After Married Life - 5 in Marathi Fiction Stories by shraddha gavankar books and stories PDF | लग्नानंतर च आयुष्य.... - 5

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

लग्नानंतर च आयुष्य.... - 5

उद्या १४ फेबुवारी होती सर्व तयारी होतच आली माझ्या वडिलांनी खुप तयारी केली मोठा मंडप टाकला बँड बाजा लावला जेवणा मध्ये पनीर ची भाजी पराठा मसाला भात पापड गुलाब जामून मिरची कट पकोडे आणि आपलं नॉर्मली काकडी कांदा लिंबू आहेर आणले सर्वान साठी तेवढ्यात माझ्या वडिलांना फोन आला.


मुलाचा मोठा भाऊ बोलत होता आम्ही उद्या सकाळी निघतो आम्हाला येण्या साठी २:३० तास लागतो फक्त आणि आमचे कडचे ४०ते ५० लोकं असतील माझे वडील हो म्हणाले त्यांचं थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवुन दिला. तस माझ्या वडिलांनी घरात सर्वाना सांगितलं कारण सर्व एकाच जागी होते. कारण ताईच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमा मध्ये पुर्ण रात्रच गेली १२ वाजले होते झोपायला मला माझ्या मोठ्या ताईने सांगितलं तु लवकर झोप नाहीतर चेहरा खराब दिसेल पण अजुन माझी मेहंदी काढायची बाकी होती कारण ऑफिस मुळे मला वेळच मिळत नव्हता. मग झोपण्या पूर्वी माझ्या आत्याच्या मुलीने काढली थोडी आणि मी झोपले बाकी माझे आई वडील घरातले मोठे सर्व कामात व्यस्त होते. सकाळ झाली आणि माझी आई आमच्या रूम मध्ये आली आणि सांगत होती. पाहुणे निघाले ११ पर्यंत पोहचतील हिची तयारी करा लवकर तस आम्ही सर्व बहिणी उठलो फ्रेश झालो आणि चहा नाश्ता घेतला. सर्वांच्या अंघोळ झाल्या माझ्या मोठ्या ताईच पार्लर च कोर्से झाला त्या मुळे तिने माझा मेकअप करायला घेतला. तेवढ्यात झाल्या मैत्रिणीचे मला फोन आला मी त्यांना घराचा पत्ता दिला आणि सर्व जणी जमल्या माझा मेकअप वेळेत पार पडला. नंतर आम्ही सर्वानी फोटोशूट केला त्याच बरोबर गप्पा झाल्या माझं घर असं पाहुण्यांनी आणि भाऊकी नि गच्चं भरलं आमची भाऊकी खुप मोठी आहे माझ्या वडिलांनी सर्वाना बोलावलं ७० ते ८० लोकं होते भाऊकीचे आणि माझ्या घरचे ३० ४० असतील सर्व रूम फुल झाल्या होत्या. पाहुणे पण पोहचले होते त्यांना रूम दिल्या त्यांचा नाश्ता झाला आणि सर्व मंडपात आले पंडित जी ने तयारी सुरू केली. मंडपात बँड वाजत होता तेवढ्यात मला बोलावलं आणि मी माझ्या मैत्रिणी सोबत गेले खुप साधा मेकअप केला होता. लाल कलर ची पैठणी गळ्यात छान असा नेकलेस मला बांगड्या खुप आवडतात म्हणून हाथ भर हिरव्या कलर च्या बांगड्या आणि त्या मध्ये छान मोत्याचे गोठ घातले कारण ताईच लग्न पण होत ना. अंबाडा घातला त्याला मोगऱ्याचा गजरा लावला.



रूप खुलून दिसत होत मंडप पाहुण्यांनी गच्चं भरलं होत जिकडे नजर गेली तिकडे पाहुणेच होते. मी जसं आले तस बँड वाजायला चालू झाला मला चौरंगा वर बसायला सांगितलं माझं औक्षण केलं मुलाकडच्यांनी पाच बायका होत्या त्यांच्या कडच्या एक एक जण येत होत आणि औक्षण करत होत सर्वात आधी माझ्या मोठ्या जाउने केलं त्या नंतर बाकी बायका आल्या होत्या. त्या नंतर मला साडी बांगडया मेकअप च सामान दिल आणि नंतर मला साडी बदलण्या साठी सांगितलं.आणि नंतर आमच्या दोघांना बोलवून अंगठी चा कार्यक्रम पार पडला जेवण झाले आणि त्या नंतर आमच्या दोघांचा फोटो शूट झाला सर्व कार्यक्रम आनंदात पार पडला आणि पाहुणे गेले निघुन.


