Hold Up - 15 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 15

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 15





प्रकरण १५
पाणिनी ऑफिसला आल्या आल्याच त्याचं काहीतरी बिनसलं असल्याचं सौम्या च्या लक्षात आलं.
“ काय झालं सर?” तिने काळजीने विचारलं.
पाणिनी ने तिला उत्तर द्यायचं टाळलं. अलिप्त पणे, खिशात हात घालून खिडकीतून बाहेर बघत राहिला.ती त्याच्या जवळ आली.त्याच्या हातात आपलं हात घालून हळूवार थोपटत राहिली.
“ कितपत वाईट घडलंय?”
“ फार वाईट.” पाणिनी म्हणाला.
“ मला सांगणार आहात?”
तिला उत्तर न देता पाणिनी येरझऱ्या घालायला लागला.
“ आणखी साक्षीदार?”
“ आणखी.आणि नको असलेले नेमके.” पाणिनी म्हणाला.
“ सर. तुम्ही आहे ती वस्तुस्थिती बदलू शकत नाही, पण अशिलाला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता.”
“ ते सगळ मला माहित्ये.”
“ काय झालंय नेमकं?” –सौम्या
“ होल्ड अप च्या वेळी इनामदार ने वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे.ती चोरीची गाडी होती म्हणजे होल्ड अप च्या आधी साधारण दोन तास ती चोरीला गेली होती.” पाणिनी म्हणाला.
“ एवढंच? ”—सौम्या
“ त्याचं गाडीतून हिमानी दुनाखे चं प्रेत आणण्यात आलं होत आणि त्या मोकळ्या पार्किंग मधे फेकून देण्यात आलं होतं. तिच्या प्रेताचा पोस्ट मार्टम रिपोर्ट असं दाखवतो की तिचा मृत्यू आदल्या रात्री म्हणजे १३ तारखेच्या रात्री उशिरा झालाय. पोलिसांना एक साक्षीदार ही मिळालाय ज्याने गाडी आणि ड्रायव्हर दोघांनाही ओळखलंय.” पाणिनी म्हणाला.
“ बापरे ! कोण चालवत होता? ”
“ सुषेम इनामदार.” पाणिनी म्हणाला.
“ अरे देवा ! ” सौम्या उद्गारली. “ मृदगंधा इनामदार बाहेर आल्ये. तिला सगळं सविस्तर सांगायचं आहे तुम्हाला. काय काय घडलं ते, ती सिया मथुर ला भेटली तेव्हा.”
“ बिचारी मृद्गंधा, तिला जेव्हा हे कळलं असेल, पेपरात वाचून, की तिच्या काकावर पोलिसांचा संशय आहे, एका खून खटल्यात, तेव्हा तिची काय मानसिकअवस्था होईल, कल्पनाच नाही करू शकत.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला खरंच वाटलं की ती, तीच गाडी असेल?” –सौम्या
“ गाड्या सारख्या गाड्या असतात सौम्या. पण मरुशिका आणि कामोद ला पोलिसांनी पढवलं असेल की ती तीच गाडी होती म्हणून ठाम पणे सांगायला. त्यातल्या त्यात मरुशिका गाडी ओळखण्याच्या बाबत जरा साशंक होती पण कामोद मात्र खात्रीशीर पणे सांगत होता की त्या गाडीचा रंग करडा होता आणि पुढची जाळी तुटली होती.मी त्यांची उलट तपासणी घेताना या मुद्यावर त्यावेळी त्याला फारसं छेडलं नाही पण आता मी ते करणार आहे. कारण तो ज्या ठिकाणी गाडी लाऊन उभा होता,तिथून त्याला आरोपीच्या गाडीची पुढची बाजू दिसणे शक्य नव्हतं. एक वेळ मी हे मान्य करेन की मरुशिका आणि कामोद ने आरोपीला ओळखण्यात चूक केली नाही पण होल्ड अप होत असतांना किंवा त्यानंतर आरोपी पळून जात असतांना त्या दोघांनी त्याच्या गाडी कडे एवढे बारकाईने पाहिले असेल हे खरं वाटत नाही.” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर आहे.” सौम्या म्हणाली.
“ पण जेव्हा साक्षीदार म्हणतो की हिमानी दुनाखे चा खुनी हुबेहूब तशीच गाडी चालवत होता, तेव्हा परिस्थितीत मोठंच फरक पडतो. ” पाणिनी म्हणाला.
“ त्या गाडीचा ड्रायव्हर सुषेम इनामदार असल्याचं साक्षीदारचं म्हणणं आहे?” –सौम्या
“ हो. मी जरा वेगळ्या प्रकारे माझं स्पष्टीकरण देतो.” पाणिनी म्हणाला.
“ सांगा सर.”
