वसतिगृहात परत आल्यावर मी आनंदला झालेला प्रकार सांगितला.  तू म्हणत होता तसंच झालं.  लक्ष्मीने प्रेमाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला.  माझ्या छातीत धड धड आणि कालवाकालव वाढली होती. काय बोलावं?? काय उत्तर द्यावं ?? सुचत नव्हतं. 
"  मग तू काय उत्तर दिलं ???"
आनंद उत्स्फूर्तपणे विचारणा केली. 
"  काय उत्तर देणार !!! तुला तर माहीतच होतं ना की, लक्ष्मी मला आवडते.  मग अधिक  विचार न करता मी तिला सांगितलं कि,  माझं ही तुझ्यावर प्रेम आहे.  फक्त मी सांगण्यासाठी भीत असायचो. "
  "  पण एका गोष्टीने चिंता वाढवली रे!!!!  मी उदास होउन आनंदला म्हटले . 
" कोणती काळजी आता अमर ???? तुझी होईल लक्ष्मी!!! 
आनंदने विचारणा केली.. 
  "  अरे तसं नाही.  पण लक्ष्मीला, लग्नाला बोलणी करण्यासाठी मुलगा पाहायला येणार आहे.  लक्ष्मीने लग्नांसाठी सुद्धा मला म्हटलं आहे.  एक तर आपली परिस्थिती अशी , वरून सामाजिक विषमता!!  भीती वाटते  रे की , माझ्यामुळे लक्ष्मीला त्रास झाला तर!!!!!  तिच्या घरी आमच्या नात्यांविषयी  माहिती झालं तर!!!!  लग्न करायला हरकत नाही पण.... आपले खायचे प्रश्न मिटत नाही, मग  लग्नाचा विचार करून , मी तिला सुखात ठेवू शकणार का????"
                       "  सुखात वाढलेली ती पोरगी.  आपल्या सोबत म्हणजे माझ्या सोबतीला असणं म्हणजे फक्त दुःखे उचलावी लागणार आहे!!"
मी गंभीरपणे बोलू लागलो. 
"  बरोबर आहे तुझं अमर !! पण लक्ष्मीने केलेल्या प्रेमाचा निदान तरी विचार कर!!! तिचा ही थोडा विचार कर!!!  लक्ष्मीची तयारी हे दुःख उचलण्याची असेल,  तर मग प्रश्नच मिटला!!!! 
असा आनंद धीर देत म्हणाला... 
"  होय आनंद लक्ष्मीने  लढण्याची, सुख दुःखात साथ देण्याची,  सोबत राहण्याची तयारी दर्शवली आहे . मी तरीही चिंतातुर होऊन बोलत होतो. 
  "  मग झालं तर अमर!!!  पुढचे पुढे बघू. निघेल कोणता  तरी मार्ग .  आणि हो समाजाच्या विपरीत करायचं ठरवलं की,  संकटे आलीचं समजून त्याला तोंड देण्याची तयारी असली की , सर्व व्यवस्थित होते!!" 
असा आशावाद  आनंदने निर्माण केला .
                आता उद्या कॉलेजमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.  त्यासाठी अमर तू  ये..  असं म्हणत आम्ही झोपी गेलो. 
                         सहा-आठ महिने मी मात्र लक्ष्मीच्या प्रेमात पुर्णतः बुडून गेलो होतो . तिच्याच आठवणीत आता दिवस अपुरा वाटायला लागला . कधी मग बागेत हातात हात घेऊन फिरायला जायचं , तर कधी नवीन सिनेमा लागला , तसं ही आता आईला पाठवून काही पैसे जवळ सुद्धा असायचे,  म्हणून आनंद,  मी आणि लक्ष्मी एखाद्या सिनेमाला जात असायचो. पण आता आनंद आमच्या सोबत यायला टाळायचा. काही काम आहे म्हणून सांगत असायचा. बहुतेक आम्हांला एकांत मिळावा म्हणून तो खोटा बोलत असावा. पण मी मात्र आनंदची काही एक युक्ती चालू देत नसायचो. मग त्याचा नाईलाज असायचा. मग त्याला आमच्या सोबत यावचं लागायचं. मग सिनेमाला गेल्यावर लक्ष्मी ने माझा  हातात हात पकडून बसायचे , असं ठरलं राहायचं . मग मध्येच आनंद खेकसून  वहिनी पुरे झालं, म्हणून लक्ष्मीला चिडवीत असायचा. ती बिचारी लाजेने खाली मान घालायची. आनंद लक्ष्मीला आता लक्ष्मी कमी आणि वहिनी जास्त म्हणत असायचा. तोच आमच्या मैत्रीतून प्रेमाचा वेल तयार होण्याचा एकमेव साथीदार होता. 
