Gunjan - 20 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग २०

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

गुंजन - भाग २०

भाग २०.

वेद तर जागी बसल्या बसल्या आईजवळ झोपून जातो. पण दिल्लीत मात्र गुंजन वेदने कॉल नाही उचलला म्हणून काळजी करत जागी राहते. मन उगाच तिचं अस्वस्थ होत होते. नकोते विचार देखील तिच्या मनात येऊन जातात. ती आपल्या मोबाईलकडे पाहतच रात्रीची बेडवर झोपून जाते.




आज वेदला लवकरच जाग आली होती. त्याने उठून आधी आईला चेक केलं आणि नंतर मग तो तसाच आपलं आवरायला निघून गेला. आज आई घरात आहे त्यात तिला बरं नव्हतं म्हणून, तो ऑफिसला न जाण्याच ठरवतो. स्वतःच सगळं आवरुन खाली हॉलमध्ये येऊन आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसतो.


"आईची अशी अवस्था केली आहे या लोकांनी ना? आता तर यांना आईची किंमत कळली पाहिजे. मायरा आईची माया तुला पैश्यापेक्षा कमी वाटत आहे. एकदिवस तुला हे सगळं कळेल. पण तुझ्या हातून वेळ निघून गेलेली असेल. आज माझ्याच घरात तीन प्रकारच्या बायका पाहायला मिळत आहे. एक गुंजन आहे जी या सगळ्याला घाबरून आता कुठे तरी या जगासोबत मॅच व्हायला शिकली आहे. तर एक आई आहे जिने आजवर सगळयांचे मन जपून, अन्याय सहन करून शांत बसली होती. या दोघींच्या विरुद्ध मायरा जी एवढी मोठी समजते स्वतःला की आज तिच्यासोबत काय चालले आहे? याची समज देखील तिला नाही आहे. आज आईवर हात उगारून तू दाखवून दिले की, बाई माणूस देखील किती खालच्या थराला जाऊ शकते हे. मला तर मायरा तुझी कीव येत आहे. पण आता तुझा हा भाऊ तुम्हा लोकांना बिझनेस डीलने उत्तर देणार आहे.",वेद सोफ्यावर बसून लॅपटॉप बाजूला ठेवत मनातच विचार करत स्वतःशी बोलत असतो.



"साहेब, गुंजनचा फोन आला आहे तुमच्यासाठी. कालपासून पोर तुम्हाला फोन लावत आहे. पण तुम्ही उचलत नाही म्हणून मला केला आहे. जरा बोला तिच्यासोबत",रखुमाई आजी तिथं येत म्हणाल्या. त्यांचा आवाज ऐकून वेदचे विचारचक्र थांबते. तो स्वतःला शांत करत केसांवर हात फिरवतो आणि रखुमाई आजीच्या हातातुन त्यांचा फोन घेऊन कानाला लावतो.


"अहो, मी तुम्हाला किती फोन केले? पण तुम्ही उचले नाही. कुठे होतात तुम्ही? काय करत होतात?",गुंजन एका मागून एक प्रश्न अस्वस्थ होत विचारते. तिचे असे प्रश्न ऐकून वेद शांत राहतो. कारण तिच्या आवाजाने ती किती घाबरली आहे? हे त्याला कळून जात असायचे.


"अहोऽऽऽऽ तुम्ही बोला की काही.",गुंजन तो बोलत नाही हे पाहून म्हणाली.


"मी शांत आहे. हे तुला जाणवलं नाही का?",वेद अगदी शांतपणे विचारतो.


"तुम्ही शांत आहात म्हणून भीती वाटते मला तुमची. वेद मी स्वतःला लकी समजते तुम्ही माझ्या लाईफ मध्ये लाईफ पार्टनर म्हणून आहात. पण एखादा व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये असतो? किंवा त्याला त्रास होत असेल ना? तो व्यक्त होतो किंवा रागाने आदळआपट करत असतो. पण तुम्ही तसे नाही आहात वेद. मनात चाललेल्या वादळाला देखील तुम्ही तुमच्या स्वभावाने नेहमी शांत करत असतात. तेच मला नको आहे वेद. निदान माझ्याकडे शेअर करा वेद. ", गुंजनचा रडवलेला आवाज त्याच्या कानी पडतो. तसा तो शांत होतो. त्याच्या श्वासाचा आवाज हळूहळू तिच्या कानापर्यंत पोहचत असतो. ते दोघे काहीवेळ एकमेकांना अनुभवत असतात.


