Hold Up - 5 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 5

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 5



होल्ड अप
प्रकरण ५
कनक बरोबर पाणिनी आपल्या ऑफिसला आला तेव्हा सौम्या टपाल आणि मेल चाळत होती.
“ सिया माथूर ने कशी साथ दिली?” तिने पाणिनी ला आल्या आल्या विचारलं.
“ खास नाही.” पाणिनी म्हणाला.
“ असं कसं?” –सौम्या
“ ती पळाली.”
“ काय ! ” सौम्या उद्गारली.
“ खरचं”
“ मला जरा सविस्तर सांगा ना.”-सौम्या
“ मला वाटत काहीतरी कारस्थान होत यात.” पाणिनी म्हणाला.
“ मला समजत नाहीसं झालंय.प्रवासात माझ्या बरोबरच होती ती.चांगली तयारीची आणि बिनधास्त वाटत होती.” कनक म्हणाला.
“ सर,तुम्ही तिच्याशी बोलला होतात का?”-सौम्या
“ नाही. तशी संधीच नाही मिळाली.कोर्ट चालू होई पर्यंत ती आली नव्हती.कनक ला मी सांगून ठेवलं होतं की तिला आपल्या लायब्ररी रूम मधी बसव.म्हणून मला कनक ने जेव्हा अंगठा दाखवून खूण केली तेव्हा मी समजलो की सर्व अलबेल आहे.म्हणून मी माझा हुकुमी एक्का टाकायचं ठरवलं, कनक ला, सांगितलं की तिला आपल्या ऑफिसातून घेऊन ये.पण जेव्हा कनक बरोबर ती मला दारात दिसली नाही आणि कनक ने मान हलवून नाही म्हणून खूण केली तेव्हा मी हादरलोच. ” पाणिनी म्हणाला.
“ पण, सौम्या, तो धक्का पचवून सुध्दा पाणिनी ने त्या बाईची जी उलट सुलट घेतल्ये त्याला तोड नाही.” कनक म्हणाला.
“ काय सांगतोस !” सौम्या कौतुकाने उद्गारली.
“ पाणिनी सांग ना तिला.”
“ कामोद च्या गाडीच्या सीट कव्हर वर एक भोक पडलेले होते.काहीतरी जळल्यावर डाग पडावा तसे.मी मरुशिका ला त्या बद्दल प्रश्न विचारले आणि तिच्या मनावर ठसवलं की डाका टाकताना त्या माणसाने कामोद ला हात वर करायला लावले तेव्हा त्याच्या हातातला पेटलेला सिगारेट लायटर खाली पडला असावा आणि त्यामुळे सीट कव्हर जळले असावे. ”
“ मला ती सिया कुठे गायब झाली हा प्रश्न चैन पडू देत नाहीये.तू मला जेव्हा तिला शोधायला सांगितलस ना प्रथम, तेव्हा तिला शोधण तसं सोपं नाही गेलं पण एकदा ती सापडली तेव्हा ती आपल्याला मदत करायला खूप उत्सुक वाटली.तिने लगेच इथे यायची तयारी सुध्दा दाखवली.ती आली.मी स्वतः तिला घेऊन आलो ,इथे लायब्ररी मधे बसवलं. तिला पुस्तकं दिली वाचायला. कोणी तिला पाहिलं असतं तर त्याला वाटलं असतं की पाणिनी कडे एखादी नवशिकी वकील आल्ये, पुस्तकातले मुद्दे काढायला. मी तिला सांगितलं की आज संध्याकाळ पर्यंत पाणिनी तुला कदाचित कोर्टात बोलावतील.ती हो म्हणाली होती.”—कनक
“ आणि तू तिला घ्यायला आलास तेव्हा ती इथे नव्हती?” –सौम्या
“ हो ना.”
“ काय झालं असावं असं वाटतंय?”-सौम्या
“ काहीच नाही सांगता येत.” कनक
“ केस वर काय परिणाम होईल याचा?”—सौम्या
“ काय माहीत? पाणिनी वर अवलंबून आहे ते.” –कनक
“ मी कोर्टातून परतताना मात्र समाधानकारक उलट तपासणी झाल्याच्या आनंदात परत आलोय.” पाणिनी पटवर्धन म्हणाला.
“ समाधान? काय पाणिनी ! लायटर चा मुद्दा सोडला तर रूटीन प्रश्न विचारून तू तिला जरा काचात पकडलस एवढंच.नेमकं काय घडलं असावं असा तुझा अंदाज आहे पाणिनी?”
“ होल्ड अप च्या घटनेत मरुशिका त्या गाडीत नसावीच असा माझा अंदाज आहे.” पाणिनी म्हणाला.
“ काय ! ” कनक ओजस ओरडला. “ म्हणजे? सिया माथूर च्या गाडीत ? ”
“ नाही. कामोद च्या गाडीत नसावी.” पाणिनी म्हणाला.
