आज शाळेतील ग्यादरींग....�����.. सगळे जमतात..... खेळ सुरू झालेले असतात.... आपली शीतल कबड्डीमध्ये उस्ताद���️� असते....�☝️ कबड्डीच्या टीममध्ये साक्षी सुद्धा असतेच.....� आता ती शांत राहून शीतलला खेळू देईल तरच नवल...�.... चला तर मग बघुया काय आग लावते ती....���
सगळे खेळाडू मैदानावर हजर होतात...... कबड्डी जोरात रंगते..... शीतल ही कबड्डीपटू असल्याने जिकडे - तिकडे..... "शीतल - शीतल....��������" असाच आवाज ऐकू येतो...... त्यामुळे साक्षी आणखीच चिडते..... आणि विरोधी टीमची लीडर साक्षीची चांगली मैत्रीण असल्याने..(साक्षीची मैत्रीण विरोधी टीमची असणे अपेक्षित)... साक्षी मैत्रिणीला सांगून, शीतलला बाहेर ढकलून देण्याचा इशारा करते....��
शितलचा डाव येतो..... ती जाते.....
शीतल : "कबड्डी..... कबड्डी..... कब्डी..... कब्डी...... कब्डी........कब्डी..... कबड्डी.....�"
म्हणत एकीला हात मारणार, तोच साक्षीची मैत्रीण शीतलला दुसऱ्या बाजूने धक्का देते....... शीतल जाऊन खेळाच्या साहित्यावर पडते....... तिथे सगळे साहित्य ठेवले असतात...... त्यातील एक साहित्य तिच्या पायात घुसून ती बेशुद्ध पडते...... पायातून रक्तस्त्राव होतो..... तिला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये अंब्युलन्स रवाना होते.....�
जेव्हा साक्षी आपल्या मैत्रिणीला खुणावत असते.....
त्यावेळी सुनील हे सगळं बघत असतो.... त्यामुळे तो नंतर हा प्रकार मुख्याध्यापिका मॅडम जवळ जाऊन सांगतो.... साक्षीला रस्टिकेट करण्यात येतं......
तिकडे हॉस्पिटलमध्ये शीतल बेशुद्ध अवस्थेत असते..... तिच्या घरच्यांना सांगण्यात येतं.... तिची मामी आणि मामा आलेले असतात....... सुनील तिथे पोहचतो..... मामा - मामिंना बघून लांबच थांबतो.... आणि त्यांच्या गोष्टीवर लक्ष देतो.....
मामी : "आता ही बया पाय तोडून बसलीय..... घरची धुणी - भांडी कोण करणार.... नसेल जमत तर पाठवून द्या तिला तिच्या आईच्या घरी, कल्याणला.....�� तिचं कोण सावडणार.....� माझ्याकडून होतं का...��"
मामा : "आज पर्यंत ती आपल्या मुला - बाळांना सांभाळत होती तेव्हा..�� ती आपली शाळा शिकुन हे सगळं सांभाळू शकते मग तुला काय होतं.... काही दिवस असेल आराम.... बरी झाली की ती स्वतः सगळी कामं करते ना घरातली.....��"
मामी : ".. आम्ही बोललो तर तोंड दिसतय....�"
मामा : "म्हणून तू गपच बस....�"
डॉक्टर येऊन सांगून जातात की, दोन दिवसांनी तिला डिस्चार्ज देण्यात येईल..... तोपर्यंत तिला सगळं करायला इथे एक लेडीज थांबणे गरजेचे असेल..... मामिंचा नकार ऐकुन मामा शीतलच्या मावशीला बोलावून घेतो..... कारण, तिची आई आणि बाबा तिकडे व्यवसायात व्यस्त असतात... आणि त्यांना कळाल की, ते पॅनिक होतील हा विचार करून मामा त्यांना सगळ्या प्रकाराची काहीच कल्पना देत नाही.....☝️
सुनील तिथून निघून जातो.... मात्र त्याला एक कळतं की, ती कल्याणची आहे......☺️ हे समजल्यावर तो खुश असतो....�� कारण, जर काहीही झालं आणि ती त्याच्यापासून दूर गेली..... तर तो तिला शोधू शकेल या विचारात तो घरी परततो.....☺️☺️
इकडे दोन दिवस तिची मावशी तिचं सगळं करते..... डिस्चार्ज होऊन ती घरी येते..... मामीचा तोरा मात्र तसाच...... आता मात्र मावशीला जावं लागणार असतं...... कारण, तिचीही फॅमिली असते.... आता इथून पुढे मात्र तिचे दिवस खूप वाईट होणार..... मामीचा रोजचाच धिंगाणा होऊन जातो..... खरंच कुणीच - कुणाचं नसतं.... एक आठवडा जवळच्या नातेवाईकांकडे राहून बघा सगळं समजून येईल..... असो.... तर, कुठे होतो आपण... Ohhhhhh शीतल घरी आली ना.... मग आता बघूच मामीचा तोरा.....
