Sakshidaar - 9 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | साक्षीदार - 9

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

साक्षीदार - 9



प्रकरण ९

पाणिनी च्या फोन नंतर थोड्याच वेळात, इन्स्पेक्टर हर्डीकर अरोरा च्या घरात हजर झाला होतं आणि त्याने प्राथमिक तपासणी पूर्ण करून घेतली होती. “ आम्हाला जी कागदपत्र मिळाली आहेत त्या नुसार अरोरा हा मिर्च मसाला या ब्लॅकमेल करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पेपर चा मालक होता,मिस्टर पटवर्धन. ” तो पाणिनी ला म्हणाला.
“ मला माहीत होत ते.” पाणिनी म्हणाला.
“ कधी पासून माहिती होत हे तुम्हाला?”
“ अत्ता एवढ्यातच.” पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला समजलं कसं पण हे?”
“ ते मात्र मला सांगता येणार नाही.”. पाणिनी म्हणाला
“ पोलिसांच्या आधी तुम्ही कसे आलात घरी?”-हर्डीकर
“ तुम्ही ईशा ने काय सांगितलं ते ऐकलय ना ? ती बरोबर बोलत्ये.तिने मला बोलावून घेतलं.तिला वाटत होत की तिच्या नवऱ्याचं म्हणजे अरोरा चं डोक फिरलं आणि रागाच्या भरात त्याने त्याला भेटायला आलेल्या माणसावर गोळी घातली असावी.नेमकं काय घडलं ते तिला माहीत नव्हतं आणि ते शोधून काढायला तिला भीती वाटत होती.”
“ त्यात भ्यायचे कशाला?” –हर्डीकर
पाणिनी ने खांदे उडवत म्हंटले, “ तो अरोरा कसा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना?मिर्च मसाला चालवणे हे त्याच्या सारख्या गुंडाचेच काम आहे. ईशा त्याची बायको आहे आणि तो बायकांच्या बाबतीत भयंकर कडक होता.मग ईशा भिऊनच असणार की त्याला.”
हर्डीकर ला पाणिनी चं म्हणण पटल्यासारख वाटलं पण तस कबूल न करता तो म्हणाला, “ एकदा त्या बंदुकीच्या मालकाचा छडा लागला की आपल्याला बरेच काही समजेल.”
“ येईल लावता छडा?” पाणिनी ने गंभीर तोंड करत विचारलं.
“ त्यावर नंबर कोरलेत.येईल शोधता.” –हर्डीकर
“ तुमचे पोलीस नंबर लिहून घेत असतांना मी पाहिलं. ३२ कॅलीबर कोल्ट आहे ना?”पाणिनी ने विचारलं.
“ बरोबर ”
पाणिनी एकदम आरामात बसला होता.त्याच्या चेहेऱ्या वर घाबरलेला आणि पूर्ण पोचलेला असे दोन्ही भाव हर्डीकर ला दिसले आणि तो गोंधळला.
“ पटवर्धन, या सगळ्यात काहीतरी लोचा आहे.मला नेमकं सांगता येत नाहीये पण आहे हे नक्की.”
“ हे तुझंच काम आहे. नेहेमी एखाद्या प्रकरणात माझा प्रवेश पोलिसांनी त्यांचे काम संपवल्यावर होतो.इथे मात्र उलट घडलंय.मला ही हा अनुभव पहिलाच आहे.” पाणिनी म्हणाला.
“ हे खरं आहे. ” –हर्डीकर
“ या भाच्याचा काही तपास लागला का?” पाणिनी ने विचारलं.
“ अजून नाही सापडला.पण तो जिथे जातो नेहेमी,ती सर्व ठिकाणे आम्ही तपासली.काल त्याची आणि आमची थोडक्यात चुकामुक झाली. एका पोरी बरोबर तो क्लबात जातो अशी टिप आम्हाला होती.आम्ही तिथे पोचलो, ती पोरगी भेटली.पण तो रात्री ११-११.१५ च्या सुमारास आधीच निघून गेला होता, असं ती पोरगी म्हणाली.” –हर्डीकर
तेवढ्यात बाहेरून गाडी चा मोठा आवाज आला. लगेच मोठ्याने हॉर्न वाजला.पाणिनी आणि हर्डीकर दोघांनी वैतागून बाहेर पाहिलं. आणखी चार- पाच गाड्यांचे आवाज आले. हॉर्न अजूनही वाजत होता.ते बाहेर आल्यावर तो वाजायचा थांबला.इतर गाड्या पोलिसांच्या होत्या वर्तुळात थांबल्या होत्या, त्याच्या बाहेर हॉर्न वाजणारी गाडी उभी होती.आत मधून एक माणूस झिंगलेल्या अवस्थेत हाका मारत होता. “लोखंडे, ए लोखंडे , माझी गाडी पंक्चर झाल्ये ! टायर बदल ”
“ हा बहुतेक कुणाल गरवारे असेल.अरोरा चा भाचा. बघू काय म्हणतोय तो ” पाणिनी म्हणाला.
