Satyamev Jayte - 12 in Marathi Moral Stories by Bhavana Sawant books and stories PDF | सत्यमेव जयते! - भाग १२

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

सत्यमेव जयते! - भाग १२

भाग १२.

काही दिवसांनी महालक्ष्मी आणि राजवीरच लग्न होत!! एका नवीन आयुष्याची सुरुवात ते करायला लागतात. पण त्यांचं लग्न अगदी साध्या पध्दतीने कोर्ट मॅरेज करण्यात येत. डीएसपी राजवीर आणि महालक्ष्मी लग्नाच्या तीन महिन्यानंतर गोव्याला फिरायला जातात. ते आता पर्यंत चांगले एकमेकांसोबत रुळले होते. पण शरीराने मात्र ते अजूनही एकत्र आले होते.



आज मात्र हॉटेलच्या लोकांनी महालक्ष्मीच्या सांगण्यावरून त्यांची रूम डेकोरेट त्यांना करून दिली होती!! पदोपदी तिचा विचार करणारा राजवीर मुळे तिचं आता पुढाकार घेते. मेडिकली आणि फिजिकली जवळपास ती चांगली झाली होती. त्यामुळे आता तिला राजवीर आणि तिच्यात दुरावा नको होता!! राजवीर आपला फोनवर बोलत रूमच्या आत रात्रीचा पाय ठेवतो आणि समोरच दृश्य पाहून शॉक होतो. तो तसाच फोन ठेवतो. तसाच दरवाजा लावून रूममध्ये आत शिरतो.


"महीऽऽऽ महीऽऽऽ", तो आवाज देत तिला आसपास पाहत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून उगाच गॅलरीत उभी असलेल्या तिच्या हृदयाच्या हार्ट बिट्सची स्पीड खुप वाढली जाते. जणू आज हृदयच बाहेर पडेल की काय? अस तिला वाटत होतं. लाज ,लज्जा , भीती, आनंद सगळ्या भावना आज एकत्र होऊन तिच्या चेहऱ्यावर झकळत होत्या. जणू आज ती वेगळ्याच विश्वात आहे? अस देखील तिला वाटायला लागलं. तो हळूहळू तिच्या परफ्युमचा वास घेत गॅलरीच्या दिशेने जायला लागतो. काही अंतरावर जाताच त्याची नजर तिच्यावर स्थिरावते. कारण आज ती पिंक कलरची ट्रान्स्पेरेंट साडी घालून बाहेरच्या चंद्राला पाहत होती. त्या साडीतून तिचा कमनीय बांधा त्याला दिसत होता. तिला तस पाहून उगाचच त्याला तिला मिठीत घेण्याचा मोह येतो. तसा तो तिच्याकडे जाऊन मागूनच तिला मिठीत घेतो.



"महीऽऽऽ" तो हळू आवाजात तिच्या कानावर ओठ टेकवत म्हणाला. त्याचा असा आवाज ऐकून ती लाजते.




"महीऽऽऽ, काय चालू आहे हे? ",तो तिच्या गालावर ओठ टेकवत विचारतो.




"अहोऽऽऽ, मला आज पूर्णपणे तुमचं व्हायचं आहे. आता नको ना दुरावा. प्लीज!!",महालक्ष्मी प्रेमाने बोलते. तसा तो हसूनच तिला पाहतो आणि सरळ आपल्याकडे वळवून स्वतःचा एक हात तिच्या गळ्याशेजारी नेऊन तिच्या दुसऱ्या गालावर स्वतःचे ओठ टेकवतो. तशी महालक्ष्मी लाजून त्याला मिठी मारते. तो हसूनच एका हाताने तिला जवळ घेतो आणि दुसरा हात तिच्या पाठी नेऊन तिच्या ब्लाऊजची नॉट हळूच सोडायला लागतो. तशी ती पुढे होऊन त्याचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत पकडून त्याला हळूहळू किस करायला लागते. तो देखील मग हसूनच तिला दोन्ही हातात पटकन उचलून घेऊन बेडवर ठेवतो.


"महीऽऽऽ ,धिस इज नॉट फेअर!! एवढा बेड सजवला आहे. मग फायदा करून घ्यायला हरकत नाही आहे का?" राजवीर अस बोलून स्वतःच्या शर्टचे बटन काढतो. तशी महालक्ष्मी लाजून आपला चेहरा स्वतःच्या दोन्ही हातांनी लपवते. राजवीर हसूनच आपला शर्ट बाजूला फेकून देऊन तिच्या अंगावर झोपून तिला आपल्या बॉडी मध्ये लॉक करून हळूहळू तिच्यावर प्रेम वर्षाव करायला लागतो. तशी ती देखील त्याला आपलंसं करून घेऊन भरपूर सारं प्रेम करायला लागते. काहीवेळातच त्या दोघांच्या कपड्यांचे अडसर दूर होते आणि दोघे आपल्या प्रेम नौकेत सवार होऊन दुसऱ्या दुनियेत जायला लागतात. या दिवसाची दोघांनी वाट पाहिली होती!! म्हणून आजचा दिवस ते एकमेकांना जपत भरपूर सारे प्रेम करायला लागतात. आता फक्त रूममध्ये महालक्ष्मीच्या बांगड्या आणि पैंजनाचा आवाज घुमतो.


