Learning through hard work in Marathi Children Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | खंड्याच शिकण

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

खंड्याच शिकण


खंडयाच शिकण

ओढ्यालगतच्या चिंचेच्या झाडावर खंड्या पक्षी बसला होता.ध्यानमग्न साधुसारखा झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याकडे एकटक बघत होता.त्या पाण्यातून वेगाने पळणाऱ्या चंदेरी- सोनेरी माश्यांवर त्याचे लक्ष होते.आपल शरीर ताणत तो झेप घेण्याच्या तयारीत होता.तेवढ्यात पलिकडच्या झाडीतून कोतवाल पक्षीची जोडी कर्कश आवाज करत उंच उडाली.त्यांच्या ओरडण्याने खंड्याचे लक्ष विचलित झाले.काहीतरी धोक्याची सूचना कोतवाल पक्षी देत होते.समोरच्या घळणीवर लटकात्या मुळांच्या आडोश्याला त्याच घर (बिळ) होत.त्यात त्याच छोट पिलू होत.त्याची पत्नीही शिकारीसाठी बाहेर गेली होती. खंड्यान आपल्या घरच्या दिशेने पाहिलं. तो दचकला.एक भला मोठा पिवळाधमक सांप सरसरत त्याच्या घराच्या दिशेने जात होता.अगदी क्षणातच तो सांप बिळात शिरणार होता.संतापाने खंड्याचे डोळे गरागरा फिरायला लागले. पंखात सार बळ एकवटून त्याने सूर मारला.मोठ्याने चीतकारत आपल्या दणकट अणकुचीदार चोचीचा प्रहार त्याने सापाच्या पाठीवर केला. वेदनेच्या झिणझिण्या सहन करत सांप वळवळला पण पुन्हा जिद्दीने पुढे सरकू लागला.डोळ्यात अंगार पेटलेला खंड्या चोचीचा आघात सापावर करत राहिला.अखेर साप या लढाईत हरला.साप धपकन पाण्यात पडला व दूर गेला.दमलेला खंड्या आपल्या काळोख्या भीतीने,अरुंद व वळणावळणाच्या घरात शिरला. आत छोटा ' टिल्ल्या ' थरथरत उभा होता.त्यालाही धोक्याची जाणीव झाली होती.
" बाबा - -,बाबा - - - काय झालं ?"
"टिल्या - - एक साप - - आपल्या घरात घुसत होता."
"पण का बाबा? "
"टिल्ल्या, सांप - - अजगर - -ससाणा--गरुड यांचं आपण भक्ष आहोत."
"पण सांप कसा असतो? व तो आपल्याला का खातो?"
एवढ्यात टिल्ल्याची आई आली. तिला झाला प्रकार समजला. भीतीने व काळजीने टी थरथरत होती.तिने टिल्ल्याला आपल्या पंखाखाली घेतले.आपली चोच ती टिल्ल्याच्या पंखावर घासू लागली.
" बाळा, सांप दुष्ट असतो." आई म्हणाली.
" हो, अन आपल्या सभोवतालच्या जगात एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊनच जगतो . जसे आपण किडे, मासे, कीटक,खेकडे खातो तसे." बाबा म्हणाले.
"अहो, आपल्याला हे घर बदलायला हव.तो सांप पुन्हा कधीही येईल."
"अग , होय, आपण आता नव्या घराचा शोध घेवू. शिवाय टिल्ल्याला उडायला व शिकार करायला शिकवायच आहे.मी आताच त्याला बाहेर घेवून जातो."
"होय, टिल्ल्याला बाहेरच जग दाखवायला हव्.पण जरा थांबा, मी त्याच्यासाठी खाऊ आणलाय तो त्याला भरवते.आजपासून तो स्वतःचे खाद्य स्वतः मिळवेल."
आईने चोचीत धरून आणलेले छोटे मासे टिल्ल्यासमोर धरले. टिल्ल्याने ते मासे आपल्या इवल्याश्या चोचीत पकडले व खाऊ लागला.
खंड्याने टिल्ल्याला अलगद उचलले.हळूहळू तो बाहेर पडला.बाबा खंड्याणें त्याला ओढ्याच्या काठावर उभ केलं. टिल्लू कसाबसा धडपडत उभा राहिला. डोळे किलकीले करत बाहेरच्या जगाकडे पाहू लागला. अजूनपर्यंत आईच्या उबदार पंखाखाली तो वाढला होता. बाहेरचा प्रकाशमान, रंगीत जग बघून तो थोडा घबरला व थक्क पण झाला. केवळ मोठ्ं हे बाहेरच जग आहे. त्याने स्वत:च्या शरीराकडे बघीतले छान निळे- चॉकलेटी पंख - - मजबूत गुलाबी - - लालसर चोच व तसेच दणकट पाय , किती छान दिसतो मी !टिल्लू हरखून गेला.
"टिल्लू तुला आता उडायला हवं ."बाबा खंड्या म्हणाला.
"उडायचं म्हणजे.,"
"क्षनभरात त्याच्या बाबांनी पंख फडफडवले व झेप घेत चिंचेची फांदी गाठली. टिल्लू डोळे फाडून बघत राहिला.त्यानेही बाबांसारखे पंख हलवले.पण तो धडपडला.
"टिल्लू , थांबू नकोस - - आपण शिकारी पक्षी आहोत. आपल्याला छान उडता आल पहिजे. चल पुन्हा प्रयत्न कर."
टिल्लूने पुन्हा पंख पसरून सार बळ एकवटून झेप घेतली.काही वेळ तो हवेत तरंगला पण फांदी पर्यंत पोहचला नाही.थरथरत त्याने पुन्हा जमीन गाठली.
" व्वा, छान ! पुन्हा झेप घे, आता जमेल तुला." बाबा हसत म्हणाले.
अखेर टिल्लूने जिद्दीने पंख हलवले व झेप घेतली.काही शनातच तो झाडावर पोहचला. आता तो बाबां शेजारी येवून बसला. बाबांनी त्याला चोचीने घासत शाबासकी दिली.
" ते बघ ओढ्यात - - त्या पाण्यातल्या माश्यावर लक्ष केंद्रित कर."
टिल्लू कुतूहलाने खाली ओढ्यात बघितले. निळसर पाण्यात छान - छान मासे फिरत होते.प्रकशात त्यांची चंदेरी काया चमचमत होती. किती छान दिसताहेत हे मासे. यांना मारून खायचं ? छ - - छ नकोच ते!
"बाबा, ते मासे किती छान दिसताहेत. त्यांना का मारायचे ?" एवढ्यात त्याची आई आली. टिल्लू चा प्रश्न ऐकताच ती हसली.
" टिल्लू, मासे हे आपल आवडत खाद्य आहे. आपण त्यांना नाही खाल्ल तरी दुसर कुणी तरी त्याला खाईल ,जगाची ही रीतच आहे."
"पण - पण त्या सुंदर अन् छोट्या - माश्याना नको - "
पण तेवढ्यात त्याच्या आईने खाली सूर मारला.अचूक वेध घेत तिने एक मोठा मासा चोचीत पकडला. तडफड करत असलेला तो मासा चोचीत धरून ती तिल्लूच्या बाजूला बसली. चमचणारा तो मासा बघून टिल्लू हरखला. त्याच्या पोटात कालवाकालव झाली.तो हळूच आईच्या जवळ पोहचला.
"टिल्लू, तुला यातला थोडाही भाग मिळणारं नाही. तू स्वत प्रयत्न कर."
बिचारा टिल्लू हिरमुसला.आपल्याला मासे पकडणे जमेल की नाही याचा विचार करू लागला.त्याची अवस्था ओळखून बाबा खंड्या म्हणाले -
"बघ, टिल्लू मी कशी शिकार करतो ती.तो पळणारा मासा व आपला वेग याचा अंदाज घेवून झेप घ्यायची.सूर मारून मासा आपल्या मजबूत चोचीत पकडायचा."
बाबा खण्ड्याने बाणासारखी झेप घेतली.सूर मारत एक मासा चोचीत पकडला व पुन्हा वर झेप घेतली. पाण्याचे वर्तुळाकार शिंतोडे वर हवेत उडाले.
आता टिल्लू सरसावला.आपले लक्ष पाण्यातल्या माश्यावर केंद्रित केले.शरीर ताणत त्याने झेप घेतली व खाली पाण्यात सुर मारला व झपकन पाण्यात चोच खुपसली.
अरेरे - - त्याच लक्ष्य असलेला मासा सुळकन निसटला. खाजिल झालेला टिल्लू पुन्हा झेप घेत वर आला.
"टिल्लू, असा निराश होवू नकोस. आम्हीही पहिल्या वेळी अपयशी झालो होतो. जा पुन्हा प्रयत्न कर." त्याचे आई - बाबा म्हणाले.
उत्साहित झालेल्या टिल्लून पुन्हा झेप घेतली. या वेळी त्याच सार लक्ष माशा वर केंद्रित झालं.अचूक वेध घेत त्याने आपल्या चोचीत पकडला. अभिमानाने वर झेप घेत त्याने फांदी गाठली.आई व बाबा खंड्यानें पंख फडकवत व चित्कारत ' टिल्लू ' चे अभिनंदन केलं. आज टिल्लू स्वतचं पोट भरण्यासाठी शिकार करायला शिकला होता.