Hangover - 4 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | हँग ओव्हर - (भाग 4)

Featured Books
Categories
Share

हँग ओव्हर - (भाग 4)

घरी पोहचल्यावर कॉल करतो म्हणाला. मितुला त्याची काळजी वाटत होती. घरी गेल्यावर मोहितने तीला कॉल केला. तिला त्याच्या काळजीने झोप येत नवहती .मोहित च्या विचारातच कधी ती झोपी गेली ते तिला ही नाही समजले. सकाळी उठल्यावर तिने मोहित ला गुड मॉर्निंग चा मेसेज केला. मोहित म्हणाला मी आज तुझ्या बद्दल घरी सांगतो. मितु ला बरे वाटले जितक्या लवकर होईल तितके आपले मोहितशी लग्न व्हावे असे तिला आता वाटू लागले होते कारण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. मोहित स्वहताचे आवरून नाष्टाला आला. ते सगळे एकत्र नाष्टा करत . नाष्टा करून अजिंक्य मोहितचा भाऊ कॉलेज ला जात असे तो इंजिनियरिंग च्या लास्ट इयर ला होता. सगळे जमले तेव्हा मोहित म्हणाला,आई तू पण ये लवकर मला बोलायचे आहे थोडं. हो आले हा नाष्टा आणते टेबल वर. बाबा पण आले . आई म्हणाली,बोल आता काय बोलायचे .आई बाबा मला एक मुलगी आवडते ती पुण्याची आहे . गेली तीन वर्षे आम्ही एकत्र आहोत आता ती इथेच कोल्हापूर सकाळ ला मुख्य पत्रकार म्हणून जॉइन झाली आहे. अरे वा पत्रकार आहे का मग छानच बाबा म्हणाले.तिचे नाव काय आणि घरी कोण कोण असत आई ने विचारले. आई तिचे नाव मैथिली माने आई वडील आणि छोटा भाऊ आहे तिला. वडील रिटायर झालेत नुकतेच ते सरकारी नोकरीत होते. तुला आवडली आहे ना मग झाले तर लवकरच लग्न उरकून टाकू आई म्हणाली. दादया अरे वहिनी चा फोटो तरी दाखव अज्जू म्हणाला. हो दाखवतो म्हणत त्याने मैथिली चा काल काढलेला सिंगल फोटो दाखवला. सर्वाना मितु आवडली. मोहित आजच मैथिली ला घरी घेऊन ये कधी तिला भेटते अस झालं आहे.,आई म्हणाली. अहो मोहितच्या आई जरा दमान घ्या,मैथिली ला तिच्या घरी सुद्धा सांगू द्या आधी बाबा म्हणाले.माझा मोहित लाखात एक आहे त्यांना आवडणारच .हो आई आणतो तिला घरी खूश. अजिंक्य म्हणाला,दादया अजून बघू फोटो फोन मधले. तसा मोहित हसत म्हणाला नाष्टा कर आणि जा कॉलेज ला नन्तर दाखवतो फोटो आणि त्याचा गाल ओढला. अरे दादा माझे गाल नको ओढू वहिनी चे ओढ आता. तसे सगळे हसू लागले. नाष्टा करून मोहित बाहेर पडला . अजय ला भेटायला गेला. एका हॉटेलमध्ये त्यांनी भेटायचे ठरवले होते. मोहित पोहचला पाच मिनिटात अजय पण आला. अजय -कसा आहेस मोहित..मी ठीक आहे काल परत कॉल आला पुन्हा धमकी,मला वाटते नक्की कोणी तरी माझा दुष्मन आहे ज्याला मला ही निवडणूक लढू द्यायची नाही. असू शकेल मोहित राजकारणात तुझे खूप विरोधक असतील पण हा जो कोणी आहे फोन करणारा तो नक्की भाड्याचा टटू असणार. हो मला ही असच वाटतय अजय पण माझ्या मुळे माझ्या घरच्या लोकांना त्रास नको आणि विशेष करून मैथिलीला. आता ही मैथिली कोण मोहित? मोहित हसला