Reshmi Nate - 27 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 27

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

रेशमी नाते - 27

पिहुला दररोजच्या वेळीच जाग आली.........तिने टाईम बघितला सहा वाजले होते.........आलार्म कसा वाजला नाही म्हणुन तिने चेक केलं तर बंद होता..........तिने विराटवर नजर टाकली अन् गालत हसत हळुच त्याच्या हात काढुन बाजुला झाली.......
.....विराटने तिच्या पोटावर हात टाकत परत जवळ ओढलं...

झोप ना....तो झोपेतच तिला बोलला...

पिहु त्याच्या कडे टर्न होऊन त्याच्या केसामधुन बोट फिरवु लागली...तिची नाजुक बोट त्याच्या केसांमधुन फिरत होती....तर त्याला परत झोप लागली.......पिहू थोड्यावेळाने अलगद बाजुला होत बाथ घ्यायला गेली........तिने बेडवर नजर टाकली तर विराट नव्हता........तिच लक्ष गॅलेरीत गेलं.......तो आज स्वतः बर्डसला पाणी ठेवत होता.......

पिहू हसत गॅलेरीत गेली......अहो, अहहं आज दिवस कुठुन उगवला तुम्ही चक्क .......पाणी,हहं पिहु हसत बाऊल नीट ठेवत बोलली........

विराट हलक हसत तिला एका हाताने जवळ घेतो......बघत होतो.......तुला काय फिल होते.......अस केल्यावर ........

हहं मग काय वाटलं तुम्हाला पिहु वर त्याच्याकडे बघत बोलली‌.......

मन प्रसन्न वाटतयं......तो तिला मिठीत घेऊन डोळे झाकत तिचा,सुगंध अनुभवत बोलतो.......

हहं आता सोडा,खाली जायच आहे......पिहु त्याचे हात पोटावरुन काढत बाजुला सरकते......

विराट तिचा हात धरत परत ओढतो.......का,दुर पळतेस.....सकाळ झाली कि.... रात्री तर एक सेंकद सोडत नाही,विराट तिच्या गळ्यावर चेहरा घुसळत बोलतो.....

अ....अहो, काही पण बोलता🙈......पिहु लाजुन त्याच्या कुशीत शिरते.....

विराट हसत मिठी घट्ट करतो......हो...सिरीयसली........तू एक,सेकंद..तो बोलत होता....कि पिहूने त्याच्या तोंडावर हात ठेवला.....चु....चुप,मला नाही ऐकायच.....पिहु लाजून लाल झाली होती.....

का,का नाही ऐकायच.....हहं...करतेस तशी......विराट तोडांवरचा हात काढत हसत बोलतो.......

तुम्ही ना....पिहु बोलतच होती...‌कि विराटच लक्ष गार्डनमध्ये गेलंं.....प्रांजल ,वीरा बाहेर रनिंगला करत होत्या....
पिहूच सुध्दा लक्ष जाते......

बघ पिहू,हेल्थची किती केअर घेतात......आणि तु.....सकाळी उठुन काय करतेस....

पिहु बारीक डोळे करुनच बघते......

डोन्ट लुक अॅट मी लाईक दॅट तो नजर रोखून बोलतो.......

मला गरज वाटत नाही.....सर्वात बोरींग वाटते......एक्ससाईज करायाला......

अग निदान वॉक तर करत जा.....विराट आत येत बोलतो....

अहो....मी एकटी किती बोर होईल.........वीरा खुप‌लेट येते तिकडे असताना......फ्रेंड्सबरोबर जात होते....पिहु त्याच्या मागे येत बोलते.....

ठिकये मी येतो

तुमच वर्क ऑऊट

आल्यावर वर्कऑऊट करतो.....मी घेऊन गेल्याशिवाय तु तर स्टार्ट करणार नाही.......तो एनर्जी ड्रिंक करत बोलतो.....

हुहह....पिहु रागाने बाहेर निघून जाते......

विराट गालात हसत जिममध्ये जातो.....
.
.
.
.
.
पिहु किचन मध्ये ब्रेकफास्ट बघत होती......

प्रांजल पिहुला शोधत किचनमध्ये आली....गुडमार्निंग दी..प्रांजल गळ्यात हात घालत बोलते....

गुड मार्निंग....पिहू हसत बोलते....

का‌य बनवते...

चीज पराठे.....तुझे फेवरेट ....

‌यम्मी....व्हा....दी असावी तर तुझ्यासार‌खी.....प्रांजल गालावर किस करत बोलते....

वहिनी,मोठ्या आईंनी दिलं......गीता शेडयुल चार्ट देत बोलते.....

पिहु घेते...

दि हे काय आहे....प्रांजल शॉक होत बोलते.....

आज कोण काय खाणार ते आहे.......

दी घर आहे का हॉटेल....अस मेन्यु लिहून देतात का...तुला....

मी नाही,कुक करतो...

हहं...हुशश मला वाटले तू करते का....

जा ,बाहेर मी आले.....



पिहुने आजींसाठी नाश्ता ट्रे मध्ये ठेवला...आणि बाहेर आली......रोहिणी जवळच बसली होती.....तिने पिहुकडे नजर टाकली....

पिहु,हे काम तु का करते......नोकर आहेत आपल्याकडे......ती गोष्ट वेगळी.....माहेरी तुला सवय असेल......म्हणुन सवय सुटत नाही का......रोहिणी टोमण्यात हलक हसत बोलते......

पिहुचा चेहराच उतरतो.....ती बोलणार कि सुमन आणि रेवती समोर उभ्या होत्या......आज पहिल्यांदा रेवती ने पिहूला अस बोलताना ऐकलं होते....त्यांना ती गोष्ट मनालाच लागली....‌

रोहीणी ,मला पिहुच्या हातचाच नाश्ता आवडतो....म्हूणन ती करते....आणि बोलताना भान ठेव....आजी आवाज चढवतच बोलतात.....

.आई,अस काय बोलले......राग येण्यासारख ... रोहीणी बोलत चिडुनच उभी राहते......

