Nirdhar - 3 in Marathi Women Focused by prajakta panari books and stories PDF | निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 3

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 3

अग ये रख्मा य जरा इकड ये. अग हे बघ, इत यक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडले, लवकर काय तर आण. हिच्यावर काय बी नाय आपण बिगी बिगी घरला नेवूया.मग हिला तयार कर, हि अजून जिती हाय, हिला लागलीच अस्पतळात न्याया पायजे. व्हय व काय यक यक उलट्या काळजाची लोक असत्यात, एकली बाय दिसली म्हंजी हैदोस घालत्यात, नरकात सडावीत असली मुडदी.
ये आ ग बास कर आदी इतन निवूया हिला लय वायट हालात हाय हिची. यळ केला तर काय बी व्हइल.
ती दोघ तिला घेऊन दवाखान्यात नेत्यात.
आव डाक्टर हे बघा या पोरीची कशी गत झाले, हिला लवकर बघा.
हा बर झाल तुम्ही लवकर आणलत. पण तरीही हिची अवस्था गंभीर आहे. कधी काय होईल सांगता येत नाही.
नर्स लवकर हिला आय. सी. यु मध्ये शिफ्ट करा. ...........
आव डाक्टर कधी बरी व्हइल व पोर, दिसाया किती ग्वाड हाय. आन काय परसंग वडवला हिच्यावर. हो आम्ही प्रयत्न करू....
रख्मा डोळ्यात तेल घालून ती बर व्हायची वाट बघत होती. तिला तिच्यामध्ये तिचीच पोरगी दिसायची.

