Hold Up - 3 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 3

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 3


होल्ड अप
प्रकरण ३
“ प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, उत्तरादाखल तुम्ही मला प्रति प्रश्न नका विचारू.” पाणिनी कडाडला.
“ हो.” साक्षीदार म्हणाली.
“ आणि तुम्हाला हे माहीत होतं की ओळख परेड च्या रांगेत, जे वेगवेगळे लोक असतील त्यात आरोपी असणार?”
“ हो.”-मरुशिका
“ आणि आरोपीला तुम्ही फोटो वरून आधीच ओळखलं होतं?”
“ होय.”
“ ज्यावेळी मिस्टर कामोद यांनी तुम्हाला आरोपीचा फोटो दिला, त्यावेळी त्यांनी तुम्हाला आरोपी शिवाय इतरही काही माणसांचे फोटो दिले का? आणि असं विचारलं का, की या पैकी कोणत्या माणसाने होल्ड अप केला असं वाटतंय? ”-- पाणिनी म्हणाला.
“ नाही, असं नाही केलं त्याने. तो म्हणाला, मरुशिका, आपला होल्ड अप करणारा माणूस पोलिसांना मिळालाय.आपले पैसे नाही मिळाले त्यांना, पण माणूस मिळाला.हा पहा त्याचा फोटो.”.- मरुशिका म्हणाली.
“ पहिल्यांदा त्याने, तुम्हाला सांगितलं की हा होल्ड अप करणारा माणूस आहे.आणि नंतर त्याने विचारलं की जरा बघून घे, हाच आहे ना तो, बरोबर ना?” पाणिनी ने विचारलं.
“त्याने विचारलं मला.”
“ नंतर पोलिसाने तुम्हाला विचारलं की ओळख परेड च्या रांगेतून तुम्ही आरोपीला ओळखू शकाल असं तुम्हाला वाटतंय ना? ” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ आणि तुम्ही त्याला काय सांगितलं?”
“ मी त्याला खात्री दिली.”
“ ही खात्री देताना तुमच्या जवळ तो फोटोग्राफ होता?”- पाणिनी ने विचारलं.
“ नाही. तो मी त्यांना परत दिला होता. ”- मरुशिका
“ त्यांना म्हणजे पोलिसांना की कामोद यांना?” पाणिनी ने विचारलं.
“ पोलिसांना.” – मरुशिका.
“ नंतर जेव्हा तो पोलीस म्हणाला, की तुम्हाला चौकीत जाऊन ओळख परेड मधे आरोपीला ओळखायचंय, तेव्हा तुम्ही तो फोटो पुन्हा एकदा पाहिलात?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ का?” – पाणिनी
“ मला खात्री करायची होती.”
“ कशाची?”
“ तोच माणूस आहे ना याची.”-मरुशिका
“ म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा फोटो पाहिलात, तेव्हा खात्री नव्हती?”—पाणिनी
“ होती, नक्कीच.”
“ पण अत्ताच तुम्ही म्हणालात की खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा फोटो पाहिलात म्हणून.”—पाणिनी
“ म्हणजे मी त्याला रांगेतल्या माणसातून वेगळा ओळखू शकीन याची खात्री करण्यासाठी पुन्हा फोटो पहिला असं म्हणायचं होतं मला. ”
“ म्हणजे तुम्ही त्याला रांगेतून ओळखणार होतात,ते डाका पडल्याच्या वेळेला तुम्ही पाहिलेल्या आठवणीच्या आधारावर नाही,तर फोटोशी तुलना करून ! ”—पाणिनी
“ दोन्ही च्या आधारे.”-मरुशिका
पाणिनी ने पुन्हा घड्याळ बघितलं.
“ तुम्ही पुन्हा का बघितलात फोटो? ”
“ ओह ! युअर ऑनर ! आमचं ऑब्जेक्शन आहे याला. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला जातोय आणि वेळ वाया घालवला जातोय.” आरुष काणेकर उभा रहात म्हणाला.