“ ओह ! पण ती असणार रे. तू काहीतरी काल्पनिक चित्र निर्माण करतो आहेस.”
“मला वाटतंय की कामोद च्या गाडीत वेगळीच बाई असावी. ” विचार करत पाणिनी म्हणाला. “ अशी बाई की जी त्याच्या बरोबर असणे त्याला परवडणारे नव्हते. तो पोलिसांना फोन करायला गेला, त्या आधी त्याने व्हिला नंबर दोन ला मरुशिका ला फोन केलं असावा आणि तिला सांगितलं असावं की तो खूप अडचणीत आहे.तिने अत्ता इथे येऊन ती त्याच्या बरोबर गाडीत असल्याचे नाटकं तिने करावे. हा फोन झाल्यावर त्याने पोलिसांना फोन केलं असावा आणि ते येई पर्यंत त्याने गाडीत बसलेल्या बाई ची व्यवस्था लावली असावी.” पाणिनी म्हणाला.
“ काय तर्क शास्त्र लावता हो तुम्ही उलट तपासणी घेताना ! ” सौम्या कौतुकाने म्हणाली.
पाणिनी हसला.
“ उत्तर दे.” कनक म्हणाला.
“ जी पद्धत साक्षीदाराला अपेक्षित असेल ती कधीही वापरू नये. हे तत्व.” पाणिनी म्हणाला.
“ ही बाई प्रचंड हुशार आहे.भरभर विचार करणारी आहे. संधी मिळेल तेव्हा माझ्यावरच डाव उलटवेल अशी पाताळयंत्री आहे.आकर्षक आहे.माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरातून माझ्या अशीलावर चिखलफेक होईल अशी तिने उत्तरं दिल्येत.”
“ पण आपल्या अशीलावर का एवढा राग असावा तिचा?” –कनक
“ आपल्या अशीलावर राग नव्हता तिचा कनक.”
“ मला वाटलं तुझं म्हणणं तसंच आहे.”
“ तिचा राग माझ्यावर होता, आहे. मी तिची उलट तपासणी थांबवावी असंच तिचा प्रयत्न आहे.” पाणिनी म्हणाला.
“ कारण काय पण?” –सौम्या
“ कारण तिच्या मधे काहीतरी कच्चा दुवा आहे. माझी तपासणी जेवढी लांबेल तेवढं तिला टेन्शन वाढेल म्हणून माझं खच्चीकरण करून मी तपासणी बंद करावी असा तिचा प्रयत्न आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ काय कच्चा दुवा आहे की ती कोर्टा समोर आणू इच्छित नाही?”
“ जो माझा अंदाज आहे तोच.की ती त्या दिवशी ती कामोद बरोबर त्याच्या गाडीत नव्हतीच. त्याच्या बरोबर गाडीत जी खरी बाई होती,तिला मरुशिका संरक्षण द्यायचा प्रयत्न करत्ये.” पाणिनी म्हणाला.
“ आणि, तू तिला अडकवालंस ! ” –कनक
“ मी तिला घाबरवलंय. उलट तपासणीचं पाहिलं तत्व आहे की सुरुवातीला तुम्ही सहजतेने संवाद सुरु करायचा आणि जे मुद्दे साक्षीदाराने अपेक्षित केलेले नसतात, अशा लहान सहान मुद्द्यावर सुरुवात करायची. म्हणजे साक्षीदाराने आपल्याला हवी असलेली उत्तरे दिली नाहीत तरी आपल्या केस वर वाईट परिणाम होत नाही. पण आपण मात्र साक्षीदाराच्या विधानातील विसंगती शोधून हवं तेव्हा त्याच्यावर हल्ला करू शकतो.”
“ म्हणजे सर, या पद्धतीमध्ये तुम्हाला गमवावं काहीच लागत नाही, झाला तर फायदाच होतो?”-सौम्या ने उत्सुकतेने विचारलं.
“ हो.बरोबर. सौम्या, माणसाची स्मरण शक्ती ही विचित्र गोष्ट असते.जेव्हा माणूस एखादा खून किंवा डाका म्हणजे होल्ड अप होताना बघतो ना तेव्हा त्या प्रसंगामधील मुख्य घटना तो नंतर दिवस भरात हजारो वेळा मनात आठवत बसतो.पण त्या महत्वाच्या घटना एकमेकांना जोडणाऱ्या प्रसंगांकडे त्याच फारसं लक्ष जात नाही.म्हणजे ते प्रसंग आठवत नाहीत त्याला, किंवा ते आठवायचा तो फार विचार करत नाही.” पाणिनी म्हणाला.
सौम्या आणि कनक मुग्ध होवून पाणिनी काय बोलतोय ते ऐकत होते.
