Curapt life thru control over thort process - 5 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 5

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 5

लग्नानंतर ती आर्याकडे रहायला येते..... बिझनेसमुळे सतत आर्याचे पॅरेंट्स आऊट ऑफ स्टेशन असल्याने, दोघेच इथल्या घरी रहातात..... नव्याचे नऊ दिवस संपतात आणि आता लग्नानंतरच्या खऱ्या जर्निला सुरुवात होते..... आता आर्या सुद्धा त्याच्या ऑफीस वर्क लोडमुळे बिझी होऊन जातो....... ही एकटीच घरात काय नको ते बघते..... एक दिवस अशीच ती...... खूप दिवसांपासून डॉमिनोजला जाऊन, हँग आऊट केलं नाही म्हणून जायचं ठरवते..... एकटीच कारने जायला निघते.... कार पार्क करून, आत येऊन बसते......

पिझ्झा अँड कोक ऑर्डर करते...... ऑर्डर देऊन, आपल्या टेबलवर बसते...... ती जिथे बसली असते तिथून तिला ट्रांस्परन्ट काचेच्या पलीकडची पार्किंग क्लिअर दिसते..... तिची नजर येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांकडे असते...... कारण, तिची ऑर्डर प्लेस व्हायला अजून तरी २८:०० मिनिटं बाकी असतात..... जास्त घाई नसते...... सो, ती टेन्शन फ्री होऊन बसते..... टाइम पास म्हणून ती रोडकडे बघत बसते......

अचानक तिला बाहेर एक एजेड कपल दिसतो..... जो तिलाच काही तरी खुणावत असल्याचं जाणवतं...... ती इकडे - तिकडे बघते..... ते दोघं इतर कोणाला तर खुणावत नाहीत ना......! हे आधी कन्फर्म करते...... तेव्हा ती दोघं हिलाच खुणावत असल्याचं समजतं...... ती त्यांना खायला काही हवं असावं म्हणून, बाहेर त्यांची विचारणा करायला निघून येते......🙂

तिला बाहेर येताना बघून, त्यांना अश्रू अनावर होतात.... तिला काहीच समजत नाही....... ती गोंधळून जाते..... पळतच त्यांच्या जवळ जाते.....

कियारा : "काय हवंय तुम्हाला...... भूक लागली आहे का....??...🥺"

दोघे हातांनीच नाही म्हणून सांगतात..... ती त्यांना सगळ्या महत्वाच्या गोष्टी हव्या का असं विचारते..... पण, त्यांचं उत्तर नाही असंच असतं..... ती गोंधळून......😣😣

कियारा : "मग काय हवंय तुम्हाला......😣"

दोघे : "तू......😭"

कियारा : "काय.....😲😲🤯"

तिला धक्काच बसतो.... ती मागे हटते.... घामाघुम होते..... तेवढ्यात तिच्या खांद्यावर ओळखीचा स्पर्श तिला जाणवतो..... ती मागे बघते तो आर्या असतो.....😲 आर्या त्या कपलकडे खाऊ की, गिळू या नजरेने बघत असतो..... आणि तिला घेऊन, आत डॉमिनो जाणार तेवढ्यात त्या दोघांमधली एक व्यक्ती ओरडत, कियाराला उद्देशून.....

ती व्यक्ती : "डोन्ट गो बेटा...... वुई आर यूअर् पॅरेंट्स..... वुई आर नॉट लायिंग..... प्लीज बिलिव्ह ऑन अस..... ज्यादिवशी विश्वास बसेल इथेच असू आम्ही...... येऊन भेट.....😭"

असं म्हणत ते निघून जातात....... इकडे आर्या, कियाराला दोन्ही बाजूंनी घट्ट पकडत, आत घेऊन येतो..... ऑर्डर पार्सल करून, ते दोघे घरी यायला निघतात..... कियाराची कार, आर्याचा ड्रायव्हर घेऊन येतो..... घरी येऊन, आर्या रागातच रूममध्ये फ्रेश व्हायला निघून जातो..... कियाराला जे समजायचं ते ती समजून जाते......

रात्री आर्या तिच्याशी एकही शब्द न बोलताच, झोपी जातो...... मात्र त्या एजेड कपलच्या बोलण्याचा तिच्यावर खोलवर परिणाम होतो..... त्यांचे एक - एक शब्द हिच्या काळजाच्या कप्प्यात जाऊन बसतात.... फिरता - फिरता सहज तिची नजर बाहेर जाते..... लग्न होऊन आल्यापासून ते आज पर्यंत जितकी सिक्योरिटी नव्हती...... तितकी आज बाहेर गेटपर्यंत असलेली तिला दिसते.... यावरून आता आपल्यासोबत इथेही प्पाच्या घरच्यासारखंच घडेल असा विश्वास, तिच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी पुरेसा असतो.....😢

ती रात्र कशी तरी निघून जाते..... सकाळी आर्या ब्रेक फास्ट विनाच ऑफिस निघून गेल्याचं तिला समजतं..... इकडे दिवसभर कियारा बाहेर कसं पडायचं हा विचार करत असताच, सायंकाळी पाच ची टोन कानी पडते आणि ती भानावर येते..... आर्या घरी आल्याचं तिला समजतं.... ती कॉफी घेऊन त्याच्या रुममध्ये जाते.... कॉफी टेबलवर ठेऊन, तिला निघून जायचा इशारा तो करतो...... ती सुद्धा त्याच्याशी बोलणं योग्य समजत नाही आणि तिथून बाहेर निघून येते...... रात्री आर्या जेवून, झोपी जातो..... हिच्या डोक्यात मात्र तेच सुरू असतं..... उशिरा रात्री तिला झोप लागते..... सकाळी १०:०० वाजता तिला जाग येते..... उठून बघते तर आर्या नसतो..... गेला असेल म्हणून, ती बाहेर हॉलमध्ये येऊन बघते..... आर्या तिथेच रागात बसून असतो..... त्याला इग्नोर करत, ती फ्रेश व्हायला निघून जाते आणि आर्या वैतागून ऑफीसला निघून जातो..... 😒

फ्रेश झाल्यावर, ब्रेक फास्ट करता - करता तिला अचानक लक्षात येतं की, बंगलोच्या मागे एक हिडन डोअर आहे ज्यातून, कधी - तरी लपून आर्या बंगलोत एन्ट्री करायचा असं त्यानेच स्वतः तिला सांगितलं असतं.... ती पट्कन रेडी होते आणि त्या डोअरचा शोध घेत, बंगलोच्या मागच्या बाजूला येऊन पोहचते.....🧐🧐 तिथे खरंच एक हिडन डोअर असतो.....😲

.
.
.
.
क्रमशः



❤️ खुशी ढोके ❤️