pravas in Marathi Travel stories by Pranav bhosale books and stories PDF | प्रवास...

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

प्रवास...

नमस्कार मित्रानो
तर ही गोष्ट आहे तब्बल ४ वर्षापूर्वीची, तेव्हा मी माझ्या कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला होतो. छान असे दिवस चालू होते.
कॉलेज मधे नुसतेच sport आणि gathering चा कार्यक्रम झाला होता. म्हणून मी थोडा दिवस निवांत राहायला घरी गेलेलो.
घरी ४ दिवस सुट्टी एन्जोय करून पुण्याला जायचा दिवस आलाच, घरी खूप दिवस सुट्टी साठी थांबलो असल्यामुळे, मला कॉलेज ला जावू वाटत नव्हते
पण काय करणार जाव तर लागणारच होत. कारण कॉलेज च्या मिड्सेम जवळ आल्या होत्या.
शेवटी सर्वांचा निरोप घेऊन मी सायकांळी ४ वाजता घरून निघालो, बस स्थानकावर पोहचलो खर.. पण त्यादिवशी खूप गर्दी होती, बस मिळेल कि नाही,
याची चिंता वाटत होती. आणि जर मिळालीच तर जागा चुकून पण भेटणार नाही हे मात्र खर होते.....शेवटी बस मिळाली, मनाची तयारी आधीच झालेली आणि
ठरल्याप्रमाणे उभा राहून च प्रवास चालू केला. अगदी इथपर्यंत सर्व नॉर्मल चालू होता, मी कानात कॉड टाकून मस्त गाणी ऐकत प्रवास चालू केलेला,
पण इतक्यात माझी नजर मागे गेली, आणि माझ्या थोड्या मागच्या बाजूला एक सुंदर मुलगी उभी होती, तिने स्कार्फ बांधला होता त्यामुळे चेहरा काही दिसू
शकला नाही पण तिच्या त्या सुंदर डोळ्यासोबत एक नजरा नजर झाली. पण काय करणार ती पण बिचारी शेवटी उभी राहूनच प्रवास करत होती .
प्रवास चालू असताना अधून मधून नजरा नजर चालू च होती.
कधी कोण कस इम्प्रेस होईल सांगता येत नाही, प्रवासातील एवढी गर्दी त्यात सायंकाळची वेळ, बस मधे वयस्कर लोक पण प्रवास करत होती.
त्यात एवढा लांबचा प्रवास करायचा असल्यामुळे लोक २ seat वर पण लोकांना adjust करून घेत होते. त्यात तिथे २ आजींना मी seat मिळवून दिली, त्यांना
पण चांगल वाटल आणि कदाचित तिला पण ते आवडले असेल. इतक्यात जिल्ह्याच ठिकाण आले. बस स्थानकात बस थांबली आणि शेवटच्या seat वर एक जागा मोकळी झाली.
त्या ठिकाणी मी बसायला जाणार एवढ्यात शेवटच्या बाजूला ती सुंदर मुलगी उभी होती तिला ती seat मिळाली. पण माझ्या मनाला पण वाटल नव्हता
अस त्यावेळी घडल. ती मुलगी त्या जागी बसली तिने तिची bag वेगरे सर्व ठेवली आणि एव्हाना तिने स्कार्फ पण काढला होता. दिसायला सावळी, सुंदर असे डोळे छान असे नाक,
पिंक कलर ची lipstick आणि डोळ्यात काजळ. साध्या भाषेत खूप सिंपल आणि cute. अशी होती ती. तिने मला तिच्या बाजूला जागा adjust करून बसायला बोलावल.
होय.... कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, माझा पण नव्हता बसत!!! का.. कस.. मलाच का?.. हे सर्व प्रश्न मनात घेऊन मी तिच्या बाजूला जाऊन बसलो एक नॉर्मल thank you च्या पलीकडे
मी तिच्यासोबत काहीच बोललो नाही. माझ्या डोकयात एवढच कि लांबचा प्रवास आहे आणि उभा कस राहायचं एक मदत महणून तीन मला तिच्या शेजारी बसायला जागा दिलेय.
माझा पुढचा प्रवास तिच्या बाजूला बसून चालू होता खर... पण मी अजून पण तसाच कानात कॉड टाकून गाणी ऐकत प्रवास एन्जोय करत होतो. खूप वाटत होता बोलायला
सुरुवात करावी, नाव विचाराव, गावं विचाराव, पण हे सर्व माझ्या मनात च होत. विचारायची हिम्मत होत नव्हती. मला अजूनही आठवतो तो दिवस , मला प्रवास करून जवळपास एक
तास झाला होता. त्या नजरा नजर च्या पलीकडे आमच्यात काहीच संभाषण झाल नव्हता. सूर्य मावळतीच्या दिशेन चालला होता. आणि त्या वेळी IPL चे सामने चालू होते. मला अजूनही
आठवतय त्या दिवशी मुंबई विरुद्ध हैद्राबाद असा सामना चालू होता. माझी आवडती टीम मुंबई असल्यामुले मी अधून मधून स्कोर बगत होतो. तेवढ्यात तीन तिच्या मोबाईल मधे match लावली.
