Gunjan - 4 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग ४

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

गुंजन - भाग ४

भाग ४.



मागील भागात:-

"गुंजन चॅनेलचे १ मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत. त्यात तुझा व्हिडीओ २० लाख लोकांनी पाहिला आहे.त्यामुळे तुला बऱ्याच इंडस्ट्रीकडून फोन येत आहे. हे तर आनंदाची गोष्ट आहे यार आणि तू कसा चेहरा करून बसली आहे. चल खुश हो!!"वेद हसूनच बोलतो.



"व्हिडीओ कसा मिळाला तुम्हाला? तुम्ही ओळखता काय मला आधीपासून?"गुंजन त्याच्याकडे नजर रोखुन पाहत बोलते. तिचं ते बोलणं ऐकून तो शांत होतो.

आतापासून पुढे:-

वेद काहीवेळ शांतच राहतो. कारण गुंजनला काय सांगावे? याचा तो विचार मनातच करत असतो. पण त्याला तिच्यापासून काही लपवायचे नव्हते. त्यामुळे तो एक मोठा श्वास घेतो आणि सोडतो.


"तुला मी जेव्हा पासून पाहिले ना? तेव्हापासून वेडा झालो होतो मी तुझ्यासाठी!! तुला मी एका स्पर्धेत पाहिलं आणि त्यानंतर नेहमी तुला शोधायचा प्रयत्न केला. पण तू भेटलीच नाही मला. त्यामुळे मग मला तुझं लग्न करत आहे, अस समजलं. मग मला काही कळत नव्हते. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना सांगितले आणि त्यांना तुझ्या घरी नेले. पण तिथे गेल्यावर तुझ्या वडिलांनी नकार देण्याचा प्रयत्न केला. मग मला डील करावी लागली त्यांच्यासोबत" वेद अगदी शांतपणे म्हणाला.त्याच ऐकून गुंजन अविश्वासाने त्याला पाहायला लागते. पण आज खरं काय आहे? हे तिला कळायला हवे, याचा विचार करून तो आज तिला सगळं सांगायला तयार होतो.



"सॉरी, अशी डील करणे चुकीचे आहे. पण, मी जर काही केलं नसत तर तू चुकीच्या हातात पडली असतीस आणि मला ते मान्य नव्हते!! त्या कारणाने मी असा वागलो" वेद तिची नजर पाहून म्हणाला.


"कसली डील केली तुम्ही माझ्या वडिलांसोबत? मला कळलं पाहिजे सगळं" गुंजन भरल्या डोळयांनी म्हणाली. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी डील केली. हे ऐकूनच तिला वाईट वाटत.


"आठ कोटी घेतले त्यांनी माझ्याकडून. साताऱ्याचा प्रोजेक्ट त्यांना दिला आम्ही. तुझ्यापेक्षा काही महत्त्वाचे वाटलं नाही आम्हाला त्यामुळे अस केले. खरंच सॉरी. पण पर्याय नव्हता माझ्याकडे. कारण माझे प्रेम आहे गुंजन तुझ्यावर!!"वेद तिच्याजवळ येत तिचे डोळे पुसत म्हणाला. त्याच ऐकून गुंजनला भरून येते. काहीही ओळख नसताना वेदने एवढं काही केलं की, ज्याचा विचार देखील तिने कधी केला नव्हता. एक अनोळखी असा होता तो तिच्यासाठी. पण तिचा स्वतःचा बाप स्वतःचा असून देखील तिचा नाही बनला!! याच विचाराने तिला रडायला येत.


"माझे बाबांनी इथं पण मला विकल. खरंच कधी त्यांनी मला स्वतःची मुलगी समजले नाही. हे, आज सिध्द केले त्यांनी आणि तुम्ही अनोळखी असून माझ्यासारख्या मुलीसाठी एवढं सगळं केलात? काय बोलू मी तुम्हाला? मला कळत नाही आहे वेद"ती रडतच हुंदके देत म्हणाली. तिचे हुंदके ऐकून तो मागचा पुढचा विचार न करता तिला मिठीत घेतो. तशी ती घट्ट पकडून त्याच्या मिठीत राहून रडायला लागते.