"महीऽऽऽ बस्स कर आता, चल झोप आता", तो अस बोलून महालक्ष्मीला आपल्या जवळ घेतो आणि दोघांवर पांघरून ओढून घेऊन तिला आपल्या कुशीत घेऊन शांत होतो. तशी महालक्ष्मी सुखाने त्याच्या कुशीत झोपून जाते. पण तो मात्र तिला पाहत राहतो.



"महीऽऽऽ यू आर बेस्ट वुमन इन माय लाईफ अँड स्पेशल पर्सन!! ज्या प्रकारे तू ,कम बॅक केला ना? तो अविस्मरणीय आहे. अश्या मुलीची गरज मला होती माझ्या आयुष्यात. आता तुझ्या येण्याने ते आयुष्य चांगलं झालं आहे. जगायला एक नवीन किरण मिळाले आहे. लव्ह यू मही.",राजवीर मनातच अस बोलून तिच्या ओठांवर अलगदपणे ओठ टेकवतो आणि बाजूला होतो. महालक्ष्मी त्याच्या स्पर्शाने झोपेत देखील हसते!! तो तिच्या हसण्याने गालात हसतो.




"सगळ कळत ना तुला? आता तुझ्या जीवनात फक्त आनंदच असेल!! आय प्रॉमिस यू.",राजवीर अस बोलून तिला आपल्या घट्ट मिठीत घेऊन झोपतो.




राजवीर आणि महालक्ष्मी आज मनाने, शरीराने एकत्र झाले होते. आता कोणीच त्यांना वेगळं करू शकणार नव्हतं!! बालपणीच्या मैत्रिणीपासून ते राजवीरच्या बायको पर्यंतचा महालक्ष्मीचा प्रवास आज पूर्ण झाला होता. स्वप्नांत देखील तिने विचार केला नव्हता. राजवीर तिला स्वतःची बायको बनवले याचा? पण त्याने मात्र , समाजाच्या विरुद्ध जाऊन , घरच्या लोकांच्या विरुद्ध जाऊन महालक्ष्मीला आपलं बनवलं होत. ना की, तिचं सौंदर्य त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. ना ही, तिचं रूप!! त्याला तर ती महत्त्वाची होती!! त्यामुळेच त्याने अस काहीतरी करून दाखवले, ज्याचा विचार देखील कोणीच केला नव्हता.


दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला सर्वांत आधी जाग येते. तशी ती बाजूला सरकून पाहते. राजवीरचा चार्मिंग असा चेहरा तिच्या जवळ पाहून तिला लाज वाटते. राजवीर एक हात तिच्या अंगावर ठेवला होता. जो पाहून ती स्वतःशीच लाजते.


"तुम्ही, असेच रहा कायम!! आय लव्ह यु राजवीर.", महालक्ष्मी खुश होत बोलते. तिचा गोड आवाज ऐकून राजवीर उठतो आणि तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो.




"गुड मॉर्निंग, स्वीटहार्ट.",राजवीर प्रेमळ आवाजात म्हणाला. त्याच ऐकून ती स्वतःशीच हसते.




"गुड मॉर्निंग.",ती हसून त्याला प्रतिउत्तर करत म्हणाली.



"कालचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता!! कारण, काल तू माझी झाली आणि मला आपलंसं केलं. त्यामुळे थँक्यू.",तो हसूनच तिला म्हणाला.




"ओहऽऽऽ राजवीर!! प्लीज, बस्स करा ना!! मला लाज वाटते.",महालक्ष्मी त्याच्या कुशीत शिरत म्हणाली. कारण कालच आठवून आठवून उगाच तिचा चेहरा लाल होत होता. तिला अस लाजताना पाहून राजवीर हसूनच तिला जवळ घेतो.



"ओके, बाबा. आता चेंज करा मॅडम. काय आहे ना? तुम्ही जर अश्या अवतारात माझ्याजवळ राहिला तर? माझे मन कंट्रोलमध्ये राहत नाही!!",राजवीर तिला छेडत म्हणाला. तशी ती त्याच्या हातावर एक फटका मारून त्याच्या पासून दूर होयला लागते. मात्र, राजवीर हसूनच तिला आपल्याजवळ ओढून घेऊन पुन्हा एकदा तिच्यावर प्रेम वर्षाव करायला लागतो. कालच्या रात्रीच्या आठवणीने त्याच मन भरलं नव्हतं. अजूनही तो स्पर्श तिचा त्याला हवाहवासा वाटत होता. म्हणून तो तिला बेडवर घेऊन पुन्हा एकदा तिला भरपूर सारं प्रेम करायला लागतो. महालक्ष्मी देखील लाजूनच त्याला प्रतिसाद द्यायला लागते. ती देखील त्याला हक्काने जवळ घेऊन आपलं बनवायला लागते.


