MANAGERSHIP PART 6 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | मॅनेजरशीप - भाग ६

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

मॅनेजरशीप - भाग ६

मॅनेजरशीप  भाग ६

भाग ५  वरुन पुढे वाचा ........

 

“हॅलो धवन, सुशील बोल रहा हूं. इथे मोठाच घोटाळा झाला आहे.” - सुशील बाबू.

“काय झालं ? इतकं अप्सेट व्हायला काय झालं ?” – धवननी विचारलं.

सुशील बाबूंनी मग दिवसभरात काय काय घडलं त्याचा पाढा वाचला. ऐकल्यावर

धवन विचारात पडला.

“सुशील मुझे जरा सोचने दो. I will call you back.” – धवन

“जलदी सोचो भाई. लक्ष्मी मेटल बंद व्हायची वेळ आली आहे.” – सुशील बाबू. 

“मी फोन करतो.” – धवन 

धवन विचारात पडला. स्क्रॅप मधून tungsten आणि molubdenum परत मिळवणं हे एक चांगलच फायदेशीर काम होतं. आणि windmill hub चे dimensionally rejected ड्रम जर मिळाले नाहीत, तर प्रॉफिट मध्ये खूपच फरक पडला असता. सुशील च्या म्हणण्यानुसार मधुकर जी पावलं उचलतो आहे त्यामुळे रीजेक्शनस खूपच कमी होताहेत आणि जी होतील ती सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत अशी व्यवस्था तो करेल, म्हणजे आपल्या कंपनी ला फारसा फटका बसणार नाही पण सुशील चं मात्र चांगलच नुकसान होणार आहे. या मधुकरचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. पण हा सुशील चा प्रश्न आहे. आपण या भानगडीत पडायचं नाही. इंडस्ट्री कम्यूनिटी मध्ये आपल्या कंपनी चं नाव खराब व्हायला नको. यातून आपण हात काढून घ्यावा हेच बरोबर.

 

तासांभाराने पुन्हा सुशील चा फोन आला.

“काय विचार केला ? काही मार्ग सुचतो आहे का ?” – सुशील बाबू.

“सुशील मुझे ऐसा लगता ही की आपण आत्ता काहीच करू शकत नाही. शांत रहा आणि सिचुएशन कशी turn घेते, ते बघू आणि मगच ठरवू. सध्या wait and watch हीच पॉलिसी ठेवूया. तू चक्रवर्ती आणि बर्डे बद्दल जयंताशी बोलून बघ, कदाचित काही मार्ग निघेल. कमीतकमी आपल्याला हे तर कळेल की परिस्थिति बदलू शकते की नाही ते. मग line of action ठरवता येईल.” – धवन म्हणाला.

“म्हणजे तू आत्ता काहीच करणार नाही तर.” – सुशील बाबू. 

“नाही, आत्ता मी काही करण्यासारख आहे असं मला वाटत नाही. बाय.” – धवन 

सुशील बाबू भयंकर चिडले होते. पण ते धवनला काहीच म्हणू शकत नव्हते.

त्यांनी पुन्हा वकील साहेबांना फोन लावला. आणि त्यांना मधुकरची दिनचर्या काय आहे यांची इत्थंभूत माहिती काढायला सांगितली.

 

***

 

“सर, मी मधुकर सरनाईक, जरा उशीरच झाला आहे पण थोडं बोलायचं होतं.

तुम्हाला वेळ असेल तर बोलू का ?”

“अरे, मधुकर साहेब, I am always available for you. I know if it is not that important, you will not disturb me. बोला काय वार्ता आहे. सकाळी जे काही झालं त्या बद्दलच आहे का ? जयंता पण इथेच आहे. मी स्पीकर वर टाकतो आहे.

मधुकरला जरा बरंच वाटलं, दोघांनाही कळेल की आज काय घडामोडी झाल्यात ते. मग त्यांनी दिवसभरात काय काय घडलं ते अगदी सविस्तर सांगितलं.

 

सगळं ऐकून घेतल्यावर किरीट साहेब म्हणाले की “आता पुढची काय अॅक्शन घेणार आहात तुम्ही.”

“आधी या स्क्रॅप च्या प्रवासाचा end point शोधून काढणार मग ती लिंक कुठे जुळते ते बघणार म्हणजे या सगळ्यांच्या मागे कोण आहे आणि काय उद्देश आहे ते कळेल. त्या नंतर अॅक्शन घेणं सोपं होईल. In the meantime चक्रवर्ती आणि बरड्यांची चौकशी चालू करणार. त्यातूनही काही महत्वाची माहिती मिळू शकेल. अर्थात तुम्ही ओके केलत तरच मी समोर जाऊ शकेन.” – मधुकर.

“दोन मिनिटं होल्ड करा.” किरीट साहेब बोलले.

पांच मिनिटांनंतर फोन वर जयंत साहेबांचा आवाज आला.

