Sakshidaar - 11 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | साक्षीदार - 11

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

साक्षीदार - 11


साक्षीदार
प्रकरण ११
मी जरा बाहेर निघालोय आपल्या प्रकरणाच्या दृष्टीने काही नवीन क्लू मिळतात का ते मी बघणार आहे हळूहळू पोलिस त्यांचा फास आवळायला सुरुवात करतील आपल्याला फार काही करता येणार नाही त्याच्या आधीच आपल्याला काहीतरी हालचाल करायला लागेल तू इथेच बस ऑफिसमध्ये आणि किल्ला लढव. मी कधी येईन ते आता सांगता येणार नाही.मी फोन करीन आणि तुला माझं नाव जयकर आहे असं सांगेन. तुला विचारीन पाणिनी ऑफिसमध्ये आहेत का? त्याचा मित्र अशी माझी ओळख करून देईन. आणि तुला विचारलं की त्यांनी माझ्यासाठी काही निरोप ठेवला आहे का? मग तू मला माझ्याशी म्हणजे पाणिनी पटवर्धन शी बोलते असं न भासवता काय काय घडलं तिकडे ते सांगू शकशील.” पाणिनीने सूचना दिली.
“का हो सर तुम्हाला वाटतंय की ते आपली टेलिफोन लाईन टाईप करतील म्हणून?”
“ हो सांगता येत नाही ते काय करतील नक्की”
“ आणि तुम्हाला वाटते की ते तुमच्यावर वॉरंट काढतील म्हणून ?” सौम्या ने विचारलं
“वॉरंट काढणार नाहीत पण मला ते प्रश्न नक्की विचारतील त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.” पाणिनी म्हणाला आणि ऑफिसच्या बाहेर पडला.
संध्याकाळी अंधार पडला तेव्हा तो हॉटेल प्रेयसी च्या लॉबीमध्ये होता त्याने स्वतःसाठी एक रूम बुक केली आणि आपलं नाव गंधार जयकर आहे असं तिथल्या रिसेप्शनिस्ट ला सांगितलं त्यांने असही सांगितलं की माझ्याकडे काही सामान नाहीये आणि हॉटेलच्या भाड्यापोटी थोडी रक्कम त्यांने आगाऊ भरली. आणि आपल्या खोलीत तो गेला. खोलीत गेल्यावर आपल्या तंगड्या कॉट वर टाकून डोळे मिटून अर्धातास शांत बसून राहिला. खोलीचं दार त्यांन उघडं ठेवलं होतं. बरोबर अर्धा तासानंतर ईशा अरोरा दार उघडून आत आली आत आल्या आल्या त्याच्याकडे बघून ती हसली.
“ बरं वाटलं मला तुम्ही इथे भेटलात म्हणून ” ती म्हणाली तू खात्री केलीस की तुझा कोणी पाठलाग केला नाही?”


“ नाही कोणी पाठलाग नाही केला.त्यांनी एवढेच सांगितले की मी महत्वाची साक्षीदार असणार आहे.त्यांच्या परवानगी शिवाय मी शहर सोडायचे नाही.मला सांगा, ते मला अटक करतील?” – ईशा
“ ते बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे, तुला त्याचे मृत्यू पत्र मिळाले का?”पाणिनी ने विचारलं.
“ मिळाले.”
“ कुठे?”
“ त्याच्या टेबला च्या कप्प्यात.”
“ काय केलेस त्याचे ?”पाणिनी ने विचारलं.
“ मी आणलंय इथे माझ्या बरोबर.”
“ बघू मला.” पाणिनी म्हणाला
“ मला अपेक्षित होत तसचं आहे ते.पण मला वाटलं होतं त्या पेक्षाही खूप कमी रक्कम ठेवल्ये मला.मला वाटलं होत की किमान मला आयुष्यात स्थिर होतं येईल इतपत तरी तरतूद असेल त्यात. ”-ईशा म्हणाली
“ स्थिर होतं येईल म्हणजे .. म्हणजे.. दुसरा एखादा माणूस .. ” पाणिनी म्हणाला.
