Spy story - Viraraje Sardeshmukh_ Journey of a Ranaragini! in Marathi Detective stories by Kavyaa books and stories PDF | गुप्तहेर कथा - विराराजे सरदेशमुख_ प्रवास एका रणरागिणीचा!

The Author
Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

गुप्तहेर कथा - विराराजे सरदेशमुख_ प्रवास एका रणरागिणीचा!

विराराजे सरदेशमुख_ प्रवास एका रणरागिणीचा!


नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या सरदेशमुखांच्या बंगल्यावर आज मात्र भयान शांतता पसरली होती. विक्रांत सरदेशमुख खुर्चीवर बसुन एकटाक कसलासा अल्बम चाळत होते. कदाचित तिच्याचं फोटोंचा. अभया सरदेशमुख तिचा एक लहानपणीचा ड्रेस हातात घेऊन शून्यात नजर लावून बसल्या होत्या. त्यांचे सर्वात धाकटे सुपुत्र , अर्जुन सरदेशमुख बुद्धिबळाचा डाव मांडून तिच्या आठवणीत हरवले होते.
‌ अर्जुन ला बुद्धिबळाची फार आवड. नॅशनल लेवल चेस चॅम्पियन तो. त्याला हरवन म्हणजे महाकठीण काम. पण ती मात्र त्याला अगदी सहज हरवायची. आज तेरा वर्ष झाली तो वाट पाहत होता तिने पुन्हा येऊन त्याला हरवण्याची. ती कालच आली होती परत. पण अर्जुन शी खेळण्यासाठी नाही, ना विक्रांतकडे हट्ट करण्यासाठी, ना ही अभया सरदेशमुखांकडे नवीन नवीन पदार्थांची फरमाईश करून त्यांना सतवण्यासाठी . ती आली ते त्यांची इतक्या वर्षात झुकलेली मान अभिमानाने उंचावी यासाठी. ती आली ते तीच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी. ती आली तिच्या देशाची मान उंचावून.
ती वीराराजे सरदेशमुख !
सरदेशमुखांची ज्येष्ठ कन्या. १३ वर्षापूर्वी फॅमिली सोबत कॉन्टॅक्ट तोडून अचानक गायब झालेली वीरा काल अचानक घरी आली.
तिरंग्यामध्ये लपेटून ! पुन्हा कधीच कोणाला न दिसण्यासाठी ! कदाचित आपल्या मात्या-पित्याचा शेवटचा आशिर्वाद घेण्यासाठी !
२६ फेब्रुवारी १९८३,
सरदेशमुखांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं.
विक्रांतराव व अभयाच्या पोटी एक गोड परी जन्माला आली. सरदेशमुखांच्या घरी खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस आले. डीलिवरी मध्ये अचानक झालेले खूप सारे कॉम्पलिकेशन, येणाऱ्या जीवाची थोडी ही आस डॉक्टरांनी ठेवली न्हवती. पण म्हणतात ना चांगले कर्म आणि देवावर भक्ती असेल तर त्याच फळ देखील आपल्याला मिळतचं ! या आजपर्यंतच्या चांगल्या कर्माच फळ म्हणून की काय , त्यांच्या त्या चिमुकली ने अगदी धैर्याने जन्म घेतला आणि डॉक्टरांची वाणी खोटी ठरवली. विक्रांताच्या मुखातून तिला पाहताच आपसूक शब्द निघले, "My Brave Daughter ! " आणि साहजिकच त्यांनी त्यांच्या पिल्लुला नाव देखील तसच दिलं .... वीराराजे !
विक्रांत सरदेशमुख हे कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये हिस्टरी चे प्रोफेसर. तर अभया सरदेशमुख कोल्हापूर पब्लिक स्कूल मध्ये सायन्स आणि मॅथस् टीचर. दोघांनाही समाज सेवेची पहिल्यापासूनच आवड. साहजिकच समाजसेवा , ऐतिहासिक शिकवण आणि सोबतच विज्ञानाचे धडे या सर्वाचे बाळकडू वीराला लहानपणापासूनच मिळत गेले. खूप लहानपणापासूनच तिला वाचनाची आवड निर्माण झाली होती.
‌ वीरा तिसरीत असेल तेंव्हाचा किस्सा, बाबा तिला नवीन नवीन गोष्टींची, गाण्यांची पुस्तके वाचण्यासाठी आणून देत . एक दिवस बाबांनी तिला असेच एक छान गोष्टींचे चित्रांचे पुस्तक आणून दिले. त्यावर तो म्हणाली, "बाबा हे काय ओ ?
मला नको या गोष्टी ! मला ना शिवाजी महाराजांच्या गोष्टी आवडतात. तुम्ही मला ,त्यांच्या गोष्टींची पुस्तके आणून द्याना ओ आणून !"
इतक्या लहान वयात तिची असणारी आवड पाहून सरदेशमुख दांपत्याला खूप आश्चर्य वाटे.
अभ्यासात वीरा खूप हुशार होती. त्याच बरोबर खेळत देखील ती खूप प्रवीण होती. संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर बाबांकडून एक गोष्ट ऐकायची आणि मगचं अभ्यासाला बसायची. शनिवार ,रविवार आई सोबत छोटे छोटे विज्ञानाचे प्रयोग करायचे आणि रविवार ची संध्याकाळ मौजमजा करत, नवीन गोष्टी शिकुन व्यतीत करायची असा त्यांचा नित्यक्रम चालू होता. आता तिच्यासोबत खेळण्यासाठी छोटा अर्जुन देखील आला होता. अर्जुन तिचा खूप लाडका होता. खूप जीव लावायची ती त्याच्यावर.
हायस्कूल मध्ये गेली तशी वीराला चेस ची खूप आवड निर्माण झाली. तिने हायस्कूल लाईफ मध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात केल्या . ती चेस चॅम्पियन तर होतीच पण त्याच बरोबर ती व्हॉलिबॉल, कराटे , नृत्य कला यामध्ये देखील प्रविण होती. तिच्या वकृत्व कलेचे संपुर्ण कोल्हापुर मध्ये तिचे कौतुक व्हायचे तेंव्हा. बघता बघता हायस्कूल लाईफ संपली. १० वी मध्ये त्यावर्षी बोर्डात ९ वी आली. सरदेशमुख दाम्पत्याला नेहमीच आपल्या कन्या बद्दल कौतुक वाटत असे.

