Rakt Pishachchh - 21 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 21

Featured Books
  • लाल बैग - 5

    समय: करीब 11:30 बजे रातरॉमी थकी हुई थी, शरीर से खून बह रहा थ...

  • बारिश एक कहानी

    "कुछ लोग ज़िंदगी में बहुत कम बोलते हैं, लेकिन उनकी चुप्पी भी...

  • Super Villain Series - Part 16

    Part 16: ज्ञान का द्वार — सत्य की खोजअर्णव अब मायावी नगरी छो...

  • उस शाम की ख़ुशबू...

    शाम की धीमी रौशनी, खिड़की से आती ठंडी हवा ️, और एक मुलाक़ात...

  • इंतजार

    इतंजार**********वो एक भीड़-भाड़ वाला इलाका था । चारों तरफ लो...

Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 21

॥रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 21

 

एकंदरीत राहाजगडची वै-याची रात्र सरली होती. त्या एका रात्रीत न जाणे काय-काय विलक्षण घटणा घडल्या होत्या. ज्या घटणांपासुन पुर्णत राहाजगडची प्रजा..अजाण होती. फक्त ज्यांनी तो अनुभव-स्व्त:समवेत अनुभवला.. त्यातले काही मोजकेच वाचले होते.. तर काही त्या वाईट अघोरी,हिंस्त्र,पाश्वि शक्तिच्या कचाट्यात सापडुन त्याचे भक्ष्य गुलाम झाले होते.आणि त्या वाचलेल्या माणच्या मनातल्या भीतीच्या पटलावर त्या अघोरी,हिंस्त्र शक्तिंचा नंगानाच असा काही उमटलेला.. की ते सर्व उभ्या आयुष्यात ही ते दृष्य विसरु शकत नव्हते..

त्यातलीच एक मेघा होती. नाही का? आपण सर्वांनी पाहिल होतच की त्या बत्तीचा स्फोट कसा झाला, व त्या स्फोटातल्या आगीने कशाप्रकारे

त्या भुश्या,चिंत्या,रुश्या तिघांच्या प्रेतांना मारुन टाकल , असो आता आपण पुढे वाचुयात.

त्या चार सळ्यांच्या खिडकीतुन बाहेरच सर्व दृष्य जस की ती पाचफुट कठड्याची काळी विहिर,ती बाग, अस दिसुन येत..सकाळच्या उन्हाचे कवडसे आत येत होते. खाली स्वयंपाक घरातल्या शेणाने सारवलेल्या भुईवर मेघा बेशुद्धावस्थेत पडली होती.डोक्यावरचे केस जरासे विचित्रपणे चेह-यावर पसरले गेलेले, बाजूलाच चुलीवर काळच जेवन जसच्या तस उघडच्या उघड दिसत होत. पन आता ते पामल जात

न खाण्या लायक झाल होत. चुलीपासुन थोड मेघाच्या दोन पैजण घातलेल्या पायांपासुन पुढे,भिंतीवरची मांडण तुटली गेलेली,मांडणीमधुन ताट,चमचे,सर्व भांडी खाली जमिनीवर अस्तव्यस्थपणे पडली गेलेली. तर कुठे भाजीच्या टोपल्यातुन लहान -मोठ्या हिरव्या-फुग्या मिरच्या, बटाटी, अस भाजीपाला ही विचित्रपणे खाली पडला होता. मेघाच्या चेह-यावर आता खिडकीतुन आत येणार उन्ह पडू लागल होत,त्यासहीतच हवेचे एक दोन झुळुकही चेह-यावरचे केस उडवून गेले. तसे तिने हळकेच पापण्यांआतुन डोळ्यांची हालचाल केली..दोन्ही बुभळ डावीकडून उजवीकडे फिरवत तीने खाडकन डोळे उघडले..व कमरेइतक शरीर वर उचल्ल.(तिच्या साडीचा पदर खाली जमिनीवर अस्तव्यस्तपणे पडलेला...बाहेरुन काळ्या ब्लाऊज मधुन तिच्या दोन स्तनाग्रांच दर्शन होत-होत. सुर्याच्या प्रकाशात..ती कमनीय बांध्याची कमर मादकहर्षासहित चमकुन उठली होती) कमरे इतक शरीर वर उचलुन तिने आपल्या दोन डोळ्यांनी एक कटाक्ष समोर टाकला. स्वयंपाक घरात अस्तव्यस्तपणे सर्वकाही भांडी-भाजीपाला भुईवर पडला होता.. हे सर्व दृष्य पाहुन काळरात्री जे काही घडल...त्या सर्वांची चित्रफीत..मेघांच्या डोळ्यांसमोर काहीसेकंदातच तरळुन गेली. चेह-यावर एकसाथ भीती,आक्रोश, दिसल जात डोळ्यांतुन टचकन दोन थेंब अश्रु गाळावरुन ओघळत खाली आले..तेच तिने कसेतरी आवळून धरले.परंतु राहुन-राहुन आपल्या पित्याचा तो हसताचेहरा डोळ्यासमोर येत होता, तो स्फोट झाल्यावर त्या स्फोटाच्या तीव्रतेने घरातली भांडी खाली पडताना -भाजीपाला टोपल्यातुन खाली उडालेला तिला दिसत होता...ते तीन प्रेत विचित्र हातवारे करत,जळताना तिला अंधुकशे दिसत होते.मग पुढे ती बेशुद्ध झाली येवढच.

" युवराजांना हे सर्व सांगायला लागल ! नायतर..समद्या गावाची राख व्हईल."

मेघा जमिनिवरुन उठली (साडीचा पदर नीट केला) केस बांधले,व तशीच राझगड महालात जाण्यासाठी निघाली.

×××××××××××

सकाळच्या कोवळ्या उन्हात राझगडमहालाच्या सफेद रंगाच्या भिंती कशा नव्यासारख्य चमकुन उठल्या होत्या. महाला समोर असलेल्या झाडांमधुन..ही हवेतुन चांगला ऑक्सिजन मिळत होता.. महालात प्रवेश करण्यासाठी वापरल्या जाणा-या चौकलेटी रंगाच्या दरवाज्या बाहेर दोन सैनिक हातात भाला घेऊन उभे होते. एक सैनिक डाव्या तर दुसरा उजव्या बाजुला उभा होता. त्या दोन सैनिकांपासुन पुढे-जेमतेम साठ-सत्तर मीटर अंतरावर राझगड महालाची हिरवीगार बाग होती. बागेत एकुण तीन जण बसलेली दिसत होती तर एक माणुस हाताची घडी घालुन उभा राहिलेला. प्रथम होते महाराज,त्यांच्या बाजुला बसल्या होत्या महाराणी,आणी त्यांच्या समोर बसलेले रघुबाबा,व उभा राहिलेला दुसरा -तिसरा कोणी नसुन संत्या होता. महाराज रघुबाबा दोघांचही काळ घडलेल्या घटनेवर बोलन चालु होत. महाराणींनी प्रथम ती सर्व घटना काल काय-काय घडल ते ऐकुन घेतल, मग त्याही आपली बाजु मांडु लागल्या.

" महाराज म्या समजत व्हतु त्यापेक्षा हे प्रकरण जरा जास्तच कठीण आण भयंकर झाल हाई!" रघुबाबा आपल्या खुर्चीत ताठ बसलेले-दोन्ही हातांत एक ऊभी जाडजुड काठी पकडली होती. रघु बाबांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी फक्त होकारार्थी मान हलवली.

" मग ह्यावर काहीतरी उपाय असेल ना ?"

महाराणी चिंताक्रांत होत म्हणाल्या.

" म्या काय बी सांगु शकत नाय महाराणी! कारण मला ज्या-ज्या गोष्टींची भीती वाटत हाई,त्या-त्या गोष्टीच ख-या घडत हाईत! "

"म्हंणजे,योगपुरुष!" महाराज न समजुन म्हणाले.

त्यांच्या ह्या वाक्यावर रघुबाबा जरा गुढ झाले-चेह-यावर गंभीरता पसरली.

" म्हंजी महाराज! तुम्हाला माहीती हाईच ,की मी काल ज्या शक्तिशाली

जादूगारणी बदल बोलत व्हतु ,"

"तीच ती मायाविनी का?" महाराज पटकन बोलले.

