Butterfly woman - 6 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | बटरफ्लाय वूमन - भाग 6

Featured Books
  • ચતુર

    आकारसदृशप्रज्ञः प्रज्ञयासदृशागमः | आगमैः सदृशारम्भ आरम्भसदृश...

  • ભારતીય સિનેમાનાં અમૂલ્ય રત્ન - 5

    આશા પારેખઃ બોલિવૂડની જ્યુબિલી ગર્લ તો નૂતન અભિનયની મહારાણી૧૯...

  • રાણીની હવેલી - 6

    તે દિવસે મારી જિંદગીમાં પ્રથમ વાર મેં કંઈક આવું વિચિત્ર અને...

  • ચોરોનો ખજાનો - 71

                   જીવડું અને જંગ           રિચાર્ડ અને તેની સાથ...

  • ખજાનો - 88

    "આ બધી સમસ્યાઓનો ઉકેલ તો અંગ્રેજોએ આપણા જહાજ સાથે જ બાળી નાં...

Categories
Share

बटरफ्लाय वूमन - भाग 6

अचानक रोबोट कीटक यायचे बंद झाले.याचा अर्थ काजव्याच्या टीमने त्यांच्या रोबोट राणीच्या किंवा रोबोट राजाचा खात्मा केला असावा. असा अंदाज वैजंता आणि लैलाने बांधला. त्या दोघी त्वेषाने लढत होत्या.
वैजंता आणि लैला लढून लढून दमल्या होत्या. विलास हेलिकॉप्टर बनून त्याच्या अवाढव्य मशीनगन मधून गोळ्यांचा वर्षाव करीत होता.मात्र त्यांच्या मशीनगनचा आवाज येत नव्हता किंवा रोबोटचा सुद्धा आवाज येत नव्हता.त्यामुळे नागरी वस्तीत युद्ध चालू असताना आप आपल्या घरांमध्ये झोपलेल्या लोकांना त्यांचा जराही उपद्रव होत नव्हता.सायलेन्सर लावलेली साऊंडप्रूफ मशीनगन त्याची असावी असे वाटत होते .परंतु ते तसे नव्हते. त्याची मशीनगन विशिष्ट प्रकारची होती. एका विशिष्ट पदार्थापासून तयार केलेली. सोबतच मशीनगन मधून निर्माण होणाऱ्या आवाजाला गिळंकॢत करणाऱ्या लहरी त्यासोबत आकाशात निघत होत्या. त्यामुळे जराही आवाज होत नव्हता. त्याचा फायदा वातावरणाला होत होता. वातावरण जराही विचलित होत नव्हते.त्यामुळे आकाशात काय चालले आहे ते नागरिकांना कळतच नव्हते.तो आवाज फक्त युद्ध करणाऱ्यांनाच ऐकू येत होता. आकाशात चाललेल्या युद्धामुळे अस्त्रांचा कडकडाट होत होता .परंतु त्याचा आवाज इतरांना ऐकू येत नव्हता.

विरोधी गटाच्या कीटकांनी आकाशामध्ये विषारी वायूचा मारा केला होता त्यांच्या शेपटीद्वारे....त्यांच्या शेपटीतून समोरच्या लक्ष्यावर विषारी वायू सोडला जात होता. त्यामुळे समोरचे लक्ष्य क्षणामध्ये वितळून त्याचं पाणी बनत होतं. मात्र वैजंता आणि लैलाच्या टीमकडे या विषारी वायूचे प्रतिजैविक वायुचा साठा होता त्यामुळे ते त्यांच्या मार्फत त्या विषारी वायूवर पसरून त्याची शक्ती कमी करीत होते. परंतु जर विरोधी गटाच्या कीटकांमार्फत पसरलेला वायू बाहेर पडून दोन मिनिटात प्रचंड प्रमाणात पसरून भयंकर हनी करू शकत होता.त्यामुळे तो जेव्हा बाहेर फेकला जातो तेव्हा त्याच्यावर प्रतिजैविक वायू फेकून त्याची विनाशक शक्ती नष्ट करावी लागते आणि याचं अचूक नियोजन लैलाच्या टीमकडे होते. त्या विशाल वायूची शक्ती इतकी होती की त्याचे दोन थेंब दहा किलोमीटर परिसरात थैमान व हाहाकार माजवू शकत होते. त्यामुळे त्याची दक्षता वेळीच घेणे आवश्यक ठरत होते.

