Reshmi Nate - 32 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 32

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

रेशमी नाते - 32



सॉरी ,पिहू आम्ही लवकरच निघालो होतो...मधेच सुधाला त्रास होत होता....मग हॉस्पीटल मध्ये वेळ झाला....

काय झाल?कुठे आहेत आत्याला पिहू काळजीने नजर फिरवत बोलू लागली.....

विराट ही ब्लँक होत बघू लागला....

आई घरी आहे आराम करतेय..... हातावर पडली होती फंक्शनमध्ये सांगितले नाही.....हात खूपच ठणकत होता येताना गाडीत बोलली....मग काय हॉस्पिटल मध्ये उशीर झाला....रिषभ वैतागत बोलला......

जास्त लागल आहे का विराट सिरियस होत बोलला..

नाही रे दादा सुजला आहे सगळ चेक केले....15 दिवस हात सांभाळायला लावला....

आई आपण भेटून येऊ....

आता नको झोपली आणि काळजीच कारण नाहिये....जा जाऊन आराम करा.....रात्र झाली आहे.....

वहिनी एक मिनीट, नमन जवळ आला....

पिहू ब्लँक होत बघू लागली.....हे गिफ्ट तो एक पोस्टर देत बोलला.....

ओपन कर....

पिहू हसत रॅपर काढते....ती डोळे विस्फारून त्या पेंटिंग कडे बघत होती.....वहिनी बघू वीरा जवळ जात बोलते.....
वॉव वीरा exited होत बोलते.....वीरा पोस्टर सरळ धरते.....पिहू आणि विराट झोक्यात बसलेले अस पेंटिंग काढले होते.....

सगळे आश्चर्य चकित होत बघत होते.....विराट ला माहीत होत म्हणुन त्याला नवल वाटले नाही ....

दादा किती मस्त आहे ना...वीरा समोर धरत बोलते.

दादा ला माहीत आहे...मला किती त्रास दिला हुश्श ... असे वाटले की दादा लाच ब्रश द्यावा....नम न नाटकी फेस करत बोलला.....सगळे हसतात....

थँक्स पिहू हसून त्याला हग करत बोलते.....

दिवस कसा ही गेला पन रात्र न विसरण्या सारखी होती....पिहू मनातून सुखावली होती.....

दोघे ही रूम मध्ये आले......अहो ,किती छान आहे ना पिहू पेंटिंग वर हात फिरवून ओठ टेकवते....

विराट तिच्या कडून ती पेंटिंग घेऊन बेडच्या मधोमध लावतो....
अच्छा ही जागा आधी पासून तयार होती....

नमन ने चार महिने आधीच काम चालू केले होते.....विराट बेडवरून उतरत बोलतो....

आले चेंज करून ती चालली होती की त्याने हात पकडून जवळ ओढले...काही गरज नाही मी आहे ना....तो खट्याळ हसत बोलला...पिहू हसत लाजून त्याच्या मिठीत विरघळली .
.
.
.
विराट ला जाग आली तेव्हा पिहू त्याला छान बिनधास्त बिलगून झोपली होती....खूप दिवसाने त्याला ही सुखाची झोप लागली होती ...त्याने तिला बाजूला केले आणि गॅलरीत आला....सगळी कडे नजर फिरवली .....पिहू ने अजून वेगवेगळ्या कलरफुल रोपे आणून स्वतः लावली होती....सगळ्या कुंड्या चेंज केल्या होत्या़ . एका साईडला.वरुन गोकर्णाची वेल आली होती.....त्यावर त्याची फुले मोहक वाटत होती..मधोमध घरटे दिसले. ...त्याने भुवया ताणून बघत हसला .तिने काचेचा बाउल काढून तिथे मध्यम आकाराचे मातीच बाउल आणून त्याला पेंट केल होते...दिसायला आकर्षक दिसत होते.. पक्षांची किलबिलाटने सगळ वातावरण संगीतमय झाल होते. आधी पक्षी येतात की नाही कधी त्याने लक्ष सुद्धा दिले नव्हते....पण आता दररोज आवाजाची सवय झाली होती.तो मनोमन हसला...त्याने त्यात पाणी ओतले तिथेच थोडे दाणे पसरवले ......लगेच पक्षी दाणे टिपत पाणी पिऊ लागले.....त्यांच्या पंखांनी पाणी उडवत उडून जात होते....त्याने पिहू वर नजर टाकली तर अजून ब्लँकेट ओढून झोपू लागली....तो आत मधे आला....

पिहू ,वेक अप.....त्याने ब्लँकेट काढली आणि तिला दोन्ही हातांवर उचलून घेतले...

झोपायच....मला ती आवसाळलेल्या आवाजातच बोलून चीडचीड करत त्याला अजून घट्ट बिलगली....

अग तुझे 🐦 बर्ड्स वेट करतात....कधी पाणी देते कधी खायला देते तो हसत गॅलरीत येत तिला घेऊन सोफ्यावर बसला ....पिहू ने अजून डोळे झाकले होते..
विराट सरकून थोडा कोवळ्या उन्हात बसला..
तिने त्याचा शर्ट घातला होता.पूर्ण हात झाकून गेले होते.. त्याच्या एवढा मोठा शर्ट मध्ये पूर्ण झाकून गेली होती..त्याने हसत स्लीव कोपर्‍या पर्यंत फोल्ड केले.तिचे केस एक सारखे करत मागे घेतो....

उठ ना ,शोना उद्या परत जाणार आहे...उद्या पासून झोप किती झोपायच...