“ सस्टेंड” न्या.एरंडे म्हणाले. “ हा प्रश्न विचारला गेलाय, उत्तर ही देऊन झालंय. पुढचे प्रश्न विचारा पटवर्धन.”
“ मी आता तुम्हाला दोन-तीनच प्रश्न विचारणार आहे, डाका पडला त्या वेळी काय घडलं या संदर्भात.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही तुमच्या व्हिला नंबर दोन कडे जात होतात तेव्हा?”
“ हो”
“ तुम्ही तेव्हा कोणता ड्रेस घातला होतात?”—पाणिनी
“ अत्ता मी जो अंगात घातलाय,तोच त्या दिवशीही होता.” –मरुशिका
“ आणि मला वाटत, तुमच्या कडे अत्ता जी पर्स आहे,तीच त्या दिवशी होती?”
“ हो.” मरुशिका म्हणाली. नंतर तिने पटकन आपली जीभ चावली.
“ सॉरी, पटवर्धन, ही नव्हती ती पर्स.कारण माझी पर्स तर त्याने पळवली होती ना ! ” तिने उत्तर बदलून सावरण्याचा प्रयत्न केला.
“ होल्ड अप चा प्रसंग चांगला लक्षात आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ चांगलाच.”
“ मिस्टर कुमठेकर हा तुमचा जुना स्नेही आहे? ”
“ बऱ्यापैकी जुना आहे. ”
“ तो सिगारेट ओढतो?”
“ हो. ”
“ डाका पडला त्या वेळी तो सिगारेट्स ओढत होता?” पाणिनी ने विचारलं.
“ मला जरा आठवून बघू दे.” आपली दोन बोटं हनुवटी वर चोळत ती म्हणाली.
“ ज्यावेळी मिस्टर कामोद ने आपली गाडी चौकात सिग्नल ला थांबवली हती तेव्हा त्याने ओठात सिगारेट ठेवली होती आणि गाडीच्या लायटर पाशी झुकून ती पेटवत असतानाच डाका घालणारा माणूस त्याच्या दारापाशी आला त्यामुळेच त्या माणसाने दार उघडे पर्यंत तो तुम्हाला दिसलाच नाही, हे बरोबर आहे की नाही मी म्हणतोय ते? ” पाणिनी ने विचारलं.
तिने उत्तर दिले नाही. तेवेढा वेळ शांततेत गेला.न्या.एरंडे आपल्या खुर्चीत चुळबुळले.त्यांची नजर घड्याळाकडे गेली.
“ उत्तर द्या.” –पाणिनी
“ सॉरी, माझ्या मनात वेगळेच विचार चालू होते.” ती म्हणाली.
“ काय होते विचार?”
“ नाही, या आपल्या केस बद्दल नव्हते.”
“ तर मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.” पाणिनी म्हणाला.
“ मला जरा पुन्हा सांगा तुमचा प्रश्न. माझं लक्ष नव्हतं ” ती म्हणाली.
कोर्टाच्या कारकुनाने पाणिनी ने विचारलेला प्रश्न भावनाहीन स्वरात पुन्हा वाचून दाखवला.
“ ज्यावेळी मिस्टर कामोद ने आपली गाडी चौकात सिग्नल ला थांबवली हती तेव्हा त्याने ओठात सिगारेट ठेवली होती आणि गाडीच्या लायटर पाशी झुकून ती पेटवत असतानाच डाका घालणारा माणूस त्याच्या दारापाशी आला त्यामुळेच त्या माणसाने दार उघडे पर्यंत तो तुम्हाला दिसलाच नाही, हे बरोबर आहे की नाही मी म्हणतोय ते? ”
“ मला नक्की नाही सांगता येणार.”-मरुशिका
“पुढे झुकून लायटर हातात घेऊन पुन्हा ताठ बसत असतांनाच त्या गुंडाने कामोद च्या डोक्याला पिस्तूल लावलं ”आणि त्याला हात वर करायला लावले.त्यामुळे कामोद च्या हातातला लायटर खाली पडून सीट कव्हर वर पडला आणि त्यामुळे सीट कव्हर ला जळल्यामुळे भोक पडलं.तुम्हाला विश्वास नसेल मरुशिका, तर कामोद च्या गाडीचे फोटो बघा, मरुशिका.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही म्हणालात तसंच घडलं असावं असं मला वाटू लागलंय.”
