Haiwan a Killer - 16 - Last Part in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | हैवान अ किलर - भाग 16 - अंतिम भाग

The Author
Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

हैवान अ किलर - भाग 16 - अंतिम भाग

भाग 16.

अंगावर एक व्हाईट शर्ट, खाली ब्लैक पेंट घातलेली एक स्त्री दिसत होती. तिचे डोक्यावरचे तपकीरी रंगवलेले केस मागे एका ठिकाणी गोल करुन बांधलेले-चेहरा जरासा उभा व त्यावर गोल्ड मेकअप मारलेली, डोळ्यांवर मोठ्या गोळ्या फ्रेमचा काळा चष्मा घातलेला..त्यातुन, निलसर रंगाने रंगवलेल्या पापण्या दिसत होत्या..त्यांवर जराश्या मध्यम काळ्या आयब्रॉ, मग खाली जरास टोकदार नाक, त्यांखाली स्ट्र्रॉबेरी सारखे लाल भडक ओठ दिसत होते. तीच वय जेमतेम पंचेचाळीस पंन्नास च्या आसपास असाव.पण हार्ड वर्क फिटनेस, मेकअप मुळे ती स्त्री तरुन भासत होती. आजच्या युगात काहीही होऊ शकत ह्याचा उत्तम नमुना! लिफ्टमध्ये एका हातात एक टेबलेट घेऊन ती पुढे पाहत ऊभी होती. तीच्या चेह-यावर जरासे गुढ भयमय भाव झळकत होते. जणु कसलीतरी भीती असावी तिला! पन कसली?. लिफ्ट सुरु असल्याने लिफ्टचे दार बंद होते. पुढे आकड्यांवर चौकोनी पट्टीवर लाल रंग बदलत होते.त्यातच लिफ्टमध्ये ती एकटीच होती. काहीवेळ निघुन गेला घंटी वाजल्यासारखा (टिंग) आवाज झाला. लिफ्टचे दोन्ही दरवाजे डाव्या-उज्व्या बाजुला ऑटोमेटिक तंत्रज्ञाना मार्फत उघडले. तशी ती लागलीच बाहेर पडली.एका कोरिडॉर सारख्या जागेतुन ती पुढे पुढे जात होती. आजुबाजुला खुप सा-या रूम्स लागत होत्या.चौकलेटी दारांवर सोनेरी पट्टीवर इंग्रजी अंकात नाव लिहीलेली दिसत होती. अशातच थोडवेळ चालून झाल्यावर ती एका रुमपाशी थांबली ! समोर बंद दार दिसत होत. सोनेरी पट्टीवर 666 अस इंग्रजीत अंक लिहीले होते.

त्या तरुणीने एक हात वाढवला, दरवाज्याबाजूची बेल वाजवली.

"कोण?" आतुन जरासा वृद्ध आवाज आला, नी मग हलकेच दार उघडून एक म्हातारी बाहेर आली. त्या म्हातारीच्या मागे अर्धवट उघड्या दरवाज्यातुन, रुममध्ये पेटलेल्या सफेद बल्बचा प्रकाश आजुबाजुला झळकत होता. बैडची खालची बाजु, त्यावर प्रथम मऊ लुसलुसशीत गादी, वर शाही पातळ चादर! नी बैड बाजुलाच एक लेंम्प टेबल होता. त्यावर एक तरुन पुरूषाचा अर्धा हात दिसत होता. अंगात सफेद गाऊन घातलेल्या त्या म्हातारीने त्या तरुन स्त्रीकडे हसतच पाहिल व म्हंणाली.

" कोण हवय आपल्याऽऽऽ!" ती म्हातारी पुढे काही बोलणार तोच त्या स्त्रीने एका हाताची मुठ वेगान पुढे त्या बिचा-या सुरककुतलेल्या म्हातारीच्या तोंडावर मारली. वयाची सुद्धा जाण नसते काही मांणसाणा नाही का? अरे पन हे काय? मित्रहो? त्या स्त्रीची मुठ त्या म्हातारीच्या तोंडापल्याड पारदर्शक असल्याप्रमाणे आरपार शिरली आहे. जणु एका लेजर तंत्रज्ञानामार्फत ती म्हातारी रेखाटली असावी, तिला तिथे उभ केल असाव. मुठ त्या पारदर्शक म्हातारीला स्पर्शुन मागे जाताच एक

आवाज आला. नी ती म्हातारी लहान काळ्या रंगाच्या मायक्रो चिप्ससारखे तुकडे होत हवेत विरुन गेली.

" पासवर्ड ?!" एक रोबॉटीक आवाज.

" तिमीर!" ती स्त्री हलकेच इतकेच म्हंणाली.

" मिशन? !" पुन्हा एक रोबॉटीक आवाज.

" क्रामचंद "

" पासवर्ड नॉट अलाऊड ! काउंटडाऊन ऑन! 1, 2, 3, "

त्या रोबॉटिक आवाजात अंक सुरु झाले. त्या रुम मध्ये आता लाल रंगाची लाईट टीम टिमू लागली! तस त्या स्त्रीच्या चेह-यावर धांदळ उडाल्यासारखे भाव दिसु लागले. डोळे डावी उजवीकडे फिरवत ती काहीतरी आठवु लागली. 4, 5, 6, 7, 8, 9! त्या स्त्रीचे एकदाच दोन्ही डोळे मोठे झाले जणु तिला आठवल.

" रामचंद x क्रामचंद!" ती पटकन म्हंणाली.तेवढ्या वेळेतच तिचा श्वास केवढा फुलला होता.जणु दहा अंक पडताच अस काय अघटीत घडणार होत? देवच जाणो.

" पासवर्ड सक्सेजफुल! " आवाज येतच पुढे उघडलेला तो दरवाजा बिन आधाराने पुढे पुढे येत हळुच बंद झाला. मग काहीवेळ निघुन गेल्यावर त्या स्त्रीनेच आपल्या स्व्त:च्या थरथरणा-या एका हाताने दार उघडल. आत आली, आपल्या मागे दरवाजा ओढुन घेतला. व लागलीच समोर पाहिल. काहिवेळा अगोदर जे बैड, पलंग, बल्बचा प्रकाश सर्व दृष्य आता दिसत नव्हत.आता पुढे चाळीस मीटर अंतरावर एक भिंत दिसत होती त्यावर एक मंद लाल दिवा जळत होता. त्या लाल दिवा जळणा-या उजेडाखाली एक काचेच चौकोनी टेबल होत. टेबलामागे एक काळी खुर्ची होती..तिच तोंड मागच्या दिशेने असुन एक माणुस पाठमोरा त्यावर बसला होता. ती स्त्री हळुच पावल चालत त्या टेबलापाशी आली. तेवढ्यात तिने आजुबाजुला पाहिल. त्या लाल दिव्याच्या प्रकाशाशिवाय डाव्या -उजव्या वर -आणि मागच्या बाजुला अंधार दिसत होता. अगदी काळ अंधार! काजळी, गढूळ, गहिरा गर्द, खोळ, खोल जाणारा सर्व शब्दांनी तैयार होणारा अंधार.त्या जागेत आजुबाजुला हवा नव्हती..पन गारवा होता. स्मशान शांतता होती. दुर दुर पर्यंत तिथे त्या लाल छोठ्या दिव्या शिवाय प्रकाश किरण नव्हत. नक्की कोणती जागा होती ती.? पुढे पाहतच तीने एक आवंढा गिळला व काफ-या आवाजात म्हंणाली.

" ब...ब..बॉस..!" तिचा तो काफरा आवाज त्या अंधा-या खोलीत गुंजला. काहीवेळ तो आवाज गुंजत राहिला मग निघुन गेला.आवाज नाहीसा झाला..पुन्हा शांतता पसरली..तसा

" हंम्म ! बोल?" पुढुन एक करडा, आज्ञाधारक आवाज आला.त्या आवाजाने ती स्मशान शांतता पुन्हा भंग पावली. दुर-दुर अंधारी काजळी जणु तो आवाज पाण्यासारखा वाहवत नेत होती. त्या थंडीमय गारव्यात सुद्धा त्या स्त्रीला घाम फुटला होता. कपाळावरचा घाम रुमालाने पुसत ती म्हंणाली.