“ माझा अनुभव सांगतोय की तो फार काही बोलू शकेल असे नाही वाटत.”-हर्डीकर
ते दोघे गाडीजवळ गेले.आतला माणूस फारच प्यालेला होता.शब्द जड झाले होते “ तुम्ही लोखंडे नाही.दोघेही नाही. लोखंडे टायर पंक्चर झालंय. लोखंडे , ए लोखंडे...” तो ओरडत राहिला.हर्डीकर पुढे झाला. “तू खूप प्यायला आहेस” तो म्हणाला
ड्रायव्हिंग व्हील जवळ बसणाऱ्या त्या माणसाने त्याच्याकडे कुत्सित नजरेने बघितलं “अर्थातच मी प्यालो आहे” तो म्हणाला.
हर्डीकर ने फार वाट न बघता त्याला विचारलं “तू कुणाल गरवारे आहेस?”
“अर्थातच !” तो म्हणाला.
“ठीक आहे बाहेर ये. तुझ्या काकांचा खून झालाय.”
क्षणभर तिथे शांतता पसरली आत बसलेल्या कुणाल गरवारे ने आपलं डोकं जोरजोरात दोन-तीनदा हलवलं.
“ कशाबद्दल बोलताय तुम्ही?” त्यांन विचारलं.
“ तुझ्या काका बद्दल बोलतोय, म्हणजे मला वाटतय की तो तुझा काका आहे. दधिची अरोरा. त्याचा खून झालाय, तास-दीड तासापूर्वी.”
व्हिस्कीचा अंमल दूर करण्यासाठी म्हणून कुणाल गरवारे नं आपली मान पुन्हा जोरात हलवली.
“ काय बोलताय तुम्ही ?दारू प्यायला आहात का तुम्ही ?” कुणाल गरवारे ने उलट हर्डीकर ला विचारलं.
“ आम्ही प्यायलो नाही, तू प्यायला आहेस” हर्डीकर म्हणाला. “आता गप्पपणे घरी चल आणि सांभाळ स्वतःला” पाणिनी म्हणाला

“काय म्हणालात तुम्ही? खून?” गरवारे नं विचारलं.
“ हो तेच म्हणालो मी.”
आता कुणाल गाडीतून उतरून झिंगत झिंगत घराकडे जायला निघाला होता.
“ त्याचा जर खून झाला असेल तर तो त्या नीच बाईनेच केलाय.” तो बडबडला
“काय म्हणायचंय तुम्हाला?” इन्स्पे.हर्डीकर ने विचारलं.
“ ती आमच्या घरात राहणारी बाई ! तिच्याशी लग्न केले ना काकांनी! ” तो म्हणाला.
हर्डीकर ने कुणाल चा दंड घट्ट धरून ठेवला होता. “ मिस्टर पटवर्धन तुम्ही प्लीज गाडी चं इंजिन बंद कराल का? आणि दिवे पण.” हर्डीकर ने विनंती केली.
“ पटवर्धन, तुम्ही मेकॅनिक आहात का? मग पंक्चर पण काढा ” जड जिभेने बोलत कुणाल म्हणाला. “पंक्चर होऊनही बरीच चालवली मी गाडी.बदलून टाका टायर.”
पाणिनी ने गाडीचे इंजिन बंद केले, दिवे पण बंद केले आणि झपाट्याने चालत पुढे गेलेल्या हर्डीकर आणि त्याच्या खांद्याचा आधार घेऊन चाललेल्या कुणाल ला गाठलं. उजेडात पाणिनी ने नीट पाहिले तर कुणाल दिसायला देखणा होता.अत्ता त्याचे डोळे नशेत असलेले दिसतं होते,चेहेरा सुमारला होता तरीही त्याच्यात एक खानदानी पणा होता.

“ कुणाल, आमच्याशी बोलण्यासाठी तू किती वेळात तयार होशील?”-हर्डीकर
“ मी जरा फ्रेश होऊन येतो ” कुणाल गरवारे म्हणाला.आणि झोकांड्या खात बाथरूम मधे गेला.
“ फारच प्यालाय हा.” पाणिनी म्हणाला.
“ खरं आहे,पण तो नवखा नाहीये.तयार गडी आहे.” हर्डीकर म्हणाला. “ बघा ना टायर पंक्चर होऊन सुध्दा त्याने गाडी चालवत आणली इथपर्यंत,आणि ते सुध्दा पावसात.स्वत:वर ताबा चांगला आहे त्याचा.”