“ मी असले काहीही शब्द उच्चारले नाहीयेत.”-ईशा
“ तू काय बोललीस ते नाही विचारलं, तुझ्या मनात काय आहे याचा अंदाज बांधत होतो.” पाणिनी म्हणाला
“ पटवर्धन, आपण फारच विषयाला सोडून भरकटत चाललोय.हे मृत्युपत्र बघा आधी.”-ईशा.
त्याने तिच्या हातातून ते कागदपत्र घेतले. “ सगळं त्याच्याच हस्ताक्षरात लिहिलंय?” पाणिनी ने विचारलं.
“ मला नाही वाटत हे त्याचं अक्षर आहे . ”
“ नाटकं करू नको. तुझ्या नवऱ्याने ते कुणाल गरवारे ला आणि त्याच्या वकीलाला दाखवलं आणि स्वतः च सांगितलं की त्याने ते त्याच्या हस्ताक्षरात लिहिलंय म्हणून ” पाणिनी म्हणाला.
“ तस सांगितलं असेल तरी नंतर ते मृत्युपत्र फाडून टाकून त्या जागी दुसरे ठेवणं ही गोष्ट कुणाल ला सहज शक्य होती.”
“ हे बघ फार गंभीर आरोप करते आहेस तू . हातात पुरावा नसताना.” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे अत्ता तरी नाहीये पुरावा.”
“ मग आरोप करणे थांबव” पाणिनी म्हणाला
“ तुम्ही मला सारखं पढवताय की मी तुझा वकील आहे आणि मी तुम्हाला सगळं काही सांगितलं पाहिजे, आणि जेव्हा मी काही सांगायला जाते तेव्हा मला अडवता. ” ईशा वैतागून म्हणाली.
“ तुला हे मृत्यू पत्र कसं आणि कुठे मिळाल हे खरं सांग.” पाणिनी तिच्या वैतागाकडे दुर्लक्ष करत म्हणाला.
“ ते त्याच्या अभ्यासिकेत होतं.”तिजोरीत. तिजोरी उघडीच होती. मी ते विल बाहेर काढल.”
“ आणखी एक थाप.” पाणिनी म्हणाला.
“ का विश्वास ठेवत नाही माझ्यावर?”- ईशा
“ साधी गोष्ट आहे, तिजोरी उघडी असेल तर पोलिसांनी त्यांचा माणूस तिथे ठेवला असता, त्यापूर्वी तिजोरीतल्या वस्तू नोंदवून घेतल्या असत्या.”
“ तुम्हाला आठवतंय आपण खुनाच्या जागी गेलो होतो आणि तुम्ही प्रेताची तपासणी करत होतात, आणि त्याच्या अंगावरच्या बाथ रोब चा दमट पणा पहात होतात ?” ईशा ने विचारले.
“ हो. त्याचं काय?”पाणिनी ने विचारलं.
“ तेव्हा मी तिजोरीतून ते बाहेर काढले.तेव्हा तिजोरी उघडी होती.”
“ ओह ! आता आठवलं की तू खरंच तिजोरी जवळ गेली होतीस. मला त्याचं वेळी तू का नाही सांगितलंस तू काय करत होतीस ते?” पाणिनी ने विचारलं.
“ कारण मला बघायचं होत की विल माझ्या साठी फायद्याचे होते की ते नष्ट करण्याच्या लायकीचे होते. ”
पाणिनी ने कपाळावर हात मारला.
“ तुम्हाला काय वाटतं, आपण नष्ट करून टाकू या का ते?” ईशा ने विचारलं
“ नाही. नाही.” स्फोट झाल्या सारखा पाणिनी ओरडला.
“ अजून तू मला पूर्ण सत्य सांगितलेलं नाहीस.” पाणिनी म्हणाला.
“ माझ्यावर विश्वास नाही का?”
“ सत्य सांगितलस म्हणजे बसेल.”
“ काय विचारायचं आहे?” –ईशा
“ माझा अंदाज आहे की त्या संध्याकाळी तू बाहेर गेली होतीस,नटून ,सजून. आणि नवऱ्याचा खून व्हायच्या आधी थोडाच वेळ तू घरी आलीस.” पाणिनी म्हणाला.
“ बिलकुल नाही. घरीच होते संपूर्ण संध्याकाळ.” –ईशा
“ मी पोलिसांना पाहते कॉफी करून घ्यायला किचन मधे गेलो होतो तेव्हा तुझी स्वयंपाकीण म्हणाली की तुझ्या नोकराणीने तुला त्या संध्याकाळी बुटाचे पार्सल आल्याचा निरोप दिल्याचे तिने ऐकलं.”