"शु$$$, शांत हो!! मला माहिती आहे तुला काय वाटत आहे ते? पण एक नक्की सांगेन सगळेच लोक सारखे नसतात ना गुंजन. अगदी हाताच्या बोटांसारखे असतात बघ. कोणतेच बोट सारखे नसत. तसेच लोकांचे स्वभाव आणि विचार असतात. त्यामुळे सगळयांना एका तराजूत बसवून तू त्यांना मापू नको!! बस्स, एवढीच इच्छा आहे माझी" वेद तिला समजावत तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला. त्याच म्हण ऐकुन ती शांत होते. पण अजिबात त्याला सोडायला पाहत नाही. त्याच्या मिठीत का कोणास ठाऊक पण एक वेगळेपणा तिला वाटतं असतो. एकदम अस सेफ तिला वाटतं. त्याच्यापासून दूर होऊच नये!! अस देखील तिला वाटत. त्यामुळे तिच्याही नकळत ती त्याला घट्ट पकडून ठेवते. वेद तिला काहीतरी सांगत असतो, पण ते तिच्या कानापर्यंत पोहचत नव्हते. तसा तो काहीसा विचार करून तिला दूर करत असतो, पण ती बिलकुल त्याला सोडायला पाहत नाही.


"गुंजन, गुंजन.. सोड मला!! मी कुठे पळून जात नाही आहे काही" वेद हसून म्हणाला.


"नका ना जाऊ तुम्ही कुठे. तुम्हाला माहीत आहे का आजवर मी ना बाबांना सोडून कधी अशी कोणाच्या मिठीत नाही गेली. पण, आज तुमच्या मिठीत मला सेफ अस वाटतं. बाबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण ते काम असलं माझ्याकडे की, प्रेमाने वागायचे माझ्यासोबत. त्यांच्या मिठीत पण मला असा अनुभव नाही आला. जो तुमच्या आला. अस का झालं असेल बर?" गुंजन त्याच्या मिठीत राहून मान वर करून त्याला म्हणाली. तिचं म्हण ऐकून तो गालात हसतो. उफ्फ!! किती क्युट आणि इनोसेंटपणे ती विचारात होती त्याला? तो देखील काही क्षण तिचा फेस पाहून तिच्यात हरवून गेला होता.


"कारण जिथे प्रेम आणि विश्वास असतो तिथे सेफ वाटत. मी तर तुला चुकीच्या विचाराने स्पर्श केला नाही. मी जसा आहे तसाच वागतो. त्यामुळे तुला वाटतं असेल. बाकी काहीच नाही" वेद भानावर येत म्हणाला.


"आपलं लग्नाच्या दिवशी पहिल्या रात्री पण तुम्ही मला काही केलं नाही, अस का बरं? तुम्ही तर नवरा आहात ना माझा? मग तुम्ही इतरांसारख नाही काही केलं" गुंजन थोडीशी विचार करत म्हणाली. आज थोडी जास्तच मोकळी झाली होती ती त्याच्यासोबत. त्यामुळेच इनोसेंट प्रश्न विचारत होती.


"पहिल्या दिवशी तुझी मर्जी नसताना मला तुझ्यावर बलात्कार नाही करायचा होता गुंजन" तो एक सुस्कारा सोडत म्हणतो.



"पण तो बलात्कार कसा असू शकतो ना? बरेच जण करत असतात ना? मग? माझ्या मैत्रिणीच पण लग्न झाल्यावर तिच्या नवऱ्याने पहिल्या रात्रीच तिला टच केलं होतच की, मग तुम्ही का नाही केलं?" गुंजन त्याला जाणून घेण्यासाठी म्हणाली. तिचं म्हणणं ऐकून त्याच्या कपाळावर किंचितश्या आठ्या पडतात.



"जेव्हा एखाद्या मुलीची इच्छा नसते, तेव्हा पण आपण तिला टच करून तिची मर्जी न जाणून घेता तिला स्वतःच्या हव्यासा पोटी खराब करतो. तेव्हा पण तो बलात्कार मानला जातो गुंजन. तो बाहेर होणारा बलात्कार आणि यात काहीच नसतो फरक. फक्त हा समाजमान्य असतो. कारण नवऱ्याने केलं ना? मग त्या मुलीला काही न बोलता उलट आनंद बनवत बसतात. वंश पिलावळ जन्माला येणार ना त्यामुळे. नाहीतर त्या मुलीला समजावून सांगितले जाते. एवढाच फरक असतो. पण अशाने तिच्या मनात नवऱ्याचे स्थान कमी होत. अस माझं मत आहे. त्यामुळे तुझ्या मर्जी शिवाय आपण नातं पुढे नाही नेऊ शकत अस मला वाटत. तू थोडीशी फ्री व्हावी या घरात!! आपलं घर समजून इकडे वागत जा. काही हवं नको ते बिनधास्त पणे मला सांगत जा. मी नक्कीच आणून देईन!!"वेद तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. त्याचे विचार ऐकून तर ती त्याला भरल्या डोळयांनी पाहत असते. कारण आजवर घरातल्यांनी तिला कधीच काहीही न विचारता तिच्या आयुष्याचा निर्णय घेऊन मोकळे होत असायचे आणि एक वेद होता. जो पदोपदी तिच्या भावनांचा, मनाचा विचार करून आपल्या मनाला आवर घालत होता. त्याच प्रेम, काळजी सगळं काही त्याच्या डोळ्यात तिला दिसत होतं. पण सध्या तिला ते मान्य होत नव्हतं. वेद तिला स्वतः पासून दूर करतो आणि हसून पटकन आपला लॅपटॉप आणून तिच्यासमोर धरतो.


