kadambari Premaachi Jaadu Part 29 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २९ वा

Featured Books
  • ચતુર

    आकारसदृशप्रज्ञः प्रज्ञयासदृशागमः | आगमैः सदृशारम्भ आरम्भसदृश...

  • ભારતીય સિનેમાનાં અમૂલ્ય રત્ન - 5

    આશા પારેખઃ બોલિવૂડની જ્યુબિલી ગર્લ તો નૂતન અભિનયની મહારાણી૧૯...

  • રાણીની હવેલી - 6

    તે દિવસે મારી જિંદગીમાં પ્રથમ વાર મેં કંઈક આવું વિચિત્ર અને...

  • ચોરોનો ખજાનો - 71

                   જીવડું અને જંગ           રિચાર્ડ અને તેની સાથ...

  • ખજાનો - 88

    "આ બધી સમસ્યાઓનો ઉકેલ તો અંગ્રેજોએ આપણા જહાજ સાથે જ બાળી નાં...

Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २९ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग-२९ वा

-----------------------------------------------------------

गच्चीवर मैफिलीची बैठक व्यवस्था करून झाली ..त्याआधी सर्वांची जेवणे गच्चीवर करायची ,

असे ठरलेले होते , त्यासाठीची गडबड सुरु झाली . मधुरा आणि तिच्या मैत्रिणीनी तयार

केलेले जेवणाचे विविध पद्रार्थ आणायला सुरुवात केली .

त्यांच्या मदतीला अंजलीवाहिनी होत्या .

चौधरीकाका –काकु , यशचे आई आणि बाबा , आजी आणि आजोबा , सुधीरभाऊ हे सगळेजण

गच्चीवर येऊन बसले ...

समोरची सुंदर सजवलेली बैठक , आणि दुसर्या बाजूला , भोजनाची सुरु असलेली तयारी

पाहून मोठी मंडळी खुश होऊन गेली .

बनवलेल्या भोजनाचा खमंग दरवळ घेऊन ..

भूक लागली हो ... !

चला पाने घ्या पटापट ..!

अशी ऑर्डर सुटली.....

आजी म्हणल्या – आधी पुरुष मंडळीचे होऊ दे ,

मग, आपण महिला मंडळ सावकाशीने बसू या.

हे ऐकून ..मधुरा म्हणाली ..

अहो आजी ..आज असे करीत बसलो तर , संगीत मैफिलीला खूपच उशीर होईल ,

मग ,तुम्ही मोठी माणसे म्हणाल ..

आम्ही तर बुवा ..सुस्ताव्लो आहोत , मस्त जेवण झाले.. खूप झोप येते आहे ..

असे करू लागलात तर कसे ?

मधुराचे बोलणे आजोबांना पटले –

ते म्हणाले ..

हे बघा मंडळी , ही मधुरा सांगते आहे ,

त्यात तथ्य आहे बरे का ,

यासाठी माझी सूचना अशी आहे की ..

दोन टेबलावर सगळे जेवण मांडून ठेवावे ..

प्लेटा घेतील एकेकजण, आणि बुफे ..करा सुरु ..

सगळ्यांची जेवणे बोलत बोलत आणि वेळेत होतील .

आजोबांची सूचना ऐकून -अंजलीवाहिनी हसून म्हणाल्या –

काय हो आजोबा – एक गोष्ट दाखवू का बोलून ?

आजोबा म्हणाले – का नाही , जरूर बोल ..

त्याचे काय आहे आजोबा ..

ही मधुरा ..तुमच्या सोबतच तिच्या गावाकडून ..या शहरात आली आहे ,

शिकण्याच्या निमित्ताने हे तर ठीक आहे..

पण..तुम्ही आणि आजी ..दोघे ही तिच्या बाबतीत फारच मायेने आणि प्रेमाने बोलता ,वागता ..

यामागचे काही विशेष कारण आहे ..!

अशी मला शंका नेहमी येत असते ..

आता हेच बघा ना ..

मागे मोनिका आपल्याकडे आली तेव्हा ..जो गोंधळ झाला, त्यादिवशी आपल्या घरात ..मधुरचे असणे ..

हा योगयोग नव्हता ..असे मला आता वाटू लागले आहे ..