" व्हई तीच!"

" पन तीच काय ?तुम्ही तर म्हणालात की श्रीकाळ देवांनी तिच अंत केल आहे!" महाराज पुन्हा म्हणाले. त्यांच्या ह्या वाक्यावर रघुबाबांनी हलकेच एक कटाक्ष आजुबाजुला टाकला- दारावर उभ्या असलेल्या सैनिकां आणि बागेत काम करणा-या बागायतदाराशिवाय तिथे कोणिही नव्हत. रघुबाबा हळुच खुर्चीतुन पुढे झुकले.

" नाय महाराज..तिच अंत झाल नाय !"रघुबाब हलकेच पुटपुटले." श्रीकाळ देवांशी तिच युद्ध झाल व्हत खर , पन त्या युध्दात तिच अंत झाल ही एक अफवा मुद्दामुन पसरवली व्हती, कारण तिचे समर्थक खुप होते आणि जर का तिला कैदेत ठेव असत , तर त्या समर्थकांनी तिला पुन्हा सोडवलच असत. म्हणुन सर्व देवांनी ती अफवा पसरवली की मायाविनीचा मृत्यु झाला.पन सत्य हे असत्या वरचढ आहे. मायाविनीला हरवुन श्रीकाळ देवांनी तिला एका मंतरहाट बाटलीत बंद केल , मग एका हिमालयातल्या गुप्त त्रिकाळ गुहेत-स्वत:च्या परम भक्ताकडे सोपावल.. आण त्या भक्ताला सांगीतल , " कलियुगात इची सुटका होईल ,तेव्हा ह्या धरतीवर म्या स्व्त:हा पुन्हा एकदा जन्म घेईल! तो पर्यंत हीला बंदिवासात ठेव !"

"रघुबाबा ,त्रिकाळ गुहा म्हंणजेच समर्थांच्या गुहेबदल तर बोलत नाही आहात तुम्ही !" समर्थ जरासे आश्चर्यकारक नजरेनेच पाहत म्ह्नाले.

" काय,म्हंजी तुम्ही समर्थांना वळखता व्हई!"

" होय बाबा तस म्हणायला आमच्या पुर्वजांची वागणुक पहिल्यापासुनच सत्याच्या बाजुनी होती आणि अद्याप आहे..म्हणुनच समर्थांची..आमच्या राझघराण्यावर कृपाच झाली..आमच्या घरात काही शुभ कार्य असेल तर त्या वेळेस ते आमच्या आमंत्रणाला अगदी मान देऊन उपस्थीत राहयचे."

"काय म्हंतासा महाराज! अव मग असं असल तर तुम्ही त्यांना बोलावून घ्या की!" रघुबाबा म्हणाले.

" होय रघुबाबा ! तुम्ही आम्हाला मदत करण्यास नकार दर्शवला त्याच दुस-या दिवशी आम्ही प्रधानजींना समर्थांना निरोप पाठवण्यास सांगितल होत."

" व्हत म्हंजी?" न समजुन रघुबाबा म्हणाले.

" म्हंणजे आज धरुन पाच दिवस झाले आहेत ,परंतु अद्याप समर्थांचा निरोप आला नाहीये,आणि असं पाहिल्यांदाच होत आहे ,कारण ह्या अगोदर जेवढे निरोप समर्थांना दिले गेलेले..ते एकतर दीड किंवा दोन दिवसांतच मिळाले होते." महाराजांनी आपली बाजु मांडली.

" म्हंजी दोन्ही मार्ग बंद झाल हाईत तर !" रघुबाबांनी काठीवर दोन्ही हातांची पकड मजबूत केली व निराशेनेच खाली पाहिल की तेवढ्यातच मागुन एक आवाज आला.

" एन संकटाच्यावेळेस जर जगातले सर्व मार्ग बंद झाले असतील ! " रघुबाबा,महाराज-महाराणी तिघांसमोर यु.रा:रुपवती चालत आल्या व उभ्या राहून पुढ्या म्हणाल्या.