" बॉ..बॉ..बॉस! मिशन क्रामचंद फैल झालंय!"

" व्हॉट ऽऽऽऽऽऽ!" एक मोठा करडा आवाज. त्या आवाजाने ती स्त्री थरथरलिच. तिच्या डोळ्यांसमोर अंधूकश्या लाल प्रकाशात पाठमोरा बसलेला तो माणुस दिसत होता.

" मिशन फैल झालंय? पन मार्शलला पाठवल होतंत ना तुम्ही ? मग कस झाल मिशन फैल !...कस झाल?" शेवटच्या वाक्याला त्याचा आवाज चढला.. होता ! ती खुर्ची आता गोल भिंगली, व त्या बसलेल्या मांणसाच हाडककुल देह सुद्धा पुढे आल. शरीराने सात साडे सात फुट उंची. अंगावर एक काळा सुट, त्यात एक निळसर शर्ट, गळ्यात काळी टाई, खाली काळी पेंट, पायांत चकचकीत काळे बुट, नी डोळ्यांवर काळ्या गोल फ्रेमचा चष्मा. डोक्यावरचे वाढलेल्या काळ्या केसांचा एक भांग डाव्या बाजुला वळवलेला, तर दुस-या भांगाची बाजु उज्व्या बाजुला सारली होती. खोलीत एका अंधूक लाल बल्बच्या प्रकाशात त्याचे फक्त कपडे केस दिसत होते पन तो खप्पड चेहरा...चेहराकाही दिसत नव्हता.

" बॉ..बॉ...बॉस्स्स! गे..गे..गे..जेट प्रोब्लेम झालं ! V10 मॉडल 1 एका शस्त्रास इन्स्टॉल करण्यास अक्षम झाली म्हनुन!" त्या स्त्रीने अद्याप मान खालीच झुकवली होती. वर पहायची हिम्मत होत नव्हती तीची.

तोंडातले शब्द तुटक तुटक बाहेर पडत होते.

" व्हॉट? गेजेट प्रोब्लेम? तुम्हा सर्वांना करोडो रुपये खर्च करुन एवढ सगळ तंत्रज्ञान मी मिळवुन दिल आहे तरी ही अशी घोडचुक तुमच्याकडून झालीच कशी?" त्या काळ्या सुट घातलेल्या लुकड्याश्या आकृतीने दोन्ही हात टेबलांवर अशे काही आपटले, की तो फट्ट आवाज चारही दिशेना गुंजला जात त्या स्त्रीच्या कानांत घुसला.. भीतीने तिच्या हातातला टेबलेट हातातून निसटून खाली पडला. तिला अस घाबरलेल पाहून त्या आकृतीने आपला राग कसातरी आवळल्यासारखा दिसला.कारण खुर्चीच तोंड पुन्हा मागे फिरवुन, ती आकृती पाठमोरी बसली. सुटच्या खिशात हात घालुन, त्या आकृतीने त्या खिश्यातुन एक सोनेरी कंपॉस टाईप बॉक्स बाहेर काढला. त्या प्लास्टीक बॉक्सवर गोल्डमन सिगारेट नाव होत. बॉसने त्या बॉक्सची कव्हर उघडून आपल्या लांबसटक दोन बोटांची चिमटी बनवत त्यातुन एक पातळसर चौकलेटी सिगारेट बाहेर काढली, मग ती सिगारेट हलकेच तोंडात ठेवली, दुस-या हाताने सिगारेटच बॉक्स त्याच खिशात ठेवून, तिथूनच एक शाही सोन्याची कव्हर घातलेला, लाईटर बाहेर काढला, ज्यावर गुणाकाराच काळ्या अक्षरात चिन्ह होत. आणि त्या गुणाकारामधोमध एक एक छोठासा हिरा अडकवला होता. लाईटरच झाकन बाजुला सरकवत त्या आकृतीने लाईटर पेटवला, नी तो लाईटर चेह-या जवळ आणणार की तेवढ्यात मध्येच तो हात थांबवुन त्याने तो लाईटर बंद केल. अस का केल पण बॉसने? आपला चेहरा कोणालाही दाखवत नव्हत का तो?

" जे झाल ते झाल! आता एक काम करा? " त्या स्त्रीने कान टवकारले.

" आपले स्पेशल रेंक टॉप 10 चे पाच घोस्टबस्टर्स कमांडोज ना तिकडे पाठव. " त्या स्त्रीने फक्त मान हलवली. " आणि हो! त्या सर्वांना आग्निपंख फाईटर प्लेंन्स द्या! दीड तासांत हा मिशन सक्सेजफुल व्हाईला हवा! काय?" " तो करडा हुकूमधारी आवाज.

" जी, ..जी, जी..बॉस!" ती स्त्री त्या पाठमो-या आकृतीकडे पाहत म्हंणाली. व लागलीच तो टेब उचलून पुन्हा माघारी वळली.तिला अस झाल होती की कधी एकदाची ह्या खोलितुन बाहेर पडत आहे.

" ऐण्ड डिकोस्टा " ती स्त्री दरवाज्यापाशी पोहचताच मागुन आवाज आला, तीने पुन्हा वळुन मागे पाहिल.

" येस बॉस!"

" त्या क्रामचंदला मारण्यासाठी अंतस्त्राच वापर करणार होतात ना तुम्ही?" तो चिरकस करडा आवाज त्या खोलीत गुंजला.

" येस बॉस ! पन फ्क्त एकच एम्मो ! मिळाली होती आम्हाला. "

" व्हॉट फक्त एकच?"

" ये..ये..येस! बॉस."

" का ?" पुढुन पुन्हा प्रश्ण आला.

" कारण बॉस एका एम्मोची किंमत! पाच लाख आहे !"

" बस्स पाच लाख !" आवाज मोठा गर्वाने तुच्छतेने बोलल्यासारखा चढला होता" अरे ह्याट! पाच लाख काहीच नाही आहेत माझ्यासाठी! भिकारी नाही आहे मी त्या अनिश्क सारखा.जो पैशांचा विचार करायचा हरामखोर ! मी म्हंणालो होतो ना तूला? हव तेवढ खर्च कर? पन हा मिशन ?.." बॉसचा सिगारेट धरलेला हात वर आला. तर्जनी मध्यमा मध्ये सिगारेट पकडली जात तर्जनी वर होत" मिशन सुटता कामा नये! का ?" बॉसने पुन्हा प्रश्ण केला...पन डिकोस्टा नुसती थरथरत होती. एकचकार शब्द बाहेर येईल तर नवळच!

" हा मिशन ! गॉडफादर (पी.एम ) ने स्पेशल आपल्याकडे दिला आहे. आणि ह्या मिशनची रक्कम माहीतीये तुला?"

त्या स्त्रीने नाही अस म्हंणत मान हलवली. तसा पुढुन आवाज आला.

" दोनशे कोटी! आणि त्या पैश्यांसहितच माझ्या कंपनीची ओळख जगभरात पसरेल ते वेगळ ! आणि म्हंणुनच मला काहीही करुन हा मिशन सक्सेजफुल झालेला हवाय ! "

" जी बॉस तुम्ही चिंता करु नका ! मी आताच जाते..आणि रेंक टॉप 10 चे पाच स्पेशल ट्रेनिंग दिलेले कमांडोज निवडुन...त्यांना पाच टर्बो सुपर बूस्ट एयर क्राफ्ट आग्निपंख आणि अंतस्त्राच्या एम्मो भरलेल्या केननसहित हायवे नंबर 405 च्या दिशेने रवाना करते." मिस:डिकोस्टाने दरवाजा उघडण्यासाठी हात वाढवला की पुन्हा आवाज आला.

" डिकोस्टा? मी जायची परवानगी दिलीये का तुला?"तो करडा आवाज ते वाक्य ऐकून मिस:डिकोस्टांच्या गळ्यात श्वास अडकला, तिचे डोळेच विस्फारले.

" स..स्स..सॉरी बॉस! " ती पुन्हा दाराशेजारीच ऊभी राहीली. हलकेच माघारी वळली. माघारी वळताच एक तांबडा प्रकाश डिकोस्टाना त्या खुर्चीसमोर पेटलेला दिसला. बॉसने नक्कीच आता लाईटर पेटवून सिगारेट शिलगावली होती.

