Victims - 13 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - १३

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

बळी - १३

बळी- १३
डाॅक्टर पटेलनी केदारला हाॅस्पिटलमध्ये कुठेही फिरायची मुभा दिली होती. ज्या पेशंटजवळ त्याच्या घरचे कोणी येत नसत, त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस करणे, त्यांना औषधे किंवा इतर काही लागलं तर हाॅस्पिटलच्या फार्मसीतून आणून देणे, स्टाफपैकी कोणाला काही गरज पडली, तर मदत करणे; हे सगळं करण्यात केदारचा दिवस जात असे. हे सगळं करताना त्याचा वेळही जात असे, आणि कोमेजलेल्या मनाला उभारी येत असे. आता त्या हाॅस्पिटलमधील कोणीही त्याला पेशंटप्रमाणे वागवत नव्हतं.
हाॅस्पिटलच्या आॅफिसमधल्या एका टेबलवर धूळ खात पडलेला एक काॅम्प्यूटर एकदा केदारने पाहिला. " हा कोणी वापरत नाही का?" त्याला शोधत तिथे आलेल्या निशाला त्याने विचारले. तो ममतेने त्या यंत्रावर हात फिरवीत होता. जणू काही त्याला त्याचा एखादा मित्र खुप दिवसांनी भेटला होता.
%तो सुरुवातीच्या काळात घेतलेला -खूप जुना काॅम्प्यूटर आहे! आता हाॅस्पिटलमध्ये नवीन सिस्टीम बसवली आहे. " निशा म्हणाली.
"हा ' पी. सी. ' मी गेम खेळण्यासाठी वापरला तर चालेल का?" कव्हर उघडत केदारने विचारलं.
"तो अनेक दिवस झाले, बंद पडलेला आहे. चालू होणार नाही! तो 'पी. सी.' रिपेअर होत नव्हतान, म्हणून नवीन सेट घ्यावे लागले. तसंही जुनं माॅडेल असल्यामुळे त्यात इंटरनेट नाही! त्यामुळे नवीन सिस्टिम घेणं भाग होतं. बरेच दिवस झाले, तो गोडाउनमध्ये हलवायचा राहून गेलाय; म्हणून इथे आहे! तुझा वेळ उगाच फुकट घालवू नकोस! " बाजूला बसलेला एक आॅफिस स्टाफ -सुधांशू - म्हणाला.
" नाहीतरी मला काय काम आहे? वेळ जाता जात नाही! उगाच दिवसभर इकडे-तिकडे तिकडे फिरत असतो! मी निदान प्रयत्न करू बघतो! " केदार म्हणाला.
"तुम्हाला प्रमिला मॅडमची परवानगी घ्यावी लागेल!" सुधांशू म्हणाला.
तेवढ्यात केदारला शोधत निशा तिथे आली,
"तुला डाॅक्टरनी बोलावलंय तिकडे आधी चल! काॅम्प्यूटरचं नंतर बघू! डाॅक्टर श्रीकांत कालच अमेरिकेहून परत आले! आज तुझ्यासाठी इथे आले आहेत! तुला दिलेल्या ट्रीटमेंटचा फायदा झाला की नाही हे पहाण्यासाठी तुझे सगळे रिपोर्ट ते बघतायत! तुला चेक करायचंय! चल लवकर!" ती म्हणाली; आणि
त्याला ओढतच डाॅक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन गेली.
"तुझी प्रकृती आता उत्तम आहे! इथे तुझा वेळ चांगला जातो नं?" डाॅक्टर श्रीकांत त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते.
" होय! इथले सगळेच माझ्याकडे खूप लक्ष देतात! पण डाॅक्टर! मला माझा भुतकाळ अजूनही आठवत नाही! माझी ओळख - नाव - गाव सगळं मी हरवून बसलो आहे! त्यामुळे खूप त्रास होतो! विचार करू लागलो, की डोकं जड होतं!" केदार म्हणाला.
" काळजी करू नकोस! आठवेल हळू हळू! -- औषधं मात्र नीट घेत जा आनंदी रहा! फार विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस! ! कामामध्ये मन रमवण्याचा प्रयत्न कर!" डाॅक्टर श्रीकांत म्हणाले!
"मी त्या विषयीच तुम्हाला विचारणार होतो; आॅफिसमध्ये एक जुना काॅम्प्यूटर आहे! मी तो चालू होतोय का ; ते पाहू का?" केदारने लगेच डाॅक्टर पटेलांकडे बघत विचारलं. त्याला परवानगी काढण्याची आयतीच संधी मिळाली होती.