ह्म्म ,ती हुंकार भरत अजून त्याच्या कुशीत बिलगली.....

वॉव, बटर फ्लाय आलेत बघ....तसे तिने किलकिले डोळे उघडले तर फक्त बर्ड्सच होते.....

ती गाल फुगवून त्याच्या कडे बघत परत डोळे झाकून पाय अजून आत घेते.... सकाळचा गारवा कोवळे ऊन होते..
शर्ट गुडघ्याच्या थोडा वर असल्यामूळे पाय थंड पडले. होते.....त्याने समोरचा पीलो तिच्या पायावर ठेवला.....

पिहू उठ ना....रात्री मला झोप आली तरी बडबड चालू होती..... माझी झोप मोडून आता स्वतः झोपली... तो तिच्या कानावर गळ्यावर हळूच बोट फिरवत गुदगुल्या करत होता..

अहो...न..को....ना....त्याचा हात पकडू लागली....गालात हसून लाजत त्याच्या कुशीत चेहरा लपवू लागली....तिचा गुलाबी गुलाबी चेहरा बघून त्याला हसू येत होते ......

पिहू कुठल डायट फॉलो करते....तो तिचा हात पकडत बोलू लागला....
मी नाही करत डायट वैगेरे सगळ खाते.....

हात पाय बघितले कसे झालेत बिलकुल मला अशी आवडत नाही.....पुढ्च्या वेळेस अशी खराब दिसली ना मी तुझ्या कडे बघणार सुद्धा नाही....

का? केरळ ला दूसर कोण भेटल का मी आता आवडत नाही....

कोण भेटल नाही पण मी तोच विचार करतोय....मला हॉट फिगर मेंटेन वाइफ हवी होती....पन तुझ्या कडे बघून वाटत नाही कधी होशील

ती डोळे झाकूनच रागाने आठ्या पाडत त्याच्या दंडाला मारते.....तो तीचा हात पकडत जोरात हसतो....वेडाबाई ,खूप बोलतेस कोण भेटल वैगेरे....तो तिच्या गळ्यात दात लावतो...

अहो sss

तू डोळे उघडणार आहे की नाही.....समोर पाण्याचा जग आहे

तिने तोंड वाकडं करत च डोळे उघडले...तुम्हा बघवत नाही ना....हूहूहूह....

गुड मॉर्निंग sunshine तो तिचे गाल ओढून गालावर किस करतो.....

हूहूहूह ती तिचे केस नीट करत त्याच्या मांडीवरुन उतरून सोफ्यावर बसते.....

इतकी लेझी कधी पासून झाली ...त्याने एका हाताने तिला कुशीत घेतले......ती त्याच्या छातीवर डोक ठेवून समोर बघू लागली. उठून काय करु लवकर काय काम ही नसते आधी कॉलेज होते म्हणून उठत होते.....आता काय दिवसभर घरीच असते.

ह्म्म,

अहो, तुम्ही मला बोलला होता ना गिफ्ट काय हव....तो डोळे मिचकावत बोलते .

मी कधी बोललो, 🤔नाही ...तो न कळल्यासारखे बोलला.....

तुम्ही बोलला होता....😒(त्याला माहित होत ती काय मागणार काल पासुन तीच एकच चालल होत केरळ ला यायच...)ती नजर रोखून बघते...तुम्ही मला गिफ्ट नाही देणार ती 😥 सॅड फेस करत बोलते .....

मी घेतल आहे ना गिफ्ट तो कपाळावर किस करत बोलतो....

ते नको.... मला जे पाहिजे ते हव....

मी आणलेले गिफ्ट काय करू.... एकच वाइफ आहे मला तो नाटकी चेहरा करत बोलते......

मला दोन गिफ्ट द्या, नेक्स्ट बर्थडेला नको...कधीच काही नको
ती निरागस पणे त्याला बोलत होती... ..

तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता...तिला काही नको होते फक्त त्याच्या बरोबर राहायच होत....त्याने तिला दोन्ही हातांनी कवटाळून केसांवर ओठ टेकवले...

अहो मी येते ना.....प्लीज दोन तीन दिवस तुम्ही सोडवायला पन येऊ नका मी एकटी येईल....

त्याने तिच्या कडे नजर वळवली आणि हसला....पिहू ,तू आणि एकटी.....कधी पुणे मुंबई केल नसेल एकटी ....ते सोड मुंबईत कधी एकटी फिरली का....म्हणे एकटी येते....

अहो,....

पिहू हट्ट नकोय....दिवस भर काय करणार तिकडे येऊन तो आवाज वाढवूनच बोलतो...

पिहू चेहरा बारीक करून नजर खाली घेते...

किती वेळा एकच बोलणार आहेस किती इरीटेड होत एकच गोष्ट सांगायला...तो तिचा चेहरा बघून शांत होतो.....

सॉरी ,चिडू नका ना...ती बारीक चेहरा करून त्याच्या कडे बघत बोलली...

त्याने तिचा हात पकडून मांडीवर बसुन घट्ट कवटाळून घेतल..तिने ही गळ्यात हात घालत घट्ट पकडले...

त्याला ओरडायच नव्हत....पण तो घेऊन ही जाऊ शकत नव्हता...नवीन जागा दिवस भर बाहेर पिहू ला एकटीला ठेऊन तो रिलॅक्स काम झालच नसते. .....थोड काम कमी झाल्या वर तो घेऊन जायचा विचार करत होता....पण आता तो सांगू शकत नव्हता......