" तर एक मार्ग नेहमीच तुमच्या साठी कायम उघडा असतो! " यु.रा:रुपवतीने आपला एक हात थोडवर केल व पुढे म्हणाल्या.

" परमार्थ... देवाचा मार्ग!"

" वा! " रघुबाबांनी एकवेळ युवराज्ञी रुपवतीकडे पाहील.गौरवर्ण काया, टपोरे पाणीदार डोळे ,अंगावर एक निळी साडी ,केसांत चाफ्याचा गजरा..हातात सोन्याच्या बांगड्या..गळ्यात एक कंठहार , त्यासोबतच

एक काळा दोराही होता.

" काय ग पोरी कोण तु? तुझ इचार तर कोण्या साधुसंतालाही लाजवतील अस आहेत बघ.!" रघुबाबांनी यु.ज्ञी:रुपवतीकडे हसतच

पाहत हे वाक्य उच्चारल.

" बाबा,ही आमची एकुलती एक कन्या आणि राहाजगडच्या युवराज्ञी रुपवती आहेत." महाराजांनी आपल्या लेकीची ओळख रघुबाबांना मोठ्या गर्वाने करुन दिली...बोलताना त्यांची मान जराशी उंचावली गेलेली.

" महाराज तुमच्या लेकीवर तुम्ही लेय चांगले संस्कार केले आहेत बघा ! हे तिच्या बोलण्यातूनच समजत हाई." रघुबाबा पुन्हा म्हणाले.

" आईसाहेब ,आम्ही जरा बाहेरुन जाऊन येतो!" अचानक युवराजांचा ही मागुन आवाज आला.सर्वांनी रघुबाबा ,महाराज-महाराणी दोघांणीही आवाजाच्या दिशेने पाहील. युवराज सुरजसेन तैयार होऊन कुठेतरी जायला निघालेले.त्यांचे कपडे एका इंग्रज आधिका-या सारखे होते.

" हे कोण!" रघुबाबा म्हणाले. त्यांच्या ह्या वाक्यावर महाराज काहीही बोलले नाहीत.उलट महाराणींनीच त्यांची ओळख करुन दिली.

"हे आमचे एकुलते एक पुत्र ,राहाजगडचे युवराज सुरजसेन!" महाराणींच्या ह्या वाक्यावर यु.रा:सुरजसेन चालतच बागेत आले. त्यांच्या चेह-यावर नविन अनोलखी मांणस दिसल्यावर जसे भाव असतात तसे भाव होते..समोर एक जाडा-टक्कल पडलेला, कपालावर तीन रेषांच पांढर भस्म फासलेला..वरच अंग उघड -तर खाली एक काळ धोतर नेसलेला म्हातारा म्हंणजेच रघुबाबा एका खुर्चीत बसलेले..तर त्यांच्या मागे लुकडा स्ंत्या उभा होता.

" हे कोण?" यु.रा:सुरजसेन यांनी महाराणींनी विचारले. त्यांच्या ह्या वाक्यावर महाराणींनी त्यांची इत्यंभूत माहिती युवराजांनी कळवली.त्यावेळेत रघुबाबा एकटक सुरजसेन यांच्या डोळ्यांत डोळे घालुन मंदस्मित हास्यकरत पाहत होते.

युवराजांना तर एकवेळ रघुबाबा कोणि वेडाच आहे अस वाटलं.

की तेवढ्यातच त्यांच्या मनातले भाव ओळखल्यासारखे रघुबाबा मान हळवुनच हसले.

" ठीके येतो आम्ही!" यु.रा:सुरजसेन जणु त्यांना रघुबाबांशी काहीघेण-देन नसल्याप्रमाणे निघुन गेले,म्हंणजे जायला निघाले.

" एन मोठयांचा मान ठेवायला तरी शिका युवराज! ते आपली इतकी मदत करत आहेत,त्यांच्याबदल तुम्हाला काहीच वाटत नाही का?"

महाराज आवाज चढवुन म्हणाले. परंतु यु.रा:सुरजसेन यांनी मागे वळुन पाहिल नाही ते पाठमोरे उभे राहुनच म्हणाले.

