Dhruvtara: Love's new definition... in Marathi Love Stories by saavi books and stories PDF | ध्रुवतारा : प्रेमाची नवी परिभाषा...

The Author
Featured Books
Categories
Share

ध्रुवतारा : प्रेमाची नवी परिभाषा...






" What??? तू??? ", ती डोळे फाडुन समोरच्याला पाहत होती..

आणि तो!!!

तो सुद्धा!!

" What the hell yaar!!! तू???", त्यानेही जोरात ओरडत वैतागून पण तेवढ्याच गोंधळून विचारले..

" HELL A BIG NO!!! ", आता मात्र दोघेही जोरात ओरडून म्हणाले.. सोबतच!!!

ते मात्र आपल्याच तंद्रीत हेच विसरले होते.. की ते एका कॅफे मध्ये आहेत.. आणि आजुबाजुची लोकं त्यांना अगदी विचित्रपणे पाहत आहेत..

" excuse me madam .. sir .. please हळु बोला ... तुम्ही आजूबाजूच्या कस्टमरला डिस्टर्ब करत आहात!! ", एक वेटर अदबीने म्हणाला..

तसं त्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं..

" यार तुझ्या तर!!! इथे आमच्या आयुष्याचे घोडे लागले आहेत.. आणि तू मला हळु बोलायला लावतो आहेस.. थांब तिथेच!!! नाही तुझी चटणी केली ना.. तर नावाची तारा नाही मी!!! ", ती त्या वेटर वर धावून जाणार तसं तो वेटर घाबरुन पळून गेला.. ती त्याच्या मागे धावणारच होती.. की तिला कमरेत कोणी तरी धरून ठेवले!!

" धृवऽऽऽऽ सोड मला!! आज तर मी सोडणार नाही कोणाला!! ", ती रागात त्या व्यक्तीला म्हणाली..

" यार शट अप तारा!!! हेच.. हेच नाही आवडत मला.. जरा म्हणून मुली प्रमाणे वागत नाही तू.. आणि मला माझ्या आजी आजोबांनी तुझ्याशी माझी bilnd date ठरवली आहे.. ", तो रागवुन वैतागून म्हणाला..

" धृव!! मला पण काही इण्टरेस्ट नाही तुझ्यासोबत डेट वर यायला!! मलाही माझ्या मॉम डॅड ने blind date वर पाठवले आहे.. मला काय माहित की माझा blind date तू आहेस.. what the!!! ", ती पण रागात म्हणाली..

आणि स्वत:ला त्याच्या हातातून सोडवत पुन्हा आपल्या चेयर वर जाउन बसली..

तो मात्र तिला आता एकटक पाहत होता..

" खांद्यावर येणारे केस.. ना चेहर्यावर मेकअप चा लवलेश!! अंगावर कपडेही साधा वाइट टी शर्ट त्यावर साधासा ब्लॅक शर्ट !! हाताच्या स्लिव्स फ़ोल्ड करून ठेवल्या होता.. आणि पँट!! तेही प्लाझो टाइप!!

ना कपाळावर टिकली.. ना ओठांवर लाली!! रंगाने मात्र त्याच्या पेक्षा थोडीच गोरी!!

" कसला नमुना आहे!!! आजी आजोबा पण ना!! ", तो ओठातच पुटपुटला..

" ए.. सांग ना रे.. आता काय करायचं?? आपण कसे एकमेकांशी लग्न करु शकतो?? आपण तर बेस्ट फ्रेंडस् आहोत ना.. ", ती टेन्शन मध्ये येत म्हणाली.. आणि तिच्या हाताची नख्ं कुरतडू लागली..

तसं त्याने पटकन तिच्या हातावर फटका मारला..

" आई ग.. तुझ्या तर हरामखोर!! लागलं ना मला.. मारतोस कशाला रेड्या!! एक फाइट देईन ना.. तर उडवूनच देईन.. ", ती त्याला चवताळून म्हणाली.. तसं त्याने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिलं..

ती मात्र अजुनही खुन्नस देत त्याला पाहत होती..

त्याने सुस्काराच सोडला!!

" तारा ऽऽ grow up !!! लहान नही आहेस आता!! You are already 22!! थोडं तरी आपल्या वयाप्रमाणे वाग!! कधी मोठी होणार??", तो तिला रागावत म्हणाला..

" माझ्या वयावर कशाला येतोस रे तू?? तू तुझं वय बघ आधी.. म्हातारा होत चालला आहेस.. 26 आहेस तू आता.. मग तर काही वर्षात डायरेक्ट आजोबा होशील तू.. ", ती त्याची खिल्ली उडवत फ़िदिफ़िदी हसायला लागली..

त्याने फक्त नकारात मान डोलावली..

" तुझं काहिच होऊ शकत नाही.. काका काकू तुला कसे सहन करत असतील काय माहित.. ",

" ए ध्रुवा ऽऽ मला लेक्चर नको देऊ.. आधी हे जे काही षडयंत्र रचल्ं आहे ना.. माझ्या मॉम डॅडने.. ते आधी क्लियर कर.. मी काय तुझ्याशी लग्न करत नसते!! ", ती दातओठ खात म्हणते..

