Badalnare chehre - 1 in Marathi Thriller by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | बदलणारे चेहरे! - 1

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

बदलणारे चेहरे! - 1

भाग - ०१.

"बस क्रमांक अठरा, शाहूपुरी मार्गे!"

ही सूचना कानावर पडताच सर्व प्रवासी जागेवरून उठले आणि सर्वांच्या नजरा बसच्या दिशेने खिळल्या!

काहीच वेळात गर्द निळ्या रंगाची एक बस, स्थानकाआत शिरली. एकामागे-एक प्रवासी बाहेर पडले आणि बाहेर उभे असलेल्यांनी एकमेकांना धक्का देत स्वतःसाठी जागा बनवली.

दहा मिनिटे बस तिथे थांबून राहिली आणि ११ वाजून ५ मिनिटांनी घंटीचा आवाज कानावर पडताच चालकाने पायाचा दाब वाढवत बस सुरु केली.

काहीच अंतरावर जाऊन मोठा ब्रेक बसला आणि सर्व प्रवासी पुढे ढकलले गेले. सर्वांनी उठून चालकास सुनवायला सुरूवात केली.

"काय हा मूर्खपणा?"

"अरे आमची लहान मुलं आहेत; जरा तरी सांभाळून थोडं!"

"क्या ये भाई, जरा तो ध्यान दे न भाई!"

असं म्हणत सर्वच चालकास बोलू लागले. चालक प्रचंड चिडून बस समोर उभ्या मुलीकडे पाहू लागला.

समोर साधारण पंचवीस वर्षीय एक तरुणी उभी होती. बस थांबताच ती बस आत शिरली. सर्व प्रवासी तिला पाहून बरळू लागले. ती लगबगीने मागच्या बाजूस जाऊन बसली आणि पाण्याच्या बाटलीतून घटाघटा पाणी प्यायली. सर्व तिच्याकडे नजर रोखून पाहत असलेले पाहून ती चिडली!

"काय आहे? कधी मुलगी बघीतलीच नाही का?"

असं म्हणताच सर्वांनी तिच्यावरून नजरा हटवल्या! चालकाने पायाचा दाब वाढवत बस दणक्यात सुरू केली आणि पुढचा आरसा त्या मुलीवर रोखून धरला. त्या आरशातून त्याला तिचा अंग न अंग नजरेस दिसत होता.

खोल गळ्यांचा टॉप आणि शॉर्ट्स घातलेल्या त्या युवतीने सर्वांच्या नजरांना भुरळ घातली होती. किशोर ते वृद्ध सर्वच पुरुष तिच्या त्या मादक शरीरामागे वेडे झाले होते.

सर्वांवरून एक नजर फिरवत तिने पाण्याच्या बाटलीला ओठ भिडवले आणि ती बाटली रिकामी केली. पाण्याचे काही थेंब ओघळत तिच्या गळ्यावरून आत शिरले आणि तिच्या छातीचा भाग त्यामुळे उठून दिसू लागला.

चालक आरशातून तिच्या शरीराचा एकूण एक भाग पाहून वेडा झाला होता.

तिने इकडे तिकडे नजर फिरवली. तिचा विश्वास बसेल असं कोणीही तिच्या नजरेस पडलं नाही. मागच्या बाजूला डोकं टेकवत तिने डोळे मिटून घेतले.

असाच काही वेळ गेला असेल आणि एका मोहक आवाजाने ती झोपेतून जागी झाली.

"थोडं बाजूला होता का?"

तिने वर पाहिले. तो साधारण तिशीतला एक तरुण होता. पाहताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडली!

थोडी जागा करून देत तिने त्याला बसायला खुणावले. तिच्याकडे न बघताच तो जाऊन बसला.

सावळ्या रंगाचा, पण दिसायला देखणा! आकर्षक शरीरयष्टी असा तो तिच्या मनात घर करून गेला.

त्याचे तिला असे न पाहताच टाळणे सहन होत नव्हते! आजवर तिच्या शरीराने प्रत्येकालाच घायाळ केले होते. पण हा तिला साधं बघत सुद्धा नव्हता!

त्याच्या विचाराने तिला बैचेन केले. अशातंच तिने मागे डोके टेकवले आणि डोळे मिटून घेतले. हळुवार येणारी वाऱ्याची झुळूक आणि डुलणारी बस त्यात कधी डोळा लागला समजलेच नाही. पाच तासांच्या प्रवासामुळे ती निवांत झोप घेऊ शकणार होती.

साधारण तीन तासांनी तिची झोप उघडली; तेव्हा ती त्याच मुलाच्या खांद्यांवर डोकं ठेवून इतका वेळ झोपली असल्याचं लक्षात आलं. ती हळूच लाजली आणि व्यवस्थित बसून घेतले.

जिथे ती जाणार होती, त्या गावी दिवसांतून फक्त दोनच वाहनांची ये-जा व्हायची! जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाला म्हणून हा प्रवास करणे तिला भाग पडले होते.

दोन तासांनी बस गावच्या बस स्थानकावर येऊन थांबली. तिने आपले सामान उचलून घेतले आणि बाहेर पडली. बाहेर थांबून ती मैत्रिणीची वाट पाहत एका जागी उभी राहिली. रस्त्यावरून ये-जा करणारी गावातली मंडळी तिची कापडं पाहून कुजबुज करू लागली.

आजवर तिला कधीच एवढे असुरक्षित वाटले नव्हते! पण आज अनोळखी ठिकाणी या कापडात तिला विचित्रच वाटत होते. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. बसमधून तो मुलगा फोनवर बोलत उतरताना दिसला. त्याला येताना पाहून तिला हायसे वाटले.

ती थांबलेल्या ठिकाणी तो येऊन थांबला. फोनवर बोलून झाल्यावर तो तसाच उभा राहिला.

साधारण अर्ध्या तासाने तिला तिची मैत्रीण एका मुलाच्या दुचाकीवरून येताना नजरेस पडली. हात दाखवत तिने उभं असल्याचे खुणावले. तो मुलगा सुद्धा त्याच दिशेने हात दाखवत असल्याचे तिला जाणवले. तिला काहीच समजेना!

दोघेही जवळ येत दुचाकीवरून उतरले. मैत्रीण तिच्या दिशेने येत बोलली,

"कशी आहेस?"

"मी मस्त! हा कोण?"

"अग हा माझा होणारा नवरा, कुमार."

"अच्छा!"

तिची नजर त्यालाच पाहण्यात व्यस्त असलेली पाहून मैत्रिणीने तिची मस्करी केली.

"पण तुला दुसऱ्याच कोणात इंटरेस्ट दिसतोय?"

"हो ग. कसला हँडसम आहे बघ ना."

"बापरे! The most beautiful Jennie! तू कधीपासनं मुलांच्या प्रेमात पडायला लागलीस?"

"त्याच्यात काही तरी वेगळं आहे!"

"चल जाऊदे. तुला मी माझ्या होणाऱ्या नावऱ्यासोबत भेटवते."

मैत्रिण हात पकडत तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्या जवळ घेऊन गेली.

"कुमार, ही माझी कॉलेजची मैत्रीण आहे."

"हॅलो मिस?"

"मिस. जेनी!"

"Nice name."

मैत्रिणीचा होणारा नवरा जवळीक साधताना पाहून त्या मुलाने मध्यस्ती केली.

"कुमार चल ना निघू या."

असं म्हणताच जेनी ने त्याच्याकडे पाहिले आणि स्मित केले. दोघांची पहिल्यांदाच नजरानजर झाली. तिने इशाऱ्याने आभार मानले.

"कुमार ऐक ना, मी आणि जेनी गाडी मागवून घेतो तुम्ही बाईक ने या."

"चालेल. पाहुण्यांना व्यवस्थित घेऊन जा."

वेगळ्याच नजरेने वरून खाली जेनीकडे पाहत कुमार म्हणाला. कुमारने फोन करून गाडीची व्यवस्था केली आणि सर्व घराकडे निघाले.