ईशा ला हा मोठा धक्का बसला होता.पण आपल्या भावना तिने दाखवल्या नाहीत. आणि पाणिनी ला विचारलं, “ त्यात गैर काय आहे मग?”
“ प्रश्न असा होता माझा की तुला असा निरोप मिळाला की नाही?”
“असेल बहुतेक.मला बूट घ्यायचेच होते.मी तिला सांगून ठेवले होते, ऑर्डर दिल्याचे.त्यात विशेष काय ?” –ईशा
“ तुला फाशी द्यायची पद्धत माहिती आहे?” अचानक पाणिनी ने विचारलं
“ काय म्हणायचंय तुम्हाला?”
“आदल्या दिवसापासून तुम्हाला गीता किंवा तत्सम धर्म ग्रंथ वाचायला दिलं जातो फाशी शक्यतो सकाळीच देतात.. आधी तुम्हाला कोर्टाचा निर्णय वाचून दाखवतात. मग तुम्हाला फाशीच्या ठिकाणी नेले जाते. तुमचे हात मागे बांधले जातात . तुमच्या बरोबर तुरुंगाचे अधिकारी असतात.तुमच्या डोक्यात काळी पिशवी घातली जाते. गळया भोवती फासाची दोरी अडकवली जाते. त्या नंतर......” पाणिनी म्हणाला.
“ नाही... नाही...” ती किंचाळली.
“ मला तू सत्य सांगितलं नाहीस तर तुझी हीच अवस्था होणार आहे.” पाणिनी म्हणाला.
“ मी... खर... खरंच...” ती पुटपुटली, तिचा चेहेरा पंधरा फटक पडला.
“ तुला पक्क माहित्ये की तो बुटाच्या पार्सल बद्दल चा निरोप खोटा होता.म्हणजे सूचक होता.हृषीकेश बक्षी ला तुझ्याशी संपर्क करायचा असेल तेव्हा असला काहीतरी निरोप देण्याची तुमची पद्धत आहे. ”
तिने भेदरून आपली मान डोलावली.
“ गुड,” पाणिनी म्हणाला. “ तर मग तू आणि हृषीकेश ने एकमेकांना भेटायचं ठरवलं.त्याने तुला कुठेतरी भेटायला बोलावलं.तू कपडे केलेस, इतर आवश्यक गोष्टी घेतल्यास आणि बाहेर पडलीस.बरोबर?”
“ नाही, मी बाहेर नाही गेले.तोच इथे आला होता.”
“ काय ? ” पाणिनी ने ओरडून विचारलं.
“ हो.त्याला माझ्याशी बोलायचं होतं, त्याला मी सांगितलं होतं इथे घरी येऊ नकोस म्हणून ,तरीही तो आलाच. दधिची अरोरा हा मिर्च मसाला चा मालक असल्याचं तुम्ही त्याला सांगितलं होतं.सुरुवातीला त्याचा या गोष्टीवर बिलकुल विश्वास बसला नाही पण नंतर त्याला ते पटलं, मिर्च मसाला ने ती बातमी छापू नये यासाठी दधिची ला काहीही द्यायची त्याची तयारी होती. दधिची त्यासाठी तयार होईल असं त्याला वाटत होत.”
“ तो घरी येणार होतं हे तुला माहीत नव्हतं?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही अचानक आला तो.” –ईशा
थोडावेळ तिथे शांतता पसरली.कोणीच काही बोललं नाही.
“ तुम्हाला कसं समजलं ?” ईशा ने विचारलं
“ काय ?” पाणिनी ने विचारलं.
“ हेच, बुटाच्या पार्सल चा उल्लेख मी संकेतिक निरोप देण्यासाठी करते म्हणून?”
“ हृषीकेश ने सांगितलं मला.” पाणिनी म्हणाला.
“ आणि माझ्या नोकराणी ने तुम्हाला सांगितलं हे? अरे देवा, तिने पोलिसांना सांगितलं नसले म्हणजे मिळवलं.” ईशा म्हणाली.