" मला धीर तर दिलास तु ! पन विश्वासाने सांगत आहेस ना? कि हा मिशन सक्सेजफुल होईल म्हंणुन?" त्या पाठमो-या खुर्चीबाजुनी वर पेटलेल्या लालसर दिव्याच्या उजेडाने सफेद धुर काळसर भासुन अगदी मंद गतीने वाकड तिकड वर जाताना दिसत होता.

" यस बॉस! आ..आई प्रॉमिस !" मिस:डिकोस्टांचा थरथरता आवाज.

बॉसने उज्व्या हातातली सिगारेट तोंडाजवळ घेऊन एक झुरका घेतला..पुन्हा तोंडातुन सफेद धुर सोडत म्हंणाला.

" ठिक आहे ! जर मिशन सक्सेजफुल झाल! तर तु निवृत्त होशील..आणी जर मिशन अनसक्सेज झाल.तर.." बॉसच्या त्या खप्पड़ चेह-याचे पातळसर काळे ओठ फाकले..तो सफेद दात काढुन एकटाच हसला.इकडे मागे मिस:डिकोस्टांना मात्र घाम फुटला होता. कपाळावरचा घाम पुसुन पुसुन रुमाल ओला झाला होता.

" तशी वेळ येणार नाही बॉस! आ...आई प्रॉमिस !" मिस:डिकोस्टा..

" ओके मग या तुम्ही !" तोच करडा हळुवारपणे बोलणारा आवाज.

या तुम्ही हा शब्द ऐकताच मिस:डिकोस्टाने पटकन दार उघडल आणि ती बाहेर आली. मग दरवाज्या लावुन बाजुलाच श्वास घेत उभी राहीली.

काहीवेळा अगोदर सुंदर भासणारा चेहरा आता पुर्णत घामेजलेला होता. मेकअप अस्तव्यस्त झाली होती. तो घाम आधी शर्टच्या बाह्यांनी पुसून काढला. नी मग तनुजांनी खिशातुन एक काला फोन काढत.. टच करत कॉल लावत तोच फोन कानाजवळ आणला.फॉनच्या मागे टी अस इंग्रजीतल शब्द नी त्या शब्दा भोवती गोल रिंगण दिसत होत. 

" हेलॉ.! मी तिमीर घोस्टबस्टर्स कंपनीची चेयरमन तनुजा डिकोस्टा बोलत आहे "

" येस मैम !" पुढुन स्त्रीचा आवाज आला.

" मिशन रामचंदxक्रामचंद फैल झालंय.. तर त्यासाठी एयर स्ट्राइक करायचीये". अस म्हंणतच मिस:तनुजा डिकोस्टा ज्या की तिमीर घोस्टबस्टर्स कंपनीच्या चेयरमन होत्या त्यांनी सर्व प्लैन फोनवर त्या अनोलखी तरुणीला कळवल.

" ओके मैम आम्ही तैयारीला लागत आहोत. मिशन सक्सेज होताच मी कॉलबैक करेल. ! धन्यवाद." समोरुन फोन ठेवला गेला. तसा मिस: डिकोस्टाने सुटल्यासारख तोंडातुन एक सुस्कार बाहेर सोडला." हुश्शऽऽऽऽ"

×××××××××××××××××

हायवे नंबर 405 च्या रस्त्यावरुन एक आर्मी जिप भरधाव वेगाने पुढच्या दोन पिवळ्या हेडलाईटस पेटवत धावत होती. हवेला कापत गाडी रस्त्यावरुन धावत होती. अंधारातून पिवळेजर्द हेडलाईटस गाडीला मार्ग दाखवत होत्या. गाडीचे गोल जाडजुड टायर्स नी त्यात बसवलेले चंदेरी व्हीलज गर्रगर्र करत फिरत होते. बंद ग्लासच्या काचांवर हवा स्प्प स्प्प करत आदळत होती. जणु कोणी हातच आपटत आहे.

एका वेड्यासारखी बेभान होऊन जीप रस्ता कापत होती. जीपमध्ये ड्राईव्हसीटवर मायरा बसलेली, तिच्या बाजुला सोज्वल बसलेला, नी मागे प्रथम निल त्याच्याबाजुला शायना, मग तिसरी प्रणया. गाडीत विलक्षण शांतता पसरली होती. ज्याच्या त्याच्या चेह-यावर गंभीर भाव झळकत होत्या. गाडीच्या स्टेरिंगखाली स्पीडोमीटर दिसत होत. हिरव्या रंगाचा आकडा 180 kph वर होत.

विंडोग्लास मधुन पिवळ्या हेडलाईटचा प्रकाश दूर दुर पर्यंत जात रस्ता दाखवत होता. त्या पिवळ्या हेडलाईटस पुढुन रस्ता अडवण्यासाठी ट्पुन बसलेल्या अंधाराला लाईट मार्फत दुर सारय होत्या. मायरा राहून राहून पुढच्या मिरर मधुन मागे पाहत होती.

तिच्या नजरेस फक्त मागचा कालोखी रस्ता दिसत होता.ह्याचा अर्थ रामचंद अद्याप आला नव्हता. शायना केव्हापासुन तिची हीच क्रीया पाहत होती.

" तुझ नाव काय आहे ग ? आणि तु त्या गावातली आहेस का?"

प्रथम शायनाच आवाज ती शांतता मोडून गेला. मायराने मिरर मधुनच तिच्याकडे पाहिल व म्हंणाली.

" नाही ! मी त्या गावातली नाही !"

" मग ?" निल मध्येच बोलला. सोज्व्ल प्रणया दोघे फक्त ऐकत होते.

" ती बस पाहिलीत का तुम्ही?" मायरा..

" हो -हो! मी त्याच बसने इथे आलो होतो." निल म्हंणाला.

" मी त्या बसची ड्राईव्हर होते." अस म्हंणतच मायराने तिच्या वडिलांबत ते हॉटेलमध्ये जाण्यपर्यंत सर्व काही त्या सर्वांना सांगितल. हायवेवर असलेल्या लहान-लहान दगड़ गोट्यांना दुर भिरकावत गाडी बेभान होऊन धावत होती. वाळवंटातली वाळू तुडवत नाचत पळणारा तो वेनम प्रजातीचा साप दुरुन पुढे पुढे जाणा-या त्या जीपच्या उजेडाला पाहत होता. सर्व काही सांगुन झाल होत. मायराच्या डोळ्यांतुन पित्याच्या आठवणीने टचकन एक अश्रु बाहेर आला होता.

" मग ही जीप कुठे मिळाली तुला?" सोज्वल प्रश्ण करत म्हंणाला. मायराने एकवेळ त्याच्याकडे पाहिल.. मग पुन्हा रस्त्यावर नजर टाकत म्हंणाली.

" मी ज्या हॉटेलात घुसले होते! त्याच हॉटेलमधुन माघारी वळताना, मला किचनमधुन एक आवाज आला, तसे मी किचनमध्ये घुसले. सर्वप्रथम तर मला तीन चार उंदीर दिसले आणी मग शेवटला हॉटेलच्या किचनची भिंत तोडुन आत आलेली ही जीप. एक क्षण मी ह्या जीप कडे पाहतच राहीले होते. की तेवढ्यात एक मोठा स्फोट झाल्याच आवाज मी ऐकल..तस मी धावतच बाहेर आले ! बाहेर येताच मला जळणारी बस दिसली. ते दृष्य पाहून तर माझ डोकच गरगरायला लागल..मग मी बेशुद्धच झाले होते. "

" औह, मग!" सोज्वल तोंडाचा चंबु करत म्हंणाला.

" मग काय, काहीवेळाने जशी मला जाग आली तेव्हा मला काचेच्या भिंतीपल्याड निल-शायना दोघेही एकमेकांना भेदरलेल्या अवस्थेत दिसले.. आणि दुरुन येणारी ती ट्रक ज्यात तो सैतान बसला होता. मग अचानक मला त्या जीप बदल आठ्वल ! जी की किचनमध्ये होती. तस मी लागलीच किचनमध्ये पोहचले. सुदैवाने जीपला चावी लावलेलीच होती..आणि पेट्रोल टेंक, इंजीन सहित सर्वकाही ठिक होत. मग पुढे जे काही घडल ते तुम्हा सर्वांना माहीतीच आहे." मायराने सोज्वलकडे पाहिल..मग पुढ़च्या मिररमधुन मागे निल शायना प्रणया तिघांकडे पाहील.