"काय आहे यात?"गुंजन लॅपटॉप कडे पाहून म्हणाली.



"तुझे, डान्सचे व्हिडीओ!! त्यातील मला आवडला तो मी अपलोड केला गुंजन या यु ट्यूब चॅनलवर आणि आज जे काही तू पाहते. ते सर्व क्रेडिट तुलाच आहे" वेद हसून म्हणाला. गुंजन लॅपटॉप हातात घेते आणि पाहायला लागते. त्यात तिचे बरेच डान्सचे व्हिडिओ होते. जे पाहून ती भयंकर खुश होते. ती पाहता पाहता यु ट्यूब ऑन करते आणि त्यावर चॅनेल स्वतःच सर्च मारते. त्या चॅनल वर एकच व्हिडीओ लाँच झाला होता. जो की कथक आणि हिप हॉप साँगच फ्युझन करून डान्स गुंजनने केला होता त्याक्षणीचा तो व्हिडीओ होता. त्या व्हिडीओला कितीतरी कंमेंट होत्या आणि बऱ्याच प्रमाणात त्यातील कंमेंट या पॉझिटिव्ह अश्या होत्या. कुठे तरी चार ते पाच निगेटिव्ह होत्या. त्या कंमेंट पाहून थोडीशी गुंजन नाराज होते.



"चांगल्या गोष्टीसोबत वाईट बोलणारे देखील लोक येतातच की, मग कशाला आपण त्या चार पाच लोकांकडे पाहायचे ना? पॉझिटिव्ह कंमेंट बघ किती साऱ्या आल्या आहेत आणि तू आहे की, या चार पाच कंमेंट पाहून नाराज होते.अस कस चालेल ना गुंजन? ही तर सुरुवात आहे. हळूहळू तू जेव्हा शिखर गाठशील यशाची ना? तेव्हा बऱ्याचवेळा तुला अश्या गोष्टीचा सामना करावा लागेल. त्यामुळे आतापासून सवय कर. इग्नोर करून पुढे जा" वेद तिचा पडलेला चेहरा पाहून तिला समजावत म्हणाला. त्याच तिला प्रोत्साहन देणे तिला आवडायला लागलं. ती मनातच निश्चय करते आणि त्या कंमेंटला इग्नोर करून इतर कंमेंट वाचायला लागते. जस जशी कंमेंट ती वाचत असते. तस तसा तिचा चेहरा आनंदित होत असतो.



"सिल्व्हर अवॉर्ड साठी मॅडम आपला फॉर्म भरावा लागेल मला. एक लाख सबस्क्रायबर झाले आपले. त्यामुळे यु ट्यूबचा सिल्व्हर अवॉर्ड बटन मिळणार आहर तुला. नाव काय टाकायच मेल मध्ये त्यांच्या" वेद तिच्या बाजूला थांबून मोबाईलवर काम करत म्हणाला.


"गुंजन वेद जाधव.. आजपासून माझ्या नावापुढे तुमचं नाव लागेल. कारण ज्या घराण्याने माझी कधी किंमत केली नाही. ज्यांनी माझा सौदा केला. त्या घराचे नाव मला बिलकुल लावायला आवडणार नाही" गुंजन वेदला पाहून म्हणाली. तिचं म्हणणं ऐकून तो अविश्वासाने तिला पाहायला लागतो. ती मात्र आपल्या कंमेंट वाचण्यात बिझी होते.वेद मात्र विचारात पडतो.


"खरंच मला स्वीकारले आहे का हिने? की असच काहीसे आहे? नाही एवढ्या लवकर नाही स्वीकारणार वेद ती तुला. जाऊ दे, चांगली बोलते ना तेच बस्स झालं मला. तू अशीच खुश रहा गुंजन. बाकी मला काहीच नको" वेद लॅपटॉप कडे पाहून गालात हसणार्या गुंजनला पाहून म्हणाला. गुंजन आणि तो सोबतच खाली येतात. तसे, वेदच्या घरचे काही लोक रागातच गुंजनला पाहायला लागतात. त्यांच्या नजरा पाहून गुंजन काहीशी घाबरून वेदच्या जवळ थांबते. वेद तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो. ते पाहून ती लोक आणखीन खवळतात.







क्रमशः
------------------------