Live in ... Part- 10 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | लिव इन... भाग- 10

Featured Books
Categories
Share

लिव इन... भाग- 10

रावी आता सगळ टेन्शन विसरून, अभ्यासाकडे लक्ष देत होती . पण, तिच्या अयुषात टेन्शन कमी नव्हते .पण, रावी ही खूप धीराची होती . सगळे आता
अभ्यासाला लागले होते .आता गाठी भेटी कमी झल्या होत्या .फोन, मेसेज वर बोलण फक्त अभ्यासाबदल च होत . रीधीमा ही मन लावून अभ्यास करत होती .
जाहाले, वेळ कसा भरभर निघून गेला .आणि आता परीक्षेचा दिवस उजाडला . सगळे एकमेकां ना ओल्ल द बेस्ट म्हणून पेपर लिहायला निघाले . सगळ्याना पेपर खूप छान गेले .आता खरी कसोटी ची वेळ होती .ती म्हणजे रिज़ल्ट ची आणि त्याच रिजल्ट वर अवलंबून असणाऱ्या नोकरीची... पण त्याच आतच कोणी टेन्शन घेतल नव्हते .सगळे होस्टेल वरून घरी जायला निघाले .घरच्यांना खूप दिवसानी भेटायला मिळणार म्हणून सगळेच खूप खुश होते . घरी गेल्यावर काय गंमत जमत करणार ते सगळे एकमेकाना संगत होते .पण, रावी शांत होती . तिला ही घरची खूप आठवण येत होती . पण ....घरी जाणे शक्य नव्हते . आणि आता त्याचा विचार करून ही उपयोग नव्हता .त्यामुळे रावी ने जवळच ओळखीने हॉटेल वरती एक रूम बघितली .आणि पार्ट टाईम छोटासा जॉब ही बघितला होता . त्यात फार असे पैसे तर मिळणार नव्हते. पण, जेवढे मिळणार होते, त्यात रावी अड्जस्ट करणार होती . हे सगळे रावी ने गँग मधल्या कोणालाच संगितले नव्हते .पण, ह्या सगळ्या बाबत अमन ला कल्पना होती . त्याला माहीत होते, थोडीशी ओढाताण होणार आहे, पण, काही जाहाले तरी रावी ला तो अस एकटीला सोडू शकत नव्हता .म्हणून गँग मधे कोणाला ही न सांगता, त्याने एक जॉब पकडला, आणि तिथेच एक ओळखीने रूम ही घेतली . जाहाले, घरी जायचा दिवस उजाडला .सगळे आपापले ब्याग घेऊन घरी जायला निघाले . आता परत कधी भेटणार ते कोणालाच माहीत नव्हते . नवीन दिशा त्याच्या वाट पाहत होत्या .रावी ही बँग घेऊन हॉटेल मधे शिफ्ट जाहाली . हॉटेल मधे सगळ्या सुख सोयी होत्या, तरीही तीच मन तिथे रमत नव्हते, कसलीतरी, वेगळीच भीती वाटत होती .रावी, खूप बिनधास्त अशी मुलगी होती, तरीही तिला भीती वाटत होती .पण थोड्याच दिवसांत तिची ती भीती ही गेली .आता ती ऑफीस मधे ही रमली होती, पार्ट टाईम ऐवजी आता ती फुल्ल टाईम काम करू लागली . थोडे थोडके पैसे त्यातून तिचे वाचत असे ....तिचे काही नवीन मित्र मैत्रीण ही जाहाले होते ....रावी आता ऑडिशन सूध्हा देऊ लागली होती .....पण तिला फारस अस काही काम मिळाले नव्हते . तिला फार मोठी हेरॉईन बनायचे होते .
ई कडे अमन ही चांगलाच रुळला होता, अमन फुल्ल टाईम जॉब करून, एक छोटासा पार्ट टाईम जॉब ही करत असे .....त्याच्या घरची परीस्तीथी तशी असल्यामुळे त्यला तस करावंच लागणार होत .पण, तरीही त्याची नजर मात्र रावी वर कायम अस्याची, तिच्या गरजेच्या वेळी तो तिथे नेहमी हजर असायचा . हळू हळू रावीला हे समजले होते, की अमन आता ऐथेच राहून जॉब करतोय ....मग तिनेच अमन पुढे लिव इन मधे राहण्याचा प्रस्ताव मांडला... मग, काय, अमन ला ही एकट्याने राहण्याचा कंटाळा येत होता . आणि रावी वर लक्ष ही ठेवावे लागत असल्यामुळे त्याची ती दोन्ही कामे होणार होती .त्यामुळे तो तयार झाला.
