Kalam - E-Ishq - Part 1 La ?? in Marathi Thriller by भाग्यश्वर पाटील books and stories PDF | कलाम - इ-इश्क - भाग १ ला ??

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

कलाम - इ-इश्क - भाग १ ला ??

वास्तविकतेला कल्पनेची जोड मिळाली तर साहित्य अधिक सुंदर आणि मनोरंजक होते, तसेच प्रेमाला विश्वासाची व बंधनाची जोड मिळाली तर प्रेम अमरत्वाला प्राप्त होते........ रुही थोडीशी घाईगडबडीतच उठली, रात्री प्रोजेक्ट पुर्ण करता करता कधी उशीर झाला ते समजलेच नाही, सर्व आटोपून ती तशीच बाहेर पडली, तसा रियाचा फोन आला तिला यार रुही किती वेळ अजुन तुला कालच सांगितले होते ना की अरोहीचा बर्थडे आहे म्हणून लवकर ये यार केक कापण्यासाठी सगळे तुझा वेट करत आहेत कम फास्ट यार , रुहीने फोन कट केला व दरवाजा पायानेच ढकलत ती बसच्या दिशेने वाटचाल करत निघाली,,,,

बसने दहा-पंधरा मिनिटं वाट पाहायला लावली. बसमध्ये तशी घाईघाईतच चढली, आणि मिळेल त्या सीटवर जाऊन ताडकन बसली… कारण पुढच्या सिग्नलनंतरच्या स्टॉपवर बस बऱ्यापैकी फुल्ल होणार, हे माहिती होतं. त्यामुळे खांद्याला लावलेली बॅग काढून ती मांडीवर ठेवून पटकन सीट पकडली. कंडक्टर आले तसे रुहीने पास काढून त्यांच्यापुढे केला. त्यांनी पास मशिनवर तो दोनदा चेक केला. मनात धडधड वाढू लागली आणि मोबाईलमध्ये पटकन तारीख चेक केली.

इतक्यात… “अगं पोरी, पास संपलाय तुझा”, असा आवाज कंडक्टर काकांनी दिला. रुहीला तारीख पाहून आपण पास रिन्यू करायला विसरलो असल्याचं नुकतच कळलं होतं.

“अरे, हो विसरलेच मी”, म्हणत थांबा मी तिकीट काढते, असं म्हणत रुहीने पर्स मध्ये हात घातला,

दिवसंच वाईट आहे, असं फिल व्हायला सुरूवात झाली होती, कारण दहा रुपये नसल्याचा प्रश्न आता निर्माण झाला होता. त्यात मैत्रिणींचे सारखे वाजणारे फोन… खरंच वैताग होत होता. रुहीने काही बोलावं… इतक्यात थांबा काका हे घ्या दहा रुपये… असं म्हणत बाजूच्या सीटवर बसलेल्या एका मुलाने पैसे देऊ केले… रुहीने त्याला नको म्हणण्यासाठी त्याच्याकडं पाहिलं आणि का ते माहिती नाही, पण त्याच्याकडं पाहिल्यानंतर एक वेगळंच फिलींग येऊन गेलं. तरीही रुहीने पटकन सावरून त्याला नको, असं म्हटलंच… त्याने राहू देत गं… तीन रुपये तर आहेत. नंतर बघू. असं म्हणत कंडक्टर काकांच्या हातात पैसे दिले. रुहीने तिकीट घेतले आणि त्याला थँक्यू म्हटलं.

पण रुहीने सुरूवात केली… तू नेहमी याच बसने जातोस का? पैसे परत करता येतील या कारणाने विचारून पाहिलं. तो हो म्हणाला. मग मी उद्या तुझे पैसे परत करेन, असं सांगितलं. “चालतं ग.. इतकी काय फॉर्मेलिटी घेऊन बसलीस… असं म्हणतं त्याने विषय संपवला. रुही फक्त हसली रुहीच्या स्टॉपच्या आधीच तो निघण्यासाठी उठला… “चलो, मी निघतो”, रुहीने त्याला बाहेर जाण्यासाठी जागा करून दिली. निघणार इतक्यात त्याने… “बाय द वे आयएम अंश ”, अशी ओळख करून दिली. रुहीने ही हात मिळवला… फक्त हात मिळवला. नाव सांगायचं राहूनच गेलं. त्यानं थांबून… हं म्हटलं आणि रुहीला कळलं.. ‘अरे हो… सॉरी मी रुही’, अशी ओळख करून दिली. मग पुन्हा भेटू… असं म्हणत तो बसमधून उतरण्यासाठी पुढे उभा राहिला. रुही अजूनही अधूनमधून त्याच्याकडं बघत होते… पण तो पाठमोरा उभा होता. नंतर रुही चे लक्षच हटेना… त्याच्याही मनात काहीतरी सुरू होतं, असं रुहीला सारखं वाटत होतं. स्टॉपजवळ थांबण्यासाठी बस स्लो झाली आणि तो उतरण्यासाठी पुढे गेला. रुहीचा त्याच्याकडेच लक्ष होतं आणि उतरताना त्याने मागे वळून पाहिलं…रुहीच्या चेहऱ्यावर हसू होतं… तो बाय असं पुटपुटला… रुहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं… ते त्यालाही कळलं होतं. तो पाहातच होता. उतरल्यानंतरही.