तिच्या करिअर बाबत ती खूप सिरीयस असायची. तिला पोलिस फिल्ड जॉईन करायची होती. घरच्यांचा देखील तिला खूप पाठिंबा होता. रोज सकाळी ५ ला उठून ती पोईखडीच्या डोंगरावर पळायला जात असे. ५-६:३० रनिंग, सूर्यनमस्कार आणि मेडिटेशन करुन ती घरी यायची. पटकन आवरून कॉलेज ला निघून जायची. दुपारी कॉलेज मधून आल्यावर अवांतर वाचन , संध्याकाळी डान्स प्रॅक्टिस. आई शाळेतून यायच्या आधी जेवणाची तयारी करून ठेवायची ती. झोपण्याआधी अर्जुन सोबत चेस चा एक डाव अस तीच रूटीन होत . १२ वी सायन्स चांगल्या मार्कस ने क्लिअर झाली आणि तिने तिच्या आवडत्या विषयात म्हणजे कॉम्प्युटर फील्ड मध्ये एडमिशन घेतलं. तीच रोजचं रूटीन आणि मन लावून कॉम्प्युटर स्टडी चालूच होता. बघता बघता BE computer केल तिने आणि सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती तिची. दिवस सरत होते, सरदेशमुखांची वीरा दिवसेंदिवस वीर होत होती. समाजसेवा , समाज प्रबोधन आणि मुलींमध्ये सेल्फ डिफेन्स ची जागरूकता या सर्व गोष्टी चालूच होत्या. १८ फेब्रुवारी २००७, एक्सरसाईज करून आल्यानंतर सवयीप्रमाणे वीरा न्यूज पाहत होती. पण आजचा दिवस खूपच वेगळा होता. समोरची न्यूज पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला . एकीकडे काळजी आणि एकीकडे खूपच राग दोन्हींचा मिलाप तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. बातमीच तशी होती. त्या मध्यरात्री समझौता एक्स्प्रेस वर टेररिस्ट अटॅक झाला होता . २ करेजेस मध्ये बॉम्ब सेत केले गेले होते. या हल्ल्यामध्ये ७० लोकांनी आपले प्राण गमावले होते आणि खूप सारे लोक जखमी झाले होते.
लहानपापासूनच देशाभिमान असणाऱ्या वीराला या गोष्टींचा खूप त्रास झाला. खूप राग आला होता तिला लोकांच्या या अशा मानसिकतेचा . ती तशीच उठली आणि जायला निघाली.
" आई मे येते ग जरा" वीरा
" वीरा अग नाश्ता नाही केलास ग बाळा" अभया
" आज नको आई मी आल्यावर जेवून च घेईन, काळजी नको करू"
असे म्हणून वीरा निघून गेली .आज तिची सायकल काही केल्या स्टडी सेंटर कडे वळायला तयार न्हवती. ती थेट रंकाळ्या वर गेली. तिची हक्काची जागा. जेंव्हा कधी तीच मन अशांत असायचं, किंवा अगदी जेंव्हा ती खूप खुश असायची तेंव्हा ती इथे यायची. या जागेवर तिला एक वेगळीच शांता जाणवायची. आज ही ती अगदी दुपार होईपर्यंत बसली. मन थोड शांत झालं तशी ती जायला निघाली. घरी पोहोचली तेंव्हा बाबा कॉलेज मधून आले होते. तिचा चेहरा पाहताच समजून गेले की काय झालं आहे . त्यांनी स्वतः जेवणाचे ताट वाढले आणि तिच्या समोर जाऊन बसले.
" वीरा जेवून घेतेस ना ?"
" बाबा मी खाऊन आले बाहेरून , तुम्ही जेवला का?"
" माझ्या परी सोबतच जेवायचं असा विचार करून थांबलो होतो. आता काय तू बाहेरून खाऊन आली आहेस तर मग झोपतो मी".
" बाबा , काय हो , कास काय समजत तुम्हाला सगळं?"
" हम भी वीराराजे के बाप है!"
तस ती हसायला लागली ," बाबा, हे फिल्मी वागणं तुम्हाला शोभत नाही हा !"
तसे विक्रांत राव हसले आणि एक एक घास भरवायला सुरुवात केली.
" बाबा, कसे काय लोक असे अविचारी वागु शकतात?"
" वीरा का , कसे , कशासाठी या प्रश्नांची उत्तरं नाहीत आपल्याकडे. हो पण एका प्रश्नाचं उत्तर नक्की आहे , या अशा मानसिकतेला आपण थांबवू शकतो! तुमच्या या नवीन पिढीने मनात आणलं तर ते देशाचं भविष्य घडू शकतं ."
" नक्कीच बाबा, खर आहे तुझ. मे तुला शब्द देते की माझ आयुष्य माझ्या देशासाठी अर्पण करीन."
" I'm proud of you beta".
असेच काही महिने निघून गेले त्या इन्सिडेन्स नंतर. आज वीराची सीबीआय ची इंटरव्ह्यू होती. written exam crack करून ती इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचली होती. खूप मनापासून मेहनत घेतली होती तिने या इंटरव्ह्यू साठी. आईसोबत ती इंटरव्ह्यू करिता मुंबई ला आलेली. इंटरव्ह्यू खूप छान गेली. सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी चलाखीने तिने दिली होती. विश्वास होता तिला की ती ही इंटरव्ह्यू नक्की crack करेल आणि रिझल्ट पोसिटिव च येतील.
रिझल्ट चा दिवस उजाडला आणि झाले काही वेगळचं. वीरा एक्झाम मधे फैल झाली होती. खूप खिन्न झाली होती. पण तिने हर मानली नाही. लगेच चं कपडे change केले आणि जायला निघाली.


" अग वीर कुठे चालली आहेस तू आत्ता?" अर्जुन


" ब्रो , अरे आता पुन्हा तयारी करायला हवी ना. यावेळी तरी मला क्लिअर व्हायचं आहे . स्टडी सेंटर ला चाललेय. "
" वीर अग आज नको, तू नाराज आहेस. आज आमच्यासोबत थांब. " अर्जुन
" अर्जुन, मी नाराज आहे पण हरली नाही. वेळ माणसाला एकदाच मिळते आणि ती मी वाया नाही घालवू शकत. चल बाय , संध्याकाळी भेटू."
अर्जुन ने काही बोलण्याआधी चं ती निघून गेली सुद्धा. विक्रांत मात्र मागे उभे राहून आपल्या मुलीच्या धैर्याकडे कौतुकाने पाहत होते. अभयाला सुद्धा आपल्या मुलीचा अभिमान वाटत होता.
वीरा स्टडी सेंटर ला पोहोचली. तिचे नीट लक्ष लागत नव्हते स्टडी मध्ये. असे कसे झाले, मी तर सर्व ansers व्यवस्थित दिले होते. ती विचार करत होती इतक्यात तिला तिच्या टेबल वर एक लेटर ठेवलेलं दिसले. तिने पाहिले तर त्यावर तिचं नाव लिहिलेलं होत..... To, Miss Veeraraje Sardeshmuk.
तिने ते लेटर ओपन करून पाहिले.
" Miss Veeraraje,
Dont get upset for not getting selected. seems god has some others plan for you! meet us alone at adress given below if you really want to do something for your country . Sharp at 7 pm.
- Your well wisher."
लेटर वाचून काही क्षण वीरा गोंधळून गेली. जाऊ की नको या संभ्रमात शेवटी तिने त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. तशीच उठून घरी गेली. बाबा समोर दिसताच ती म्हणाली, " बाबा, मी आज संध्याकाळी मैत्रिणींसोबत बाहेर जाणार आहे. जाऊ ना?"
