tristhamb in Marathi Motivational Stories by YUVI MANALI books and stories PDF | त्रिस्थंभ

Featured Books
  • Operation Mirror - 4

    अभी तक आपने पढ़ा दोनों क्लोन में से असली कौन है पहचान मुश्कि...

  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

Categories
Share

त्रिस्थंभ

त्रिस्थंभ
​एक गाव त्या गावाचं नाव रामपूर होतं, त्या गावात सर्व गावकऱ्यांच्या प्रति संस्काराची गोडी व मायेची छाया होती, अश्या गावात ऐकून लोकसंख्या 90 होती, ते गाव छोटंसं असून निसर्गाची साथ होती, गाई गुऱ्यांची चिमण्यापाखरांची किलबिल होती, असे वाटत असे की जणू काही आपण धर्तीवर असून सुद्धा स्वर्गात आहोत असल्याचा भास भासत होता, त्या गावातील घराघरांतल्या आई वडिलांच्या प्रति मायेची प्रीत गगनात मावेनासा होता, एवढ्या चांगल्या गावाच्या वृद्धावणात एक चिमुकला जन्माला आला आज तो लेख लिहत आहे, तो लेखक आज स्वतःची आत्मचरीत्राची ओढ लिहत आहे, तो चिमुकला जन्माला आल्यावर संबंधितांनी त्याचं नाम करण सुद्धा केलं त्याचं नाव जणू काही एका राजाच्या मुलाच नाव नामंत्रीत केल्यासारखं, त्या मुलाच नाव युवराज ठेवण्यात आलं होतं हा मुलगा सर्वांच्या सहवासात हळूहळू मोठा होऊ लागला मित्रांची संगत व गमतीचा हात सुद्धा थांबवत चालला होता, सुख दुःखात त्याच वास्तव गावाप्रति होतं, गावातील नागिकांचा हिरा व मित्रत्वाच्या दुनियेतला राजा होता, अचानकच युवराजचे वडील इ.स. 2009 मध्ये मृत्यू पावतात युवराजचं व त्याच्या परिवाराचं हस्त खेळत जीवन रडण्याच्या वाटेवर आलं होतं, त्या मुलाला हळू हळू काही गोष्टी व परिवाराची अडचण समजायला लागली, तो घरातला वडिलोपार्जित मुलगा होता, त्याला तीन भाऊ सुद्धा होते युवराज हा लहानाचा मोठा त्याच्या आजुळीच झाला, त्याचे वडील मृत्यू पावल्या कारनाने त्याच्या आईला चिमुकल्यांना मोठं करण्यासाठी सासर सोडून माहेरी यावं लागलं त्याच्या आईचं लग्न नववीच्या वर्गात असतांना झालं होतं, त्याच्या आईच मराठी शिक्षण असल्याकारणाने तेलनगण्यात वास्तव असलेलं सासर लेकरांच्या शिक्षणासाठी व भवितव्याच्या भरारीसाठी सोडावं लागलं, युवराज हा त्याचे वडील मृत्यू पावलेल्या वर्षात पाचवीत इंग्रजी मीडियम च्या वर्गात कार्यरत होता, त्याचे भाऊ चिमुकले मदवा भाऊ 8 वर्षाचा होता व सर्वात लहान भाऊ सहा वर्षाचा होता, त्यांची आई त्या चिमुकल्या लेकरांना मोठं करण्यासाठी आई बापांच्या दारी पडली होती, व ते वर्ष रडण्याच्या ओढीत गेलं होतं, आईच्या माहेरच्यांना लेकरं व त्या चिमुकल्या लेकरांची आई जड वाटू लागली, त्या घरात काम करणारे आईचे वडील एकटे होते, खाणाऱ्यांचे हात दोन झोडप्यांचे व परदेशी चिमुकल्या लेकरांच परिवार होतं, असे चालत असतांना घरात युवराजच्या आईच्या प्रति तानातनी रिकामी असल्याची गोष्ट त्या चिमुकल्या लेकरांच्या आईच्या कानावर पडत होती, त्यांची आई काम शोधण्यासाठी घराच्या बाहेर पाऊल टाकली होती, त्यांच्या आईला बिडी कंपनी चालविण्याची मुभा मिळाली ती छोटीशी कंपनी गावात चालविण्यास सुरुवात केली होती, त्या लेकरांच्या आईचे स्वप्न खूपच वेगळे होते जणूकाही अवकाशात भरारी घेण्यासारखी त्या आईला वाटत असे माझं शिक्षण पूर्ण करून दुसरी कोणती चांगली नोकरी शोधावी असं तिच्या डोक्यात विचार खेळत होतं, त्या लेकरांची आई नववी पास असून इ.स.पू. 2010 मध्ये दहावीच्या वर्गात प्रवेश घेऊन उत्तीर्ण होण्याचं ठरविलं होतं, ती दहावीची परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण सुद्धा झाली होती, आता मात्र ती चांगली नोकरी शोधण्याच्या मार्गावर होती तिला एखाद्यकडून आयकण्यात आलेली LIC या शाखेची समजूत मिळाली व ती परीक्षा देण्यासाठी पात्र ठरली परीक्षा उत्तीर्ण होऊन LIC च्या कामात पारंगत होत जात होती तिला आता चिमुकल्यांना पाळण्याचा धीर चांगलाच मिळाला ती कधी हरण्याचे स्वप्नच पाहत नसे, तिला दैनंदिन दिवसातील वेळेतला सेकंद तिला वेगळ्याच अनमोल जीवनाचा भास निर्माण करून देत होता, त्या चिमुकल्यांची आई लहाण्या दोन मुलांना तेलनगण्यात स्थित असलेल्या बोधन येथे शिक्षणासाठी हॉस्टेल मध्ये दाखल केले, मदवा मुलगा शिक्षणास पहिल्या वर्गात पात्र ठरला तर सर्वात लहाना मुलगा LKG या वर्गात पात्र ठरला त्यांची आई त्यांना इंग्रजी मीडियम शिक्षण देण्यास सुरुवात केली, आता या दोन मुलांना मायेची प्रेम बापाची छाया नाहीसे झाले, आई चिमुकल्यांना सोडून एकटी राहवेनासी होऊ लागली होती जिद्दीपोटी ती लेकरांच्या शिक्षणाप्रति हार मानली नाही, त्या चिमुकल्यांचा शिक्षणाचा पहिला वर्ष उमटवून गेल्यावर लहाना मुलगा आकाशला आई जास्त सोरत आठवत होती, म्हणून ती आई लहाण्यामुलाला हॉस्टेल मधून प्रवेश रद्द करण्याच ठरवलं होतं, मदवा मुलगा अक्षय याला एकट्याला चांगलं शिक्षण देण्याचं ठरविली होती, लहाण्यामुलाला माहेरी जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात दाखला देण्यात आला होता, मोठा मुलगा युवराज हा अजुळच्या सहवासात लहानपणापासून राहून चांगल्याप्रमाणे शिक्षण घेत होता, अश्याप्रमाणे आईच्या उच्च विचारांच्या प्रति मुलांना चांगलं शिक्षण मिळालं आईच्या ज्ञानापोटी उच्च भरारी मिळाली, आज त्यांची आई इ.स.पू 2021 मध्ये मागील 7 वर्षांपासून महाराष्ट्र शासन जिवोन्नती अभियान या कार्यालयात ICRP या पदावर कार्यरत आहे, त्यांचा मोठा मुलगा धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात B.A तृतीय वर्गातील कला शाखेत कार्यरत आहे, मदवा मुलगा हैद्राबाद युवतरंगा सैनिक महाविद्यालयात 11 विज्ञान शाखेत त्याचं शिक्षण चालू आहे, लहाना मुलगा धर्माबाद गुरुकुल शाळेत 10 व्या वर्गात सेमी मध्ये कार्यरत आहे,

