Flat Number 306 in Marathi Fiction Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | फ्लॅट नंबर ३०६

Featured Books
Categories
Share

फ्लॅट नंबर ३०६

 

भाग -१

"लव्ह यू जिंदगी लव्ह यू जिंदगी "हे गाणे गाडीमध्ये वाजत होते आणि त्याबरोबर अवनी आणि अमितच्या गप्पा हि रंगात आल्या होत्या मध्येच अमित ने गाण्याचा आवाज कमी केला आणि अवनीला पहात म्हटले "फायनली आपण पोहचलो ती समोर दिसते ती आपली नवीन सोसायटी "

समोरून इमारत निळ्या रंगानी खुलून दिसत होती तिला पाहत अवनी म्हणाली "वाह मस्त आहे "

अमित ने गाडी सोसायटी च्या आत घेतली पाटोपाट सामानाने भरलेला टेम्पो हि आत आला

अमित ची ह्या शहरात बदली झाली होती अमित आणि अवनी ह्या नवीन सोसाटीत राहायला आले होते दोघे हि गाडीतुन उतरले अवनी तर आजूबाजूची हिरवळ आणि झाडे पाहून भलतीच खुश झाली

"वाह मस्त जागा आहे अमित आणि गार्डन पहा किती मस्त आहे "

"आवडलं ना तुला म्हणून तर मी हि जागा निवडली तुला निसर्गाच्या सानिध्यात राहायचे होते ना बघ तुझी विश पूर्ण झाली "

"थँक क्यू खरंच इथे राहायला मजा येईल "

"आता वर जायचं कि इथेच थांबायचं "

"अरे हो चल "

त्या दोघांना पाहून वॉचमॅन पुढे आला "नमस्कार तुम्ही इथे नवीन आलात ना "?

"हो "

"साहेब तुम्ही पुढे व्हा मी सामान काढतो "

"धन्यवाद दादा "

"अहो ताई धन्यवाद कशाला माझे कामच आहे तुम्ही व्हा पुढे"

"तुम्हला फ्लॅट माहित आहे ना "?

हो साहेब ३०४ ना सांगितलेले मला चेयर मॅन साहेबानी "

"बरं आम्ही निघतो "

"हो "

दोघेही लिफ्ट ने तिसऱ्या मजल्यावर आले अमित ने चावी काढली आणि दरवाजा उघडला अवनीने आजूबाजूला पहिले पण सगळ्याच्या दारांना कुलूप होते दोघेही आत गेले अवनी पळत गॅलरीत गेली तिथून वारा मस्त येत होता ते पाहून ती अधिक खुश झाली वॉचमन ने हमाली बरोबर सगळे सामान आणले हमालांना मजुरी आणि टेम्पो चे भाडे अमित ने दिले आणि थोडे पैसे वॉचमॅन कडे वळवले

"नाही साहेब नको कशाला उगाच "

"नाही आमची ओळख नसताना तुम्ही आम्हाला मदत केली "

"साहेब अहो ते माझे कामच राहू द्या "

तो पर्यंत अवनी ने पूर्ण फ्लॅट ची सफर केली तसा २ बी एच के होता अवनी बाहेर येत म्हणाली

"वॉचमन दादा आमच्या शेजारी कोणी नाही का सगळ्याच्या दरवाजांना कुलूप आहे "?

"नाही ताई आहेत ना पण सगळे नोकरीवाले संध्याकाळी येतात पण तुमचा वरचा मजला आणि पहिला मजला मात्र गजबजलेला असतो सगळेच घरी असतात "

"अरे म्हणजे शेजाऱ्यांशी संपर्क कमीच होणार "

"हो रविवारी असतात सगळी घरी पण आप आपल्या कामात पण हा आमच्या सोसायटीतर्फे कार्यक्रम असतो ना तेव्हा मात्र सगळे हजर असतात ते सुद्धा न चुकता पण तुम्ही भली माणसे म्हणून एक सांगतो "

"काय "?

"फ्लॅट नंबर ३०६ पासून जरा सावध राहा "

"म्हणजे "?

"शक्यतो संपर्क ठेऊ नका"

"पण का "?

"ते तुम्हला कळेलच बरं मी निघतो काही लागले तर सांगा "

अवनीने अमित कडे पाहून विचारले "अमित तो असा का म्हणाला "?

"अवनी तू ना अगं सोसायटी म्हटले कि काहींना काही गोष्टी आवडतात काहींना आवडत नाही वॉचमन बरोबर काहीतरी झाले असेल म्हणून म्हणाला असेल आपल्याला काय करायच आहे आपण बरे आणि आपले घर बरे "

"हो रे ते हि खरं आहे "

"चल आपण सामान लावूया परत बाजारात खरेदीला जायचं आहे दोघांनी पार्सल आणलेले खाल्ले आणि कामाला लागली झाडलोट सामान लावून दोघेही थकले थोडा वेळ आराम करून खरेदी साठी निघाले उद्या पासून स्वयंपाक करावा असे ठरवले म्हणून येताना पार्सल घेऊनच आले खरेदी करून ते परतले त्यांनी गाडी पार्किंग मध्ये लावली दोघांनी हि पिशव्या घेऊन लिफ्ट ची वाट पाहत उभे असताना एक व्यसकर आजोबा हि तिथे आले लिफ्ट येताच लिफ्ट मध्ये तिघेही चढले

अमित ने आजोबा ना विचारले "आजोबा कुठला मजला "?

"चवथा नवीन आलात वाटत राहायला ?

"हो तिसऱ्या मजल्यावर"

"अरे देवा "

हे ऐकून अवनी आणि अमित ने विचारले "काय झालं आजोबा "?

"काही नाही रे तो मजला सहसा कोणाला आवडत नाही "

"पण का आजोबा" ?

"३०६ ची पीडा आहे ना तिथे "

तेव्हड्यात तिसरा मजला आला आणि दोघांनी आजोबा चा निरोप घेतला फ्लॅट मध्ये शिरण्याआधी अवनीने ३०६ कडे नजर मारली तर कुलूप नव्हते पण दरवाजा बंद होता आणि आत येत विचार करू लागली ते पाहून अमित ने विचारले

"काय झालं "?

"अमित ते आजोबा पण "

"३०६ तेच तुझ्या डोक्यात चाललंय ना"

"कॉम ऑन अवनी अगं लोक हजार बोलतील तू पण ना "

अमितच्या अश्या बोलण्याने अवनी गप्प बसली

संध्यकाळ सरत रात्र होत आली अवनी ने देव्हाऱ्यात दिवा लावला आणि देवाकडे सांगडे घातले मग दोघांनी आणलेले राशन डब्यामध्ये भरून ठेवले पार्सल आणलेले खाऊन दिवसभर कामाच्या थकव्यामुळे लवकर झोपी गेले अवनी च्या मात्र डोक्यात आजोबा चे ते वाक्य घुमत होते "३०६ मध्ये ती पीडा आहे "?