" अग विचारतेस काय? थोडी relax होऊन ये परी."
" हो बाबा, thank you बाबा."
" हो पण वेळेत घरी ये जेवायला."
" नक्कीच" अस म्हणून ती आवरायला निघून गेली. Sharp ६:३० वाजता ती आवरून बाहेर पडली . कोल्हापूर चित्रनगरीच्या मागे असणाऱ्या मोकळ्या जागेत त्यांनी तिला भेटायला बोलावलं होत.

विरा तिथे पोहोचली तेंव्हा तिथे एक कार उभी होती. ती कार च्या जवळ गेली आणि तिने आजूबाजूचा अंदाज घेतला. १५ मिनिट झाले तरी कार मधून कोण बाहेर येईना म्हणून ती थोडी अस्वस्थ झाली. ती जायला निघणार तेवढ्यात गाडीचा डोअर उघडला. त्यातून एक लेडी आणि पुरुष बाहेर उतरले. त्या लेडी ने अंगावर साधा चुडीदार घातला होता, केसांना खूप तेल लावून वेणी घातली होती. दिसण्यावरून तर ती खूप गौंडळ वाटत होती. तिच्या सोबत जो पुरुष होता त्याने सुद्धा एक सैल असलेला शर्ट आणि त्यावर ढगळी पँट घातली होती. तिच्या मनाला पटत नव्हते ते की ते लेटर या लोकांनी दिलं असेल. ती तशीच जायला निघाली.
' मीस सरदेशमुख ' त्या लेडी ने हाक मारली तशी वीरा मागे ओळली आणि आश्चर्याने बघु लागली.
"अव वीरा मॅडम , आम्हीच बोलविल्याल तुमासणी इथं.तुम्ही तर बिन भेटताच चाल्लासा." ती लेडी म्हणाली.
" काय, पण हे कस शक्य हाय? I mean तुमच्याकडे बघून अस वाटत नाही, तुमची भाषा...."
" अव मॅडम , आता कोल्हापूरची भाषा कोल्हापुरात बोलायची नाही तर कंची बोलायची ओ? " तो पुरुष म्हणाला.
" हे बघा जर तुम्ही माझी मस्करी करण्यासाठी बोलावलं असेल तर खूप महागात पडेल ते तुम्हाला " वीरा रागात म्हणाली.
" महागात म्हणजे? धमकी देतासा वय? काय करणार हायसा तुमी अमासनी? " पुरुष
" हे बघा..." वीरा बोलत असतानाच तिच्या लक्षात आल की तिच्या मागून कोणीतरी तिच्यावर हल्ला करतय. तस तिने पटकन त्या माणसाचा हात पकडुन त्याला जमिनीवर पाडले.
" well done miss Veera" , तो जमिनीवर पडलेला इसम म्हणाला.
वीरा तर पूर्ण गोंधळून गेली होती. तिला काय बोलावे ,काय react व्हावे काही सुचेना.
त्या व्यक्तीने तिला उठण्या करिता हाथ दिला व त्याने आपले आयडेंटिटी कार्ड दाखवले.
धैर्यशील भोसले,एस पी ,सीबीआय, मुंबई ब्रांच.
" Hello veeraraje Sardeshmukh ! nice to meet you! " meet my colleages , ASP Mr jivay patil and PI Mrs kranti khare."
" hello miss veera! '" ते दोघेही म्हणाले.
" हॅलो सर, सॉरी म्हणजे ते....!" वीरा स्वतःला सावरत कशी बशी बोलत होती .
" calm down Veeraraje, आपण गाडी मध्ये बसून बोलूया म्हणजे सविस्तर बोलता येईल." धैर्यशील.
" हो सर , चालेल" वीरा म्हणाली.,
क्रांती , धैर्यशील आणि वीरा तिघे ही गाडीत बसले आणि विजय पाटील आजूबाजूला लक्ष ठेवत बाहेरच उभा होता.
मॅटर काहीतरी वेगळाच आहे आणि तितकाच गंभीर आहे हे वीराच्या लक्षात आल होत.
एसपी धैर्यशील यांनी वीराला पाण्याची बॉटल ऑफर केली. थोड पाणी पिऊन ती आता थोडी relax झाली होती. तस धैर्यशील नी तिच्याशी बोलायला सुरुवात केली.
" वीरा तुझा सीबीआय एक्झाम मधील all ओव्हर परफॉरमन्स खूपच चांगला आहे .खूप चलाखीने तू सगळ्या गोष्टी हतळतेस हे माझ्या लक्षात आलं आहे. ."
"thank you sir! पण मग तरीही माझ सिलेक्शन होऊ शकल नाही आणि आज तुम्ही असे इथे मला भेटायला बोलावलं. I m bit confused."
"I can understand Veera. वीरा कस असत ना , पोलिस खातं किंवा कोणतही खातं असुदे , देशाची सुरक्षा व्यवस्था ही फक्त या खात्यातील लोकांसमोर youth icon म्हणून काम करणाऱ्या ऑफिसर्स मूळे मजबूत राहते हा एक भ्रम आहे . ही व्यवस्था सुरक्षित वा मजबूत ठेवण्यासाठी काही लोक दूनियेसमोर न येता काम करत असतात. त्यांची आपल्या कामासाठी कोणतही क्रेडिट मिळावं अशी अपेक्षा नसते. आणि अशा निस्वार्थ भावना असणारे लोक खूपच क्वचित सापडतात. त्यातच तू बसतेस अस आम्हाला वाटत." धैर्यशील
" Sir u mean गुप्तहेर?" वीरा
" absolutely right Veera . फेब्रुवारी मधील समझौता एक्सप्रेस वरच्या टेररिस्ट अटॅक नंतर देशात सुरक्षा व्यवस्थेवर खूप सारे प्रश्न निर्माण होत आहेत . पुन्हा असे काही अघटीत घडेल याची खात्री निर्माण झाली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, त्यामुळे आपल्या मुंबई वर , किंबहुना महाराष्ट्रावर खूप मोठं संकट येण्याची चाहूल लागली आहे. " धैर्यशील.
" आतंकवादी मनोवृत्तीचा मला नेहमीच तिरस्कार आहे सर. पण मला अजूनही कळत नाही आहे की मी यामध्ये तुमची कशी मदत करू शकेन." वीरा आता धाडसाने आणि जिज्ञासू वृत्तीने विचारत होती.
" वीरा मी तुला सर्वच प्लॅन इथेच सांगू नाही शकणार . काही टेररिस्ट महाराष्ट्र मध्ये आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली आहे . त्यांना बाहेर काढण्याकरिता एका चपळ आणि बुद्धिमान मुलीची आम्हाला गरज आहे. मी तुला हे काम ऑफर करतो आहे. तू नीट विचार करून मला २ दिवसात कळव .मी वाट पाहीन ."