पुढे मग रुहीचा स्टॉप येईपर्यंत रुही … खिडकीतून बाहेर पाहात स्वत:ला गुंतवण्याचा प्रयत्न करत होती . पण सारखं राहूनराहून तोच समोर येत होता. ज्या ठिकाणी तो उभा होता… तिथंच सारखं लक्ष जात होतं… थोडक्यात फक्त ओळखीपुरतं झालेला संवाद सारखा आठवत होता. त्याचही माझ्यासारखंच असंच होत असणार, असंही वाटत होतं. काहीच कळेना… खरंच रुही ब्लँक झाली होती. या काळात मैत्रिणींचे तीन मिस्डकॉल आले होते, पण रुहीने उचलेले नव्हते. फोन आलेलंही रुहीला कळलं नव्हतं. पुढचा संपूर्ण दिवस रुही त्याचाच विचार करत होती … शांत. रुही रोज वागते तशी त्या दिवशी नव्हते… मैत्रिणींनीही रुहीला त्याची जाणीव करून दिली. रुहीने काहीच नाही म्हणून त्यांना टाळलं.

रुही आता त्याच्याच बद्दल विचार करू लागले होती फॉर्मल कपड्यांमध्ये होता, बॅगही होती. म्हणजे तो जॉबला जात असणार… असे अंदाज बांधणे सुरू केले. इतकंच काय… कॉलेजच्या कँटिनमध्ये बसून फेसबुकवर अंश नावाने… शोधाशोध सुरू केली. अडनाव माहिती नसल्यानं कठीण जात होतं. अंश नावाचे जेवढे ऑप्शन आले ते सर्व पडताळून पाहिले पण तो सापडला नाही. मग अंश जाधव असं… स्पेसिफिक सर्च करून शोधण्याचा नालायकपणा देखील केला. पण त्यातही अपयश. दुसऱया दिवशी दहा रुपये परत करण्याच्या इराद्याने तिच बस गाठायची असं ठरवलं. अगदी काटेकोरपणे त्या दिवशी रुही निघाली … म्हणजे काल किती वाजले होते बस पकडण्यासाठी वगैरे वगैरे… असं सगळं वेळेचं गणित करून निघाली होती. स्टॉपवर पोहोचली आणि पाच मिनिटांची वाट पाहिल्यानंतर ती बस दुरून दिसली. स्टॉपवर येऊन थांबली… बसमध्ये चढतानाच रुहीची धडधड वाढू लागली होती. ज्या सीटवर ती दोघे बसली होती… तिथेच रुहीची नजर गेली. अचानक मन निराश झाले… सीट रिकामी होती. मग संपूर्ण बसमध्ये नकळत नजर फिरवली. पण तो कुठेच नव्हता… त्याच निराश मनाने पुढे जाऊन रुही त्याच रिकाम्या सीटवर जाऊन बसली . पुन्हा तो काल बसमधून उतरण्यासाठी ज्या ठिकाणी उभा होता त्याच ठिकाणी राहूनराहून लक्ष जात होतं. रुही इअरफोन्सकाढून मोबाईलवर गाणी ऐकत बसली . स्वत:ला बिझी ठेवू लागली . त्याचा स्टॉप आला… रुहीने खिडकीबाहेर पाहिलं… उगाच शोधाशोध देखील केली. पुढे मग रुहीचा स्टॉप आला… . पुढचा संपूर्ण दिवस निराश होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच बस पकडली… अजूनही रुही चे मनं त्यातच होतं. दुसऱ्या दिवशी त्या सीटवर आधीच दुसरं कुणीतरी बसलं होतं. पण तो नव्हता. हे असं पुढचे बरेच दिवस सुरु होतं… दोन आठवडे…. रुही असं नक्की का वागत होती . काहीच कळत नव्हतं. रुही त्याला खूप आधीपासून ओळखत होती असंही काहीच नव्हतं… पण तरीही रुहीला रुखरुख लागली होती. रुबीच्या मनाची खूप चलबिचल झाली. कशातच लक्ष लागत नव्हतं
मग एक दिवस…अचानक त्या वळणावर,,,
क्रमश: