Aghori Sud - 2 in Marathi Horror Stories by Om Mahindre books and stories PDF | अघोरी सूड - भाग २

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

अघोरी सूड - भाग २


थॉमस फार घाबरला होता. त्याने ठरवले कि आता प्रत्येक वेळी शेतावर जाताना आपली शॉटगन बरोबर ठेवायची आणि एखाद्या नोकराला बरोबर घेऊन जायचं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो शॉटगन आणि एका कोडझो नावाच्या नोकराला बरोबर घेऊन शेताची पाहणी करायला गेला. त्या दिवशी सुद्धा त्याला ते डुक्कर दिसले. त्याने लगेच त्याची शॉटगन काढून एक गोळी त्या डुकरावर मारली. थॉमस चा निशाणा अचूक होता तरीपण त्या डुकराला काही झाले नाही. थॉमस ने पटकन गन लोड करून आणखीन एक गोळी झाडली. तरीपण डुकराला काही झाले नाही. बरोबर आलेला नोकर तर पुरता भांबावला होता. थॉमस भयभीत होऊन त्याच्याकडे पाहू लागला. थॉमस ने नोकराला विचारले "कोडझो, तुला या डुक्कराला इथून घालवता येईल का?" तर कोडझो म्हणाला "कोणते डुक्कर मास्टर? मला तर कोणीच दिसत नाही आहे." हे ऐकून थॉमस एक्दम चक्रावलाच. तो पळून जाण्याचा प्रयत्न करायचा तर ते डुक्कर त्याच्या मागोमाग यायचे आणि थांबला कि तसेच थांबून त्याला घाबरवायचा प्रयत्न करायचे. थॉमस ने पुन्हा नोकराला विचारले "हे एवढे मोठे डुक्कर तुला दिसत नाही आहे?". कोडझोने पुन्हा नकारार्थी मन हलवली. थॉमस ने पहिले कि ते डुक्कर फक्त त्याच्याच मागे येत आहे आणि कोडझोला पाहत पण नाही आहे. थॉमस ला वाटले पाळण्याचा प्रयत्न न करता तिथेच उभा राहिलो तर ते जनावर काही करू शकणार नाही. आणि तो तिथेच उभा राहून त्या गुरगुरणाऱ्या डुकरासमोर उभा राहिला. थोडा वेळ डुकराचे गुरगुरणे चालू होते पण थोड्याच वेळात त्या जनावराने थॉमस वर झडप घातली. थॉमस जमिनीवर पाठीवर पडला आणि डुक्कर त्याच्या छातीवर पुढचे दोन पाय ठेवून थोडावेळ डोळ्यात डोळे घालून गुरगुरण्याचा आवाज करत होते. थॉमस च्या डोळ्यासमोर १०-१२ इंचावर त्या डुकराच भयावह तोंड होत. थॉमस भीतीने एकदम गार पडला होता. एव्हाना कोडझो त्याच्याकडे धावत आला आणि ते डुक्कर तिथून निघून गेले. कोडझो थॉमस ला घेऊन गाडीजवळ आला. थॉमस अजूनही भीतीने थरथर कापत होता. कोडझो थॉमस ला घेऊन त्याच्या घरी आला आणि थोडे पाणी प्यायला दिले.
पाणी पिऊन थोडा वेळ झाल्यानंतर थॉमस ला थोडा धीर आला आणि ते बोलू लागले.

थॉमस : कोडझो, तुला ते डुक्कर कसे काय नाही दिसत होते? आणि ते माझ्यावरच आक्रमण का करत होते?
कोडझो : मास्टर, मला ते डुक्कर नाही दिसले, पण हा काय प्रकार आहे हे मला समजले आहे. कोणीतरी तुमच्यावर आमच्या समाजातील काळ्या जादूचा वापर करतो आहे.
थॉमस : पण तू जवळ आल्यावर ते डुक्कर निघून का गेले?
कोडझो : आमच्या समाजामध्ये लहानपणी एक विधी करून आम्हाला अशा शक्तींपासून संरक्षण दिले जाते. कदाचित त्यामुळे मी जवळ आल्यावर ते तिथून निघून गेले.
थॉमस : मला पण असे वाटते आहे कि त्या डुक्कराला मला हळूहळू घाबरवून मारायचे आहे. पण यावर उपाय काय? मी कितीही किंमत मोजायला तयार आहे.