आजी,आईंच बरोबर आहे......एवढे नोकर असताना मी का करायच त्यांना वाटत असेल......आणि माहेरी मी सगळ काम करते.....आमच्या कडे नोकर नाहीयेत......त्यात मला राग येण्यासारख काहीच वाटत नाही......पिहु आजींना शांत ठेवण्यासाठी म्हणत होती......

सुमन मध्येच येत दूसरा विषय काढते......रेवती....बस आज मानवच्या घरी जायच ना.....

ह...हो रेवती वर वर हसत बोलते....पण आतून पिहूची काळजी वाटत होती....

पिहुला ही जाणवले....मम्मीला,आता खुप प्रश्न पडले असतील.....

सगळे एकत्र डायनिंग टेबलावर जमा झाले.......पिहुने रागानेच बाऊल ठेवून मम्मीशेजारी बसली...किती केलं तर टोमणे आहेच कस वागायच हेच तिला कळत नव्हतं .....सुमनला ही जाणवलं.....नाही तर पिहु अशी लगेच नाश्तासाठी बसत नाही......

----💕------

पिहू,रोहीणीताई तुला सारख तर काही बोलत नाही ना‌....

मम्मी तु लक्ष देऊ नको...त्यांचा स्वभावच आहे.......आपण नीट रहायच...

हहं पण त्यांना का‌य त्रास असेल तर आम्हाला बोलाव ना‌...तुला कस काही बोलु शकता....तुझा दोष नाही कि तूझ माहेर मध्यमवर्गी‌य आहे.....

मम्मी सोड तो विषय मानव दादा येत असेल........तुम्ही जाऊन या.....पिहु कसतरी समजावत सांगून आली.......

रेवती,भिमराव,प्रांजल मानव सोबत घरी आले...पिहुला पण चल म्हणत होता.....पण दूपारून मम्मी पप्पा जाणार म्हणुन तिला स्वतःच्या हाताने लाडु करुन द्यायचे होते.....

पिहुच्या डोक्यात सकाळच घूमत होते....कधी तिला इतका त्रास झाला नाही आज होत होता......तिचे लाडु करून झाले.....
.आई,टेस्ट करा .....पिहु सूमनला देत बोलली.....रोहिणी ही तिथेच होती...‌

खुप छान झालेत....धरा,ताई सुमन दुसरा,देत बोलली.....

रोहिणी घेते.........(छान टेस्ट होती पण बोलणार नाही)..... हहं ठिक आहेत...ती बोलायच म्हणुन कसतरी बोलते......

आई,आवडले नसतील तर ..... तुमच्यासाठी कुकला सांगु बनवा‌यला...पिहु गालात हसत बोलते.....तशी सुमन एकटक पिहूकडे बघत राहते.....

मला हवे असतील....तर मी सांगेन....रोहीणी आवाज चढवतच बोलते....

आई ,मला चार गोष्टी अश्या सांगा कि माझी तूमच्या मनात जागा निर्माण होईल....आणि तुम्ही अस करा कि,माझ्यामनात तूमच्या बद्दल आदर वाढेल....पिहु आवाजात कडकपणा ठेवतच बोलते.....

रोहिणी शॉक होतच बघते....

पिहु, ....ते लाडु घे....आणि पॅक कर....सुमन तिला तोडुनच बोलतात‌....

पिहू काही न बोलता....लाडु घेऊन आत निघुन जाते..

सुमन,बघ.....आता हेच ऐकायच राहील होते......ह्यासाठी आपल्या स्टेट्सला शोभेल तश्या मूली निवाडायच्या....इतके दिवस गोडीत राहीली......आणि आता काय विराट मुळे डोक्यावर चढली आता तिचे खरेरंग दा‌खवते......रोहीणी पिहूला ऐकु जाईल ह्या आवाजातच बोलत होती......

सुमनला तर काय बोलाव कळतच नव्हते....पिहुला पहिल्यांदा अस बोलताना बघितलं होते.....ताई,लहान आहे.‌...चुकुन बोलली .....विराटचा काय संबंध ...

अग सगळा विराटचा संबंध आहे....त्यानेच लाडावुन ठेवले आहे......मला ही डोळे आहेत....सगळ दिसतं मला...

अहो,ताई.....

तु शांत बस तिची बाजु घेऊन आता तु बोलणार का......सुमऩ शांतच बसते.......

इकडे पिहुच्या डोळ्यातुन पाणी वाहतच होते....आईसमोर बोलले तिला सहनच झालं नाही....आणि एक शब्द आज निघाला तर रोहिणी ची बडबड चालु होती.....

पिहु रुममध्ये जाऊन फ्रेश होते......परत मम्मी समोर असा चेहरा घेऊन गेलं कि टेंशन घेईल......

दूपारी जेवण करतात...विराट दोन तीन तासाच्या मिटींग कॅन्सल करुन घरी येतो......

पिहु काळजी घे.....रेवती डोळ्यात पाणी आणतच बोलते......
पिहु च मुसमुसण चालु होते.....

बाबा ड्रायव्हर ला घेऊन जावा......

अरे नको....येताना प्रांजु होती....आणि आता सावकाश जाईन.........

विराट‌ काही न ऐकता ड्रायव्हरला त्यांच्यासोबत पाठवतो........

प्रांजल काळजी घे...रेवती डोळ्यात पाणी आणत तिला मिठीत घेत बोलते....आणि मस्ती करु नकोस.......

प्रांजल डोळ्यातल पाणी सावरते........ पिहुच आईवडींना रडली तर काही वाटत नव्हते......ती हळवी आहे.....पण प्रांजल रडली कि त्यांच मनच होणार नाही....म्हणुन ती स्वतःला सावरते.मम्मी काळजी करु नकोस...ती रुबाबात बोलते....यावर सगळे हसतात....

विराट तुला सांगायची गरज नाही...पण प्रांजलकडे थोड लक्ष असू देत....भिमराव भावुक होत बोलतात...

बाबा,प्रांजलची काळजी करु नका......मी आहे.....तुम्ही फक्त आईंची आणि स्वतःची काळजी घ्या........आणि कधीही फोन करा......त्यात कुठला संकोच‌ करु नका.....

