relationship in Marathi Biography by Vaishnavi Meena Kiran Bhalerao books and stories PDF | नातं

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

नातं

नाती ही अनेक स्वरूपाची असतात . नात्याला अनेक रुपे असतात . आई-वडील , बहिण भाऊ, नवरा बायको, मित्र मैत्रीण ,प्रत्येक नाती ही एकमेकांमध्ये खूप गुंतलेली असतात, म्हणूनच नाती ही विश्वासावर टिकून असतात . आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही तर काही नाती ही बांधलेली असतात . ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती ही जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात . काही मात्र आपोआपच जपली जातात तर काही नकळत दुरावली जातात, तो नात्याचा मोठा अंत असतो. याशिवाय नात्यांमधल्या मधला संवाद साधण्याच्या असमर्थ्यतेच्यामुळे देखील समस्या वाढतात . मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असेल तर दोघांच्याही अशा वागण्यामुळे नात्यावर खूप मोठा परिणाम होतो. नाते हे रबरा सारखे ताणण्यात अर्थ नाही . कुणीतरी एकाने ते सैल सोडले पाहिजे. प्रत्येक माणसांमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टींची कमी असते .अंतर फक्त इतकच असतं की जो पारखून घेतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते ,आणि जिथे इतरांना समजून घेणे कठीण जाते तेव्हा आपण समजून घेणे चांगले असते त्यासाठी स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आपोआपच आनंद घेता येतो आणि देता ही येतो. अपेक्षा गैरसमज अहंकार आणि तुलना यामुळे एकमेकातील नाते बिघडू शकतात . तसे होऊ नये असे वाटत असेल तर सगळे विसरून त्यांना माफ करून आपली नाती सांभाळा, हे तत्व कधीही चांगले . उदाहरणार्थ ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही . त्यासाठी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की प्रेम हे माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही नाराज झाला तर त्याच्या सवयींवर व्हा त्याच्यावर नाही. कारण जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेले प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून. आयुष्यामध्ये खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुळकी प्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा निर्माण करतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओठावर हसू खुलवतात आणि अश्रू ही पुसतात . आणि हेही तितकेच सत्य आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो . तसे असेल तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा की चढउतार हे आयुष्यात कितीही आले तरी आपल्याला साथ देणाऱ्या व्यक्तीला नेहमी किंमत द्या त्यांचा आदर करा. जर आपल्याला नाते टिकवायचा असेल तर त्यांच्या सवयींना नजरेआड करून त्याला जवळ करा. जीवनाचा अनुभव हेही सांगतो की जुनी लोकही भावनिक होती तेव्हा ती नाती जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकली झाली नात्याचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाली फायदा असेल तरच नाती बनवू लागली. तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवीहवीशी वाटतात, म्हणून कायम हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. म्हणून नाते सांभाळण्याचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचा असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी. कधी आठवण आली तर डोळे झाकू नका जर काही गोष्टी आवडल्या तर सांगायला उशीर करू नका. कधी भेटल तिथे एक स्माईल देऊन बोलायला विसरू नका .कधी चूक झाल्यास माफ करा पण कधी कमी करू नका . जन्म हा एका थेंबासारखा असतो तर आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रिकोणासारखा असतं पण नाती ही वर्तुळासारखे असतात ज्याला कधीच शेवट नसतो.