"गुंजन, मी नाही व्यक्त होऊ शकत सॉरी. बट तू मला सावरून घेशील ना? मला कधी सोडून नाही ना जाणार?",वेद हळू आवाजात तिला विचारतो.



"वेदऽऽऽऽ काहीही बोलू नका!!मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. शेवटचा श्वास देखील तुमच्या जवळ घेऊनच सोडणार आहे. तुमचा स्वभाव चांगला आहे. मी तर बिझनेसमन लोकांना रागावताना पाहिले आहे. पण तुम्ही मात्र, अगदी शांत राहून सगळयांना उत्तर देत असतात. अस नाही हो कोणाला जमत. मुलगा म्हणजे रागीट असा असतो. घरात थोडफोड करून हट्टीपणा दाखवून आपली मनमानी करतो. असे मी जवळून पाहिलं आहे माझ्या घरात. पण एक मुलगा शांत, मार्गदर्शक देखील असू शकतो? याचा अनुभव तुम्ही मला करून दिला आहे. जेव्हा मी घाबरली तेव्हा मला धीर देऊन पुढे आणलं आहे. तुम्ही जगातील माझ्यासाठी बेस्ट व्यक्ती आहात. आता मी तुमच्यावर पंधरा दिवस भरभरून प्रेम करणार आहे.",गुंजन अस कॉल वर बोलत असते आणि तो आवाज त्याच्या जवळ पास देखील त्याला ऐकायला येत असतो. तसा तो उठून उभा राहतो. नकळतपणे तिचे बोलणं ऐकून त्याचे डोळे किंचितसे पाणावतात. पण काही क्षणासाठीच हे असत. कारण दुसऱ्याच क्षणी तो समोर पाहतो तर गुंजन कानाला फोन लावून भरल्या डोळयांनी त्याच्याकडे पाहत असते, असे त्याला दिसतं. तसा तो भलताच शॉक होतो.


"वेद आय लव्ह यू!!",गुंजन अस म्हणून पटकन त्याला पाहून मिठी मारते. तिचा स्पर्श होताच वेद गोंधळतो. पण आता गुंजनला पाहून मात्र रखुमाई आजी हसूनच तिथून निघून जातात. गुंजन अगदी लहानमुलीसारखी त्याला घट्ट पकडून उभी असते. वेद देखील स्वतःला सावरत तिच्या भोवती हातांचा विळखा घालतो आणि तिला कुरवाळायला लागतो.




"वेद मी सेमी फिनालेला पोहचली आहे. त्यांनी सुट्टी दिली आहे म्हणून मी आली तुमच्याकडे. सगळ्यात जास्त मी ही मिठी मिस केली. तुमचे श्वास, परफ्युम सगळं काही तुमचं मिस केलं मी",गुंजन त्याच्या मिठीत राहून त्याच्या छातीवर स्वतःच डोकं घासत म्हणाली. तिला इतक्या जवळ पाहून वेदला भरपूर आनंद होतो. त्यात तिचे बोलणे ऐकून तो आनंद दुप्पट पटीने वाढतो.


"गुंजन, मी देखील तुला मिस केलं. लव्ह यू गुंजन. आय लव्ह यू लॉट ऑफ. ",वेद जड आवाजात स्वतःची मिठी घट्ट करत म्हणाला. वेदच अस जवळ घेणं तिला जास्त आवडत असायच. तो वेगळा असल्याने, स्पर्शाने तिच्यावर हक्क दाखवत असायचा. गुंजन स्वतःचा चेहरा वर करून त्याला पाहते आणि हळूच त्याच्या भोवतीचे स्वतःचे हात काढून त्याच्या गळ्यात गुंफवते. तसा वेद हसूनच तिच्या कमरेवर स्वतःचे हात रोवत तिला जवळ घेतो. तो थोडासा झुकून अगदी हळुवारपणे तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो. तशी ती स्वतःचे डोळे बंद करून घेते. वेद काहीसा हसूनच मग अलगदपणे तिच्या गुलाबी ओठांवर स्वतःचे ओठ टेकवतो. तशी गुंजन अंग चोरून घेऊन त्याच्या भोवतीचा एक हात काढून तो त्याच्या केसांवर नेते. वेद आधी हळूहळू तिच्या ओठांना आपलंसं करत असतो. ती देखील बेभान होऊन त्याला प्रतिसाद द्यायला लागते. एवढा दिवसाचा दुरावा दोघे अशाप्रकारे भरून काढत होते. गुंजनला श्वास घेणं जड पडत तसा वेद हसूनच तिला पाहत तिच्या ओठांना सोडतो आणि हसूनच तिला ओढून स्वतःच्या मिठीत घेतो.