पिहू विराटकडे भारावुन बघते......(एका मुलीला अजुन काय हवें असते.....ती जशी त्याच घर संभाळते....तसच त्याने पण अपलं घर संभाळुन घ्यावे.....बस्स एवढीच अपेक्षा असते......)

तिचे आईवडील गेल्यावर सगळे आत येतात....प्रांजल पिहु रुममध्ये येतात....दि, वॉट हॅप्पन असा का सॅड फेस झाला आहे.... प्रांजल संशायाने बघत विचारते......

प्रांजु ssपिहु चिडुनच बोलते...

ओहहहं चिल....रीलॅक्स राह.......मम्मी पप्पांची काळजी वाटते का.......तर टेंशन घेऊ नको.......मी राकेश ला अधुनमधुन जा बोलले घरी.....

हहहं ,पिहू डोळ्यातल पाणी आवरत बोलते.....वीरा आणि दिपा येतात......दिपा उद्या जाणार होती......म्हणुन तिला शॅापिंगला जायच होते.....

वहिनी चल ना.......

नाही नको,तुम्ही जावा.....आपण नंतर कधी तरी जाऊ......

प्रांजल तु तरी चल वीरा तिच्याकडे बघत बोलते......

हहं ती पिहूकडे बघते....पिहु डोळ्यानेच जा म्हणते.‌.....

तिघी निघुन जातात‌.....पिहु रुममध्ये येते.,...विराट स्टडीमधुन फाईल बघत परत ऑफिसला चाललाच होता.......पिहु रुममध्ये आल्यावर तो फाईल बेडवर टाकुन पिहुला मिठीत घेतो.....पिहू पण त्याच्या मिठीत स्वतःला शांत करते.......

विराटचा मोबाईल वाजला तो कॉल रीसीव करणार कि पिहूने मोबाईल घेऊन बेडवर टाकला आणि त्याच्या कुशीत शिरली.....नका जाऊ....पिहू कंठ दाटुनच बोलली.......

पिहु,मी इंव्हिनीगला लवकर येतो......विराट तिच्या शोल्डरला पकडुन दुर करत तिच्या डोळ्यात बघत बोलतो.......

अहं...पिहूचे डोळे पुर्ण भरले होते....ती परत त्याच्या कुशीत शिरुन मुसमुसत होती..... ....विराटचा फोन एकवर एक वाजत होता.....पिहू पण आज पहिल्यांदाच अशी वागत होती....पिहु,तो तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिला शांत करत बोलतो‌........

पिहु, आराम कर.......मी लगेच मिटींग अटेंड करुन लवकरात लवकर येतो.....पण पिहू काय त्याला सोडायच नावच घेत नव्हती.....लहानमुला सारखी हट्ट करत बिलगुन होती........

विराट तिला बेडवर बसवतो.......पिहु,डोन्ट बी स्टबबोर्न....

पिहु ने रागाने त्याच्या हात काढला आणि ब्लँकेट‌ घेऊन आडवी झाली.....

तो ही काहीच बोलला नाही....त्याने त्याचा मोबाईल फाईल उचलली आणि तिच्या चेहरयावरची ब्लँकेट काढत तिच्या कपाळावरुन हात फिरवत किस करतो.....पिहू,मिटींग अटेंड करुन लगेच येतो.....आपण बाहेर जाऊ.....

पिहु ने काहीच उत्तर दिलं नाही.......डोळे सुध्दा उघडले नाही......
विराटला ही कळलं ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये...आणि त्याच काम सुध्दा महत्तवाच होते..........त्याने एक सुस्कारा सोडला अन् निघुन गेला........

विराट ऑफिसमध्ये येतो......जाता जाता तो नमनच्या केबिनकडे नजर वळवतो....नमन आणि रीषभ केबिनमध्ये बसुन मोबाईलवर‌ काहीतरी करत होते.........

मानव रीषभ साईटवरुन येऊन कितीवेळ झाला तो केबिनमध्ये जात बोलला.,......(विराटने आता रीषभला ही ऑफिसमध्ये ठेवण्याचा विचार केला.....नजरेसमोर असल्यावर अजुन सुधारणा होतील ....)

दोन तास झालं.......

नमन,ने पेपर्स चेक केले.......तो लॅपटॉप कडे बघत बोलला.......

मी विचारले नाही.....

हहं ,विराट दोघांना बोलावुन घेतो.....दोघेही आत येत चेअर वर बसतात.....

मानव, नमनची केबिन लॉक कर....विराट नमनवर नजर रो‌खूनच बघत बोलतो.....

तसा नमन दबकतो.......रीषभ ही दचकतो......दोघे एकमेकांकडे बघत विराटकडे बघतात........

रीषभ साईटवरुन आल्यावर तु अपडेट दिले का....तो ओरडुनच बोलतो.....

त...ते दादा ,तु आ...आता आला ना....रीषभ अडखळत बोलला...

मी आत्ता,आलो.हहह. मग तुला एकच काम करुन गेम खेळ बोललं का?????......

न..ते......दाददा,रीषभला तर दरदरुन घाम फुटला....

कधी तरी स्वतःच डोक चालवावे.....मी नाही,म्हणून दोघांपैकी कोणालावाटलं नाही....आपण मिटींग चालु करावी.....जेवढ काम दिलं काम संपलं........मग तूमच्यात आणि एम्पाॅलाई मध्ये काय फरक आहे.......विराटने समोरच्या फाईलवर जोरातच हात सरकवाला......सगळ्या फाईल्स ‌खाली पडल्या.....

दादा,ते..नमन बोलणार कि,विराटने हाताने त्याला थांबवल......

मानव,मी सांगेपर्यंत दोघेही स्टाफ मेबंर मध्ये बसुन काम‌ करतील......

तसा नमन रागाने उठला.....नो,दादा मी अस काही करणार नाहीये........

व्हाय???कमीपणा वाटतो....तूला केबिन मी आरामासाठी दिली नाही.....आणि रागात ऑफिस सोडुन जायची गरज नाहीये.......उपकार करत नाही माझ्यावर काम करुन हे लक्षात असु देत.......विराट चेअरवरुन उठुन दोघांनावर एक कटाक्ष टाकतच मिटींगसाठी निघुन गेला.....