" तुम्ही ठेवताय तेवढ मान बस्स आहे! आमच्याकडून अपेक्षा करु नका:!" यु.रा: सुरजसेन अस म्हंणतच बागेतुन बाहेर आले..पुढे त्यांची घोडागाडी थांबलेली, त्यातच ते बसण्यासाठी जाणार की तेवढ्यात एका स्त्रीचा मागुन आवाज आला. "युवराज??" आवाज येताच यु.रा:सुरजसेन यांनी मागे वळुन पाहिल. त्यांच्या नजरेस प्रथम मेघावती दिसली,तिच्या अश्रुंनी डबडबलेला चेहरा दिसला, विस्कटलेले केस ,

डोळ्यांखालच काजळ अश्रुंमुळे विशीष्ट प्रकारे डोळ्यांभोवताली गोळ आकारात पसरलेल. तिच हे रुप पाहुन तिच्यासमवेत काहीतरी भयानक घडल आहे हे युवराजांना कळायला वेळ लागला नाही. तिने येऊन थेट युवराजांना मिठी मारली...हुंदके देत रडू लागली.

इकडे बागेत महाराज-महाराणी,युवराज्ञी रघुबाबा सर्वजन सुद्धा हे दृष्य पाहत होते. कोण कुठली मुलगी ?..असंच राझघराण्यात येऊन युवराजांना हाक काय मारते ?..मीठी काय..मारते? महाराज आपल्या खुर्चीतुन खाडकन उभे राहिले.

" कोण आहे ही मुलगी?" महाराजांनी महाराणींकडे पाहिल..महाराणींची

मान जराशी झुकली गेलेली.

" महाराज म्या काय म्हंतु !" आतापर्यंत रघुबाबा ही खुर्चीतुन ऊठून उभे राहिलेले हातातली ती जाड काठी जवळ धरलेली. त्यांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी फक्त होकारार्थी बोला अस म्हंणत मान हळवली.

" महाराज मला तुमच्या राझघराण्यात घडणा-या कुठल्या बी मामल्यात जरासा भी हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही, पन त्या पोरीची ही अवस्था पाहुन आपन ह्या ईषयावर नंतर बोललेच बर हाई अस मला वाटतंय ! तसंबी ती कायतरी सांगत हाई !" रघुबाबांनी आपल मत मांडल.

" हम्म! बरोबर आहे तुमच!" महाराजांनी होकार दर्शवला.

" मेघा..! मेघा.." यु.रा:सुरजसेन यांनी मेघाचे दोन्ही खांदे पकडले , मीठी सोडवली..तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाले.

" काय झाल !... आणि तु रडते का आहेस ?...आधी..शांत हो पाहू."

" ते आलेत , ते आलेत..!..त्यांनी माझ्या बाला मारल...! "

" कोण...कोण आले..आहेत मेघा." यु.रा:सुरजसेन यांनी मेघाला जरा स्पष्टपणे विचारल..परंतु तिच्या डोळ्यांसमोर हळकेच अंधारी येऊ लागली..काळ उपाशेपोटीच तर रात्रभर बेशुद्ध होती ती..आता अंगात त्राणच उरला नव्हता. महाराज-महाराणी,यु.ज्ञी:रुपवती सुद्धा बागेतुन बाहेर आल्या...

" मेघा..! मेघा..बोल कोण आले आहेत ! " यु.रा:सुरजसेन यांनी हळकेच मेगाच्या गालांवर हात आपटल..तशी ती अर्धवट बेशुद्धवस्थेच म्हणाली.

" सै...सै...सैतानऽऽऽऽऽऽ" मेघाच्या ह्या वाक्यावर तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या चेह-यावर एक आश्चर्यकारक भीती पसरली. सर्वांचे डोळे विस्फारले गेले. यु.रा:सुरजसेन यांनी मेघाला उचल्ल व महालात घेऊन गेले.

" रघुबाबा..तुम्ही ऐकलत ती मुलगी काय म्हणाली." महाराज आश्चर्यकारक नजरेने रघुबाबांकडे पाहत म्हंणाले.

" व्हय महाराज. !" रघुबाबांनी महाराजांकडे पाहिल.