“ कामोद आणि मरुशिका या दोघांनी आरोपीला ठाम पणे ओळखलं आहे. पण गाडी ची ओळख पटवताना साशंकता आहे.या उलट ज्योतिर्मयी सुखात्मे ने गाडी ठाम पणाने ओळखली आहे पण ड्रायव्हर ला ओळखण्यात साशंकता आहे.दुसऱ्या भाषेत सांगायचं तर मरुशिका आणि कामोद ने गाडी ओळखण्यात चूक केली असेल तर –आणि ती केलीच आहे, तर ज्योतिर्मयी ने सुषेम इनामदार ला ड्रायव्हर म्हणून ओळखण्यात सुध्दा चूक कली आहे. कामोद आणि मरुशिका ने त्याला ड्रायव्हर म्हणून ओळखण्याचा परिणाम तिच्या मनावर आणि मतावर झालाय. ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही कितीही तर्कशुद्ध खुलासा केलात तरी विचित्र घटनांची साखळी आहे ही.” –सौम्या म्हणाली.
“ काहीही झालं तरी मरुशिका जे लपवू इच्छिते आहे आपल्यापासून, ते आपल्याला शोधून काढावेच लागेल. सिया माथूर, जी आपल्याला सहकार्य करायला अनुकूल होती. ती अचानक आपल्या ऑफिस मधून निघून का गेली आणि नाहीशी का झाली? हे हो कळलं पाहिजे.”
“ तुम्हाला काय वाटतंय,दोन बहिणी अस्तित्वात आहेत?” –सौम्या
“ काय करावं तेच सुचत नाहीये सौम्या. जर सुषेम इनामदार या होल्ड अप च्या प्रकरणात दोषी ठरला तर खुनाच्या प्रकरणातून तो वाचणार नाही.या क्षणा पासून त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न सुरु झालाय सौम्या.”
“ आपण मृदगंधा ला आत बोलावू या का? काय आणि कसं सांगूया तिला?” –सौम्या
“ फार तपशीलात नाही सांगायचं तिला. जोर का झटका धीरे से लगे अशा प्रकारे सांगू. येऊदे आत तिला.” पाणिनी म्हणाला.
मृदगंधा ने आत येऊन पाणिनी ला त्या खोलीत काय घडलं, म्हणजे सिया ने झोपेच्या गोळ्या घेतल्या पासून ती अॅम्ब्यूलन्स मधून गेल्या पर्यंतची हकीगत सांगितली. कनक ने पाणिनी ला सांगितलेल्या हकीगती पेक्षा वेगळे किंवा जास्त असे त्यात काही नव्हतं.
“ आम्हाला अजूनही तिला कुठल्या हॉस्पिटलात नेलं ते समजलं नाही.” पाणिनी म्हणाला.
“ आजच्या पेपर मधे काय बातमी आल्ये पटवर्धन, काका एका खुना संदर्भात हवे आहेत पोलिसांना म्हणून?.” मृद्गंधा ने विचारलं.
“ त्यांनी काकाचे नाव घेतलेले नाही थेट,अजून.”
“ काका आणि खून? दरोडा? अहो मी कल्पना सुध्दा नाही करू शकत.काका डास सुध्दा मारत नाही कधी.”
“ हं, ते लक्षात आलंच माझ्या. ” पाणिनी म्हणाला. “ मला वाटतंय दोन मुळी असाव्यात, म्हणजे दोन सिया माथूर. कदाचित दोन बहिणी.सारख्याच दिसायला. म्हणजे आपल्या ऑफिसातून पळून गेलेली आणि मला क्लबात भेटलेली.” पाणिनी म्हणाला.
“ आपण ते शोधून काढू शकणार नाही का?”
“ मी आधीच कनक ला सांगितलंय. त्यासाठी एका स्त्री गुप्त हेर लागेल. पण ती त्याला लगेच मिळत नाहीये. मिळाली की ती सिया च्या घरी जाऊन बहाणा करेल की सिया हॉस्पिटल मधे आहे , तिचे कपडे आणायला मी आली आहे. त्या निमित्ताने तिच्या अपार्टमेंट मधे जाऊन तिथून तिचे ठसे मिळवेल.” पाणिनी म्हणाला.
“ मग कशासाठी थांबलोय आपण? ” मृद्गंधा ने विचारलं.
पाणिनी ने कनक ला फोन लावला. “ कनक, ठसे घेण्याचं साहित्य घेऊन माझ्या केबिन मधे ये.
“ काय करायचं आहे तुला पाणिनी?”
“ एखाद्या वस्तू वरचे ठसे कसे घ्यायचे ते एखाद्याला शिकवायला तुझी हरकत नाही ना?” पाणिनी ने विचारलं.
“ काहीच हरकत नाही.”
“ ये तर मग.”
“ तुम्ही मला विलासपूर ला तिच्या घरी जाऊन ठसे मिळवायचं काम देणार आहात?” मृद्गंधा एकदम खुशीत येऊन म्हणाली.
“ माझ्या डोक्यात आहे तसं. तुझी हरकत नसेल तर.” पाणिनी म्हणाला.
