Dheyvedya Mulanchi - 1 in Marathi Motivational Stories by Dhanshri Kaje books and stories PDF | ध्येयवेड्या मुलांची - भाग - 1

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

ध्येयवेड्या मुलांची - भाग - 1

परिचय :
वेगवेगळ्या टोकाला राहणारी पाच मुल. पण त्यांचं ध्येय एक. "समाजातल्या प्रत्येक लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने संपूर्ण भारताची भारताच्या संस्कृतीची आणि भारतातल्या अनगीनत रहस्यांची ओळख करून देणे" होतील का ही मूल यात यशस्वी? ध्येय मोठं होत आणि येणाऱ्या अडचणी सुध्दा पण जीथे स्वप्नांचा ध्येयांचा ध्यास असतो तीथे मार्ग देखील असतात.
काय आहे यांची कहाणी? कोण आहेत ही मूल? यांच स्वप्न पूर्ण होईल का? की ही मूल आपल्या ध्येयापासून भटकतील? की ध्येयामागे धावता धावता यांना वेगळाच शोध लागेल? सत्य की असत्य स्वप्न की भास यांचा संगम म्हणजेच ही कथा.
खर तर ध्येय गाठण्याचा मार्ग हा सोप्पा नसतो अहो प्रत्येक गोष्ट जर सहजा सहजी मिळत गेली तर संघर्षाची मजा कुठे येणार हो की नाही.

कथा ध्येयवेड्या मुलांची(भाग - एक)
'मिशन भारत'
काय आहे हे मिशन? ह्यात नेमक काय सांगायच आहे या मुलांना? ह्या मिशनची कशी सुरवात झाली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्या आधी हे मिशन काय आहे आणि याची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते जाणून घेऊ.
भूतकाळात...
प्रासादिक निवास...
समीरची रूम...
"ए आई, आई (जरा ओरडून) छे या घरात मला एक वस्तू जागेवर मिळत नाही काही वेळात मला बस पकडायची आहे आणि इथे अजून एक चांगला ड्रेस मिळत नाही छे."
समीर : "हाय, मी समीर उपाध्ये. आजच ग्रॅज्युएशनचा निकाल लागणार आहे म्हणून आधी कॉलेजला जाऊन मग बस पकडणार. कॉलेजला जायचं आहे मामा कडे ही जायचं आहे पण आमच्या घरात प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे असेल तर शप्पत. (परत एकदा आईला आवाज देत) आई येतीएस का आता मला उशीर होतोय."
आज समीरच्या ग्रॅज्युएशनचा निकाल म्हणून विशाखा तयारी करत होती तेवढ्यात समीरचा आवाज ऐकून ती समीरच्या खोलीत आली.
विशाखा(समीरची आई): "काय रे, आता मोठा झाला आहेस तू कधी तरी स्वतःची काम स्वतः करत जा सारखी काय मी लागते तुला?"
समीर: "बघितल. ही अवस्था आहे आमच्या घराची. मातोश्री आम्ही आमच्या प्रत्येक वस्तू नीटच ठेवतो हो पण घर घरातल्या प्रत्येक खोल्या आवरण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आहे न. त्याला आम्ही काय करणार. बर ते जाऊ दे माझा तो निळा टि-शर्ट कुठे आहे कालच मी स्वच्छ धुऊन घडी घालून ठेवला होता कपाटात."
विशाखा(स्मित हास्य करत): "बघ ह, आपले शब्द लक्षात ठेवायचे. सरक देते काढून. तु बाळा कपडे छानच ठेवतोस रे फक्त अजून व्यवस्थीत पणा यायचा बाकी आहे हे घे हाच न. याला म्हणतात डोळे असून काय? (समीर खाली मान घालून शांत उभा असतो) आंधळे." दोघ एकमेकांकडे बघून हसू लागतात.
काही क्षणातच समीर आपलं आवरायला निघून जातो आणि विशाखा परत आपलं आवरू लागते.
एक तासा नंतर...
विशाखा डायनिंग टेबलवर नाश्त्याची तयारी करत करत समीरला आवाज देते.
"झाल का रे बाबा आता होत नाहीये का तुला उशीर मुलगी बघायला जात नाहीयेस तु चल लवकर आवर."
शर्टची बाही नीट करत समीर डायनिंग टेबलवर येतो.
"आता आहे का? इथे मधेच माझ्या लग्नाच कुठे आलं तु पण न आई. वाढ लवकर मला."
दोघ नाश्ता करायला बसतात.
काही वेळा नंतर नाश्ता करून समीर कॉलेजला निघून जातो.
ज्ञानदा आर्ट्स कॉलेज..
गेट नं 1...
ज्ञानदा कॉलेजमध्ये आज सगळीकडे नुसती वर्दळ होती. आज ग्रॅज्युएशनचा निकाल लागणार होता त्यामुळे सगळी मुलं जरा अस्वस्थच होती. ग्रॅज्युएशन म्हणजे आयुष्यातला आणखी एक टप्पा पार केलेल्या मुलांचा टर्निंग पॉईंट इथून आयुष्याला खरी सुरवात होत असते.
आज डिग्री मिळणार म्हणजे इथून प्रत्येकजण वेगळे होणार प्रत्येकाचे मार्ग वेगळे होणार इतक्या वर्षाचा सहवास एका क्षणात संपणार याच प्रत्येकाला दुःख ही होत पण त्याच बरोबर आपला आत एक नवा प्रवास सुरू होणार आपण आपल्या ध्येयाकडे आणखी एक पाऊल टाकणार याचा उत्साह देखील होता. जो तो येऊन बोर्डवर नजर टाकून आपला निकाल चेक करत होते.
सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. अशातच समीर आपल्या बाईक वरून कॉलेजला येतो अंगावर निळ्या रंगाचा टि - शर्ट मनात 'मी पासच होईल' असा आत्मविश्वास आणि एकदम स्टायलिश असलेला मुलगा समीर.
जस समीर कॉलेजमध्ये आला तस सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या त्याला बघताच एक क्षण सगळे निकालाच अगदी विसरूनच जातात. शेवटी कॉलेजचा प्रिन्स चार्मिंग असतो ना तो. ते म्हणतात न. 'मुलींच्या गळ्यातला ताईत' तेच.
एक उमदा व्यक्तिमत्त्व. कुणाला ही मदतीची गरज पडली की लगेच हजर कुठल्याही नोट्स असो की अजून कसली मदत कधी ही नाही म्हणणार नाही. त्यामुळे कॉलेजचा तो हिरो होता.
त्याच्या चौकस बुद्धीचे आणि नेहमी काही तरी नवीन शिकण्याचे त्याच्या शोधक वृत्तीचे त्याचे शिक्षक देखील कौतुक करायचे याच वृत्तीमुळे की काय "मिशन भारत" ला ठिणगी मिळाली होती.
समीर एक असा मुलगा होता जो प्रश्नांमधून दुसरे प्रश्न निर्माण करायचा आणि त्याची उत्तरे ही स्वतःच शोधायचा. संपूर्ण ग्रॅज्युएशन मध्ये अस करत करत त्याचा एक ग्रंथच तयार झाला होता. त्याला अडलेले प्रश्न त्यांची त्यानी शोधलेली त्याला पटलेली उत्तरे याचा जणू तो एक महासगारच होता.
पण या माहितीच पुढे काय करायचं हेच त्याला समजत नव्हतं. त्याचा इतका अभ्यास झाला होता की, आता त्याला स्वतःला भारत, त्याचा इतिहास, आपली संस्कृती, आणि पुरातन रहस्ये प्रत्यक्ष रुपात समजून घेण्याची तीव्र इच्छा होती.
आणि तो त्याची सुरुवात आपल्या मामाच्या छोट्याशा गावा पासून करणार होता.
त्यामुळे आज समीर खूपच गडबडीत होता. त्याने कॉलेजच्या पार्किंग मध्ये आपली बाईक लावली आणि सरळ बोर्डकडे गेला आणि आपलं नाव शोधू लागला यावेळी कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी दोन बोर्ड लावले होते एका बोर्डवर प्रत्येक साईड मधून पाहिले आलेल्या विद्यार्थ्यांची नावे होती आणि दुसऱ्या बोर्डवर बाकीच्या विद्यार्थ्यांची नावे होती.
ज्या बोर्डवर पाहिले आलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी होती त्या बोर्डवर सगळ्यात वर समीरच नाव होत कारण तो संपूर्ण राज्यात पहिला आला होता.
समीर आपलं नाव शोधण्यात मग्न होता. तेवढ्यात त्याच्या ग्रुप मधला संकेत त्याला आवाज देतो.
"ए (जोरात आवाज देऊन) त्या बोर्डवर काय शोधतोएस इकडं ये चल आपल्याला कॅन्टीनला जायचय चल लवकर."
समीरच्या ग्रुपनी आधीच सगळी तयारी करून ठेवलेली होती. आज समीरला सगळ्यांकडून जंगी पार्टी होती.
संकेत तसच त्याला ओढत कॅन्टीनकडे नेतो. कॅन्टीनमध्ये त्याच्या स्वागतासाठी अगदी सर मॅडम पासून सगळे तयार होते. संकेत समीरला घेऊन कॅन्टीनमध्ये येतो.
त्याला आलेलं बघताच सगळेजण एकदम ओरडतात.
"समीर अभिनंदन काँग्रॅट्स हिरो राज्यात पहिला आला आहेस तू"
त्याच्या बद्दलच सगळ्यांच प्रेम बघून समीर भारावून जातो. त्याला काय बोलाव तेच समजत नाही. तो कॅन्टीनमध्ये येतो समोर सगळे शिक्षक उभेच असतात तो सगळ्यांच्या पाया पडतो आणि मग सगळे पार्टीचा आनंद घेतात.
आता सगळ्यांना उत्सुकता असते ती सोहळ्याची आज सगळ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे डिग्री मिळणार असते. समीरला तर कधी एकदा आई बाबांना हे सांगतो अस झालेलं असत. तो शिक्षकांची परवानगी घेऊन लगेच घरी जातो.
काही वेळा नंतर...
प्रासादिक निवास...
विशाखा आवरा आवर करून नुकतीच आपल्या खोलीत आराम करायला आली होती. थोडासा तिचा डोळा लागतच होता तेवढ्यात दार वाजल आणि तिची झोप उडाली. ती तशीच झोपेतच दार उघडायला येते.
विशाखा(दार उघडत): "आले.. आले.. थोडासा आराम पण कुणी करू देत नाही कोण आहे? (दार उघडताच). तु इतक्या लवकर? काय लागला निकाल.?"
समीर घरात येत विशाखाला सांगतो.
"अग आई झोप काय घेतेस आवर लवकर कॉलेजमध्ये पदवी समारंभ सुरू होईल आत्ता. तुला मी घ्यायला आलोय चल लवकर बाबा डायरेक्ट येणार आहेत."
विशाखा लगेच आवरायला निघून जाते. आणि समीरच्या मनात आता पुढे काय कस करायचं याचे विचारचक्र सुरू होतात.
काही वेळा नंतर...
विशाखा छान साडी नेसून बाहेर येते. आणि लगेच दोघ कोलेजकडे निघून जातात.
आज समीर स्पीच सुद्धा देणार असतो त्याने तशी तयारी देखील केलेली असते.
काही तासा नंतर...
ज्ञानदा आर्ट्स कॉलेज...
काही क्षणातच ती वेळ येणार होती. पूर्ण कॉलेज विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी गजबजलेलं होत प्रत्येकजण एकमेकांच्या भेटी गाठी घेत होते आणि तेवढ्यात आपल्या शानदार बाईक वरून समीर आईला घेऊन आला.
प्रत्येकजण त्याच्या कडे बघून एकमेकांशी कुजबुजत होते. प्रत्येकाच्या नजरा समीरवरच खिळल्या होत्या.
आणि तेवढ्यात अनाउंन्समेंट होते.
क्रमशः...