" अच्छा म्हंणजे ह्याचा अर्थ ह्या अगोदर सुद्धा कोणितरी त्या रामचंदच्या कचाट्यातुन सुटण्याचा प्रयत्न केला होता! पन तो सूटू शकला नाही."

प्रणया एक एक करत सर्वांकडे पाहत म्हंणाली.

" आणी त्याचीच ही जीप असावी !" शायनाने बरोबर ओळखल.

" काहीही असो ! पन आपन देवाच्या कृपेने आपण सुटलो आहोत. आणि हे खुप चांगल झाल आहे!" निल म्हंणाला. नी तेवढ्यातच त्याची नजर स्टेरिंग बाजुला गेली. मधोमध एक, लाल, पिवळ्या रंगाचा कापड तिथे होता. जणु त्या खाली काहीतरी असाव.

" तिथे त्या कापडा खाली काहीतरी आहे वाटत?"

निल पुढे त्या लाल पिवळ्या कापडा कडे पाहत म्हंणाला.मायराने ही ते पाहिल नी मग एक हात स्टेरिंगवर ठेवतच तो छोठासा लाल पिवळा कापड हलकेच दुस-या हाताने उचल्ला. तसे त्याचक्षणी सर्वांना त्या जागेवर एक छोठीशी संतोषी मातेची आणि तिच्या मांडीवर श्रीगणेश बसलेली. मूर्ती दिसली. अंगात लाल साडी, डोक्यावर मुकुट, गळ्यात सोन्याचे हार, दोन्ही हातांत लहान हिरव्याबांगड्या घातलेल्या दिसत होत्या. त्याच एका हातात त्रिशूल धरलेला, गर्वाने नढलेल्या, आपल्या शक्तिचा वाईट उपयोग करुन सामान्य मानवाला त्रास देणा-या आसुराचा अंत करण्यासाठी तो त्रिशूल धरला होता मातेने हाती. साक्षात जंगलातल्या राजाच्या म्हंणजेच वाघाच्या पाठिवर बसलेली, संतोषी मातेची, आणि श्रीगणेशाची ती मूर्ती पाहून तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनातली भीती जणु झटकन दुर हिबाळली गेली.

 नकारत्मक शक्तिचा प्रभाव हा कितीही ताकदवर असो. तिची पकड आपल्या मनावर कितीही जोरदार एका गंजुन गेलेल्या फिट बसलेल्या नटासारखी असो. पन त्यात जर तेलाच एक थेंब जरी आत पडला, तर ती पकड तो नट मेहनतीने काढता येऊ शकतोच. सकारत्मक उर्जेच ही तसंच आहे. मानवी मनाच्या भीतीवर विजय मिळवाचा असेल तर देवांची साथ हवी.त्यांच्यावर मनोभावनेचा विश्वास हवा. देवावर विश्वास हवा. मग पहा कस विजय मिळवता येत ते.

निल-शायना सोज्व्ल-प्रणया चौघंनी दोन्ही हात जोडून मोठ्या आदराने मनोभावे डोळे मिटून कड़कडुन मातेच आर्शीवाद घेतल. मनोमन ह्या संकटातुन सुटका कर असा धावा सर्वांनी केला. मायराने सुद्धा एका हाताने दर्शन घेतल. पन डोळे बंद केले नाहीत.ड्राईव्हसीटवर बसली होती ती! डोळे बंद केले असते तर एक्सीडंट झाल नसत का?

मायराने आपल्या वडीलांना दिलेला वचन अद्याप पाळला होता. गाडी 180 kph च्या स्पीडनेच धावत होती. प्रतिघंटा गाडीचा वेग 180 होता.

तास उलटून गेले होते. पन हायवेवर दुसरी कोणतीही गाडी पुढुण येताना दिसत नव्हती ! आलीच नव्हती. किती विलक्षण बाब. नाही का?

पुर्णत हायवेच झपाटला होता. आत इंट्री मारली की थेट स्वर्गाचा रस्ताच लागत होता. बाहेर पडण किस्मत साथ देगी तो ही कुछ हो सकेगा वरना..? निल-शायना सोज्वल -प्रणया डोळे उघडे ठेऊन एकटक पुढे पाहत होते. मायरा सुद्धा डोळे उघडे ठेऊन ड्राईव्ह करत होती.पाहता पाहता आकाशातला चंद्र आता अंधुक -अंधुक दिसायला सुरुवात होत होती. काळे ढग लाथाडुन लावल्यासारखे पळ काढत होते. कारण..? कारण, सकाळ व्हायला आली होती. हो मित्रांनो सकाळ होत होती. पन सूर्य मात्र अद्याप आला नव्हता. तो विजयी करता, सकारत्मक शक्तिचा दूवा मार्तंडय अद्याप आला नव्हता. आजुबाजुचा रेगिस्तान आता साफ दिसत होत. सोनेरी वाळु सकाळच्या पांढरट अंधुकश्या उजेडात हळकीशी चौकलेटी दिसत होती.

" सकाळ झालीये! " प्रणया बाजुच्याच काचेच्या बंद खिडकीतुन बाहेर पाहत म्हंणाली. एकक्षण तिला सकाळच्या थंड हवेस अनुभवायची उत्तेजक लहर दौडून आली होती पन तिने कसतरी आवर घातल.

 " मायरा ताई ! अंग अजुन पोहचलो कस नाही आपन ?" निल मागुन म्हंणाला.

" एक तास उलटून गेलय! मला वाटत तीस -चाळीस मिनीटांत पोहचु आपण." मायरा आपल नेहमीच तर्क लावत म्हंणाली जे की अगदी बरोबर- अचूक होत. निल -शायना मायरा तिघांच्याही सकाळच्या वातावरणात काहीवेळ का असेना गप्पा सुरु झाल्या होत्या. अनावधानाने का असेना पन गप्प राहून त्या गप्प ऐकत बसलेल्या सोज्वलची नजर गाडीच्या स्पीडोमीटरकडे गेली.पेट्रॉल टक्केवारी दर्शवणारा आकडा कमी -कमी होताना दिसत होता. हिरव्या, मग पिवळ्यावरुन आकडा, थेट लाल कलरच्या दिशेने येऊ लागला.

" ओह शट, ओह शट!" सोज्व्ल एकच वाक्य डबल डबल बोलु लागला.

त्याच हे अस वागण पाहून सर्वजन " काय झाल? काय झाल? " अस त्याला विचारु लागले.

" पेट्रोल संपतय! पेट्रोल संपतय! काहीतरी करा ?"

सर्वांच्या नजरा एकदाच स्पीडोमीटर जवळ गेल्या. एकक्षण सर्वांच्याच अंगावर सर्रकन भीती चढली.

" शट, शट, शट, शट! " निल सुद्धा एकापाठोपाठ एकच शब्द बोलू लागला. नी इकडे गाडी काहीवेळातच धक्के खात गाडी बंद पडली.

नी जशी गाडी बंद पडली.एकाचवेळेस, एकाचक्षणी सर्वांच्या मुखातुन

एक किंकाळी बाहेर पडली."आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" जो तो गुरा सारखा घसाफाडून ओरडू लागला. हायवेवर ऊभी जीप बाहेरुन संपुर्णत वाळवंटात एकटी ऊभी दिसत होती.आणि त्या जीपमधुन किंकाळ्यांचा ह्या चारहीजणांचा ओरडण्याचा आवाज येत होता.

" अरे गप्प बसाऽऽऽ" मायरा दोन्ही हात कानांवर ठेऊन मोठ्याने ओरडली तसे चौघेही हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन गप्प बसले.

" इडीयट! कशाला ओरडताय ? आर्मी जीप आहे म्हंणजे एकस्ट्रा 

पेट्रोल केन ही असेलच ना!" मायरा म्हंणाली.

" हो, असेल असेल नक्की शोधूयात चला लवकर !" निल झटकन भुतासारखा जागेवरुन गायब झाला. एक दोन सेकंद बाकीचे हे चौघे विस्फारलेल्या नजरेनेच एकमेकांकडे पाहू लागले.