***********************************************************************************************************************

भाग  २

दुसऱ्या दिवसाची नव्या घरातली नवी सकाळ अमित टेबल वर ब्रेकफास्ट करत होता "वाह अवनी मस्त परोठे झाले मज्जा आली खाताना "

अवनी किचन मधून टिफिन घेऊन येत म्हणाली "अच्छा हा घे टिफिन आज ऑफिस ला जायचं आहे तुला नव्या ऑफिसमध्ये नवीन दिवस आहे तुझा "

"अरे हो मी विसरलो होतो चल निघतो उगीच उशीर नको "

अमित पटकन तयार झाला आणि ऑफिस साठी जाण्यासाठी बाहेर पडला त्याने अवनी कडे पहिले तर तिचा चहेरा पडला होता कारण तसेच होते नवे शहर ना कोण ओळखीचे शेजारी हि नाही दिवसभर घरात बिचारी एकटी असेल तसे नव्या शहरात तिनी नोकरीसाठी अर्ज दिला होता पण नोकरी मिळेल तो पर्यंत तिला एकटीच राहावे लागणार होते

"अवनी मी जातो पण लवकर परत येईन तू मस्त पैकी एखादा सिनेमा पहा टीव्ही वर आणि हो पाहिजे तर खाली गार्डन मध्ये फिरून ये मस्त वाटेल तुला "

"पुरे लहान आहे का मी किती सांगतोस "

"मग काय करू तुझा चहेरां पडलेला पाहू "

"कुठे पडला आहे तू पण ना "

"अच्छा उलटा चोर कोतवाल को डाढ़े चल बाय मी निघतो "

"लवकर ये अमित "

"हो येईन डोन्ट वरी "

अमित गेला तशी अवनी हॉल मध्ये सोफ्यावर बसली तिने रिमोट घेतला आणि टीव्ही चालू केला पण काही क्षणातच तिला कंटाळा येऊ लागला ती उठली आणि गॅलरी त गेली आणि बाहेर पाहू लागली गाड्याची ये जा होती खाली गार्डन मध्ये पण लोक फिरताना बसलेले दिसत होते एवढ्यात तिची नजर सोसायटी जवळच्या मंदिराकडे गेली आणि ती लगेच तयार होऊन मंदिराकडे निघाली

सोसायटी कडून अवघ्या पांच मिनिटाच्या अंतरावर मंदिर होते मंदिराबाहेर पूजा साम्रगी च्या दुकानातून पुजेचे साहित्य घेऊन अवनी मंदीरात आली मंगलमुर्ती चे दर्शन होताच तिचे मन शांत झाले भटजी कडे पुजेचे साहित्य देत तिने डोळे बंद करत मनोमन प्रार्थना केली " हे गणराया ह्या नवीन शहारात आमची तुझं काळजी घे जर काही संकट असेल तर दुर कर असे म्हणून ती मंदिरात बसली मंदीरात येणारा वारा गणराया चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या भक्ताना मनाची शांतता देत होता

अवनी शेजारी येऊन एक बाई बसली अवनीने पाहाताच ती हसली अवनी तशी हसरीच होती ती ही तीला पाहत हसली

" कुठे राहतेस पहिली कधी पाहीले नाही "

"समोरच्या बिल्डींगमधये वी के सोसायटी मध्ये

"काय मी पण तिथेच रहाते "

"हो का नाही आम्ही कालच आलो रहायला "

"तरीच मी तुला पाहिले नाही कुठला मजला

"तिसरा आणी तुम्ही "?

"चवथा एकटी असतेस "?

"नाही मिस्टर आणी मी त्याची बदली झाली ते कामावर गेले घरात बसून कंटाळा आला म्हणून इथे आले "

"बरं केलंस आणी काय करणार तुमच्या मजल्यावर तर शेजारी ही तसलेच सगळे नोकरी दार मग कोणाशी बोलणार पण एक सांगू तुला कंटाळा आला तर पाहीजे तर आमच्या घरी ये‌ पण त्या ३०६ पासुन दुर ‌रहा "

"का सगळेच असे का म्हणतात "

"म्हणजे तुला ही कोणी सांगितले तर"

"पण का ते नाही सांगितले"

"कळेल‌ तुला बर मी निघते मला ‌जरा बाजारात जायच आहे"

त्या बाई गेल्या पण अवनीच्या मनात प्रश्नांचा भुंगा चालू करुन गेल्या ती मनातल्या मनात विचार करू लागली
"ही ३०६ बद्दल एवढे‌ लोक का वाईट बोलतात काय असेल‌ जे सगळ्यांना आवडत नाही आणी तिथे कोण रहात की नाही हे ही माहीत नाही? पाहीले तेव्हा दार बंद असते हे गणराया तुझं सांभाळ म्हणत "अवनी परत घरी परतली

लिफ्ट मधुन तिसऱ्या मजल्यावर पोहचताच तिची नजर ३०६ वर पडली तिने पाहीले की थोडा दरवाजा उघडा आहे हीच ती वेळ म्हणत अवनी दरवाजा जवळ केली ती आत पाहायच्या अगोदरच दरवाजा बंद झाला अवनी तशी धीट होती त्यामुळे न घाबरता ती परत आपल्या फ्लॅट मध्ये आली

पण तिचे विचार चालु होते कोण रहात असेल आणी लोक एवढं का वाईट बोलतात ३०६ बद्द्ल आहे नेमकी गोष्ट?

***********************************************************************************************************************

भाग ३

संध्यकाळची वेळ होती अवनी च्या डोक्यात परत परत ३०६ चे विचार येत होते मन वळवण्यासाठी तिनी मोबाईल वर गाणे लावले आणि अमित च्या आवडीचा स्वयंपाक करण्यात मग्न झाली एवढ्यात दरवाजाची बेल वाजली तशी ती ने दरवाजा उघडला तर समोर अमित ला पाहून ती आनंदित झाली

"वाह अवनी आज मेजवानी वाटते मस्त वास येतो "

"हो हो पहिली घरात तरी ये फ्रेश होऊन ये तो पर्यत मी चहा आणते "

अमित फ्रेश होऊन हॉल मध्ये आला गरमागरम चहा बरोबर भजी पाहून

"वाह अवनी बायको असावी तर तुझ्यासारखी ऑफिस मधून थकून आल्यानंतर गरमागरम चहा आणि भजी वाह यार सुख म्हणतात ते हेच "

"पुरे पुरे खूप झालं कौतुक पहिली खा नाहीतर थंड होतील मग काही खाण्यात मज्जा नाही "

"हो हो बरोबर बोललीस गरमागरम चहा आणि गरमागरम भजी काय मेळ आहे वाह "

आणि चहा बरोबर गप्पा सुरु झाल्या

"अवनी आज चा दिवस खूप छान गेला नवीन ऑफिस आणि तिथली लोक हि खूप चांगली आहे असं वाटलंच नाही कि मी नवीन आहे मी त्याच्यातला वाटलो मनात कुठे दडपण नव्हते असे वातावरण असेल तर काम करायला मज्जा येते आणि येणार "

"हो का मग बरंच आहे "

"तर मॅडम तुमचा दिवस कसा केला कंटाळा आला असेलच "?