पाणिनी हसला. “ नाही.ती पोलिसांना काही सांगणार नाही.तिने मलाही काही सांगितलं नाही. तुझ्या कडून खरं काय ते काढून घेण्यासाठी मीच तुला थाप मारली होती.तो काळजीत असतो तेव्हा तुला भेटायचं प्रयत्न करतो हे माझ्या लक्षात आलं होतं.त्यामुळे तुला भेटण्यासाठी तो असा सांकेतिक निरोप ठेवेल असा कयास मी केला. ”
ती दुखावली गेली. “ माझ्याशी अशा पद्धतीने वागणं तुम्हाला शोभत नाही.”
“ तर मग हृषीकेश आल्यावर काय घडलं?” पाणिनी ने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत विचारलं.
“ दधिची शी बोलायचं च आहे असा तो आग्रह करत होता.त्याने मला वचन दिलं की माझं नाव तो दधिची ला अजिबात सांगणार नाही.तो त्याला एवढंच सांगणार होता की येणाऱ्या निवडणुकीत तो निवडून येणार हे त्रिवार सत्य आहे आणि तो निवडून आला की दधिची साठी काहीही करायची त्याची तयारी आहे. फक्त त्या बदल्यात दधिची ने मिर्च मसाला मधे होल्ड अप आणि गोळीबाराच्या वेळी हृषीकेश एका स्त्री बरोबर तिथे असल्याची बातमी छापू नये.”
“ आता आपण बरोबर एका मार्गावर आलो ! ” पाणिनी म्हणाला. “ म्हणजे या साठी हृषीकेश सतत दधिची ला भेटायचं म्हणत होता आणि तू ते टाळत होतीस.बरोबर?” पाणिनी ने विचारलं.
“ बरोबर.”
“ तू का त्याला भेटू देत नव्हतीस?”
“ मला वाटत होत की अनावधानाने का होईना हृषीकेश च्या तोंडून माझे नाव उच्चारले जाईल.”
“ मग? त्याने घेतलं का तुझं नाव?” पाणिनी ने विचारलं.
“ मला नाही माहीत... म्हणजे ... अर्थात नाही सांगितलं त्याने.... म्हणजे तो भेटलाच नाही दधिची ला. माझ्याशीच बोलला तो आणि निघून गेला.”
“ माझ्या सापळ्यात तू अडकलीस ईशा.आधी तू म्हणालीस की तुला माहीत नाही त्याने तुझं नाव घेतलं की नाही ते ,नंतर तुझ्या लक्षात आलं मला काय वदवून घ्यायचं होतं ते, आणि लगेच तू सारवा सारव करण्यासाठी म्हणालीस की तो दधिची ला भेटलाच नाही म्हणून. वस्तुस्थिती अशी आहे की त्याने तुझं नाव घेतलं की नाही हे तुला माहीत नाहीये.”
“ तुम्हाला सांगितलं ना, त्याला न भेटताच तो गेला बाहेर म्हणून ! ” –ईशा
“ तु सांगितलस ग, पण प्रत्यक्षात तो भेटला त्याला .” पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला काय माहीत?”
“ कारण काय झालं असावं या बद्दल माझा एक तर्क आहे, आणि त्या आधारावरच मला माझी रण नीती आखायची आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ काय घडलं असावं?”- ईशा
पाणिनी हसला. “ तुला माहित्ये ”
“ तसं नाही, मला म्हणायचं होतं जे, घडलं ते काय होतं नेमकं?”- ईशा
“ हृषीकेश वरती गेला, तुझ्या नवऱ्याशी बोलला.किती वेळ होतं तो वर?” पाणिनी ने विचारलं.
“ मला नाही माहीत.पंधरा-एक मिनिटं असेल.त्यावर नाही.”
“ आणि तो खाली आल्यावर तु त्याला पाहिलं नाहीस?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही.”
“ जेव्हा तो वर होता तेव्हा तू गोळी मारल्याचा आवाज ऐकलास? आणि नंतर लगेचच तो खाली उतरून घरा बाहेर पडला,तुझ्याशी काहीही न बोलता? ” पाणिनी ने विचारलं.
“ नाही , तसं नाही, तो गोळीच्या आवाजा पूर्वीच बाहेर पडला होता. ”
“ किती वेळ आधी?”
“नक्की नाही सांगता येणार, दहा पंधरा मिनिट असेल किंवा जास्त सुध्दा.