" अरे शोधाना!" निल चा आवाज आला.तसे सर्व हो हो करत बाहेर आले. दरवाजे खोलून सर्वजन निल शायना सीटखाली, सोज्वळ रूफ वर, तर प्रणया डिकीमागे पाहू लागली. पन कोणालाही पेट्रॉल मिळाल नाही.

" मिळाल का ?" मायरा सीटवर बसुनच म्हंणाली. पन सर्वांचे पडलेले चेहरे नाही बोलायची गरजच भासली नाही.

" आता पायी जाव लागेल का ? " शायनाने निळकडे पाहील. तसा निल मोठ्या फिल्मी स्टाइलने म्हंणाला.

" नाही माझ्या राणी, पायी नाही जाव लागणार !"

" मग !" शायना केविलवाणा चेहरा करत न समजुन म्हंणाली.

तस निलने दात रागात ओठांखाली चावले. मनात एकदा विचार आला.द्याव एक कानाखाळी..पन त्याने कंट्रोल केल.व हळकेच स्वरात म्हणाला.

" शायना. तु पायी चालत ये हा ! आणि मी, ही बाकीची सर्व धावत जाऊ ..! कारण मागुन तो रामचंद आला ना की तुला कायमची लिफ्ट देईल. " निल शायना दोघांच बोलण सुरु होत. सोज्व्ल-प्रणया दोघेही त्या भाबड्या निखळ प्रेमाचे रागीट बोल ऐकत हसत होते. मज्जा घेत होते. की मायरा ह्या चौघांपासुन पुन्हा जीपच्या ड्राईव्हसीटपाशी आली. दरवाजा उघडाच होता. तीने हळूच सीटपाशी हात नेला. आणी तो सीट हळकेच वर उचल्ला आणि खाली पाहते तर काय? सीटखाली एक सफेद केन होती..त्यात ती पुर्ण भरुन पेट्रोल होत. जे पाहून मायरा ओरडलीच.

" हेय गाईज पेट्रॉल भेटल यार ! " तीचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज, सर्वांच्या चेह-यावर आनंद झळकून गेला.आणि त्याच वेळेस आनंदाला सुतीक लागल. ( पोंम्ममऽऽऽऽऽऽ) त्या हॉर्नचा आवाज तर आता ह्या सर्वांना ओळखीचाच झाला होता. बहिरा माणुस सुद्धा थरथरुन ऐकेल असा अभद्र आवाज होता तो. आणि ती काळसर ट्रक. तीचा इंजीनचा घर्रघर्रता खर्जातला आवाज. निल-शायना सोज्व्ल- प्रणया मायरा सर्वांनी वळुन एकदाच मागे पाहील. रामचंदची काळी ट्रक. बोनेटवर घुबडाच लाल चित्र, तिचे टपोरे पिवळेजर्द भेदक डोळे ह्या सर्वांकडे पाहत होते. एकक्षण सर्वांच्या मनात धडकी भरली. चाकांच्या मधोमध खाली नंबर प्लेटच्या थोड खाली साखळ्या बसवल्या होत्या. ज्यांचा प्रेतयात्रेत वाजणा-या टालांसारखा आवाज होत होता. ठण, ठण..!

रामचंदच्या ट्रकमधला एक चाक ! हो एक चाक पंक्चर झाला होता.आणि रस्त्यावरुन नुस्त लोख्ंड गर्रगर्र ठिंणग्या उडवत पुढे पुढे येताना दिसत होता. बाकीसर्व स्तब्ध झाले होते. भीतीने जागेवर गारठले होते. पन मायरा नाही.मायराने लागलीच केन हातात घेतली. त्यासहीत चावी काढुन ती हवेतच सोज्वलकडे भिरकवली.

"पेट्रोल हॉल खोल, .लवकर खोल !" मायराने अस म्हंणतच केन नीलच्या दिशेने फेकली.

" तुम्ही दोघी गाडीत बसा लवकर! जस्ट फ़ास्ट घाई करा ! " इकडे मायराने ड्राईव्हसीटचा दरवाजा खोलला, गाडीत बसली. सोज्वलचा हात रामचंदच्या पुढे पुढे येणा-या ट्रकला पाहून थरथरायला लागला. त्यामूळे सोज्वलच्या त हातातली चावी की हॉलमध्ये भीतीने आत काही शिरत नव्हती कारण नेम चुकत होता. हात थरथरत असल्याने नेम चुकत होता. आणि हेच दृष्य मायरा पाहत होती. की तेवढ्यात तिच्या मुखातून एक शिवी बाहेर पडलीच.

" अरे ए टाकना आई झ×××या! "मायराच्या तोंडून शिवी बाहेर पडली. प्रणया-शाईना दोघीही एकवेळ डोळे मोठे करुन तिच्याकडे पाहतच होत्या. खच्च आवाज करत सोज्वलच्या हातुन चावी की होलमध्ये बसली. तीच उज्व्या दिशेला फ़िरवुन त्याने पेट्रॉल गाडीत ओतण्याच झाकण खोल्ल. तस निलने केनच झाकन उघडून पुर्णत केनच त्या हॉलमध्ये ओतायला सुरुवात केली. वेळ शिल्लक नव्हती.कोणत्याही क्षणी सैतान इथे पोहचणार होता. लाल व्हील फिरवत रामचंदची ट्रक पुढे येत होती. जेमतेम सत्तर ऐंशी मीटरचा अंतर होत ट्रक आणि जीपमध्ये.पन ते अंतर मागे सोडायला, त्या ट्रकला किती वेळ लागेल?

पेट्रॉल केनमधुन बुड बुड आवाज करत पाण्यासारखा पेट्रॉल केनला धड धड धक्के खात हलवत अर्ध पेट्रॉल गाडीत जात होत तर अर्ध खाली रस्त्यावर पडत होत. मायरा एकटक स्पीडोमीटरकडे, तर कधी मिरर मधुन मागे दुरुण पुढे पुढे येणारा तो ट्रक पाहत होती. पेट्रॉल दर्शवणारा आकडा लाल र्ंग सोडून पिवळ्या लाईनच्या दिशेने निघाला होता. ह्याचा अर्थ पेट्रॉल टेंक अद्याप भरली नव्हती. ( पोंम्मम्मम्म) पुन्हा एकदा त्या हॉर्नचा आवाज आला. ट्रक जवळ जवळ येत होती.

" निल सोज्वल बस्स झाल ! गाडीत बसा!" मायरा मिरर मधून पुढे पुढे येणा-या ट्रकला पाहत होती. तेवढ्या वेळेतच तिला क्रामचंदच्या ट्रकच एक टायर फुटून फक्त लोख्ंड गोल गोल भिंगरी सारखा ठींणग्या उडवत येताना दिसल.

" सोज्व्ल तु जा! आत बस्स!" सोज्वल लागलीच निघून जात पुढच्या सीटवर येऊन बसला. निलने पेट्रॉल ओतायच बंद केल...मग घाई करतच चावी लावून पेट्रॉलच झाकण बंद केल. मग धावत मायरा जवळ आला. चावी उघड्या खिडकीतून तिच्याकडे सोपवली. मागच्या सीटच्या दिशेने येऊन दरवाजा खोल्ला ! पन हे काय ?

" दरवाजा उघडत का नाहीये ! " निल ने एक कटाक्ष मागे रामचंदच्या ट्रकवर टाकल जेमतेम पन्नास मीटरच अंतर उरल होत.

जीपचे चारही दरवाजे अचानकच जाम झाले होते. सर्वजन दरवाजा खोलायचा प्रयत्न करत होते पन उघडतच नव्हत.

" निल रूफवर बस्स !" मायराने निलने सोपवलेला पेट्रॉलचा केन रस्त्यावर फेकला. नी गर्रकन चावी की हॉलमध्ये घुसवून उजव्या दिशेला फिरवली. धड, धड, धड करत इंजीन पुर्णत जीपला कंपने देत सुरु झाल.