अहो आई कुणाची ही असो ती चिमण्यापाखरांची असो वा गाईगुरांची असो, किड्यामकोड्यांची असो, "ती आई आईच असते" तिच्या पिलांसाठी कष्टाच्या घामाने दिवस रात्र एक करून पिलांच्या उद्याच्या भवितव्याचा विचार करत असते,
असं म्हणतात ज्यांना आई नाही त्यांना छाया नाही, छाया नाही त्यांना मार्ग नाही, मार्ग नाही त्यांना स्वप्न नाही, ज्यांना आईच नाही त्यांना उंच भरारी घेण्याची जिद्द नाही,
अहो आई शिवाय जग नाही,
आई म्हणुनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई ईकानी माझं होई शोक कारी, नोव्हेच हाक माते, मारी कुणी कुऱ्हारी, ती हाक येई ईकांनी, माझं होई शोककारी, चिमणी मुखी पिलांच्या हळूच घरट्यात जाई,

माझ्या आईने मला कुणासमोर मान खाली टाकून झुकवण्याचं शिकविलं नाही, कोणत्याही परिस्थितीत खंबीर पणे विचार व बुद्धिच्या बळावर यस हाती घेण्याचं शिकविलं आहे,
आपलाच लाडका लेखक :- युवराज मानाली