Hold Up - 20 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 20

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 20




प्रकरण २०
दहा वाजता कोर्ट चालू झालं तेव्हा आधीच्या आठवड्यातल्या घडामोडींचे परिणाम जाणवायला लागले होते.
पाणिनी उठून उभा राहिला. “ माझी कोर्टाला विनंती आहे की जो माणूस साक्षीदार नसेल तर तो या कोर्टात हजर राहणार नाही.
“ आणि ज्या साक्षीदारांच्या साक्षी आधीच होऊन गेल्या आहेत,त्यांचे काय?” आरुष काणेकर, सरकारी वकील म्हणाला.
“ तुम्ही जर खात्री देत असाल की त्या साक्षीदारांना पुन्हा साक्ष देण्यासाठी पाचारण केलं जाणार नाही, तर त्यांनी बसायला हरकत नाही. थोडक्यात साक्ष होऊनही कोर्टात बसणाऱ्याना मी पुन्हा साक्षीला बोलावून देणार नाही.” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे.ज्यांना साक्षीला बोलावले जाणार आहे ते सर्व लोक कोर्टाच्या बाहेरच बसतील.फक्त साक्षी पुरते त्यांना आत बोलवले जाईल.” न्या. एरंडे म्हणाले. “ मागच्या तारखेला मरुशिका मतकरी यांची उलट तपासणी चालू होती.”
“ एक बाब मरुशिका च्या उलट तपासणीत चव्हाटयावर आली होती,मला वाटत ती वकीलांना आणि कोर्टाला गोंधळात टाकणारी होती.त्यातील गोंधळ दूर करण्यासाठी मी कामोद कुमठेकर यांना पुन्हा पिंजऱ्यात बोलावून काही खुलासा घेऊ इच्छितो.”
“ यात बचावाचे वकील काय म्हणतात ते महत्वाचं आहे.” –न्या.एरंडे म्हणाले.
“ आमची काहीही हरकत नाहीये.जास्तीत जास्त वस्तुस्थिती कोर्टा समोर यावी हाच माझाही उद्देश आहे.” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे तर, कामोद कुमठेकर ना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येउद्या.” न्यायाधीश म्हणाले. “ आणखी एक, मरुशिका तुम्ही कोर्टातून बाहेर जा. कुमठेकर यांची साक्ष तुम्ही ऐकणे अपेक्षित नाही.”
“ नक्कीच युवर ऑनर.” मरुशिका म्हणाली आणि कोर्टातून बाहेर पडली.चालताना तिला जाणीव होती की आपल्या कडे कोर्टातल्या सगळ्यांचे लक्ष आहे. कामोद कुमठेकराने पिंजऱ्यात प्रवेश केला.
आरुष काणेकर त्याच्या जवळ गेला. “ मी तुम्हाला दरोड्याचा प्रसंग आठवायला सांगणार आहे.”
“ हो सर.”
“ गाडीचा दरवाजा उघडून जेव्हा आरोपीने तुमच्या डोक्याला बंदूक लावली तेव्हा तुम्ही काय केलंत ते कोर्टाला सांगा. ” –आरुष म्हणाला.
“ मी नुकतीच ओठात सिगारेट ठेवली होती. गाडीतला लायटर काढून हातात घेतला होता.तो पेटला तेव्हा मी तो सिगारेट ला लावायला गेलो त्याच क्षणी आरोपीने माझ्या डोक्याला बंदूक लावली आणि हात वर करा म्हणून दम दिला. मी हात वर केला आणि त्या गडबडीत लायटर माझ्या हातातून निसटून खाली पडला.तेव्हा मला अंदाज आला नाही पण नंतर पाहिलं तर तो सीट वर पडला.या गडबडीत सीट कव्हर ला भोक पडलं.”
“ पुरावा क्रमांक ५ मधे दाखवलेला ? ” हातातला फोटो त्याला दाखवत आरुश काणेकर म्हणाला.
“ हो बरोबर आहे सर.” कामोद म्हणाला.
“ नंतर तू काय केलास?”
“आरोपी आमच्या वस्तू , पैसे घेऊन गेल्यानंतर मी तो लायटर उचलला आणि जाग्यावर ठेवला.”
“थँक्स, मला एवढी एकच गोष्ट स्पष्ट करून घ्यायची होती.”
“ तुमच्या समारोपाच्या भाषणाच्या वेळी बोलण्यासाठी हे राखून ठेवा.” एरंडे म्हणाले.
कुमठेकर पिंजऱ्यातून बाहेर निघाला.
“ एक मिनिट मिस्टर कामोद, मला एखाद दुसरा प्रश्न विचारायचा आहे.” पाणिनी म्हणाला.
“ अगदी काहीही हरकत नाही ! ” काणेकर म्हणाला.जणू काही पाणिनी पटवर्धन ना कोणतीही मोकळीक द्यायला त्यांची तयारी होती.
