sutka part 8 in Marathi Short Stories by Sweeti Mahale books and stories PDF | सुटका पार्ट 8

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

  • ભાગવત રહસ્ય - 118

    ભાગવત રહસ્ય-૧૧૮   શિવજી સમાધિમાંથી જાગ્યા-પૂછે છે-દેવી,આજે બ...

Categories
Share

सुटका पार्ट 8

सुंदर माडाच्या रांगा पसरल्या होत्या. पलीकडून आमराईच सुंदर दर्शन होतं होतं. सकाळची गुलाबी थंडी अजून ही ओसरली नव्हती. हलकं हलकं धुकं रस्त्यावर पसरलं होतं. कोवळं ऊन उबदार वाटत होतं. लांबून मोरांच्या म्याव म्यावचा आवाज. त्यात किलकीलणारी पाखरं वातावरण प्रसन्न करत होती. सुंदर वाटत होतं कसं सगळं.

“सुरे ऐकतेस का? तुला आठवत का गं? आपण सोबत जेवायला बसलो तर तू माझा डब्बा आणि सोबत तुझा डब्बा सुद्धा संपवायची. तरी एवढी बारीक कशी दिसतेस ग?”

“म्हणजे फक्त बारीकच दिसते, साडी कशी आहे सांगितलं नाही?” मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत प्रश्न केला.

“साडी ही छान आहे.” त्याने तोळ्यावर मोजून देतात तस कौतुक केलं त्याचा मात्र मला रागच आला. तरी मी तो काही दाखवला नाही.

“अरे माझं सोड तू ही जादू कशी केली. ते सांग मला अजून ही आश्चर्य वाटतय की तूच आहेस म्हणून, एवढा कसा बदलला?” मी हसून त्याच्या कडे पाहिलं.

“तीच तर गोष्ट जिने मला खरं रूप दाखवलं. तिरस्काराचं. लोकांना सुंदरता एवढी का भावते ग? सतत मी अपमान सहन करत आलो सतत चे टोमणे. मी म्हणजे लोकांना हसण्याच आणि थट्टेच हक्काचं ठिकाण होतो. प्रत्येक जण मला हसून पुढे निघायचा. मी जरी चेहऱ्यावर हसू आणत असंलो तरी मनातून खुप अस्वस्थ व्हायचो. मला ही काही स्वप्न होती त्या वयातल्या अल्लड भावना होत्या पण आपल्याकडे लक्ष लोक तेव्हा देतात जेव्हा आपण एकतर सुंदर दिसू. नाहीतर अतिशय कुरूप माझी कॅटेगरी मला समजली होती. एक जाडा आणि लठ्ठ मुलगा या पलीकडे माझी ओळख ही नव्हती.”

त्याच्या मनातली घुसमट त्याच्या शब्दांतून जाणवत होती. मी ही त्याच थट्टा करणाऱ्या लोकांमधलीच एक होते. क्षणभर मला काय बोलावे ते ही सुचेना.

“माहितीय माझं ही एका मुलीवर प्रेम होतं, खुप आवडायची मला ती. कधी बोलू शकलो नाही. कारण ती ही मला माझ्या लठ्ठपणा मुळेच ओळखत होती. यापलीकडे काहीच ओळख नव्हती माझी. एवढा वाईट तर नव्हतो मी?”

काही वेळ असाच शांततेत गेला. मीही हसणाऱ्यांमधलीच एक होते. स्वतःचच वाईट वाटलं मला त्या वेळी. पण काश ती मुलगी मी असं ते. असं क्षणभर वाटलं.

चालत आम्ही दूरवर एक टेकडीकडे निघालो. तिथून गावच एकंदर दृश्य दिसत होतं. दूरवर पसरलेल्या माडाच्या बागा, आमराई, चिंचेची बनं आणि मोर, कोकिळा, पक्षी यांचा संमिश्र चिवचिवाट ऐकायला किती मोहक वाटत होतं. मन अगंदी असं मोरपिसा सारख हलकं झालं होतं.

“चला मॅडम आता मस्त जेवणावर ताव मारू आपण.” थोडं खाली उतरून गेल्यावर एका जागी काही तरी छान अशी रचना दिसत होती. छान पसरलेलं धुकं त्या कच्च्या पाऊल वाटां आणि सुंदर लाकडी टेबल. बसायला दोन खुर्च्या, हिरवा लांबवर पसरलेला हिरवा बगीचा आणि तिथून दिसणार गावाचं सुंदर रूप. मला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एवढं ही सुंदर काही असतं. त्याने अदबीने ‘मॅडम बसा’ असं म्हणत खुर्ची सरकवली. मला तर जणू स्वर्गात आल्याचा भास होतं होता.

“लोढू… तू केलं हे सगळं?” मी भीरभिरल्या नजरेने ते सगळं नजरेत साठून घेत होते.

“जास्त नाही गं. इथे मुळातच सुदंर देणगी दिली आहे गावाला निसर्गाने. फक्त टेबल तेवढा जमवला. संध्याकाळी तुझं हेच काम करायला आलेलो.”

“ओह लोढू. तू किती करतोस माझ्यासाठी. जेवढ्या प्रेमाने मी त्याच्याकडे पाहत होते तशाच नजरेने तो ही पाहत असावा असं मला वाटलं. पण ते क्षणभरच. रामा गरमागरम जेवण घेऊन हजर होता. पुन्हा एकदा असं वाटलं की कितीतरी दिवसांनी मी असं पोटभर जेवतेय.