" अंग थांबना, अंग थांबना, अंग थांबना.! " लहान मुलासारखा निल हात पाय हलवत उड्या मारु लागला. मायराने त्याच्याकडे लक्ष न देता फर्स्ट गियर शिफ्ट केल. एक्सीलिटरवर दाब सोडला. व्हील फिरवत गाडी रस्त्याला लागली. निल गाडी सोबत धावु लागला. शायनाने बंद काच खाली केली.

" कमॉन आत ये लवकर !" निलकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता धावता धावताच त्याने जागेवरुनच उडी घेतली नी थेट उघड्या

काचेतुन सापासारखा डोक, मग कंबर, शेवटला पाय..असा निल गाडीत घुसला. मायराने एकापाठोपाठ दोन गियर चढवले होते. नी पुढच्या साईड मिरर मधुन मागे पाहत होती. रामचंदचा ट्रक पुढे पुढे येत होता. काहिवेळा अगोदर मायराने रस्त्यावर फेकलेल्या पेट्रॉल केनमधुन पेट्रोल बाहेर पडत होत. क्रामचंदच्या ट्रकच्या फुटलेल्या टायर्सचा व्हील रस्त्यावरुन घासत पुढे येत होता..आणि त्यामुळेच तो तांबड्या रंगाने तापला जात निखारे उडवत होता. की अचानक रस्त्यावर सांडलेल्या त्या पेट्रोलचा आणि त्या तापलेल्या व्हीलचा एकमेकांना स्पर्श झाला. की त्याचवेळेस रस्त्यावरुन नदी सारख वाकड तिकड सांडत गेलेला तो पेट्रोल पेटलाजात सर्रसर्र करत नागमोडी वळणे घेत केन पाशी पोहचला. केनमध्ये अर्ध पेट्रॉल अद्याप शिल्लक होत.ट्रक वेगाने पुढे आली. आणि त्याचवेळेस ट्रकच्या मधोमध खाली त्या पेट्रॉल केनमध्ये पेटती आग घुसली. रसायनांच आगीशी मिळण झाल, एक विशिष्ट प्रकारचा धाड आवाज होत स्फोट झाला. गाडीच्या खालुन आग वाकड तिकड मार्ग काढत वर आली. एकाचवेळेस सर्वांच्या नजर मागे फिरल्या. कसला आवाज झाला?काय झाल? मागे वळुन पाहतो तर कय? रामचंदचा ट्रक जिवंत प्रेतासारखा जळत होता. ती काळी ट्रक जागेवर थांबुन जळत होती. काचा, बोनेट, रुफ सर्वकाही आगीने आपल्या कचाट्यात घेरुन ठेवल होत.

" ओह माय गॉड! रामचंदची ट्रक फुटली ! म्हंणजे आपन जिंकलो. तो पाताळात धाडला गेला " निल गाडीत जल्लोष साजरा करत म्हंणाला.

" म्हंणजे !" मायराने न समजुन विचारल. तस निलने मार्शलच बोलन तिला ऐकवल.

" ट्रकचा स्फोट होताच तो सैतान पुन्हा पाताळात खेचला जाईल !"

" ओह खरच!" मायरा सुद्धा खुष झाली होती.

" येस!"

" म्हंणजे आपन वाचलो तर !" प्रणया शायना मायरा दोघींनाहा टाळी देत म्हंणाली.

की अचानक एक मोठा इंजीनचा गर्जना केल्यासारखा आवाज उभा आसमंत दणाणून गेला.(घूर्रर्रर्ररर्रर्रर्रर्रर्र ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ)

गाडीत पसरलेल्य आनंदाला दुखाचा फटका बसला.

" यार हे रामचंद मरता क्यु नही!" निल लहानमुलासारख तोंड वाकड करत म्हंणाला. जळती चित्ता चालत यावी तशी ती रामचंदची ट्रक हळू हळू पुढे येऊ लागली. अंगावर आग घेऊन सैतान-मानवाचा पुन्हा एकदा पिच्छा सुरु झाला होता.

" फ़क यु बिच!" मायराने उघड्या काचेतुन मध्यमा मागच्या दिशेने रामचंदला दाखवला. दुस-याने हाताने गियर शिफ्ट केल. व्हील फिरवत गाडी जागेवरशी हल्ली. वेग हवा होता..आता वाचायचे असेल तर वेग हवा होता.

" अंग मायरा आता कसलाही विचार करु नकोस बाई" शायना म्हंणाली.

" म्हंणजे!" जरा त्रासिक सुरातच न समजुन मायरा म्हंणाली. एव्हाना तिने चौथा गियर शिफ्ट केला.

" मी केव्हापासुन पाहतीये ! की गाडी 180 kph च्या स्पीडनेच धावतीये, तु लास्ट गियर शिफ्ट करतच नाहीयेस ? " शायनाच्या ह्या वाक्यावर मायराला आपल्या वडीलांची ती नेहमीची दोनशेच्या स्पीडची अट आठवली. तीच अट मायरा शायनाला सांगणार होती. बाकीचे तिघेही तिच्या तोंडाकडेच पाहत होते. पन तीने ते सांगितल नाही.

उगीचंच कोणि थट्टेवर नेल तर? आणी वेळ ही तशीच होती.

" मायरा ताई मला वाटत की तु लास्ट गियर शिफ्ट करावस, कारण आपल्याला ह्या हायवेवरुन लवकरात लवकर बाहेर पडायचय! हा सैतान आता काही ऐकायचा नाही आपल्याला आता मेलो तर मेलोच. पन तू स्पीड वाढव."

निल म्हंणाला आणि त्याच्या वाक्याला दुजोरा देतच शायना, सोज्व्ल -प्रणया सुद्धा उच्चारली.

" हो मायरा निल अगदी बरोबर बोलतोय! तो सैतान आणि त्याची ट्रक भलतीच ताकदवर आहेत. अमानविय शक्तिने नढलेली आहेत. तो केव्हा कस आपल्याला गाठेल सांगता येत नाही." शायना..

" हो प्लीज वाढव स्पीड ! प्लीज!" सोज्व्ल प्रणया म्हंणाले.

मयरा पुढे मोठ डावपेच निर्माण झाल होत. एकेतर्फी वडीलांना दिलेल वचन दुस-या तर्फे स्व्त:च जीव वाचवण्यासाठी तेच वचन मोडाव लागणार होत. मायराने झपकन डोळे बंद केले. वेळ आली होती. काही गोष्टी, काही वचने तोडण्याची वेळ आली होती. तो बंधन आता तोडायचा होता..कायमचा न कायमचा दुर हिबाळायचा. मायराने आपल्या पित्याला दिलेला वचन तोडायच होत. जिवंत रहायचं असेल. तर हे करावच लागणार होत. काही बांधीळ वचनांनी जर आपल्याला नुक्सान होत असेल किंवा त्या वचनांचा काही फायदा नसेल. तर त्या वचनांना, त्या वायद्यांना काही अर्थ नाही. मायराने खाडकन डोळे उघडले. पुढे विंडोग्लासमधुन जीप पुढचा रस्ता अगदी हळूवारपणे कापताना दिसत होती. नी मागुन तो पेटलेल्या जिवंत चितेसारखा ट्रक भरधाव वेगाने पुढे पुढे येत होता. थरथरणा-या डाव्या हाताने मायराने गियरला स्पर्श केल. नी इतक्या वर्षाचा तो बंधनमय भिंतीचा कवच तोडुन टाकला.

" सॉरी पप्पा! " मायराने अस म्हंणतच लास्ट गियर शिफ्ट केल. गियर खाली विशिष्टप्रकारच्या वायर्स काही आकडे बदलले. नी तो दोनशेचा मार्ग खुला झाला. हवेला कापत जीप चित्यासारखी दौडू लागली. मागची रामचंदची ट्रक मागे पडू लागली. पन अंतर जेमतेम साठ सत्तर इतकच होत. हायवेवर काही छोठमोठे खड्डे होते. त्यातुन जीप अगदी

टून, टून उड्या मारत बाहेर पडत होती. हवेचा विशिष्ट प्रकारचा चापट बसवल्यासारखा सप्प, सप्प आवाज काचेवर आदळत चपराक बसवत होता. निल-शायना दोघेही एकमेकांना जवळ ओढुन बसले होते. प्रणया -सोज्वलवच्या खांद्यावर हात ठेऊन विंडोग्लासमधुन पुढे पाहत होती.