"बरं झालं तुझं विचारलं म्हूणन नाहीतर म्हणाला असतास मी च रडते एकटी असते म्हणून "

"हो का मला तुझी काळजी नाही का हेच म्हण्याच आहे तुला "

"नाही रे तसं नाही लगेच राग बरा येतो तुला बरं ऐक"

अवनीने अमितला गणेश मंदिरातून सुरु झालेला ते ३०६ चा उघडलेला दरवाजा बंद होई पर्यंतचा किस्सा सांगितला हे ऐकून अमित जोरात हसू लागला त्याला हसताना पाहून

"काय अमित मी तुला एक गंभीर गोष्ट सांगते आणि तू हसतोस काय "

"मग काय करू तुला उठता बसता फक्त ३०६ दिसते देवा गणेशा माझ्या अवनीला लवकरात लवकर नोकरी मिळू दे नाहीतर ती डिटेक्टिव्ह कधी होणार मला सुद्धा कळणार नाही "

"कर मस्करी माझी कर "

"अगं मग मी काय करू जेव्हा पासून आपण आलोय तू फक्त ३०६ च्याच मागे आहे आणि विषय नाहीत का बघ ना मस्त संध्यकाळ आहे चहा भजी खात चार प्रेमाच्या गोष्टी कराव्यात तर तुझं आपलं ३०६ चे पुराण असते "

"अमित कालच आलो आपण असं काही मी एव्हडा त्रास दिला नाही तुला आणि मी तुला हे कशाला सांगते एकट्याने सांगितले असते तर मला काहीही फरक पडला नसता पण सगळेच असे म्हणतात मग विचार येतो ना आणि आपण नवीन आहोत उद्या काही वाईट घडले तर त्रास आपल्याच होणार "

"बरोबर आहे तुझं पण तू विचार करते तसे काही वाईट होणार नाही तुला एक सांगू तू तो विचार करणं बंद कर मग बघ उगीच तोच तोच विचार केल्याने मन दुषीत होते मग जे नाही आहे ते सुद्धा तुला दिसेल ते सोड आई बाबा ना फोन केलास ना "?

""हो

अमित ने बरोबर विषय बदला आणि अवनी हि त्या विषयात रंगली अमित ने आवडीच्या जेवणावर बोटे चाखत अवनीचे गुणगान गाईले आणि ती रात्र सरली अमित ने अवनीला समजावले पण तोच आता प्रश्नात पडला "कि जो तो ३०६ बद्दल वाईट का सांगतो खरंच काही वाईट आहे कि लोकांची पाह्यण्याची दृष्टी तशी आहे"?

***********************************************************************************************************************

भाग ४

असेच दिवस जात होते अवनीला हि चांगली नोकरी मिळाली आता ती सकाळी अमित बरोबर बाहेर पडायची ती संध्यकाळी परत येत असे म्हणून तिच्या मनातली ३०६ ची गोष्ट जरा बाजूला सरकली होती पण येता जाता तिची नजर ३०६ वर पडायची पण दरवाजा बंद असे

अश्याच एका रात्री ९ वाजता अमित आणि अवनी जेवण करत होते गप्पा हि रंगात आल्या होत्या एवढ्यात दरवाजाची बेल वाजली

"अमित आता कोण आलं असेल "?

"हो ना मी पाहतो "

अमित ने दरवाजा उघडला तर समोर

"मला वाचवा मला वाचवा "

"पण तुम्ही कोण आहात "?

"मी ३०६ मध्ये राहाते '

"काय"?

हे ऐकताच अमित आणि अवनीने तिच्या कडे पहिले तर ५५ वर्षाच्या आसपास असलेली बाई उभी होती

"अहो पण काय झालं "?

त्या बाईने एक कागद काढून अमित दिला

अमित ने तो वाचला "मी तुला मारणार आहे कोणीच तुला वाचवू शकत नाही "

"अहो पण तुम्हला हि धमकी कोण देत आहे "

"माहित नाही पण खिडकीतून हा कागद घरात फेकला गेला "

"चला आपण चेयर मॅन ना सांगूया "

"नाही नको बिल्डिंग मध्ये कोणालाच नको म्हणून तर मी तुमच्याकडे मदत मागायला आले "

"पण का "?

"माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही"

"अहो असे कसे नाही ठेवणार मी सांगतो "

"नाही नाही माझ्याबद्दल सोसायटी वाले काय बोलतात माहित आहे मला त्याना कोणालाच नको "

"मग आपण पोलीसाकडे जाऊया"

"नको नको ते का माझ्यावर विश्वास ठेवतील आणि सोसायटी च्या लोकांना विचारले तर तेच मला मुर्खात काढतील नको "

"मग मी तुमची मदत कशी कारेन हे बघ आपण सांगूया तुमच्या जीवाचा प्रश्न आहे चला "

"हो ऐका आम्ही दोघे येतो आपण सोसायटी वाल्याना सांगूया "

"नको नको त्यापरस मी मरण पत्करेन "

"अहो तुम्ही असे बोललात तर आम्ही तुमची मदत कसे करू शकतो आम्ही पण इथे नवीन आहोत "

"मी आज रात्र इथे राहिले तर चालेल "?

अमित ला काहीच कळेना त्याने अवनी कडे पहिले तीही ह्या बाईचे अजब वागणे पाहून चकित झाली होती दोघाना हि गप्प पाहून

"नको राहू द्या मी नाही राहत उद्या माझ्यावर हल्ला केला तर तुम्हला धोका मी जाते ""

अहो पण ऐका "

आणि ती बाई ३०६ मध्ये शिरली आणि दरवाजा बंद केला इथे मात्र अमित आणि अवनीच्या जीवाला घोर लावून केली

"आता काय करायचं अमित हि तर आपल्याच संकटात टाकून गेली "

"हो ना अवनी आता तिच्या जीवाला काही झालं तर आपण अपराधी ठरू "

"हो ना आणि हि तिथे राहत आहे हिला तर आपण आजच पहिले आणि पहा ना ती सोसायटी वाल्याकडून मदत हि नाकारत आहे पोलीस हि नको म्हणते मग आपण काय करू शकतो "

"अवनी आपण तिला इथे थांबण्यासाठी नकार देऊन चांगलं केलंय का "

"काय सांगू अमित ती इथे राहिली असती तर आपल्या हि जीवाला धोका "

"पण अवनी तीच काही बरं वाईट झाल तर "?

