Nilya Aakashanch Swapn - 6 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ६

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ६

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ६


मागील भागात आपण बघीतलं की माधवीला राहूलच्या भावाकडे जायची इच्छा असते.त्याप्रमाणे आज पंकज तिला घेऊन जाणार आहे.



आज संध्याकाळी पंकज माधवीला राहूलच्या भावाकडे घेऊन जाणार असल्याने माधवी खूप उत्साहात होती. संध्याकाळ कधी होते याची ती वाट बघत होती.


' सकाळपासून घड्याळाचा काटा लवकर पुढे सरकतच नाही.एरवी वेळ कसा पुढे सरकतो कळत नाही. गॅसवर दूध तापत ठेऊन बाजुच्या खोलीत काही करायला गेले की तेवढ्या पाच मिनिटांत दूध गॅसवर हमखास ऊतू जाणार. थोड्यावेळापूर्वी स्वच्छ केलेली गॅसची शेगडी पुन्हा दुधाने माखल्यावर धुवावीत लागते.तेव्हा कसा हा वेळ भरभर सरकतो! आज जागीच थांबला आहे असं वाटतं आहे.'


घड्याळाकडे बघत माधवी स्वतःशीच पुटपुटली.


त्या लहान बाळाला बघायला मिळेल याचा आनंद माधवीच्या मनात काठोकाठ भरलेला होता. आपल्याला बाळ नाही तर ती तिच्या बाळाला मला हात लावू देईल नं! या विचाराने माधवी दचकली. एकदम कावरीबावरी झाली आणि तिच्या डोळ्यातून खळकन अश्रूचा एक थेंब वाहिला.


पंकज येईपर्यंत माधवीच्या जीवाची खूप ऊलघाल चालू होती.


पंकजच्या बाबांनी जेव्हा देवकी आणि यशोदेचं उदाहरण देऊन दत्तक या शब्दाला एक पवित्र अर्थ दिला. त्यामुळे आजुबाजुला दत्तक या शब्दाला दिल्या गेलेल्या चुकीच्या अर्थांचे कोपरे गळून पडले. त्यानंतर माधवीच्या मनात बाळाबद्दलची ओढ आणखी तिव्र झाली.


माधवी तिच्या विचारात इतकी गुंतून गेली की पंकज घरी आला तेही माधवीच्या लक्षात आलं नाही. पंंकज आजही स्वतः जवळच्या किल्लीने दार उघडून घरात शिरला. आजही घरात सगळीकडे अंधार होता. पंकजने दिवे लावले तेव्हा सोफ्यावर माधवी आपल्याच तंद्रीत असलेली दिसली.


पंकजने माधवीला हलवले तेव्हा ती तंद्रीतून बाहेर आली. समोर पंकजला बघून माधवी झटकन सोफ्यावरून उठली आणि विचारलं,


" पंकज निघायचं आपण? मी बघ कधीची तयार होऊन बसले आहे."


माधवीच्या चेहे-याकडे बघून पंकजला तिचा बाळाला बघण्याचा उत्साह लक्षात आला. तो हसतच म्हणाला,


"हो. जायचय. मी पटकन फ्रेश होऊन येतो मग जाऊ. चालेल नं?"


" हो चालेल.पण पटकन तयार हो. मला खूप घाई झाली आहे बाळाला बघायची. त्याला जवळ घ्यायची. पंकज ती देईल नं माझ्या जवळ तिच्या बाळाला?"


माधवीचा चेहरा या भितीने भेदरलेला दिसला.


" अगं आत्ता पासून कसले नको ते विचार मनात आणते. तिला पण तुझ्या सारखीच बाळाची ओढ होती नं? तिला तुझ्या भावना कळतील ती का असं वागेल? नको वेडेवाकडे विचार करू. मी पटकन तयार होऊन येतो मग आपण जाऊ"


पंकजने हळूच लाडाने, प्रेमाने,ममत्वाने माधवीच्या गालावर थोपटलं आणि तो फ्रेश व्हायला गेला.


***

पंकज आणि माधवी राहूलच्या भावाकडे पोचले. बिल्डींगच्या खाली राहूल त्याचा मुलगा हर्षद आणि त्याची बायको रोहिणी भेटले.

पाचही जणं राहूलच्या भावाकडे गेले.


फ्लॅटच्या दाराशी पोचताच आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून माधवीच्या अंगावर रोमांच उठले.चेहरा आनंदाने फुलला.

राहूलच्या भावाने राजेश ने दार उघडलं.


" कायरे बाळ का रडते?"