"अश्याप्रकारे गोड गिफ्ट द्यायचं होत का मिसेस वेदला? पण माझं मन नाही भरलं त्यामुळे बाकीच मी रात्री पाहीन. माझी मॉर्निंग स्वीट केल्याबद्दल थँक्यु मिसेस वेद",वेद हसूनच तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला. त्याच अस बोलणं ऐकून ती लाजून त्याच्या शर्टमध्ये स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते.



"सगळं बदलले तरीही हे लाजून चुर होणं नाही बदलले आणि आज अशी साडी घालून आली तर कस कंट्रोल करेल ना कोणी?",वेद तिला बाजूला करत म्हणाला. त्याच बोलणं ऐकून ती हसूनच कपाळावर हात मारते. कारण समोर जो होता ना? त्याच लक्ष तिच्या प्रत्येक हालचाली वर असायचे. हे पाहून ती तसं करते.



"अहो, आपण खूप दिवसांनी भेटणार ना. म्हणून मला तुम्हाला अस जवळ ठेवायचे होते माझ्या. त्यासाठी साडी घातली मी.",गुंजन वेदच्या डोळ्यात पाहत म्हणाली.


"मी नेहमीच तुझ्या जवळ असणार आहे. मग तू कशीही असली तरीही. कारण मी गुंजन तुझ्या मनावर प्रेम केलं आहे. या तुझ्या निर्मळ असणाऱ्या हृदयावर प्रेम केलं आहे. ",वेद तिच्या हृदयावर स्वतःचा हात ठेवत म्हणाला. त्याचा त्या जागी हात पाहून तिच्या हृदयाची स्पंदने वाढायला लागतात. ती डोळयांनीच त्याला दटावत असते. पण तो मात्र तिला इग्नोर करत तिचा नाजूक हात स्वतःच्या हृदयावर ठेवतो.



"या मुळे मला कळून चुकलं होत की तू येणार आहेस. कारण हे जरिही माझ्याकडे असलं ना? तरीही ते तुझ्या हार्टबिट्स सोबत मॅच होत असत. आता जर तू शांतपणे ऐकलं ना तर नक्कीच कळेल तुला ते एकाच गतीने वाजत आहे.",वेद हळू आवाजात म्हणाला. पण त्याचं बोलणं ऐकून ती मात्र गोंधळून त्याला पाहते. कारण आता त्या दोघांच्या हृदय एकाच स्पीडणे वाजत होते आणि ते तिला चांगल्या प्रकारे कळत होतं. ती स्वतःला सावरत वेदचा हात बाजूला करते. तशीच ती तिथून हसून रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते की, तेवढ्यात वेद भानावर येत तिच्या साडीचा पदर मागूनच ओढतो. तशी गुंजन लाजून जागीच थांबते.


"वेद नो मस्ती हा. सोडा मला. मी रात्री झोपले पण नाही. फ्रेश होऊन मग मी तुमच्या जवळ येऊन झोपणार आहे.",गुंजन मागे न बघता म्हणाली.



"ते तर मी घेणारचं आहे. पण आपल्या रूममध्ये नको जाऊ. वर आई झोपल्या आहेत. तू खालच्या रूममध्ये जा. मी पण येतो.",वेद म्हणाला. पण त्याच बोलणं ऐकून ती शॉक होते.



"आई? त्या इथे कसे काय?त्या घरात असताना तुम्ही अस करत होतात? त्यांनी पाहिलं ना तर माझ्याबद्दल गैरसमज करतील. लाज वगैरे सोडून मी अस किस केलं तुम्हाला. ओ गॉड वेद तुम्हाला आधी सांगता येत नव्हतं का? त्यात माझी साडी पण अशी आहे? तुम्ही एकटे असशाल म्हणून सिव्हलेस आणि बॅकलेस घातला ब्लाऊज मी. पण आता मलाच कसतरी वाटत आहे. सासूबाई समोर अस काही घालून जायला.काय विचार करतील त्या माझा...",गुंजन गोंधळून त्याच बोलणं ऐकून भीतीने एकटीच त्याला पाहत बडबडत असते. तसा वेद तिची बडबड ऐकून हसूनच तिच्या तोंडावर स्वतःचा हात ठेवतो. तशी ती वैतागून त्याला पाहते.









क्रमशः
------------------