"पण आपण काय करू शकतो सगळेच सोसायटी वाले तिच्याबद्दल वाईटच बोलतात आणि तिला हि त्याची मदत नको मग आपण काय करूया "

दोघे ही थोडा वेळ शांत राहीले आणी काही क्षणात एकमेकांना पाहात दोघे हि बाहेर गेले ३०६ ची बेल वाजवली आणि त्या बाईना घरी घेऊन आले हॉल मध्ये तिला बसवले तिच्या केविलवाण्या नजरा त्या दोघांना पाहत होत्या

अमित आणि अवनी च्या मनात हजार प्रश्न येत होते पण तिला ते विचारण्यास धजत होते ती बाई हि गप्प बसून इथे तिथे पाहत होती ती रात्र मात्र त्याच्यासाठी वैऱ्याची होती

***********************************************************************************************************************

भाग -५

रात्र सरली आणि दिवस उजाडला अमित आणि अवनीच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता ते जणू त्या रात्री त्या बाईचे पहारेकरी झाले होते सकाळ उजाडली तशी त्या बाईने अवनी ला दरवाजा उघड म्हणून सांगून ती बाई निघून गेली तशी अवनी हि आपल्या ऑफिस ला जाण्याच्या तयारीला लागली दोघे हि नाश्ता करण्यासाठी बसले पण आज नेहमी प्रमाणे ते दिसतं नव्हते दोघेही गोधळलेले होते

"अरे यार अवनी रात्र भर झोप नाही लागली असंख्य प्रश्न डोक्यात घुमत होते "

"माझं हि तसेच झाले अमित त्या बाईला विचारवं तर काय हेच कळत नव्हते "

"तेच ना तू एवढे दिवस ३०६ करायची पण हे असे काही पुढ्यात येईल असे विचार हि आला नव्हता "

"काय विचित्र बाई आहे धमकी चे पत्र येतात पण तिला मदत नको मला असे वाटते आपण सोसाटीचे चेयर मॅन च्या कानावर घालूया उगीच मग आपल्याला त्रास नको "

"बरोबर आहे अवनी ती बाई किती नको म्हणटली तरी आपण रिस्क घेऊ शकत नाही उद्या आपल्या समोर हजार प्रश्न नको मी आजच संध्यकाळी भेटतो "

"हो चल निघूया ऑफिस ला उशीर होईल "

दोघे हि बाहेर पडले अवनी येता-जाता ३०६ वर लक्ष मारत असे पण आज अमित ने हि दरवाजावर लक्ष मारले आणि ते ऑफिस साठी निघाले संध्यकाळी ठरवलेल्या नुसार अमित भेटण्यासाठी निघाला तशी अवनी हि तयार झाली मग दोघे हि निघाले दुसऱ्या मजल्यावर आणि २०५ ची बेल वाजली दरवाजा उघडण्यात आला

"नमस्कार "

"अरे या या ३०६ वाले देवधर ना "?

"हो तुमचे मिस्टर आहेत का "

"हो आहेत ना या "

सुर्वे सोसायटी चे चेयर मॅन टीव्ही पाहत होते ह्यांना पाहतच

"अरे देवधर या बसा "

"आम्ही तुम्हला डिस्टर्ब नाही ना केलं "

"नाही हो हे कामावरून आले कि आम्ही टीव्ही बघत बसतो आणि काही नाही बसा तुम्ही चहा आणते"

"नाही वाहिनी नको "

"देवधर कशाला नको पर्थमच तुम्ही दोघे आला आहात कर तू घेतील ते "

"मिस्टर सुर्वे मला तुमच्याशी थोडं बोलायचं होत "?

"बोला ना काय झालं काही प्रॉब्लेम आहे का बिंदास सांगा"

अमित आणि अवनी ने सगळे काही मिस्टर सुर्वेच्या कानावर घातले त्यावर ते हसले आणि म्हणाले

"मिस्टर देवधर तुम्ही चांगली माणसे आहात म्हणून सल्ला देतो तुम्ही त्या बाईच्या भानगडीत पडू नका तीच तिलाच काही ते पाहू दे "

"पण तिच्यावर हल्ला झाला तर "?

"अहो कर्म जसे कराल तसे फळ मिळेल "

तेव्हड्यात सुर्वेच्या मिसेस चहा घेऊन आल्या त्या हि आतमधून सगळे ऐकत होत्या येता येता त्या म्हणल्या "विसरून जावा हो सगळे तुम्ही तिला मदत करण्याच्या भानगडीत पडू नका उद्या तुम्हीच फसाल "

त्याच्या अश्या बोलण्याने अमित आणि अवनी गप्प झाले सुर्वेनी वेगळा विषय काढला आणि थोड्या वेळात मिसेस सुर्वेनी खण नारळांनी अवनीची ओटी भरली आणि त्याच्या निरोप घेऊन अमित आणि अवनी परतले पण त्याच्या महत्वाचा मुद्दा तिथेच राहिला आणि त्या बाईला मदत करायची कि नाही आणि आता काय करायचं ? हा प्रश्न मात्र अनिरूत्तरीत राहिला

***********************************************************************************************************************

भाग-६

आता काय करायचं मदत करावी कि नको हा प्रश्न अवनी आणि अमितला पडलेला तो सुर्वे याची भेट घेऊन तो मिटला आपण ह्या गोष्टीत पडायचे नाही असे दोघांनी ठरवले असेच दोन चार दिवस गेले ती बाई त्याच्याकडे आली नाही आणि दिसली हि नाही अवनी आणि अमित ने हि तिच्या पासून लांब राहण्याचे ठरवले

अश्याच एका संध्यकाळी अवनी गॅलरीत उभी असताना ती बाई अवनी च्या नजरेस पडली ती आपल्या खिडकीतून डोकावून पहात अवनी ने दिला न पाहिल्यासारखे गेले पण ती मात्र अवनी कडे पाहून मिश्कीलपणे हसू लागली आणि आत निघून गेली

अवनी हि आत येत अमितला म्हणाली "काय बाई आहे काल परवा पर्यंत धमकी मिळाली आणि आज कुठे दिसली तर मला पाहून हसून आत गेली "

"जाऊ दे ना अवनी आपण सुर्वेचे ऐकुया आपल्याला नको तिची गोष्ट "

"बरोबर आहे तुझे अमित "

त्या संध्यकाळी अवनी आणि अमित टीव्ही पाहत बसले होते कार्यक्रम रंगात आला आणि एवढ्यात दरवाजाची बेल वाजली

अमित उठला ह्या वेळी त्याच्याकडे तसे कोण येणारे नव्हते म्हणून अमित ने दाराच्या मेन होलातून पहिले तर ती बाई उभी होती आणि तिच्या हातातून रक्त येत होते ते पाहून अमित घाबरला त्याने अवनी कडे पहिले त्याच्या तोंडून पुसटसे शब्द आले

"अवनी तीच आहे आणि तिच्या हातातून रक्त येत आहे "

"काय "?म्हणत अवनी ने हि पहिले तर तिच्या हाताला कोणी तरी चाकू मारल्याचे घाव दिसत होते अवनी ते पाहून घाबरली आणि अमित ला तिने ओढत आणत सोफ्यावर बसवले

"अमित तिच्यावर कोणीतरी हल्ला केला आहे आपण दरवाजा नको उघडूया काय व्ह्याच ते होऊन दे "

"पण अवनी काहीच कळत नाही माणुसकी म्हणून मदत करायची कि संकट अंगावर घ्याच ""?