×××××××××

आकाशातले काळे-सफेद ढग वेगाने एका बुलेट ट्रेन प्रमाणे पुढे-पुढे सरकत निघालेले...तसा सूर्यही वर-वर जात एक फेरी डोंगरमाथ्याखाली गडप झालेला..सकाळची वेळ अगदी वेगाने निघुन जात दुपार उलटलेली मग..दुपारही उलटून संध्याकाळ झालेली.

सर्वत्र अंधाराच्या कोळ्यांच काळजळमट पसरलेल...वातावरण कस

एका दुषीत अपघात झालेल्या भग्न्हींत इमारतीच्या सांगाड्यासारख भासत होत.किरकिर करत रातकिडे मृत्युची धुन वाजवत होते.का-का करत कोठे अंधारात कावळा कोणी मरतो की काय असा अभद्रपणे ओरडत होता. एक मोठी घुबड आकाशातुन पंख फड-फडवत पुढे चालली आहे...तिचे डोळे कसे लाल रक्तासारखे धारधार आहेत..नाक नकटा आहे...ज्याने ते सोज्वळ रुप अंधारात,रात्री अपशकुनी दिसत आहे ,भासत आहे. पंख -फडफडवत ती घुबड एका चार सळ्यांच्या खिडकीत जाऊन बसली..! त्या घुबडाच्या मागे एक खोली दिसत होती..आणि त्या खोलीत पसरलेल्या कंदीलाच्या तांबड्या उजेड़ात..मागे पांढ-या चादरीचा पलंग दिसत होता..आणि त्या पलंगाच्या पांढ-या चादरीपासुन दोन फुटांवर हवेत तरंगणारे दोन पैजण घातलेले पांढरेशुभ्र पाय..जणु जणु कोणि फास लावून घेतल असाव द्रुष्य होत ते.

एन सांजवेळेस समयी रामु सावकार वाड्यातल्या अंगणात असलेल्या

झोपाळ्यावर बसला होता.तो झोपाळा रामु सावकाराला घेऊन पुढे-मागे करकरत झुलत होता.रामु सावकाराच सर्व लक्ष खाली जमिनीवर स्थिरावलेल..डोक्यात काल महाराणी-युवराज्ञींचे बोल घुमत होते..

मग तेच-तेच दृष्य कल्पनाशक्तिने दिसल जात , डोक्यात रावण शिरत होता. राग उफाळून वर वर येत होता.

" अव !..." ढमाबाई जरा लगबगीने चालतच अंगणात आल्या.वाड्या बाहेर असलेल्या लाकडी खांबांना दोन मशाली अडकवलेल्या..त्यांचा उजेड पुर्णत अंगणात पडलेला.ढमाबाईंचा आवाज रामुने ऐकला..परंतु प्रतिउत्तर दिल नाही...तो खालीच पाहत राहिला.

" अव ,मेघाने काल रातपासुन काय खाल्ल नाय बघा! आण कालपास्न खोलीच दार लावुन बसली हाई, !"

" काय ?"पोरीचा विषय निघताच रामुने खाडकन वर ढमाबाईंकडे पाहिल व पुढे बोलु लागला.

" आण तुम्ही हे आम्हांस्नी आता सांगताय व्हय! "

" सकाळच्याला मेघा अंघोळ धुण्यासाठी बाहेर आली व्हतु...मग आम्हाला वाटल की, तिच मन आता हलक झाल असल आता."

" बस्स!" रामु सावकाराने आपला एक हात वर करत तो विषय तिथेच थांबण्यास सांगितल." ह्यो ईषय आता वाड्यात कधी काढु नका!"

रामु सावकार झोपाळ्यावरुन उठलुन." चला ! आम्ही समजावतु शालुबाईंना!" सावकार,व ढमाबाईं वाड्याच्या दारातुन आत घुसले..हॉलमध्ये असलेल्या लाकडी जिन्यावरुन चालत जात दुस-या मजल्यावर पोहचले.शालुच्या खोलीच दार बंद दिसत होत.

बाहेरची कडी खुली होती ह्याचा अर्थ दार आतुन लावल गेलेल..

सावकार ,ढमाबाई दोघेही दरवाज्यासमोर उभे राहिले.