" सर , पण मी जरी तयार झाले तरी मे इथून कशी बाहेर पडणार ? I mean आई बाबांना मी काय सांगेन?" वीरा
" त्याची व्यवस्था मी केली आहे. तू हो म्हटलीस की आपण पुढची बातचीत करू." धैर्यशील
तिला त्यांच्या सोबत बोलत असताना धैर्यशील व क्रांती दोघांच्याही डोळ्यात तीच्याबद्दलचा विश्र्वास स्पष्ट जाणवत होता.
स्वतःबद्दल खूप अभिमान वाटला तिला.
" मी ready आहे सर" कशाचाही विलंब न लावता ती म्हणाली. कोल्हापूरची रणरागिणी ती शेवटी! देशप्रेम रक्तात भिनलेलं.
" very good! हीच अपेक्षा होती माझी तुझ्याकडून. हे पुण्याच्या एक क्लास चे स्कॉलरशिप लेटर." धैर्यशील नी तिच्या हातात एक एन्वेलोप दिला आणि ते म्हणाले.
" घरी काय सांगायचे हे लक्षात आलेच असेल तुझ्या."
" हो सर" वीरा.
" आज इथे बोलण्यात आलेला एकही शब्द या गाडीच्या बाहेर जाता कामा नये. बरोबर ७ दिवसांनी म्हणजे नेक्स्ट Sunday तु पुण्याला येशील. तिथून तुला आम्ही मुंबईला नेऊ. तुझ्या राहण्याची सोय केलेली आहे." धैर्यशील
" नो प्रोब्लेम सर . पण सर बाबा सोडायला येतील" वीरा टेन्शन मध्ये म्हणाली.
" don't worry about that . we will manage everything Miss Veera."
" ok sir!" वीरा.
" वीराराजे , आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." धैर्य व क्रांती दोघेही म्हणाले.
" thank you sir"
तिघेही गाडीतून बाहेर पडले आणि वीरा जायला निघाली.
तेवढ्यात धैर्यशील ने तिला पुन्हा आवाज दिला
" बाईसाहेब, अव ते तांबडा पांढरा लई भारी मिळतूय नव तुमच्या कोल्हापुरात?".
" व्हय , तुमासनी खायचा हाय काय?" वीरा म्हणाली तस त्या तिघांच्या चेहऱ्यावर एक वेगळच समाधान पसरल .
" आता आलुयच तर खाऊन जाऊया म्हणतोय. सांगशीला काय अमासनी कुठ चांगला मिळल त्यो?" विजय म्हणाला
" या माझ्या मागणं, दावते तूमासनी" अस म्हणून वीरा ने तिची स्कूटी start केली. ते तिघेही तिच्या मागून निघाले .
मंगळवार पेठेत हॉटेल महादेव जवळ पोचल्या नंतर वीराने गाडी थांबवली. त्यांची कार ही तिच्या मागे थांबली.
हिथ खाऊन घ्या पावनं! आवडल तूमासनी आमच्या कोल्हापूरच जेवण" वीरा
" धन्यवाद ताईसाहेब " विजय म्हणाला ट्स " अतिथी देवो भव! " असं म्हणून वीराने हलकीशी smile दिली व ती तिथून निघून गेली.
घरी आई बाबा वाट पहात होते. वीरा खूप खुश होती. तस पुढे काय होईल याच टेन्शन देखील आल होत तिला.
घरी पोचताच तिने आईला हाक मारली,
" आई अग खूप भूक लागलीय ग. चल ना जेवूया. काय बनवलस आज? sorry तुला आज मी काहीच मदत केली नाही ना" वीरा
" अग हो हो! एका दमात किती बोलशील? शांत बस एके ठिकाणी आणि पाणी पी थोड" अर्जुन
" काय रे तू! मला भूक लागलेय आणि तू चेष्टा करतोस" वीरा
" अग आज बाबांनी बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन बनवलाय." अर्जुन
" आज अचानक? काय स्पेशल बाबा?" वीरा
" आज माझ्या पिल्लुचा मूड ठीक न्हवता मग म्हणल खुश करूया. आता वीराराजेना खुश करायचं म्हणजे एकच मार्ग!" बाबा
" झणझणीत तांबडा - पांढरा !!" आई आणि अर्जुन दोघेही एकदम म्हणले तशी वीरा खूप खुश झाली आणि आवरायला निघून गेली. चौघे त्यांच्या आवडीच्या धाब्यावर जेवायला गेले. मौज मजा करत जेवून घरी आले व झोपी गेले.
वीराला मात्र आज काही केल्या झोप येईना पुढं काय आयुष्य असेल याच विचारात ती बराच वेळ जागी होती.रात्री खूप उशिरा तिला झोप लागली. पण सकाळी मात्र अगदी नेहमीच्या वेळेत उठून तिने तिचा दिनक्रम चालू केला.
" ये आई आज मी बनवते नाश्ता बाबांसाठी" वीरा
" अरे वा! म्हणजे आज खूप दिवसांनी चमचमीत खायला मिळणार तर!" विक्रांत राव खुश होऊन म्हणाले.
वीरा तयारीला लागली आणि नाष्ट्या साठी तिने मस्त वडापाव चा बेत केला. आणि सोबतीला बाबांचा फेवरेट आल्ल्याचा वाफळता चहा!
सर्वांनीच खूप कौतुक केलं तीच . आज Sunday होता सर्व घरातच होते. दुपारी वेळ बघून वीरा बाबांना भेटायला गेली .
" बाबा थोड बोलायचं होत" ती घाबरतच म्हणाली.
" बोल ना वीरा . इतक्या टेन्शन मध्ये का आहेस?" बाबा
" बाबा ते..." असं म्हणत तिने तो एन्वेलोप बाबांच्या हातात ठेवलं
विक्रांतनी ते एन्वेलोप उघडून स्कॉलरशिप लेटर वाचलं तसे ते खुश झाले.
" वीरा बेटा अग हा तर पुण्यातील नामवंत कोचिंग क्लास आहे! आणि ते स्वतः तुला बोलावत आहेत! आणि तू हे असं तोंड पडून सांगतेय?" विक्रांत राव
" बाबा तुम्हाला सगळ्यांना सोडून मला पुण्याला जावं लागेल" वीरा.
" अग वीरा बाळ कुछ पाने केलिय कुछ खोना पडता है ! तू काही कायमची आम्हाला सोडून नाही चाललीस ना!" विक्रांत राव असे म्हंटले तस वीराच्या डोळ्यात चटकन पाणी आल. बाबांनी तिला जवळ घेतल आणि म्हणाले " माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बेटा" .
" थॅन्क्स बाबा"
" केंव्हा निघायचं आहे सांग मला? तुझ्यासाठी खरेदी सुद्धा करायला लागेल ना? " बाबा
" बाबा पुढच्या Sunday ला निघायला लागेल" वीरा
" अरे वा! मग आजच जाऊ आपण शॉपिंग ला . तुला काय हवं त्याची लिस्ट काढून ठेव."
" बाबा अहो काही नको मला, सगळं आहे माझ्याकडे. मी तिकडे जाण्याआधी थोडा स्टडी करते " वीरा.
"ठीक आहे बेटा. मी पाहतो काय ते " विक्रांत
बराच वेळ बोलून मग वीरा स्टडी साठी निघून गेली. शिवाजी महाराजांची सर्व पुस्तके तिने बाहेर काढली आणि स्टडी चालू केला . त्याचबरोबर तिने नेट वरून महाराष्ट्राची जिओग्रफिकल इन्फॉर्मेशन काढून स्टडी सुरू केला.
वीरा जाणार म्हणून तिचे खूप लाड सुरू होते. ती सुद्धा आई कडे रोज नवनवीन डिमांड करत होती शनिवारी दुपारी बाबा कॉलेज मधून आले. त्यांनी वीराला हाक मारली. वीरा बाहेर येऊन बघते तर काय त्यांच्या हातात एक छान ट्रॅव्हल बॅग ,एक सॅक आणि तिच्यासाठी सामान होते.
" बाबा, अहो काय हे सगळं? कशाला आनलत एवढं? " वीरा
" आता आमच्या कन्येला वेळ नाही शॉपिंग साठी , मग म्हणल आपणच खरेदी करू. नवीन शहरात कुठे फिरशिल एकटीच तू."
वीराचे डोळे भरून आले.
बघता बघता रविवार उजाडला व ती पुण्याला निघाली तिघेही तिला सोडण्यासाठी गेले. class मध्ये धैर्यशील ने आधीच instructions दिल्या होत्या. त्यामुळं तिथं काहीच अडचण नाही आली. क्लास कडून च तिला एक रूम देण्यात आली .
आई बाबा अर्जुन समाधानाने घरी परतले.
दोनच दिवसात धैर्याने वीराला मुंबई ला शिफ्ट केले. तो स्वतः जाताना तिच्या arrangements कडे लक्ष देत होता .काळजी घेत होता. मुंबई मध्ये वीराला राहण्यासाठी बोरिवली ला एक छोटा फ्लॅट दिला. तिथून रोज तिला कुर्ल्याला यावं लागेल असं सांगितलं. आता तिच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून वीरा कुर्ल्याला दिलेल्या अॅड्रस वर पोहोचली. एक बंद पडलेली खूप जुनी बिल्डिंग होती ती. नेमके कुठे जायचं हे तिच्या लक्षात येईना. बाहेर एक welding man काम करत बसला होता. ती त्याच्या जवळ गेली व धैर्याने सांगितलेल्या कोड वर्ड प्रमाणे त्याला म्हणली ," यहाँ पे हमीद लेडीज टेलर कहा मिलेगा?"
" क्यू मॅडम? क्या काम है"
" डिझायनर सूट सिलवाना था" वीरा
तो sure झाला तस त्याने तिला खूनवल .." आयिये मेरे साथ".
वीरा त्याच्या मागोमाग गेली . ते बेसमेंट ला पोहोचले .एका बंद पडलेल्या दुकानाच शटर त्याने उघडल आणि बरच आत ते दोघे चालत गेले. वाटेत २ असेच शटर लागले . त्यानंतर पुढं एक मेटल डोर होत , त्याने त्या दरवाजाच्या साईड ला असणाऱ्या मशीन वर आपले फिंगर आणि ratina स्कॅन केलं तस door open झाल.
आतला नजारा पाहून वीरा खूप शॉक झाली.
पूर्ण अद्यावत अशी कॉम्पुटर ल्याब, जिम् हे सगळं होत तिथे. तो इसम वीराला घेऊन आत आला तसे सगळे उठून उभे राहिले. त्याला good morning म्हणत होते. आत्ता तिच्या लक्षात यायला लागलं होत की आपल्याला सुद्धा हे असच राहावं लागणार आहे.
तो तिला आत एका केबिन मध्ये घेऊन गेला. आता already धैर्यशील येऊन थांबला होता.
" good morning sir!" वीरा
"good morning miss Veeraraje!" meet commissioner Mr शेखावत , ATS ( Anti terrorist squad)..."
" hello sir!" Veera
" hello miss Veera, please have a seat" Mr शेखावत.
" thank you sir"
"धैर्यशील, आजपासून मी हिच्या ट्रेनिंग ची जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय."

"मॅक्स २ महिन्यांत मला मिस विरा मिशन साठी तयार पाहिजेत. Got it? शेखावत सर
"Yes Sir I'll give my best to train her" धैर्यशील
"Miss Veera, all the best for your training. You may leave now" शेखावत सर
"Thank you sir"
धैर्यशील आणि विरा बाहेर आले. धैर्य ने तिचे फिंगेर आणि ratina स्कॅन करून घेण्यासाठी ऑर्डर्स दिल्या. त्याच बरोबर तिला एक swiping card दिले. सोबतच एक मोबाईल आणि वॉच दिले ज्यामध्ये ट्रॅकर लावला होता. आता तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जाणारं होत. तिच्या चेहऱ्यवरचे टेन्शन स्पष्ट दिसत होतं.
"वीरा उद्यापासून आपण ट्रेनिंग सुरू करू. शार्प ४.४४ वाजता मैदानावर भेटू. "
"ठीक आहे सर"
तिला थोडे रिलॅक्स करण्यासाठी क्रांती तिला दुपारी लंच करिता बाहेर घेऊन गेली. येता येता त्यांनी उद्यापासून जे काही लागणार त्याची शॉपिंग केली.
दुसऱ्या दिवसापासून ट्रेनिंग सुरू झाले. ५-७ फिजिकल ट्रेनिंग झाले. त्यानंतर आवरून वीरा पुन्हा ऑफिस मध्ये पोहोचली. धैर्यने तिला एका स्टडी रूम मध्ये नेले व बोलू लागला.
"वीरा, गुप्तहेर आणि आपली जमीन यांचं खुप जुनं नातं आहे. अगदी महाभारताच्या काळापासून गुपतहेरांच्या कार्याला एक विशेष महत्त्व आहे.मला सांग, तुझ्या नजरेसमोर कोणाचे नाव किंवा प्रतिमा तरळते जेव्हा मी गुपतहेर या विषयावर बोलतो?"