नमन,रीषभच्या हातात फाईल्स मानव फाईल्स देतो.....कोकण च्या रीसोर्ट चे आहेत......चेक करा......सोनिया मानव ने तिला इशारयातच सांगितलं.....

रीषभ पटकन फाईल घेत बाहेर निघुन गेला.....नमनला राग आला होता......पण नाईलाज होता......त्याला ही माहीत होते.....त्याच्या रागापेक्षा विराटचा राग कितीतरी पटीने जास्त आहे.......त्याने गपचुप फाईल घेतली.......

स्टाफ तर दोघांना शॉक होत बघत होते........नमन ने एकवर सग्ळयांवर कटाक्ष टाकला तर सगळे पटकन आपपल्या कामाला लागले.......

पिहु,पाच वाजता खाली आली.......रोहिणी तिला रागाने बघुन रुममध्येच निघुन गेली........पिहु पण इग्नोर करत किचन मध्ये
आली...

तिने प्रांजल ला कॉल केला ....

हा दी.....

हहं कुठे आहे अजुन आली नाही,सहा वाजत आलेत..... म्हणुन कॉल केला.......

वीराने प्रांजलकडुन मोबाईल घेतला.......वहिनी आम्ही आता डीनर करुनच येणार आहे.....

हह...हो का.....ठिक ये.......पिहु ने फोन ठेवुन दिला......

दादा,आम्ही जाऊ सिक्स थर्टी झालेत....नमन फईल टेबलावर ठेवत बोलतो....

,हे धर पेपर्स चेक कर....आणि आज नऊ वाजेपर्यंत थांबायच तुम्ही,.....नेक्स्ट टाईम कळेल ऑफिसमध्ये गेम खेळायच का,ऑफिसव‌र्क करायच.... विराट दोघांकडे रागाने बघत बोलतो...

दोघांचा चेहराच उतरतो.....

नमन रीषभला वीरा दिपा फोन करत होती....

ब्रो,तुच ‌प्लॅन केला आणि तुझाच आता पता नाही...वीरा चिडुन बोलली.......

वीरा ,दादा का‌य घरी जायच नाव घेत नाही......आणि आम्हाला ही हलु देत नाही.......नमन चिडतच बोलला......वीरा, तु दादा...वीरा लगेच थांबवत बोलते...

हे..हे...मला नको मध्ये पाडु....माझा मुड‌आता खुप छान आहे दादाच्या ओरडा खाऊन मूड स्पाॅईल नाही करायच....ते तु बघ,आम्ही थोड्यावेळात हॉटेलला जातोय....वीरा भाव खातच फोन ठेवते......

नमन च्या डोक्यात पिहूचा विचार येताच त्याची कळी खुलती....तो लगेच पिहुला फोन लावतो....

हा बोल नमन,

वहिनी,एक काम होते...

हा बोल ना...पिहु हसत बोलते....

मला आणि रीषभला ही डीनरला जायच दादा सोडतच नाहीये.....नऊ वाजताच जायच अस बोलला.....नमन नाराज होतच बोलतो....

हो का ...मग आता..

वहिनी,दादाला तु

अ,मी....ना....नाही.....ते फोन सुध्दा उचलत नाही म्हणजे कामात असणार.....

वहिनी,प्लिज ना......एकदा ट्राय कर ना.....दादाला घरी बोलव ......म्हणजे आम्ही ही सटकतो....तो रीषभला डोळा मारत बोलतो....

अहं ते स्वतः बोलले होते....लवकर येतो पण अजुन पत्ता नाहीये....

हो ना...मग आठवण करुन दे ना....आणि जरा चिडुन बोल....मग दादाला तुझ्याबद्दल वाईट वाटेल....त्याच्याकडुन चुक झाली आता ओरडणार नाही तुला‌.....

बघु ....

पिहुचा मानवला कॉल आला.......तो विराटसमोरच बसला होता.....,त्याने विराटकडे बघत कॉल रीसीव करतो......
हा बोल ,पिहु...तसा विराट चमकुन मानवकडे बघतो.....तेव्हा त्याच्या लक्षात येते......त्याने कपाळावर अंगठा घासला.......आणि मोबाईलवर नजर टाकली.....मोबाईल सायलेंट असल्याने त्याने बघितलच नाही...पिहुचे मिसकॉल पडले होते.....

दादा,हे आहेत का.....फोन उचलत नाहीये....

हहं आहे ना....एक मिनीट हहं मानवने विराटकडे मोबाईल दिला आणि हसतच बाहेर गेला......

विराट मोबाईल कानाला लावतो ..पिहु त्याला बोलु न देता स्वतःच चालु होती.....दुपारी काय बोलला होता.....लवकर येतो....आणि आता सात वाजत आले....ते जाऊ दे......तुम्ही एक काम काम करता.....नमन रीषभ ला पण हहं .....त्यांच वय कामाबरोबर एन्जाॅय ‌करायच सुध्दा आहे पिहु चिडुनच बोलते.....

विराटच्या लक्षात येते....नमन च काम असणार हे....हहं ठिक ये मी ......

तुम्ही नका येऊ, काही गरज नाही घरी यायची ....स्वतः तर कधी एन्जॉय करायच नाही.....मला ही कूठे जाऊ द्यायच नाही....त्यांना तरी जाऊ देत ....ते सगळे डीनरला जाणार होते.....त्यात तुम्ही त्यांना अस त्रास देताय.....

ओके ,फाईन.....तो चिडतच बोलून फोन ठेवतो.....

पिहु मोठा श्वास घेत फोन कडे बघते.....काही ही करायाला लावतात....आता हे आल्यावर पिहु भितीने आवंढा गिळते...परत तिच्या डोक्यात येते....मी पण चिडली ना.....लवकर‌ येतात बोलले आणि आलेच नाही....