दुपारी जेवण झाल्यावर ही आम्ही बऱ्याच जागा पहिल्या. खूपच सुंदर निसर्ग अनुभवत होते मी. संध्याकाळी आम्ही परत यायला निघालो. दिवसभरात माझी मात्र अथक बडबड चालू होती. पण तो मात्र शांत… मला फारस काही स्पष्टपणे तो बोलला नसला तरी त्याच्या मनात काहीतरी घुसमट चालु आहे एवढं माझ्या नक्कीच लक्षात आलं होतं.

“पण मी काय इथे कायमची राहणार नाही. निदान काही वेळ तरी आनंदात जाऊदे आणि प्लिज जे असेल ते बोलायच आणि मोकळं व्हायचं, रिलॅक्स राहायचं तर तू हा असा घुम्या सारख राहतो. तुला हे असं आळणी आणि बेचव आयुष्य कधी पासून आवडायला लागलं. मी बराच वेळ ची शांतता भंग केली. त्याने हसून माझ्याकडे पाहिलं. रात्रीचं जेवण उरकून आम्ही पुन्हा तसेच माझ्या खोलीत बसलो होतो. माझ्या हातातलं पुस्तक त्याने ओढून स्वतः त्यात डोकं घालून बसला होता. ते मात्र मला काही बघवेना. तो काहीसा गलात हसला. मी त्याच्याकडे पाहून हलकेच हसले.

“पण आज सहा सात वर्षे उलटून गेली, तरी तुला माझी प्रत्येक आवड लक्षात आहे. मला निसर्गाच्या जवळ जायचंय. काही ठिकाणं मी मनातल्या मनात रेखाटून तुला गंमत म्हणून सांगितलेली ती तू अजून लक्षात ठेवली. मला जेवणात काय आवडतं? एव्हढंच काय, मला आवडणारी चव देखील तू लक्षात ठेवली आणि ते जेवण तूच बनवलं होतं ना? खरं सांग?”

माझ्या लक्षात गोष्टी आलेल्या दिसल्यावर त्याला काय बोलावे सुचेना. त्याने मला उत्तर देणे टाळावं म्हणून हातातलं पुस्तक तोंडावर ठेवून झोपायचा प्रयत्न केला. कदाचित त्याला भावनिक व्हायला आवडत नसावे. आधी तर तो असा नव्हता. “मी काय बोलतेय?” मी चिडून तो बसलेल्या लाकडी सोफ्याकडे धाव घेतली. मला उत्तर दे! कधी पर्यंत असं गप्प बसणार? तो तोंडावर पुस्तक घेऊन तसाच पडून राहिला. आता मात्र माझी चिडचिड झाली. “बाय, गुड नाईट.”

झोपायचा प्रयत्न करू लागले खरी पण झोप काही येईना. एक दोनदा चोरून त्याच्या कडे पाहिलं. तो मात्र त्याच स्थितीत पहुडला होता. हु, काहीश्या रागाने मी कूस बदलली.

काही वेळ पुन्हा शांततेत गेला असेल कानावर आवाज पडला, “तू आंधळा विश्वास ठेवून आली. माझ्यावर हेच मोठं दडपण आहे माझ्यावर.”

“म्हणजे?” मी आश्चर्याने त्याच्या कडे पाहिलं.

“तू उद्याच परत जा.” तो त्याच स्वरात उद्गारला.

“म्हणजे तू मला सरळ सरळ हाकलून लावतोय?” मी चिडून उत्तरले.

“तस नाही. पण समजून घे इथे जास्त ठीक नाही. सतत भीती असं ते. जंगली प्राणी सुद्धा येतात सरळ आत पर्यंत. तुझी जबाबदारी आहे माझ्यावर आणि उद्या काय आणि दोन तीन दिवसाने काय परत तर जायचंच आहे ना? उद्या मी तुला बसवून देतो बसमध्ये जा निवांत.” तो आता आपल्या जागेवरून उठून बसला.

“म्हणजे मला लगेच काढून द्यायचा तू प्लॅनच केला आहे तर.” मी थंड आवाजात बोलल्यावर त्याला काय बोलावे सुचेना. तो त्या सोफ्यावरून उठून त्या लाकडी दिवाणाच्या कोपऱ्यावर येऊन बसला. आमच्यात जास्त काही अंतर नव्हतं मला त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. त्या मिणमिणत्या उजेडात देखील त्याच्या चेहर्या वरची काळजी मला स्पष्ट दिसत होती.

“मला माहीत आहे तू काहीतरी लपवतोयस माझ्या पासून.” मी पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत विचारलं.

“काही काय, उगाच काही शंका आणू नको मनात. झोप आता निवांत आणि हो उद्या सकाळी निघायचंय विसरू नको.”

तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन शांत झोपला. पुन्हा तो तसाच दुसरीकडे तोंड करून निवांत पडला होता. त्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात त्याच्या हातावरच्या लाल रेषा दिसल्या जणू कोणी ओरखडून घेतलं असावं. त्याला विचारावेसे वाटलं पण एक गोष्ट आठवली.

आल्या पासून वापरतली ही एकच खोली मी पाहिली. पूर्ण वाडा तर अजूनही पहिला नाही. आल्या आल्या वरच्या कधी कधी वापरात येणाऱ्या दोन तीन खोल्या मी पहिल्या.