“आणि आता हृषीकेश बक्षी सापडत नाहीये”. पाणिनी म्हणाला.
“काय !”
‘मी म्हणालो तोच शब्दशः अर्थ आहे.’
‘तो घरातही नाहीये आणि त्याचा फोन ही उचलत नाहीये’.
‘तुम्हाला कसं कळलं हे?’
‘मी सतत त्याला फोन करतोय,त्याच्या मागावर माझी माणसं सोडली आहेत’
‘का केलंत तुम्ही असं?’-ईशा
‘कारण मला माहीत होत की तो गोळीबाराच्या प्रकरणात गोवला जाणार आहे’.
‘असं कसं होईल पटवर्धन? तो इथे आल्याचं आम्हा दोघांशिवाय कोणालाही माहीत नव्हतं. आणि अर्थात तो कुणालाच सांगणे शक्य नाही कारण त्यामुळे परिस्थिती अजूनच चिघळेल हे त्याला माहिती आहे.दुसरा माणूस, म्हणजे ज्याने गोळी मारली,तो, घरी येण्या पूर्वीच हृषीकेश निघून गेला होता’.-ईशा
‘ज्या गोळीने खून झाला ती हृषीकेश च्याच बंदुकीतून सुटली आहे’. पाणिनी म्हणाला.
‘का आरोप करताय तुम्ही त्याच्यावर?’-ईशा
‘प्रत्येक बंदुकीवर विशिष्ट नंबर कोरलेला असतो ईशा. त्यावरून ती कोणा कडे आहे हे सहज शोधून काढता येत.हृषीकेश चा खास माणूस मधुदीप माथूर याने ती खरीदली होती.पोलीस त्याच्या मागे आहेत आता.त्याला सांगावेच लागेल पोलिसांना की त्याने ती हृषीकेश ला दिली होती’. पाणिनी म्हणाला.
‘आम्ही त्या बंदुकीचं काहीतरी करायला हवं होतं’.-ईशा
‘मग अजूनच अडकत गेली असतीस तू’. पाणिनी म्हणाला. “ तुला हृषीकेश ला वाचवायच आहे, ठीक आहे त्यात चूक नाही काही,पण हृषीकेश ने खून केला असेल तर अत्ताच मला खर काय ते सांग, मी त्याला वाचवायचा प्रयत्न करीन.पण त्याला वाचवताना तू त्यात अडकशील असं मला व्हायला नको आहे.”
ती एकदम उठून फेऱ्या मारायला लागली.तिचा चेहेरा घामाने डबडबला.आपलं रुमाल पर्स मधून काढून तिने घाम पुसला.
“ तुला माहीत आहे की नाही मला कल्पना नाही,पण गुन्हा घडल्याचे माहीत असूनही तो लपवणे, खोटी साक्ष देणे यासाठी सुध्दा शिक्षेची तरतूद आहे.तुला आणि मला स्वतःला यातून बाहेर काढणे हे माझं पाहिलं काम आहे.जर हृषीकेश ने खून केलं असेल तर त्याने पोलिसांसमोर स्वतः हून हजर राहणे योग्य आहे.मला आता फिरोज लोकवाला ला गप्प करायचयं.मिर्च मसाला मधे काही छापून येऊ नये म्हणून हालचाली करायच्या आहेत.” पाणिनी म्हणाला.
“ कसं जमवणार तुमी हे ?” –ईशा
‘ तुला जेवढ कमी माहिती असेल तेवढ बर.कारण जेवढ कमी माहिती तेवढ तू पोलिसांना सांगायची शक्यता कमी.’ पाणिनी म्हणाला.
‘ माझ्यावर तुम्ही भरोसा ठेऊ शकता. मी सांगणार नाही कोणाला.’-ईशा
‘ तू एक नंबरची खोटारडी आहेस या खोटे पणाला तू भरोसा म्हणतेस म्हणजे कमाल आहे.’ पाणिनी म्हणाला. ‘पण इथून पुढे तुला खोटं बोलावं लागणार नाही अशी मी काळजी घेणार आहे.म्हणजे या पुढे मी काय करणार आहे ते तुला कळूच देणार नाहीये.म्हणजे खोटं बोलायचा प्रश्नच येत नाही.’