अहो सोडा ,नऊ वाजलेत..ती बाजूला होत उठत बोलली.....
आज फूल डे माझा आहे तो खट्याळ हसत बोलला तस त्याच्या मानत काय चालू आहे ..हे कळताच पिहू पटकन पळू लागली.....त्याने ही पटकन उठून मागून तिच्या पोटावर दोन्ही हातांनी तिला पकडले...

अहो सोडा sss ती हात काढत बोलू लागली..

मला पण शॉवर घ्यायचा आहे....तो तिच्या कानात ला ओठ लावत बोलला..

आ ...ह ...मला लेट होतोय.......ती मान हलवून लाजून नाही म्हणते...

इतक्या वेळ उठवत होतो तेव्हा लेट होत नाही, त्याने हसत तिला उचलले.... अहो sss ती पाय आपटत सुटण्याचा गोड प्रयत्न करत होती....पण विराट ऐकल तर ना 🙈🙈

.💞💞💞
.
.
पिहू घाईतच घाबरत खाली आली....तिने खाली येता येता पोर्च मधल्या घड्याळाकडे नजर टाकली....दहा वाजून गेलेत काय विचार करत असतील.....त्यात नमन वीरा असले तर किती विचित्र वाटत, ह्याना तर डोकच नाही....ती स्वतः शीच बडबड करत खाली आली....हॉल.... डायनिंग हॉल मधे कोणी नव्हत....तिला थोड बर वाटले....ती पळतच किचन मध्ये गेली .....किचन मध्ये सुमन, सुधा बसल्याच होत्या......

कुक त्याचं काम करून बाहेर गेले....पिहू असताना कोण जास्त किचन मध्ये थांबत नव्हते ..तस रोहिणीची ऑर्डरच होती....पिहू च्या बाबतीत मन कस का असेना...पण घरची सुन म्हंटल्यावर तेवढी ती काळजी ही घेत होती.....

पिहू थोडी दचकतच ज़बरदस्ती स्माइल करत गेली....

गुड मॉर्निंग पिहू , सुधा ओठ दाबत सुमन कडे बघत बोलली....

गुड मॉर्निंग आत्या पिहू लाजून इकडे तिकडे बघत बोलली....
परत पिहू च्या लक्षात आले ....आत्या हात कसा आहे....

आता बरा आहे काल खूपच दुखत होता...औषध घेतली तेव्हा कुठे बर वाटले....

पिहू विराटच झाल का आवरून सुमन गॅस बंद करत विचारतात....

आवरत होते येतील...

पिहू खूप लवकर आली... मला वाटल दिवस भर येणारच नाही....सुधा हसत तिच्या जवळ येत कानात बोलली....पिहू चा चेहरा लाल झाला होता. घसा कोरडा झाला होता...तिला काय बोलायच कळताच नव्हते....

आ......आत्या....ती कशी बशी लाजून बोलू लागली....

सुधा का त्रास देते.....पिहू ये नाश्ता कर......सुमन हसत पिहू कडे बघत बोलल्या....

पिहू जाऊन चेयर वर बसली....

अहो वहिनी मी काहीच केल नाही....तुमचा मुलगाच तिला त्रास देतोय... ...विराट आल्याने चेहरा बघा किती गुलाबी गुलाबी झाला सुधा हसत बोलू लागली....

आता पिहूला थांबू वाटत नव्हते... कुठे तरी पळून जाऊ वाटत होते....

सुधा पायाला काय लागल आहे का?....तशी सुधा पाया कडे बघते.....काय वहिनी तुम्ही ... मी काय नजर लावते का सुधा तोंड फुगवून पिहूच्या शेजारी बसली.....

सुमन गालात हसतात....(शेवटी आईच मन आपल्या मुलाच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागू नये )

किचनच्या ग्लास मधून विराट डायनिंग टेबल वर आला होता....

पिहू उठतच होती की.....

गीता विराट चा ब्रेकफास्ट आण.....सुमन बाहेर जात बोलल्या....पिहू परत बसली........तिला विराट साठी करायच होत...पण ती यायच्या आधीच सुमन ने करून ठेवला होता.....

गुड मॉर्निंग मॉम विराट हग करत बोलला....

सुमन त्याच्या डोक्यावरुन हात फिरवतात.....

आई बाबा कुठे आहेत विराट ब्रेकफास्ट चालू करत नजर फिरवत बोलतो....

आहेत रूम मधे आताच गेले.....

ह्म्म,

विराट पिहूला राग वैगेरे आला नाही ना.....काल सकाळीच निघालो होतो....

मॉम वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टीला महत्व राहत नाही... .शेवटी कोणी ही मुद्दाम करत नाही...आणि पिहू आणि वीरा मधे मी कधीच अंतर ठेवले नाही....दोघांबरोबर नात जरी वगळे असले तरी दोघींच्या वयात दोन ते अडीच वर्षाचाच फरक आहे.....आपल्या कडून चुकून का होईना फरक झालाच ना ....ह्याच जागी वीरा असली असते तर तिने किती गोंधळ घातला असता....ती बोलत नसली तरी कोवळ मन आहे कुठे तरी वाईट वाटणार ना.....माझी चूक आहे. मी थोड लवकर येऊन तिचा बर्थडे स्पेशल करायला हवे होते..

सुमन विचारात पडतात.....विराटच बोलण बरोबर होते...