आव आपली सावली पण अशीच व्हती नव, तिला आजार नसता झाला तर हिच्या यवडीच झाली असती नव.
आ ग आता इसर जेवड आठवशील तेवडा तरास व्हइल, आता हि हाय नव आपलीच पोर समज.
...........
रखमा तिच्यासाठी दररोज मंदिरात जायची. प्रार्थना करायची या पोरीला लगच बर कर ग देवी तुझी व्हटी भरीन. ......
बघता बघता दोन - तीन महिने होत आले पण ती अजूनही शुद्धीवर आली नव्हती. पण आज तिचा रिस्पॉन्स चांगला होता. डॉक्टरांना पण आश्चर्य वाटत होते काल पर्यंत अस वाटत होत की, हि जगणारच नाही. पण आज चांगला प्रतिसाद देत आहे. ............
आता रिस्पॉन्स तर चांगला देत होती पण ती अजूनही शुद्धीवर आली नव्हती. .......
रख्मा चिंतेत होती. तोवर रामू म्हणाला, काय ग रख्मा कसला इचार करतीस यवडा.
आव ती पोरं अजून शुद्धीवर नाय आली. आता पाहवत नाय तिला अस. अग व्हइल ग बरी ती, आता पर्यंत कायच सुधारणा नव्हती. आता डाक्टर म्हणल नव आता ठिक व्हइल ती. तशी बरी होत आली हाय ती आता फकस्त शुद्धीवर यायला पायजे मग झाल. .........
रख्माला सावलीची आठवण आली. सावली म्हणजे रख्माची मुलगी, जी केवळ नऊ वर्षाची असताना. किडनी फेल झाल्यामुळे दगावली होती. रख्माला तेव्हा एका वर्षानंतर मुल झालेल, त्यांनी जास्त खर्च परवडणार नाही म्हणून एका मुलीलाच फक्त जन्म दिलेला. त्यांच्यासाठी ती म्हणजे त्यांच जग होत.
रामू दुसऱ्यांच्या शेतात काम करायचा . त्यावर त्यांच गुजराण चालायच. आई - बाबा लहानपणीच जगाचा निरोप घेऊन गेलेले. म्हणून ती नवरा - बायको दोघच राहायची. अशात सावलीचा जन्म झाला तेव्हा त्यांना धरतीवर स्वर्ग अवतरल्यासारख झाल होत. त्या दोघांचा वेळ सावलीसोबत खूप छान चाललेला. बघता बघता सावली मोठी व्हायला लागली, रांगायला लागली. तेव्हा तर घर - भर फिरुन फिरुन रख्माला हैराण करून सोडायची.
रख्माला तिचा दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हेच कळायच नाही.
रामूला सुद्धा कधी शिवारातली काम आवरुन घरी जाईन आणि सावलीसोबत खेळत बसेन अस व्हायच. रामूसाठी आणि रख्मासाठी सावली हा त्यांचा प्राण झाला होता.
त्यांना सावलीला शिकवून खूप मोठ बनवायच होत. कारण आपण जस दारिद्र्याचे जीवन जगतोय तस काही तिच्या वाट्याला येवू नये असच त्या दोघांना वाटायच. रामूला पण लहानपणी शिकण्याची खूप आवड होती पण त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती म्हणून त्याने शिकण्याचा हट्ट सोडून दिलेला. पण आज त्याला कळाल होत आपण जर शिकलो असतो तरच हि परिस्थिती बदलली असती. त्यामुळेच त्यान ठरवलेल की काहीही होवू दे. आपल्याला किती बी काम कराय लागू दे. आपण आपल्या सावलीला शिकवून इतक मोठ करायच कि ती अनेकांची सावली बनू शकेल. म्हणूनच तो लहानपणापासूनच म्हणजे दोन वर्षांची असल्यापासूनच सावलीला वेगवेगळ्या कथा सांगायचा कि ज्यातून तिला कथा ऐकण्याची सवय लागावी. व पुढे जावून शिक्षण घेण्याची पण ओढ लागावी.
सावली हळू हळू मोठी होत होती. आश्चर्य म्हणजे ती अगदी चार वर्षाची झाली तेव्हापासूनच प्रश्न विचारून विचारून हैराण करू लागली. मग मात्र रामूची पण पाचावर धारण बसायची कारण तिच्या काही प्रश्नांची उत्तरे रामूला देताच यायची नाहीत. मग आता लय यळ झाला काम बी आवराय पायजत अस म्हणून तो कसतरी काढता पाय घ्यायचा. नंतर मग रख्मा भवती तिचा वेढा सुरू व्हायचा ये आय हे अस का असत. रातच्याला सूर्य का दिसत नाय ? आभाळ खाली आल तर काय व्हायच ग? या जमिनीखाली काय असत ग? वारा दिसत का नाय ग? असे बरेच प्रश्न असायचे. मग रख्मा पण वैतागून म्हणायची. आ ग कसल कसल परश्न इचारती. याची उत्तर मला बी नाय ठाव. काय ग आय मला मग कधी उत्तर मिळणार याची अग तु जरा आणखी मोठी हो म्हंजी मग आम्ही तुला साळला घालतो तवा मिळतील ब तुला उत्तर. अजून किती मोठ व्हाय लागल ग म आय? आर देवा हाय का आणि झालं हिच परश्न सुरू. बर जरा जा बाहिर पण खेळ जा आता अस म्हणून मग रख्मा तिला खेळायला पाठवायची.
रामू आणि रख्माला तीचे प्रश्न ऐकून भारी वाटायच तेला पण तिला कधी शाळेत घालीण अस झालेल. त्यान लगेच सावली पाच वर्षाची झाल्यावर जवळच्या अंगणवाडीत घातल. बघता बघता सावलीच तिसरीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल. रामू आणि रख्मा आता तिला आणखी शिकून मोठ
करायच अशी स्वप्न बघू लागली. रामूला तर आपल्या वाट्याला जे आल नाही ते आपल्या पोरीला तर मिळत हे पाहून खूप आनंद झालेला. पण कस असत ना आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. अगदी तसच झाल. एकदा अचानक सावली लइच आजारी पडली. तिला जवळच्या दवाखान्यात तर नेता आल पण तिच्या किडन्या फेल झालेल्या. व दुसऱ्या मिळेपर्यंत उशीर झाला व त्यातच सावली दगावली. तेव्हा तर त्या दोघांना इतका धक्का बसलेला कि दोघ पण जीव द्यायला चाललेले तेव्हा गावातल्या लोकांनी त्यांना कसबस सावरलेल आज त्या बेशुद्ध अवस्थेतील मुलीला बघून त्या दोघांना ते सगळ आठवल होत. त्यामुळे ते देवापाशी रात्रंदिवस प्रार्थना करायचे कि हि पोर लवकर बरी व्हावी अशी.

क्रमशः