दारातच राहूलने भावाला विचारलं.


" अरे त्याची भुकेची वेळ झाली म्हणून रडतोय."

राजेशने बाळाच्या रडण्याचा कारण सांगितलं.


सगळेजण घरात शिरले.


राजेश त्याची बायको रेवती यांच्याशी राहूलने पंकज आणि माधवीची ओळख करून दिली.


माधवी अनिमिष नेत्राने दुध पिणा-या बाळाकडे बघत होती. हे लक्षात येताच पंकजने माधवीला आपल्या हाताच्या कोप-याने ढोसलं तशी माधवीची तंद्री भंगली. तिने पंकजकडे बघीतलं तशी पंकज हळू आवाजात तिला म्हणाला,


" माधवी दूध पिणा-या बाळाकडे अस़ टक लावून बघायचं नसतं दृष्ट लागते."


पंकजचं बोलणं ऐकताच माधवीने स्वतःला सावरलं.


" माधवी ये बस नं" रोहिणी माधवीला म्हणाली.


" हो"

म्हणत माधवी रोहिणी शेजारी येऊन बसली.

सगळ्यांच्या बाळाबद्दलच गप्पा चालू होत्या.


ब-याच वेळाने बाळाचं दूध पिणं संपलं आणि ते सगळ्यांकडे टकमक बघू लागलं.


माधवीला बाळाला मांडीवर घेण्याची घाई झाली होती. तिचं बाकीच्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी न राहवून ती रोहिणीला म्हणाली,


" मला बाळाला मांडीवर घ्यायचय."


" होका. घे नं अगं रेवती माधवीला तुझ्या बाळाला मांडीवर घ्यायची इच्छा आहे."


" होका! अगं मग घे." रेवती म्हणाली.


" मी घेऊ शकते नं?"

माधवीने घाबरतच प्रश्न केला.


" म्हणजे काय ! घे" रेवती म्हणाली.


" मला बाळ होत नाही म्हणून मला कुणी बारशाला बोलवत नाही. कुणी आपलं बाळ माझ्या मांडीवर पण देत नाही."


माधवीने तिच्या मनातली सल बोलून दाखवला.


रेवती बाळाला घेऊन पटकन उठली आणि माधवी जवळ आली. आपल्या बाळाला तिच्या जवळ देत म्हणाली,


" घे. तुला हवे तेवढा वेळ बाळाला मांडीवर घे. त्याच्याशी खेळ माझी काही हरकत नाही. मी तुझी भावना समजू शकते. मीपण याच अनुभवातून गेले आहे."


रेवती ने हसत बाळाला माधवीच्या मांडीवर दिलं.


माधवी आश्चर्याने बाळाकडे बघू लागली.बाळ मस्त टुकूर टुकूर नजरेने माधवीकडे बघत होतं. त्याची वळवळ सुरू होती. कधी माधवी बाळाशी बोबड्या बोलीत बोलू लागली हे तिलाही कळलं नाही माधवी बाळाशी बडबडण्यात एवढी रमली की तिचं बाकीचे काय बोलताहेत याकडे लक्ष नव्हतं.


सगळे तिच्याकडे बघत होते.


" पंकज तुम्ही फायनल करा बाळ दत्तक घेण्याचा निर्णय." राहूल म्हणाला.


" हो.तू म्हणतोय ते बरोबर आहे."


" अहो भावजी माधवी किती रमली आहे बाळामध्ये आपण सगळे इथे आहोत याचं भानही नाही तिला."

रोहिणी म्हणाली.


" हो. माधवीला लहान बाळं फार आवडतात. आम्ही बाळ दत्तक घेउच."


पंकज आपले डोळे पुसत म्हणाला.


राहूलने हळूच त्याची पाठ थोपटली.


सगळे इतर गप्पांमध्ये रमले आणि माधवीचं त्या बाळाबरोबर एक वेगळंच जग तयार झालं. त्या जगात माधवी आणि ते बाळ हे दोघच होते. माधवी बाळाला काऊचिऊच्या गोष्टी सांगू लागली. बाळ मध्येच गोष्ट समजल्या सारखं हसायचं बाळ हसलं की माधवीच्या मनात आनंदाला उधाण यायचं.


माधवी कडे बघताना पंकजचे निर्णय पक्का झाला

तो राजेशला म्हणाला,


" राजेश मला ही दत्तक प्रक्रियेबद्दल माहिती दे."

" हो.सांगतो.".

________________________________

राजेश पंकजला काय माहिती देतो हे आपण पुढील भागात पाहू.