विराट ही पिहूबद्दल वाईट वाटते....तिच ही हेच ऐज आहे एन्जॉय करायच......लग्न झाल्याने फक्त घर, कॉलेज करते....विचार करतच ब्लेझर घालुन बाहेर येतो.......दोघांसमोर जातो......छान आयईडीया शोधुन काढली......विराट नजर रोखूनच बघत बोलतो....

तसे दोघे एकमेकांकडे बघुन खाली मान घालतात....

उद्या लवकर येऊन कंपलिट करा......जास्तीत जास्त टेन पर्यंतचा टाईम.....मला अकारच्या आत घरी हवेत तुम्ही सगळे.....विराट दोघांना व‌ाॅर्निंग देत निघुन जातो......

दोघेही खुश होत पटकन उठुन आवरुन निघतात....नमनला प्रांजलची ओढ आणि रीषभला आलिशाची लागली होती......

विराट घरी ‌येतो....पिहू गाडीचा आवाज ऐकुन किचनमधुन बाहेरच येत नाही.....विराट फ्रेश होऊन खाली येतो......पिहु डीनर लावत होती.....तो तिच्याकडे बघत चेअरवर येऊन बसतो....पिहू एकदा पण त्याच्यावर नजर टाकली नाही.....सुमन ,आजी येऊन विराटच्या शेजारी बसल्या...रोहिणी आणि दामोदर सुध्दा आले.....

आज सगळे बाहेर गेलेत वाटतयं दामोदर हसत बोलतात.....

हो,दिपा उद्या जाणार आहे ना....रोहीणी हसत सांगते.....

पिहु, तु सुध्दा जायच होते....घरात एकटीच थांबली......दामोदर बोलतात....

हा...ते....ती बोलतच होती...कि रोहिणी बोलली..... नंतर बोला....आता जेवण करा.....

सगळे जेवण करतात....विराट स्टडीमध्ये चाललाच होता कि रोहिणीने बोलवल...विराट मला बोलायच रोहीणी एक नजर पिहुकडे बघत विराटकडे बघत बोलते....पिहुची धडकीच भरते....

हा बोल ना....विराट ब्लँक होत सुमनकडे एकदा बघत रोहीणी कडे बघत बोलतो....पिहु चाललीच होती....कि रोहिणी थांबवते.....

ताई,सुमन डोळ्यानेच शांत व्हा बोलतात.‌...

सुमन,पिहुला ही कळु देत.....ह्या घरात कोणाशी कस बोलायच.....मोठ्यांशी कस बोलायच.....

तसा विराट एक नजर पिहूकडे बघत रोहीणीकडे बघतो......

विराट पिहुला समजावुन सांग,माझ्याशी बोलताना भान ठेवुन बोलत जा....इथे मी तिच काहीही ऐकायला बसले नाही....रोहिणी आवाज वाढत पिहुकडे बघत चिडुनच बोलते.....

पिहुला घाबरुन कहीच सुचत नाही.....

का...काय झालं.....

विराट,....काही नाही,भांड्याला भांड लागतच...सुमन विषय संपवण्याच्या हेतूने बोलतात....

विराट पिहुकडे बघत परत रोहीणी कडे बघतो... आई,लहान आहे चुकुन काही तरी बोलली असेल.....परत नाही होणार ,हो ना...पिहु.... तो नजर तिच्याकडे बघत बोलतो....

पिहु मानेनेच हो म्हणते.....

इतकी ही लहान नाहीये.....मोठ्यांशी बोलायच कळत नाही...

आ.... आई,मी अस काहीच बोल....ले नाही.....तुम्ही जे बोलला त्यालाच उत्तर दिलं पिहु धीर एकवटुन बोलते....

पिहू,..विराट तिला डोळ्यानेच शांत हो म्हणतो...

पिहु शांत होते.....

बघ,विराट तुच बघ.....तुझ्यासमोरच मला कशी बोलते..... हे फक्त तुझ्या लाडाचे परीणाम आहे.....(विराट डोळे झाकुन डोळ्यांना़‌वरुन हात फिरवत शांत राहण्याचा प्रयत्न करतो....)

पिहु चिडुनच वर निघुन जाते......

ताई,शांत बसा....मी समजावते....पिहू परत नाही बोलणार सुमन रोहिणीला शांत करत बोलते...

आई,मी समजावतो...तु शांत राह. जा जाऊन आराम कर....

समजव नीट.... रोहीणी बोलुन निघुन जाते....

मॉम,काय झालं,पिहू,उलट जरा वेगळ वाटत नाही....

विराट,लक्ष देऊ नकोस....आता घर बोलले तर अस होणारच....
पिहूला काही बोलू नकोस....तिच्या मनात नव्हतं अस काही बोलायच....पण होत कधी कधी राग अनावर होतं..आणि ताईंच माहीत आहे ना‌....तुला सांगितल्याशिवाय शांत बसणार नव्हत्या....सुमन हलक हसत बोलते....

मॉम,पिहुला ही माहीत असाव , जॉईंट फॅमिलीत थोडस का असेना झुकाव लागते....त्यानेच घर एकत्र राहते......

विराट,मी सांगते....तु काही बोलू नकोस.....

हम्म.....

विराट रुममध्ये येतो...पिहु शांत गॅलेरीत झोक्यात बसुन बाहेर बघत होती.....विराट गॅलेरीत येऊन झोका देतो तशी़ ती भानावर ‌येत स्वतःला सावरत नीट बसते....

पिहू,....तो बोलतच होता...कि,पिहु बोलली....अ..‌अहो उद्या ओरडा,आता मला रडायच नाहीये....पिहु कंठ दाटुनच बोलते..

विराट हसत तिचा झोका थांबवत,तिचा चेहरा जवळ घेतो.....चल लॉन्गड्राव्हीय जाऊ.....

पिहु,त्याच्या डोळ्यात चमकुन बघते...

उठ चल,तो तिचा हात पकडत आत आणतो......

अ..अहो,पिहु थोड निरखुन बघत बोलते.....

व्हाट हप्पन ,तु अशी का बघतेस....

क...काही नाही.....

हहं ,तो दोघांचे मोबाईल घेतो....धर तिचा मोबाईल हातात देत बोलतो.....