                   पूर्ण दिवस मजेत जायचा . आई  हाताला काम लागेल तीच करू लागली. कारण वरचेवर मी तिला पैसे पाठवत असायचो.  एकेदिवशी लक्ष्मीला नाशिक हून जयेश नावाचा एक मुलगा  पाहायला आला होता.  उंचपुरा, पाहायला देखना,  अगदी लक्ष्मीला शोभेल असा ,सोबतचं सरकारी नोकर, जमीन  जुमला, म्हणजे त्याच्या गावचा तो पाटील चं होता, म्हणून तो मुलगा लक्ष्मीच्या घरच्यांना आवडला म्हणजे पसंत पडला.  आता आपलं नाशिकच्या मुलांशी लग्न पक्के होईल,  या भितीने तिने लग्नांस नकार दिला  आणि आमच्या दोघांच्या  प्रेमांविषयी घरी सांगितलं ... 
    " काय !!!! तू कुणावर तरी प्रेम करतेस ???? यांसाठीचं तुला इतके वर्षे शिकवलं काय???  कॉलेजमध्ये जात होतीस की , लफडे करायला???"  लक्ष्मी चे वडील संतापून बोलत होते. 
"  कोण आहे तो नांव?  गावं ??  जातीचा आहे की,दुसऱ्या जातीचा???"   असे नाना तर्हेचे  प्रश्न  लक्ष्मीच्या बाबांनी  रागात येऊन विचारले होते. 
   " तो आपल्याचं गावचा आहे . अमर अंबादास अवथरे यांचा मुलगा.  आंम्ही एकाचं कॉलेजमध्ये शिकायला आहो." 
लक्ष्मी रडत रडत घरी सांगत होती . 
" तो अंबादास , आपल्या घरी कित्येक वर्षे नोकरी केली , गुलामी  केली, हमाली केली , कर्ज काढून शेती केली, कर्ज फेडणे शक्य झालं नाही,  शेवटी जगण्याचा कंटाळा , खाण्याचा प्रश्न होता म्हणून विहिरीत जीव देऊन मेला!!!!  त्या भिकारड्या च्या मुलांसोबत तू प्रेम केलं???त्याच्याशी लग्नाची स्वप्न पाहिली??? 
कुठे शेण खायला  गेली होतीस???? तूला दुसरा कुणी सापडलाचं नाही ??? " 
" त्या मेलेल्या जनावराचे मांस खाणार्या महारांच्या घरी नांदायला जाणार आहेस  तू???? " लक्ष्मी चे बाबा अजूनच रागात बोलत होते. 
  "  पाहिला असता जातीचा,  जमीनजुमला असणारा,  तर एक वेळ विचार करून करून दिलं असतं लग्न!!  पण या  कुत्र्यांकडे खायला पैसे नाही,  राहायला घर नाही , त्याच्या सोबत प्रेम करताना किळस कशी वाटली तुला???? की अक्कल गहाण ठेवली होतीस??? 
           "  अहो बाबा ,  तो खरंच खूप चांगला मुलगा आहे . त्याचं ही माझ्यावर प्रेम आहे. काय असलं घर नाही, दार नाही तर??? आणि आज ना उद्या त्याला नोकरी लागेलचं!!! जातीचा नसला म्हणून काय झालं??? पण माझं प्रेम आहे त्याच्यावर. मी लग्न करेल तर अमर सोबतचं अन्यथा अशीचं राहील आयुष्यभर एकटीचं !!! 
लक्ष्मी आई, बाबा, आत्या यांना समजावून सांगत होती.. 
      "  खबरदार!!!!!!  एक  अजून शब्द काढला तर!!! !!  तेवढ्यांत  कानात एक चपराक लक्ष्मीच्या मिळते . आमचं नाव घालायला जन्माला आलीस का???  आणि परत कधी त्याचा विषय त्याच्यावर प्रेम आहे,  असं म्हटलं तर , त्याचा आणि तुझा जीव घेतल्या बिगर राहणार नाही""
लक्ष्मीचे बाबा जोराने बोलत होते...