पाणिनी ने मान हलवून सहमती दर्शवली.
“ ईशा आणि त्याच्यात विस्तव जात नाही असं दिसतंय.” हर्डीकर म्हणाला.
“ दारू प्यालेल्या माणसाने तिच्या बद्दल केलेल्या विधानाला फारसे महत्व देऊ नकोस हर्डीकर.” पाणिनी म्हणाला
“ प्याला असला तरी त्याची बुध्दी आणि मन ताळ्यावर होतं ”
पाणिनी ने न पटून आपले खांदे उडवले. “ तुला काय अर्थ काढायचं तो काढ.”
बाथरूम मधून जोरजोरात उलटी काढल्याचे आवाज आले.
“ तो दारूच्या अंमलाबाहेर यायचा प्रयत्न करतोय. शुद्धीत आल्यावर पण तो ईशा बद्दल तेच बोलेल पहा.” हर्डीकर म्हणाला.
“ असे अती पिणारे असतात ना, ते दाखवतात की मी धुंदीतून बाहेर आलोय पूर्ण पणे आणि एकदम शुद्धीकरण झालंय माझं पण प्रत्यक्षात ते पूर्ण पणे अंमलाखालून पूर्ण बाहेर आलेले नसतात.” पाणिनी म्हणाला.
“ बाहेर आल्यावर तो काय बोलेल या भीती पोटी तुम्ही आधीच माझी मानसिक तयारी करून ठेवताय की काय? ”हर्डीकर ने विचारलं
“ याला कडक कॉफी पाजू या. तुझं काय मत आहे? ” पाणिनी म्हणाला. “ स्वयंपाक घरात कोणी नोकर असतील, नाहीतर मीच करून आणतो.”
“ पटवर्धन, राग मानू नका,पण मला कुणाल शी बोलायचं आहे.तुम्ही नसताना. तुमचा या प्रकरणात नेमका संबंध काय हे मला माहीत नाही, मला वाटत कुटुंबातील मित्र आणि वकील अशा दोन्ही भूमिकेत तुम्ही आहात.” हर्डीकर म्हणाला.
“ अगदी काही हरकत नाही.तुमचा स्पष्ट पण मला आवडला.तुमची परिस्थिती मी समजू शकतो.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही वर किचन मधे जा. तिथे मंगल वायकर नावाची नोकराणी आहे.माझ्या माणसांनी तिला आणि तिच्या मुलीला थोडया वेळापूर्वीच बरेच प्रश्न विचारलेत.तिला सांगा कॉफी करायला, गरवारे बरोबर आपल्या सगळ्यांसाठीच करायला सांगा.”.
पाणिनी वरील भागात असलेल्या किचन मधे गेला. खूपच मोठे होते ते , आणि अगदी अत्याधुनिक उपकरणांनी ,सुविधांनी सज्ज असे.पाणिनी आत आला आला तेव्हा दोन बायका टेबला जवळ एकमेकींशी हळू आवाजात बोलत बसल्या होत्या .पाणिनी येताच त्यांनी बोलणं थांबवलं.त्यातली एक बाई साधारण चाळीशीतील होती.लांबुडका चेहेरा, बारिक जीवणी,आणि उंच अशी गालफडं.
दुसरी तरुण होती, विशीच्या जवळपासची.लाल चुटुक ओठ,भुवया काळ्याभोर आणि पातळ,पापण्या जरा जास्तच मोठया.
“ तू मंगल वायकर आहेस?” वयाने मोठया असलेल्या बाईला पाणिनी ने विचारलं.
तिने उभं राहून पटकन होकारार्थी मान हलवली.ओठ घट्ट मिटले होते.
“ मी सुषुप्ती वायकर, ” ती दुसरी तरुण मुलगी म्हणाली. “ मी हिची मुलगी आहे.तुम्हाला काय हवंय? आईला एकदम धक्का बसल्यामुळे ती भेदरून गेल्ये.”
“ मी समजू शकतो.” पाणिनी म्हणाला. “ आम्हा सगळ्यानांच कडक कॉफी हव्ये . कुणाल घरी आलाय, त्याला तर सगळ्यात जास्त गरज आहे कॉफीची. शिवाय इतर पोलीस वगैरे आहेतच.सर्वांनाच कर.”
“ अहो ! का नाही? नक्कीच करते ” सुषुप्ती वायकर म्हणाली. “ चालेल ना आई?” तिने तिच्या आईला विचारलं. आईने पुन्हा मान डोलावली.
“ मी करते आई.” सुषुप्ती म्हणाली
“ नको,नको, मीच बघते,” मंगल वायकर म्हणाली. “तुला कुठे काय ठेवलंय ते माहीत नाहीये.”