“ अत्ता तू जी उत्तर दिलीस, त्यांची चर्चा तू कोणाबरोबर तरी केली होतीस आठवड्यापूर्वी?” पाणिनी ने विचारलं.
उत्तर पाठ केलेला प्रश्न परीक्षेत आला तर जो आनंद होतो तसा त्याच्या चेहेऱ्यावर आला.
“ आरुष काणेकरांनी मला सांगितलं की जे प्रत्यक्षात घडलं दरोड्याचे वेळी ते तसच त्याला सांगायचे मी. आणि मी त्यांना ते सांगितलं.”
“ मग शुक्रवारी कोर्टात साक्ष देताना तू हे का नाही सांगितलंस?” पाणिनी ने विचारलं.
“ मला कोणीच विचारलं नाही तसं.”
“ अस तर घडलं नाही ना की काणेकरांनी तुम्हाला सांगितलं की तुमची गाडी चौकात उभी असतांना, काय घडलं याच वर्णन करावंस? ” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ मग तू वर्णन करत सुटलास.... ” पाणिनी म्हणाला.
“ थांबा ! ” आरुष ओरडला. “ अशा प्रकारे साक्षीदाराला हैराण करण्याला माझी हरकत आहे. जर पाणिनी पटवर्धन ना जुने रेकोर्ड आणि साक्षीदाराची आत्ताची उत्तरे यातील विसंगती दाखवायची असेल प्रथम त्यांनी जुने रेकोर्ड दाखवावे आणि विसंगती बद्दल खुलासा करायची संधी त्याला द्यावी.” आरुष काणेकर आपलं बोलणं थांबवून न्यायाधिशांच्या निर्णयाची वाट पहात उभा राहिला.
पाणिनी पटवर्धन हसला. “अशी परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज करून मी आधीच या कोर्टाच्या क्लार्क कडून साक्षीदाराने याच प्रश्नाला पूर्वीच्या साक्षीच्या वेळी काय उत्तर दिलं याची प्रत आधीच माझ्या खिशात तयार ठेवल्ये.”
“ आय ऑब्जेक्ट ! ” आरुष ओरडला. “अशी परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज घेतल्याची बचावाच्या वकिलांनी जी माहीती दिली, याला माझी हरकत आहे.”
“ तुमचा प्रश्न बदलून विचार पटवर्धन.” एरंडे म्हणाले.
“ मिस्टर कुमठेकर, मागच्या शुक्रवारी कोर्टात असं नव्हतं का विचारलं गेलं की तुम्ही चौकात आल्यानंतर काय झालं ते सांगा, आणि तुम्ही त्याच उत्तर खालील प्रमाणे दिल होतं की नाही?” पाणिनी ने विचारलं आणि कुमठेकर ने दिलेल्या उत्तराची चिट्ठी वाचली.


‘चौकात सिग्नल ला आल्यावर मी गाडीचा वेग कमी कमी करत आणला आणि गाडी थांबवली.माझ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीची मी बोलत होतो त्यामुळे मी ज्या बाजूला बसलो होतो त्या खिडकीकडे माझे लक्ष नव्हतं.माझं लक्ष सिग्नल कधी बदलला जाईल या कडे होतं, त्याच वेळी माझ्या बाजूचे दार दाणकन उघडलं गेलं आणि आरोपीने माझ्यावर बंदूक रोखली असल्याचं लक्षात आलं. मला हात वर कर म्हणून धमकावण्यात आलं आणि मी लगेच तसं केलं.आरोपीने लगचेच माझ्या कोटाच्या खिशात हात घालून माझं पाकीट बाहेर काढलं, माझी हिऱ्याची टाय पिन हिसकावून काढली.नंतर माझ्या अंगावरून पुढे वाकून माझ्या बाजूला बसलेल्या सहकाऱ्याची पर्स ओढून घेतली, आणि लाथेने दार बंद केलं. हे सगळं इतक्या वेगात घडलं की काय चाललंय हे समजे पर्यंत सगळा संपलं होतं.’
प्रश्न:-‘नंतर काय झालं?’
उत्तर:- मी अगदी स्पष्ट पणे आरोपीला रस्त्यावरून त्याच्या गाडीच्या दिशेने पळून जाताना पाहिलं.गाडीचं तोंड विरुध्द दिशेला होतं, दिवे लावलेले होते,गाडीचं इंजिन बहुदा चालूच ठेवलं होतं.कारण आरोपी पटकन गाडीत चढला आणि त्याक्षणी गाडी लगेच उडी मारल्या सारखी भरधाव सुटली.’
प्रश्न:- ‘आरोपी चालवत असलेली गाडी बघायची संधी तुम्हाला मिळाली का?’
उत्तर:- ‘मला मिळाली संधी तशी. ती करडया रंगाची गाडी होती, आणि तिची पुढच्या बाजूची जाळी उखडल्या सारखी होती.’

पाणिनी पटवर्धन ने कागद वरची प्रश्न-उत्तरे वाचून कागद खाली ठेवला.