आणि त्याने त्याच्या आणि मितु च्या रिलेशनशिप बद्दल अजयला सांगितले. ओहह असे आहे तर पण ती रिपोर्टर आहे सो तिला कोणी त्रास देईल असे मला नाही वाटत मोहित. पण अजय मितु माझा वीक पॉईंट म्हणून तिला त्रास दिला तर मी ही हार मानेन असे नाही का समोरचा विचार करणार. तुझे बरोबर आहे मोहित मग तुम्ही शक्यतो बाहेर भेटू नका. हो अजय पण सध्या ती एकटीच राहते इथे सो आय वरीड. अजय विचार करू लागला या वर काय करता येईल. तो म्हणाला,मोहित इलेक्शन होइ पर्यंत तुझ्या घरा बाहेर पोलिस प्रोटेक्शन तसेच मैथिली च्या सोसायटी बाहेर 2 पोलिस असे करता येईल पण सोसायटी वाले परवानगी देणार नाहीत.मोहित म्हणाला,फक्त माझ्या घरी पोलीस प्रोटेक्शन असू दे. मैथिलीची काळजी मी घेईन. ओके म्हणत अजय ने पोलिस चौकीत फोन लावला आणि मोहितच्या घरी पोलीस पाठवायला सांगितले तसेच काल आलेल्या कॉल चे डिटेल्स मागितले. दोघांनी कॉफी घेतली . तोपर्यंत कॉल चे डिटेल आले अजयला. अजय म्हणाला,मोहित काल आलेला कॉल हा शिरोली मधुन केला होता. हा जो कोणी आहे तो फार हुशार आहे दर वेळेस वेगवेगळ्या ठिकाणाहून कॉल करणार तुला. हम्मम्म मोहित इतकच बोलला. मोहित तू कायम सावध रहा आणि काही समजले तर कळव मला . हो अजय. चल निघुया आणि वहिनी ची भेट घालून दे तुला सवड असेल तर अजय हसतच म्हणाला. काय अजय तू पण फिरकी घेतो माझी भावा,आता डायरेक्ट साखरपुड्याला ये. बर बर म्हणत अजय ने त्याला शेकहॅण्ड केला . एकमेकांचा निरोप घेतला. कार सुरू करत मोहित ने मितु ला कॉल लावला. हॅलो जान काय करतेस. मोहित राजे आम्ही कामा मधये व्यस्त आहोत बोला काय काम होत..मैथिली राणी सरकारां कडे आमचं महत्वाचे काम होते भेटतील का त्या? ना इथे कोणी राणी सरकार नाहीत इथे फक्त पत्रकार मैथिली आहेत समजले का मिस्टर देशमुख..बर तुमच्या पत्रकार मॅडमना सांगा की त्यांना देशमुखांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे हे ऐकून मितु खुश झाली म्हणाली,मोहित खरंच सांगतोस. हो ग राणी मी खोटं बोलत नाही हे तुला माहीत आहे ना. तू सांगितलेस आपल्या बद्दल सगळं. होय म्हणूनच आई ने तुला बोलवले आहे. संध्याकाळी तयार राहा मी येतो घरी. ओके लव यु स्वीटहार्ट म्हणत मितु ने फोन ठेवला. मितु ऑफिस मधुन घरी आली फ़्रेश झाली. कोणता ड्रेस घालू ती विचारात पडली आणि एकीकडे धाकधूक ही होती की मोहितच्या घरी जायचे. सगळे ड्रेस तिने बेडवर काढून ठेवले यातला कोणता घालू तिला समजेना तो पर्यंत मोहित आलाच. ती अजून तयार नवहती तिला पाहून म्हणाला,काय हे मितु अजून तू तयार नाही मोहित मला समजत नाही कोणता ड्रेस घालू? बेडवरचा पसारा बघून तो म्हणाला,हा ढिग लागला आहे ना कपड्यांचा तरी तुला सुचत नाही . मोहित तूच सांग आता कोणता ड्रेस घालू? स्वीटू सगळ्याच ड्रेसमध्ये तू छान दिसतेस .हा पिस्ता टॉप घाल चल आवर लवकर. मग तू जा ना बाहेर बस. नाही मी इथेच बसणार मोहित म्हणाला. मोहित जा लवकर नाहीतर मी येत नाही. बर जातो म्हणत जाता जाता त्याने तिच्या गालावर किस दिला. मॅड आहेस तू मोहित ती हसुन म्हणाली. छान आवरून आली मितु पिस्ता कलरचा टॉप आणि पिंक प्लाझो तिने घातला होता. दोघे मोहित च्या घरी आले. ती म्हणाली घरी सांगितले आहेस ना . हो चल. मोहीत चा मोठा दोन मजली बंगला होता. बंगल्याच्या आवारात गार्डन आणि झोका ही होता. लाँनवर बसण्यासाठी छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मीतूला घर खूप आवडले. कार पार्क करून मोहित तिला घेऊन घरात आला . आई बाबा कुठे आहात. त्याचा आवाज ऐकून आई बाबा हॉल मधये आले. मोहितच्या आई एकदम खानदानी पण चेहऱ्यावरून हसतमुख होत्या. बाबा एकदम कडक कोल्हापुरी देशमुख शोभत होते. अरे मोहित मैथिली या बसा आई म्हणाल्या. मीतूने आई बाबा ना वाकून नमस्कार केला. बाबा म्हणाले काय पत्रकार मॅडम घर आवडले का ? हो बाबा खूपच छान. मैथिली काय खाणार तू आई ने विचारले. काही नको आई फक्त चहा चालेल. अग हे घर तुझेच आहे लाजू नकोस. नको आई खरंच भूक नाही. आई ती काय लाजत बिजत नाही एकदम डॅशिंग आहे.ती डोळे मोठे करत मोहित कडे पाहू लागली. हा मग देशमुखांची सून डॅशिंगच हवी काय मोहित राजे ? बाबा बोलले. बरोबर बाबा. घरचे हे मनमोकळे वातावरण मीतूला खूप आवडले. अरे आपले लाडोबा कुठे गायब मोहितने विचारले. अजिंक्य ला थोडा लेट होणार होता येईल आता आई म्हणाली. तोपर्यंत चहा आला. मीना स्वयंपाकाची तयारी कर मी आलेच आई मीनाला म्हणाल्या. मीना स्वयंपाक करायला बंगल्यावर यायची. मैथिली तू आता जेऊनच जा. हो आई तिला ही मोहित सोबत वेळ घालवायचा होता.सूनबाई तुमच्या आई वडिलांना लवकर बोलावून घ्या बाबा म्हणाले. हो बाबा आजच फोन करते. मोहित मैथिली ला घर दाखव सगळे आई म्हणाली. आई बाबा अजून एक सांगायचे होते. के मोहित बाबानी विचारले. उद्या पासून आपल्या बंगल्याला पोलीस प्रोटेक्शन असेल मला आणि तुम्हाला कोणी त्रास देवू नये म्हणून ,अजयने हे ठरवले आहे. ठीक आहे बाबा म्हणाले.इतक्यात अजिंक्य ही आला मीतूला पाहून म्हणाला,हॅलो वहिनी कशा आहात माय सेल्फ अजिंक्य तुमचा होणारा छोटा दीर. हॅलो अजिंक्य आय एम फाईन. अज्जू तू फ्रेश हो त्या दोघांना बसू दे बोलत आई म्हणाली. जा दादया वहिनीशी फक्त गप्पा मार काय...☺️☺️ मोहित त्याला मारायची अँकटिंग करू लागला तसा अजिंक्य त्याला ठेंगा 👍 दाखवत पळाला. मीतूला हे सगळं छान वाटत होतं. चल मितु घर दाखवतो
असे म्हणत मोहित ने मीतूला सगळं घर दाखवले आणि शेवटी त्याच्या रूम मध्ये आला मितु ही रूम आपली. रूम मध्ये मोहितला मिळालेली खूप सारी बक्षिसे होती. त्याचे कॉलेज मधले फोटो होते . मोहित तू बास्केटबॉल खेळायचास का? हो चॅम्पियन होतो मी,कॉलेज ला खूप प्राइज मिळवून दिले. वा छानच,पण किती बारीक होता तू मोहित!! हु,,आणि आता कसा आहे? तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. आता ना एकदम ऑसम,दिसतोस. मोहित ने तिला जवळ ओढले. मोहित काय करतोस कोणी येईल ना? नाही येत कोणी एक चॉकलेट म्हणत त्याने तीच्या ओठांवर बोट ठेवले . अरे अजिंक्य ये ना मितु म्हणाली तसे मोहितने मागे पाहिले तर कोणीच नवहते.मितु हसू लागली..आता कोण भित्रा असे म्हणत ती त्याच्या पासुन दूर झाली. अच्छा नंतर बघुन घेईन तुला मोहित म्हणाला. बर चल आपण लॉन वर बसु मीतू म्हणाली. दोघे लॉनवर गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. बाबा म्हणाले मैथिली येत्या रविवारी तुझ्या आई बाबा ना घरी बोलवले आहे असे सांग. हो चालेल बाबा. मोहित तिला घरी सोडायला निघाला. पुन्हा मितु आई बाबाच्या पाया पडली. सर्वांनाच ती खूप आवडली. . दुसऱ्या दिवशी सकाळीच मीतूने आई ला फोन केला आणि मोहीत आणी त्याच्या घरच्या बद्दल सगळ सांगितले. मोहित चा फोटो पाठवला. तिचे आई बाबा खुश झाले आणि शनिवारीच कोल्हापूर ला येतो म्हणाले. मितु ने ही गोष्ट मोहितला सांगीतली. विक्रांत लाही तिने फोन केला. तो ही खुश झाला. शनिवारी मीतूला सुट्टी असे तरी ती लवकर उठून आवरून बसली आई बाबा आणि सौरभ येणार होते. दुपारी सगळे आले. तिने मोहित ला संध्याकाळी घरी यायला सांगितले. मोहित संध्याकाळी आला.लाइट पिंक कलर चा शर्ट आणि ब्लू जीन्स मध्ये तो आला होता . थोडी स्ट्रीम केलेली बियर्ड खुप स्मार्ट दिसत होता मोहित. आई बाबानी त्याला बसायला सांगितले. मीतू पानी आनायला गेली. मोहित ही आई बाबांच्या पाया पडला. कसे आहात मोहित राव? बाबा मला फक्त मोहित म्हणा ते मला जास्त आवडेल. बर चालेल . हॉउ आर यू सौरभ मिहितने विचारले. आय एम फाइन जिजु. जिजु म्हणटले तर चालेल ना? सौरभ ने विचारले. तूझ्या ताई ला आवडत असेल तर मला ही चालेल. यावर सगळेच हसू लागले. कॉफ़ी घेत सर्वजन गप्पा मारत होते. आई बाबां आणि सौरभ लाही मोहित फार आवडला. उदया घरी जेवायलाच या असे सांगून मोहित निघाला. मीतू त्याला खाली सोडायला गेली. मग राणी सरकार खुश ना आता. हो खुपच. पण मी नाही खुश. काय झाले मोहित? आमचे एक काम पेंडिंग आहे तुमच्या कड़े राणी सरकार. कोणते मोहित. तसा मोहित आपल्या ओठां वर बोट ठेवत म्हणाला,चॉकलेट नाही मिळाले अजुन आम्हाला. हो का जा आता जास्त गोड खायचे नसते असे म्हणत मीतू ने त्याला बाय केले. हसत तो कार मध्ये बसला . तिला बाय करून निघाला. सकाळी लवकर उठून मीतू सौरभ आई बाबा तयार झाले. मैथिली ने आज आई ची पिंक पैठणी नेसली होती गळ्यात मोत्यांची माळ, कानात झुमके,हातात पिंक आणि गोल्डन कलर च्या बांगडया खुप सुंदर दिसत होती मीतू. मोहितचा फोन आला तो त्यांच्या साठी कार आणि ड्राईवर पाठवून देतो म्हणाला. थोड्याच वेळात सगळे मोहितच्या घरी आले. मोहितचा बंगला पाहूनच आई बाबा आनंदी झाले.

क्रमश...