" बहिर्जी नाईक सर! गुप्तहेर म्हंटल की माझ्यासमोर बहिर्जी नाईक यांचं नाव सर्वात आधी येतं" वीरा
"आय एम इंप्रेसड! मला तुझा अभ्यास ऐकायला आवडेल"
" नक्कीच सर! बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या गुपतहेर खात्याचे प्रमुख. त्यांच्या खात्यात जवळ जवळ ३-४ हजार गुप्तहेर होते. चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट असा नियम बहिर्जी यांनी ठेवला होता. त्यांचं जाळं राज्याच्या कानकोपऱ्यांतून पसरलं होतं. त्यांची एकमेकांना संदेश देण्याची किंवा सावध करण्याची एक वेगळी भाषा होती. ज्यामध्ये पक्षांचे, वाऱ्यांचे आवाज यांचा समावेश होता. महाराजांच्या प्रत्येक यशामध्ये बहिर्जी नाईकांचा समान वाटा होता असं म्हणल तर वावगं ठरणार नाही. फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, अश्या वेगवेगळ्या रूपात ते वावरत असत. महाराज कोणत्याही ठिकाणी जाणारं असतील तर त्या ठिकाणची पूर्ण माहिती ते महाराजांना २ दिवस आधीच ते देत असत. महाराजांच्या जीवाला धोका असल्यास बहिर्जी तातडीने त्यांना कळवत असत. शत्रु मध्ये काही चुकीची अफवा किंवा चुकीची माहिती पसरवायची असल्यास बहिर्जी अगदी शिताफीने ती पसरवत असत. असे म्हणतात की शिवाजी महाराजांच्या शिवाय त्यांना दरबारात कोणीही ओळखू शकत नव्हते. " वीराने अगदी विश्वासाने तिचा अभ्यास सांगितला.
" Very good वीरा! त्यांच्या कारकिर्दीत त्यांना सुरतचा एक ब्रिटिश वखारी सोडल्यास कोणीही ओळखू शकले नाही. अगदी त्यांचा मृत्यु कसा झाला हे देखील अजुन गूढच आहे. वीरा, आपल्याला देखील बहिर्जी नाईकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करावे लागेल. गुप्तहेर यांचं आयुष्य असच असतं. त्यांना कोणत्याही गोष्टीचं ग्लॅमर नसतं. ते प्रत्यक्ष लढाई मध्ये नसतात. लोकांना त्यांचा पराक्रम माहीत नसतो. सेना ही फक्त लढाई मध्ये लढते पण एक गुप्तहेर मात्र सतात लढत असतो. देशाची स्थिती युद्धाची आहे की शांत आहे याचा विचार करून चालत नाही." धैर्य सांगत होता.
वीराच्या मनात त्याचं बोलणं ऐकून खुप अभिमान दाटुन आला होता. हे काम आपण काही केल्या पूर्ण करायचचं असा तिने ठाम निश्चय केला.
वीराचे ट्रेनिंग अगदी व्यव्थितपणे चालू होते. रोज घरी एखादा फोन असायचा त्यामुळे घरी देखील शंका आली नाही. बघता बघता २ महिने सरले. या काळात धैर्यने तिचे बौद्धिक व शारिरीक दोन्ही ट्रेनिंग अगदी शिताफीने करून घेतले. शेखावत सर देखील खुष होते तिच्या परफॉर्मन्सवर.
वेगवेगळी पुस्तके, वेगवेगळ्या देशातील प्रसिद्ध गुपतहेरांचा अभ्यास, अभिनय व नृत्य कलेकडे विशेष लक्ष तसेच रायगड, सिंहगड आणि शेवटी कळसूबाई शिखरची चढाई तिने खूप छान पूर्ण केली. महाराष्ट्र व गोव्याचा पूर्ण ऐतिहासिक तसेच भौगोलिक अभ्यास तिने पूर्ण केला.
आज शेवटचा दिवस ट्रेनिंग चा. शेखावत सरांनी दोघांना केबिन मध्ये बोलवून घेतले. पुढील प्लॅन त्यांनी डिस्कस केला आणि वीराला त्यांनी रात्रीच्या गाडीने घरी जाण्यास सांगितले. आता तिची खरी परीक्षा, तिचं खर काम सुरू होणार होतं.
" वीरा तुझी लढाई ही आता संयम आणि बुद्धीची असेल. सोंग घेणं खूप सोपं असतं पण ते सोंग वठवण मात्र खूप कठीण. त्यासाठी त्या सोंगाचा खूप बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तहेरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणं आवश्यक असतं. आणि माझा विश्वास आहे की तू यात नक्कीच यशस्वी होशील." शेखावत सर गहिवरून बोलत होते. तिने त्यांचे आशीर्वाद घेतले. "मी तुमच्या विश्वासाला खरी उतरेन सर."
संध्याकाळी गाडीला सोडायला धैर्य विरसोबत गेला. दोघांनाही भरून आले होते. इतक्या दिवसांच्या सोबतीत कळत नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आता वीरा पुन्हा कधी आणि कशी दिसेल हे धैर्य ला माहीत नव्हतं.
" वीरा काळजी घे. आठवण येईल मला तुझी" धैर्य म्हणाला तसं विराने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे मागे वळून पाहिलं आणि ती त्याच्या मिठीत शिरली.
" धैर्य मला माहिती आहे सगळं पण आत्ता आपल्या देशाला आपली जास्त गरज आहे. मी आशा करते की आपण लवकरच भेटू." वीरा
"नक्कीच वीरा! I'm proud of you my girl. मी वाट पाहीन तु यशस्वी होऊन येण्याची." धैर्यने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.

सकाळी वीरा घरी पोहोचली. तिला पाहून घरचे खुप खूष झाले. ती ही खूप गहिवरून गेली. खुप वाईट वाटतं होत तिला की ती तिच्या घरच्यांना आता दुखावणार होती. पण देशापेक्षा मोठं काहीच नव्हतं तिच्यासाठी. २ दिवस झाले, विराचे खूप लाड चालू होते.
ठरल्या प्रमाणे ती त्या रात्री उठली, हळूच दरवाजा उघडून तिची बॅग घेऊन ती निघून गेली. सकाळी उठल्यावर ती दिसेना म्हणुन घरात एकच गोंधळ चालू झाला. तोच बाबांना त्यांच्या रूम मध्ये एक लेटर मिळालं. तिनेच ठेवलं होतं ते!
प्रिय बाबा,
आय एम सॉरी. मी तुम्हाला खूप दुखावून चालले आहे. आशा आहे तुम्ही मला माफ कराल. माझं एका मुलावर खूप प्रेम आहे बाबा. तो खूप गरीब घरचा आहे त्यामुळे तुम्ही त्याला स्वीकार कराल असे मला वाटत नाही. मी त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा आम्ही तुमच्या समोर येण्याच्या पात्र होऊ तेव्हा आम्ही स्वतः येऊ. स्वतःची, अर्जुनची आणि आईची काळजी घ्या.
- वीरा.

लेटर वाचून बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आई जोरजोरात रडायला लागल्या. इतके दिवस ताठ ठेवलेली मान अचानक झुकली होती. मुलीवर डोळे झाकुन ठेवलेल्या विश्र्वासाला तडा गेला होता. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये बदनामी झाली. यातून सावरण्यात त्यांना खुप वेळ गेला. अर्जुनला तर अजूनही पटत नव्हते की त्याची ध्येयवेडी वीर अस काही करू शकेल. पण सर्वांच्या मनातील तिच्या प्रेमाची जागा आता रागाने घेतली होती.