दोघेही गाडीत शांतच बसले होेते........पिहु बाहेर बघत होती.......विराटने तिचा हात पकडुन गेअरवर ठेवला...पिहु ने एक नजर बघुन त्याच्या जवळ सरकुन हाताला विळखा घालुत त्याच्या खाद्यांवर डोक टेकवले.......विराटने गालात हसत पटकन तिच्या डोक्यावर किस करत पुढे बघू लागला.....

पिहू,

हहं

एका घरात राहिलं तर असे छोटे छोटे वाद होतच असतात मनावर घ्यायच नाही.....त्याला आता कळलं कि ती दूपारपासून का सॅड आहे ते....त्याला वाटलं आईबाबा गेले म्हणुन असेल....पण कारण आत्ता कळालं)

हहं पण,

शुशु‍शु....मी तुला विचारणार सुध्दा नाहीये....पण जे झालं ते सोडुन द्यायच त्यात इतक गुंतत जायच नाही........फॅमिली म्हटलं हे होणारच....म्हणुन काय एवढ मनाला लावुन घ्यायच का.....फेस बघितली का.....कसा झाला.....आपण ह्या घरातले मोठे आहोत....पुढे जाऊन तुला सगळं बघायच आहे.....मग थोड स्ट्रॅाग हो....अस लगेच घाबरुन जायच का.........आणि आई मोठी आहे....सगळ घर संभाळते....आणि घर संभाळण चेष्टा नाहीये.......

हो माहीत आहे......पण मी एक लिमीट पर्यंत सहन करु शकते ना.....

एकदी गोष्ट बोलली तर ह...हं म्हणून सोडुन द्यायची वाद घालत बसायच नाही...‌‌....

(पिहुला सांगु कि नको हा प्रश्न पडला पण आईंनी (सुमन )सांगितल नाही...आणि मी बोलले तर ...)

तुला आई,मॉमच काही पटत नसेल तर मला बोल मी बोलेन हहं तो तिला प्रेमाने बोलत होता‌....

पिहु पण त्याच्या हो मध्ये हो मिळवत होती.,.......

अहो,

बोल...

पिहु बाजुला सरकत त्याच्याकडे बघते........तुम्ही लवकर ‌येणार
होते......पिहु गाल फुगवुन बोलते....

विराट हलक हसतो.....काम होतं........

आणि मी......मी आठवली नही........

आठवायला तुला विसरत नाही मी.....तो तिच्या हातावर किस करत बोलतो.....

पिहु हात काढत बाहेर बघते.......त्याने कार थांबवली........तिच्यासाठी आईस्क्रिम घेऊन परत गाडीत बसला.....

पिहु खुश होत आईस्किम घेत त्याच्या कुशीत शिरली.......तो तिच्या केसावरुन हात फिरवत ओठ टेकवतो.....

पिहु,ह्या छोट्याश्या डोक्यात फक्त माझा विचार करायचा.....बाकी सगळे हॅन्डल करायाला मी‌ आहे.......

(त्याने तिला नोटीस केलं होते....कोणी काही बोलू दे....ती त्याच विचारात असते....मग शांत शांत राहायच....)

तुमचा काय विचार करायाचा....पिहु आईस्क्रिम ‌खात विचारते.....

मला कस अजुन खुश करायच....तो चेहरा जवळ आणत स्माईल करत बोलतो..
..
पिहु लाजुन लाल झाली होती...त्याच्या चेहरयावरची स्माईल बघुन ती चेहरा लगेच दूसरीकडे फिरवते....सकाळी तिला हसलेली बघितली ती आता मनातुन हसली होती.....तो ही मनोमन सुखावला होता......

दोघेही थोडलांब अंतरावर आले ....विराट ने कार बाजुला घेतली.......दोघेही उतरुन बाहेर आले...थोड चालत ते टेकडीवर आले........अहो ,आपण घरी जाऊ....पिहु इकडेतिकडे बघतच बोलली...

विराट तिच्या भोवती हाताचा विळखा घालत जवळ‌ घेतो.....थोड्यावेळ थांबु मग जाऊ....

गार वारयाच्यी झुळुक येताच पिहु विराटला बिलगली....विराटने ही तिला आपल्या उबदार कुशीत कवटाळलं.....दिवसभराचा थकवा ती जवळ असली की निघुन जात होता......

सांस लेने से भी ज्यादा
तुम ज़रूरी हो गए
जी रहे थे हम अधूरे
तुम से पूरे हो गए

वरुन झकमगती लाईटींग मध्ये शहर उजळुन निघाले होते........दोघेही टेकडीवर थांबुन तो नजारा बघत हरवुन गेले होते.....

.
.

सगळे डिनरला बसले होते....प्रांजल ही सगळ्यांच्यात चांगली मिक्स झाली होती........

वीरा,दिपा ला रीषभच आणि आलिशाच माहीत होते......आता प्रांजल ही माहीत होते.......

दीपा,तुझ्या भावाला सांग घरी सांगायला......नाही तर मी स्वतः सांगेन......आंटीना येऊन आलिशा चिडुन बोलते.....

अगं आलिशा....घरात आईला(सुधा) कळलं तर दादाच काही खर नाही.....दिपा रिषभ ची बाजु घेऊन बोलते‌.......

इतके का घाबरता........तुम्ही सगळे.....आलिशा चिडुनच बोलते......

घाबरत नाही,गं पण आमच्यात कोणी लव्ह मॅरेज केलं नाही ना....कोणी अजुन ......रीअॅक्शन काय असेल हा विचार करतोय....वीरा खात खात बोलते....

प्रांजल फक्त ऐकत होती.....नमन तर चोरुन चोरुन तिलाच बघत होता.....तिने मस्टर कलरचा लो हाय नी लेंथचा ड्रेस घातला होता.......केस एकासाईडने घेऊन मोकळे सोडले होते.....साजेसा मेकअप तिचे पाणीदार बोलके डोळे बघुन तो भान हरपुनच बघत होता.‌......त्याच कोणाकडे लक्षच नव्हते.... रीषभ ने त्याच्या पायावर जोरात पाय मारला तसा तो विव्हळत रागाने रीषभ कडे बघु लागला.....