मामीचा शीतल साठीचा राग, दिवसेंदिवस जास्तच वाढत असतो..... रोज तिचं सगळ त्यांनाच करावं लागतं..... असच एकदा शीतलला वॉश रूम जायचं असतं..... मामी बाहेर बोलत उभी असते.......
शीतल : "मामी.......�� मामी......"
ठोंबरे : "अहो.... जा ना तुमची भाची बोलवतीये..... बघा काय लागतं..."
मामी : "तिच्यामुळे कंटाळले मी..... आता तिच्या मामाना सांगून कल्याणला पाठवून द्यायचं म्हणते.....�"
ठोंबरे : "मामा ऐकेल का तुमचं..... भाचीसाठी जीव जातो मामाचा..... तो कसला जाऊ देतो.....�"
मामी : "बघतेच मी अस कस नाही पाठवत.... एकतर इथून पुढे ती किंवा मी......��"
शीतल : "मामी.....����"
मामी : "आले बया..... नुसती ओरडून कानाचा भुगा करते.....��� येते मी ठोंबरे बाई...."
ठोंबरे : "मी पण जाते बर का..... आताच काही होणार नाही तुमचं.... जा....� भाची चांगलीच सेवा करून घेतेय...."
मामी : "हो ना.....�"
मामी आत जाते...... बघते..... शीतलला मासिक पाळी आलेली असते..... तिची परिस्थिती खूपच वाईट असते..... ती स्वतः उठून जाऊही शकत नाही..... तिचा नाईलाज असतो..... कुठल्याच स्त्रीवर ही वेळ येऊ नये.... मी अस का म्हणते आहे समजेलच......
मामी : "ही बया..... काय केलंस ग ये.... आता सर्व मी करू .....� हो मलाच करावं लागेल ना..... मीच तर आहे तुझी सेविका...... चल.....��"
मामी तिचं सर्व रागा - रागात आवरून देते..... त्यात शीतलच्या पायाला सुद्धा दुखापत होते..... डॉक्टरांनी पायाला पाणी लावू नका..... अस सांगून मामींनी इतके दिवस जाणून ते केले असते...... त्या तिला सगळं आवरून आत आणून, जोरात खाली टाकतात...... तिचे अश्रू अनावर होतात..... ती ढसाढसा रडते..... मामा कामावर गेला असल्याने आणि त्यांची मुलं बाहेर खेळत असल्याने, घरात फक्त मामी आणि शीतलच असते......
मामी : "ही काय करायची गोष्ट आहे का.... तुझं सगळच मी करू.... म्हणजे काय मला काय समजून काय ठेवलं तुझ्या घरच्यांनी.... आजच मी तुझ्या मामाना सांगते एकतर तू नाहीतर मी.... बस.....���"
मामी ताडकन बाहेर पाय आपटत, बडबडत निघून जाते..... शीतलला आज स्वतःची लाज वाटते.... ती रडत - रडतच विचार करत असते......