                " आंम्ही पोरीला शिकवायचं म्हणून शहरात घर घेतलं. इथे राहण्याची सोय केली. शिक्षणात हुशार, आणि शिकायची आवड म्हणून आम्हीं एवढ्या वर्षेपासून तुला शिकवत आलो..आणि  तू त्याच्यासोबत,  या खालच्या जाती वाल्या सोबत प्रेमाचे चाळे करून  राहिली होती, वरून सांगून सुद्धा राहिली!!! इज्जत वेशीवर टांगणार आहेस का आमची???  म्हणे  त्या महाराच्या पोरांवर प्रेम करतो..लायकी तरी आहे का त्याची आपल्या समोर उभे तरी राहण्याची ??? छे~~~ त्यांच्या घरी पाणी प्यायची ईच्छा होत नाही आणि ही त्या पोट्ट्यासोबत प्रेम करून आली!!! 
                         लक्ष्मीच्या डोळ्यांत आता अश्रुची धार लागली होती. ती कधी थांबेल याचा काही वेळ माहितीचं नव्हता.. 
  "  आज पासून तुझं कॉलेज बंद.  नाशिक वाला मुलगा आम्हांला पसंत आहे.  तुझं लग्न आता त्याच्याशी लावून देणार आहे.  खूप झालं कॉलेजचं शिक्षण आणि काय दिवे लावले????  आल्या त्या महाराच्या पोरासोबत प्रेमाचे चाळे करून!!! 
असे बोलत लक्ष्मी चे बाबा  रागाने निघून गेले. 
                              लक्ष्मीला एका खोलीत बंद करण्यात आले.. घरीच सर्व करायचं. बाहेरची कामे असली तरी दुसऱ्या नातेवाईकांना सांगून करायची पण लक्ष्मीला घराबाहेर पडू द्यायचं नाही, अशी सूचना घरातील सर्व सदस्यांना देण्यात आली. आपलं जाणं येणं, कॉलेज बंद झाल्याने लक्ष्मी समोर काय करावं सुचत नव्हते. सतत ती रडून रडून पूर्ण दिवस काढत असायची. अमर कसा असेल???त्याला या गोष्टीची माहिती झाली असेल का???किंव्हा कुणाला निरोप सांगायचा हा ही यक्ष प्रश्न लक्ष्मी समोर उभा ठाकला होता. 
                अश्यातचं महिना उलटून गेला होता. पण लक्ष्मी कॉलेज मध्ये का येत नाही याचा थांगपत्ता ही लागत नव्हता. लागेल तरी कसा??? कधी तिच्या घरचा पत्ता ही आम्हीं माहिती केला नव्हता. कॉलेज ला येते आणि आमची भेट होत असायची त्यामुळे आम्हीं कधी लक्ष्मी च्या घराचा पत्ता घेतला नाही. आणि अशी परिस्थिती येईल, अचानक लक्ष्मी गायब होईल याची कल्पना सुद्धा आम्हीं केली नव्हती. मग मनात सतत प्रश्न उठत असायचे????नाशिक हुन आलेल्या मुलांसोबत तर नाही झालं असेल लग्न लक्ष्मीचं???एक मन झालं असेल असं सांगत असायचं तर दुसरं मन छे असला काही विचार करू नको असं मलाचं सांगत असायचं. 
        परत विचार यायचे की, आमच्या नात्याविषयी तर नाही सांगितलं असणार????त्यामुळे तर लक्ष्मी चं कॉलेज बंद झालं असणार!!! मग मी स्वतःलाच दोष देत असायचो.. मग आनंद माझी समजूत काढत असायचा, आणि सांगत असायचा, अरे काही अडचण निर्माण झाली असेल रे??? येईल - येईल ती परत आपल्या कॉलेज ला!!! तेवढ्या पुरताच तो वेळ निघून जायचा, पण लक्ष्मी च्या आठवणीने मातफ मन हेलावून जात असे. कित्येक दा तरी ती ज्या रस्त्याने नेहमी जायची, त्याचं रस्त्याने कुठे लक्ष्मी चा, तिच्या घराचा पत्ता लागते काय???याचा शोध घेत असायचो, पण लक्ष्मी चा पत्ता काही लागत नव्हता.........
क्रमशः .....