मॉम

ह्म्म सुमन विचारातून बाहेर येत बोलतात

मॉम पिहूच ऐज लहान आहे... तू परत तिला बेबी बद्दल काही म्हणू नको...लग्नाच्या वेळेस विचार करायला हवा होता....ती मॅच्युर असली तरी फिजिकली स्ट्राँग हवी ..ती अजून ती बालिश आहे . खूप गोष्टी तिला कळत नाही....एवढ्या लहान वयात तिला एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देन तुला पटते का ...तिने स्वतः अजून जग बघितले नाही. ....तिच वय करियर कडे फोकस करायच आहे...त्यात तू सारख तिला अस काही बोलल तर तीच ही मन होणारच...तू फक्त माझा विचार करते ....माझे फ्रेंड्स सगळे सेटल झाले त्यांची फॅमिली कंप्लीट झाली.....पण तिचा ही विचार कर......

विराट मी तिला जबरदस्ती केली नाही....शेवटी मी पण एक आई आहे...मला ही वाटणार...लवकर नातवंड बघावी...

हो मॉम, मी तुला काही म्हणत नाहिये... मी तूला आमचा ऐज डीफरंन्स चा प्रॉब्लेम सांगतोय....त्यात तुझ काहीच चुकत नाही ..... थोडी फिजिकली स्ट्रॉन्ग होऊ दे ..

ह्म्म.....किती वेळ घ्यायचा तेवढा घे....तू बोलतो ते ही बरोबर आहे....सुमन पिहू कडे नजर वळवतात....पिहू सुधा हसत गप्प मारत होत्या....

विराट पिहु ला गिफ्ट काय दिल....

मी अजून दिल नाही...

विराट,ss सुमन आठ्या पाडूनच बघतात....

मॉम, देणार आहे....मला यायला लेट झाला आणि काल असा वेळ भेटला च नाही .....

सुमन समजून घेत बोलतात....काय देणार आहे. ....

तिच्या नावाने मी न्यू रेस्टॉरंट घेतल आहे.

सुमन ब्लँक होत बघतात....कुठे? तू आधी काही बोलला नाही...

मॉम माझ आधीच ठरले होते....

ह्म्म, चांगला विचार आहे...आता तिच्या नावाने घेशील बर वाटले...नाही तर सगळ नमन वीरा च्या नावाने करणार का अस वाटले मला...(त्या थोड्या टोमण्यात बोलल्या. )तुझ्या नाही तर पिहूच्या भविष्याच्या विचार कर .....
केरळच रिसॉर्ट किंवा मुंबईच हॉटेल पिहू च्या नावाने कर .

मॉम आईला वेगळ वाटेल आतच अस केल तर.....नमन पूर्ण सेटल होऊ दे.....केरळच रिसॉर्ट किंवा मुंबईच हॉटेल दोन्ही माझ्या नावाने आहेत.....आणि आई ला दोन्ही नमन च्या नावाने हवेत बोलली.....

सुमन चा चेहरा च उतरतो....तू बोलला नाही मला....सुमन चिडून बोलतात.....त्यावर विराट शांत बसतो .....

मला सगळ ठरल्यावर कळते......ओपनिंग लाच सांगायच होत केरळच रिसॉर्ट नमनच्या नावाने करणार आहे.... पिहूच्या नावाने मला हव आहे.....तुझ्या नावावर असले तर तू कधी देऊन मोकळा होशील कळणार नाही.....

मॉम बस आता. ह्यासाठी तुला काही सांगू वाटत नाही. आणि नमनच्या नावावर असल किवा माझ्या नावाने असले तर काय फरक पडणार आहे...........तो बोलून चिडून उठून जातो...

सुमन विचारात पडतात...त्या खुश होत्या जेव्हा विराट ने ती जागा स्वतः च्या नावाने घेतली.....पण आज कळले की काम पूर्ण झाल्यावर नमन च्या नावाने करणार.... दिवस रात्र मेहनत करून जिवाच रान करून आयत कोणी घेऊन जाणार त्याची हळहळ लागू लागली....रोहिणी ते कस करून घेणार हे ही माहित होते....विराट मॉम पेक्षा आई च ऐकतो म्हणून तर अजूनच त्यांची चिंता वाढत गेली....

पिहू आवरून रूम मध्ये आली..... एका मागून एक विराटचे फोन कॉल चालू होते......ती ही मोबाईल बघत बसली.....दार नॉक झाल्याने तिने बघितले....मनी ने हातातले पेपर पिहू कडे दिले..... तिने घेऊन विराट कडे दिले....त्याने फोन बंद करून पेपर रीड केले....पिहू साईन कर....त्याने पेपर तिच्या कडे देत पेन दिला..

कसले आहेत...ती ब्लँक होत पेपर बघत बोलली.....

का ट्रस्ट नाही का दरवेळेस विचारते......रीड कर......त्याच डोक आधीच मॉम खाल्ले आणि आता पिहू च काही तरी चालू होणार म्हणून वैतागतच बोलला...

पिहू पुढे काहीच विचारले नाही....तो चिडला बघून तिने पटकन साईन केले.....

रीड करून कुठले ही पेपर साईन करायचे असतात..
माझ्यासमोर ठीक आहे पण नेक्स्ट टाईम डोक लाव.......तो नजर रोखून तिच्या कडून पेपर घेत बोलतो....

पिहू नजर खाली घेते....सॉरी ते...त्याने तिला जवळ घेतले....नेक्स्ट टाइम कोणी ही पेपर दिले मी सुध्दा पहिले पेपर रीड कर....तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत बोलतो.......ती मान हलवत त्याला बिलगते.....

माझ गिफ्ट ती हात समोर करत बोलते....तो हसत पेपर तिच्या हातात ठेवतो..... ती ब्लँक होत एकदा पेपर कडे एकदा त्याच्या कडे बघते.....

तुला जे रेस्टॉरंट आवडत होते.....तेच आहे.....