"तो अनेक दिवस बंद आहे; चालू होणार नाही; पण तू प्रयत्न नक्कीच करू शकतोस!" डाॅक्टर म्हणाले.
" थँक यू , सर! मी बघतो प्रयत्न करून!" केदार म्हणाला.
"तो काॅम्प्यूटर चालू होणारा असता, तर इतका खर्च करून नवीन सिस्टिम आम्ही कशाला विकत घेतली असती? पण ठीक आहे--- त्या मुलाच्या बुद्धीला या निमित्ताने थोडी चालना मिळेल! नाही तरी तो पी.सी. आता काही कामाचा नाही! आणखी थोडा मोडला तरी चालेल! नाहीतरी भंगारमध्येच द्यायचा आहे!" डाॅक्टर श्रीकांतकडे बघत हास्य करत डाॅक्टर पटेल म्हणाले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो काॅम्प्यूटर केदारने संध्याकाळपर्यंत चालू केला. ते मशीन जुनं असल्यामुळे तो इंटरनेट वापरू शकत नव्हता, पण आता त्याच्यासाठी वेळ घालवायचं उत्तम साधन मिळालं होतं. हळू हळू पत्रव्यवहाराचं काम त्याच्याकडे दिलं जाऊ लागलं. त्याच्या पत्रांमधील उत्तम मराठी आणि इंग्रजीवरील त्याचं प्रभुत्व पाहिल्यावर हा मुलगा उच्चशिक्षित आहे, याविषयी डाॅक्टर पटेल यांच्या मनात शंका उरली नाही.
केदार स्वतःला विसरला होता; पण मिळवलेलं ज्ञान अबाधित होतं.
"तूला काँप्यूटरची माहिती कशी? कुठे शिकलास?" डाॅक्टर पटेल त्याला विचारू लागले ; पण केदारकडे उत्तर नव्हतं.
एके दिवशी हाॅस्पिटलच्या काँप्यूटर सिस्टिममध्ये बिघाड झाला होता. सगळ्याच फाइल्स करप्ट झाल्या असाव्यात असं वाटत होतं. पेशंन्ट्सची हिस्ट्री गमावणं हाॅस्पिटलसाठी खूप धोक्याचं होतं. डाॅक्टरसुद्धा खूप काळजीत पडले होते. पण केदार-- त्याला आता सगळे रात्रीच्या वेळी मिळाला; म्हणून सगळे मजेने "रजनीकांत" म्हणू लागले होते - डाॅक्टरांची परमिशन घॆऊन काॅम्प्यूटरसमोर बसला आणि काही वेळातच सगळी सिस्टीम व्यवस्थित करून दिली.
"अरे रजनीकांत! तू तर ग्रेट आहेस ! कंपनीचे इंजिनिअर येऊन प्रयत्न करून गेले --- पण त्यांनाही फाॅल्ट कुठे आहे हे कळलं नव्हतं; आणि तू एवढ्या सहज सिस्टिम रिट्राइव्ह केलीस! " त्या आॅफिसमधला सगळा स्टाफ केदारचं कौतुक करत होता!
त्या दिवसानंतर तिथले सगळेजण त्याच्याशी आदराने बोलू लागले. तो साधासुधा मुलगा नाही, खूप हुशार आहे, याची त्यांना खात्री पटली होती. इतक्या हुशार मुलावर अश्रितासारखं जीवन जगायची वेळ आली; याबद्दल सगळे मनातल्या मनात हळहळत होते!
दिवस भराभर पुढे सरकत होते.
एके दिवशी डाॅ. पटेलना विचारांमध्ये हरवून गेलेले पाहून प्रमिलाबेन विचारू लागल्या,
"एवढा कसला विचार करताय? काही प्राॅब्लेम आहे का?"
यावर डाॅक्टर गंभीर चेह-याने बोलू लागले,
"मी खूप प्रयत्न केला, पण रजनीकांतला अजूनही त्याचा भूतकाळ आठवत नाही! त्याला हाॅस्पिटलमध्ये तरी किती दिवस ठेवायचं? पण त्याला डिस्चार्ज द्यायलाही मन तयार होत नाही! फार गुणी मुलगा आहे! या अवस्थेत बाहेर जाऊन काय करील बिचारा ! काय करायचं? काही कळत नाही!"