एवढं बोलून मंगल उठली आणि ओट्या जवळ जाऊन कॉफी ची तयारी करायला घेतली.पण तिच्या एकंदर हालचाली वरून ती खूप दमल्या सारखी वाटत होती.
सुषुप्ती ने पाणिनीला विचारलं. “ तुम्ही पोलीस गुप्तहेर आहात?”
“ नाही.” पाणिनी म्हणाला. “ मिसेस अरोरा बरोबर मी आलो मगाशी. ज्याने पोलिसांना फोन केला,तो मीच.”
पाणिनी मंगल वायकर कडे बघत होता.ती थकून कशीबशी कॉफी करत होती.
“ तुम्ही दमल्या असाल तर मी करीन कॉफी ” तिला उद्देशून पाणिनी म्हणाला.
“ नको, मी करते.” मंगल वायकर म्हणाली.
“ फारच भयानक घडलं ना हे ! ” सुषुप्ती पाणिनीला म्हणाली.
“ हं, तुमच्या पैकी कोणी गोळीचा आवाज ऐकलं असेल असं मला नाही वाटत.” पाणिनी सहज बोलल्या सारखं म्हणाला.
“ नाही ऐकला.मी आणि आई गाढ झोपलो होतो.खरं सांगायचं तर पोलीस येई पर्यंत आम्ही झोपलोच होतो.त्यांनी आईला उठवलं.त्यांना माहीत नव्हतं मी बाजूच्या खोलीत झोपले होते म्हणून. त्यांना कळल्यावर ते माझ्या खोलीत आले, आणि मी जागी झाल्यावर पाहते तो माझ्या समोर पोलीस उभा होता.मला त्यांनी एवढं धारेवर धरलं की झोपेतून पूर्ण जागं व्हायची सुध्दा संधी दिली नाही.मला कपडे बदलायला लावले आणि मला वरच्या मजल्यावरील खोलीत घेऊन गेले.मी उठल्यापासून मला क्षणभर सुध्दा नजरे आड केलं नाही. अगदी कपडे बदलत असतांना सुध्दा.वर नेऊन, पोलीस ज्याला थर्ड डिग्री असा शब्द प्रयोग वापरतात ती दिली.” सुषुप्ती म्हणाली.
“ तू सांगितलस काय त्यांना?” पाणिनी म्हणाला.
“ खरं काय ते सांगितलं, की मी गाढ झोपले होते अंथरुणात.पोलीस माझ्याकडे बघत उभा राहिला तेव्हाच मला जाग आली . अर्थात यावर त्यांचा विश्वास नाहीच बसला.” सुषुप्ती म्हणाली.
तिची आई,मंगल वायकर, हाताची घडी घालून टेबलाकडे बघत गप्प बसली होती.
“ तू काहीही ऐकलं नाहीस किंवा पाहिलं नाहीस? ” पाणिनी ने विचारलं.
“ काहीही नाही.”
“ तुला काही अंदाज?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही.पुन्हा पुन्हा तेच सांगितल्या सारखं होईल.”
“ वेगळं काय सांगण्यासारखं?” पाणिनी ने विचारलं.
“ मी इथे आठवडयापूर्वीच आल्ये, तेव्हा ...”
“ गप्प बस सुषुप्ती ! ” मंगल वायकर ओरडली.ही.पण तिची नजर टेबलावरच खिळली होती
सुषुप्ती दचकून गप्प बसली.
“ सुषुप्ती ने काही ऐकलं किंवा पाहिलं नाही, पण तू?” पाणिनी ने मंगल वायकर ला विचारलं.
“ मी नोकर आहे इथे. नोकरांना काही ऐकू येत नसतं किंवा दिसतं नसतं.” मंगल वायकर म्हणाली.
“ कौतुकास्पद आहे नोकरदार या नात्याने तुझं म्हणणं.” पाणिनी म्हणाला. “ छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत हे ठीक आहे, पण कायदा असं मानतो की मोठया घटनेच्या बाबत तुम्ही ,म्हणजे संबंधित लोकांनी जागरुकता दाखवायलाच हवी.”
मंगल वायकर च्या चेहेऱ्यावरील भाव तसूभर सुध्दा बदलले नाहीत. “ मला काहीही दिसलं नाही.” ती ढिम्म पणे, भावना शून्य आवाजात म्हणाली.
“ आणि काहीही ऐकलं पण नाहीस?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही.”
पाणिनी ला संशय आला की ही बाई काहीतरी दडवते आहे.
“ तुला पोलिसांनी प्रश्न विचारले तेव्हा तू अगदी अशीच उत्तर दिलीस?” पाणिनी ने विचारलं.