साखरपुडा झाला आणि माझं समोरच सर्व आयुष्यच बदलून गेलं. प्रत्येक मुलीचं बदलते पण काहीच चांगलं होते काहीच वाईट लग्ना नंतर तर मुलगी जशी त्यांचीच होऊन जाते मुलींना खूप ऐकून घ्यावं लागते त्यांच्या मनासारखं वागावं लागते त्यांच्या ख़ुशी साठी जगावं लागते.

माझा साखर पुडा झाला आणि दुसऱ्या दिवशी ताईच लग्न होत त्या तयारी मध्ये होते सर्व जण तस मी माझ्या होणाऱ्या मिस्टरांना सांगितलं होत तुम्ही लग्नाला या कारण त्यांच्या पुर्ण परिवाराला आमंत्रण होत ते तयार नव्हते पण माझ्या मुळे आले मी छान तयारी करून त्यांची वाट बघत होते. ते आल्या नंतर दुसऱ्या बाजूने बसले आणि मी दुसरी कडे बसले ताई सोबत राहायचं होत मला पण माझ्या सासरचे माणसं आले होते त्या मुळे मी माझ्या सासू आणि जाऊ सोबत बसले. तेव्हा मला तिथे पहिल्यांदा असं वाटलं हे लोक कसे आहेत एका छोट्या गोष्टीचा तमाशा करताय काय झालं होत. माझ्या वडिलांनी मुला साठी जी रिंग घेतली होती ती थोडी छोटी झाली त्या वरून सासू बोलायला लागली आम्ही कशी तुझ्या साठी बरोबर रिंग आणली आत्ता तुझ्या वडिलांना सांग मोठी करून आणायला त्या वेळेस त्यांच्या बोलण्याची पद्धत जी होती ना ती मला अजिबात आवडली नव्हती असं वाटतं होत किती लालची आहेत हे. आणि माझा स्वभाव असा आहे मला लगेच राग येतो. त्यांच्या बोलण्याची पद्धत बघून मला खुप राग येत होता असं वाटत होत बोलावं आत्ता मी काही बोलणार तेवढ्यात माझ्या वडिलांनी मला स्टेज वर बोलावलं आणि त्याच बरोबर माझ्या मिस्टरांना हि बोलावलं सर्वान समोर अनाऊंसमेंट केली


"माझे वडील सांगत होते हे आमचे नवीन जावई" सर्वांना खुप छान वाटत जोरात टाळ्या वाजवल्या त्या वेळेस माझ्या वडिलांच्या चेहऱ्या वर खुप आनंद होता आणि मला माझ्या सासूने बोललं मी त्यांना नाही सांगितलं.


मी परत माझ्या सासु कडे जाऊन बसले खुप प्रेमाने आई आई ताई ताई करत बोलत होते. खुप गप्पा झाल्या आणि लग्न लागलं ताईच.
चला आपण जेवण करून घेऊ असं मी माझ्या सासूला बोलले आणि आम्ही सर्व जण जेवण करण्या साठी गेलो कारण त्यांना निघायचं होत लगेचच माझे आई वडील दोघे हि त्यांना बोलत होते नवीन संबंध झाला होता तर ओळख करून देत होते दुसऱ्या पाहुण्यांना बोलणं झालं आणि सर्व निघाले तशी माझी इच्छा होती माझ्या मिस्टरांना बोलावं फोटो काढावं पण सर्व मोठे होते त्या मुळे राहील बोलणं सुद्धा झालं नाही

(२ शब्द मनातले :- मुलींना सर्व माहित असते त्या कमजोर नसतात त्यांच्यात खुप सहनशीलता असते अत्याचार फक्त त्या आपल्या वडिलांची इज्जत वाचवण्या साठी सहन करतात पण त्यांनी जर एकदा ठरवलं तर खूप काही करू शकतात माझ्या कडुन पहिली चुकी हीच झाली कि मी लगेच सांगितलं नाही आणि त्यांचं ऐकून घेतलं म्हणून त्यांना पावर मिळाली बोलायची पण कधीच कुठलीच गोष्ट नाही सहन करायची )