काहीच वेळात सर्व घरी पोहचले.

"Jennie, this is your room."

"Ohhh wow, so beautiful."

"फ्रेश होऊन खाली ये. Okay?"

"Okay!"

मैत्रीण खोली बाहेर निघून गेली. दार बाहेरून लावण्याचा आवाज ऐकून तिने लक्ष देणं गरजेचं समजलं नाही आणि दार तपासून न बघताच ती फ्रेश व्हायला आत निघून गेली.

साधारण काही मिनिटांनी दार लोटण्याचा आवाज ऐकू आला. पण तिने दुर्लक्ष केले आणि अंघोळ करण्यात व्यस्त झाली.

अंगावर पडणारे थंड पाण्याचे थेंब तिला उत्तेजित करण्यास पुरेसे होते. अंगावरून हात फिरवत ती त्याच्या विचारात हरवली असताच तिला कोणी तरी मागे उभं असल्याचे जाणवले. तीने मागे वळून पाहिले, तर तिथे कुमार त्याच्या फोन मध्ये काहीतरी टिपताना नजरेस पडला.

"What the hell?"

अंगावर बाथ रोब चढवून घेत ती बाहेर पडली. त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागली. मोबाईल हातात वर पकडत तो तिला अंगावर घेण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी ती थकली आणि विनवणी करू लागली.

"Please, delete this photos!"

"एका अटीवर!"

"कोणती?"

"एक रात्र."

"What?"

"Yes, tonight!"

"Fuck you!"

"Yes I want to!"

"Disgusting!"

"जर तू आली नाहीस, तर ह्या फोटो व्हायरल झाल्याच म्हणून समज."

"Please, Don't do that!"

"मग आज रात्री जेव्हा सर्व पालखी रसम साठी मंदिरात जातील तेव्हा माझ्या खोलीत यायचे."

"आणि त्या फोटो?"

"काम झालं की डिलीट!"

असं म्हणत कुमार हसतंच बाहेर पडला आणि जेनी रडत बिछान्यावर बसून राहिली.

कुमारने दार ओढून घेतले असल्याने ते उघडे राहिले होते. बाहेरून कुमारचा मित्र जात असता त्याला जेनी रडताना नजरेस पडली. त्याला काळजी वाटली म्हणून तो आत शिरला आणि तिची विचारणा करू लागला.

"काय झाले?"

त्याच्या आवाजाने ती दचकून भानावर आली. डोळे पुसत जागेवर उभी राहिली. कुमार विषयी त्याला सांगावे आणि त्याची मदत घ्यावी हा विचार तिच्या डोक्यात आला; मात्र तो कुमारचा मित्र मग तो तिची मदत का करेल? म्हणून ती गपंच राहिली.

"Nothing serious!"

"रडत होतीस?"

"हो ते वॉश रूम मध्ये पाय स्लिप झाला!"

"लागलं तर नाही ना?"

"नाही!"

असं म्हणत तिने डोळे पुसत मान फिरवली. त्याने तिला उचलून बिछान्यावर बसवले. तिला काहीच समजेना!

"घाबरू नकोस!"

त्याने तिला धीर दिला आणि स्प्रे घेऊन आला.

"डावा की उजवा?"

"काय?"

"पाय घसरला ना?"

"हो, डावा!"

त्याने तिचा पाय मांडीवर ठेवत त्यावर स्प्रे केला. थोडा वेळ तो तिचा पाय चेपत बसला. ती त्याच्यात हरवून गेली.

"आता कसं वाटतंय?"

त्याचे शब्द कानावर पडताच ती भानावर आली.

"आ! हो बरं वाटतंय!"

त्याने तिचा पाय हळूच खाली ठेवला आणि जायला उठला. आपण त्याचे आभार मानले नाही, या विचाराने तिने त्याला मागून हाक मारली.

"Excuse me?"

तिच्या आवाजाने त्याने मागे वळून पाहिले.

"Yes?"

"What's your name?"

"Hello, I'm Advik."