मायराच्या उजव्याबाजुने उघड्या खिडकीबाहेरुन हवा आत येत होती.थंड हवा त्या थंड हवेने सर्वांना हुड़हूडी भरली होती. त्यासहितच उघड्या काचेतुन वाळवंट दिसत होता. जो की हा मनोरंजक मृत्युचा खेळ उभा डोळ्यांनी पाहत होता. वाळवंटात एका सुकलेल्या झाडा जवळुन पुढे ऐंशी-नव्वद मीटर दुरुन एक जीप अगदी सुसाट वेगाने पुढे पुढे जाताना दिसत होती. आणि त्या जीप मागुन एक आगीने ग्रासलेली पेटती ट्रक त्या जीपचा पाठलाग करताना दिसत होती. निल-शायना सोज्वल-प्रणया चौघांनीही डोळे बंद केले होते. हायवेची सीमारेषा किती उशिर झाला..पन मिळत नव्हती. जणु काही सुटका नशीबात लिहीलीच नसावी ! आप-आपल्या जोडीदारासमवेत आयुष्यभर सुखात संसार करण्याचे स्व्पन ह्या चौघांनी पाहिले होते. पन ते आता पूर्ण तरी होणार होते का ? सर्वांच्या मनावर दुखाचा अमळ चढला होता. सकाळच्या नयनरम्य वातावरणाला अगदी दुषीत अंधाराच स्वरुप आल होत.

मायराने ड्राइव्ह करता करता एक कटाक्ष संतोषी मातेच्या मूर्तीवर टाकल. तिच्याही मनात अथ्ंग दुख, गोंधळ चालला होता.

" हे आई !" मायराचा आवाज ऐकुन निल-शायना सोज्व्ल-प्रणया सर्वांनी डोळे उघडले.

" भक्तांना वाचवण्यासाठी तु कधीच मागचा पुढचा विचार करत नाहीस ना माते ? मग आज तुझी ही मुल एका मोठ्या संकटात सापडली आहेत." निल -शायना दोघेही अश्रु गाळत हात जोडून संतोषी मातेच्या मूर्तीकडे पाहत होते. 

" आई तुला तुझी ही लाकडी भक्त आज ह्या कलियूगात हाक देत आहे आहे. राक्षसांचा अंत करणारी तू! भक्तांच्यावर माया ओवाळून टाकणारी तु! तुला मी आवाहन करत आहे आई ! धावुन ये, धावुन ये आई ! भक्तांच्या मदतीला धावून ये. त्या सैतानाचा अंत कर अंत कर !" 

" हो बाप्पा मदत करा !" निल सुद्धा हळकेच पुटपुटला नी त्याचक्षणी त्याला दिसल खुप सारी झाडे आणी झाडांमधुन जाणारा रस्ता बाजूलाच वेलकम सिटी लिहीलेल नाव हॉट.

" हे गाईज ते बघा आपल शहर !" निल मोठ्यानेच ओरडला. नी त्याचक्षणी जीपला एक वेगवान धडक बसली. निल -शायना सोज्वल प्रणया चौघांनीही डोके चोळत मागे वळून पाहिल. आगीने पेटलेली ट्रक नी त्या पेटत्या ट्रकमध्ये ड्राईव्हसीटवर क्रामचंद बसला होता. पुर्णत ट्रक आग लागली होती पण ह्या सैतानाला काहिच फरड पडत नव्हता. ते हिरवट जहरी डोळे अद्यापही ह्या सर्वांवर खिळले होते. खाऊ की गिळु ह्या नजरेने सर्वांकडे पाहत होते.

" मी जाऊ देणार नाही तुम्हाला ! हिहिहिही, हा हाहा हा! नाही जाऊ देणार !" क्रामचंदचा खर्जातला आवाज सर्वांनी ऐकला. नी तेवढ्यात पून्हा ट्रकने जीपला एक धडक दिली.हायवेची एंड सीमा अद्याप एक किलोमीटरवर होती. ट्रकने धडक देताच जीप आणि ट्रकच अंतर वाढत होत.तस धडक देण्यासाठी पेटलेली ट्रक पुन्हा जीप जवळ जवळ स्पीड घेत येत होती. मागुन रामचंदचा हसण्याचा ओरडण्याचा आवाज काळजात चर्रचर्र करत कानांत घुसत होता. 

" मायरा स्पीड वाढव ना !" मागुन निल म्हंणाला. पन मायरा बोलणार तरी काय? गाडी जितक वेग होती तितक्या वेगानेच पळत होती. पन मागे मानविय वेगाला हरवणारा अमानविय वेग होता. त्यासमवेत निभाव लागण असंभव होत.

" हा, हा, हा, हा, हा, हा, !" क्रामचंदचा मोठ्याने हसणारा गडगडाटी अवाज त्याचे ते हिरवट जहरी डोळे आगीतही चमकत होतें

" शेवट ज्वळ आलाय तुमचा ! ह्या हायवेवरुन आजपर्यंत कोणीच वाचु शकला नाहीये ! आणि ह्या पुढेही वाचणार नाहीच ! कधीच नाही." क्रामचंदने आपल्या बलदंड एका हाताने शेवटच गियर शिफ्ट केल.

मागच्या नळीतुन कालसर धुर, नी तो अभद्र हॉर्नचा आवाज सर्वकाही संपल होत. एक धडक बसणार होती. गाडीचा चेंदामेंदा होऊन सर्वजन मरणार होते. सुटकेचा मार्ग फक्त पन्नास मीटरवर येऊन ठेपला होता. वेलकम सीटी फलक दिसला जात. सर्वांनी डोळे बंद केले.

क्रामचंदचा ट्रक पुन्हा वेगाने पुढे येऊ लागला. एक फुटांच्या अंतरावर आला, पुढे एक धडक बसणार होती. पाच निष्पाप जिवांचा बळी जाणार होता. की तोच उभा आसमंत जणू दणाणून उठला. सकाळच्या ढगांमधुन त्यांना बाणाच्या पातिसारखे भेदत, सूर्यदेव पाच काळ्या रंगाचे एयर फाईटर प्लेन्स घों, घों विशिष्ट प्रकारचा आवाज करत उडत आले. आग्निपंख ह्या पाच ही जणांना वाचवण्यासाठी आले होते.. सकाळच्या शुभ सुर्याची किरणे थेट समोरुन अर्ध आकार झाडांमधुन वर वर येताना दिसली जात एक किरण संतोषी मातेच्या डोक्यावर पडली. नी त्याचवेळेस ही पाचही प्लेन्स सुद्धा वेगाने उभा आसमंत दणाणुन सोडत हायवे नंबर 405 मध्ये घुसली. तो आवाज ऐकुन निल-शायना सोज्व्ल प्रणया मायरा सर्वांनी झप, झप करत आपल्या डोळ्यांच्या पापण्या उघडल्या..तआप्रत्येकाच्या नजरेस वर आकाशात पाच काळ्या रंगाचे एयर फाईटर प्लेन्स दिसले.

" माय गॉड मदत आली! मदत आली. मार्शलच्या कंपनीकडून मदत आली." निल मोठ्या खुशीतच ओरडला. मागे क्रामचंदच्या ट्रकचा स्पीड कमी झाला होता. जीप सुसाट वेगात पुढे निघुन गेली. कारण क्रामचंद सुद्धा ते पाच प्लेन्स त्यांच वेग पाहून काहीक्षण भांबावुन गेला होता. 

आकाशात वाकडे तिकडे फिरत, आग्निपंख ज्यांचा ताशी स्पीड दोन हजार kph होत ते इंजीनचा घों, घों आवाज करत उभा आसमंत हादरुन सोडत होते. 

××××××××××××××××××

आग्निपंख एका प्लेनमध्ये छोठीशी चौकोनी स्क्रीन दिसत होती.त्यावर एक सरळ हायवे आणि त्या हायवेवर एक पेटलेली ट्रक, तिच्यापुढे एक आर्मी जीप पळताना दिसत होती.

" टारगेट !" आत बसलेला घोस्टबस्टर कमांडो म्हंणाला.

तसा आजूबाजूला त्याच्या जोडीने आलेल्या प्लेनमधुनच एक आवाज आला.