"नको अमित आपण नाही मदत करायची "

"पण तिला इथेच काहीतरी झालं तर आपणच फसू तिला इथून तिच्या घरी जाण्यांस सांगू "

त्या बाईने परत बेल वाजवली तसा अमित ने हिम्मतीने दरवाजा उघडला

"काय आहे "?

"अहो पहा ना माझ्यावर कोणी हल्ला केला"

"काय"?

"हो रक्त पहा हातातून "

"पण कोणी केला हल्ला "?

माहित नाही मी हॉल मध्ये बसल्यावर अचानक पने हाताला धार दार काही लागल्याचे जाणवले "

"काय घरात पण तुमच्या बंद घरात कोण शिरेल "?

"गॅलरी तुन शिरला असेल कोणी मी मागे पाहातच पळून गेला "

"पण तुम्हला कोण मारणार असेल आणि का "?

"माहित नाही मला "

"म्हणून मी तुम्हला सांगत होतो कोणाला तरी सांगा आता पाहिलात घरात येऊन हल्ला झाला "

"आता तरी सांगा सगळ्यांना "

तिचे रक्त पाहून अवनी हि हळहळली ती म्हणाली" अहो काही लावलं नाही हाताला थांबा इथेच थांबा "म्हणत अवनी ने बँडेज आणून तिच्या हाताला लावले आणि तिला समजावत सांगितले "हे बघा तुम्ही पोलिसाना सगळे सांगा उद्या काही झाले तर आम्हला पण तुमच्या मुळे धोका होऊ शकतो "

"नाही नाही मला कोणालाच नाही सांगायचे "

हे ऐकून अमितचा पारा चढला

"मग तुम्ही इथे कशाला आलात तुम्हला जर कोणाला काही सांगायचे नाही तर निघून जा आम्हला तुम्ही मदती साठी बोलवू नका "

हे ऐकून तिचा चहेरा जरा गंभीर झाला

"शांत हो अमित "

"काय शांत होऊ अवनी प्लिज तुम्ही जा इथून तुमच्यावर हल्ले होतात आणि तुम्ही कोणालाच सांगायला तयार नाही म्हणजे "

अमितचा राग पाहून त्या बाई ने हळुवार म्हंटले "कोणाला सांगू ह्या सोसायटी वाल्याना जे माझ्या जीवावर उठले त्यांना "

"काय सोसायटी वाले "?

"हो त्याच्या पैकी कोणीतरी असेल जो मला मारायचा प्लॅन करत असेल "

"अहो पण तुम्हला मारून त्याना काय मिळणार "?

"माझा फ्लॅट मी नको आहे इथे कोणालाच म्हणून तर सगळेच माझ्याशी वाईट वागतात तुम्ही बरी माणसे दिसली म्हणून आली मदत मागायला पण राहू दे जाते मी "

तिचा केविलवाणा चेहेरा पाहून अमित ला हि वाईट वाटले "थांबा हे बघा मला रागवायचं नव्हतं पण तुम्हीच सांगा आम्ही तुमची मदत कशी करू ना तुम्ही सोसायटी वाल्याना सांगायला तयार आहात ना पोलिसाना तुमच्या नातेवाईकांना तरी सांगा "

"त्याना काय सांगू कसले नातेवाईक कोण कोणाचे कोणीही नाही माझे एकटीच मी म्हुणुन तर सगळे सहन करते असे म्हणून तिचे डोळे पाणावले हे पाहून अमित आणि अवनी ला हि वाईट वाटले

त्या दोघांनी तिला समजावत सांगितले "आम्ही मदत करू तरी कशी सोसायटी वाले तुम्हला का वाईट म्हणतात आम्हला माहित नाही पण आपण पोलिसाकडे जाऊया ते पाहतील काय ते

ती बाई कशी बशी तयार झाली आणि तिघेही पोलीस स्टेशन वर गेले रीतसर रिपोर्ट लिहून बाहेर आले तिच्या ३०६ मध्ये तिला सोडून अवनी आणि अमित आपल्या फ्लॅट मध्ये आले दोघेही खूप घाबरले होते पण पोलिसाकडे जाण्याखेरीस त्याच्याकडे काही पर्याय नव्हता पण पुढे काय होणार सोसायटी वाले त्याच्या ह्या निर्णयाला कसे सामोरे जातील हा मात्र गंभीर प्रश्न होता

***********************************************************************************************************************

भाग ७

सकाळी सकाळी पोलिसाची गाडी सोसायटीत दाखल झाली पोलिसाची गाडी पाहिल्यावर वॉचमॅन जरा घाबरला त्याने भीतभीत विचारले

"साहेब काय झाल तुम्ही इथे "?

"हो तुम्ही ड्युटी चोख करत नाही म्हणून आम्हला यावे लागले "

"काय सांगताय साहेब "

"मग तुमच्या सोसायटीत घरात घुसून हल्ले होतात आणि तुम्ही आम्हला विचारतंय "

"हल्ला "?

"हो फ्लॅट नंबर ३०६मध्ये हल्ला झाला "

"काय"?

"पण कसा आणि ती बाई मेली का "?

"का मरायला हवी होती पण सुदैवाने ती जिवंत आहे "

"नाही साहेब तसे नव्हे पण कोणी केला हल्ला आणि तुम्हला कसे कळले "

"तुला काय वाटतंय कोणी केला असेल "?

"माहित नाही साहेब"

"आम्ही शोधून काढू आणि आम्ही पोलीस आहोत आम्हला सगळं कळत "

पोलिसाची गाडी आली हि खबर सोसायटीत पसरली सुर्वे लगेच खाली आले

"नमस्कार मी जनार्धन सुर्वे सोसाटीचा चेयरमॅन साहेब काय झालं "?

"बरं झालं तुम्हीच भेटलात "

""तुमच्या सोसायटीत हल्ला झाला आणि तुम्हला माहित नाही "?

"कोणावर हल्ला साहेब "?

"फ्लॅट नंबर ३०६ च्या कांचन नाईक ह्यचावर "?