युद्ध थांबल्यावर वैंजंता एका ठिकाणी आकाशातून खाली उतरून बसली. पाठोपाठ लैलाही तिच्या सोबत येऊन बसली. लैलाचा फुलपाखरू सूट फाटला होता.तिने तिच्या हाताने तो सूट दुरुस्त केला .तिने तिचा हात तिच्या सूटवर फिरवला. त्यासरशी तिच्या हातातून दिव्य अशा धाग्यांच्या लहरी बाहेर पडून जिथे तो सूट फाटला होता ती जागा शिवून निघाली. विलास अजुन आकाशात घिरट्या घालीत होता. उरलेल्या रोबोट किटकांना त्याने पळवून लावले. थोड्यावेळाने विलास हेलिकॉप्टरचे रूप टाकून मानवी रूपात त्यांच्या जवळ येऊन बसला. तो येऊन नेमका लैलाच्या बाजूला बसला. त्याला तसं बसताना बघून वैजंता हलकेच हसली. तिने डोळ्यानेच लैला खुणावले. तीची खुणवाखूणवी बघून विलास मनोमन लाजला. तो थोडा बाजूला सरकला. ते बघून लैलाने त्याचा हात धरला ती त्याला म्हणाली ...

तु माझा सखा आहेस. बस तिथेच माझ्या बाजूला कशाला जातोस दूर माझ्यापासून...
तेव्हा चमकून वैजंतने तिच्याकडे पाहिले.
तेव्हा तिला खुणावीत वैजंता म्हणाली .
मी सुद्धा त्याच्यावर प्रेम करू लागले आहे. ते ऐकताच विलास मनातून फारच सुखावून गेला. त्याच्या अंगातून सुखाची एक लकेर सळसळली.
पहाटे-पहाटे युद्ध आटपून ते आपापल्या घरी गेले. विलासला लैला ने फोन लावले तू घरी जाऊ नकोस तू माझ्या घरी चल त्यासरशी विलास मनातून आनंदला. त्याची प्रेम तपस्या फळाला आली होती. वैजंताने नकळतपणे हे टिपले होते. परंतु तिने त्यावर काहीच प्रतिक्रिया दाखविली नाही.

लैला आणि विलास बोलत बसले होते. लैला विलासला म्हणाली.
विलास मला काय वाटते वैंजंता पुन्हा फुलपाखरू बनून मागच्या दुनियेत जाऊ शकेल... तुला काय वाटते.
मला नाही वाटत ती तसे करील. कारण तिला कसल्याही इच्छा उरल्या नाहीत. जरी ती इच्छाधारी फुलपाखरू असली तरीही...

लैलाला हीच भीती होती की वैजंता पुन्हा फुलपाखरू बनून तिच्या मूळ स्थानी जाईल. पण ते तसं घडणार नव्हतं. कारण वैंजताच्या कपाळात मारलेला खिळा नष्ट झालेला होता. आणि तो विशिष्ट खिळा निघून गेला होता. त्या निघून गेलेल्या वाईट शक्तीमुळे वैजंता पुन्हा फुलपाखरू बनेल ही शक्यता खूपच कमी होती.

वैजंताच्या एक्स पतीने मागच्या जन्मात तिचा जेव्हा खून केला होता. तेव्हा वैजंता कर्णबधिर आणि मुकी होती. मात्र ती फुलपाखरू बनल्यावर मानव म्हणून तिचा पुनर्जन्म झाला .तेव्हा वैजंता फुलपाखरांच्या अद्भुत शक्तीने पूर्णपणे वेगळी जन्मली होती . आधी ती कर्णबधिर होती .परंतु फुलपाखराच्या स्पर्शामुळे ती आता पूर्ण ऐकू शकत होती. तिचे मुकेपण सुद्धा निघून गेले होते. तिची कर्णेंद्रिये आणि मुखद्रिंये पूर्णपणे दुरूस्त होऊन कार्यरत झाली होती.ती आता सामान्य स्त्री सारखे तिचे व्यवहार स्वबळावर करू शकत होती.

वैजंताचा खून करून तिच्या पतीने वैजंताला बंगल्याच्या मागे एका बागेमध्ये दफन केले होते. ज्या झाडांच्या शेजारी त्याने तिला दफन केले होते , ते झाड अद्भुत असे फुलपाखरांचे विश्रांतीस्थान होते. त्या झाडावर हजारो-लाखो फुलपाखरे विश्रांती घेत असायचे आणि त्या झाडांच्या मुळाशी असलेल्या दिव्य शक्तीने वैजंता ही सुद्धा फुलपाखरू बनून या मानवी जगात आली होती. मात्र तिच्या कपाळा मध्ये एक मोठा व्रण होता . सोबतच तिच्या पायामध्ये मारलेल्या खिळ्यांमुळे ती मुक्त होत नव्हती. तिचे पंख त्याच्यात अडकून राहिले होते. वैजंता ला अस्पष्ट असे आठवत होते. तीला अध्ये मध्ये एक स्वप्न पडायचे. तिची टक्कर एका अजस्त्र भुंग्याशी होते आणि त्या भुंग्याच्या टकरीमुळे तिच्या कपाळाला मध्ये अडकलेला खिळा खाली पडतो आणि वैजंता ही पूर्ण स्त्री रूपात दिसू लागते.तेव्हा तिचे सौंदर्य बघून तो भुंगा तिच्यावर मोहित होतो. तो भुंगा तिच्या कानामध्ये गुणगूणू लागतो.अशीही एक आठवण स्वप्नांच्या द्वारे तिला होत राहते.