“ कॉफी तयार झाल्ये , मी कपात ओतून तयार करते.” ती म्हणाली.
“ तुला पोलिसांनी प्रश्न विचारले तेव्हा तू अगदी अशीच उत्तर दिलीस?” पाणिनी ने तोच प्रश्न पुन्हा जसाच्या तसा विचारला.
“ अशीच म्हणजे?”
“ मला अत्ता दिलीस तशी?” पाणिनी ने विचारलं.
“ मी त्यांना हेच सांगितलं, की मी काही पाहिलं नाही की ऐकलं नाही.”
“ आई ला हेच सांगायचं होतं आणि त्या बाबत ती ठाम आहे.” सुषुप्ती म्हणाली.
“ गप्प बस, सुषुप्ती !”मंगल वायकर म्हणाली
“ मी वकील आहे, तुम्हाला, काही सांगायचं असेल मला, महत्वाचे आणि गोपनीय तर अत्ताच सांगा. हीच वेळ अत्यंत योग्य आहे.” पाणिनी म्हणाला.
“ मान्य आहे मला ” मंगल वायकर म्हणाली
“ काय सांगायचं आहे? सांग.” पाणिनी म्हणाला.
“ मला सांगायचं काहीही नाहीये.” मंगल वायकर म्हणाली. “ मी फक्त हीच वेळ अत्यंत योग्य आहे या तुमच्या म्हणण्याला मान्यता दिली.” आणि तिने कपात कॉफी ओतायला सुरुवात केली.
“ आई ते नको घेऊ कप.ते नोकरांसाठी आहेत.” सुषुप्ती एकदम म्हणाली.
“ पोलीस म्हणजे नोकरच आहेत.” मंगल वायकर ने तिला फटकारले.
“ तसं नाहीये आई ! ”
“ बरोबरच करत्ये मी. मोठे साहेब असते तर त्यांनी या पेक्षा वेगळं नसतं केलं.” –मंगल
“ पण आता ते जीवंत नाहीयेत आणि ईशा अरोरा याच आता सगळ बघणार आहेत.” सुषुप्ती म्हणाली.
“ असंच काही समजू नकोस.” मंगल वायकर म्हणाली
“ वरच्या पोलिसांना तू दे कॉफी, मी खालच्या मजल्यावर आमच्यासाठी मी घेऊन जातो ” पाणिनी म्हणाला आणि खाली गेला.
हर्डीकर कुणाल गरवारे शी बोलत होता “ तू आत आलास तेव्हा तू तिच्या बद्दल अत्ता बोलतो आहेस त्या प्रकारे बोलत नव्हतास.”
“ तेव्हा दारूच्या धुंदीत होतो मी.”
“ नशेत असतानाच माणूस खर बोलतो, शुद्धीत असतांना बोलतो त्या पेक्षा.” हर्डीकर म्हणाला.
“ खर की काय?, मी असल काही ऐकल नाही की अनुभवलं पण नाही.” कुणाल उत्तरला.
“ पटवर्धन कॉफी घेऊन आलाय, घे,कॉफी घे कुणाल, बर वाटेल.” हर्डीकर म्हणाला
“ मी बरा आहे अत्ताच ” कुणाल म्हणाला. पाणिनी ने त्याला कॉफीचा कप दिला.
“ तुला अरोरा च्या मृत्यू पत्र बद्दल काय माहिती आहे?” हर्डीकर ने अचानक विचारलं
“ या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार ” कुणाल म्हणाला
“ द्यावच लागेल उत्तर” हर्डीकर म्हणाला.
“ आहे , मृत्युपत्र केलेलं ” कुणाल ने नाईलाजाने मान्य केलं
“ कुठे आहे ते?”
“ ते मात्र मला माहीत नाही.” कुणाल म्हणाला
“ मग मृत्युपत्र केल्याचं तुला कसं कळलं?”
“ मला दाखवलं होत अरोरा ने एकदा.”
“ त्याची सगळी मालमत्ता त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या बायको च्या नावाने केली आहे?”
“ तिला पाच लाखाच्या वर छदाम मिळणार नाहीये. ”कुणाल म्हणाला.
“ या मुद्द्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळेल. कारण खुनाच्या प्रकरणात हेतू महत्वाचा असतो ” हर्डीकर म्हणाला.
“ तुला असं सूचित करायचं आहे का की ईशा अरोरा ने त्याला मारलं?” पाणिनी ने विचारलं.
“ मला काहीच सुचवायचं नाही.मी अगदी प्राथमिक चौकशी करतोय.अरोरा मेला तर फायदा कोणाचा आहे जास्त याची चौकशी करतोय अगदी रुटीन” हर्डीकर म्हणाला.