"काय पण कोणी केला आणि त्यांना काही झालं तर नाही ना "?

"का काही व्हयला हवं होत सोसायटीत एव्हडी लोक असतात त्या बिचाऱ्या एकट्याच तक्रार देण्यासाठी आल्या असं का सोसायटी चे प्रमुख म्हणून तुम्हला का नाही आलात "?

"हे बघा साहेब मला हल्ला झाला ते माहित नाही नाही तर मी आलो असतो पण हल्ला कोणी केला "?

"तेच तर शोधायला आलो आहोत "

"पण साहेब त्या कांचन नि आमची नावे तर दिली नाही ना संशयित म्हणून "?

"का तुम्हला का असे वाटते "

"नाही साहेब असेच सोसायटीत हल्ला झाला म्हणजे तुम्ही सगळ्याची चौकशी करणार "?

"हो तर सगळ्याची बोलवा सगळयांना "

सुर्वे नि फोन करून सगळ्यांना महत्वाची मीटिंग आहे म्हणून बोलावले तसे सगळे आले अवनी आणि अमित हि उपस्तिथ होते

"मी इन्स्पेक्टर मोहित तुम्हला इथे मीच बोलावले काल रात्री कांचन नाईक ह्याच्यावर हल्ला झाला सुदैवाने त्या वाचल्या जरा धार अजून हातावर बसली असती तर त्याच्या जीव गेला असता त्या एकट्याच काल रिपोर्ट देऊन गेल्या कोणाला काही माहिती असेल कोण त्यांना मारू शकतो तर सांगा "

"काय पण साहेब त्यांना मारून कोणाला काय मिळणार आम्ही तर तिचे तोंड पाहिल्यावर महिने होतील "

"का असे का एकाच सोसायटीत राहून काही बिनसलेले आहे का "?

"नाही नाही तसं नाही त्या घराबाहेर नसतात घरातल्या घरात असतात जास्त मिसळत नाही त्या "

"त्या मिसळत नाहीत कि तुम्ही मिसळून घेत नाही"

"नाही साहेब तसे नाही "

एवढ्यात चार पाच बायका मधून एक आवाज आला "तिच्याबरोबर कोण मिसळून घेणार "?

हे ऐकताच मोहित त्या दिशेने वळला "काय म्हणालात कोणीतरी काही म्हण्टले इथून कोणीतरी काहीतरी म्हण्टले कोण मिसळून घेणार म्हणजे "

मधेच सुर्वेनी त्या बायकांना शांत करत इन्स्पेक्टर ना पाहत म्हण्टले "साहेब त्याचे म्हणे तसे नाही साहेब खरं सांगायच तर सोसायटी मधल्या आणि त्याच्या नातेवाईकांशी कोणाशीच तिचे पटत नाही तिचा स्वभाव खूप कठोर आहे म्हूणन आम्ही सगळे तिच्यापासून लांब राहतो म्हणून तिच्याबरोबर कोणी आले नाही पण इन्स्पेक्टर साहेब आम्ही कोणाच्या जीवाशी खेळू शकत नाही तेवढे आम्ही प्रतिष्टीत आणि माणुसकी जपणारी माणसे इथे राहतो

"पाहूया कोणी किती माणुसकी जपली आहे ती येतो मी कांचन नाईक च्या फ्लॅट ची पाहणी करुन "हे ऐकताच सगळेच एकमेकांच्या तोंडावर भयभीत होऊन पाहू लागले

***********************************************************************************************************************

भाग ८

इन्स्पेक्टर मोहीत आणि त्याचे सहकारी भराभर जिना चढून वर वर गेले तसे सोसायटी चे रहिवासी कुजबुजू लागले काय होणार ?कोणी केला असेल हल्ला? असे अनेक प्रश्न तिथे उपस्तिथ होत होते इन्स्पेक्टर मोहीत ने ३०६ ची बेल वाजली तसा दरवाजा उघडण्यात आला

"इन्स्पेक्टर साहेब तुम्ही"?

"हो मिस कांचन मी आत येऊ"

"हो"

"हवालदार पुर्ण खोल्या तपासा काही हाती लागु शकते" तसे हवालदार लगेच तीन खोल्यांत शिरले

आणि मोहित ने कांचन कडे मोर्चा वळवला "तर कांचन माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या जेणेकरून आम्ही हल्लेखोराला लगेच पकडू "
हे ऐकताच कांचन घाबरली

"हे पहा घाबरू नका तुम्हाला कोणावर संशय असेल तरी सांगा कोणाची गय केली जाणार नाही"

"तर तुम्ही त्या दिवशी सोफ्यावर कुठे बसला होता"?

"ती व्यक्ती कोण होती म्हणजे स्त्री होती की पुरुष होता "?

"त्या व्यक्तीने कसले‌ कपडे‌ घातले होते

"तेव्हा तुम्ही काय करत होता "

असे अनेक प्रश्नांची सरबत्ती इन्स्पेक्टर मोहित ने सुरु केली त्यावर कांचन ने डगमगत भीत भीत काही प्रश्नांची उत्तरे दिली चौकशी संपवून मोहीत खाली येत असताना वाटेत अमीत आणी अवनी भेटले

"धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आमचे नाव नाही घेतले "

"शू.....मी मुद्दाम नाही सांगितले हल्लेखोर आजुबाजुला असु शकतो त्यामुळे तुम्ही सतर्क राहा "असे म्हणून इन्स्पेक्टर मोहीत खाली उतरला तर सोसायटीचे लोक चिंतेत खाली उभे होते

मोहीत ने त्यांना पाहात म्हटले "चला कामाला लागा इथे उभे राहुन काय करणार आहात हल्लेखोराला आम्ही लवकरच पकडू तो‌ पर्यंत हवालदार शिंदे इथे थांबतील आणी हो आमच्या शिंदेंची नजर चोख आहे गुन्हेगाराचा वास जरी लागला आला तर त्याची खैर नाही आणि पोलिसांची गाडी सोसायटी बाहेर पडली

पण गाडी जातात "कोण कोणी केला असेल हल्ला "असे निकष सोसायटी वाले लावू लागले

***********************************************************************************************************************

भाग ९

इन्स्पेक्टर मोहित च्या सांगण्यानुसार हवालदार शिंदे आपली नजर सोसायटी च्या प्रत्येक जणांवर ठेवली होती अधून मधून कोण संशयित दिसला तर त्याची हि चौकशी केली जात होती अधून मधून वॉचमन ला हि प्रश्नाची उत्तरे दयावी लागत होती तिथे मोहित हि ह्या केस ची पूर्ण माहिती करत होता

हवालदार शिंदे असेच बिल्डिंग मध्ये फेरफटका मारताना त्याच्या नजरेस सोसायटी चे सुर्वे अमित आणि अवनीशी बोलताना दिसले शिंदे नि हळूच भिंतीला कान लावला

"पाहिलात देवधर ह्या साठी मी सांगत होतो तुम्ही त्या बाईच्या भानगडीत पडू नका आता पहा सगळ्यांना तिनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे हिच्या अश्या स्वभावामुळे कोणी तरी हल्ला केला असेल पण ताप मात्र आपल्या डोक्याला "?