इकडे गेटअप बदलून वीरा गोव्याला पोहोचली. २ आतंकवादी कुठे आहेत याची माहिती त्यांना होती. पण अशी देखील माहिती होती की त्यांचा देशाकडून त्यांच्या सेक्युरीटी साठी पूर्ण बंदोबस्त केला होता. त्यात भरीस भर म्हणजे आपले राजकारण. बऱ्याच मोठ्या व्यक्तींची या गोष्टीला साथ होती. त्यामुळे त्यांना डायरेक्ट अटक करणे म्हणजे इतर लोकांच्या जीवाशी खेळ ठरला असता. म्हणूनच विराची या कामासाठी निवड करण्यात आली होती.
ते आतंकवादी ज्या फ्लॅट वर रहात होते त्याच्या शेजारीच वीरा राहायला गेली. टुरिस्ट म्हणून ती तेथे वावरू लागली. थोडे दिवस गेल्यानंतर तिने त्या दोघांशी ओळख केली. वीरा दिसायला अगदी सुंदर होती. उंची ५.५', गोरा रंग, लांबसडक केस आणि अंगात नेहमी मॉडर्न कपडे. अशी ती तिथे राहायची. तिने घातलेल्या ग्रीन लेन्स मूळे तर तिचे डोळे घारे दिसायचे. ती आणखीनच सुंदर दिसायची त्यात. ते दोघेही आता तिच्या मागे मागे करू लागले होते. तिच्या प्रेमात ते इतके अडकले की ते ख्रिस्त नसून मुस्लिम आहेत, तिथे खोट्या नावाने राहतात हे देखील सांगून टाकले.
एक दिवस वीराने त्या दोघांना क्रुझ टुर वर येण्याबद्दल विचारले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी होकार दिला. वीरा छान तयार झाली. एक छानसा रेड पार्टी गाऊन तिने घातला, त्यावर हलकासा मकअप आणि हलकीशी ज्वेलरी. खूपच छान दिसत होती वीरा. दोघेही भुलले होते.
ठरलेल्या क्रुझ वर तिघेही जमले. तिचे काम होते त्यांना गोवा बॉर्डर मधुन बाहेर काढणे. महाराष्ट्र बॉर्डर मध्ये पोहोचल्या नंतर महाराष्ट्र पोलीस आपले काम करू शकणार होते. कारण त्यांना पुरवलेली सेक्युरीटी ही फक्त गोवा एरिया पुरती मर्यादित होती.
त्यांच्यासोबत लंच व बाकी गप्पा करत तिने त्यांना बिझी ठेवले. त्यामुळे बोट गोवा सोडून शिरोडा एरिया मध्ये कीवा आली कळलेच नाही. तिथे धैर्य आणि त्याची टीम तयार होती. आज ६ महिन्या नंतर त्यांचं मिशन सक्सेस होणार होतं. या दरम्यान आणखीही बरेच घातपात देशामध्ये झाले होते. बोट पोहोचताच धैर्य व त्याच्या टीम ने आत शिरकाव केला व दोघांना ताब्यात घेतले. वीराला इतक्या दिवसांनी पाहून धैर्यला भरून आले. दोघेही एकत्रच मुंबईला आले.

जीवाचा धोका, शारिरीक संबंधांचा धोका, कोणाही ओळखीच्या व्यक्तीशी काही संपर्क नाही. अशा कठीण परिस्थितीतून वीरा ने आपले मिशन पूर्ण केले होते. इतकेच नाही तर या ६ महिन्यात तिने त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉप मधुन त्यांच्या पुढील प्लॅन्स ची माहिती काढली होती. देश खूप मोठ्या संकटातून वाचला होता. शेखावत सर व धैर्य यांचे मीडियाने खूप कौतुक केले. पण त्यांच्या यशामागे कोणाचा हाथ होता हे फक्त त्या दोघांनाचं माहिती होतं. त्यांना अभिमान होता आपल्या नविन गुप्तहेरचा!

पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र अशी घडली की शत्रूंना माहिती मिळाली की त्यांच्या दोन लोकांना पकडण्यात एका मुलीचा हाथ आहे. आणि त्यांनी तिच्या बद्दल माहिती काढण्यास सुरवात केली. आता मात्र वीराला कधीच जगासमोर येऊन चालणार नव्हतं. फॅमिलीला रिस्क मध्ये टाकून त्यांना भेटायला जाणं तिला मान्य नव्हतं. आता गुप्तहेर असणं हीच आपली लाईफ हे तिने मान्य केलं

त्यानंतर सतत १३ वर्ष ती वेगवेगळे मिशन करत राहिली. पाकिस्तान, काश्मीर, इराण, अमेरिका, दुबई अश्या ठिकाणी राहून तिने देशाला वाचविण्यासाठी मदत केली. कधी स्कूल टीचर, कधी भिकारी, कधी भाजीवाली तर कधी अगदी सेक्स वर्कर च्या एरिया मध्ये राहून तिने खूप महत्त्वाची माहिती आपल्या खात्याला पुरवली.
२-३ वर्षातून एकदा ती आणि धैर्य भेटायचे. धैर्य ने ही आता मान्य केले होते की हीच त्यांची लाईफ आहे. त्याने देखील कोणाशीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ते जेव्हा भेटायचे तेव्हा फारसे काही बोलत नसत. फक्त एकमेकांचा हात हातात घेऊन तासन् तास बसून राहायचे. असेच दिवस जात होते. वीरा तिच्या प्रत्येक कामात यशस्वी होत होती. कधी कधी २-३ दिवस खायला अन्न मिळत नसे पण तरीही ती तीच काम चोख बजावतं होती. घरच्यांच्या येणाऱ्या आठवणीचा तिने तिच्या कामावर बिलकुल परिणाम होऊ दिला नाही.
कौटिल्य याने त्याच्या एका अर्थशास्त्रीय ग्रंथात राज्य या संकल्पनेला मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान मंत्री परिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बहु तर गुप्तहेर म्हणजे राज्य रुपी शरीराचे डोळे आणि कान असे म्हणले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिध्दांत त्याने मांडला आहे.
वीराने देखील तिच्या मातृभूमीचे डोळे आणि कान बनून मातृभूमीला नेहमी सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. तीच नाव देशातील सर्वात सजग आणि विश्वासू गुप्तहेरांमध्ये गणल जात होत. ज्या देशात जायचं त्या प्रत्येक देशाची भाषा, तिथल राहणीमान, पेहराव ती आत्मसात करत होती. या सर्वांचा साक्षीदार होता धैर्यशील. आपल्या विरावर नेहमी गर्व करायचा तो.
असच दिवस सरत गेले आणि एक दिवस खबर आली की भारतामधून बऱ्याच मुलींची विक्री दुबई ला होते आहे . खूप नाजूक असल्यामुळं या केस च्या टीम मध्ये विरा च नाव घेण्यात आले. प्लॅन नुसार ती त्या लोकांच्या जाळ्यात फसली आणि तिची निर्यात देखील दुबई ला करण्यात आली . तिथेच ते तिला पोचायचं होत . बाकी टीम लगेच च दुबई ला पोचली.