“ तसं असेल तर संशयितांच्या यादीत मी सर्वात पहिला असेन.कारण दधिची अरोरा च्या मृत्यू नंतर त्यांची सर्व संपत्ती मलाच मिळणार आहे.आणि यात दडवण्या सारखं अस काहीच नाहीये. सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं माझ्यावर किती प्रेम होत ते.”
“ तो भांडकुदळ होता पण तुझ्याशी त्याचे कधी वाद नाही झाले?” हर्डीकर म्हणाला.
“ नाही झाले, तो खूप आक्रमक होता पण माझ्याशी वाद नाही झाले कारण त्याला माहिती होतं की त्याच्या संपत्तीवर माझा कधीच डोळा नव्हता.मी त्याला डबल क्रॉस कधीच केलं नाही.मला जे वाटायचं ते मी फाडकन सांगून टाकायचो.कदाचित माझा हाच स्वभाव त्याला पटत असेल.”कुणाल म्हणाला.
“ त्याला कोणी डबल क्रॉस केलं?” हर्डीकर ने विचारलं.
“ का? म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला?”
“ तू अत्ता म्हणालास ना, की तू त्याला डबल क्रॉस कधीच केलं नाहीस म्हणून !” हर्डीकर म्हणाला.
“ बरोबर , म्हणालो मी तसं, मग त्याचं काय?” –कुणाल
“ डबल क्रॉस शब्द उच्चारताना तू जरा जास्त जोर देऊन उच्चारलास.”-हर्डीकर
“ नाही, तसं काही नाही.”-कुणाल
” त्याच्या बायको चं काय? त्याला आवडायची का ती? ”
“ माहीत नाही. त्या विषयावर त्याने मला कधीच काही सांगितलं नाही.”-कुणाल
“ तिने कधी त्याला डबल क्रॉस केलं? ”
“ मला कसं समजणार ते?”
“ तुला बरोबर समजतंय, काय सांगायचं आणि काय नाही ते ! ” –हर्डीकर
“ मला जे जे माहिती आहे ते सगळं मी सांगीन. ”-कुणाल
“ खून झाला, बरोब्बर त्या वेळी तू कुठे होतास?”-हर्डीकर
कुणाल गरवारे चा चेहेरा लाल झाला. “ सॉरी इन्स्पेक्टर , मी नाही सांगू शकत. ”
“ का?”
“ कारण,पाहिली गोष्ट म्हणजे खून कधी झालाय ते मला माहीत नाहीये.दुसर म्हणजे मी संध्याकाळ पासून बऱ्याच ठिकाणी होतो.आधी एका मैत्रिणी बरोबर होतो ,ती गेल्यावर मी प्यायला बार मधे गेलो. एकाच बर मधे नाही, दोन तीन बर मधे बसून प्यालो थोडा थोडा वेळ.शेवटी बाहेर पडलो आणि गाडीत बसलो तेव्हा लक्षात आलं की टायर पंक्चर झालंय. मी एवढा प्यालो होतो की दुसरा टायर बदलायच्या अवस्थेत नव्हतो.पाऊस पडत होता आणि पंक्चर काढून मिळणारं एकही दुकान उघडं नव्हतं. मी तसाच गाडी हळूहळू चालवत घरा पर्यंत आलो. एक तास तरी लागला असेल मला. ”-कुणाल
“ तुझ्या शिवाय मृत्यू पत्रा बद्दल कुणाला माहिती आहे? कोणी वाचलंय ते? ”-हर्डीकर
“ अर्थात माझ्या ,वकिलाने पाहिलंय ते. ” –कुणाल
“ वकील ! ” हर्डीकर उद्गारला. “ म्हणजे तुझ्या कडे वकील ही आहे तर !”
“ अर्थात आहे.काय वावगं आहे त्यात? ”
“ कोण आहे वकील?” –हर्डीकर
“ अथर्व देवचके ”- कुणाल
“ मला नाही माहिती हा. पटवर्धन, तुम्ही ओळखता का त्याला?”
“ मी एक दोन वेळा भेटलोय.टक्कल असलेला माणूस आहे. कोर्टात जाण्या पेक्षा बाहेरच्या बाहेर प्रकरण सोडवण्यात तो माहीर आहे. पण तो चांगल्या तडजोडी करतो असा त्याचा लौकिक आहे.” पाणिनी म्हणाला.
