. असे म्हणून तो थेट मितालीचा कॅबीन जवळ गेला आणि त्याने मितालीला हाक मारली, “ मिताली मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.” मिताली बोलली, “ मला काहीही बोलायचे नाही.” मग सुमित बोलला, “ तुला नाही बोलायचे आहे तर ठीक आहे, परंतु मला बोलायचे आहे. माझ्या मनातील दाटलेलं वादळ मला आज रिक्त करायचे आहे. जर तुने मला खाकसचा दाण्या इतकं हि प्रेम केलं असेल तर आज सायंकाळी मला नजीकचा बागेत भेट मी तुझी वाट बघणार आहे.” एवढे बोलून सुमित त्याचा कॅबीनकडे निघून गेला.
मिताली हि आता काहीशी अधीर झाली आहे आणि ती सुद्धा त्या गोष्टीबद्दल विचार करत आहे. मितालीला मागील दिवस स्मरू लागले होते. ती रागाचा भारात घर सोडून तिचा आईचा घरी निघून गेली. तेथे जाऊन एक दोन आठवडे तशीच रागाचा भारात वावरत राहिली. त्यानंतर तिचा राग शांत झाला आणि तिला हि वाईट वाटू लागले होते. अशी कशी मी माझे घर आणि सुमितला सोडून निघून आले. तिला हे सुद्धा कळून चुकले कि सुमितने आणि त्याचा आई बाबांनी आमचा प्रेमासाठी किती मोठा त्याग केला होता. तिला त्यावेळेस कळून चुकले कि रागाचा भारात मनुष्य असे काही पाऊल उचलतो. त्याचे त्याला वेळ हातून गेल्यानंतर कळते, त्याला त्याची जाणीव होते. तिने तिचा फोन चेक केला होता तर सुमितचे तिला शंभर मिस कॉल दिसले. आता ती काही करू शकत नव्हती. ती फक्त आणि फक्त सुमितचा पुन्हा एका कॉलची प्रतीक्षा करत आली. तिला हि जाणीव सुद्धा होती कि तिच्या अशा वागण्यामुळे सुमितचे मन फारच दुखी झाले असेल आणि आहे. पण तरीही तिचा एक प्रेमळ असा अट्टहास हा होता कि, सुमितने मला फक्त एकदा कॉल करावा आणि आज सहा महिने उलटले आणि ती प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे. मात्र आज सुमितचा साहस मुळे मितालीला हि फारच बळ मिळाले होते.
मितालीला राहून राहून ते सहा महिने आठवत होते. सुमित सोबत लग्नानंतरचा तो स्वर्णिम काळ आणि घर सोडून आईचा घरी आल्यानंतरचा तो असहय्य आणि वेदनेने भरलेला काळ. आईचा त्या खोट्या अभिमानाने ओतप्रत होऊन मी आईचा घरी आले. आईचे वर्तन तर आधीपासूनच अभिमानी होतेच परंतु बाबांचे प्रमोशन झाल्यापासून आईला तर बाबांपेक्षा हि जास्त अभिमान आलेला होता. ती त्या अभिमानाचा भारात कुणाचा हि अपमान करत रहायची. त्याच बरोबर त्या खोट्या शान शौकत वाल्या लोकांचा सोबत राहून ती तशीच होऊन गेली होती. आईचा तो किळसवाना अभिमान आणि माझी प्रतीक्षा या मुळे तर माझे जगने मला कठीण झाली होती. माझी उत्कंठा आता अनवरतेचा चरमसीमें वर पोहोचली होती. आता माझी प्रतीक्षा संपणार आहे म्हणून मी आज सुमितला भेटण्यास जाणार आहे.
शेष पुढील भागात...........