" मलाही काही हौस नाही तुझ्याशी लग्न करण्यात!! यू आर जस्ट बेस्ट फ्रेंड मटेरियल!! नोट वाइफ!! ", तो बारीक डोळे करून म्हणाला..

पण हे वाक्य मात्र तिला चांगलंच लागलं..

" Not wife material म्हणजे काय हा?? मी काय फक्त बेस्ट फ्रेंड बनू शकते का?? वाइफ नाही??", ती चवताळून म्हणाली..

तसा तो हसायला लागला.. आणि ती गोंधळली..

" वाइफ?? आणि तू?? Joke of the day!!! ", तो अजुनही खदाखदा हसत होता..

" काय कमी आहे माझ्यात??", ती रागाने लालबुंद होत म्हणाली.. तिचा ईगो हर्ट झाला होता..

" कमी?? तुझ्या कडे फक्त बाईचं शरीर आहे.. बाकी वागणं बोलणं तर फूल रावडी मुलांसारख्ं!! आणि गूण तर काही आहे नाही तुझ्यात!! ना तुला मुलींसारखं राहता येतं.. ना वागता येतं.. ना काही काम येत.. मग काय कामाची तू?? ", तो तिला डिचवत म्हणाला..

तशी ती अजुनच तापली!!

" मला एवढा म्हणतोस.. मग तुझ्यात काय गुण आहेत??", ती रागानेच म्हणाली..

" काय गुण नाही आहेत ते विचार.. वेल सेट्ल आहे मी... चांगल्या पगाराची नोकरी करतो आहे.. तेही एका नामांकीत कंपनीत.. एवढं मोठं घर आहे.. घरात नोकर चाकर आहेत.. आजी आजोबांना खुश ठेवत आहे मी.. सगळं काही मी पाहतो आहे.. मग अजुन काय हवे?? आणि हो.. बरयापैकी स्वयंपाकही जमतो मला.. हे तुला वेगळं सांगायची गरज नाही.. तुच माझ्या कुकिंग स्किल ची तारिफ़ डोळे बंद करुन केली आहेस.. ", तो अगदी स्वत:ची स्तुती करत म्हणाला..

तशी ती शांत झाली.. बरोबरच तर बोलत होता तो..

तसं तिने तिचं डोकं खाजवलं..

" ए.. नोकरी तर मी पण करते!! तेही चांगल्या पगाराची.. मग अजुन काय पाहिजे??", तिला आठवलं तसं ती पटकन म्हणाली..

" पण फक्त नोकरी करून काय फायदा?? 22 वर्षाची झालीस.. पण अजुन पण तुला एक बॉयफ्रेंड पटवता आला नाही.. तेही तुला तर तुझ्या घरुन लव मॅरेज साठी परवानगी दिलेली असताना !! लाज वाटली पाहिजे तुला.. Boyfriend - less!! ", तो हसू दाबत म्हणाला..

" यार!! पण मी तरी काय करु?? कोणी माझ्या मागे येतच नाही.. मग मी कशी पटवू??", ती तोंड बारीक करून म्हणाली..

" कोणी मागे येत नाही?? बिनडोक!! मागच्या महिन्यात तीन मुलांनी तुला प्रोपॉझ केले होते.. त्यांना तर बदडून काढलं होतंस.. मग कशाला उगाचच कोणी मागे येइल तुझ्या??", तो आठवण करून देत म्हणाला..


" अरे ते सारखे चॉकलेट आणि ते बाहुले पाठवत होते मला.. मला नाही आवडत सांगितले तरिही.. मग काय करनार?? चोपल एकेकाला धरुन!! माझी काय चूक??", ती खांदे उडवत म्हणाली!! तसं त्याने कपाळावर हात मारून घेतला..

" अगं वेडी!! बाहुले नाही.. टेडी बियर होते ते!! मुलींना किती आवडतात ते.. आणि एक तू आहेस!! ", तो तिला रागवत म्हणाला..

तशी ती शांत बसली..

" आता मला समजलं.. तुला काका काकूंनी love marriage साठी परवानगी का दिली?? कारण त्यांना समजले होते.. की तुझ्यात जे गुण आहेत ना.. ते पाहता तुझं arranged marriage होणे तर फार फार दुर आहे.. बिचारे ते तरी काय करणार??",

" यार ध्रुव!! आता मी काय करू??? लग्न तर करायचं आहे मला.. I don't want to die single!! ", ती रडक्या आवाजात म्हणाली..

" ठीक आहे.. मग आज पासून आपण तुझ्यासाठी नवरा शोधायला सुरुवात करु.. आय ऍम श्योर तू 25 वर्षांची होई पर्यंत एक तरी बकरा मिळेलच.. म्हणजे नवरा मिळेलच!! ", तो ठामपणे म्हणाला.. तशी ती पण खुश झाली..

" thanks buddy!! That's why you are my best friend!! ", ती खुश होत म्हणाली..

" मला सांग तुला कसा नवरा पाहिजे??",

" फक्त तो पुरुष असला पाहिजे.. बस्स!!", ती बत्तीशी दाखवत म्हणाली.. आणि इकडे त्याने टेबलवर आपलं डोकंच आपटल्ं!!




क्रमश:

कमेंट्स नक्की करा...