" शालुबाई!" पहिल्या हाकेला कसलाही प्रतिउत्तर आल नाही. तसा सावकाराने एकवेळ दरवाज्याकडे मग ढमाबाईंकडे पाहिल ,पुन्हा हाक दिली.

" ओ शालुबाई! हे बघा.. जे झाल ते झाल. आता जे आपल्या नशिबातच

नाही ते मिळत व्हय कधी....मग तुम्ही काऊन जिवाला लाऊन घेता हो.

माझ ऐका? सोडा त्यो राग.आण बाहेर या पाहु." सावकार म्हणाला.परंतु त्याच्या ह्या वाक्यावर आतुन कसलही प्रतिउत्तर आल नाही.

" अहो मालक ! आपली शालु उत्तर का देत नाय ओ!.तिन स्व्त:च काय बर वाईटत तर केल नसल ना!"

" काय. !" सावकार ओरडलाच." अव काय येड लागलय का तुम्हाला!

आमची शालुबाई तसल्यामधली न्हाई! हिम्मतवर हाईत त्या. ते हे असल काय बी करणार नाहीत." सावकार जरी वर-वर अस म्हंणत असला तरी एकंदरीत त्याच्याही मनात आपल्या लेकीने जीवाच काही बर वाईट तर केल नसेल ना हा विचार क्षणाक्षणाला टोचत होता.

" ओ शालुबाइ! अहो काय बारीक पोरांसारख करताया..खोला की दार!" सावकाराने दर ठोठावल परंतु आतुन कसलेही प्रतिउत्तर येत नव्हत.क्षणा-क्षणाला सावकाराच्या मनात धडकी भरली जात होती..

आपल्या शालुने फास तर लावुन घेतल नसेल ना? काल दिवसभर तिच्या चेह-यावर झळकणा-या आनंदाला असा तडा गेला होता की ती नैराश्यात जाण साहजिकच होत..परंतु तो दुख..साधारण मुळीच नव्हता.

" काय झाल बा !" मागुन लंक्या संत्या दोघेही वर आले.ढमाबाईंनी दोघांनाही काल दिवसभरात जे काही घडल ते सगळ जसच्या तस सांगितल..सर्वप्रथम तर लंक्याच्या चेह-यावर प्रसन्नतेचे भाव आले पन जस जस रात्रीचा महाराणी आल्या तो प्रसंग ढमाबाईंनी सांगायला सुरुवात केली.लंक्याच राग उफाळून आला.

" बा ! ह्या महाराणींनी आपल्या शालुची फसवणुक केली आहे..."

" लंक्याऊ ! ह्या विषयावर आपण नंतर बोलू, तसंबी म्या त्यांना सोडणार नाय ! पन अगोदर शालुबाईनी दरवाजा उघडायला हव."

" दाजी तायडे ! म्या काय म्हंतु !"संत्याने सावकार ढमाबाई दोघांकडे पाहिल व पुढे म्हणाला." आता दार ठोकून काय बी फायदा नाय!"

"ए मामा काय..! म्हंणायचय काय तुला! माझी बहिण तस काय बी करणार नाय , ती लय हुशार हाई!" लंक्या म्हणाला.

"लंक्या ,दाजी मला बी माहीती हाई , पन कव्हा पास्न आपन दार ठोठावताय? दार उघडल जात हाई का?नाही ना !"

" हा म..!" लंक्या न समजुनच इतकेच म्हणाला.

" मग आता आपण दार तोडून टाकुयात!" संत्याच्या ह्या वाक्यावर

रामु सावकाराने लंक्याकडे पाहिल, दोघांनाही ती युक्ती पटली गेलेली.

" ठिक हाई ! आता हा एकच मार्ग उरला हाई ! तोडा दार?"

सावकार म्हणाला.त्याच्या ह्या वाक्यावर संत्या लंक्या दोघेही दाराला एक-एक खांदा लावून उभे राहिले.दोघांनीही एकमेकांना पाहत डोळ्यांनी इशारा करत पाहिला धक्का दिला.

" धाड.." दार तुटल नाही.

" धाड..धाड.." दुस-यांदा दोन ध्कके दिले परंतु दार तुटल नाही.