ती दोन मिनिट शॉक लगल्या सारखी बघू लागली..तेव्हा तिला क्लिक झाले...
अहो, ss मी सहज बोलले होते....ती घाबरत बोलू लागली....

म्हणून बोललो होतो पेपर रीड कर....आता मी काही करू शकत नाही तो हसत तिला घट्ट कवटाळून घेतो....

(कॉलेज पासून थोड्या अंतरावर एक रेस्टॉरंट होते....पिहू आणि तिची फ्रेंड सारखे जायचे... तिला ते रेस्टॉरंट खूप आवडायचे शांत रमणीय वातावरण होते....तिकडे रहदारी जास्त नव्हती ....दुपारच्या वेळेस प्रसन्न गार फ्रेश वाटत होते...त्याने तिला विचारले आपल हॉटेल असून इकडे का येते...
तेव्हा तू सहज च बोलून गेली....हॉटेल मध्ये सगळे हाय क्लास लोकच असतात......आणि तिथे तिला ऑकवर्ड वाटते....हे अस छोटे कॅफे आणि बिना ऐसी ची ताजी हवा असल्याने मन प्रसन्न होते 🤩🤩🤩 मला आवडते इथे यायला.....तेव्हाच त्याच्या डोक्यात आल होते....तिला आवडते तर हेच तिला गिफ्ट द्यायच)

आवर आपण ऑफिस मधे जाऊ.....

मी...ती डोळे उघडझाप करत बघते.....

येस शोना......तो दोन्ही हात तिच्या गळ्यात टाकून कपाळाला कपाळ लावत बोलतो....

अहो, मला नाही जमत काही मी कधी कुठे काम केल नाही.....आणि दररोज ऑफिसला ना...नाही नाही ती त्याचे हात काढून त्याला पाठ फिरवून बोलते.....

पिहू लगेच पॅनिक का होतेस मी आहे

मी येणार नाहिये....ती फुगून च बोलते.....

मी तुला विचारल नाहिये ...गो एंड फास्ट रेडी हो....
अहो, तो रागाने लूक देतो....तशी ती पाय आपटतच निघून जाते ....तो हलक हसतो.

पिहू ने प्लेन लाईट ब्लू कलरची कॉटन ची कुर्त त्यावर वाईट सिगार पँट घातली होती.... ....

त्याने तिला वरुन खालून बघितले.....पिहू कॉलेजला चालली नाही.....

अहो,साडी घालू का 😕

त्याने डोक्यालाच हात लावला ......

अहो,

काही नाही चल छान दिसतेस....तो गालात हसत तिला जवळ घेत बोलला....

दोघे ही ऑफिस आले....पिहू दुसर्‍यांदा ऑफिस मध्ये आली होती....सगळे दोघांना बघत होते.......विराट फोन वर बोलत पिहू चा हातात हात घेऊन चालत होता.....दोघांचा जोड़ा दिसायला खूप सुंदर दिसत होता.... त्याची attractive पर्सनॅलिटी....त्याच्या बोलण्यात, चालण्यात एक रुबाब दिसत होता....आणि पिहू त्याच्याविरुद्ध ...कन्फ्युज ,घाबरलेली , थोडी ब्लँक चेहर्‍यावरून साधी भोळी निरागस दिसत होती.....विराट बरोबर तीच कस पटत असेल हाच अर्धे लोक विचार करत होते.....ऑफिस मधल्या हुशार सेल्फ confidence मुली त्याच्या बरोबर बोलताना घाबरत होत्या....मग पिहू कशी त्याला हॅन्डल करत असेल....सगळे बघत होते तर पिहू ला ऑकवर्ड फील होत होते.. ती विराट च्या हातातून हात सोडवत होती....विराट एक नजर हाताला बघितले आणि...एक नजर सगळ्यांवर टाकली तर सगळे पटापट आपल्या कामाला लागले .....

दोघे लिफ्ट मधे आले...

अहो, हात सोडा सगळे कसे बघत होते......ती हात सोडत घाबरत बोलली...

विराट एका हाताने तिला जवळ घेत तिच्या चेहऱ्यावरचा घाम रुमालाने पुसतो.... घाबरायला काय झाल मी आहे ना....

ती कशी तरी स्माइल करत मान हलवून त्याला मिठी मारते ...तिची धडधड त्याला ही जाणवत होती....एवढी ती घाबरली होती....

पिहू , इथे तुला कोण जज करणार नाही ये... कोणी इंटरव्यू घेणार नाही. त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला...

पिहू असच जायच बाहेर मला काही च प्रॉब्लेम नाही .....तो हसत बोलला...... ती अजून ही त्याला बिलगूनच होती....

ती लाजून बाजूला सरकते....दोघे ही केबिन मध्ये येतात....

वेलकम वहिनी, नमन आणि रिषभ तिच्या समोर बुके घेऊन उभे रहातात....आता पर्यंत तिचा चेहरा घाबरल्यासारखा झाला होता....दोघांना बघून तिने गोड स्माइल करत बुके घेतला....दोघांची बड़बड़ चालू झाली ..तेव्हा कुठे पिहू नॉर्मल होत बोलू लागली...विराट ला माहीत होत नमन रिषभ पिहू बरोबर असले तर ती रिलॅक्स होत काम शिकेल....

विराट, तुला वाटत हे दोघ पिहू ला काही काम करून देतील....मानव थोड विचार करत बोलला.....

विराट ने डोळे ताठ करत नाही अशी मान हलवून त्याच्या कामाला लागला ....