‘ ऐका ना , प्लीज, ’ ईशा काकुळतीला येत म्हणाली. ‘ हृषीकेश ने नाही केलं हे.’
‘ त्याने नाही तर कोणी केलं?’ पाणिनी ने विचारलं.
‘ तुम्हाला मी म्हणाले नव्हते का, की एका माणसाने दधिची बरोबर भेट ठरवली होती म्हणून! मला वाटलं की तो माणूस म्हणजे तुम्हीच आहात.आवाजा वरून तसंच वाटलं.’
पाणिनी उठून उभा राहिला.रागाने त्याचा चेहेरा लालबुंद झाला. ‘ अशा प्रकारचं नाटकं करायचा तू पुन्हा प्रयत्न केलास तर तुला मी त्यांच्या तावडीत सोडून मोकळा होईन.स्वत:ला कसं वाचवायचं ते मी ठरवीन ’
तिने एकदम हुंदके द्यायला आणि हमसुन हमसुन रडायला सुरुवात केली.‘ मी काहीही झालं तरी तुमचं नाव सांगणार नाही कोणालाच.मला कितीही छळू दे त्यांनी. ’ ती म्हणाली.
पाणिनी ला मनस्वी संताप आला.त्याने तिच्या कडे निरखून बघितलं.आणि तिच्या एक कानफडात भडकावली. ‘ बसं झाली तुझी नवटंकी, डोळ्यात पाण्याचा टिपूस नाहीये तुझ्या, रडायचा अभिनय सुध्दा करता येत नाहीये तुला ! नीट ऐक , तू ऐकलेला आवाज माझा असूच शकत नाही कारण मी तिथे नव्हतोच.मी माझ्या घरी होतो त्या वेळी.’
‘ तर मग हुबेबुब तुमच्या सारखा आवाज असलेला तो माणूस असला पाहिजे.’ आपले म्हणणे तसेच पुढे रेटत ती म्हणाली.
‘ तू त्या हृषीकेश च्या प्रेमात पडल्येस म्हणून माझ्याशी डबल गेम खेळते आहेस का? मी हृषीकेश ला वाचवू शकलो नाही तर मी त्यात अडकावे असा तुझा डाव आहे.’
‘ डाव वगैरे काही नाही माझा. तुम्ही मला काय घडलं ते खरं सांगायची गळ घातली आणि मी खरं सांगितलं’ –ईशा
‘ मला खरोखर सर्व सोडून निघून जावं बाहेर असं वाटतंय.तुझं तू बघून घे काय करायचं ते.’ पाणिनी म्हणाला.
‘ मग माझ्या समोर दुसरा पर्यायच उरणार नाही तुमचाच तो आवाज होता असं पोलिसांना सांगितल्या शिवाय.’ निर्लज्ज पणे ती म्हणाली.
“ तुझ्या घरून मी बाहेर पडल्या नंतर, तू ज्या मेडीकल शॉप मधून मला फोन केला होतास ,तिथल्या माणसाशी बोलण्यासाठी, मी घरी जाताना थांबलो होतो. तू मला फोन करायला तिथे गेलीस तेव्हा त्याचं तुझ्याकडे बारकाईने लक्ष होतं.ते स्वाभाविक होतं,कारण एवढया उशिरा ,पावसात भिजत आणि पुरुषाचं जर्किन अंगावर घालून येणाऱ्या तरुण मुलीकडे कोणीही संशयाने बघेल. तर त्याने मला सांगितले की, तू तिथून लागोपाठ दोन फोन केलेस.” पाणिनी ने विचारलं.
तिने डोळे विस्फारून पाणिनी पटवर्धन कडे पाहिले.पण काही उत्तर दिलं नाही.
“ बोल ना., माझ्या व्यतिरिक्त कोणाला फोन केलास?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही... कोणाला नाही केला.त्या माणसाची चूक होत्ये काहीतरी”
पाणिनी उठला. “मला विश्वासात न घेता तू तुझी कृत्य करत्येस,पण ठीक आहे.मी हे आव्हान स्वीकारतो. तुला मी यातून बाहेर काढूनच दाखवतो.”
तो म्हणाला आणि जोरात दार उघडून बाहेर पडला तेव्हा नुकतंच झुंजुमुंजू व्हायला लागलं होत.
( प्रकरण ११ समाप्त)