" त्याला हळू हळू सगळं आठवू लागेल; असं डाॅक्टर श्रीकांत म्हणाले आहेत. आपण थोडे दिवस त्याला आधार द्यायला काय हरकत अाहे? -- सुशिक्षित आणि हुशार मुलगा आहे. काही दिवस त्याला सांभाळून घेतलं; तर त्याचं पुढचं जीवन चांगलं जाईल. अशा अवस्थेत बाहेरच्या जगात जगणं त्याच्यासाठी कठीण आहे! कुठे जाईल बिचारा? कोणत्याही सर्टिफिकेटशिवाय आणि ओळखपत्राशिवाय त्याला नोकरी कशी मिळेल? तो जगेल कसा? ---- आणि आपल्या हाॅस्पिटलसाठी तो खुप काही करतोय!" प्रमिलाताई पतीला समजावत होत्या.
"पण त्याला हाॅस्पिटलमध्ये किती दिवस ठेवायचं? स्टाफमध्ये वेगळा संदेश जाईल! पूर्णपणे निरोगी माणसाला पेशंट म्हणून कसं ठेवायचं?" डाॅक्टरांनासुद्धा त्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा; हे कळत नव्हतं.
" त्याला आता पेशंट म्हणून नाही ; तर स्टाफ म्हणून ठेवूया! त्याला काँप्यूटरचं चांगलं ज्ञान आहे. आपल्या हाॅस्पिटलचे रेकाॅर्ड ठेवण्याचं काम त्याला देऊया! शिवाय तो पत्रव्यवहारातही चांगला सांभाळेल! यामुळे त्याला आत्मविश्वास मिळेल ,त्याच्या मेंदूलाही चालना मिळेल. शिवाय आपल्याला एक चांगला विश्वासू मदतनीस मिळेल. एक ना एक दिवस तो कोण--- कुठला, हे त्याला नक्की आठवेल! तोपर्यंत त्याला मदतीचा हात द्यावा, असं मला वाटतं!" प्रमिलाताई म्हणाल्या.
"पण त्याला आपण स्टाफ म्हणून ठेवू शकत नाही! कारण त्याचा प्रोफाईल आपल्याला माहीत नाही! आणि तो रहाणार कुठे? कुठे हरवला तर ती आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होईल." डाॅक्टर म्हणाले.
" नाहीतरी घरी आपण दोघेच असतो! दोन्ही मुलं परदेशात शिक्षणासाठी गेली, तेव्हापासून आपला बंगला सुनासुना वाटतोय! त्याला हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन आपण आपल्या बंगल्यावर घेऊन जाऊ! खूप हुशार मुलगा आहे! आपल्याला त्याची चांगली मदत मिळेल! स्टाफ म्हणून नाही; तर घरचा माणूस म्हणून तो काम करेल! पोलिसांना सगळं प्रकरण माहीतच आहे. ते त्याच्या कुटुंबाचा शोध घेत असतीलच! काही दिवसांचा प्रश्न आहे!" प्रमिलाताईंनी बहुतेक सगळा विचार केला होता. त्यांच्यातील स्त्रीसुलभ ममता केदारला रस्त्यावर सोडायला तयार होत नव्हती. शिवाय ज्याचा जीव वाचवायला ईश्वराने आपल्याला मध्यस्थ केलं, त्याचं पुढील आयुष्य चांगलं गेलं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं.
शेवटी डाॅक्टर पटेलना पत्नीच्या हट्टाला शरण जावं लागलं. केदार त्यांच्याबरोबर त्यांच्या बंगल्यात राहू लागला. तो हाॅस्पिटलमध्ये आॅफिसचं काम जबाबदारीने सांभाळत होता. घरी सगळी मदत करत होता.
प्रमिलाबेन त्याला मुलाप्रमाणे वागवत होत्या, पण केदारला त्यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबून गेल्यासारखं वाटत होतं,
"या दोघांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांनी आधार दिला नसता तर माझी बाहेरच्या जगात काय अवस्था झाली असती?" या विचारानेच केदारच्या अंगावर काटा येत असे.
"पण तरीही मी एक आश्रित आहे! त्यांच्या उपकारांवर जगतोय!" हा विचार मनात आला, की त्याचं अंतःकरण दुःखी होत असे.
विचारांना दूर ठेवण्यासाठी तो दिवसभर स्वतःला कामाला जुंपून घेई.
तरीही त्याच्या मनात विचार येतच असत,
" आज मला कसलीही कमतरता नाही; पण तरीही जीवनात अर्थ वाटत नाही! हे खरं जगणं नाही--- माझं खरं -- माझं स्वतःचं आयुष्य मला परत कधी मिळेल?
********* contd.- Part -14.