थॉमस ला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता पण त्या विचित्र डुक्कराचा अनुभव आल्याने त्याच्याकडे काही पर्याय नव्हता.

कोडझो : एका माणसाला मी ओळखतो जो हि विद्या जाणतो. तोच तुम्हाला यावर उपाय देऊ शकतो.
थॉमस : आपण आता भेटू शकतो का त्याला.
कोडझो : चला मी तुम्हाला त्याच्या घरी घेऊन जातो.

ते दोघे त्या माणसाच्या घरी जातात. काकू नावाचा तो वयोवृद्ध माणूस थॉमस चे सगळे म्हणणे ऐकून घेतो आणि सांगतो हि नक्कीच वुडूतील एक काळीजादु आहे आणि कोणीतरी तुमचा जुना वैरी आहे त्याने हि केली आहे. काकू सांगतो कि यावर तो उपाय देऊ शकतो पण त्यासाठी बक्कळ पैशाची मागणी करतो. थॉमस ला पैशाची काही कमी नसते तो काकूला पैसे देतो आणि उपाय मागतो. काकू त्या दोघांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोलावतो कारण त्या रात्री त्याला एक विधी करून त्यावर तोडगा तयार करावा लागणार होता.
ठरल्याप्रमाणे, दुसऱ्या दिवशी थॉमस काकू कडे परत जातो. काकू एका बाटली मधून एक काळ्या रंगाचे द्रव्य थॉमस कडे देतो आणि सांगतो कि जेव्हा तो डुक्कर पुन्हा दिसेल तेव्हा हा बाटलीमधून यातील द्रव्य त्याच्यावर टाका.

त्याच दिवशी संध्याकाळी परत थॉमस आणि काडझो शेतावर परत जातात आणि पुन्हा थॉमस ला ते डुक्कर दिसते. यावेळी मात्र थॉमस काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करतो. त्याला माहित होते कि थोडावेळ त्या डुकराकडे पाहत राहिल्यास ते पुन्हा त्याच्यावर आक्रमण करेल. ते डुक्कर कधी आक्रमण करणार याचीच थॉमस वाट पाहत होता. अपेक्षेप्रमाणे ते डुक्कर गुरगुर करत थॉमस वर आक्रमण करते पण यावेळी थॉमस त्याच्या कमरेला अडकवलेली बाटली काढतो आणि त्यातील काळ्या रंगाचे द्रव्य त्या डुकराच्या तोंडावरच फेकतो. ते द्रव्य तोंडावर पडताच ते डुक्कर विचित्र किंचाळते आणि तडफडत जमिनीवर पडते आणि काही वेळातच काळा धूर होऊन हवेत नाहीसे होते. ते पाहून थॉमस थोडा घाबरतो पण त्याला तो उपाय काम केल्याचे समाधान होते.

दुसऱ्या दिवशी थॉमस ला बातमी लागते कि ज्या माम्बो ला त्याने महिन्याभरापूर्वी कामावरून काढून टाकले होते त्याचा मृत्यू झालाय. मृत्यूचे कारण काही समजत नाही पण असे कळते कि त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या छातीवर जळाल्याचे मोठे घाव दिसत होते जणूकाही कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर गरम लावा फेकला होता. थॉमस ला समजले कि तो माम्बोच होता ज्याने ती त्याच्यावर डुकराची काली जादू केली होती आणि माम्बोच डुक्कर बनून त्याच्यावर आक्रमण करायचा.