बऱ्याच दिवसांच्या निरिक्षणाने तिने त्या लोकांच्या बऱ्याच सवयी ओळखल्या. ज्याचा तिला पुढे उपयोग होणार होता. जे लोक हे रॅकेट चालवत होते त्या लोकांच्या फॅमिली बद्दलची इन्फॉर्मेशन तिने काढली व त्यांना आपल्या टीम ला ताब्यात घ्यायला लावले.
दिवस ठरला आणि ठरल्या प्रमाणे तिच्या टीम ने ती ज्या प्लेस ला होती त्या प्लेस वर अटॅक केला. वीराच काम होत तिथल्या मुलींना एखाद्या सेफ वे ने बाहेर काढून एका सेफ ठिकाणी नेन. त्याप्रमाणे अटॅक झाल्यावर जेव्हा सगळे गोंधळले त्याच क्षणाचा फायदा घेऊन ती बाकी मुलींना घेऊन चोर वाटेने बाहेर पडली. पण म्हणतात ना प्रत्येक वेळी सगळं परफेक्ट नाही होऊ शकतं. या वेळी तेच झालं. त्यांच्या मागून त्या रॅकेट मधले २ लोक आले.जशी वीरा त्यांच्या ठरलेल्या प्लेस ला पोहोचली , त्या दोघांनी तिच्यावर हल्ला केला . तिने देखील त्यांच्या फाईट ला उत्तर दिलं. एकाची अवस्था त्याला चालता ही येणार नाही अशी करून टाकली तिने. पण त्याच वेळी दुसऱ्याने त्यांच्यातल्याच एका मुलीवर गोळी चालवली. तिला वाचवण्यासाठी वीरा आडवी आली आणि तिच्या छातीला गोळी लागली आणि ती खाली पडली.
आता मात्र आपला जीव आपल्याच हातात आहे अस मुलींच्या लक्षात आल आणि त्यांनी त्या दुसऱ्या क्रिमिनल वर एकत्र अटॅक केला. अचानक झालेल्या ग्रूप अटॅक मूळ तो पुरता जखमी झाला. तेवढ्यात तिथे वीराची बाकीची टीम आली . ती बेशुद्ध पडली होती. तिला तातडीनं हॉस्पिटल ला हलवण्यात आले. बाकी मुलींना सेफली त्यांच्या घरी पाठवण्यात आले. आज वीरा मुळे शेकडो मुलींचे प्राण वाचले होते.
वीराला लगेच ऑपरेशन थिएटर ला घेण्यात आले. धैर्याच्या कानावर बातमी पडताच धैर्य तर पुरता कोसळून गेला. तो लगेच च दुबई ला जायला निघाला. पण तो पोहोचण्या आधीच वीरा हे जग सोडून गेली होती. शेवटची भेट सुद्धा त्यांच्या नशिबी नसावी हेच दुर्दैव!
स्वतःला सावरुन धैर्याने हॉस्पिटल च्या लास्ट फॉर्मलीटीज कंप्लीट केल्या . व ते तिचे शव घेऊन कोल्हापूर कडे रवाना झाले. शेखावत सराना ही बातमी कळताच ते देखील तातडीने कोल्हापुरात दाखल झाले. घराबाहेर पोलिस ऑफिसर ची गाडी पाहून विक्रांत राव अचंबित झाले. शेखावत सरांनी विक्रांत, अर्जुन आणि अभयाला समोर बसवून घडला सगळा प्रकार सांगितला . त्या तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली . ज्या मुलीने आपल नाक कापल अस आपण म्हणायचो तिने तर पूर्ण देशाची मान उंचावली. त्यांचा उर भरून आला. पण आता आपली मुलगी आपल्याला कधीच दिसणार नाही या विचारानेच ते घाबरले.
आपल्या मुलीचं शव तिरंग्यात पाहून आज सरदेशमुखंना गर्व वाटत होता तिचा. वीराराजे ...अगदी नावाप्रमाणेच जगली!.
अलिकडेच गुप्तचर यंत्रणां बद्दल जे संशोधन किंवा जो अभ्यास झाला आहे, त्यांनी गुप्तहेरांच्या यश- अपयशाचे एक महत्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे अज्ञात राहणे ! गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहिला, तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक ही असेच अज्ञात राहिले. पण ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपशी आहे ना दस्त्रखुद्द इतिहासापाशी!! तसेच काहीसे माझ्या लेकीचे कदाचित. विक्रांत राव विचार करत होते.
तेवढ्या एक ३-४ वर्षाची छोटी गोड मुलगी विक्रांत रावांना बोलवायला आली.
" बाबा मी तुमच्यासाठी जेवण आणू? तुम्ही मला गोष्ट कधी सांगणार बाबा?"
विक्रांत राव आशच्र्याने तिच्याकडे पाहू लागले . एक cute smile तिच्या चेहऱ्यावर होती.
" बाबा, ही अवनी वीराराजे सरदेशमुख. बेटा तू बाहेर खेळ . बाबा येतीलच हा इतक्यात" धैर्यशील म्हणाला तशी ती " ओके डॅडा " अस म्हणून खेळायला निघून गेली.
विक्रांत राव पूर्णपणे संभ्रमात होते. " सर मी समजलो नाही. ही तुमची आणि वीराची..."
" तुम्ही समजता तस काही नाही बाबा. अवनी वीराला ३ वर्षापूर्वी रस्त्यावर पडलेली सापडली. तेंव्हापासून वीराने तिला स्वतःच नाव दिले माझ्याकडेच असते ती . " धैर्य म्हणाला ट्स विक्रांत रावांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. आपल्या मुलीबद्दल त्यांना आणखीच अभिमान वाटला .
" तुम्ही आणि वीरा... नाही म्हणजे ती डॅडा म्हणाली म्हणून.." विक्रांत
" आमचं प्रेम होत एकमेकांवर पण त्याहीपेक्षा तीच आपल्या देशावर खूप जास्त प्रेम होत. नात्यांपुढे आपल्या मातीच रक्षण माझ्या वीराने चुझ केलं. मला अभिमान आहे तिचा." धैर्य
विक्रांत रावांचा उर् गर्वाने फुलून आला. त्यांनी धैर्य ला उराशी घेतल आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हाथ फिरवला.
बघता बघता २ महिने उलटले. आज १५ ऑगस्ट. आज सर्व न्यूजपेपर ची एकच हेडलाईन्स होती, कोल्हापूर च्या रणरागिणी वीराराजे सरदेशमुख यांचा मरणोत्तर Presidenst Gallentry पुरस्कार देऊन सन्मान!!
सरदेशमुख कुटुंबाला अभिमान होता आपल्या मुलीचा..
" बाबा येताय ना खेळायला..? " बाहेरून आवाज आला तसे विक्रांत राव हसतच बाहेर गेले.
त्यांच्या लाडक्या अवनी सोबत लपाछपी चा डाव रंगला त्यांचा.....!!!