"पण सुर्वे तुम्हला काय वाटत कोण करू शकतो "?

"ते मात्र मला माहित नाही तिच्या विचित्र स्वभावामुळे तिनी किती दुश्मन उभे केले असतील देव जाणे चला येतो मी देवधर "

आणि सुर्वे गेले तसे अवनी आणि अमित हि आपल्या फ्लॅट मध्ये शिरले

सोसायटीच्या लोकांबरोबर मोहित ने कांचन च्या त्या शहरात राहत असलेल्या नातेवाईकांना हि चौकशी बोलावले

"इन्स्पेक्टर साहेब मान्य आहे आम्ही तिचे नातेवाईक आहोत पण आमचे हि तिच्याशी पटत नाही त्यामुळे आमचे तिच्या घरी येणेच होत नाही आणि आम्हला तिच्यावर हल्ला करून काय मिळणार मी तर काका काकू म्हणजे कांचन चे आई वडील असताना तिथे गेलो होतो आज तर ७ वर्ष झाली मी तिथे फिरकलो हि नाही "

अशीच काहींची उत्तरे आली कोणीच तिच्या संपर्कात नव्हते पण तिच्या नसण्याने फायदा मात्र सगळयांना होणार होता सोसायटी वाल्याना तिच्या विचित्र स्वभावातून तर नातेवाइकांना तिच्या संपत्तीतून कारण कांचन हि एकुलती एक होती त्यात ती अविवाहित आई बाबा आणि कांचन नंतर संपत्ती नातेवाईकडेच जाणार होती

मोहित च्या नजरेत सगळेच संशियत होते पण कोण तिला मारू शकतो हे कोडे मात्र सुटत नव्हते ?

***********************************************************************************************************************

भाग -१०

"असे असते तर असे व्हायला हवे होते "इन्स्पेक्टर मोहित केस संदर्भात स्वतःशी बोलत होता एवढ्यात

"सर मी आत येऊ "

"या देशपांडे काय खबर "?

"सर हे पहा म्हणत हवालदार देशपांडे नि मोहित कडे एक कागद दिला "

तो पाहत मोहित ने पेन घेतले आणि टेबलवर असलेल्या पेपर वर काही लिहिले आणि लगेच फोन हातात घेतला

"हॅलो शिंदे लवकरात लवकर पोलीस स्टेशन वर या "

निरोप मिळताच शिंदे पोलीस स्टेशन वर हजर झाले

"शिंदे मी काही प्रश्न तुम्हला विचारतो त्याची उत्तरे त्या "

"हो सर "

इन्स्पेक्टर मोहित ने शिंदे ना प्रश्न विचारले आणि शिंदे नि हि पटापट उत्तरे दिली

तशी मोहित ने शिंदे कडे पाहत म्हण्टले "शिंदे केस सॉल्व्ह झाली "

"काय सर कोण आहे हल्लेखोर "?

"लवकरच कळेल "

चला शिंदे निघूया सोसायटी कडे आणि पोलिसांची गाडी सोसायटीत पोहोचली लगेच सुर्वेना कळवण्यात आले कि सगळ्या सोसायटी मेंबर्स ना खाली बोलवा तशे एक एक करून सगळे जमले पण त्यात कांचन नाईक काही दिसेना मोहित ने स्वतः फोन करून तिला सांगितले होते तरी तिचा पत्ता नाही हे पाहून "शिंदे त्या कांचन नाईक ला बोलवा "

शिंदे पटकन वर गेले कांचन नाईक च्या दरवाजाची बेल वाजवली तसे दरवाजा उघडण्यात आला

"चला खाली साहेबानी बोलवले आहे "

"नको मी नाही येत"

"अहो तुमच्यावर कोणी हल्ला केला तेच सांगणार आहे म्हणून चला"

"नाही नाही मी नाही येणार "

"अहो घाबरू नका आम्ही आहोत चला "

तशी ती खाली आली तिला पाहतच सगळ्यांनी नाके मुरडली ती मात्र मोहित ने अचूक पहिले

सगळ्यांना पाहत मोहित ने सुरवात केली "तर मी तुम्हला इथे बोलवले आहे ह्याचे कारण तुम्हला माहित असेल चार दिवस पूर्वी तुमच्या सोसायटीत धमकी देऊन मग हल्ला करण्यात आला आणि आज आरोपी माझ्या नजरेस आहे "

"काय तुम्हला कळले कोण आहे हल्लेखोर "?

हो मिसेस सुर्वे

हे ऐकताच सगळे सोसायटी वाले भयभीत झाले कारण सगळयांच्या गळ्याभोवती लटकती तलवार होती

"कोण आहे तो"

"मिस्टर जो आरोपी आहे तो ह्याच सोसायटी त राहत आहे "

"काय "?

"हो बरोबर ऐकलंत तुम्ही ह्याच सोसायटीत "?

"कोण आहे तो "?

"सुर्वे तो तो नाही ती आहे "

"काय तुम्हाला काय म्हण्याच आहे ह्या सोसाटीतल्या बायका हल्लेखोर आहेत इथे प्रतिष्टीत महिला राहतात "

"तुमचं म्हण बरोबर आहे मॅडम पण हल्लेखोर महिला आहे हेच सत्य आहे "

"कांचन नाईक तुमचा कोणावर संशय बिंदास सांगा घाबरू नका "

"कांचन नाईक चे हातपाय कापत होते ती नि मानेनेच नाही म्हणून सांगितले "

कोण असेल ती हल्लेखोर ची इन्स्पेक्टर मोहितच्या नजरेस पडली आहे ?

************************************************************************************************************************

अंतिम भाग ११

हल्लेखोर महिला आहे हे ऐकताच सोसायटीच्या जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली कारण ही तसेच होते असे कोणी पाऊल उचलेल असे कोणालाच वाटत नव्हते

"इन्स्पेक्टर साहेब कोड्यात न सांगता सरळ कोण आहे ती सांगून टाका उगाच मनाला घोर नको "

"बरोबर आहे तुमचं मिसेस सुर्वे पण हे सत्य आहे तर हल्लेखोर एक महिला आहे जी नी पूर्ण प्लॅन रित्या हे आखलं पण ती यात फसली "

"कांचन नाईक काय वाटतं कोण असेल? तुमचा कोणावर संशय असेल तर सांगा पाहूया तरी तुमचे उत्तर बरोबर येते कि नाही ते "

"नाही माझा कोणावर संशय नाही "

"कसा असेल मिस कांचन कसा असेल कारण ती हल्लेखोर आणि कोणी नाही तुम्ही स्वतः आहात "

"हे ऐकताच सगळे आश्चर्य चकित होऊन म्हणाले" काय "?