पिहू ,हे पेपर नीट रीड कर मानव तिला पेपर देत बोलतो.....

मानव, वहिनी आतच आली तू पण दादा च्या वर झालाय..
नमन पिहू कडून पेपर घेत होता....

नमन रिषभ आज तुम्हाला काही काम नाही का.....तो कडक आवाजात बोलला....

हा..हा...ते रिषभ पटकन त्याच्या कामाला गेला .....

विराट ने नमन कडे नजर रोखली....ते ....ते...मी वहिनी त्याने परत पिहू कडे पेपर दिले ..पिहू ओठ दाबून हसू कंट्रोल करत होती.

नमन, पिहूला तू हेल्प कर...तिला काहीच आयडिया नाहिये ...उद्या पासून तुझ्या बरोबर घेऊन ये जाताना तिचा टाइमिंग एडजस्ट कर.....

येस दादा....चल वहिनी आपण माझ्या केबिन मधे बसू..... तो पिहूचा हात धरत च घेऊन गेला....

सोनिया केबिन मध्ये आली.....मानव ने एक नजर बघितले तसा तो तडक निघून गेला...सोनिया ने ही नजर फिरवली....विराट ने एक नजर सोनिया ला बघत त्याच्या कामाला लागला......दोघां मधे काही तरी बिनसले आहे दिसत होते.....पण तो स्वतः हून कोणाच्या मधे पडत नव्हता...

नमन पिहूला काम समजावून देत होता....तिचा चेहरा पूर्ण पणे कन्फ्युज झाला होता......

नमन , काही चुकल तर....

वहिनी टेंशन घेऊ नको मी आहे ना... जमेल तुला तू थोड घाबरायच सोडून दे.....चुकलं तर चुकले.....चुकांमधून च माणूस शिकतो ना....दादाला घाबरू नको.....दादाला कस हॅन्डल करायच ते तू आता चांगलीच शिकली.. नमन पिहू ला डोळा मारत बोलतो...

पिहू त्याच्या डोक्यात फाईल मारत हसते.......

दोन तीन तासाने दोघे ही घरी येतात. जेवण वैगेरे आटपून रूम मध्ये येतात. .....पिहू उद्या पासून नमन बरोबर
जात जा येताना तुझ्या टाइमिंग नुसार येत जा....जास्त स्ट्रेस घेऊ नको....तू खुश आहेस ना तिचा उतरलेला चेहरा बघून तो गालाला हात लावत विचारतो......

मला जमेल का....कधी काही चुकलं ....तर ती कंठ दाटून त्याच्या कुशीत शिरून बोलते......

विराट हसत तिच्या पाठीवरून हात फिरवतो....चल थोडा आराम कर ..त्याने तिला बेडवर झोपवून कुशीत घेतल.....
.
.
चारच्या आसपास विराटला जाग आली.....पिहू अजून बिलगून झोपली होती....... तिला बाजूला करून फ्रेश होऊन तो बाहेर गेला....
थोड्या वेळाने पिहू ला जाग आली....विराट समोर नाही दचकून ती उठून बसली.....समोर त्याचा लॅपटॉप बघून ती थोडी रिलॅक्स झाली. तिने फोन लावला.

हॅलो ,कुठे आहात ?

थोड काम होत... येतो थोड्या वेळात, रात्रीच डिनर एकत्र करू ...

तिने हो म्हणून हसत फोन ठेवला....ती पटकन फ्रेश झाली....आवरून खाली आली.....रोहिणी कुकला इन्स्ट्रक्शन देत होती. विराट च्या आवडीच सांगत होती...पिहू चा चेहरा च उतरला .तिला विराटसाठी जेवण बनवायच होत....त्याच वेळ सुमन ही किचन मध्ये आल्या.

ताई ,विराट साठी पिहू बनवेल त्याच डिनर सुमन थोड तोडत बोलल्या....सकाळचा राग मानत होताच सुमन च्या....पण त्या बद्दल काही बोलता येत नव्हते. त्या तेवढ बोलून निघून गेल्या.

रोहिणीला ही जाणवत होते....पिहूला ही जाणवले.

रोहिणीने पिहू कडे नजर टाकली...पिहू ने नजर फिरवली पिहू तीच काम करू लागली पिहूला जाणवत होते रोहिणी तिथेच चेयर वर बसत तिला वरुन खालून निहाळत होती....पिहू ने खूप दिवसांनी घरात साडी घातली होती....हकला मेकअप त्याच कलरच्या हात भरून बांगड्या ती हलली की पायात तून पैंजनचा आवाज येत होता. विराट इथे असताना तिला वेळ मिळाला की संध्याकाळी अशीच आवरत होती.

रोहिणी ने डोळे ताठ करत मोबाईल मधे डोक घातले. पिहू ला लाजल्या सारख झाल. पिहूच झाल्या वर रोहिणी बाहेर आली. पिहूला रोहिणी ची ही गोष्ट खुप आवडत होती..कशी असू दे पण सगळ्या घर भर बारीक लक्ष होत. सुमन गीता नसल्या की कूक असताना रोहिणी स्वतः पिहू बरोबर थांबायची. वीरा घरात फिरत असली तरी मनी शिवाय कुठलाही नोकर वीराच्या समोर फिरकू देत नव्हती. .....


विराट सात साडे सातच्या दरम्यान घरी आला....पिहू सुधा च्या घरी गेली होती .विराट फ्रेश होऊन खाली आला..मॉम पिहू कुठे तो थोड चिडतच बोलला ....

सुमन ने लक्ष दिल नाही...त्याने आठ्या पाडत आई कडे बघितले....