“मधुकर साहेब, तुमची line of action आम्हाला बरोबर वाटते आहे. आमच्या कडून ओके आहे. पण पुन्हा एकदा सांगतो की If required, you will have to justify your actions. Only thing is that, just ensure that whatever you do, is in the interest of company.”

“होय साहेब.” – मधुकर. 

दुसऱ्या दिवशी मधुकरने प्रोसेस कंट्रोल आपल्या अधिकारात घेतलं. सातपूत्यांना बरोबर घेऊन प्रत्येक प्रोसेस अत्यंत काळजी पूर्वक तपासायला घेतली. जिथे जिथे बदल आवश्यक होते ते करून final tables तयार केलेत. सर्व प्रॉडक्शन सुपरवायजर्स साठी सूचना लिहून दिल्या. आता रीजेक्शन nil असायला पाहिजे.

त्या दिवशी दुपारी त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून कोणी experienced metallurgical इंजीनियर आहे का ? असेल तर सांग आम्हाला हवा आहे असं सांगितलं. 

मग फिरके साहेबांना फोन करून सांगितलं की गेल्या वर्षभरातले invoices घेऊन या. ते आल्यावर चेक केलेत. हाय स्पीड आणि स्पेशल स्टील चे चार क्लायन्ट होते आणि ब्रेक ड्रम चा एक. एवढं झाल्यावर मधुकर म्हणाला की

“फिरके साहेब, ज्या quantity मध्ये हे dispatches होताहेत, तेवढी फिनिश करण्याची आपली क्षमता नाहीये. मग हे कुठे बाहेर पाठवल्या जातात का ?”

“होय साहेब. लक्ष्मी मेटल मध्ये आपण जॉब वर्क करायला पाठवतो आणि मग तेथूनच पुढे फायनल dispatch होतं.” – फिरके.

“आता बर्डे नाहीयेत मग कोण  बघणार आहे ?” – मधुकर.

“बर्डे हे बघत नाहीत. सचिन बघतो.” – फिरके.

“सचिन म्हणजे अकाऊंटंट ?” – मधुकर. 

“होय साहेब.” – फिरके. 

मधुकरने फोन लावला. आणि सचिनला बोलावून घेतलं.

“सचीन, आपण जॉबवर्क ला जे मटेरियल पाठवतो ते फक्त लक्ष्मी मेटल्स मध्येच

जातं का ? का अजून दुसरीकडे पण जातं ?” – मधुकर.

“फक्त लक्ष्मी मेटल मध्येच साहेब.” – सचिन. 

“ओके जा तू.” – मधुकर. 

“फिरके साहेब,” मधुकरनी विचारलं की “एंड यूजर कडून आपल्याला काही rejections येतात का ?”

“येतात साहेब नेहमीच येतात.” – फिरके. 

“आणि ते आपण स्क्रॅप डीलर कडे पाठवतो ?” – मधुकर.

“होय साहेब.” – फिरके. 

“फिरके साहेब आता एक काम करा, गेल्या वर्षभरातले वापस आलेल्या माटेरियलची

सगळी माहिती गोळा करा. सातपुते साहेबांना घ्या मदतीला. झालं की घेऊन या.

आणि हो स्क्रॅप डीलर कोण आहे ?” – मधुकर.

“लोहाणा स्टील स्क्रॅप म्हणून आहेत त्यांच्याकडेच सर्व स्क्रॅप जातं.” – फिरके. 

“ओके वर्षभरात त्यांच्याकडे जे काही स्क्रॅप गेलं त्यांचे कंप्लीट डिटेल्स मला हवेत.

जमेल ना  ?” – मधुकर.

“हो साहेब.” – फिरके. 

“ठीक, या तुम्ही.” – मधुकर.

एव्हाना बराच उशीर झाला होता म्हणून माधुकरने सगळं आवरलं आणि घरी जायला निघाला.

 

दुसऱ्या दिवशी सातपुते आणि फिरके त्यांची वाटच बघत होते. सर्व डिटेल्स च्या शीट त्यांच्या समोर होत्या आणि त्या बद्दलच ते बोलत होते. थोडं इकडच तिकडचं बोलणं झाल्यावर मधुकर म्हणाला की

“फिरके हा स्वामिनाथन कसा  माणूस आहे ? या माणसावर आपण विश्वास ठेऊ शकतो का ?” – मधुकर.

“हो साहेब क्लीन माणूस आहे. अबोल आहे, त्याचं जे काम आहे ते तो चोख करतो आहे. सुशील बाबू त्यांच्या वाटेला फारसे जात नाहीत. त्यांनी एकदाच सुशील बाबूंना सुनावलं होतं की कुठलंही, कायद्यात न बसणार काम ते करणार नाहीत म्हणून. . मोठ्या देसाई साहेबांनी त्यांची हुशारी आणि प्रामाणिक पणा  पाहूनच त्याला इथे आणलं होतं. त्यामुळे त्याला हात लावण्याची सुशीलबाबूंना हिम्मत झाली नाही.” फिरके साहेबांनी स्वामी बद्दलची माहिती दिली.