“ सीट कव्हर जळल्यामुळे बऱ्या पैकी धूर आला असेल गाडीत.नाही का?” पाणिनी नं विचारलं.
“ तुम्ही ते मिस्टर कामोद ला विचारा.तेच योग्य होईल नाही का?” –मरुशिका
“ मी तुम्हाला विचारलाय प्रश्न.” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही वाटत मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे.”—मरुशिका
“ का?”
“मिस्टर पटवर्धन, मी हाडा मासाची स्त्री आहे.यंत्र नाही.डाका पडत असतांना त्यातल्या प्रत्येक मिनिटाचा तपशील आठवायला.”-मरुशिका
“ का बर? आरोपी च्या प्रत्येक बारकाव्याचा तपशील तुम्ही लक्षात ठेवलाय की ! ” - पाणिनी म्हणाला.
“ अगदी बारकाव्याने नाही.ढोबळ तपशील.”
“ अच्छा, त्याचे डोळे कसे होते? घारे, तपकिरी? काळे?” पाणिनी नं विचारलं.
तिने पिंजऱ्यातल्या आरोपी कडे पाहिले.
“ त्याच्याकडे बघू नका, तुमच्या आठवणी च्या आधारे सांगा.” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही माहीत.”
“ होल्ड अप च्या दिवशी त्याने कपडे कुठले घातले होते?” पाणिनी नं विचारलं.
“ अत्ता आहेत त्याच्या अंगात, तेच.”
“ अच्छा, आणि ओळख परेड च्या वेळी कुठले होते?” पाणिनी नं विचारलं.
“ मला.. मी...सॉरी, नाही सांगता येणार.”
“ ज्या चौकात डाका पडला, तेव्हा मिस्टर कामोद कोणत्या गल्लीत होता? रस्त्याच्या मध्यभागा जवळची गल्ली की कोपऱ्या जवळची?” पाणिनी नं विचारलं.
“ रस्त्याच्या बाजूची.”
“ तर मग डाका घालणाऱ्या माणसाने जेव्हा गाडीचं दार उघडलं तेव्हा....”
“ सॉरी, माझी चूक झाली.” पाणिनी ला थांबवत मरुशिका म्हणाली. “ मला अत्ता आठवलं ती रस्त्याच्या बाजूची गल्ली नव्हती, उजव्या गल्लीच्या बाजूची होती.”
“ नक्की किती वाजता डाका पडला?” पाणिनी नं विचारलं.
“ १३ सप्टेम्बर ला.”
“ रात्री नेमका किती वाजता?” पाणिनी नं विचारलं.
“ रात्री केव्हातरी.”-मरुशिका
“ नऊ वाजता?”
“ नाही लक्षात. मी घड्याळ बघितलं नव्हतं.”
“ दहा वाजता?”
“ आठवत नाही. मी म्हणाले ना, घड्याळ नाही बघितलं मी तेव्हा.”—मरुशिका
“अकरा वाजता? ” पाणिनी नं विचारलं.
“ सॉरी पटवर्धन.मला.... थांबा, अकराच्या आधी असणार कारण औषधांची दुकानं अकराला बंद होतात.”
न्यायाधीश एरंडे थोडे खाकरले. “ पाच वाजलेत. उद्या आणि परवा सुट्टी आहे.कोर्ट आपलं काम सोमवारी दहा वाजता सुरु करेल.” ते आसनावरून उठून म्हणाले आणि आपल्या चेंबर कडे निघाले.
( प्रकरण ३ समाप्त)