सुधा कडे गेली ,गीता पिहू ला बोलावून आण. जायच तर तिकडेच जाऊन बसायच रोहिणी चिडून बोलते.

आई बाबा आहेत का रूम मध्ये

हो आहेत, आताच फिरून आलेत मी आले ग्रीन टी घेऊन रोहिणी खुश होतच बोलली.

सुमन ने एक नजर विराट कडे बघितले आणि उठून रूम मध्ये गेल्या. विराट ला सगळी कडे आड विहीरच दिसत होती...त्याने विचार झटकले आणि रूम मध्ये गेला.

टाइमिंग सुद्धा सांगत नाही.चिडले असतील....पिहू बड़बड करत घाईतच घरी आली, .....ती रूम मध्ये आली तर तो नव्हता..तिने कॉल केला .....त्याने दारात थांबून कट केला. अन आत आला....

अहो, ते ती बोलत होती तर त्याने तिला दोन्ही हातांचा विळखा घालत घट्ट मिठी मारत थोड उचलून तिच्या खांद्यावर डोक ठेवून तिचा सुगंध मानत साठवून घेत होता....तिचे पाय हवेतच होते...त्याला पिहू कडून पॉझिटिव्ह एनर्जी हवी होती....सगळा कामाचा स्ट्रेस ती मिठीत असली की तो विसरून जात होता. उद्या सोडून परत जायच जिवावर आले होते...पिहू त्याचा केसांमधून हात फिरवत गालात हसत होती... अहो,...

थांब ना शांत तो चिडून तिला अजून घट्ट पकडत वर घेत बोलला.

पिहू हसुन शांत झाली. तिने मुद्दाम त्याचा कानात बांगड्या वाजवल्या.....त्याने तिच्या खांद्यावरून डोक काढत बारीक डोळे करत च तिच्या कडे रोखून बघितले...

पिहू खुदुखुदू हसत त्याचा नाकाला नाक टच करते....

मी असताना कुठे जायच नाही मला तू समोरच हवी तो हट्ट करत बोलत होता...

पिहू ला अजून हसू येते....चला डिनर करू.....सोडा खाली.
त्याने तिला खाली ठेवले.... खूप दिवसांनी सगळे एकत्र डिनर करत होते.....जेवताना ही सगळ्यांचा गोंधळ चालला होता. सुमन शांत जेवण करत होत्या. त्यात रोहिणी तर पुढे पुढे करत होत्या त्या वरुणच सुमनला अंदाज आला होता... रोहिणीच्या माणसासारखं होत आहे.... सुमन सकाळपासून एक ही शब्द बोलल्या नव्हत्या. विराटला हे नवीन नव्हते. त्याने ही लक्ष दिल नाही....कोणा कोणाच ऐकू अशी गत झाली होती.

पिहू सगळी कडे नजर बघून रूम मध्ये येते.....बेडवर खूप सार्‍या बॅग्ज होत्या .....अहो हे काय आहे ती बॅग कडे बघत बोलली....

तुझ्या साठी आहे,

मगाशी नव्हते ती बॅग ओपन करत बोलली. तो ही जवळ आला...

अहो .....हे ती ब्लँक होत ड्रेस कडे बघत होती...विराट ने तिला ऑफिस ला जाण्यासाठी फॉर्मलस घेऊन आणले होते.

मला घालून दाखव ...उद्या पासून ऑफिस ला जाताना हेच घालून जायचे.....

काही काय .. मी कधी घातले नाही....

तू कॉलेजला चालली नाही ऑफिस मध्ये जाताना प्रॉपर आवरून जायचे असते......

अहो 😕 घरातून अस बाहेर जाऊ...

शटअप , चेंज कर. तो चिडून च बोलतो....त्याला तिच्या अश्या प्रश्नांची खूप जास्त चीड येत होती...अस नको तस नको..का.. हे अस का लबालबलबालब 🙄🙄🙄😖 ती फुगून च पाय आपटून आत आली....चेंज करता करता बड़बड़ चालूच होती....तिने मिरर मधे बघितले...आणि थोड शॉक मधेच बघत होती...😨😧

पिहू बाहेर ये इतका वेळ तो ओरडून बोलतो....

हा आले पिहू ने पटकन ब्लेझर घातला आणि बाहेर आली....

विराट इकडून तिकडून फिरत होता ती बाहेर आल्यावर जागचा थांबून तिला एकटक भान हरपून निहाळत होता..... त्याची नजर बघून पिहू चा चेहरा गुलाबी झाला होता....

तिने फॉर्मल व्हाइट शर्ट ,शॉर्ट स्कर्ट जो गुडघ्याच्या थोडा वर होता....त्यावर ब्लॅक कलर चा ब्लेझर घातला होता....

अहो, ती हळूच लाजत बोलली तिच्या आवाजाने तो भानावर आला....

ह..हो..वन मिनिट तो कपाळावर अंगठा घासत आत गेला तिच्या शू रॅक मध्ये नजर टाकत बोलला.......ओह गॉड .सेव मी.....हे अस बघून ऑफिस मधे माझ काम कधी होईल. का..... पुटपुटत च तिची हिल्स घेत गालात हसत बाहेर आला. ...

पिहू कम ,त्याने तिला चेयर वर बसवले आणि खाली वाकून तिला हिल्स घेऊन दिल्या...अहो ती आठ्या पडतच चिडून बघू लागली. .

त्याने तिचा हात धरत तिला उभ केल....त्याने तिच्या केसांमधून क्लच काढला..आणि केस मोकळी सोडले......