रीषभsss तो दात ओठ ‌खातच हळु बोलला.....

तुझी गाडी रस्ता पण पकडली नाही....तो विचार नंतर‌ कर....पहीले माझ बघ......

तुझ काय बघु,ते तू आणि आलिशा ठरवा.तो पाय धरत चिडुनच बोलतो.....

बर,तुला मी नंतर बघतो.......रीषभ आलिशाकडे वळतो.....

मी एक सजेशन देऊ का प्रांजल दोघांकडे नजर वळवत बोलते.....

तसे सगळे तिच्याकडे वळतात........

हा बोल रीषभ बोलतो.....

तुम्ही,दोघे सरळ लग्न करुन या........प्रांजल हहीहीही करत बोलते.....

तसे सगळे एकटक बघतात.....

तशी प्रांजल शांत होत...सॉरी,इतका वेळ तुम्ही खुपच सीरीयस बोलत होता..‌....म्हटलं एक जोक करावा...

नाईस जोक हेहेहे....रीषभ तोंड वाकड करत बोलतो‌‌.........

हहे...मस्त आईडीया आहे........वीरा हसत बोलते......

सीरीयसली,वीरा.....😓नमन शांत पणे बोलतो.....

रीषी मी डॅडला बोलते.....तसही डॅड आणि विराट दादाच बॉन्डींग चांगल आहे........आणि फॅमिली ही एकमेकांना छान ओळखते........

आलिशा,मी दादा ला बोलतो........ते मी बघतो कधी बोलायच...नमन बोलतो.....रीषभ तर ‌खुशीत त्याला घट्ट मिठी मारतो......

मला नाही,आलीशाला घे.....नमन चिडतच त्याला दुर करतो.......सगळे त्यावर हसतात........
.
.

पिहु विराट घरी येतात.....तसे हे सगळे ही घरी येतात......

दी,तु कुठे गेली होती....नाईट ड्रेसवर....प्रांजल गाडीतून उतरुन पिहुकडे जात बोलते.......

ते,मी.....ते......

अगं ,प्रांजल वहिनी दादा,लॉन्ग ड्रायव्हीला गेले होते......वीरा मागुन,येत बोलते........

ओहहहं व्हा.....प्रांजल चिडवते......पिहुलाजुन हसते.....

दि, उदया बोलू ‌खुप फिरले....झोपते....आणि मम्मीला सांग दहा वेळा फोन करु नको ...

हो,सांगते पिहु हसत बोलते........

विराट पिहुचा मोबाईल तिला देतो.......

वहीनी ,तु चिडली होती ना......नमन जवळ येत बोलतो......

अ...हं ते.....पिहु,एक नजर विराटकडे बघत नमन कडे बघते......

आय नो,दादा माहीर आहे तुला गोल गोल बोलून मनवायला........पण तु इतक्या लवकर का माफ केलं.........
उद्याचा फुल डे माग दादाचा...मस्त दोघे एन्जॉय‌ करा........नमन पिहूच्या गळ्यात हात घालुन हळुच कानात बोलता बोलता चालत जात होते....मागुन विराट त्या दोघांनाकडे बघत चालत होता.........

विराट मागून नमनच्या खांद्यावर हात टाकला......नमन,रुम तूझी त्यासाईडला गुडनाईट तो त्याच्या हात काढत रागात हसत पिहुचा हात पकडुन घेऊन जातो....पिहु हसु दाबत नमनला हात करत गुडनाईट बोलते..........

वहिनी,मी बोलले ते.......नमन बोलतच होता.....कि,विराटने रागाने बघितलं तसा तो पटकन रूमकडे वळाला.......

काय शिकवत होता नमन विराट डोर लॉक करत बोलतो......

पिहु हसते....काही,नाही उद्या तुम्हाला घेऊन फिरायला जा म्हणतो....

विराट हलक हसत बेडवर पडत पिहुसमोर हात करतो...पिहु,पण त्याच्या हातात हात देत छातीवर डोक ठेवुन बिलगुन झोपते.......

पिहु,

हहं पिहु डोळे झाकुनच बोलते......

‍पिहु,उद्या,वॉकिंगला जायच.....लक्षात आहे ना....

पिहु ने मान वर करत त्याच्या कडे गाल फुगव‌ुनच बघितले.....

नखरे नको येत.....

लगेच यायच ,

अस करु मेन डोर पर्यंत जाऊ तिथुनच रीटर्न येऊ...विराट नाटकी हसत बोलला.....

हुहहह.......पिहु त्याच्या छातीवर पंच करत आठ्या पाडत डोळे झाकली...
.
.
.

दोघेही सहा वाजता गार्डनमध्ये गेले.....

पिहू,रन......ती कसावाच्या गतीने चालत होती....‌‌तो ओरडुनच बोलतो...........

पिहू थोड पळते....परत ती धाप टाकत स्लो होत चालू लागते‌...
अ..अहो आज इतकच बस्स....पिहू श्वास घेत घेतच बोलते....

,अगं किती वेळ झाला येऊन,लगेच दमतेस‌.......विराट वैतागतच बोलतो......काही नाही,गार्डनच्या तीन राऊंड कंपलिट कर.......

मी एकच राऊंड करणार आहे चिडुनच रन करते........

अवघड आहे,विराट तिच्याकडे बघत बोलतो.......प्रांजल वीरा येतात.......दोघांना बघत विराट जवळ येतात.....दादा,वहिनी कधीपासुन अहहहहं वीरा हसत बोलते.......

आज पासुनच चालु केलयं......ते पण मागे लागुन लागुन विराट बोलतो‌........

हहं.....

चला दी आता हेल्थ कडे लक्ष तर‌ देईल...जीजु असच मागे लागा....पिहुला ऐकु जाईल म्हूणन प्रांजल जोरात बोलते.......

विराट हसत त्याच वर्कऑऊट करायाला निघुन जातो......