तो भुंगा तिचे सतत रक्षण करतो. मात्र एक अवाढव्य फुलपाखरू तिच्या भोवती सतत घिरट्या घालीत राहते. तो भुंगा म्हणजेच लैला होती आणि ते अवाढव्य फुलपाखरू म्हणजे फुलपाखरांची राणी होती.मागच्या जन्मात लैला वैजंता वर प्रेम करते . कारण त्यावेळी ती पूर्ण पुरुष होती. फुलपाखरांच्या राणीने गेल्या जन्मात वैजंताला वाचवले होते... फुलपाखरांच्या राणीची आणि वैजंताची मैत्री झाली होती. फुलपाखरांची राणी वैंजतेला आपली दिव्यशक्ती देऊन फुलपाखरांच्या जगात निघून गेलेली असते. तेव्हापासून लैलाही वैजतेलाच फुलपाखरांची उपराणी समजू लागते .वैजंताला सांभाळण्याची व रक्षण करण्याची जबाबदारी फुलपाखरांच्या राणीने लैलाला दिलेली असते. त्यामुळे चला या जन्मात सुद्धा वजन त्याच्या मागे मागे घेऊन तिचे रक्षण करत होती . मात्र लैला खरीखुरी फुलपाखरू असल्यामुळे तिची देवी शक्ती आधी जागृत झाली होती. वैजंताला सुध्दा फुलपाखरांच्या राणीचा दर्जा प्राप्त झाला होता. परंतु ती बाहेरून फुलपाखरांच्या राज्यात शिरली होती. आणि तिथे राणी बनली होती.

लैलाच्या अंगात एक संरक्षक कवच असते. ते लैलाचे नेहमी रक्षण करते. ही गोष्ट वैजंताला माहीत होती. वैजंताच्या अंगात सुद्धा तसेच एक रक्षक आवरण होते. परंतु ते नैसर्गिक नव्हते. कृत्रिम होते. जे फुलपाखरांच्या राणीने तिला बहाल केले होते. त्याची शक्ती मर्यादित होती.मात्र तिच्या आजीचा जो अंगरखा(सुट) होता त्याची शक्ती असीमित होती. आजीला तो कसा काय मिळाला हाच तिला प्रश्न पडला होता.

एक दिवस वैजंताने तो प्रश्न लैला समोर मांडला.
मला वाटते तुझ्या आज्जीचा आणि फुलपाखरांचा काहीतरी ऋणानुबंध असावा. कदाचित तो अंगरखा तुझ्या आजीला फुलपाखरां कडून भेट मिळाला असावा. किंवा एखादा थेट संबंध तुझ्या आज्जीचा एखाद्या फुलपाखरांच्या समूहाशी असावा.
छे ती अशक्य गोष्ट आहे... वैजंता म्हणाली.
या जगात शक्य अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी काही वेळा नेमक्या उलट्या होतात.
असं घडू शकत असावं कदाचित. लैला ठामपणे तीच्या मतावर अडून राहिली.
अखेर शेवटी शेवटी वैजंताने हार मानत लैलाच्या मताला सहमती दिली. त्यांचे बोलणे ऐकत असलेला विलास मध्येच म्हणाला...
कदाचित तुझ्या आज्जीचा नवरा हा एखाद्या फुलपाखरूंचा वंशज असण्याची शक्यता असावी.

हो हो तसं घडू शकते. लैलाने त्याच्या सुरात सूर मिसळला.त्या दोघांचा सुरेखच निघाल्यामुळे वैजंता तिथून उठली आणि खिडकीशी येऊन बाहेर बघत राहिली.खरंच असं घडलं असण्याची शक्यता आहे कां? ती मनात विचार करत होती. पण तसं असतं तर आजीने तिला तसं सांगितलं असतं. आजी कधी या विषयावर बोलली नाही किंवा आपण तिला तसे विचारले सुद्धा नाही. मग हा अंगरखा तिच्याकडे कुठून आला....
लैला आता फारच खूश होती कारण तिला तिचा जीवनसाथी मिळाला होता विलास....
विलास सुद्धा लैलाशी खूपच आपुलकीने वागत होता.

मधेमधे वैजंताला अनेक विचित्र गोष्टी आठवत राहत होत्या. एकदा एक दुसरी फुलपाखरांची राणी एका फुलपाखराला खाऊन टाकते. त्यांच्या समागमा नंतर. ते दृष्य आठवून वैंजताच्या शरीरावर काटाच उभा राहतो. तिला एकदम शिसारी येते.तिला उलटी होईल असे वाटू लागले होते. परंतु तिने ती उलटी परतवून लावली.