“ तर मग मिस्टर कामोद कुमठेकर, मला सांगा तुम्हाला विचारले गेलेले प्रश्न आणि तुम्ही दिलेली उत्तर अशीच होती ना?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ मग त्यावेळी तुम्ही लायटर ने सिगारेट पेटवल्याचा प्रसंग का वर्णन केलं नाहीत?” पाणिनी ने विचारलं.
“ मी पुन्हा तेच सांगतो की मला कोणी त्या बद्दल विचारलं नाही.”
“ पण तुम्हाला चौकात सिग्नल ला उभे असतांना काय घडलं ते सांगायला सांगितलं होतं की नाही. ”
“ हो ”
“आणि तो तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजला होता?”
“ मला अगदी व्यवस्थित समजला होता. मला विचारलेला प्रश्न,हा दरोड्याच्या संबंधात काय घडलं ते मला विचारण्यात आलेलं होतं. माझ्या हातांनी आणि पायांनी केलेली प्रत्येक कृती मी वर्णन करून सांगणे अपेक्षित नव्हतं. उदाहरणार्थ माझ्या नाकाला कंड आल्यामुळे मी माझ्या उजव्या हाताच्या बोटाने नाक खाजवलं, इतकं सगळं सांगायला हवं होत का?”
कामोद ने अशा काही थाटात उत्तर दिलं की त्याने या प्रश्नाची आधीच रंगीत तालीम केली असावी असं वाटतं होतं. पाणिनी ने आपल्या प्रश्नांचा रोख बदलला.
“ पुरावा क्रमांक ५ म्हणून जो फोटो दाखवण्यात आला होता, तुला, म्हणजे सीट कव्हरला पडलेल्या भोकाच फोटो. त्याच्याकडे मी लक्ष वेधतो तुझं.”
“ ठीक आहे सर.” कामोद म्हणाला.
“ तो फोटो कधी घेतला गेला माहीत आहे?”
“ मला माहीत नाही ते. पोलिसांनी घेतला तो फोटो, पण कधी घेतला ते नाही माहीत.” कामोद ने उत्तर दिलं
“ तू गाडीचा ताबा पोलिसांना दिला होतास?”
“ हो.त्यांनी सुचवलं की त्यावरचे ठसे मिळवावे लागतील. आरोपीचे ठसे त्या दारावर असतील.”
“ कधी दिलीस गाडी त्यांच्या ताब्यात?”
“ दरोडा पडल्या नंतरच्या सकाळी.”
“ ती परत कधी मिळाली तुला ?” पाणिनी ने विचारलं.
“ त्याच दिवशी संध्याकाळी.”
“ तू त्यांच्या ताब्यात गाडी दिलीस तेव्हा सीट कव्हर ला भोक पडलेले होते याची तुला जाणीव होती?”
“ हो.”
“ भोक कधी पडलं ते तुला माहिती आहे?”
“ दरोड्याच्या वेळीच.”
“ त्या आधी नाही नक्की?” पाणिनी ने विचारलं.
“ नक्कीच नाही.” कामोद म्हणाला.
“ खात्री आहे तुझी?”
“ शंभर टक्के.”
“ जेव्हा तू सिगारेट ओढण्यासाठी तुझी सिगारेट केस उघडलीस, तेव्हा तुझ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला पण सिगारेट देऊ केलीस? ”
“ म्हणजे मरुशिका ला?” कामोद ने विचारलं.
“ तुझ्या शेजारणीला?”
“ ती मरुशिका होती.”
“ माझा प्रश्न , ती कोण होती हा नाहीये, तू तिला सिगारेट देऊ केलीस का? हा आहे.”
“ मी...मला ..मी..नाही लक्षात माझ्या.”
“ तसं करणं ही स्वाभाविक घटना आहे. नाही का?”
“ हो बरोबर आहे.” कामोद उत्तरला.
“ ती सिगारेट ओढते का?”
“ हो ओढते.”
“ आश्चर्य आहे.सिगारेट ओढणाऱ्या स्त्रिया फार कमी असतात. पण तुझी शेजारीण सिगारेट ओढते हे माहीत असल्यामुळे तू तिला सिगारेट घेणार का असं विचारणं स्वाभाविकच नाही का?” पाणिनी ने विचारलं.
“ हो अत्ता मला आठवलं, मी तिला दिली होती सिगारेट.” कामोद म्हणाला.
“ आणि तिने घेतली?”
"हो" कामोेद उत्तरला.
आपलं बोट कामोद च्या दिशेने आरोप केल्या सारखे नाचवत पाणिनी पटवर्धन कडाडला, “ मग तू खोट बोलतो आहेस लायटर बद्दल मिस्टर कामोद, तू जर तिला सिगारेट दिली असशील आणि तिने ती घेतली असेल तर स्वतःची सिगारेट पेटवण्या पूर्वी तू तुझ्या हातातला लायटर आधी तिची सिगारेट पेटवण्या साठी धरला असशील कामोद ! ”
( प्रकरण २० समाप्त)