कनक आत आला. त्याने बरोबर ठसे घेण्याची उपकरणे आणली होती. पुढचा पाऊण तास त्याने वेगवेगळ्या वस्तूंवरचे ठसे कसे मिळवायचे याचं प्रात्यक्षिक दिलं. मृद्गंधा ने नीट अभ्यासलं आणि आत्म विश्वासाने पाणिनी ला म्हणाली, “ मी जमवते सगळ बरोबर.” आणि बाहेर पडली.
“ कनक. तिला आपण एकटीला सोडू शकत नाही. मी सियाच्या इमारतीत तुझ्या ज्या माणसाला भेटलो, त्याला तिच्यावर नजर ठेवायला सांग.मृद्गंधा त्या अपार्टमेंटमध्ये जाण्या पूर्वी तिला काहीही धोका असला तर तिला आत जाऊन देऊ नको अस त्याला सांग.” पाणिनी म्हणाला.
“ मी तुला माझी स्त्री हेर उपलब्ध करून देऊ शकलो नाही सॉरी, पाणिनी.”
“ असू दे. मला घाई आहे सोमवारच्या आत सगळ करायची नाहीतर मी सुषेम इनामदार ला होल्ड अप च्या आरोपातून बाहेर नाही काढू शकणार. तो त्यात अडकला तर खुनातही अडकणार.” पाणिनी म्हणाला.
कनक बाहेर पडला. पुढे जवळ जवळ अर्धा तस पाणिनी अस्वस्थ पणे येरझाऱ्या घालत होता.
दार वाजल. “ कोणी आलं असेल तर त्याला बाहेरच घालवून दे सौम्या. मला नाही भेटायचं कुणाला.”
सौम्या ने दार उघडलं. बाहेर चक्क मृद्गंधा उभी होती.हातात कनक ने दिलेली उपकरणे घेऊन.
“ मी लगेच परत आले इथे.” मृद्गंधा म्हणाली.
“ काय झालं? ” पाणिनी ने विचारलं.
“ लॉबी मधे एक वरकरणी निरुपद्रवी दिसणारा माणूस उभा होता.त्याला माझ्यात जास्तच स्वारस्थ्य होतं असं जाणवलं.माझा पाठलाग करायचं त्याच्या मनात होतं.”
“ तू काय केलंस मग? ”
“ मी शेजारीच केमिस्ट कडे गेले, ब्रश, पेस्ट, साबण असं काहीतरी मनाला वाटेल ते घेतलं आणि बॅगेत भरलं, जणू काही त्या साठीच मी बॅग घेतली होती हातात. आणि सरळ इकडे आले.माझा पाठलाग होतोय हे मला कळलंय हे त्याला भासवलंच नाही मी. ” मृद्गंधा म्हणाली.
“ छानच केलंस पण त्यांना समजलंच कसं तू सिया च्या रूम मधे जाते आहेस म्हणून?” पाणिनी म्हणाला
“ मी सकाळी काकाला भेटायला तुरुंगात गेले होते.”
“ तिथूनच त्यांनी तुझ्यावर पाळत ठेवली असणार. या प्रकरणाशी संबंधित सर्वांवरच त्यांची नजर आहे तर ! तुझ्या काकांना ते एक लबाड आणि संशयित म्हणून पाहतायत.पण तू परत आलीस ते बरं केलंस. नाहीतर तुला त्यांनी घरात जाताना पाहिलं असतं तर नसती आफत ओढवून घेतली असती आपण.त्यामुळे काकाच्या केस ला आणखीनच वाईट वळण लागलं असतं.” पाणिनी म्हणाला.
“ आपण काय करायचं आता?” सौम्या ने विचारलं.
“ मी कनक ला सांगितलं होत की तू सिया च्या घरी जाणार आहेस.तुझ्यावर नजर ठेवायला माणूस नेम. आता त्याला सांगायला हवं की आपण आपला प्लान बदललाय. तुम्ही दोघीजणी बाहेर जा. मृद्गंधा तू आधी जा. तो माणूस अजून तुझ्या मागावर आहे का पहा. त्याला चकवून सौम्या च्या घरी जा. सौम्या, तुला नाहीतरी इथे काही काम नाहीये, तू घरी जा. मी मात्र इथे थांबणार आहे, त्या सिया माथूर चा ठाव ठिकाणा लागे पर्यंत. मी आता कनक ला भेटायला जाणार आहे. कामोद चं काही प्रेम प्रकरण आहे का, मरुशिका ची आणखी काही पार्श्वभूमी समजते का याची मला माहिती घ्यायची आहे. पळा तुम्ही दोघी.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १५ समाप्त.)


(वाचक हो आपणास ही कथा आवडत असल्यास आपल्या ओळखीच्या आणखी काही रसिक वाचकांना माझ्या कथा वाचण्यास सांगा. आणि कथेला जास्तीत जास्त समीक्षा द्या)