आता एकत्र राहताना दोघेही खूप खुश होते .दोघांनी ही आपापली कामे वाटून घेतली होती . दोघेही भांडण करत, गप्पा मारत, एकमेकांच्या कामा वरच्या गमती जमती सांगत .....दोघे ही खूप आनंदी राहू लागले होते ...रावी आणि अमन एकत्र रहायला लागले ले सहा महिने पूर्ण जाहाले होते ......दोघांनीही छोटसं सेलिब्रेशन करून ते साजरे केले .आणि अमन नी रावीला त्याच वेळी प्रपोज केल, रावीला ही अमन आवडू लागल्यामुळे त्याच्या प्रेमात ती कधी पडली हे तिला ही समजले नव्हते .त्यामुळे तिने ही त्या प्रस्तावाला होकार दिला .जेव्हा पासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते, तेव्हा पासून ते जास्त च खुश होते ....सारख फिरायला जाणे, लॉंग ड्राइव ला जाणे, पैसे वाचवून एकमेकाना गिफ्ट्स देणे ....हे सगळ चालू होत ....पण, आता ...रावीला एका सेरियल्स मधे रोल मिळाला, रोल काही मोठा नव्हता ,....छोटासा च होता पण रावी त्या साठी खूप मेहनत करत होती . त्या मुळे तिला यायला खूप उशीर होत असे .....शिवाय शकली लवकर जाणे..... आणि जेव्हा कधी मधे तिला थोडाफार वेळ मिळत असे, त्यावेळी अमन च ऑफीस असे ....त्यामुळे त्या दोघांमध्ये संवाद फार कमी होऊ लागला होता . हळू हळू तर त्या दोघांना एकमेकाचे चेहरे ही दिसत नव्हते .मग, ह्या सगळ्यातून एके दिवशी अमन ने च तोडगा काढायचा ठरवला .चार पाच दिवसानी रावीचा वाढदिवस होता .....त्याने त्या दिवशी महाबळेश्वर ला फिरायला जाण्याचा प्लान केला .महाबळेश्वर ला गेल्यावर दोघानाही मोकळा वेळ मिळेल .मस्त गप्पा मारता येतील, म्हणून अमन ने हा प्लान केला होता . त्याने तशी रावीला कल्पना ही दिली .पण, प्लान ऐकून ....रावी ने त्याबदल काहीही बोलली नाही . ई कडे अमन ने तयारी चालू केली . दोन दिवसाचे हॉटेल चे बूकिँग ...जाण्या येणाचा बूकिँग ...त्याने रावी साठी गिफ्ट ही घेतल होत . आता फक्त तो रावीच्या वाढदिवसा चा दिवस कधी येतो, त्याची वाट पाहत होता . आणि एकदाचा तो दिवस उजाडला .....अमन लवकरच उठला, होता ...रावी उशिरा आल्यामुळे तिला त्याला रात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आल्या नाहीत . पण,सकाळी उठून पाहतो तो काय? रावी तिच्या रूम मधे नव्हती . अमन ने तिला फोन केला, तेव्हा समजले की, ती सकाळी लवकर उठून शूटिंग ला गेली सूध्हा .....अमन ला तिचा थोडा राग च आला ....ई तर वेळी .... तो तिच्या कामात कधीच लुडबुड करत नसे ....पण आज ...तिला सगळ्या प्लान बदल माहीत असून ती अशी वागली .....का वागली ...असेल ती? एक दिवस सुट्टी घेतली असती, तर काय जाहाले असते ...... आणि, जर ....सुट्टी घ्याची नव्हती ....तर, सांगायच होत आधी ....अमन ला रावीचा खूप राग आला होता? एवढा की त्या रागापुढे त्यला काही सुचत नव्हते .
पण ...त्याने तो राग आवरला ... कारण त्यला आज चा दिवस खराब करायचा नव्हता . त्यला काही जाहाले तरी, रावी चा वाढदिवस खूप छान साजरा करायचा होता . त्याने ठरवले, महाबळेश्वर ला जरी जाता आले नाही .तरी, संध्याकाळी ती घरी आल्यावर तर, तिचा वाढदिवस साजरा करू शकतो . अमन लगेच तयारीला लागला .तिला सेर्प्रीज देण्या साठी त्याने तिला काहीच संगितले नाही .
अमन सगळी तयारी करून रावीची वाट पाहत बसला होता .त्याने घर पूर्ण सजवले होते .सुंदर असा केक आणला होता . खूप सऱ्या कन्डेल .....खूप काही आणले होते ......तिला गिफ्ट म्हणून तिच्या आवडती च्या रंगाचा ड्रेस आणला होता . पण किती वेळ झाला, तरी रावी आलीच नव्हती ....आता तर, रात्र च होत आली होती . पण, रावी येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते .