Your man in Marathi Fiction Stories by Dhanshri Kaje books and stories PDF | आपली माणस

Featured Books
Categories
Share

आपली माणस

"वक्रतुंड महाकाय,
सुर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्नम कुरुमदेव,
सर्वकार्येशु सर्वदा"
एकता कॉलनी...
वेळ सकाळी 8 वाजताची...
शाल्मलीच घर..
शाल्मली आपल्या खोलीत झोपलेली असते. तेवढ्यात शाल्मलीची आई(वेदिका) तिला उठवायला तिच्या खोलीत येते. "शालु... ए.. शालु अग उठतेस न वाजले बघ किती. चल तुझं कॉलेज सुरू होणार आहे न आजपासुन आणि पहिल्या दिवशीच उशीर चल उठ लवकर." शाल्मलीची खोली आवरता आवरता शाल्मलीची आई वेदिका शाल्मलीला उठवते. आणि खोली बाहेर निघुन जाते.
काही वेळानंतर...
शाल्मली पटकन उठते आणि घड्याळाकडे बघत मनाशीच पुटपटू लागते. "बाप... रे आज चांगलाच उशीर झालाय लवकर आवरायला हवं आता." दिवाणावरून उठून खिडकी समोर उभं राहुन परत मनाशीच पुटपुटू लागते.(दार उघडत) "ही, माझी कॉलनी आहे. एकता कॉलनी. आज किती छान वातावरण आहे नयी." शाल्मली सकाळच्या वातावरणाचा आनंद घेत असते तेवढ्यात वेदिका आवाज देते. तेव्हा शाल्मली आवाज ऐकुन लगेच आवरायला खोली बाहेर येते.
शाल्मली एका मध्यम कुटुंबात वाढलेली 23 वर्षीय गोड मुलगी. या कथेची नायिका चला तर मग तिच्याकडूनच ऐकुया तिची कहानी.
शाल्मली(कथेची नायिका). "कोण? मी, शाल्मली सहस्त्रबुद्धे इंशॉर्ट शालु. तुम्ही सुद्धा मला शालु म्हणू शकता ते काय आहे पुढचे काही दिवस आता आपण एकत्रच असणार आहोत न. तर मी शाल्मली या कॉलनीत राहणारी एक साधारण मुलगी अगदी तुमच्या सारखीच. काय बघताय अस? तुम्ही विचार करत असाल या कॉलनीच एकता अस नाव का? तर ह्या कॉलनीत एकता आहे. म्हणजे बघा इथे राहणारी प्रत्येक व्यक्ती एकीने राहते प्रत्येक सण घरचे समारंभ एकत्र साजरी करते अगदी भांडणसुद्धा एकीनेच करते. म्हणून या कॉलनीच नाव एकता आता पुढे या कॉलनीतल्या गमती-जमती समजतीलच तुम्हाला.
काय अजुनही विचारच करताय? कसला हे होय. अच्छा तुम्ही विचार करत असाल ही मागे धामधुम कसली तर आज माझ्या कॉलनीतल्या जोशी काकूंच्या मुलाचं लग्न आहे. मलाही बोलावलं आहे काकूंनी. त्याच काय न कॉलनीच नाव एकता आहेन मग इथे सगळं काही एकीनेच होत. बरं आता मी निघते बरीच काम पडली आहेत. कॉलेज आहे, घरातली काम आहेत, आणि काकूंकडे ही जायचं आहे." एवढं सांगुन शालु निघुन जाते.
एकता कॉलनी...
सकाळची वेळ..
एकता कॉलनीमध्ये लग्नाची धामधूम आहे. जोशी काकुंच घर एकदम सजलेलं असत तसेच घरातल्यांची लग्नाची लगबग सुरू असते. तेवढ्यात जोशी काकूंकडे शाल्मली येते. आणि काकूंना भेटते. "सॉरी, काकु आज उठायला खुप उशीर झाला बघा. बर सांगा माझ्याकडे काय काम आहे दोन दिवसावर आलय न लग्न. मी तुम्हाला काय मदत करू." काकु शालुला सांगतात. "बेटा तु आताच आली आहेस न जरा दम खा." शालु स्माईल करत सांगते. "नाही काकु अहो आपल्या घरच लग्न आहे हे असं दम खात बसुन कस चालेल. सांगा बर मला? बर खुप दिवस झालेत मी एकदा दादाला भेटुन येते. परत लग्नाच्या गडबडीत आमचं भेटणच होणार नाही. बघते तरी काय चालु आहे दादाच." दोघी एकमेकींशी बोलुन निघुन जातात.
शार्दुलची खोली...
शार्दुल आपल्या खोलीत आवरत असतो. तेवढ्यात शालु त्याच्या खोलीत येते. आणि दरवाजा नॉक करते. शार्दुल दरवाजा उघडतो. आणि शालु त्याची जरा मजा घेत त्याच्याशी बोलु लागते. "काय, नवरदेव खुपच बिझी आहात वाटत. कसली घाई एवढी अं." शार्दुल जरा लाजत. "तु आधी आत ये बलिके आणि मला कसली घाई झाली आहे असं तुला वाटतंय अं." खोलीत येत शालु बोलु लागते. "तेच विचारत आहे मी कसली घाई सुरू आहे इतकी? कुठे बाहेर निघाला आहेस? की कुणी वाट बघतंय? अं." किंचित हसुन शार्दुल बोलतो. "अं शालु तुला आज काम नाही का काही? दोन दिवसच राहिलेत न माझ्या लग्नाला अं? तु तर आईला मदत करणार होतीस न. काय झालं त्याच?" आवरता आवरता चेष्टेत शार्दुल शालुशी बोलतो. शालुही त्याच मजेत आपल्या दादाशी बोलते. "हं, मी बघतीये बरं का दादा तयारी सुरू झाल्यापासुन तु खुपच वेगळा वागु लागला आहेस हं. बर सोड ते नाव काय तिच?" शार्दुल मोबाईलमध्ये नंबर बघत असतो. अचानक शालुकडे बघत विचारतो. "कुणाचं नाव? तुझ्या वहिनीच का?" शालु म्हणते. "हो, वहिनीचच हं." दोघही हसु लागतात. शालु भानावर येत शार्दुलला विचारते. "दादु तु खुश आहेस न?" शार्दुल स्माईल करत. "हो, खुप खुश आहे मी. आज माझ्या आयुष्यात अशी मुलगी आलीये जिच्या येण्याने माझं आयुष्यच आनंदुन गेलंय एका भेटीतच तिने सगळ्यांच मन जिंकलं. अजून काय हवंय." दोघजण गप्पा मारत असतात. काही वेळानंतर शार्दुलला आठवत त्याला बाहेर जायचं आहे. "चलो मॅडम, संपले की नाही तुमचे प्रश्न? मला जरा भेटून यायचं आहे.(थोडस थांबत) मित्राला." दोघ हसु लागतात. हसता हसता नाटकी स्वरात शालु म्हणते. "दादु मित्रालाच भेटायला जा. नाही म्हणलं लग्नाला दोनच दिवस राहिले आहेत म्हणून म्हणाले आता वहिनीला लग्नानंतर च भेटायचं हं." मिश्किलपणे हसत शार्दुल बोलतो. "बर आजीबाई. ते बघ तुला आई बोलवत आहे." शालु हसत हसत बोलते. "हो, हं बघते बघते पण तु मात्र लक्षात ठेव हं." दोघ एकमेकांकडे बघत हसतात. आणि शालु जोशी काकूंना भेटायला खोली बाहेर पडते. शालु खोलीतुन निघतच असते तेवड्यात जोशी काकूंचा भाचा नकुलची आणि शालु एकमेकांशी टक्कर होते. आणि दोघ खाली पडतात. शालु खुप चिडते नकुलला ओरडणारच असते तेवढ्यात दोघांची एकमेकांवर नजर पडते दोघ एकमेकांकडे बघतच राहतात.
जोशी काकूंचा हॉल...
नकुल आणि शालु एकटक एकमेकांकडे बघत उभे राहतात. तेवढ्यात शालु चिडुन नकुलशी बोलु लागते. "ए... दिसत नाही का? बघतोस कुठे? चालतोस कुठे? कोण आहेस कोण तु." नकुल भानावर येत शालुशी बोलु लागतो. "मॅडम, मी तर माझ्या रस्त्यानीच जात होतो. मला वाटतंय तुमचा मार्ग आणि नजर चुकत आहे. तुझी नजर कुठे हरवली होती का?" शालु कंबर सरळ करत त्याच्याशी बोलते. "तु काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? हे नाही की मला विचारशील कुठे लागलं तर नाही न? सॉरी म्हणणं तर दूरची गोष्ट साधं हात देउन उठवलं पण नाहीस मला." लक्षात येऊन नकुल लगेच तिची विचारपुस करू लागतो. "सॉरी... सॉरी.. तुझ्याशी बोलण्याच्या नादात तुझी विचारपुस करणच राहुन गेलं. आय एम सो सॉरी.. तुला कुठे लागलं तर नाही न." शालु बोलणारच असते तेवढ्यात शार्दुल येतो. "अरे तुम्ही दोघ? इथे काय करताय?" दोघ शार्दुलकडे बघु लागतात. शार्दुलला बघुन नकुलला खुप आनंद होतो. त्या आनंदातच नकुल शार्दुलची गळा भेट घेत त्याला लग्नाच्या सुभेच्छा देतो. "दादा कसा आहेस? ओह. सगळ्यात आधी हार्टीएस्ट काँग्रॅच्युलेशन्स. मग झाली का सगळी तयारी?" शार्दुल आनंदुन. "तु? कधी आलास तु? आणि कोण कोण आलंय?" आनंदात नकुल शार्दुलशी बोलतो. "म्हणजे काय दादु? दादाच लग्न आहे. त्यात मावशीच्या घरातलं पाहिलं आणि शेवटचं आम्ही सगळेच येणार न आणि त्यातुन आईचा सगळ्यात लाडका भाचा म्हणल्यावर कस मागे राहुत." थोडस हसत शार्दुल नकुलला बोलतो. "हा..हा.. नकुल जर मी विदया मावशीचा लाडका आहे तर तु पण आईचा लाडका आहेस न." दोघ हसु लागतात. मध्येच दोघांचं बोलणं तोडत शालु शार्दुलला विचारते. "दादा? हा तुझा भाऊ आहे दादा? किती फरक आहे तुम्हा दोघांमध्ये. तु इतका शांत आणि हा खुपच विचित्र आहे बाई." हसत शार्दुल शालुला विचारतो. "काय झालं? तुमच्यात भांडण झाल का? दोघही सारखेच आहेत अगदी." शालु किंचित चिडक्या स्वरात बोलते. "दादा मी काही केलं नाही हं हाच आला मध्ये. आणि परत सॉरी ही म्हणाला नाही मला." परत हसुन शार्दुल दोघांना बोलतो. "हा..हा.. शालु अग लग्न कार्यात अश्या गोष्टी होतच असतात. जाऊ दे सोड राग आता आणि दोघ फ्रेंड्स व्हा बरं." दोघ एकदम चिडुन बोलतात. "कोण? आम्ही आणि फ्रेंड्स...शी.." दोघ नाक मुरडुन निघुन जातात शार्दुल मनाशीच स्माईल करतो आणि बाहेर निघुन जातो.