आणि त्यामुळेच आमचा संभाषण चालू झाला. ते म्हणतात ना, " the girl who loves cricket are marriage material" अगदी तशीच होती ती.
मी तिला विचारल, तुम्हाला पण match आवडते काय? किती स्कोर झालाय? तीन माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत म्हणाली...होय!..मला क्रिकेट पाहायला आवडते आणि रोहित शर्मा
तर खूपच...match सोबत आमच्या गप्पागोष्टी सुरु झाल्या. तसपण आम्ही दोघ एकाच team ला support करत होतो. आमच्यात खूप काही साम्य होता.
तिचा नाव मोहिनी! अगदी नावाप्रमाणेच होती ती... आमच्या गप्पा आता क्रिकेट सोडून carrier, family, छंद , मैत्री अशा खूप काही गोष्टी बद्दल बोलण चालू होत.
तर ति पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये फार्मासिस्ट म्हणून जॉब ला होती. एव्हाना मला समजून गेलेला ती माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे.पण तिचा ते बोलण, तिचा नाजूक आवाज
तिचा समंजसपना याच्यामुळे मी तिच्यावर खूप इम्प्रेस झालेलो.तिला कॉलेज ला असल्यापसून च मेडीकल क्षेत्राची आवड होती आणि तीन तस तिचा carrier पण केल होता.
प्रवास सुरु होऊन ३ तास होऊन गेलेले, सूर्य मावळतीला जाऊन आता अंधार पडत चालेला , तीन तिचा मोबाईल मधे बगून मुंबई जिंकल्याची गोड बातमी दिली. दोघेपण आता
एकमेकांना चांगले ओळखू लागलो होतो तेवढ्या गप्पागोष्टी पण करून झाल्या होत्या. इतक्यात बस एका हॉटेल बाहेर चहा घेयाला थांबली. प्रवासी बस मधून खाली उतरत होते. तेव्हा मी
पण तिला बोललो, चल चहा घेऊयात? तर ती बोलली, नको खूप गर्मी आहे आपण icecream खाऊयात! आणि तसही मुंबई जिंकलेय त्यामुळे ही icecream treat माझ्याकडून!
आम्ही दोघेपण icecream खायला खाली उतरलो. मला अजूनही जे घडतंय त्यावर विश्वास बसत नव्हता. पण आयुष्यातील चांगला वेळ घालवतोय असच काहीतरी वाटत होत. कारण
याआधी अस कधीच झाल नव्हता. मी एका छोट्या गावात राहणारा मुलगा, ना कधी जास्त मुलीसोबत संभध, ना कोणत्या शहरासोबत, मी पहिल्यांदाच पुण्याला शिक्षणासाठी बाहेर राहिलेलो,
आणि ती अगदी खूप modern विचाराची, लहानपणीपासून शहरात मोठी झालेली,घरच वातावरण पण खूप बिनधास्त असलेला. इतक्यात ती २ corneto icecream घेऊन आली.
आम्ही गप्पा मारत icecream खाऊ लागलो, आणि तेव्हा आम्ही आमची पहिली selfi घेतली. हो! तो आमचा पहिला एकत्र फोटो......!
१० मिनिटांच्या नंतर बस ने आपला प्रवास पुण्याच्या दिशेन चालू केला. पुन्हा आमच्या न संपणाऱ्या गप्पा ना सुरुवात झाली. एकटा असताना कंटाळवाना वाटणारा प्रवास त्यादिवशी
संपूच नये अस वाटत होत. अस सर्व गप्पा गोष्टी आणि विचारात पुणे मात्र जवळ जवळ येत होत. एवढी छान मैत्री होऊन पण आम्ही अजून एकमेकांचा contact नंबर घेतला नव्हता.
आणि आता नंबर घेयाला भीती पण वाटत नव्हती, फक्त मी मनात आधीच ठरवलेला प्रवास संपल्यावर च नंबर घेवूयात. पुणे अगदी २० मिनिटांच्या अंतरावर राहिलेला. पण तेव्हाच खूप traffic
लागले. इतरवेळी नको वाटणारे traffic आज मला संपूच नये अस वाटत होत. एव्हाना आम्ही एकमेकांचा contact नंबर घेतला होता. मी तिला बोललो, भेटून छान वाटल, दरवेळी
एकट्याला कंटाळवाणा वाटतो प्रवास, पण आज पुणे कस आले ते समजलच नाही. ती बोलली.. हो ना..! कसा वेळ गेला समजलाच नाही. अजून एवढाच प्रवास जरी करायचा असता तरी कंटाळा
येणार नाही मला...! मला माहिती नव्हता तिच्या मनात काय होत, पण ऐकून मात्र छान वाटलं.
ते ना संपणारे traffic पण आता कमी होत चालेला आणि बस कात्रज जवळ येऊन पोहचली होती. मला होस्टेल कात्रज पासून जवळ असल्याने तिथच ऊतराव लागले. तिचा निरोप घेऊन मी
कात्रज ला उतरलो. आणि होस्टेल च्या दिशेन वाटचाल केली. ते म्हणतात ना, पहिली भेट दुसऱ्या भेटीची आंस लावून जाते अगदी तसच.......! मी होस्टेल च्या दिशेने चालेलो खर, पण मन मात्र अजून बस मधेच होता.