sansaar - 3 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | संसार - 3

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

संसार - 3

रुही आणि आदित्य ह्याचा साखरपुडा व्यस्तित पार पडला . पाहुणे मंडळी, पण सख्र्पुड्याचि तयारी बघून खुश जाहले होते, दोन्ही घरची मंडळी घरी परतली . पण, आदित्य थोडा कन्फ्यूज़्ड होता, तो सख्र्पुड्या च्या कार्यक्रमांत तिच्याशी बोलायला बघत होता,पण ....तिने प्रत्येक वेळी बोलणं टाळलं. पण, ही गोष्ट मात्र आदित्य च्या मनाला लागली होती .म्हणजे, अस कोणी करत का? अरे, दोन शब्द तरी बोलायचे . तो थोडासा चिढ्लाच होता . साखरपुडा झल्याव र जेवायला बसल्यावर त्याने हळूच फोन नंबर मागितला होता. तिने ही नंबर दिला . पण, नंबर घेताच त्याने तिला मिस्ड कॉल दिल्ता .त्याचा नंबर तिच्याकडे जावा म्हणून, पण घरी येऊन ई त का वेळ निघून गेला, तरी तिचा फोन काही आला नाही .
मग त्यानेच स्वतः हुन फोन करायचं ठरवलं . आदित्य चा स्वभाव खूप शांत होता, त्याला पटकन असा कोणाचा राग येत नसे .पण, जर कोणाचा राग आला तर, तो त्याला सोडत नसे ..... पण, रुहीच्या बाबतीत मात्र तो खूप हळवा होता ....त्याने रुहीला फोन केला, रुहीला पण त्याचा फोन येणं अपेक्षित असल्यामुळे, त्याचा फोन आल्यावर तिला फारसं काही वाटलं नाही ....तिने आदित्य चा फोन उचला, दोघांच हाय, हेलो जाहाले. आदित्य पुढे बोलू लागला .रुही, तू खूप सुंदर दिसतेस .अगदी नक्षत्रासारखी, आणि आज तर खूपच सुंदर दिसत होतीस . रुहीने हळूच थँकयु, म्हंटले . रुहीचा आवाज ऐकून आदित्य पुन्हा म्हणाला, किती, सुंदर आवाज आहे ,तूझा? आदित्य च बोलणं ऐकून रुही एकदमच लाजली . आदित्य आणि रुही च बोलणं जवळजवळ तासभर चालू च होत .रुहीही आदित्य शी बोलून जरा मोकळी जाहली होती . तिला आदित्य च बोलणं फार आवडलं होत . थोडक्यात, तिला आदित्यच आणि तीच पटेल, अस वाटतं होत .
दुसरा दिवस उजाडला, आदित्य आणि रुही एकमेकाशी रात्र भर बोलत होती, एकमेकां ना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती .जोडीदाराच्या आवडी निवडी जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती .त्यामुळे रुही अजून ही झौप्ले होते .रुहीला एत्की वेळ झौप्लेले पाहून, सगळे तिला चिडवू लागले . तिच्या चुलत बहिणी नी तर तिला चिडवून अगदी नको करूंन सोडलं . आता रुहीला ही ते चिड्व्न आवडू लागले होते . आदित्य च नाव घेताच तिच्या ओठांवर अलगद कोणालाही लज्वील अस हसू यायला लागले होते . लग्नाला अजून दोन महिने होते . लग्नामुळे रुहीने जॉब सोडला होता, लग्न झल्यावर ती मुंबई मधेच शिफ्ट होणार होती. आता रुही आणि आदित्य फोन वर जमेल तसे बोलायला लागले होते, रुही घरीच असल्यामुळे ती आदित्य च्या फोन आतुरतेने वाट बघायला लागली होती .तिलाच आश्चर्य वाटायला लागले होते, जो मुलगा तिला पाहता क्षणी अजिबात आवडला नाही .त्या मुलाशी बोल्याशिवाय तिला अजिबात जमत नव्हते ..तिच्या मनाने ते कबूल केले होते .आता आदित्य शिवाय जगणे नाही ........ एके दिवशी आदित्य ने रुहीला भेटायचे ठरवले . तस त्याने तिला सांगितले .आढेवेढे घेऊन शेवटी रुही आणि आदित्य चा भेटायचा दिवस ठरला . आदित्य मुंबई वरून घरातल्या ना काही न सांगता रुहीला भेटायला आला, रुही ने ही कोणाला ही न सांगता ती आदित्य ला भेटायला गेली . दोघेजण भेटले, पण रुही ला थोडसं वेगळ च वाटतं होत, ती पहिल्या दाच अशी एखाद्या मुलाला भेटली होती, तीही कोणाला ही घरी न सांगता आणि ती ही एकटी..... या उलट आदित्य च होत, त्याला वाटतं होत की, रुही ने त्याच्याशी मनमोकळे पणाने बोलावं ,तो एवढ्या लांब त्या साठी च आला होता,तिने एखादं हग एखादं गालावर थोडसं किस तरी करावं . त्याला तर वाटू लागलं होत, ह्या मुली च्या मनात दुसरा कुठला मुलगा तर नाही ना .......त्याने तस अप्रत्यक्ष रित्या तिला विचारले ही ......पण तिने त्याला त्या बदल नकार ही दिला .