" टारगेट ती पेटलेली ट्रक दिसतीये ! जस्ट शुट डोंट वेस्ट टाईम."

सूचना मिळाली विषय संपला होता. समोर एक काळ्या रंगाची ऊभी स्टीकसारखी जाडजुड स्टेरिंग होती! त्यावर एक लाल बटन होत..तेच त्या सर्वांनी एकाच वेळेस दाबल. तस प्लेन खालुन एक केनन गणच तोंड बाहेर आल. नी मोटर जशी चालू होण्या अगोदर गोल, भिंगावी तशी वेगाने फिरु लागली. नी एकदाच पाचही प्लेनमधुन एक आवाज धडाड फटाक्यासारख्या आवाज घुमला. नी एका पाठोपाठ पाच जळणा-या तांबड्या ठींणग्या हवेतुन टालांसारखा आवाज करत खाली झेपावल्या. (ठण, ठन, ठन, ठन, ठण )

××××××××××××××××××

" न्हाई! नाही...! मी तुम्हाला अस जाऊ देणार नाही ! क्रामचंद कोणालाच सोडत नाही. " पुढ़ची जीप हायवेची सीमा ओलांडत आहे. हे पाहून क्रामचंद गरजला. त्याचा आवाज ह्या चौघांनी ऐकला होता, तशी सर्वांची नजर मागे वळली. पेटणारी ती आग्निट्रक अगदी हेवन (नरकात) घेऊन जाण्यासाठी आलेल वाहन एकवेळ सर्वांना भासल. पुन्हा एकदा ती ट्रक तिप्पट वेगाने जीप ला धडक देण्यासाठी पुढे सरसावली..की तोच वर आकाशातुन काहीतरी आगीसारख लहानसर ठींणग्यांप्रमाने चमकणार वेगाने खाली येत ट्रकवर आदळल. त्यांचा फट, असा फटाके फुटल्याप्रमाणे आवाज झाला. अंतस्त्राच्या गोळ्या चालुन आल्या होत्या. ज्या अशाच ह्या हैवानाला सोडणार नव्हत्या. त्याच्या चुकीच्या पाश्वी कृत्यांची शिक्षा त्याला देणार होत्या. एक नी एक चुकीच्या शिक्षेची भरपाई होणार होती.वर केननची मोटर चालणीतुन माती गालावी तशी गोळ्यांच्या कव्हर्स हवेतुन खाली फ़ेकत होती. नी अंतस्त्राच्या गोळ्या मुक्त होऊन बाहेर पडत होत्या. पाण्यासारख्या दिसणा-या त्या गोळ्या जश्या कव्हरमधुन बाहेर पड़ायच्या तश्या त्या वर हवेतच पेट घेत होत्या. प्रथम, चंदेरी, दुसरा निळा, नी शेवटला ठींणग्यांप्रमाणे हवेतुन सर, सर सुर मारत क्रामचंदच्या ट्रकवर बरसत होत्या. त्या माराने ती आग विझत होती..बोनेट काचा ताडताड फट फट आवाज करत फुटत होत्या, हलकेच एक गोळी येऊन क्रामचंदच्या छाताड़ात घुसली. गोळीच्या आघाताने त्या क्रामचंदच्या सैतानाच्या चेह-यावरचे ते रागीट भाव काहीसेकंद का असेना वेदनेत बदलले होते.

" आऽऽऽऽहा...आहा....ऽऽऽऽऽ" क्रामचंद भयानक आरोळी ठोकत विव्हळला. क्रामचंदच्या छाताडातुन गोळी लागलेल्या जागेवर एक लहानसर होल तैयार झाल होत. ज्या होलमधुन कालसर रक्त बाहेर पडत होत. क्रामचंदने वर आकाशात पाहिल. ती हिरवट जहरी नजर त्या पाचही प्लेन्सवर रागीट खूनशीपणे स्थिरावली होती.

" मादxxत ! ह्यावेळेस वाचले. पन पुढच्यावेळेऽऽऽऽ" क्रामचंदच्या पुढच्या शब्दांना बाहेर पडण्यासठी पुरेसा वेळ मिळालाच नाही. कारण वरुन आकाशातुन शेकडोने पेटते तांबडे स्फटीक रुपी अंतस्त्राच्या गोळ्या पावसासारख्या टप, टप आवाज करत ट्रकवर आदळल्या होत्या.

" आऽऽऽऽऽऽऽ! आऽऽऽऽऽ" एकापाठोपाठ भयान ओरडणारा क्रामचंदचा आवाज. अंतस्त्राच्या गोळ्यांनी त्यांच्या मारांनी क्रामचंदच्या ट्रकच्या बोनेट, काच खिडक्या, मागचा भाग सर्वकाही एसीड ओतळ्याप्रमाने वितळू लागल होत. निल-शायना सोज्व्ल-प्रणया मायरा हाइवे नंबर 405 ची सीमा ओलांडून सुखरुप बाहेर आले होते. गाडी आता सीमेपल्याड थांबली होती आणि सर्वजन मागे वळून क्रामचंदचा लाव्ह्यासारखावितळणारा ट्रक पाहत हायवे नंबर405 च्या कचाट्यातून सुखरुप बाहेर पडले होते. एका वाईट शक्तिला ह्या पृथ्वितळावर राहण्याचा हक्का नाही ! तिच घर हे पाताळ, तिमिर आहे. हे पुन्हा एकदा निसर्गाने तिचा अंत करुन पटवुन दिल होत. मायराने हलकेच चावी फिरवली. गियर टाकल तस हलकेच मागची लाल लाईट दाखवत गाडी पुढे पुढे जाताना दिसु लागली.

. सोज्व्ल प्रणया दोघांनीही आपल्या ज्वळचे दोन मित्र गमावले होते.तर मायराने आपल्या वडिलांना, निल-शायना दोघांचही एकमेकांवर किती प्रेम आहे हे दोघांनाही कळून चुकल होत. प्रेमाची ताकद ब्रम्हास्त्रापेक्षाही ताकदवर असते हे खर ठरल होत. काहीही असो सफर आंबट गोड झाला होता.

कथेचा अंत ..

 काहीदिवसांनी निल-शायना दोघांचही रीतिरिवाजाने लग्न झाल होत. सोज्व्ल-प्रणया दोघांनीही पुन्हा एकरा कॉलेज सुरु केल होत. आणि चांगल लक्ष देऊन अभ्यास करत होते. मायराला एका ड्राईव्ह स्कूल मध्ये नोकरी लागली होती..आणि त्यात ती खुप खुश ही होती. आणि अशाप्रकारे कथेचा सुखदायक अंत झाला आहे.

 

समाप्त :

......

 

25 वर्षांनंतर...

एक काळ्या रंगाची गाडी भरधाव वेगाने रस्त्यावरुन धावत होती. 

गाडीत एकुन चार स्त्रिया बसल्या होत्या. गाणि, गप्पा गोष्टी करत गाडी पळत होती.

" ए हायवे नंबर चारशे पाच ना ! " रस्त्याबाजुला असलेल्या पाटीवरच नाव वाचत ड्राईव्हसीटवरची तीसच्या आसपास असलेली ती स्त्री म्हंणाली.

" हो ग ! चल !" तिच्या बाजुला बसलेली स्त्री तिची मैत्रिण असावी.

तस तिने गियर चढवल. गाडीने हायवेची वेस ओलांडून आत प्रवेश केला. गाडी सुसाटवेगाने पळत होती. डाव्या उजव्या बाजूला सोनेरी वाळू चमकत होती. गाण्यांच्या भेंडया खेळत गप्पा गोष्टी करत ह्या सर्व स्त्रीया दुस-या शहरात चालल्या होत्या. सर्वजणी आप-आपल्या बोलण्यात गुंग होत्या की तेवढ्यात एक आवाज आला.

" पोंम्मऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"...नी एक काळी ट्रक हळकेच गाडीला ओव्हरटेक करुन पुढे निघुन गेली...

 

हैवान किलर 2....

.........  सैतानाला...अंत नसतो...!

अंग बासुंती... तु माझ्या मनात...बसली आहेस..

तु..माझ्या मनात..बसली आहेस...मनातली..आहेस..���������...

 

समाप्त:...