“ वकिलाच्या उपस्थितीत तू मृत्युपत्र बघितलस हे कसं काय? सर्व साधारण पणे मृत्युपत्र करणारा माणूस, मृत्यू पत्रात असलेल्या लाभार्थी ला त्याच्या वकिला सोबत बोलावून मृत्यू पत्र कसे केलंय हे दाखवत नाही. बरोबर आहे की नाही? ”-हर्डीकर
“ तुम्ही ते माझ्या वकीलांनाच विचारा. या कायदेशीर बाबी बद्दल मी न बोलणेच उचित आहे.” –कुणाल
“ फालतुगिरी बस झाली.निमुटपणे सांग त्या बद्दल.”-हर्डीकर
“ म्हणजे? ”
“ मी म्हणालो तेच. ” हर्डीकर म्हणाला.त्याची अत्ता पर्यंत संयम दाखवणारी देहबोली एकदम कठोर झाली. “ तू कोणाला तरी वाचवायला बघतो आहेस, आपण सज्जन असल्याचा अविर्भाव निर्माण करतो आहेस.गप्प पणे सांग नाहीतर तुला महत्वाचा साक्षीदार म्हणून तुरुंगातच टाकतो.”-हर्डीकर
“ फारच टोकाचं बोलताय असं नाही का वाटत तुम्हाला?”-कुणाल
“मी अजिबात किंमत देत नाही किती टोकाचं मी बोलतो आहे या गोष्टीला. तू इथे बसून मला गोल गोल फिरवायचा प्रयत्न करतोयस हे मला समजतय. मला सांग त्यावेळेला काय काय बोलण झालं होतं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तू आणि तुझा वकील यांना ते मृत्युपत्र कसं काय दाखवण्यात आलं होतं?”-हर्डीकर
“हे लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला पण ते काही विशिष्ट अटीवरच.” –कुणाल
“ठीक आहे काही हरकत नाही”-हर्डीकर
कुणाल ने हळू हळू बोलायला सुरुवात केली, “ मी तुम्हाला सांगितलं आहे की दधिची आणि त्याची बायको यांचे एकमेकांशी फारसं पटत नव्हतं. दधिची ला वाटत होतं की पुरेसा पुरावा मिळाला तर ती कदाचित त्याच्या विरुद्ध घटस्फोटाचा दावा लावेल.
मी आणि दधिची अरोरा एका व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र चर्चा करत होतो तेव्हा माझा वकील माझ्याबरोबर होता त्यावेळेला अचानक दधिची ने मृत्युपत्राची गोष्ट आमच्या समोर काढली. मला ते फारच अवघडल्यासारखं वाटलं मला त्या विषया वर चर्चा करायची नव्हती. पण त्यानेच ते मृत्यू-पत्र माझ्या वकिलाच्या हातात दिलं. मग वकील ज्या पद्धतीने ते वाचतात तसं त्यानं ते वाचलं”
एवढं बोलून कुणाल गरवारे पाणिनी पटवर्धन कडे वळून बघून म्हणाला, “वकील कसे बघतात , एखाद कागदपत्र ते ,तुम्हाला माहितीच आहे तुम्ही स्वतः वकील असल्यामुळे”-कुणाल
हर्डीकर ने आपली नजर कुणाल गरवारे कडेच रोखून ठेवली होती.
“ ठीक ठीक, ते फारसे महत्त्वाचे नाही. पुढे सांग काय झालं?”
“ हो सांगतो.” कुणाल म्हणाला “ते मृत्युपत्र दधिची ने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. त्यानं माझ्या वकीलाला विचारलं की स्वतःच्या हाताने लिहिलेलं मृत्युपत्र असेल तर त्यासाठी साक्षीदार नसला तरी चालतो का? त्याने असं विचारलं की माझं आणि माझ्या बायकोचं फारसं पटत नसल्यामुळे मी तिच्या नावाने फार काही मालमत्ता ठेवणार नाहीये त्यामुळे कदाचित या मृत्युपत्राला आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यानं आपल्या बायकोला फक्त पाच लाख एवढीच रक्कम द्यायचा उल्लेख केल्याचे मला आठवतय आणि बाकीची त्याची सगळी मालमत्ता तो मला देणार होता”-कुणाल
“तू मृत्युपत्र वाचले नाहीस का?” हर्डीकर ने विचारलं
“नाही. वाचलं असं नाही म्हणता येणार, पण अगदी हातात घेऊन तुम्ही जसं सविस्तर वाचाल प्रत्येक शब्द आणि शब्द अशा पद्धतीने मी नाही वाचलं. मी त्याच्याकडे फक्त एक नजर टाकली. पण हे माझ्या लक्षात आलं की ते त्याचं स्वतःच्या अक्षरात लिहिलेलं मृत्युपत्र होतं आणि तसा त्याने उल्लेखही केला होता पण मला वाटतं माझ्या वकिलानं मात्र ते सविस्तर वाचलं होतं” कुणाल ने सविस्तर माहिती पुरवली.