नंतर पुन्हा एकदा - गीतांजली आणि तिची आई आलेली असतांना .

ही .मधुरा आली म्हणून बरे झाले “

नाही तर ? काय झाले असते आपले ?

अशी परिस्थिती झाली होती .

आणि मधुराने आपल्याला एक प्रकारे मदतच केली .हे तर मान्य करायलाच पाहिजे आहे.

खरे तर या दोन प्रकारामुळे ..

.मी मधुराची एक प्रकारे fan “ झाले आहे .

त्यामुळे हा आजचा सगळा कार्यक्रम ..चौधरीकाका आणि काकूंनी काही स्पेशल हेतू ठेवून

प्रायोजित केला आहे ..असे मला राहून राहून वाटते आहे.

कारण ..बघा ना तुम्ही आणि करा विचार ..

आज संध्याकाळ पासून इथे जे काही होते आहे , घडते आहे , दिसते आहे ..

यातून काही तरी खूप छान ,सर्वांना आवडणारे घडणार आहे “ असे शुभ-शकून मला होत आहेत .

माझ्या या शंकांचे निरसन कराल का आजी आणि आजोबा ..?

अंजलीवाहिनीचे हे सगळं बोलने ऐकल्यावर -

आता आजी-आजोबा काय सांगतात ? याची उत्सुकता ..सर्वांच्या चेहेर्यावर दिसत होती ..

मधुराच्या मनातील धडधड तिला ऐकू येत होती ..

यश आणि मधुराच्या मैत्रिणी सारेच उत्सुकतेने आजोबांच्याकडे पाहत होते ..

आज मधुरा –बद्दल खूप खास नक्कीच ऐकायला मिळणार ..

आजोबा बोलायला सुरुवात करणार ..तोच ..

खाली गाडी थांबल्याचा आवाज आला ..तसे बोलण्याचे थांबत आजोबा म्हणाले ..

आता आज राहू दे ..पुन्हा सांगेन केव्हा तरी ..

तुम्हाला ऐकुण्याची उत्सुकता आजून काही दिवस तशीच ठेवावी लागणार ..

इंतेजार करो ..

यशचे डझनभर मित्र ..गाण्याच्या मैफिलीसाठीचे सगळी instruments, साऊंड-सिस्टीम ..असे खूप

काही सामान घेऊन आले होते ..

यश त्यांच्या मदतीला खाली गेला ..

सगळ्यांनी मिळून ..वाद्ये आणून ठेवली , साऊंड-सिस्टीम लावून टाकली ..

सामान घेऊन आलेल्या यशच्या मित्रांना आजी म्हणाल्या –

चला रे पोरानो ..

जेवणे आटोपून घेऊ या ..म्हणजे ..गाण्याची मैफिल सुरु होईल ..

जेवणाची चव घेत घेत सगळ्यांच्या आपसात गप्पा सुरु झाल्या ..

चौधरीभाऊ म्हणाले ..

यशचे आई-बाबा ..

बघा आज माझे घर खूप वर्षांनी आनंदाने भरून गेलाय .

कित्येक वर्षांनी ,..आज आम्ही दोघं ..नवरा-बायको ..आमच्याच घराच्या गच्चीवर येऊन बसलोत.

या मधुराने मला त्यादिवशी तिचा व तिच्या मैत्रिणीचा ..”घर मिळेल का आम्हाला ?

तिचा हा प्रोब्लेम सांगितला नसता तर ..आजचा हा आनंद- उत्सव झाला नसता .

यशच्या आजी तुम्हाला सांगतो –

या चौघी मुली आमच्या घरात राहायला काय आल्या ..

आमची सारी निराशा , आमचे एकटेपण ..!

आमच्या सौ.चे आजारपण ..कुठल्याकुठे पळून गेले.

हे ऐकून ..समोरच खुर्चीवर बसून जेवण करीत बसलेल्या आजी म्हणाल्या ..

“आहेच आमची मधुरा ..गुणवान ..

तिचा पायगुण ..तिचा हातगुण ..दोन्ही छान आहेत.

प्लेटमध्ये एकेक पदार्थ घेऊन , चवीने खात खात यशचे मित्र ..म्हणाले ..

अंजलीभाभी ..ये सब तुम्हारा कमाल होगा ..बहोत टेस्टी है हर चीज ..

अंजलीभाभी म्हणाल्या –

नाही रे दोस्तांनो ..मी यातले काही नाही केले ..मदत केलीय थोडी फार .

आज मी फक्त थर्ड अंपायर होते ..किचन मधली ..

आजची किचन टीम .बेस्ट टीम ..तुमच्यासाठी नवीन आहे ..

ऐका ..यातले पदार्थ .कुणी कुणी काय केलेत ते ..

ही माधवी –खानदेशातली ..जळगावच्या जवळची ..तिने हे खानदेशी भरीत बनवले आहे..

ही सारिका नगर कडची – तिला ..भाताचे खूप प्रकार बनवता येतात ..तिने व्हेज – बिर्याणी बनवली आहे ..

ही रुपाली ..उस्मानाबाद जिल्ह्यातली ..तिला सोलापुरी शेंगदाणा चटणी आणि कडक भाकरी

मस्त जमतात ..

ही मधुरा ..विदर्भ –मराठवाडा ..दोन्हीच्या सीमेवरची ..तिने पातोड्या ..आणि तिखटजाळ येसर

बनवलाय ..

आणि तुम्हाला माहितच आहे पोरानो .

.मी तर लोकल ..पुणेरी ..चक्क ..श्रीखंड ..घरी चक्का आणून बनवलेले ..

आणि हा पोळ्यांचा ढीग दिसतोय ना..समोर ..

तो आम्ही सगळ्यांनी मिळून पोळ्या लाटल्या ..भाजल्या ..म्हणून झालाय..

हे सगळ ऐनवेळी करावे लागले ..त्यामुळे पोळ्या बनवणे हेवी वर्क लोड झाला

या यशचे काम असेच .

.मित्र येणार ..ते ही डझनभर ..असे ऐनवेळी ..सांगून

.लावले न आम्हाला कामाला.!

आता मस्त जेवण करा ..पण .सुस्ती येऊ देऊ नका ..

आपल्याला आज एका नव्या गायिकेला ऐकायचे आहे ..!

यशच्या मित्रांना आश्चर्य वाटले ..ते म्हणाले ..

तरी आम्ही आल्यापासून विचार करतोय ..इथे बसलेल्या पब्लिक मध्ये तर कुणी मैफिल

गाणारा सिंगर वाटत नाही ..मग कोण असेल ?

यश म्हणाला ..मला फक्त सांगितले ..संगीत मैफिल आहे..तयारी करून दे ..

बाकी मला देखील काही माहिती नाही आजच्या सिंगर बद्दल.

सर्वांची जेवणे आटोपली , आवरा आवरी करण्यासाठी इतक्या जणी होत्या कि , लगेच आवरणे

झाले ..आणि सगळे समोरच्या गालिच्यावर ..लोडाला टेकून बसले ..

आजोबा म्हणाले ..

यश ..आज तबला साथ तुला करायची आहे, खूप दिवस झालेत ..तुझे तबला वाजवणे ऐकून ..

मागे तंबोरे लावून तुझे दोन मित्र असुदेत ..हार्मोनियम ..स्वतहा सिंगर वाजवेल ..आणि

बदल करावासा वाटलाच तर ..यशचे हे सुधीरभाऊ बसतील हार्मोनियम ..घेऊन साथीला .

आजी म्हणाल्या ..

अंजली ..आजचे साथीदार नवे..गाणारे पण नवीनच हवेत ..

तू सुद्धा म्हण काही छान .ऐकू दे ..तुझा गळा गोड आहे.

यश म्हणाला ..आजोबा ..

ही सिंगर नवी कुठे ? जुनीच तर आहे ..

आजोबा म्हणाले .यश ..थोडा धीर धरशील का ..

सगळी तयारी झाली ..आजोबा म्हणाले ..

रसिक हो . तुमच्या समोर पहिल्यांदा ..ही मधुरा ..आज गाणार आहे..

आणि हो ..ती सुगम-संगीत गाते ..संगीत –विशारद आहे.

तिचे बाबा तिचे संगीत गुरु आहेत..

ये मधुरा – कर सादर तुझी गाणी ..

मधुरा हार्मोनियम घेऊन मधोमध बसली ..तिची नजर सगळीकडे फिरून आली

तिच्या बाजूला ..तबला साथ- तिचा यश ,

तंबोरा लावून बसलेले दोन साथीदार ..

मधुराने मनोमन श्रीगुरूंचे ..तिच्या बाबांचे स्मरण करीत ..

समोर बसलेल्या ..आजी-आजोबा , यशचे आई-बाबा , चौधरीकाका –काकू ,सुधीरभाऊ यांना दोन्ही हात

जुळवत अभिवादन केले .

यशच्या मित्रांकडे .मैत्रिणीकडे आणि अंजलीवाहिनीकडे ..हसून पाहिले ..

आणि एक तिरपा कटाक्ष ..यशकडे टाकीत ..स्मित केले ..

प्रार्थनेचे ..स्वर उमटले ..

हम को मन की शक्ती देना ..!

मधुराचा आवाज तिच्या नावाप्रमाणेच ..मधुर आहे..गोड आहे ..हे सगळ्यांना आनंदित करणारी

गोष्ट होती.

आजी आजोबा ..सोडले तर ..बाकीच्या सर्वांसाठी मधुरा गायिका आहे “ ही गोष्टच नवी होती ..

त्यामुळे ..तिच्या गोड आवाजाने जणू सगळे भारावून गेले ..

प्रार्थना सदर केल्यावर ..मधुराने गीत सुरु केले ..

“जीवनात ही घडी ..अशीच राहू दे ..प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे ...!

सर्वांच्या परिचयाचे हे लोकप्रिय गाणे ..मधुराच्या आवाजात ऐकणे खूप छान वाटणारे आहे “

यश खूप दिवसांनी आज तबला साथ करीत होता ..तरी ..त्याच्या वादनातील सफाई त्याच्या

तबला वादनातील कसबी हाताची कल्पना येत होती ..

मधुर समोर पाहत होती ..सगळ्यांच्या नजरेत तिच्या विषयीचे कौतुक तिला दिसत होते ..

मनातून ती जणू मोहरून जात होती ..

यश म्हणजे चार –चाकी आणि इतर वाहनांचा जादुगार मेकेनिक ..हेच इथे आल्यापासून

मधुरा पहात होती ..

पण ..आजच्या संध्याकाळी ..ती यशची आणि यश तिचा झाला होता ..प्रेमाची कबुली ..

आपण एकमेकांचे आहोत ही भावना ..मधुराच्या गाण्यातून येत होती ..

मधुरा मनोमन म्हणत होती ..आपली दोन मने ..सूर आणि स्वर जुळून आलेत ..

हे आयष्य असेच संगीतमय असू दे..!

लोकप्रिय गाणे संपताच सगळ्यांनी टाळ्या वाजवून मधुरची तारीफ केली ..

असावे घर ते आपुले छान ..हे भावगीत ती म्हणू लागली ..

मन तल्लीन होऊन ती गाऊ लागली ..

यशच्या आई-बाबांना मधुरचे हे लोभस रूप ,गोड गाणे खूप आवडले .

मधुरा म्हणाली ..आता अंजली वाहिनी ..तुम्ही एक गाणे सदर करा ..या ..

अंजलीवाहिनी ..म्हणाल्या ..

मी जे गाणे म्हणणार आहे.. ते कुणाचे ..कुनासाठीचे आहे , जरा अंदाज करा..

आणि त्यांनी एक हिंदी फिल्मी गाणे म्हनायास सुरुवात केली ..सुधीरभाऊ हार्मोनियम घेऊन बसले.

जैसे राधा ने मला जपी शाम की ..

मैने ओढी चुनरिया तेरे नाम की ......!

अंजली वहिनीनी आणखी एक गाणे म्हटले ..

चेहेरे पे ख़ुशी छा जाती है ,आंखो मी सुरूर आ जाता है..

जब तुम मुझे आपणा केहते हो .अपने पे गुरुर आ जाता है..

ही मैफिल पुढे रंगत गेली ..

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचू या पुढच्या भागात –

भाग – ३० वा लवकरच येतो आहे ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------