काही दिवस दोघेजण आपलं मस्त गोवा ट्रिप एन्जॉय करून पुन्हा दिल्लीला परततात. मात्र, यावेळी गोड आठवणी घेऊन नवीन संसार सुख सोबत घेऊन ते आपल्या घरी येतात. राजवीरने स्वतःच्या कमाईने न्यु दिल्ली येथे आपला २ बी.एच. के फ्लॅट घेतला होता. जिथे ते दोघे आणि महालक्ष्मीचे आईवडील राहत असायचे!! महालक्ष्मीला जुन्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या बायकांकडून टोमणे असायचे. त्यामुळेच त्यांनी ते घर सोडून दिले. आता मात्र ,इथं महालक्ष्मी खूप खुश राहत होती.



राजवीरने तिला तिच्या जॉब सोबत कलायरीपयट्टू ही मार्शल आर्ट देखील शिकायला सांगितले. त्यामुळे जेव्हा जॉब मधून टाईम मिळायचा तेव्हा महालक्ष्मी दिल्लीतिल एका स्पेशल कलायरीपयट्टू शिकवणाऱ्या क्लास मध्ये जाऊन आपलं ट्रेनिंग करत असायची. हळूहळू ती त्यात पारंगत होत होती. काही महिन्यांतच तिने ही कला अवगत केली आणि बाहेर येऊन त्यांच्या आसपासच्या लहान मुलींना देखील शिकवली. राजवीर तर तिच्यावर भलताच खुश होता!! कारण आता वेगळी महालक्ष्मी त्याला पाहायला मिळत होती.



एक दिवस अशीच महालक्ष्मी जॉब वर कारण सांगून रीतसर परमिशन काढून घरी परतली. अचानक तिला कसतरी व्हायला लागलं होतं. त्यामुळे ती तशीच कोणाला काहीही न सांगता आपल्या रूममध्ये निघून जाते.



"महीऽऽऽ , महीऽऽऽ ", राजवीर दरवाजा वाजवत म्हणाला. कारण महालक्ष्मीला घरात येताना त्याने त्यावेळी पाहिलं होतं. तिची अवस्था थोडीशी त्याला वेगळी वाटली. त्यामुळे तो तिला काही विचारणार? त्या आधीच महालक्ष्मी रूममध्ये पळाली होती. आता मात्र, त्याला काळजी लागली होती. त्याचा आवाज ऐकून महालक्ष्मी खूप वेळानंतर दरवाजा खोलते. तसा राजवीर तिला पाहतो. तिच्या डोळ्यांत आज पाणी होते. ते पाहून त्याला वाईट वाटलं.



"महीऽऽऽ महीऽऽऽ, काही झालं आहे का तुला? काही दुखत का तुला?", राजवीर तिला जवळ घेत म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर महालक्ष्मी तशीच शांत राहते आणि काहीतरी त्याच्या एका हातात देते. तसा राजवीरती वस्तू हातात घेतो आणि ते पाहून भलताच शॉक होतो.



"रिअलीऽऽऽ मही?",तो शॉकमध्ये विचारतो. ती फक्त मान हलवून त्याला "हो" बोलते. तसा तो आनंदी होऊन तिला मिठीत घेतो.



"मही यू आर प्रेग्नंट!! तू आई होणार आहेस? मी बाबा होणार आहे. ओहऽऽऽ मही रिअली लव्ह यू शोना!! तू मला आयुष्यातील सगळ्यात मोठ गिफ्ट दिलं आहे. आय कान्ट एक्सप्लॅन धिस मूव्हमेंट इन वर्ड!!", तो भावुक होत म्हणाला. कारण आता एक नवीन सदस्य लवकरच त्यांच्यात येऊन त्यांचे घर भरून टाकणार होते. आता त्यांचे नाते घट्ट होणार होते. कारण आता त्यांचं बाळ येणार होत. राजवीर तिला जवळ करून कुरवाळतो आणि भरपूर सारे किसेस तिच्या चेहऱ्यावर करून आपला आनंद साजरा करतो.



त्या दोघांची आई बाबा होण्याची बातमी महालक्ष्मीच्या आई बाबांना देखील कळते. तसे ते आनंदी होतात. दिल्ली पोलिसांना राजवीर मिठाई वाटून आपला आनंद त्यांच्यासोबत देखील साजरा करतो!! सगळे पोलीस खुश होऊन त्यांना अभिनंदन करतात. महालक्ष्मीला तो आता कुठे ठेवू? आणि कुठे नको? अस करत होता. तिची भरपूर काळजी तो घ्यायला लागला होता. सगळं काही सांभाळत तो तिला जपत होता.

.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
-----------------------

नेक्स्ट पार्ट हा लास्ट पार्ट आहे स्टोरीचा.पुढच्या भागा नंतर ही स्टोरी संपणार आहे. काही स्टोरीचे पर्व नाही बनत. त्यातीलच ही एक स्टोरी आहे. याचे पर्व २ नाही येणार. याची वाचकांनी नोंद घ्यावी!!