शीतल : " इतकी परावलंबी ही माझी अवस्था..... की, मी स्वतःच्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावं..... नाही आयुष्यात मला हा क्षण आता पुढे कधीच नकोय..... मी कधीच कुणावर अवलंबून राहायचां विचारही आता करणार नाही..... खूप झालं.... आता मी इथेही राहणार नाही..... मी माझ्या घरी कल्याणला मामांना सोडायला सांगते..... हो... हेच योग्य..... कितीही केलं तरी ते आपल घर आहे..... इथ रहाण्याची आता माझी सहनशक्ती नाहीये.....���"
सायंकाळी मामा घरी येतो..... मामी खूप भांडण करते......
मामी : "आता तुम्ही सांगता..... की मी सांगू..... एकतर ती असेल या घरात नाहीतर, मी..... तसं सांगून टाका..... मला निघायला बर होईल....��"
मामा : "जा निघ आताच....... आली मोठी माझ्या भाचीला हाकलणारी.... काय झालं तिचं केलं... तिला जमत नाही म्हणून केलंस ना..... बरी असली की, तीच गप बसत नाही...... चार दिवस काय झाले तू तमाशे केले...... अग लहान होती तेव्हापासनच ती या घरातली काम करत आलीय.... काय झालं तू तिचं सगळं केलं..... अग एक स्त्री असून तुला तिच्याविषयी इतका राग बघून मला आज वाटतं ना की, काही स्त्रियाच दुसऱ्या स्त्रियांच्या वैरी असतात.... जा निघ माझ्या घरातून..... मी करेल माझ्या भाचीच..... कारण, माझ्या साठी ती माझी लहान परीच आहे.... ����"
मामी आपली बॅग भरून जायला निघतात......
शीतल : "मामा नको ना रे.... थांबव मामीला..... मला तू कल्याणला नेऊन सोड..... स्वतःचा संसार नको मोडू रे.... प्लीज मामा ऐक ना माझं... ���"
मामा : "जाऊ दे ग.... आली तेव्हापासून बघतोय नाटकं.... हवं तेव्हा हिला तूच दिसतेस का!!....? मूर्ख बाई कुठली.....����"
शीतल : "मामा तुला माझी शप्पत......�"
शीतल मामांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेऊन त्याला शप्पत घालते...... मामाचा नाईलाज असतो.....�
मामा : "बर मग आता तू म्हणतेस म्हणून तिला थांबवतो आहे मी..... नाहीतर त्या मूर्ख बाईला कधीच थांबवलं नसतं....��"
मामा जाऊन मामीला घेऊन येतो...... मामी खूप रागात असतात.... म्हणून, मामा स्वयंपाक करून शीतलला जेवायला देतो.....
शीतल : "मामा मला आई - बाबांकडे कल्याणला जायचयं उद्या.... प्लीज मामा आजपर्यंत होते मी.... पण, इथून पुढे नको मला तुझ्या संसारात मिठाचा खडा..... झालं माझं बँडेज ही सुटेल काहीच दिवसांत नंतर तिकडेच मी दहावी करेल......��"
मामी : "कुठल्या तोंडाने थांबवू पोरी तुला.....इतकं केलंस माझ्या घरासाठी पण, आज नाईलाज आहे माझा....जा पोरी सुखी रहा.....���"
दुसऱ्याच दिवशी मामा शीतलला तिच्या घरी कल्याणला आणून सोडून निघून जातो तो, कायमचा.... कारण, त्याला स्वतःची लाज वाटत असते..... इकडे आता शितलचं दहावीचं ते वर्ष...... तिच्या पायाच्या दुखापतीमुळे तिचं अभ्यासाच खूप नुकसान झालं असतं.....�� तो तिला भरून काढायचा असतो..... नववीत ती वर्गात पहिली असते..... दहावीत सुद्धा सत्तर टक्क्यांहून जास्त मार्कांनी तिला पास व्हायचे असते..... म्हणून, ती आता खूप मेहनत घ्यायचे ठरवून अभ्यास करते.... यावेळेस ती कुठल्याच गोष्टीचा विचार न करता अभ्यास करून छ्यांशी टक्के (८६%) घेऊन येते.... सगळे आनंदी असतात... मात्र ती निराश असते... कारण, तिचे टार्गेट ७०-९०% यामध्ये पण, नव्वद च्या जवळ असते.....� ती स्वतःला सावरून, पुढील वाटचालीसाठी तयार होते.......
क्रमशः