“ठीक आहे, पुढे काय घडलं सांग.” हर्डीकर म्हणाला.
“ पुढे काही नाही. एवढंच.” -कुणाल
“नाही एवढेच नव्हतं. सांग काय घडलं पुढे?”
कुणाल ने आपले खांदे उडवले. “बरं ठीक आहे, सांगतो.अरोरा पुढे असं म्हणाला की त्याला ते मृत्युपत्र अशा तऱ्हेनं हवं होतं की पुढे त्याचं स्वतःचं जर काही बरं-वाईट झालं तर त्याच्या बायकोला त्यातून काहीही मिळता कामा नये अगदी नगण्य रक्कम मिळाली पाहिजे, म्हणजे ती रक्कम मिळण्यासाठी तिने अरोरा चा शेवट करू नये किंवा त्याला घटस्पोट देऊ नये अशा पद्धतीचे तरतूद असलेलं मृत्युपत्र.” कुणाल म्हणाला. “ आणि आता मला माहीत असलेलं सर्व काही सांगून झालंय माझं.आणि ते ही विशिष्ट अटीवर.पण मला तुमची विचारायची पद्धत आवडली नाही मुळीच. ”
“ तुझ्या या शेरे बाजी ला मी मुळीच किंमत देत नाही.तू पिऊन आलास तेव्हा तू जी बडबड केलीस त्यावर पांघरून घालायचा हा तुझा प्रयत्न आहे.आणि....”-हर्डीकर
कुणाल ने त्याला मधेच थांबवलं. “ पुन्हा तोच तो विषय काढू नका.मी तेव्हा बोललो असलो तर ते दारूच्या अंमलाखाली.मला तसं म्हणायचं नव्हतं आणि मला ते आता आठवत पण नाही.”
“ तुला तसं म्हणायचं नसेल ही पण तू बरोब्बर नाटक केलसं....” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही जरा गप्प बसा पटवर्धन, किंवा इथून जा तरी निघून. मी हाताळतोय हे प्रकरण.तुम्ही फक्त इथे प्रेक्षकाच्या भूमिकेत आहात लक्षात असू दे.”-हर्डीकर
“ मला दम द्यायचा प्रयत्न नका करू हर्डीकर” पाणिनी म्हणाला. “ हे घर मिसेस ईशा अरोराचं आहे आणि मी इथे तिचा वकील म्हणून आलोय. इथे हा माणूस माझ्या अशिला वर शिंतोडे उडवणारी विधानं करतोय.त्याने ती मागे घ्यावीत किंवा त्याला पूरक असा पुरावा द्यावा.”
“ तुमचे आणि तुमच्या अशिलाच्या हक्का बद्दल चर्चा करायला मला वेळ नाही, पण पटवर्धन,एक बाई आपल्या नवऱ्याचा खून झाल्याचे कळल्यावर पोलिसांना न सांगता आधी तिच्या वकीलाला फोन करून बोलावते याची गंमत वाटते. ”-हर्डीकर
पाणिनी पटवर्धन उठून ताठ उभा राहिला.आपले दोन पाय ताणून , उजव्या हाताच्या तर्जनीचे बोट हर्डीकर कडे करून म्हणाला, “ मी बोलतोय ते नीट ऐक हर्डीकर,मी ईशा चं वकीलपत्र घेतलंय.तिच्यावर कोणीही चिखल फेक केलेली मला चालणार नाही.हा कुणाल नामक प्राणी मधेच उपटतो आणि आपली अॅलिबी दाखवायचा ,म्हणजे आपण खुनाच्या वेळी तिथे नव्हतोच असं दाखवायचा प्रयत्न करतो हे कोर्टात टिकणार नाहीये.थोडया सुध्दा संशयाचा फायदा आरोपीला देण्याची कायद्यात तरतूद आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ आणि तुम्ही, मिस्टर पटवर्धन , त्या संशयाचा फायदा घ्यायच्या विचारात आहात?” –हर्डीकर
हर्डीकर कडे दुर्लक्ष करून कुणाल गरवारे कडे बघून तो म्हणाला, “ संधी मिळताच मी तुला आणि त्या मृत्युपत्राला बरोबर या प्रकरणात गोवणार आहे.”
“ म्हणजे तुम्हाला कुणाल वर संशय आहे.?”-हर्डीकर
“ न्यायाधीश कधीच योग्य कारण असल्याशिवाय एखाद्यावर आरोप ठेऊन देत नाहीत, हर्डीकर, तू जर माझ्या अशीलावर संशय घेणार असाल तर मला संशय असलेली व्यक्ती याच खुर्चीत बसल्ये लक्षात ठेव.” कुणाल कडे निर्देश करत पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला.
( प्रकरण ९ समाप्त)