ईकडे आदित्य च्या खांद्यावर लग्नाची जबाबदारी, कामाचं टेन्शन ...घरातील जबाबदारी, ,पैशाची जमवा जमव करणे .....सगळं चालू होत. त्यांत रुहीचे कधी कधी फोन आल्यावर तो बिझी असल्यामुळे तिचा फोन उचलू शकत नसे.आणि जेव्हा कधी तिचा फोन उचले, तेव्हा फार दमल्यामुळे त्याला तिच्याशी काय बोलावे काहीच कळत नव्हते . ई कडे रुही ला मात्र त्याचा अस वागणं, त्याचा दुरावा सहन होईना ......त्या तून तो तिच्याशी काही वय्व्सतीथ बौलेना, तिला तर काहीच कळेना , तीच काय चुकलं .... आपल्या दोघांच्या भेटीत त्या वेळी तर काही जाहले नाही .....आदित्यला जर त्या बदल विचारलं, तर तो काम आहे सांगत असे, त्यामुळे रुही ची खूप चिडचिड होत असे . तिची होणारी चिडचिड, तिचे एकट्यात रडणे, तिच्या आई ने ओळखले होते, आज रात्री रुहीशी ह्या बदल बोलायचं तिने ठरवलं होत . रात्री जेवणानंतर मुद्दाम आई ने एक फेरी मारायला जाऊ, म्हणून सांगितले .रुही ही घरात बसून वैतग्ली होती, त्यामुळे ती ही तयार झाली.
दोघी फेरी मारण्यासाठी बाहेर पडल्या, सुरवातीला ईकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या . मग रुहीच्या आई ने विषयाला हात घातला, आदित्य विषयी विचारू लागली, रुहीला ही कोणाशी तरी बोलावे अस वाटतं होते, त्यामुळे तिने ही आदित्य च आजकाल च वागणं तिला पटत नाही, म्हणून सांगितलं . त्याला तिच्या साठी वेळ च नसतो, कधीही फोन केला, तर तो बिज़ी च असतो, आणि नंतर तो स्वतःसुध्दा फोन करत नाही . आणि जर कधी फोन उचला तर, तो नीट बोलत ही नाही. आई, जर मला वाटले, की मझ्या होणाऱ्या नवऱ्याने थोडा वेळ मझ्या सोबत घालवावा तर माझं काय चुकतय. मला, कबूल आहे, त्याचे वडील नाहीत, त्यामुळे त्याला सगळंच बघावं लागत घरचं, पैशाची जमावा जमव .....सगळंच, शिवाय ऑफीस मधले टेन्शन . पण, माझी एकच अपेक्षा आहे, की त्याने मझयशी बोलावं, फोन करावं, ....ह्या सगळ्या बरोबर मी सुध्दा तितकीच महत्वाची आहे ना ....लग्न होणार आहे आमचं ....जर आदित्य मला आताच वेळ देणार नसेल, तर मग लग्नानंतर कसा वेळ देणार तो ...... आणि बरं, स्वतःनी च मला सवय लावली एत्की, की, मला आता त्याच्या शिवाय नाही राहवत ..मी घरातल्या कामात, लग्नाच्या तयारीत स्वतःला रम्वून घेण्याचा खूप प्रयत्न करते, पण तरीही मला त्याची खूप आठवण येते, सारखं फोन कडे लक्ष जात, आता फोन येयील, मग फोन येयील, शंभर वेळा त्या फोन कडे लक्ष जात. पण, फोन काही येत नाही .आई मला अस, वाटतं, त्याला मझयशी लग्न च नाही करायचं? मग, मीच हे लग्न मोडून टाकते . जर आता मी दुःखी राहत असेल, तर मग नंतर तो मला काय सुखी ठेवणार .लग्न झल्यावर नंतर काय करू शकत नाही? रुही च बोलणं ऐकून रुहीच्या आईला खूप आश्चर्य वाटलं, हे आपले संस्कार नाहीत, तिने तस रुहीला स्पष्ट बोलून ही दाखवलं ., नातं, अस तोडता नाही येत रुही .....त्यात समजून घ्याच असतं, आदर करायचा असतो, एकमेकां वर जीवा पाड प्रेम करायचं असतं .पण नातं कधीच तोडायचे नसते .एकमेकां ना वेळ द्या .तो एकटा आहे .लग्नाची तयारीत खरच बीजी असेल तो, लग्न झल्यावर देयील वेळ ....घे थोडसं समजून .