"I'm Jennie."

"Nice name."

"Thanks!"

असं म्हणत तो जायला वळणार तोच तिने हात पकडत त्याला स्वतःकडे ओढून घेतले आणि ओठांवर ओठ टेकवले. तिच्या या वागण्याची कल्पना नसल्याने तो स्तब्ध राहिला. भानावर येत त्याने तिच्याकडे पाहिले आणि पहातंच राहिला.

आतापर्यंत तिच्या मादक शरीराकडे त्याचे लक्षच गेले नव्हते! अंगाला गुंडाळलेला बाथ रोब ज्यात तिचे गोरेपान शरीर आणखीच उत्तेजित करणारे होते.

तिच्याकडे तो नकळत ओढला गेला आणि आता त्याने तिला कमरेत पकडत स्वतःकडे ओढून घेतले. ती त्याच्या छातीवर जाऊन धडकली. दोघांची नजरानजर झाली आणि परत ओठांना ओठ भीडले.

आतून दार बंद करून घेत तिने त्याला बिछान्यावर लोटून दिले. स्वतःला तिच्या अंगावर झोकून देत त्याने तिच्या शरीरभर चुंबनाचा वर्षाव केला.

काही तास ते एकमेकांचा उपभोग घेण्यात व्यस्त झाले. भानावर येत तिने तिचा बाथरोब आणि त्याने त्याचे कपडे अंगावर चढवून घेतले. दोघांनी एकमेकांकडे मनभरून पाहिले आणि स्मित केले.

"तसं तू मघाशी का रडत होतीस?"

हा प्रश्न विचारताच ती मोठ्याने रडू लागली. त्याला काहीच समजत नव्हते!

"शू!!! रडू नकोस. मला सांग काय झालंय?"

"कुमार!!"

"कुमार? त्याचं काय?"

"मी अंघोळ करत होते. दार उघडून तो कधी आत शिरला समजले नाही. त्याने त्याच्या फोन मध्ये माझे नको त्या अवस्थेत फोटो काढले. आता तो माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतोय. असे न केल्यास तो ते फोटो व्हायरल करणार असं बोलला."

"What?"

"हो!"

"मी त्याला सोडणार नाही!"

रागाच्या भरात त्याने शर्टाच्या बाह्या गुंडाळल्या आणि हाताच्या मुठी आवळल्या. त्याचा राग पाहून ती घाबरली. तिचा भेदरलेला चेहरा पाहून त्याने तिला जवळ घेतले.

"तुला घाबरायला काय झाले?"

"तुझा राग पाहून भीती वाटते रे!"

"अग तो फक्त त्यांच्यासाठी, जे तुला त्रास देतील!"

"मग माझ्यासाठी?"

"तुझ्यासाठी फक्त माझे प्रेम!"

"खरंच? म्हणजे तू पण?"

"हो ग. तुला पाहताक्षणी!"

"पण तू तर माझ्याकडे पाहत सुद्धा नव्हतास?"

"आणि हे कोण बोललं?"

"मला माहितीये ना!"

"मग न पाहता तुझ्या जवळ येऊन कसा बसेल? हा विचार केला तू?"

"अरे हा ना! मी हा विचारंच केला नव्हता!"

"वेडी!"

"I love you Advik!"

"Love you too Jennie."

परत ओठांना ओठ भिडले आणि प्रेमाची कबुली देण्यात आली.

"अरे पण आता आपण कुमार कडून माझे फोटो कसे काढून घ्यायचे?"

"Don't Worry! मी आहे ना. तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना?"

"हो रे."

"बस मग आजची रात्र कुमारच्या नेहमी लक्षात राहील!"

असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाहेर पडला. तिने आतून दार बंद करून घेतले आणि बिछान्यावर त्याच्या विचारात लोळत पडून राहिली.

त्याच्या स्पर्शाने तिला वेड लावले होते. थोडा वेळ तशीच पहुडल्यावर दारावर तिला थाप ऐकू आली आणि ती दचकून जागी झाली.

.

क्रमशः