पिहु,पण थोड्यावेळाने रुममध्ये ‌येते.......ती जिम जाते.....विराट पुश मारत होता...तर पिहु हळुच त्याच्या पाठीवर बसली......

पिहुssतो त्याच्या स्पीड करतच ओरडतो....
,

मला सोडुन का आलात.....पिहु त्याच्या,शोल्डर नीट पकडत बोलते........

मला लेट होतो.......

हहहं,पिहु त्याच्या,मानेवरुन अलगद हात फिरवत ओठ दाबत हसते.....

पिहु,मस्ती खुप सुचतेय.......का,मी मस्ती स्टार्ट केली ना.....दिवसभर रुममध्येच राहव लागलं.....त्यात प्रांजल तर‌ दहा वेळा डोर नॉक करते...हहहं तो सभ्य भाषेत तिला धमकी देत होता....

न...नको ,सॉरी....पिहु लाजतच पटकन उतरुन आवरायला पळतच निघुन गेली....

विराट ती गेली त्या दिशेनच हसत स्टार्ट करतो.......

पिहु आवरुन खाली येते.......सूमन किचन मध्येच होती.......पिहु,आज पासुन काय वॉकिंग चालु केलं का.....सुमन हसत विचारते.......

हह.हो,

छान गोष्ट आहे......

पिहु गालात हसते.......सुमन एक नजर तिला बघत दुसरीकडे बघत बोलतात....पिहु,ताईंचा स्वभाव आहे......सगळ विराटला सांगायचा‌.......मनाला लावुन घेऊ नकोस‌.....हं

पिहु सुमनकडे बघते....आई,मोठ्या आईंना मी आवडत नाही का......

तशी सुमन पिहु कडे बघते.....अगं तस नाहीये......आणि पिहु ते सगळ्यांनाच बोलतात.....एकेकाच स्वभाव असतो.....सोडून द्यायच आपण.......

हम्म,

विराट तु काही सांगितलं नाही ना‌........

नाही,बोलले........

हह...पिहु अश्या छोट्‌या छोट्या गोष्टी विराटला सांगु नकोस......त्याला किती बाहेरच टेंशन असते.....आणि आपण एकत्र राहतो.... काही गोष्टी सोडुन द्यायच्या असतात....

पिहु शांतच बसते........

..
.
.
.
.दोन -तीन दिवसाने पिहु विराट मानव प्रांजला सोडवायला जातात....गाडीत पिहूचे इंशट्रक्शन चालुच होत्या....प्रांजल तर डोक्यालाच हात लावुन बसली होती........

पिहु,ती स्कूला नाही चालली इतका वेळ पिहूची बडबड ऐकून विराट वैतागतच बोलतो..,

अहो,ती लहान आहे,फस्ट टाईमच अशी बाहेर राहतेय...

अगं दिssमी लहान कूठुन वाटतेय तूला......प्रांजल इरीटेड होतच बोलते.....

प्रांजू तु तुझ डोक चालवु नकोस....... मी सांगते तसच ऐकायच...आणि हा सॅटेर्डे संडे घरी यायच आहे.....

का,

हो अहो,तुम्ही सांगा....

पिहु,तिला सांगायची गरज नाहीये....तू स्वतःतिला घेऊनच घरी येशील..... विराट चिडुनच हसत बोलतो.......

हुहह......

जीजु,अस वाटतं उगाच मुंबईला आलीये........दुस‌रीकडे गेली असते तर बर झालं असते.......हुहुह...

आता काळजी पण करायची नाही का.......

अगं काळजी करणे आणि बंधन घालणे ह्यात जमीन आसमानचा फरक आहे.......काय म्हणे अनओळखी लोकांशी बोलु नको.....मीन्...तिथे काय तुझे का माझे रीलेटिव्ह असणार का
......

अहो,तुम्हाल कस कळत नाही......दादा तुच सांग......

अगं पिहु,अग जगात वावरायच म्हटलं तर थोड स्ट्रांग बनाव लागतं.........प्रांजल समजुत दार आहे......तु टेंशन नको घेऊ......मानव तिला समजून सांगतो......

परत पिहु काहीच बोलत नाही......ती गाडीच्या बाहेर बघते.......शेवटी बहिणीसाठी वेड प्रेम असतेस......एकटी कशी राहणार ....ती ओठ दाबत डोळ्यातलं पाणी आवरते......
विराटला ही जाणवते.......पण त्याला पिहू च ही बोलण पटत नव्हते......स्वतःही घाबरत जगायच आणि दुसरयांनाही घाबरुन टाकत होती.......

मानव कार चालवत होता.....प्रांजल‌ त्याच्याशेजारी बसली होती...मागे पिहू आणि विराट बसले होते.....

त्याने तिचा हात पकडत जवळ ओढलं.......पिहु,माहीत आहे काळजी आहे......पण तिला तिच कळते......कस राहायच आणि तिथे स्फेटी आहे.......मी सिलेक्ट केल्‌यावर काळजीच काहिच कारण नसणार ना.....तो तिचा ला प्रेमाने समजवत कापाळावर किस करतो....

हहं पिहु हातांचा विळखा घालत घट्ट बिलगते.......

हॉस्टेल येते.... प्रांजल पिहुला टाईटं हग करते...माझी वेडी,दी....किती केअर करतेस.....मम्मी आणि तूझ्यात काहीच फरक नाही.......तु जेवढ सांगितल मी सगळ माझ्या मेमेरीत फिट केलं.........प्रांजलचे डोळे भरुन येतात..
...

पिहू तिचे डोळे पुसते.......काही ही प्रॅाब्लेम आला तर मला जीजु ला कॉल कर......तु स्वतः काही हॅन्डल करायाला जाऊ नको....हहह.तिच परत लेक्चर चालु झाल्यावर विराट मानव एकमेकांनाकडे ईरेटेडवाली स्माईल दिली....

पिहु,बाकीच काही राहील तर फोन करून सांग.....हहं ...

पिहु एक लुक देते.....

प्रांजल,टेक केअर मानव तिला हग करत बोलतो.....

------💕-----

(कसा वाटला भाग नक्की कळवा.)

क्रमशः

.