Bodhkatha - 2 in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | बोधकथा - 2 - दंड न करणे

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

बोधकथा - 2 - दंड न करणे

*सुंदर बोधकथा* २. मच्छिंद्रनाथ माळी छ. संभा-
जी नगर.
" दंड न करणे "
_________________
एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) सरयू नदीच्या तटावर. तीन्ही भावांसह फिरत असता, श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं, "एक गोष्ट विचारु दादा.? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं, ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का.? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला. आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास.?"

यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, "तुला माहित आहे भरता.! एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान और धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पीढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल , तिला दंड कसा बरं देता येईल भरता.?"

यावर भरताचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, "हा तर मोह आहे दादा, आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त्त असायला हवा. तेव्हा दादा तू कृपा करुन मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की, तू माता कैकईला दंड कां नाही दिलास.? असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय."

श्रीराम गंभीर झाले. काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, "हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्त्तिला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे.! माता कैकईनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या (१४) चौदा वर्षांत आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो. पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पति गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख, सन्मान तीनं गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणिवेतून ती कधीच मुक्त्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा. परिवारतील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी आणि सुखी झालेत. पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्या मुळेच (अकारण) माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला."

रामाच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्या,
आणि भरतासह सर्व भाऊ नि:शब्द होऊन गेले.

रामचंद्र पुन्हा सांगू लागले. "आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता.! जर मला वनवास झाला नसता], तर हे जग 'भरत' आणि 'लक्ष्मण' या भावंडांचं अतुल्य भ्रातृ-प्रेम कसं पाहू शकलं असतं.? मी तर केवळ माझ्या माता पित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी १४ वर्षाचा वनवास भोगलात. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं कां.?"

भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. कांहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं.!

राम काही कुठला नारा नाही,
राम एक आचरण आहे,
एक चरित्र आहे,
जीवन जगण्याची एक शैली आहे.

*👣 जय श्रीराम 👣*

सादर : ही कथा मला अतिशय प्रेरक, आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असल्यासारखी वाटली म्हणून प्रेषित करीत आहे. जर आपल्याला ही कथा आवडली आणि पुढे पाठवावीशी वाटली तर जरुर पाठवा.
--------------------------------------------------------