" धाड,धाड,धाड,धाड " तिस-या फेरीला एकुन चार धक्के दिले तिसरी फेरी होऊन जसा चौथा धक्का दाराला बसला दार धाडकन खाली कोसळल. दार तुटताच सावकार ,ढमाबाई,लंक्या आणि मग शेवटला खांदा चोळतच संत्या खोलीत आला आणि पुढील दृष्य पाहुन जागीच थिजला..डोळे विस्फारले ,जीभ थोडी बाहेर आली.. अंगावर कसा सरसरुन काटा आला.

कारण समोर..शलाकाने माळ्यावर असलेल्या एका जाडजुड लाकडाला दोर बांधुन फास घेतला होता. तिने आपल्या अंगात नव्या नवरीसारखी एक लाल साडी घातलेली..तोंडाला मेकअप मारलेल..डोळयात काजळ घातलेल..गळ्यात दाग-दागीने घातलेले..एका नव्या नवेली..वधु सारखी नटली होती..ती.परंतु तिच्या अंगातला आत्मा कधीचच हा जग सोडुन गेला..होता..मागे फक्त भेसुर रुपाच फास घेऊन लटकणार प्रेत राहिल होत..तीच रुप त्या तांबड्या अंधुक उजेडात पुढील प्रमाणे दिसत होत..ते डोळे फास घेतल्या नंतर..सुटकेसाठी डोळ्यांतुन निघालेल्या अश्रुमुळे..ते काजळ विशिष्ट प्रकारे वटारलेल्या सफेद बुभळांच्या डोळ्यांन खाली गोल वर्तुळा आकारात लागल जात काळ विकृत हिडीस बनवुन गेलेल...ओठांना लावलेली लाल भडक लाल लिपस्टिक वितभर बाहेर आलेल्या जिभेला लागली होती..ते सोज्वळ कोमळ रुप आता भयाण हिडिस भासत होत...जे पाहुन अंगावर सर्रकन काटा येत होता..

अंगावरचा एक नी एक केस भीतीने उभ राहत होता..

ढमाबाई, सावकार ,लंक्या तिघांनीही जागेवर हंबरडा फोडला...

शलाकाच प्रेत सोडवुन खाली पलंगावर ठेवल..!

" दाजी ,म्या लोकांस्नी बोलुन मयताची तैयारी करतु!"

काहीवेळ अर्ध्या तासा नंतर संत्या म्हणाला.

" नाय...! माझी पोर मेली नाय..! जिती हाई ती ! " सावकार गरजला.

सावकार वटारलेल्या डोळ्यांनीच संत्याकडे पाहु लागला.ज्या नजरेला नजर देन संत्याच्या हिमती बाहेर होत..

" आबा , स्व्त:च्या मनावर काबू ठेवा." लंक्याने सावकाराच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिल..! शेवटी सावकाराचाच तर खून होता तो..

" म्या बी माझी बहिण गमावलीया! आण मेलेला माणुस कधी परत येत नसतो." संत्याच्या ह्या वाक्यावर सावकार एका पिसाटलेल्या सैतानासारखा हसु लागला..त्याची आकृती त्या खोलीत असलेल्या कंदीलाच्या उजेडात विद्रूप दिसु लागली.

" अर ए येड्या! आपण त्यो दगड पुजत नाय! तर सैतान पुजतु..! हा नियम फक्त त्या दगड पुजणा-या मांणसां साठी हाई की कोणि मेल की त्यो मेलच. पन आपल्या साठी तस नाय.. आपल देव आपल्याला हव ते देतो..! " रामु सावकाराने अस म्हंणतच पलंगावर ठेवलेल्या शलाकाच्या प्रेताकडे (मयताकडे) पाहिल.तिचा चेहरा पांढरा फट्ट पडलेला..तोंड थोडस उघडलेल ज्यातुन आतले दात बाहेर आलेले.

" शालुबाईंना घेऊन स्वयंपाक घरात या !"

सावकार अस म्हंणतच दारातुन बाहेर पडला..आणि ती खिडकीबाहेर असलेली घुबड सुद्धा उडून गेली.

 

क्रमश:

×××××××××××