“ओके म्हणजे आपण त्यांच्याशी बोलू शकतो..” – मधुकर. 

“हो साहेब.” – सातपुते. 

माधुकरने फोन करून त्याला बोलावून घेतलं.

“स्वामिनाथन साहेब, आपल्या कंपनीची आर्थिक स्थिति ही गेल्या दोन तीन वर्षांपासून हळूहळू ढासळते आहे हे खरं आहे का ?” – मधुकर.

“हो साहेब.” – स्वामी. 

“मग याचं अनॅलिसिस केलं का ? कोण कोणते फॅक्टर्स आहेत की ज्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे सांगू शकाल का ?” – मधुकर.

फिरके आणि सातपुते मधुकर कडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. त्यांना कळेना की मटेरियल च्या डिसकशन मध्ये आर्थिक स्थिति बद्दल मधुकर का विचारतो आहे. पण त्यांनी गप्प बसण्यात शहाणपणा आहे अस ठरवून पुढे काय होतं ते बघत बसले.

“हो साहेब, मी आणि फिरके साहेब दोघांनी यावर बराच वेळ खर्ची घातला आहे. आणि निष्कर्ष पण काढलेत.” – स्वामी. 

“मग ते कोणाला दाखवले ?” – मधुकर.

“सुशील बाबूंना प्रिंट आउट काढून दिले होते आणि सांगितलं पण होतं.”- स्वामी. 

“मग ?” – मधुकर.

“ते म्हणाले की ते किरीट आणि जयंत साहेबांशी बोलतील, आणि यावर ते corrective action घेतील म्हणून. पण तसं काही झालेलं दिसत नाहीये.” – स्वामी.

“फिरके तुम्ही याबद्दल किरीट साहेबांशी काही बोलला का ?” – मधुकर.

“हो साहेब, ते म्हणाले की यावर उपाय सापडला आहे. काळजी करू नका. लवकरच सर्व ठीक होईल.” – फिरके. 

“ओके. ते जे काय निष्कर्ष असतील ते जरा सांगता का ?” – मधुकर.

 

“साहेब,” स्वामिने बोलायला सुरवात केली. 

“नंबर 1

Rejections पार्टी ने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने दोन पार्ट्या आपल्या कडून माल घेत नाही. हा एक मोठा सेट बॅक बसला आहे.”

“नंबर 2

पार्टी कडून माल वापस येण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. वापस आलेला माल स्क्रॅप च्या भावाने विकला जातो आहे. वरतून ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुन्हा तो माल बनवावा लागतो. आणि त्यांच्यातही काही प्रमाणात वापस येतो. या सगळ्यात कंपनीच आतोनात  नुकसान होतं आहे. डबल प्रॉडक्शन घेण्यात वेळ आणि लेबर वाया जातंय ते वेगळंच. खूप नुकसान होतेय साहेब.”

“मला जरा वेगळाच संशय येतो आहे. म्हणजे आत्ता पक्क सांगता येणार नाही. क्रॉस चेक केल्यावरच सर्व गोष्टी उघड होतील. सातपुते साहेब, आपण जे मटेरियल

स्क्रॅप म्हणून पाठवतो, त्यांचे हीट नंबर्स रेकॉर्ड करून ठेवतो का ?” – मधुकर.

“हो साहेब. तो सगळा रेकॉर्ड आहे माझ्याकडे.” – सातपुते. 

“आता जे मटेरियल वापस येतं त्याचं केमिकल कोंपोझिशन चेक करता का आणि रेकॉर्ड ठेवता का ?” – मधुकर.

“हो साहेब.” – सातपुते. 

“मग आता एक काम करा, जरा किचकट आहे पण करा. स्क्रॅप मटेरियल च्या हीट नंबर वरुन त्याची केमिस्ट्रि काढा. आणि वापस आलेल्या मटेरियल शी मॅच करून घ्या. हीट नंबर्स वेगवेगळे असतील पण केमिस्ट्रि will speak the truth. काही लक्षात येतेय का ?” – मधुकरने सांगितलं.

“होय साहेब, बापरे, हे जर असं असेल तर हे बरंच मोठं अतिशय हुषारीने केलेलं कारस्थान असेल. My god.” – सातपुते.

“माझ्या मते हे असच असण्याची शक्यता बरीच आहे. तेंव्हा आता आपल्याला सांभाळूनच पुढची पावलं उचलायची आहेत. तुम्ही सगळे तयार आहात न ?”

“होय साहेब. सगळेच एकसुरात  बोलले.”

“ठीक तर मग.” मधुकरनी फायनल सांगितलं. “शक्यतो आजच गेल्या वर्षभरातले आकडे तयार करून या म्हणजे आपल्याला काही महत्वाचे निर्णय घेता येतील. आणि हो तुम्ही कसल्या कामात गुंतले आहात हे कोणालाही कळू देऊ नका. भिंतीला कान असतात हे लक्षात घ्या.”

“ठीक आहे साहेब.”  आणि मीटिंग संपली.

 

क्रमश:............

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com