“ उदाहरणार्थ, कनक, एखाद्याला गोळी मारताना साक्षीदाराने पाहिलं असेल तर खुनी माणसाने हातात रिव्होल्वर घेतल्याचं त्याला चांगलं दिसलेलं असतं, आठवणीत असतं. गोळी लागलेला माणूस खाली पडल्याचं त्याच्या स्मृतीत कोरलं गेलेलं असतं, पण खुनी माणसाने घातलेली पँट कोणत्या रंगाची होती, तेव्हा बाजूला कोणती गाडी होती, असा तपशील त्याच्या लक्षात रहात नाही.मग तो त्याबद्दल प्रश्न विचारले गेले तर स्वतःची तर्क संगती लावून काय घडलं असावं याचा अंदाज बांधतो आणि तेच घडलं असं सांगून मोकळा होतो. प्रत्यक्षात तसं अजिबात घडलेलं नसून सुध्दा. ” पाणिनी म्हणाला.
“ पण मरुशिका च्या बाबत तशी स्थिती नव्हती?” सौम्या ने विचारलं.
“ नव्हती. मी तिला जोखण्यात कमी पडलो. सुरुवातीला तरी. मी पहिल्यापासूनच कुशलतेने प्रश्न विचारत गेलो असतो तर तिला आधीच मी सापळ्यात पकडलं असतं. ” पाणिनी म्हणाला.
“ तुला जो संशय आहे, ती गाडीत नसल्याचा, याचा तिला अंदाज आलाय?” –कनक
“ मला वाटतंय की तिला आला असावा. हुशार आहे ती.”
“ मला एक सांग पाणिनी, तुझ्याकडे मुळात ही केस आलीच कशी पण?”
“ मी दुसऱ्या केस साठी कोर्टात होतो तेव्हाच या माणसाला होल्ड अप च्या आरोपा वरून कोर्टात आणले होते. ”
न्यायाधीशांनी त्याला त्याचा वकील कुठे आहे म्हणून विचारलं तेव्हा तो म्हणाला माझ्याकडे वकीलाला द्यायला पैसे नाहीयेत. मी गुन्हा केलाच नाही तर मला वकिलाची गरजच काय? तेव्हा न्यायाधीशांनी त्याला सांगितलं की तुला शक्य नसेल तर तुझ्या वतीने कोर्ट नेमेल वकील. मी तिथेच होतो म्हणून मला विचारलं त्यांनी. मला तो माणूस सच्चा वाटला. मी हो म्हणालो, वकीली घ्यायला.”
“ त्याला गुन्हेगार म्हणून पार्श्वभूमी आहे?”—कनक
“ नाही.उलट त्याचं रेकोर्ड साफ आहे. नोकरी तून निवृत्त होवून जीवन जगणारा माणूस आहे तो.पन्नास –बावन्न वय असेल.”
“ वयाच्या मनाने लौकर निवृत्त झालाय नाही का?”
“ खरं आहे पण तो सेल्स मन म्हणून खाजगी कंपनीत कामाला होता.फार चांगली स्थिती नव्हती आर्थिक दृष्टीने.पूरग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या एका चाळीत राहायचा.त्याला मध्यंतरी अपघात झाला आणि तो शारीरिक दृष्टया सुध्दा विकलांग झाला. त्याच्या घर शेजारीच कचरा डेपो होता,तिथे कचरा ने आण करणाऱ्या एका ट्रक मधून त्याला एक लेडीज पर्स आणि पुरुषाच पाकीट पडलेल दिसलं.त्याने पोलिसांना कळवलं.त्या कामोद आणि मरुशिका च्या वस्तू निघाल्या. पोलीस त्या माणसाशीशी बोलले आणि त्याला चौकीत घेऊन गेले. ” पाणिनी म्हणाला.
“ आणि तू मला कुठे कुठे जाऊन त्या सिया माथूर चा शोध घ्यायला लावलास, स्वतःचे पैसे खर्च करून ! ज्यातून तुला काहीही फी मिळणार नाही.”
मी एकदा केस घेतली की पूर्ण पणे झोकून काम करतो. चांगल्या वकिलाने फी चा विचार करून प्रकरण घ्यायचे नसते.” पाणिनी म्हणाला. “ तर मग कनक, तुझ्या हातावर तुरी देऊन निसटलेल्या सिया माथूर च्या मागे लाग आता.तुला आता ती माहिती आहे, तिचे फोटो आहे तुझ्याजवळ. हवी तेवढी माणसे कामाला लाव.”
“ फार खर्चिक आहे हे.”—कनक
“ तुला विचारलंय का मी खर्च किती येईल ते? तुला सर्व अधिकार आहेत.मला सोमवारी कोर्ट सुरु व्हायच्या आधी ती इथे हजर पाहिजे.” पाणिनी म्हणाला.
(प्रकरण ५ समाप्त)