झाल का.. ती वैतागत बोलू लागली.....

👌 परफेक्ट विराट हात करून हलक हसुन म्हणतो........

अहो, मी कधीच अस काही घातले नाही.....😥 चांगले वाटेल का....
तो मागून तिच्या शोल्डर ला पकडून मिरर समोर आणतो....

त्याला आता तिला सगळ्या गोष्टी पटवून द्यायच्या होत्या....तिने कधी असे कपड़े घातले नव्हते....कधी चार भिंतीतून बाहेर पडली नव्हती....लग्ना आधी आईवडिलांच्या कुशीत तीच जग होत आणि लग्नानंतर विराट च्या कुशीत तीच जग होते....

पिहू मिरर मध्ये नजर टाकत स्वतःला निहाळत वरुण खालून बघते.....अहो अस घालून जाण गरजेचे आहे का... मी टॉप जीन्स, लॉन्ग स्कर्ट वैगेरे घालून जाते ना...ती नाराज होतच बोलते.

What is your name?

पिहू प्रश्नार्थक नजरेने बघते....तो डोळ्याने च परत विचारतो.
ती लाजून हसते...

Don't shy answer तो सिरियस होत विचारतो...

पिहू विराट देशमुख ती हसत ब्लेझर दोन्ही हातांनी ओढत बोलते....विराट गालात हसत नजर खाली करत परत तिला बघतो .

तो पुढे येत तीच मंगळसुत्र कॉलर च्या आत घेत परत तोच प्रश्न विचारतो.....

अहो,...तिला तर काहीच कळत नाही तो काय करतोय.....

तुझ नाव पिहू आहे.....फ़क्त पिहू तुझ्या साठी खरी ओळख तुझ नाव आहे.....पिहू ....बस्स तो गालात हसत बोलतो.

पिहू ब्लँक होत त्याच्या कडे बघते.....नको विचार करू जास्त तुला जायच असेल तर जा....तुझ्या लाइफचा तू डिसीजन घे मी फोर्स करत नाहिये.....आणि तुला काही गरज नाहिये काम करायची .....तुझ्या एज्युकेशनचा काही तरी फायदा करून घे ..बाहेर च जग बघ मी नसताना तू स्वतः इंडिपेंडेंट लाइफ जगु शकतेस....confidence लेवल तुझा झिरो आहे ना..तो थोडा वाढेल.....तू सगळ करू शकते ...फक्त स्वतः वर विश्वास ठेव...मला हे जमणार च नाही ह्या वाक्यातले नाही काढून टाक मला हे जमणारच अस बोल .....मी कधी केले नाही ह्यातून नाही काढ ...मी आता करणार अस म्हण....पॉझिटिव्ह थिंग ठेव...नाही हा शब्द विसरून जा.....तुला सगळ नीट आणि छान रित्या होईल....ट्राय करु शकते ना.... पिहू त्याच बोलण नीट लक्ष पूर्वक ऐकत होती....मनावर ते शब्द कोरू लागले....

आणि कपड्यांच बोलली तर एक गोष्ट क्लियर ठेव आपल्याला दुसर्‍याच्या नजरेत बेस्ट दिसायच नाहिये ...आपल्या नजरेत बेस्ट दिसायच आहे....तुझ फर्स्ट इम्प्रेशन इस द लास्ट इम्प्रेशन आणि हे तुझ्या बाबतीत सांगतो जेव्हा तू स्वतः परफेक्ट आवरून मिरर मधे बघशील ना एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आतून येते. ....उद्या मी ऑफिस ला जिमचे कपड़े घालून गेलो तर चालेल का?नाही ना हसतील मला सगळे तो हसत बोलला...
पिहू हसत त्याचा कुशीत शिरते...त्याच म्हण तिला बर्‍या पैकी पटले होते....

पिहू .....

पिहू मान वर करून त्याच्या कडे बघते....

चेंज कर सोना ....माझा माझ्यावर कंट्रोल राहणार नाही 😚😚

पिहू त्याचा टीशर्ट पकड़त खाली ओढते....नका ठेवू कंट्रोल पिहू त्याच्या डोळ्यात आरपार बघून बोलते...त्याने तिच्या डोळ्यात नजर रोखली...दोघांच्याही डोळ्यात प्रेमाची नशा चढली होती. कधी दोघे प्रेमात हरवून गेले कळलेच नाही....
.
.
.
.
सकाळीच फ्लाईट होती. सुमन चिडल्या होत्या पण तो चालला म्हणून शांत झाल्या.... विराट ने टाईट हग केले....सुमनचे डोळे भरून आले.....त्यांनी त्याचा पाठीवरून हात फिरवला....

पिहूचा चेहरा हिरमुसला होता....दोन दिवस कसे गेले कळलेच नाही.....त्याच्या समोर रडायच नव्हते...कंठ दाटूनआला होता... मन ऐकत नव्हते...परत कधी येणार हे माहीत नव्हते.....डोळ्यातले पाणी गालावर आलेच...त्याने तिचे डोळे पुसले....तिच्या कपाळावर किस करून तो गाडीत बसला....आणि डोळ्यावर गॉगल चढवला....पिहूला सोडून जायची त्याची इच्छा बिलकुल होत नव्हती.....दोन दिवस डोळ्यात तिच्या पाणी नव्हते....चेहरा फक्त blush करत होता.....अणि आज हसू ही नव्हत.....

पिहू रूम मध्ये आली ...डोळ्यातल पाणी काही केल्या आवरत नव्हते....त्याच्या सामानावरुनहात फिरवू लागली.

💞💞💞💞