"हो तुम्ही सगळ्यांनी जे ऐकले ते खरं आहे कांचन स्वतः हल्लेखोर आहे "

"काय मिस कांचन खरं आहे ना "?

"मी मी का करेन असं "

"अच्छा तु का केलंस हे मला जाणुन घ्यायचेच आहे त्यापुर्वी तु केलेल्या चुकानी तुला पकडुन कसे दिले ते जरा ऐक

क्रमांक १
कोणीही धमकी चे पत्र पुराव्यासाठी सांभाळून ठेवेल कारण जीवाचा प्रश्न होता पण तू तर ते हरवलं असे म्हणून मोकळी झालीस

क्रमांक २
तु सांगितले होते की सोफ्यावर बसली असताना हल्ला झाला आणी गॅलरीतुन‌ कोणी आला असेल पण मी त्याच जागेवरून बसुन पाहिले तर गॅलरीत कोणी आला असता तर तो तुझ्यावर समोरून हल्ला केला असता बाजुंनी नाही कारण गॅलरी समोर आहे

क्रमांक ३
तुला झालेली जखम किंवा तो वार दुसऱ्या व्यक्तीने बाजुने‌ केला असता तर जखमेचा घाव वेगळा असता तो असा नसता जो तु स्वतःला काळजी बाळगत केलास

क्रमांक ४
तु सांगितले कि धमकी चे पत्र कोणी खिडकीतून फेकले आणि धमकी चे पत्र दगडात गुंडाळले होते तर तुझ्या खिडकीच्या काचा कश्या फुडल्या नाहीत ?

क्रमांक ५

आपल्यावर जीव घेणा हल्ला झाला तरी आता तुला भीती वाटत आहे तशी भीती तुझ्या चेहऱ्यावर दिसलीच नाही


"आता बोला मिस कांचन बरोबर बोलत आहे ना "?


कांचन मान खाली खालून बसली हे पाहून मिसेस सुर्वे म्हणाली "बोल ना उगाच गाजावाजा केलास ताप मात्र आमच्या डोक्याला"

"हे बघ कांचन तुझा प्लॅन फ्लॉप झाला आता सत्य सांगण्याखेरीस तुच्याकडे काही पर्याय नाही "

सगळे सोसायटी वाले तिच्यावर बोल बोल म्हणत तुटून पडले तसे मोहित ने आणि शिंदे नि त्याना शांत केले

आपले डोळे पुसत तिनी सुरवात केली सोसायटीत माझ्याबरोबर कोणाचे पटत नाही त्यामुळे गेली चार पांच वर्ष मी कोणाच्या संपर्कात नाही ना कोणी माझी विचारपूस करायला आले ते पण का येणार माझ्या अश्या विचित्र स्वभावामुळे मी कित्येकांचा अपमान केला त्याच्या बरोबर विनाकारण वाद घातला माझे आई बाबा खुप चांगले होते ते असताताना आमच्या घरी सोसायटीतले यायचे पण मी मात्र त्याच्याशी चांगले वागायची नाही आईबाबा गेल्या नंतर कोणीच घरी फिरकले नाही माझ्या अश्या गर्विष्ठ स्वभावामुळे मी अविवाहित राहिले आई बाबा नि आणलेल्या प्रत्येक स्थळाला मी काहीना काही कारण काढून नाकारले मग काय वय होत गेलं आणि माझा स्वभाव सगळयांना परिचित झाल्या मुळे स्थळ येणे हि बंद झाले आई बाबा गेल्या नंतर मी नोकरी सोडली आई बाबानी पैसे ठेवलेलं त्यावरच जीवन जगायचं ठरवलं पहिली पहिली हा एकटेपणा मज्जेत गेला मग मात्र एकटेपणाचा कंटाळा येऊ लागला शेजारी हि कोणी नाही मित्र मैत्रिणी हि नाही नातेवाईक हि नाही त्यामुळे तो एकटेपणा खायला उठला सगळे सोसायटी वाले हसताना ऐकून वाटायचं कि आपण पण त्याच्यात मिसळून हसावं पण मला कोणीच जवळ करणार नाही हे माहित होते मग मनाशी ठरवलं नवीन कोणी राहिला आले कि त्याच्याशी दोस्ती करायची पण भावनिक आधारे आणि ३०४ मध्ये देवधर कुटूंब आले मला माहित होते सोसायटीतले हे लोक त्याना माझ्यापासून लांब राहा म्हूणन सांगतील म्हणून मी प्लॅन केला स्वतःच धमकी चे पत्र लिहून देवधर यांना दाखवण्यास गेले मला त्याची सहानभूती मिळाली मग आणखी सहानभूती मिळवण्यासाठी स्वतःवर हल्ला केला

"काय स्वतःवर हल्ला केलास मग पोलीस स्टेशन वर का केलीस "?

"ती एकटी आली नव्हती तिच्या सोबत आणखी कोणी होते आणि त्याच्यामुळेच सत्य बाहेर आले "

"कोण सोंबत होते"

"देवधर दाम्पत्य"

"काय तुम्ही तर सांगितले होते कि ती एकटीच आली होती "

मोहित ने अमित आणि अवनी बदल सगळे सांगितले आणि त्याचे अभिनंदन गेले त्यांनी जर हा पुढकार घेतला नसता तर सत्य बाहेर आले नसते

सत्य ऐकून सगळे सोसायटी वाले भावुक आणि नाराज हि झाले वयस्कर गोखले आजोबानी कांचन कडे पाहत म्हण्टले

"कांचन तुच्या वागण्याचा तुला आता पश्ताताप होतो पण काय फायदा तेव्हा आमचे ऐकेल असते तर आज सुखी संसार करत असतीस मी पण तुला खूप समजवले पण तू माझा अपमान केलास कोणाचं बरोबर तू चांगली वागली नाहीस ना शेजाऱ्यांशी ना नातेवाईकांशी म्हणून कोणीच तुझ्या आता सोबतीला नाही तुझे आई बाबा खूप चांगले होते एकुलती एक लेक तू त्याची पण त्याना हि कधी सुख दिले नाहीस "

"धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब डोक्याचे टेन्शन दूर केलेत उगाच आमची सोसायटी बदमान झाली असती "

"सत्य कधी हि लपून नाही राहत आणि पोलीस साच्या नजरेस तर काहीच नाही लपत चला शिंदे निघूया "

आणि पोलिसांची गाडी गेट बाहेर पडली आणि अवनी आणि अमितच्या डोक्यात असलेल्या ३०६ ची गुत्ती हि सुटली


**************************************समाप्त**************************************************